दिनविशेष:- Kiss Day
[अंतरराष्ट्रीय]
१- 'मोदीजी धन्यवाद, पण आज माझा वाढदिवस नाही' - अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी
२- अमेरिका पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानं विकणार, भारताकडून निषेध
३- पाकला विमाने देणारच - अमेरिका
४- अमेरिकेत ख्रिश्चनधर्मियांच्या संख्येत घट - सर्व्हे
५- वॉशिंग्टन; भारतीय वंशाच्या स्त्रीला वीस वर्षांचा तुरुंगवास
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- 'मेक इन इंडिया'च्या सिंहाची आज गर्जना, मोदींच्या हस्ते उद्घाटन
७- दिल्ली; गोळीबार करत तरुणाला लुटलं, चोरट्यांची दहशत सीसीटीव्हीत कैद
८- लष्कराची एक फळीच संपविण्याचा कट; हेडलीच्या साक्षीतून लष्करी महाविद्यालयावरील हल्ल्याची योजना उघड
९- पुण्यात छबाड हाऊसचा बनविलेला व्हिडिओ-हेडली
१०- इशरत जहाँ दहशतवादी असल्याचे प्रतिज्ञापत्र काँग्रेसने न्यायालयापासून लपविले – प्रकाश जावेडकर
११- नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला - IB चे माजी विशेष संचालक राजिंदर कुमार
१२- स्वच्छतेचा प्रसार भाषणापेक्षा कला जास्त चांगला करते - पंतप्रधान नरेंद्र मोदी
१३- 'जेएनयू'तील घोषणाबाजी अस्वीकार्य- राहुल गांधी
१४- आपण असहिष्णुतेबाबत खूप सहिष्णु : अमर्त्य सेन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- बिहार; भाजपच्या उपाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या
१६- मला कोणत्याही फंदात पडायचे नाही- अजित पवार
१७- मुंबई; ‘जेंडर बजेट’च्या माथी पुरुष शौचालयांचा भार!
१८- रस्त्यावर उत्सव साजरे करण्याला धर्म समजणे ही चूकच!- ‘ढोलताशे’मधून केंकरेंची स्पष्टोक्ती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- अजमेर; कर्करोग्यांच्या नावे रेल्वेत पैसे गोळा करणारी टोळी अटकेत
२०- कुपवाडा: चकमकीत दोन जवान हुतात्मा
२१- कोल्हापूर; हा घ्या घरपोच चेक; पण... बनावटच
२२- पुण्यात चोवीस तास पाणी हवे; दरवाढ नको
२३- बिहारमधल्या वजीरगंज येथे ट्रक व कारचा भीषण अपघात झाला असून ६ जण ठार तर ३ जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- भारताकडून श्रीलंकेचा 69 धावांनी धुव्वा, मालिकेत 1-1 ने बरोबरी
२५- अंडर-19 विश्वचषकापासून भारत फक्त एक पाऊल दूर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२६- मुखेड; पाणलोट क्षेत्राच्या कामात लुट, चौकशीसाठी नऊ पथके दाखल
२७- स्वरातीम विद्यापीठ प्रकरणी एसएफआयची निदर्शने
२८- देगलूर; शिवाई प्रतिष्ठानच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना धान्य वाटप
२९- बहुचर्चित नरेंद्र महोत्सवाला आजपासून सुरुवात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
श्रीनिवास कल्याणकर, लक्ष्मीकांत कांबळे, रोहित सोनी, पंकज इंगळे, बालाजी गिरगावकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सुखी आणि आनंदी रहायचं असेल तर समाजात राहण्याचा प्रयत्न करा. एकटे रहाल तर दुखः पदरी पडेल.
(अतुल यादव, नमस्कार लाईव्ह)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
===============================================
'मोदीजी धन्यवाद, पण आज माझा वाढदिवस नाही' - अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांना शुक्रवारी ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण गनी यांनी जे उत्तर दिलं, त्यामुळे दोन्ही नेते ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होते.
मोदींनी ट्विटरवरील शुभेच्छा मेसेज लिहिलं होतं की, “अशरफ गनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो.”
शुभेच्छा मेसेजच्या उत्तरात गनी यांनी लिहिलं की, नमस्कार पंतप्रधान. खरंतर माझा वाढदिवस 19 मे रोजी असतो. पण तरीही तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.
कर्करोग्यांच्या नावे रेल्वेत पैसे गोळा करणारी टोळी अटकेत
अजमेर : बनावट ‘एनजीओ’च्या नावे कर्करोग्यांसाठी मदत करण्याच्या हेतूने, रेल्वेप्रवाशांना गंडा घालणाऱ्या मुंबईतील तरुणांच्या टोळीला राजस्थानमध्ये अटक करण्यात आली आहे.
बोगस एनजीओच्या नावे ही टोळी अजमेर स्टेशनवर रेल्वे प्रवाशांकडून पैसे उकळत होती. त्यावेळी रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता, 11 तरुणांचं हे रॅकेट असल्याचं उघड झालं. हे सर्वजण महाराष्ट्रातील ठाणे आणि नाशिकमधील आहेत. त्यांच्याकडून 26 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतही लोकलमध्ये कर्करोग्यांच्या मदतीसाठी पैसे गोळा करणाऱ्या टोळीला अटक केली होती. त्यानंतर आता तिकडे राजस्थानातही असाच प्रकार उघडकीस आला आहे.
'मेक इन इंडिया'च्या सिंहाची आज गर्जना, मोदींच्या हस्ते उद्घाटन
मुंबई: परदेशी गुतंवणूकदारांना महाराष्ट्रात आणि देशात गुंतवणूक करण्याचं आवाहन करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’चा सिंह आजपासून मुंबईत गरजणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचं उद्घाटन होणार आहे.
हा कार्यक्रम 13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मुंबईच्या बीकेसी ग्राऊंडवर 2 लाख चौरस फुटांवर विविध दालनं यासाठी तयार करण्यात आली आहेत.
68 देशातील उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आठवड्याभरात महाराष्ट्रात 4 लाख कोटीची गुंतवणूक व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यातून 12 लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे.
दरम्यान 15 तारखेला मेक इन मुंबई परिसंवादाचा समारोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
गोळीबार करत तरुणाला लुटलं, चोरट्यांची दहशत सीसीटीव्हीत कैद
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील विहार परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार करत तरुणाला लुटल्याचा प्रकार घडला आहे. चोरट्यांची ही दहशत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
महुमुद्दीन नावाचा तरुण रिलायन्सचा डिस्ट्रिब्युटर आहे. विहारमधील सेंटरमध्ये पैसे जमा करण्यासाठी हा तरुण काल संध्याकाळी आला होता. मात्र त्याच्या मागावर असलेल्या दोघांना आधी मुहमुद्दीनच्या गाडीला अडवून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पिस्तुल दाखवत त्याला धमकावलं.
भीतीने मुहमुद्दीन मालकाच्या घराच्या दिशेने पळाला. पण चोरट्यांनी पाठलाग करत गोळीबार केला. चोरट्यांनी परिसरातील नागरिकांनाही पिस्तुलीचा धाक दाखवला. यानंतर मुहमद्दीनच्या गाडीजवळ पडलेली पैशाची बॅग घेऊन पसार झाले.
सुदैवाने या थरारक घटनेत मुहमुद्दीनला कोणतीही इजा झाली नाही.
अमेरिका पाकिस्तानला F-16 लढाऊ विमानं विकणार, भारताकडून निषेध
वॉशिंग्टन : अमेरिकी प्रशासनाच्या पाकिस्तानला F-16 ही लढाऊ विमाने विकण्याच्या निर्णयाचा भारताने तीव्र निषेध केला आहे. अमेरिकेतील लॉकहीड मार्टीन या कंपनीने पाकिस्तानबरोर केलेल्या या व्यवहाराला ओबामा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. हा खरेदी करार 699 मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे साडेचार हजार कोटींचा आहे.
अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने काल या व्यवहाराला मंजुरी दिल्याची माहिती अमेरिकी काँग्रेसला म्हणजे संसदेला कळवली. पाकिस्तानला अमेरिकेकडून F-16 विमाने मिळणार असल्यामुळे पाकिस्तानची संरक्षण सज्जतेत मोठी भर पडणार आहे.
अमेरिकी सरकारचा निर्णय समजल्यावर भारत सरकारने या निर्णयावर टीका केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी भारत सरकारचा निषेध ट्विटरवर टाकला आहे.
भारताकडून श्रीलंकेचा 69 धावांनी धुव्वा, मालिकेत 1-1 ने बरोबरी
रांची : पुण्याच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत श्रीलंकेकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवाची भारतीय संघानं रांचीत सव्याज परतफेड केली. धोनीच्या टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत श्रीलंकेचा 69 धावांनी धुव्वा उडवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
त्यामुळे रविवारी विशाखापट्टणममध्ये होत असलेला तिसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना हा मालिकेत निर्णायक ठरला आहे. दरम्यान, रांचीच्या ट्वेन्टी ट्वेन्टीत भारतानं दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला वीस षटकांत नऊ बाद 127 धावांचीच मजल मारता आली.
भारताकडून रवीचंद्रन अश्विननं तीन, तर आशीष नेहरा, जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन श्रीलंकेला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याआधी, टीम इंडियाच्या शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि हार्दिक पंड्या यांनी धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
धवननं 25 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावा फटकावून, ट्वेन्टी ट्वेन्टीतलं पहिलं अर्धशतकं साजरं केलं. रोहित शर्माचं अर्धशतक सात धावांनी हुकलं. रहाणेनं 25, रैनानं 30 आणि पंड्यानं 27 धावांची खेळी उभारली.
आपण असहिष्णुतेबाबत खूप सहिष्णु : अमर्त्य सेन
नवी दिल्ली: नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात बोलताना खडे बोल सुनावले आहेत.
मी भारतावर नाही तर भारत सरकारच्या कारभारावर नाराज आहे, असं सेन म्हणाले.
“नागरिकांनी असहिष्णुता सहन करता कमा नये. या देशातले लोक कधीच असहिष्णू नव्हते. फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी एक विशिष्ट गट असहिष्णुता पसरवत आहे”, असं अमर्त्य सेन म्हणाले.
ज्यावेळी अल्पसंख्यकांवर हल्ले होतात, तेव्हा अशाप्रकारच्या घटनांच्या विरोधात देश आणि सरकारचं समर्थन मिळत नाही. मात्र हे या सरकारपासून नव्हे, तर मागील सरकारच्या काळातही अल्पसंख्यांक सुरक्षित नव्हते. एम.एफ हुसेन, सलमान रश्दी ही त्याची उदाहरणं आहेत. सध्याच्या सरकारमध्ये बंदीच्या घटना अधिक वाढल्या आहेत.
दादरीप्रकरणाचा उल्लेख करत सेन म्हणाले, “बीफ खाणाऱ्यावर हल्ला करा, असं संविधानात कुठेही म्हटलेलं नाही”. धार्मिक भावना भडकून एखाद्याची हत्या करणं याबाबत सेन यांनी चिंता व्यक्त केली.
गेल्या वर्षी 28 सप्टेंबर 2015 रोजी दिल्लीजवळच्या बाबरी इथं बीफ खाल्ल्याच्या संशयावरून अखलाख नावाच्या 52 वर्षीय व्यक्तीवर जमावाने हल्ला केला होता. यात त्यांचा मृत्यू झाला, त्यावरून मोदी सरकारवर टीकेची राळ उठली होती.
बिहार भाजपच्या उपाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या
पाटणा : बिहार भाजपचे उपाध्यक्ष आणि भोजपुरचे महत्त्वपूर्ण नेते विश्वेश्वर ओझा यांची हत्या झाल्याचं धक्कादायक वृत्त आहे. शुक्रवारी संध्याकाळी अरा गावात काही जणांशी गप्पा मारताना गोळ्या झाडून त्यांची हत्या झाली. राजदचे माजी खासदार शिवानंद तिवारी यांचा पुत्र राहुल यांच्याविरोधात ओझा निवडणुकीला उभे होते. मात्र शहापूर मतदारसंघात ओझा यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. गेल्या दहा दिवसातील एका नेत्याच्या हत्येची ही दुसरी घटना आहे. वैशालीतील लोजप नेते ब्रिजनाथी सिंह यांची हत्या झाली होती. भाजपने हे राजकीय हत्याकांड असून 72 तासांच्या आत आरोपींना गजाआड करण्याचा इशारा भाजपने राज्य सरकारला दिला आहे.
अंडर-19 विश्वचषकापासून भारत फक्त एक पाऊल दूर
मुंबई : अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत उद्या भारताला वेस्ट इंडीजचा सामना करायचा आहे. बांगलादेशात मिरपूरच्या शेरे बांगला स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता या लढाईला सुरुवात होईल. पाहूयात या लढतीवर आमची स्पोर्ट्स प्रतिनिधी जान्हवी मुळेचा रिपोर्ट.
ईशान किशनची यंग टीम इंडिया अंडर-19 विश्वचषकापासून केवळ एकच पाऊल दूर आहे. एकही सामना न गमावता भारतानं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताच्या या विजयी वाटचालीत मुंबईच्या दोन युवा फलंदाजांनी महत्त्वाचं योगदान दिलंय. ते म्हणजे सरफराझ खान आणि अरमान जाफर. मुंबईच्या मुशीत घडलेला सरफराझ या स्पर्धेत भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरलाय. सरफराझनं यंदा अंडर-19 विश्वचषकाच्या पाच सामन्यांमध्ये 76 च्या सरासरीनं 304 धावा केल्या आहेत. त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सरफराझनं संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी वेळोवेळी समर्थपणे पेलली आहे.
मला कोणत्याही फंदात पडायचे नाही- अजित पवार
सत्तेत नसलेल्या आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मला कोणत्याही फंदात पडायचे नाही,’ असे उद्गार िपपरीत शुक्रवारी काढले. प्रसारमाध्यमांकडून एकच बातमी सतत दाखवली जाते, दुसरी बाजू समजून घेतली जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पिंपरीतील एका कार्यक्रमानंतर अजितदादा पत्रकारांशी बोलत होते. एकात्मिक राज्य जलआराखडा अस्तित्वात नसतानाही मंजूर केलेल्या १८९ प्रकल्पांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार समिती स्थापन केल्याने तत्कालीन जलसंपदामंत्री अजितदादा व सुनील तटकरे अडचणीत आले आहेत. या संदर्भात, पत्रकारांनी प्रतिक्रियेसाठी वारंवार विचारणा केल्यानंतर अजितदादा म्हणाले, ‘‘ही न्यायप्रवीष्ट बाब असल्याने त्यावर मी बोलणार नाही. मी काहीतरी वक्तव्य करणार, तुम्ही दिवसभर बातमी चालवणार. सध्या मला कोणत्याही फंदात पडायचे नाही. चौकशी समितीचे मी स्वागत करतो. त्यांनी सर्व मुद्दे तपासावेत, माहिती घ्यावी. कामात भ्रष्टाचार झाला असल्यास पारदर्शक कार्यवाही व्हावी. अलीकडे मी काही बोलत नाही. प्रसारमाध्यमांकडून दुसरी बाजू समजून घेतली जात नाही. एकही प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रातील नाही. एखादा अपवाद वगळता सर्वच प्रकल्प विदर्भ आणि मराठवाडय़ातील आहेत.’’ समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे यांना माझ्याविषयी काहीही बोलू द्या, आरोप करणाऱ्यांना करू द्या, त्याविषयी काहीही बोलणार नाही. चौकशी झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. जनता सोबत आहे. निवडणुकीत भूमिका स्पष्ट करू, सभागृहात म्हणणे मांडू, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
===============================================मुंबई; ‘जेंडर बजेट’च्या माथी पुरुष शौचालयांचा भार!
मुंबई महापालिकेकडून स्त्री सबलीकरणीच थट्टा महिलांना नागरी सेवेत समान वाटा मिळावा, या हेतूने निर्माण झालेल्या ‘जेंडर बजेट’ या संकल्पनेला मुंबई महापालिकेने हरताळ फासला आहे. गेली सलग दोन वर्षे ‘जेंडर बजेट’मध्ये महिलांपेक्षा पुरुषांच्याच शौचालयांची तजवीज करून स्त्री सबलीकरण संकल्पनेचीही महापालिकेने थट्टा आरंभली आहे. महत्त्वाचे म्हणजे स्त्री सक्षमीकरणाचे निव्वळ बजेट तयार करण्यासाठी म्हणून पालिका लाखो रुपयांची उधळण करते आहे. प्रत्यक्षात इतके पैसे खर्चूनही या ‘जेंडर बजेट’खाली महिलांचे जगणे सुसह्य़ करणाऱ्या नागरी योजना आखल्याच जात नाहीत. तसेच, जी काही किडुकमिडुक तरतूद स्त्रियांकरिता म्हणून केली जाते तीही न वापरता करदात्या महिला वर्गाच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. गेल्या वर्षी केवळ ‘जेंडर बजेट’च्या नावाखाली पालिकेने ३३ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद केली होती. प्रत्यक्षात त्यातील केवळ महिलांच्या शौचालयांसाठी असलेल्या पाच कोटी रुपयांमधला एकही रुपया खर्च केला नव्हता. २०१६-१७च्या ‘जेंडर बजेट’मध्ये सामूहिक शौचालयांसाठीचे २६ कोटी ७० लाख रुपयेही अंतर्भूत केले आहेत. पुरुषांच्या शौचालयांसाठी निधी वापरून महिलांचे सबलीकरण नेमके कसे होईल, याबाबत मात्र पालिकेने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक खात्याअंतर्गत करण्यात येत असलेली तरतूद ‘जेंडर बजेट’ अंतर्गत एका ठिकाणी दाखवण्यात येते. याप्रमाणे २०१६-१७ या वर्षांत तब्बल ६५७ कोटी रुपये महिला विकासासाठी खर्च होणार असल्याचे पालिका दाखवत असली तरी त्यातील ९० टक्क्य़ांहून अधिक निधी प्रसूतिगृह बांधकाम, त्याचे व्यवस्थापन, प्राथमिक शिक्षण तसेच मुलांच्या उद्यानासाठी खर्च होणार आहेत. त्यातही उरलेल्या निधीपैकी ३१ कोटी ७० लाखांचा निधी शौचालयांसाठी वापरला जाणार आहे. त्यातील गेल्या वर्षीही न वापरले गेलेले पाच कोटी रुपये यावेळी महामार्गालगतच्या महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी बाजूला ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, ६५० कोटी रुपयांच्या निधीतून कौशल्यप्रशिक्षण व शिवणयंत्राचे वाटप वगळता महिलांच्या हाती काही पडलेले नाही. याव्यतिरिक्त महिला स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठीचा २५ लाख रुपये खर्च वगळता इतर सर्व रक्कम ही विविध प्रकारच्या सामूहिक शौचालयांसाठी दाखवण्यात आली आहे. यापैकी केवळ महिलांसाठी कोणती शौचालये बांधली जाणार, याचा उल्लेख नाही. आधीच स्त्रीसबलीकरणासाठी अत्यल्प निधीचा वापर होत असताना ‘जेंडर बजेट’वर पुरुषांच्या शौचालयांचा भार कशाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
===============================================लष्कराची एक फळीच संपविण्याचा कट; हेडलीच्या साक्षीतून लष्करी महाविद्यालयावरील हल्ल्याची योजना उघड
सूडासाठीच हल्ला.. हेडलीच्या साक्षीतून लष्करी महाविद्यालयावरील हल्ल्याची योजना उघड ‘आयएसआय’ व ‘लष्कर-ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनांप्रमाणे ‘अल कायदा’लाही भारतात हल्ले करायचे होते. तसेच भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक फळीच नष्ट करण्याच्या हेतूने दिल्लीतील राष्ट्रीय लष्करी महाविद्यालयाला या हल्ल्यासाठी लक्ष्य करण्यात आले होते, असा गौप्यस्फोट पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन दहशतवादी आणि मुंबई हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडली याने शुक्रवारी विशेष न्यायालयासमोर केला. हा हल्ला केला तर भारत-पाक युद्धापेक्षाही कैकपटीने लष्करी अधिकाऱ्यांची जीवितहानी घडविता येईल, हा त्यामागचा हेतू होता, असेही हेडलीने सांगितले. २६/११च्या खटल्यात माफीचा साक्षीदार म्हणून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप हे ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हेडलीची साक्ष नोंदवत आहेत. २६/११च्या हल्ल्यानंतर पुन्हा भारतात येण्याचे कारण काय, या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना हेडलीने हा गौप्यस्फोट केला. अल कायदाच्या अफगाणिस्तानातील म्होरक्या इलियास काश्मिरी याने भारतात जाऊन काही ठिकाणांची पाहणी करण्यास मला सांगितले होते. दिल्लीतील राष्ट्रीय लष्करी महाविद्यालय, पुष्कर, गोवा आणि पुण्यातील ‘छाबाड हाऊस’ आदी ठिकाणांचा त्यात समावेश होता. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची फळीच उद्ध्वस्त करण्याचा कट काश्मिरीने रचला होता.
===============================================रस्त्यावर उत्सव साजरे करण्याला धर्म समजणे ही चूकच!- ‘ढोलताशे’च्या पाश्र्वभूमीवर दिग्दर्शक विजय केंकरे यांची स्पष्टोक्ती
‘ढोलताशे’च्या पाश्र्वभूमीवर दिग्दर्शक विजय केंकरे यांची स्पष्टोक्ती रस्त्यावर उतरून उत्सव व प्रत्येक गोष्ट साजरी करण्याचे प्रमाण वाढले आहे आणि यालाच धर्म समजले जात आहे. ही खूप मोठी चूक आहे, असे परखड मत नाटय़दिग्दर्शक विजय केंकरे यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता’ने ‘संपादक शिफारस’ म्हणून पुरस्कृत केलेल्या ‘ढोल-ताशे’ या नाटकाच्या प्रयोगानंतर बोलत होते. ‘लोकसत्ता’चे रवींद्र पाथरे यांच्याशी नाटकानंतर संवाद साधताना त्यांनी वरील विधान केले. ‘ढोल ताशे’ हे नाटक आपल्याकडील सार्वजनिक उत्सवातील उन्माद, ध्वनी तसेच वायू प्रदूषण आणि सार्वजनिक उत्सवातील अनिष्ट गोष्टींवर ताशेरे ओढणारे आहे. उत्तम रंजनमूल्य हे या नाटकाचे वैशिष्टय़ आहे. सध्याच्या परिस्थितीत हे नाटक रंगभूमीवर येणे ही काळाची गरज होती हे ओळखून ‘लोकसत्ता’ने ‘संपादक शिफारस’ म्हणून हे नाटक पुरस्कृत केले आहे. विजय केंकरे पुढे म्हणाले की १९९९ साली ‘आविष्कार’ या संस्थेसाठी हे प्रायोगिक नाटक म्हणून केले होते. सार्वजनिक उत्सवांचे ‘सेलिब्रेशन’ आता अनिष्ट दिशेने चालले आहे. त्यामुळे आज १५-१६ वर्षांनी पुन्हा हे नाटक करण्याची गरज निर्माण झाली. सार्वजनिक उत्सवांची आजची परिस्थिती बदलायचे तर सोडाच पण, ती अधिक वाईट झाली आहे व राजकारणी मंडळी याला खतपाणी घालत आहेत.
===============================================इशरत जहाँ दहशतवादी असल्याचे प्रतिज्ञापत्र काँग्रेसने न्यायालयापासून लपविले – प्रकाश जावेडकर
गुजरात येथे २००४ मध्ये झालेल्या कथित पोलीस चकमकीत ठार झालेली इशरत जहाँ ही दहशतवादी असल्याचे डेव्हिड कोलमन हेडली याचे प्रतिज्ञापत्र त्या वेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेसने न्यायालयापासून जाणीवपूर्पक लपविले होते, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. इशरत जहाँ हा केवळ बहाणा होता. तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हाच काँग्रेसचा निशाणा होता, याकडे लक्ष वेधत, न्यायालयाने काँग्रेसचा हा डाव उधळून लावला असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले. इशरत जहाँ दहशतवादी होती, असे हेडलीने विशेष न्यायालयाला गुरुवारी सांगितले. राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) त्याने हाच जबाब दिला होता. मात्र, त्या वेळी काँग्रेस सरकारने ही बाब का दडवून ठेवली, असा प्रश्नही जावडेकर यांनी उपस्थित केला. सहा वर्षांपूर्वी हेडलीच्या जबाबाचे प्रतिज्ञापत्र का बदलले याचाही जाब काँग्रेसला द्यावाच लागेल, असेही ते म्हणाले. इशरतला शहीद ठरविण्याचा प्रयत्न करीत जितेंद्र आव्हाड हे इशरतच्या घरी धनादेश घेऊन गेले होते. ही भूमिका गुन्हेगारांना पाठीशी घालणारी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणारी आहे. इशरत जहाँ केवळ बहाणा होता. पण, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हाच काँग्रेसचा निशाणा होता. आता या विषयावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित करणे हा ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ असाच प्रकार आहे, अशी टीकाही जावडेकर यांनी केली.
===============================================नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला - IB चे माजी विशेष संचालक राजिंदर कुमार
- गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी खोटी साक्ष देण्यासाठी युपीए सरकारनं माझ्यावर दबाव टाकला होता, मला बड्या नोकरीची आमिषं दाखवण्यात आली होती, परंतु त्याला मी बधलो नाही असा खळबळजनक आरोप इंचेलिजन्स ब्युरोचे माजी विशेष संचालक राजिंदर कुमार यांनी केला आहे.एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार 'माझ्यावर दबाव टाकला, मला आमिषं दाखवली, इंटेलिजन्स ब्युरोला बदनाम करण्याची कारस्थानं रचली गेली तसेच युपीए सरकारपुढे आव्हान म्हणून उभ्या ठाकलेल्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी इशरत जहाँ प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला' असा खळबळजनक आरोप राजिंदर कुमार यांनी केला आहे.इशरत जहाँ लष्करची दहशतवादी होती या हेडलीच्या जबानीनंतर आता हे प्रकरण अत्यंत गंभीर वळण घेत असून यामध्ये आधीच्या युपीए सरकारवर अनेक आरोप होताना दिसत आहेत.
स्वच्छतेचा प्रसार भाषणापेक्षा कला जास्त चांगला करते - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- - स्वच्छतेवरती दिलेल्या भाषणापेक्षा चित्रकाराचं काम स्वच्छतेचा जास्त प्रसार करतं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामाजिक जीवनातलं कलेच कार्य अधोरेखीत केलं. अनेक रेल्वेस्थानकांवर चित्रकार सौंदर्यीकरणाचं काम करत आहेत. याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, हे सरकार करत नाहीये, सरकारकडे यासाठी बजेटही नाहीये, परंतु कलाकार स्वत:हून पुढे येतात आणि रेल्वेस्थानके चित्र काढून सुंदर करतात. एखाद्या भाषणापेक्षा चित्रकारांचं हे काम स्वच्छतेचा जास्त चांगला प्रचार करतं असं मोदी पुढे म्हणाले.मुंबईमध्ये बाँबे आर्ट गॅलरीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, राज्यपाल विद्यासादर राव, चित्रकार वासुदेव आदी मान्यवर उपस्थित होते.कलेचं जीवनातलं स्थान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगताना माणसाला रोबो होण्यापासून वाचायचं असेल तर कलेला जवळ करायला हवं असं ते म्हणाले. माणसातली माणुसकी जपण्याचं काम कला करते, त्यामुळे प्रत्येक शाळेनं मुलांच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये आर्ट गॅलरीला भेट देणं हा कार्यक्रम आवर्जून ठेवावा असा सल्ला मोदींनी दिला.कलेला राजाश्रय नसावा तर कलेला राज्याने पुरस्कृत करावे असं मत व्यक्त करताना, कला ही मुक्त असावी, स्वतंत्र असावी असंही मोदी म्हणाले.मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे:- कलेला काळाचं, वंशाचं, धर्माचं, प्रांताचं तसंच वयाचं बंधन नसतं.- कला ही मुक्त असायला हवी, स्वतंत्र असायला हवी.- कला ही फक्त भिंतीवर लावण्यापूरती मर्यादीत नसते तर ती समाजाची शक्ती असते.- मुंबईमध्ये आर्ट सोसायटीने तीन शतकं समाजावर प्रभाव पाडलाय कारण ती कलेची ताकद आहे.- मुंबईची ओळख आर्थिक राजधानी अशी आहे, परंतु सांस्कृतिक दृष्ट्या व रंगभूमी व कलेच्या प्रांतातही ती राजधानी आहे.
संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू याला 2013 मध्ये फाशी देण्याच्या निषेधार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या प्रमुखाने भारताविरुद्ध केलेली घोषणाबाजी अस्वीकार्य असल्याचे, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या प्रमुखाला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. अफजल गुरू याला 2013 मध्ये फाशी देण्यात आली होती, याचा निषेध करत या संघटनेने आंदोलन पुकारले आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव कन्हैया कुमार असे आहे. मंगळवारी त्याने केलेल्या निषेधावेळी भारताविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला ठेवण्यात आला आहे.
याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकार आणि अभाविप जेएनयू सारख्या संस्थांमध्ये दमदाटी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, भारताविरुद्ध घोषणाबाजी ही निषेधार्थच आहे, यात काही प्रश्नच नाही. कोणत्याही प्रश्नावर चर्चा होणे, हे लोकशाही चांगले आहे. पण, असे कृत्य करणे अस्वीकार्य आहे.
कन्हैया कुमार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी त्याच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे गंभीर असून, भाजप सरकारने याचा विचार केला पाहिजे असे म्हटले आहे.
===============================================पुण्यात छबाड हाऊसचा बनविलेला व्हिडिओ-हेडली
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 मध्ये हल्ला झाल्यानंतर 2009 मध्ये पुण्यातील छबाड हाऊसची रेकी करत त्याचा व्हिडिओ बनविल्याची कबुली मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सूत्रधार डेव्हिड हेडली याने दिली आहे. तसेच लष्करे तैयबाने लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयाची (सदर्न कमांड) माहिती मिळविण्याचेही आदेश दिल्याचे हेडलीने म्हटले आहे.
अमेरिकेहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष मोक्का न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे जबानी नोंदवताना हेडलीने आज (शनिवार) पाचव्या दिवशीही खळबळजनक माहिती दिली आहे. त्यापूर्वी त्याने शुक्रवारी मुंबईवर हल्ला करण्याआधी मुंबई विमानतळ, नौदलाचा तळ आणि सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला करण्याचाही विचार होता. ‘शिवसेना भवन‘ उडवण्याचा कट माझ्या डोक्यात होता, असे त्याने म्हटले होते.
आज आणखी खुलासे करताना हेडली म्हणाला, की लष्करेच्या मेजर इक्बालने मला पुण्यातील भारतीय लष्कराच्या सदर्न कमांडला भेट देण्यास सांगितले होते. तसेच इक्बालने भारतीय लष्करात एखाद्याची नेमणूक करून माहिती मिळविण्यास सांगितले होते. पुण्यासह मी पुष्कर आणि गोव्यालाही भेट देत तेथील काही ठिकाणांचे व्हिडिओ बनविले होते. लष्करे तैयबाचा म्होरक्या या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद, झकी उर रेहमान लख्वी यांच्याशी चर्चा करताना मी सांकेतिक भाषा वापरत असे. हाफीज सईदला ओल्ड अंकल आणि लख्वीला यंग अंकल असे संबोधत होतो. .
===============================================कुपवाडा: चकमकीत दोन जवान हुतात्मा
श्रीनगर - उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले आहेत. तर, चार जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील मरसारी गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहिम सुरु केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान हुतात्मा झाले. या गोळीबारात जखमी झालेल्यांमध्ये एक लष्करी अधिकारीही आहे. जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी लपलेल्या घरे जवानांनी स्फोटकाच्या साहाय्याने उडवून दिले. यात चारही दहशतवादी ठार झाले आहेत.
मरसारी गावात दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर राष्ट्रीय रायफल्स, विशेष कृती दल, पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे कारवाई केली.
===============================================कोल्हापूर; हा घ्या घरपोच चेक; पण... बनावटच
कोल्हापूर - तुम्हाला बक्षीस लागले आहे; पण बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी अगोदर काही रक्कम खात्यावर भरा. एटीएम नंबर, पासवर्ड सांगा... असे फोनवरून दाखवले जाणारे आमिष आणि त्यानंतर होणारी फसवणूक आता नवी नाही. लोकही जागरूक होऊ लागल्याने तुलनेत फसवणुकीचे प्रमाण कमी आहे. पण फसवणुक करणाऱ्यांनी त्याही पुढचे पाऊल गाठले आहे. आता ते तुमच्या पॉलिसीचे पैसे जमा झाले आहेत, असे सांगून चक्क चेकच घरपोच पाठवू लागले आहेत. अर्थात हे चेक म्हणजेही फसवणुकीसाठी टाकलेले एक नवे जाळे ठरते आहे...
स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे हे चेक खरे आहेत किंवा खोटे हा तपासाचा भाग आहे; पण लाख रुपयांचा हा चेक तीन दिवसांनी भरा; पण चेक भरण्याआधी तुमच्या खात्यावरची उलाढाल दिसण्यासाठी किमान लाख रुपये भरा, असे सांगितले जाते आणि फसवणुकीच्या जाळ्यातील दुसऱ्या टप्प्यात ओढून घेतले जाते.
आतापर्यंत नेमके किती जण फसले असतील हे माहीत नाही; पण सारंग रमेश मुनीश्वर यांनी जागरूकता दाखवून फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आणला आहे. तुमच्या घरी कोणीही अनोळखी व्यक्तीने चेक पाठवला तर पूर्ण खात्री केल्याशिवाय पुढचा व्यवहार करू नये, असेच त्यांनी यानिमित्ताने सुचवले आहे.
मुनीश्वर यांना काही दिवसांपूर्वी ‘‘तुमचे एलआयसीचे पैसे जमा झाले आहेत. तुमच्या एजंटने तुम्हाला कल्पना दिली नाही का?’’ म्हणून फोन आला. काही दिवसांनी चेक घरपोच येईल, असे सांगून फोन बंद झाला; आणि खरोखरच त्यांच्या नावे स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा ९८ हजार ५०० रुपयांचा चेक आला.
‘इन्शुरन्स कस्टमर बोनस डिपार्टमेंट, संसद भवन मार्ग, नवी दिल्ली’ यांच्याकडून हा चेक देण्यात आला होता. हा चेक आजपासून तीन दिवसांनी भरा; पण त्या अगोदर खात्यावर एक लाख रुपये भरून उलाढाल जिवंत ठेवा, असे सांगून खाते नंबर, एटीएम याची माहिती घेण्यात आली. घरपोच चेक, तोही स्टेट बॅंकेचा... त्यामुळे क्षणभर कोणीही भुलून जावे असाच हा प्रकार. मुनीश्वर यांनाही क्षणभर चेक पाहून बरे वाटले; पण काही वेळाने त्यांच्या ध्यानात आले, की चेक भरण्यापूर्वी एक लाख रुपये खात्यावर भरा, असे कोणी कधी सांगत नाही. याबरोबरच त्यांनी पाहिले, की चेक क्रॉस नाही. ९८,५०० रुपयांचा चेक कोणी बेअरर देणार नाही. त्यामुळे त्यांनी चेक तर भरला नाहीच; पण खात्यावर उलाढाल दाखवण्यासाठी लाख रुपयेही भरले नाहीत.
माहिती कशी कळाली?
फसवणुकीच्या उद्देशाने आलेला चेक, त्यासाठी वापरले गेलेले पाकीट पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे नंदकुमार मराठे व सारंग मुनीश्वर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्ही जागरूक राहिल्याने पुढची फसवणूक टळली; पण आमचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, एलआयसी खाते हे फसवणूक करणाऱ्या टोळीला कळाले कसे, हे कोडेच आहे.’’
पुण्यात चोवीस तास पाणी हवे; दरवाढ नको
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांची अपेक्षा
पुणे - शहरात 24 तास समान आणि शुद्ध पाणीवाटप योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांनी अनुकूलता दर्शविली. मात्र, पाणीपट्टीमध्ये 12 टक्के वाढ करण्याचा फेरविचार करावा, अशीही मागणी काही नगरसेवकांनी केली. त्यावर पक्षाच्या वतीने येत्या 15 फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे.
24 तास पाणीवाटप योजनेंतर्गत पाणीपट्टीमध्ये 12 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झाली. मात्र, मंगळवारपर्यंत (ता. 16) सभेचे कामकाज तहकूब करण्याचा महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमवेत नगरसेवकांची महापौरांच्या निवासस्थानी बैठक झाली. 24 तास समान पाणीवाटप विषयावर त्यात प्रामुख्याने चर्चा झाली. पक्षाचे शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण, महापौर आणि पदाधिकारी तसेच सुमारे 50 नगरसेवक उपस्थित होते. दुपारी दीडच्या सुमारास सुरू झालेली बैठक सुमारे दोन तास झाली. बैठकीच्या सुरवातीसच ही योजना राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे, भारतीय जनता पक्षाची नव्हे, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रत्येक सदस्याचे योजनेबाबतचे म्हणणे पवार यांनी ऐकूण घेतले. 24 तास पाणीपुरवठ्याची योजना हवी आहे, असे मत बहुतेक नगरसेवकांनी व्यक्त केले. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मीटर पद्धत हवी, योजना सुरू झाल्यावर पाणीपट्टीत वाढ करावी, पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यावर भर देऊ, आदी मते सदस्यांनी मांडली. सर्वांची मते ऐकूण घेतल्यावर पवार यांनी याबाबतचा निर्णय पक्षाकडून 15 फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल, सभागृहात सर्वांनी त्याचे पालन करावे, अशी सूचना केली. तत्पूर्वी, शहराध्यक्ष महापौर, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृह नेते यांच्याबरोबरही पवार यांनी बैठक घेतली होती.
===============================================
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये योजनेबाबत मतभेद आहेत; तसेच या विषयावर सभागृहात चर्चा टाळण्यासाठी आणि 16 फेब्रुवारीला थेट निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीने विशेष सभा तहकूब केली, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
पाकला विमाने देणारच - अमेरिका
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या संसदेतील अनेक सदस्यांनी विरोध करूनही पाकिस्तानला एफ-16 जातीची लढाऊ विमाने देण्याचा अमेरिकी सरकारचा निश्चय पक्का असल्याचे येथील सूत्रांनी सांगितले.
अमेरिकेच्या मदतीमुळे दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला बळ मिळते, असे सरकारचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अनेकदा सांगूनही पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कसारख्या दहशतवादी संघटनांवर ठोस कारवाई केली नसल्याने त्यांना विमाने देऊ नयेत, असे काही खासदारांचे म्हणणे होते. तसेच, पाकिस्तान सरकारमधील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने दहशतवादी मुक्तपणे पाकिस्तानात फिरत असतात, असेही त्यांनी सरकारला कळविले होते. मात्र, अमेरिका सरकारने पाकिस्तानला मदत करण्याचा आपला निश्चय पक्का असल्याचे स्पष्ट केले आहे.
===============================================अमेरिकेत ख्रिश्चनधर्मियांच्या संख्येत घट - सर्व्हे
वॉशिंग्टन - अमेरिकन ख्रिश्चनधर्मियांची संख्येत घट होत असून कोणताही धर्म स्विकारला नसलेल्यांच्या संख्येत वाढ होत चालल्याची माहिती प्यू रिसर्चच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
मंगळवारी या सर्व्हेचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अमेरिकेतील धार्मिक चित्र बदलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अमेरिकेमध्ये ख्रिश्चनांचे सर्वाधिक प्रमाण असून सर्वसाधारणपणे अमेरिकेतील प्रत्येक 10 जणांपैकी 7 जण ख्रिश्चन असल्याचे चित्र होते, असे सर्व्हेत म्हटले आहे. मात्र अलिकडे अमेरिकेत ख्रिश्चन धर्मियांची संख्या कमी होत चालली असून कोणत्याही धर्माशी संबंधित नसलेल्या प्रौढांची संख्या वाढत चालल्याचेही आढळून आले आहे. अमेरिकेतील बहुतेक देशांमध्ये हेच चित्र दिसून येत असल्याचेही सर्व्हेत पुढे म्हटले आहे. सर्ववयोगटांमध्ये ख्रिश्चन धर्म सोडणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असल्याचेही सर्व्हेत म्हटले आहे. अमेरिकेत 2007 साली कोणत्याही धर्माशी संबंध नसलेल्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 16.1 टक्के होते. मात्र 2014 मध्ये हेच प्रमाण 22.8 टक्क्यांवर पोचले आहे. तर 2007 साली ख्रिश्चनेतर धर्म असलेल्यांची संख्या 4.7 टक्क्यांवरून 5.9 टक्क्यांवर गेली असल्याचेही सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.
===============================================
भारतीय वंशाच्या स्त्रीला वीस वर्षांचा तुरुंगवास
वॉशिंग्टन - स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी येथील न्यायालयाने एका भारतीय वंशाच्या महिलेला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पूर्वी पटेल (वय 33) असे या महिलेचे नाव आहे. पटेल यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या मूळ भारतीय वंशाच्या असून इंडियाना येथे राहत होत्या. "कोणत्याही महिलेवर गर्भपात अथवा गर्भाच्या मृत्यूबद्दल गुन्हा दाखल करण्यात येत नाही. याप्रकरणी गर्भपातविरोधी संघटनेच्या दबावामुळे महिलेला शिक्षा करण्यात आल्याचे दिसून येते,‘ असे गर्भवती महिलांच्या वकिलांचे राष्ट्रीय कार्यकारी संचालक लायन पालत्रो यांनी म्हटले आहे. स्वतःचा गर्भपात केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पटेल या पहिल्याच महिला नसल्याचेही ते म्हणाले. मात्र एखाद्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला दोषी ठरविण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. पटेल या ग्रॅंजर, इंडियाना येथे राहत होत्या, त्या जुलै 2013 मध्ये रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपण गर्भवती असल्याचे अमान्य करत मृत गर्भाला एका पिशवीत गुंडाळून कचरापेटीत फेकल्याचे सांगितले होते.
==============================================================================================
===============================================
===============================================
===============================================
No comments:
Post a Comment