Saturday, 20 February 2016

खळुरे यांना उपक्रमशिल कला शिक्षक पुरस्कार

खळुरे यांना उपक्रमशिल कला शिक्षक पुरस्कार ..........
मुक्रमाबाद - रज्जाक कुरेशी 
मुक्रमाबाद येथिल रहीवासी असलेले कला शिक्षक खळूरे महादेव यांना मराठवाडा कला विकास महामंडळाच्या वतीने विभागीय ललित कला महोत्सवात विभागीय पातळीवरील उपक्रमशिल कला शिक्षक पुरस्कार रविवारी संत एकनाथ नाट्य मंदिर औरंगाबाद येथे सिनेअभिनेञी सुरूची अडारकर,( आदिती- का रे दुरावा) हिच्या हस्ते देण्यात आला.यावेळी महापौर ञ्यंबक तुपे, माजी आमदार जयवंतराव ठाकरे, शुभांगी विक्रम काळे, प्रल्हाद शिंदे, अशोक तांबटकर, संगिता शिंदे , यांच्या उपस्थित हा पुरस्कार देण्यात आला. खळूरे यांना मराठवाडा कला विकास महामंडळाचा सतत तिन वर्ष सन 2014 मध्ये सिनेअभिनेञी निशिगंधा वाड, यांच्या हस्ते सन 2015 जय मल्हार मधील देवदत नागे, यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता .
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जि.प.चे माजी.शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर , जि.प.चे सदस्य अशोक पाटील रावीकर, व समस्त गावकरी यांनी अभिनंदन केले .

No comments: