Friday, 19 February 2016

नमस्कार लाईव्ह १९-०२-२०१६चे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- होर्डिंगबहाद्दरांना हायकोर्टाची चपराक, आशिष शेलारांसह 13 जणांना ठोठावला दंड 
२- सर्व विद्यापीठांवर 207 फूट उंचीवर तिरंगा फडकवा: स्मृती इराणी 
३- बुलेट ट्रेनआधी रेल्वेतल्या पायाभूत सुविधा सुधारा, मेट्रोमॅन श्रीधरन यांचे खडे बोल
४- विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचे प्रयत्न - राहुल गांधी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
५- राज्यात इतर दुश्मनांची गरज ती काय? - उद्धव ठाकरे
६- मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर 72 तासांचा मेगाब्लॉक सुरु 
७- नंदुरबार; कॉपीचा महापूर, पोलिसच पुरवतात परीक्षार्थींना कॉपी 
८- विरार; पतीच्या त्रासामुळं शिल्पी वर्मानं प्रियकराबरोबर रचला अपहरणाचा बनाव 
९- घाटकोपरमध्ये लोकलच्या धडकेत ४ गॅंगमनचा मृत्यू 
१०- राजस्थान; राहुल गांधीवर वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार कैलाश चौधरी यांचे घर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळया शाईने रंगवले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- नगरमध्ये ट्रकची एसटीला धडक, 21 प्रवासी जखमी 
१२- सातारा; अजिंक्यतारा किल्ल्यावर पाणी आणणारा ढाण्या वाघ 
१३- खडकवासला; बचाव दलाच्या पथकाने केली ट्रक चालकाची सुटका 
१४- नागपूर; सेंद्रिय शेतीसाठी प्राध्यापिकेने सोडली नोकरी 
१५- नागपूर; रुग्णांसाठी मोफत "ऑटो ऍम्बुलन्स' 
१६- झारखंडमध्ये चकमकीत चार माओवादी ठार 
१७- सांपलामध्ये जाट आंदोलन, रोहतकमध्ये एसएमएस सेवा बंद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- अखिल भारतीय नाटय़संमेलनात अग्निरोधक’ कापडाचा रंगमंच 
१९- इंग्लिश कट्यार काळजात घुसली, राहुल-महेशनं 25 वर्षानंतर गायली इंग्लिश गाणी 
२०- जगातील स्वस्त स्मार्टफोनचं बुकींग 24 तासांसाठी थांबवलं 
२१- आमीर खान थिरकला मराठी गाण्यांवर 
२२- वैभव तत्ववादीसाठी सरसावला रणवीर सिंग 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
जितेंद्र कुमार, प्रवीण बदेवाड, संदीप कांबळे, संजय पवळे, जय वित्नोर, अनिल भोसले, संतोष कल्याणकर, रोहित माटेकर, पूनम लोढा, विलास देशमुख, प्रसाद कोटगीरे, धीरज तोष्णीवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

=======================================

नगरमध्ये ट्रकची एसटीला धडक, 21 प्रवासी जखमी

नगरमध्ये ट्रकची एसटीला धडक, 21 प्रवासी जखमी
अहमदनगर पुणे-अहमदनगर महामार्गावर एसटी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने पुण्याकडे नगरकडे जाणाऱ्या एसटीला धडक दिली. यामध्ये 21 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.अहमदनगरच्या बाह्यवळण रस्त्यावर केडगाव चौकात हा भीषण अपघात झाला. ट्रक सोलापूरवरुन मनमाडला जात होता, तर मुंबईहून पाटोद्याला जाणारी एसटी बस होती. या अपघातात एसटी चालकही जखमी झाला असल्याची माहिती मिळते आहे.
=======================================

बुलेट ट्रेनआधी रेल्वेतल्या पायाभूत सुविधा सुधारा, मेट्रोमॅन श्रीधरन यांचे खडे बोल


बुलेट ट्रेनआधी रेल्वेतल्या पायाभूत सुविधा सुधारा, मेट्रोमॅन श्रीधरन यांचे खडे बोल

नागपूर भारतासारख्या देशाला बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे. पण भारतीय रेल्वेची सध्याची परिस्थिती पाहता, बुलेट ट्रेन भारतात आणायची ही योग्य वेळ नसल्याचं मत मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलं आहे. नागपूर मेट्रोच्या आयोजित एका कार्यक्रमात श्रीधरन काल बोलतं होते. 
“भारतीय रेल्वेला सध्या आपल्या पायाभूत सुवीधांमध्ये प्रचंड बदल करण्याची आवश्यकता आहे. यानंतरचं भारतात बुलेट ट्रेनचा विचार केला जाऊ शकतो.” असंही श्रीधरन म्हणाले. 
देशातल्या दिल्ली मेट्रोचं जाळ उभारण्यात श्रीधरन यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला श्रीधरन यांनी केलेला विरोध नक्कीच दखल घेण्यासारखा आहे. 
मुंबई-अहमदाबाद अशी देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. या बुलेट ट्रेनला कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला आतापर्यंत अनेकांनी विरोधही केला आहे. रेल्वेतल्या पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या नसताना बुलेट ट्रेनचे प्रकल्प कशाला, असा सवाल अनेक राजकीय पक्षांनी उपस्थित केलेला आहे.
=======================================

मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर 72 तासांचा मेगाब्लॉक सुरु


मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावर 72 तासांचा मेगाब्लॉक सुरु

मुंबई हार्बर रेल्वेमार्गावर 12 डब्यांच्या प्लॅटफॉर्म आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी 19 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून 72 तास मेगाब्लॉक असणार आहे. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमामुळे गेल्या आठवड्यात रद्द करण्यात आलेल्या मुंबईच्या हार्बर लोकलच्या विशेष ब्लॉकला मध्यरात्रीपासून सुरुवात झालीय. आज या विशेष ब्लॉकचा मोठा फटका बसणार नसला तरी उद्या आणि परवा पूर्ण वाहतूक ठप्प होणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस हार्बरकरांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. 
19 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी मेगाब्लॉक 
19 फेब्रुवारीपासून घेण्यात येणारा 72 तासांचा ब्लॉक 21 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येईल. या ब्लॉकला आज मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. या दोन दिवशी सीएसटी ते वडाळा दरम्यान लोकलसेवा बंद राहील, तर वडाळ्यापासून डाऊन लोकलसेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
=======================================

सर्व विद्यापीठांवर 207 फूट उंचीवर तिरंगा फडकवा: स्मृती इराणी


सर्व विद्यापीठांवर 207 फूट उंचीवर तिरंगा फडकवा: स्मृती इराणी

नवी दिल्ली देशातल्या सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये रोज 207 फूट उंच खांबावर तिरंगा फडकवा, असा आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी काढला आहे. देशाची एकता आणि अखंडता अबाधित राहावी, यासाठी इराणी यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक घेतली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे याची सुरुवात दिल्लीतील जवाहलाल नेहरू विद्यापीठातून करावी, असे या आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे. या बैठकीला 46 विद्यापीठातले कुलगुरु उपस्थित होते. बिहार विद्यापीठाच्या कुलगुरुंनी 207 फूट उंचीवर तिरंगा फडकावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, भारताविरोधी कोणतंही वक्तव्य सहन केलं जाणार नाही, असं स्मृती इराणी जेएनयू प्रकरणावर बोलताना म्हणाल्या.
=======================================

होर्डिंगबहाद्दरांना हायकोर्टाची चपराक, आशिष शेलारांसह 13 जणांना ठोठावला दंड

होर्डिंगबहाद्दरांना हायकोर्टाची चपराक, आशिष शेलारांसह 13 जणांना ठोठावला दंड!

मुंबई: ‘राजकीय कार्यकर्त्यांनो खबरदार, यापुढे बेकायदेशीर होर्डिंग्स लावून आपल्या नेत्याचा उदो उदो कराल तर त्याचे परिणाम भोगण्यासही तयार राहा.’ राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्स प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई हायकोर्टने आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे विलेपार्ले येथील आमदार पराग अळवणी आणि 12 भाजप कार्यकर्त्यांना दंड आकारून इतरांना चांगलाच संदेश दिला आहे.
गेल्या वर्षी गणेशोत्सव आणि नवरात्री दरम्यान हायकोर्टनं आदेश धाब्यावर बसवून बेकायदेशीर होर्डिंग्स लावणाऱ्या सत्ताधारी पक्षाला हायकोर्टाने आज चांगलच फैलावर घेतलं. सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे बेकायदेशीर होर्डिंग्स विरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या जनहीत याचिकेवर सुनावणी करताना आज बॉम्बे हायकोर्टाने आशिष शेलार आणि त्यांच्या अन्य कार्यकर्त्यांकडून कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितल होतं. मात्र, जस्टिस अभय ओक यांच्यापुढे संबंधितांच्या वकीलांनी मोघम उत्तर देण्यास सुरूवात करताच, हायकोर्टाने आज सर्वांना धारेवर धरलं.
कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनी आपली चूक मान्य करत पुन्हा अशी चूक होणार नाही हे नेहमीच उत्तर दिल. मात्र, आज हायकोर्टानं याप्रकरणातील सर्व सामान्य 12 कार्यकर्त्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये तर आशिष शेलार आणि पराग अळवणी या त्यांच्या नेत्यांना त्यांच्या इच्छानुसार दंड भरण्याची मुभा दिली. मात्र, ही रक्कम 25 हजारांपेक्षा जास्त राहील याची खबरदारी घेण्याची सुचना देण्यात आली आहे. नेत्यांच्या दंडाच्या रकमेतील प्रत्येकी 25 हजार रूपये हे बीएमसीला दंड म्हणून आकारले जातील. तर वरची त्यांच्या इच्छेनुसारची रक्कम आणि कार्यकर्त्यांची प्रत्येकी 20 हजारांची दंडाची रक्कम ही नाम फाउंडेशनसारख्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत सेवाभावी संस्थांना मदत म्हणून दिली जाईल. असे आदेश हायकोर्टाने दिले.
=======================================

नंदुरबार; कॉपीचा महापूर, पोलिसच पुरवतात परीक्षार्थींना कॉपी



VIDEO: कॉपीचा महापूर, पोलिसच पुरवतात परीक्षार्थींना कॉपी!
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील धानोऱ्यातल्या परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा अक्षरश: महापूर आला आहे. इथं चक्क बंदोबस्ताला असलेले पोलिसच कॉप्या पुरवत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. त्यामुळे या पोलिसांवर काय कारवाई होणार हा प्रश्न आहे? 
बारावीच्या परीक्षेतील नंदुरबार जिल्ह्यातील धानोऱ्यात पोलिसच कॉपी पुरवत असल्याचं आढळून आलं आहे. तर त्याचवेळी काही पालकच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत होत असल्याचंही निदर्शसनास आलं आहे. हे कमी म्हणून की काय कॉप्या रोखण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर आहे ते पोलिसही कॉप्या देत आहेत. 
धानोऱ्यातल्या एनटीव्हीएस कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे याच केंद्रावर पोलीस निरीक्षक हजर होते. त्याचवेळी पोलीस विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्यात मग्न होते. 
माध्यमांचे कॅमेरे आल्यानंतर नाही म्हणायला थोडी धावपळ झाली. पण कॉपी पुरवणारे अनेक पालक कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. खरं तर गुणवत्तेची कसोटी तपासणारी परीक्षा कॉपीमुक्त होणं आवश्यक आहे. पण कॉपी करुन विद्यार्थी उत्तीर्ण होत असतील तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित होत आहे.
=======================================

विरार; पतीच्या त्रासामुळं शिल्पी वर्मानं प्रियकराबरोबर रचला अपहरणाचा बनाव

पतीच्या त्रासामुळं शिल्पी वर्मानं प्रियकराबरोबर रचला अपहरणाचा बनाव

विरार: पतीच्या त्रासाला कंटाळून विरारमधील शिल्पी वर्मानं आपल्या प्रियकराबरोबर पळून जाण्यासाठी अपहरणाचा बनाव रचल्याचं अखेर आज स्पष्ट झालं. शिल्पी वर्माच्याच वकीलांनीच आज अशी माहिती दिली. 
२ फेब्रुवारीला शिल्पी वर्माचं अपहरण झाल्याचा बनाव तिने आपल्या प्रियकराच्या साथीने आखला होता. अर्नाळा सागरी पोलिसांनी या दोघांना सोमवारी पंजाबच्या लुधियाना येथून आणलं होतं. आज वसई न्यायालयासमोर दोघांनाही हजर करण्यात आलं होतं. 
वसई कोर्टानं या दोघांना २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिल्पीचा प्रियकर अमरेश कुमार सिंग याच्यावर कलम ३९४,३६४,३७,५०६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिल्पीवर कटात सहभागी असल्याचा १२० (ब) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शिल्पीच्या वकीलांने सांगितल्याप्रमाणे शिल्पीचा पती तिला खूप त्रास देत होता. घरात बंदिस्तपणाने ठेवत होता. ती आपल्या पतीबरोबर खूश नव्हती. तो तिला पत्नीप्रमाणे न वागवता नोकरांनी प्रमाणे वागवत असल्याचंही त्यांनी सांगितली.
=======================================

जगातील स्वस्त स्मार्टफोनचं बुकींग 24 तासांसाठी थांबवलं

जगातील स्वस्त स्मार्टफोनचं बुकींग 24 तासांसाठी थांबवलं!


नवी दिल्ली: काल लाँच झालेला जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन वादाचा भोवऱ्यात सापडला आहे. आज सकाळी या स्मार्टफोनच्या बुकींगसाठी असलेली अधिकृत वेबसाइट http://www.freedom251.com/ क्रॅश झाली. ज्यामुळे या फोनची बुकींग बंद करण्यात आली आहे. आता भाजप खासदार किरीट सोमय्यांनी या स्मार्टफोन लाँचिंगवरच हल्लाबोल करीत हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगितले आहे. 
मोबाइल हॅण्डसेट उद्योग (आयईसीए) 251 रुपये किंमताचा स्मार्टफोन लाँचिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे. सबसिडी असणाऱ्या स्मार्टफोन मोबाइलची किंमत 3,500 एवढीच आहे. आज कंपनीच्या वेबसाईटवर सगळी प्रकिया पूर्ण झाल्यानंतर पेमेंटचं पेज मात्र सुरु होत नव्हत. सकाळी सहा वाजेपासून हिच परिस्थिती आहे. त्यामुळेच रिंगिंग बेल्स कंपनीनं याची बुकींग थांबवली आहे. 
तर दुसरीकडे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या स्वस्त स्मार्टफोन लाँचिंग हा ‘मोठा घोटाळा’ असल्याचा आरोप केला आहे. एबीपी माझाशी बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘मी फायन्सासचा माणूस आहे, मला हा काहीतरी घोटाळा वाटतो. मी ट्रायच्या चेअरमनशी बोलून याच्या बुकींगवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.’ 
सोमय्या म्हणाले की, ‘मी या कंपनीची पार्श्वभूमी तपासली ही कंपनी अगदी तीन महिन्यापूर्वी नोंदणीकृत झाली आहे. तसेच याच्या गुतंवणूकदारांची काहीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळं ही कंपनी सगळे पैसे घेऊन पळून जाईल असे वाटते.” असा घणाघाती आरोप सोमय्या यांनी केला आहे.
=======================================

सातारा; अजिंक्यतारा किल्ल्यावर पाणी आणणारा ढाण्या वाघ

अजिंक्यतारा किल्ल्यावर पाणी आणणारा ढाण्या वाघ!


सातारा: अजिंक्यतारा किल्ल्याला नवसंजीवनी मिळवून देणारे डॉ. अविनाश पोळ आणि टीम:

VIDEO: अंजिक्यतारा


=======================================

इंग्लिश कट्यार काळजात घुसली, राहुल-महेशनं 25 वर्षानंतर गायली इंग्लिश गाणीइंग्लिश कट्यार काळजात घुसली, राहुल-महेशनं 25 वर्षानंतर गायली इंग्लिश गाणी!


मुंबई: मराठी संगीत रंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक कट्यार काळजात घुसली रूपेरी पडद्यावर उतरलं आणि या सिनेमामधल्या गायिकीतल्या शिलेदारांनी आपल्या आवाजानं प्रेक्षकांना भुरळ घातली. 
प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे ही जोडी आज एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम ‘माझा कट्ट्या’वर आली होती. या जोडीनं आपल्या गाण्यांची मैफील बांधली. पण याचवेळी या दोघांनी तब्बल 25 वर्षानंतर काही इंग्रजी गाणीही गायली. 
राहुल देशपांडे आणि महेश काळे या दोघांनी 25 वर्षानंतर काही इंग्रजी गाणी गायली. दोघांनीही कट्ट्यावरील माझाच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांची सुरेल अंदाजात उत्तरंही दिली आणि फर्माइशीही पूर्ण केल्या.
=======================================

घाटकोपरमध्ये लोकलच्या धडकेत ४ गॅंगमनचा मृत्यू


  • मुंबई, दि. १९ - मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर-विद्याविहार रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेच्या चार गॅंगमनचा लोकलच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी हा दुर्देवी अपघात झाला.  
    सीएसटीच्या दिशेने जाणा-या लोकलची या गॅगमनना धडक बसली. अपघातानंतर या गॅंगमनना तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे त्यांचा मृत्यू झाला.  
    हे चारही गॅंगमन रेल्वेचे कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे ट्रॅकवर काम करताना नव्हे तर, रेल्वे रुळ ओलांडताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. दरम्यान रेल्वे पोलिस या अपघाताची चौकशी करत आहेत. गॅंगमन रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम करतात.
=======================================

आमीर खान थिरकला मराठी गाण्यांवर

  • आमीर खान त्याने केलेल्या असहिष्णुतेच्या वक्तव्यामुळे बरेच दिवस चर्चेत होता. यामुळे त्याचा चाहता वर्गदेखील मोठा निराश होता. आपल्या याच चाहत्या वर्गाला खूश करण्यासाठी मिस्टर परफेक्शनिस्टने रविवारी झालेल्या गिरगाव येथील ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमात अजय-अतुल या धडाकेबाज जोडीच्या मराठी गाण्यांवर पाय थिरकवून मराठी प्रेक्षकांचे मन जिंकले, तसेच या कार्यक्रमाला राजकीय व बॉलीवूडमधील दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी कविता सादर केली होती, तर हेमा मालिनी यांच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.
=======================================

आठ-दहा वर्षांत ‘बुलेट ट्रेन’ची गरज - मेट्रोमॅन डॉ. ई. श्रीधरन

  • नागपूर : बदलत्या तंत्रज्ञानानुसार आठ ते दहा वर्षांत देशात ‘बुलेट ट्रेन’ची गरज भासणार आहे. या ट्रेनचे तंत्रज्ञान नेहमीच्या गाड्यांमध्येही वापरता येऊ शकते, असे मत मेट्रोमॅन डॉ. ई. श्रीधरन यांनी येथे व्यक्त केले.
    नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमानंतर श्रीधरन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच नव्हे, तर इतर गाड्यांची आणि ट्रॅकची संख्या वाढविली पाहिजे. एका प्रश्नाच्या उत्तरात श्रीधरन म्हणाले, देशात स्थापन होणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा चांगला ताळमेळ दिसून येतो. त्यामुळे बांधकाम करताना अडथळा फार कमी येतो आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतो. मेट्रो रेल्वे प्रकल्प पूर्ण करताना गुंतवणूक आणि बांधकाम खर्च कमी असावा, यावर त्यांनी भर दिला. प्रकल्प पूर्ण करताना शासनावर अवलंबून राहू नये. ६० टक्के कर्जाची गरज भासते. कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी शासनाने ट्रॅक्स फ्री बॉण्ड काढला होता. जनरल कन्सल्टंट नियुक्ती झालेली नाही, पण त्यामुळे नागपूर मेट्रो रेल्वेचे कोणतेही काम थांबले नाही. सिव्हिल आणि तांत्रिक कामे जनरल कन्सल्टंट करतो. ही कामे या प्रकल्पात पूर्वीपासूनच सुरू असल्याचे श्रीधरन यांनी स्पष्ट केले.
=======================================

राज्यात इतर दुश्मनांची गरज ती काय? - उद्धव ठाकरे


  • मुंबई, दि. १९  - शेतकरी आत्महत्यांवरुन राज्य सरकारची बाजू मुंबई उच्च न्यायालयात सावरण्याऐवजी उलट सरकारलाच अडचणीत आणणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे आणि भाजपचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारच्या सामनच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे. मुंबईतील वातानुकूलित कार्यालयात बसून मराठवाडा-विदर्भातील शेतकर्‍यांच्या दु:खाच्या झळा कशा काय कळणार? सरकारी यंत्रणेला शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत काही पडलेले नाही, अशा लाथा महाराष्ट्राच्या अ‍ॅडव्होकेट जनरलनेच घातल्यावर राज्यात इतर दुश्मनांची गरज ती काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे. 
    देवेंद्र फडणवीस यांनी खास नेमलेले राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आपल्याच सरकारची आणखी किती अब्रू काढणार आहेत? सरकारच्या प्रमुख वकिलांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडायची असते, पण फडणवीस यांनी नेमलेले वकील नेमके उलटेच वागताना दिसत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा कमी पडत असल्याचा ‘बांबू’ सरकारी मुख्य वकिलांनीच घातला आहे व तोही मुंबई उच्च न्यायालयात. सरकारची बाजू भक्कमपणे मांडायचे सोडून श्रीहरी अणे हे तोंडास येईल ते बरळले आहेत असे सामनच्या अग्रलेखात म्हटले आहे. 
=======================================
बचाव दलाच्या पथकाने केली ट्रक चालकाची सुटका
पुणे/खडकवासला- पश्‍चिम बाह्यवळण महामार्गावर वडगाव बुद्रूक येथे दोन्ही पुलाच्या मधून 50 फूट खाली ट्रक पडला होता. यामध्ये ट्रक चालकाचा पाय अडकला होता. बचाव दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत त्याची सुटका केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली. 

सिंहगड रस्ता अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रभाकर उमराठकर यांनी सांगितले की, ट्रक साताऱ्याहून मुंबईकडे जात होता. आज सकाळी सात वाजता ही घटना घडल्यानंतर आम्हाला 7 वाजून 12 मिनिटांनी समजली. ट्रक चालकाचा पाय स्टिअरिंग व केबिन मध्ये अडकला होता. स्पीडरच्या साह्याने केबिनचा भाग कापून अर्धा तासानंतर त्याचा पाय बाहेर काढला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाजी मुजुमले, संतोष नलावडे, प्रमोद नलावडे, विलास घडशी, रामचंद्र सातपुते याच्या पथकाने चालकाची सुटका केली.




=======================================
नागपूर; सेंद्रिय शेतीसाठी प्राध्यापिकेने सोडली नोकरी
नागपूर - शेती करण्यासाठी कोणी नोकरी सोडेल यावर विश्‍वास बसत नाही. मात्र, हे सत्य आहे. नागपुरातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिका कीर्ती मंगरूळकर यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी प्राध्यापिकेची नोकरी सोडली. निसर्ग जीवनशैलीशी एकरूप होऊन आज त्या कळमेश्‍वर येथे पूर्णवेळ सेंद्रिय शेती करून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. 
संगणकशास्त्राच्या प्राध्यापिका कीर्ती मंगरूळकर यांचा बालपणापासून शेतीकडे कल होता. परंतु, धरणात जमीन गेल्याने शेती करण्याची संधी मिळाली नाही. अखेर त्यांनी तीन वर्षांपूर्वी कळमेश्‍वर येथे पाच एकर शेती विकत घेऊन सेंद्रिय शेती करणे सुरू केले. प्रारंभी शेती करताना बऱ्याच अडचणी आल्या. मात्र, त्यानंतर निसर्ग जीवनशैलीशी एकरूप होऊन त्यांनी यशस्वीपणे शेती केली. त्यांचा पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचा आत्मविश्‍वास वाढला. या आत्मविश्‍वासाच्या बळावर त्यांनी प्राध्यापिकेची नोकरी सोडली. कुटुंब आणि इतरांना विषमुक्त अन्नधान्य मिळावे यासाठी संकरित बियाण्यांऐवजी देशी बियाणे वापरून शेतात मूग, उडद, तूर, तीळ, हळद, मिरची या पिकांसह भाजीपाला घेत आहेत. सेंद्रिय शेती करण्यासाठी त्यांना विविध शेतीतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. पारंपरिक व शास्त्रोक्‍त पद्धतीचा वापर करून त्या शेती करतात. यामुळे पिकांवर रोग येत नाही. खर्च कमी लगतो. परिणामी उत्पादन वाढून नफा मिळत आहे.
=======================================
 रुग्णांसाठी मोफत "ऑटो ऍम्बुलन्स' 
16 वर्षांपासून उपक्रम : दिलीप इंगळे यांची समाजसेवा 
नागपूर - फावला वेळ घालविण्यासाठी काही लोक समाजसेवा करतात. परंतु दिवसभर ऑटो चालवून थकून घरी आल्यानंतर रात्री केव्हाही "रुग्णसेवे‘साठी मोबाईल खणखणला की त्वरित झोपेतून उठून रुग्णांप्रति तत्परता दाखविणारा ऑटोचालक म्हणजे दिलीप इंगळे. ऑटोच्या माध्यमातून रात्री-अपरात्री रुग्णांना मोफत सेवा देण्याचा त्यांचा प्रयोग 16 वर्षांपासून सुरू आहे. दिलीपचा ऑटो म्हणजे गरीब गरजूंसाठी रुग्णवाहिकाच ठरला आहे. बजरंगनगरात भाड्याच्या घरात राहणारा दिलीप दिवसभर शाळकरी मुलांची ऑटोतून ने-आण करतो. यातून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा गाडा ओढतो. स्वत: आर्थिक अडचणीत असूनही तो दुसऱ्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो. मागील 16 वर्षांत पंधरा हजारांच्या वर आजारी व्यक्ती, गर्भवती माता, मृतदेहांना त्याने ऑटोतून मोफत सेवा दिली. ही नोंद दिलीप आपल्या रजिस्टरमध्ये ठेवतो. रात्री मदतीसाठी येणारे फोन बेसा, मानेवाडा, उदयनगर, सुभेदार ले-आउट, गजानननगर, सावित्रीबाई फुलेनगर, न्यू कैलासनगर, बजरंगनगर, चंद्रमणीनगर, हुडकेश्‍वर, कौशल्यायननगर, कुकडे ले-आउट आणि जयताळा परिसरातून येतात. रात्री झोपमोड होते. परंतु गरजूंना मदतीचे समाधान त्याहून अधिक असल्याचे दिलीप सांगतात. सुरुवातीला दिलीप हातमजुरी करायचा. दरम्यान, दामोधर इंगोले या भल्या माणसासोबत त्याची भेट झाली. इंगोले यांनी ऑटो खरेदी करण्यासाठी मदत केली. त्याचवेळी ऑटोचा समाजासाठी उपयोग करण्याचा संकल्प त्यांनी केला
=======================================
झारखंडमध्ये चकमकीत चार माओवादी ठार
तैमारा घाटी (रांची)- झारखंडमध्ये सुरक्षा दल व माओवाद्यांमध्ये 9 तास चाललेल्या चकमकीमध्ये चार माओवादी आज (शुक्रवार) सकाळी ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकारी राकेशकुमार मिश्रा यांनी दिली. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘घागराबेरा गावाजवळ माओवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून त्यांच्याविरोधात सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी संयुक्तरीत्या गुरुवारी (ता. 9) रात्री नऊ वाजल्यापासून शोधमोहिम सुरू होती. घटनास्थळी जवान दाखल झाल्यानंतर त्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला होता. यावेळी जवान व माओवाद्यांमध्ये रात्रभर तब्बल 9 तास चकमक सुरू होती. आज सकाळी 4 माओवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ते माओवादी असल्याची ओळख पटली आहे. दोन जवान जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.‘
=======================================
विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचे प्रयत्न-राहुल
नवी दिल्ली/लखनौ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना चिरडण्याचा, तसेच देशभरातील विद्यार्थ्यांवर संघाची पोकळ विचारसरणी लादण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, कॉंग्रेस हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. विद्यार्थी आणि पत्रकारांवरील हल्ले देशाची बदनामी करणारे आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केंद्र सरकार आणि संघावर हल्ला चढवला. 
दरम्यान, हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याची हत्या केंद्र सरकारनेच केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी नंतर लखनौ येथील दलित मेळाव्यात केला. सत्तेवर पकड ठेवण्यासाठी दलित नेतृत्वाचे खच्चीकरण केल्याची टीका त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावरही केली. 

देशप्रेम आपल्या रक्तात आहे. देशद्रोह्यांविरुद्ध कारवाई व्हावी; पण देशभरातील विद्यार्थ्यांना आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (जेएनयू) बदनाम केले जाऊ नये, असे आवाहनही राहुल यांनी दिल्लीत केले. "जेएनयू‘मधील विद्यार्थ्यांवरील तसेच पत्रकारांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटून निवेदन दिल्यानंतर राहुल गांधी पत्रकारांशी बोलत होते. राहुल यांच्यासमवेत गेलेल्या शिष्टमंडळात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, आनंद शर्मा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, दिल्ली प्रदेशाध्यक्ष अजय माकन, राजस्थान प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, खासदार कुमारी सेलजा, के. सी. वेणुगोपाल, ज्योतिरादित्य शिंदे, मनीष तिवारी, माध्यम विभागप्रमुख रणदीप सुरजेवाला आदींचा समावेश होता.
=======================================

अखिल भारतीय नाटय़संमेलनात अग्निरोधक’ कापडाचा रंगमंच

 

मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमातील आगीच्या पाश्र्वभूमीवर काळजी
‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमातील रंगमंचावर उसळलेल्या आगीमुळे अवघ्या काही क्षणांत रंगमंच जळून खाक झाल्याची घटना मागील आठवडय़ात मुंबईत घडली. या पाश्र्वभूमीवर ठाण्यात होत असलेल्या नाटय़संमेलनात अग्निसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी नाटय़संमेलनाच्या रंगमंचावर आवश्यक ठिकाणी ‘अग्निरोधक’ कापड वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकाराच्या कापडामुळे एखादी ठिणगी उडाली तर ती पसरण्या ऐवजी पडद्याला केवळ एक छिद्र पडते. आग रोखण्यास हे कापड उपयुक्त ठरत असून त्याचा वापर केल्याने त्याचा लाभ होणार असल्याची माहिती नाटय़संमेलनाचे कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
ठाण्यात होणारे ९६ वे अखिल भारतीय नाटय़संमेलन शुक्रवारपासून सुरू होत असून मुख्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठय़ा संख्येने नाटय़कर्मी ठाण्यात दाखल होत आहेत. ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या रसिकांसाठी भव्यदिव्य रंगमंच आणि मंडप साकारण्यात आला आहे. गेल्या आठवडय़ात मुंबईतील ‘मेक इन इंडिया’ उपक्रमातील कार्यक्रमादरम्यान लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ठाण्यातील मंडपाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला.=======================================

अमेरिकेला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत- मनोज वाजपेयी

बॉलीवूड कलाकारांना हॉलीवूडमध्येही काम करण्याची इच्छा असते. प्रियांका चोप्रा, इरफान खान या कलाकारांनी तर आपल्या अभिनयाने हॉलीवूडकरांचीही मने जिंकली आहेत. पण याला अपवाद असा एक अभिनेता आहे की ज्याला बॉलीवूडमध्येच राहून येथील चित्रपटसृष्टीत अधिकाधिक चांगले काम करण्याची इच्छा आहे, तो म्हणजे मनोज वाजपेयी.
मनोजला बॉलीवूडमध्येच राहून काम करण्याची इच्छा तर आहेच पण अमेरिकेला जाण्याइतके आपल्याकडे पैसे नसल्याची प्रांजळ कबुलीही त्याने दिली. अलिगढ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’ने मनोजशी संपर्क साधला. त्यावेळी तो म्हणाला की, लॉस एन्जलिसला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. तसेच, तेथे महिनाभर राहून एजन्टला शोधणे मला जमणारे नाही. भारतात मला चांगल्या भूमिका आणि चित्रपट मिळत आहेत. इथे मिळालेल्या भूमिकांकडे मी अधिक लक्ष देऊन चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन. उगाच ‘लॉस एन्जलिस’ला जाऊन तिथे काळोखात भविष्य शोधत बसण्यास काय अर्थ आहे. मला हे काही योग्य वाटत नाही. माझ्या चाहत्यांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षांना मी तडा जाऊ देणार नाही. मला समोरून हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्की करेन. पण हॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी मी काही अतिरीक्त प्रयत्न करणार नाही. माझ्याकडे काही पैसा नाही. मी जे चित्रपट करतो त्यातून मला फार पैसे मिळत नाहीत. पण मला जे काही या चित्रपटसृष्टीकडून मिळते ते मला आणि माझ्या कुटुंबाला येथे चांगले आयुष्य जगण्यासाठी पुरेसे आहे.
=======================================

वैभव तत्ववादीसाठी सरसावला रणवीर सिंग

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आपल्या सहकलाकारांच्या कामाची नेहमीच प्रशंसा करतो.  दीपिका पदुकोण सध्या हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज होतेय. त्यासाठी रणवीरने तिला शुभेच्छा तर दिल्याचं पण त्याचसोबत तो आपल्या भावाच्या चित्रपटासाठीही उत्सुक आहे. अहो गडबडून जाऊ नका. हा काही त्याचा सख्खा भाऊ नाही. तर रुपेरी पडद्यावरील त्याच्या भावासाठी तो पुढे सरसावला आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात रणवीरच्या लहान भावाची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता वैभव तत्ववादीचा आज ‘मि अॅण्ड मिसेस सदाचारी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचा हा चित्रपट सर्वांनी पाहावा याकरिता रणवीरने एक व्हिडिओ तयार केलाय.
संजय लीला भन्साली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटात रणवीर आणि वैभवने अनुक्रमे ‘बाजीराव’ आणि ‘चिमाजी अप्पा’ या भूमिका साकारल्या होत्या. रुपेरी पडद्यावर या दोघांमध्ये मतभेद असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, पडद्यामागे या दोघांमध्ये चित्रीकरणादरम्यान चांगलीच गट्टी जमली. मग आपल्या या भावासाठी रणवीर मागे कसा राहिल. त्याने एक व्हिडिओ तयार केला असून त्यात म्हटले की, हाय मी रणवीर सिंग, माझा भाऊ वैभव तत्ववादीचा ‘मि अॅण्ड मिसेस सदाचारी’ चित्रपट बघायला विसरू नका. तसेच, त्याने बॉलीवूडमधील आपल्या मित्रमंडळींनाही हा चित्रपट पाहण्यास सांगितलेय.
वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, उमा सरदेशमुख आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मि अॅण्ड मिसेस सदाचारी’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

=======================================
=======================================
=======================================
=======================================

No comments: