१- फिजीमधील चक्रीवादळात ४२ जणांचा मृत्यू
२- नेपाळधील बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले, सर्व प्रवासी ठार
३- मलेशिया: सात हजार हिंदुंची मुस्लिम म्हणून नोंद
४- वॉशिंग्टन; द.चिनी समुद्रात चिनी क्षेपणास्त्रे,लढाऊ विमाने
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- JNU वाद: काँग्रेस-भाजपच्या युवा खासदारांची खडाजंगी
६- राज्यसभेत स्मृती इराणी- मायावतींमध्ये जुंपली
७- भारतातील मुस्लिम सुरक्षित आहेत म्हणत जिहादीने दिला होता हल्याला नकार
८- हैदराबाद; भारतातील मुस्लिम चांगल्या स्थितीत- अझीज
९- पाच हजार कोटी रुपये खर्च करुन १.५५ लाख टपाल कार्यालये होणार डिजिटल
१०- भगव्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्यानेच जेएनयूतील विद्यार्थ्यांवर कारवाई’
११- मंचाखालील सिलिंडरच्या स्फोटामुळे आग, चौपाटीवरील आगप्रकरणी अहवाल सादर
१२- अर्थसंकल्प ऑनलाइनच वाचा; छपाई कमी होणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- संजय दत्तच्या सुटकेला आव्हान, हायकोर्टात याचिका
१४- महाराष्ट्र सदन घोटाळा: भुजबळ कुटुंबावर आरोपपत्र दाखल
१५- लातूर; पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री
१६- हॅप्पी बर्थडे उदयनराजे ! बघा उदयनराजेंबाबतच्या 6 गोष्टी
१७- घाटी शब्द अनेकांसाठी अपमानास्पद - मुंबई उच्च न्यायालय
१८- मुंबई; महिला पीएसआयशी असभ्य वर्तन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- सातारा; कालव्यात कोसळलेल्या कारमधून पाचही जणांना सुखरुप वाचवलं
२०- मिसुरी; बेबी पावडरमुळे कॅन्सर, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला 500 कोटींचा दंड
२१- पाटणा; पास न केल्यास आत्महत्या, 20 वर्ष नापास विद्यार्थ्याची धमकी
२२- झारखंडःवरिष्ठाची हत्या करून जवानाची आत्महत्या
२३- रांची; बलात्कार पीडित चिमुकलीला शाळेचेही दरवाजे बंद
२४- उत्तर प्रदेश; मोटारीत संभोग करणाऱ्याचा अपघाती मृत्यू
२५- भाजप लोहा कार्यकारणीच्या बैठकीने कार्यकर्त्यांना मिळाली उर्जा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- आशिया कप : भारताविरुद्ध पाकिस्तानची नवी चाल
२७- 'नीरजा'ची गगनभरारी, पाच दिवसांत कोटींचा गल्ला
२८- संजय दत्त चार्टर्ड प्लेनने येणार, प्रथम सिद्धिविनायक चरणी
२९- गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का?
३०- 'नीरजा' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा करिती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो
[अरुण शेंडगे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
=======================================
संजय दत्तच्या सुटकेला आव्हान, हायकोर्टात याचिका
मुंबई: संजय दत्त येरवडा जेलमधून बाहेर येण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. मात्र संजयच्या सुटकेविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
संजय दत्तने जेलमध्ये असं कोणतं चांगलं काम केलं की त्याला शिक्षा संपण्याच्या आधी जेलमधून सोडलं जातंय, असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे.
देशभरातल्या जेलमध्ये कित्येक कैदी शिक्षा भोगत आहेत. पण त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नसल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.
अभिनेता संजय दत्त उद्या तुरुंगाबाहेर येणार आहे. त्याच्या स्वागतासाठी दत्त कुटुंबियांनी जोरदार तयारी केली आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता तो येरवडा तुरुंगातून बाहेर पडेल. मात्र, शिक्षा संपण्याच्या 8 महिने आधीच तो तुरुंगातून सुटणार आहे.
1993 मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला मे 2013 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातली दीड वर्षांची शिक्षा संजयनं आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती. त्यानुसार तो ऑक्टोबरमध्ये तुरुंगाबाहेर येणं अपेक्षित होतं. पण शिक्षेच्या आठ महिनेआधीच तो जेलमधून बाहेर येणार आहे.
JNU वाद: काँग्रेस-भाजपच्या युवा खासदारांची खडाजंगी
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील घोषणाबाजीचे पडसाद अपेक्षेप्रमाणे संसदेत उमटले. “देशविरोधी घोषणांचा निषेध, पण केवळ घोषणा दिल्याने देशद्रोही ठरत नाही, असं सांगत काँग्रेसचे तरुण खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
त्याला भाजपचे तरुण खासदार अनुराग ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
“संसदेवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला तुम्ही शहीद मानता का? जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारीला अफजल गुरुचा जयजयकार झाला, त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला. काँग्रेसवाले देशाला तोडणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटले, पण जेएनयूचाच विद्यार्थी पवन कुमार जो देशासाठी शहीद झाला त्यांच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत”, असा पलटवार अनुराग ठाकूर यांनी केला.
दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे यांनी कन्हैय्या कुमारला देशद्रोही ठरवता, मग गांधीजींचा हत्यारा नथुरामाचा जयजयकार करणारे कोण? त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का नाही? असा सवाल शिंदे यांनी केला. याशिवाय अफजल गुरुच्या फाशीला विरोध करणाऱ्या पीडीपीसोबत तुम्ही काश्मीरमध्ये सत्तेत का? असाही सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्र सदन घोटाळा: भुजबळ कुटुंबावर आरोपपत्र दाखल
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्यासह 17 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.
एसीबीने 20000 पानांच्या या आरोपपत्रात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना आरोपी केलं आहे. याशिवाय अरुण देवधर, माणिकलाल शाह, देवदत्त मराठे, दिपक देशपांडे, बिपीन संखे, अनिलकुमार गायकवाड, कृष्ण चमणकर, प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, प्रसन्ना चमणकर, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी यांचा आरोपपत्रात समावेश आहे.
पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री
लातूर : पानगावमधील शिवजयंती दिनी झालेल्या पोलिस मारहाण प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक आणि गृहराज्यमंत्र्यांना पानगावला भेट देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच हा हल्ला वैयक्तिक नव्हे तर तो पोलीस दलावरील हल्ला असून, असे हल्ले खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे.
दुसरीकडे पोलिसांना झालेल्या मारहाणीनंतर रेणापूरचे पोलीस निरीक्षक एल.व्ही.राख यांची बदल करण्यात आली आहे. काल रात्री त्यांना बदलीचे आदेश मिळाले आहेत
दरम्यान, आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस आमदार अमित देशमुख पानगावात जाऊन युनूस शेख यांची भेट घेणार आहेत.
राज्यसभेत स्मृती इराणी- मायावतींमध्ये जुंपली
नवी दिल्ली: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुल्ला आत्महत्याप्रकरणी चौकशी समिती नेमताना त्यात दलित सदस्य नेमण्याची मागणी करत बसपाच्या अध्यक्षा मायावती आक्रमक झाल्या.
त्यावर बोलताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी बसपा दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं राजकारण करत असल्याच आरोप केला. यामुळं संतापलेल्या मायावतींनी इराणी यांना मंत्रिपदावरुन दूर करण्याची मागणी करत गोंधळ सुरु केला.
याचवेळी बसपा खासदारही वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करु लागले. या सगळ्या राड्याला वैतागून सभापती कुरियन यांनी बसपा खासदारांना निलंबित करण्याची धमकी दिली.. मात्र त्यानंतरही घोषणा न थांबल्यानं अखेर कामकाज स्थगित करण्यात आलं.
दरम्यान कामकाज सुरु होण्याआधी सदनाबाहेरही रोहित वेमुला आणि जेएनयू प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
कालव्यात कोसळलेल्या कारमधून पाचही जणांना सुखरुप वाचवलं
सातारा : काळ आला होता पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय आज साताऱ्यात आला. साताऱ्यातील वडूज इथल्या कन्हेर कालव्यात कार कोसळली. पण सुदैवाने कारमधील पाचही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. ही कार आज पहाटे लोणंदहून साताऱ्याच्या दिशेने येत होती. कार वडूज गावानजीकच्या कन्हेर कालव्याजवळ पोहोचली. मात्र कालव्याला कठडा नसल्याने कार थेट पाण्यात कोसळली. आवाज आल्यानंतर स्थानिक घटनास्थळी दाखल झाले आणि कारमधील सगळ्यांना बाहेर काढलं. हे पाचही जण हे साताऱ्याचेच रहिवासी होते.
हॅप्पी बर्थडे उदयनराजे ! उदयनराजेंबाबतच्या 6 गोष्टी
राष्ट्रवादीचे खासदार आणि शिवरायांचे 13वे वंशज उदयनराजे भोसले यांचा आज 50 वा वाढदिवस. नेहमीच डॅशिंग आणि बिनधास्त भूमिकेमुळे उदयनराजे चर्चेत असतात. ना पक्षाची तमा ना वरिष्ठांची भीती, 'जे पोटात, तेच ओठात' अशी उदयनराजेंची प्रतिमा आहे.
सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व राजेशाहीच आहे. नुकतंच उदयनराजे टॅक्सीचालकांसाठी रस्त्यावर उतरले होते. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना मोटरसायकल भाडेतत्त्वावर काही दिवसात मिळणार आहे. त्याला टॅक्सीचालकांचा विरोध आहे. यावेळी उदयनराजेंनी आपल्या डॅशिंग भूमिकेत डायलॉगबाजी केली होती. 'एक बार जो मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनता....' उदयनराजेंच्या स्टाईल मधील ही धमकी महाबळेश्वरातील टॅक्सी व्यवसायिकांसाठी दिली.
1) पाचगणीत प्राथमिक शिक्षण ते इंजिनिअरिंगची पदवी उदयनराजेंनी पाचगणी इथं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण त्यांनी इंग्रजी माध्यमातून घेतलं. त्यामुळे इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांनी पुण्यात प्रॉडक्शन मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे.
2) लाईफस्टाईल उदयनराजेंना हॉर्स रायडिंग, कार ड्रायव्हिंगची आवड आहे. मॉर्डन उदयनराजेंना राजेशाही वेशभूषा आवडत नाही. उदयनराजेंना जीन्स, कॅज्युअल शर्ट आणि पायात कोल्हापुरी चप्पल हा उदयनराजेंचा फेवरेट ड्रेसकोड. उदयनराजेंना शाकाहारी जेवण आवडतं. मी कारलं सोडून सगळ्या भाज्या खातो, असं उदयनराजे म्हणतात.
3) राजकीय कारकिर्द उदयनराजे 1990 पासून राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली. उगवता सूर्य या चिन्हावर रयत पॅनेलवर सातारा मनपा निवडणुतीत त्यांचा विजय झाला होता. मग उदयनराजेंनी 1996 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. पण त्यांच्या पराभव झाला. मग उदयनराजेंनी भाजपकडून 1996-97 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.
त्या वेळी युतीच्या सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आलं. पण 1999 च्या विधानसभा निवडणुकीत अभयसिंहराजेंच्या विरोधात उदयनराजेंना पुन्हा पराभूत व्हावं लागलं. तर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण काँग्रेसकडून उमेदवारी मिळत नाही, हे कळल्यावर त्यांनी शरद पवारांशी संधान बांधलं. यानंतर मग 2008-09च्या लोकसभा निवडणुकीत देशात सातव्या क्रमाकांचे सुमारे तीन लाख इतके मताधिक्य घेत ते राष्ट्रवादी खासदार झाले. मग 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट असताना उदयनराजे स्वत:च्या हिमतीवर निवडून आले. यावेळी राष्ट्रवादीचे केवळ 4 खासदार निवडून आले. त्यामध्ये उदयनराजेंचा समावेश होता.
4) गोपीनाथ मुंडेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध उदयनराजे आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच त्यांनी विधानसभेची निवडणूक भाजपकडून लढवली होती. भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात त्यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते. याशिवाय ते महसूल राज्यमंत्रीही होते.
5) शरद पवारही 'खास' उदयनराजे आणि शरद पवार यांचेही संबंध म्हटलं तर खास, म्हटलं तर टोकाचे आहेत. उदयनराजेंनी अनेकवेळा पक्षादेश धुडकावले आहेत. त्यामुळे अनेकवेळा पक्ष आणि उदयनराजे यांच्या भूमिका वेगवेगळ्या राहिल्या आहेत. पण तरीही शरद पवार आणि उदयनराजे यांचा संवाद होत असतो. पूर्वी शरद पवार आणि उदयनराजे यांचा पत्रव्यवहार व्हायचा, तेव्हा पवार त्याची सुरुवात 'माय डिअर' अशी करायचे, असं सांगितलं जातं.
बेबी पावडरमुळे कॅन्सर, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला 500 कोटींचा दंड
मिसूरी : लहान मुलांची उत्पादनं बनवणारी प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अॅण्ड जॉन्सनला तब्बल 72 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 494 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील सेंट लुईस सर्किट कोर्टाने कंपनीवर ही दंडात्मक कारवाई केली आहे.
या कंपनीच्या उत्पादनांचा वापर केल्याने कॅन्सर झाल्याची तक्रार जॅकलीन फॉक्स या महिलेने केली होती. त्यानंतर न्यायलयाने हा आदेश जारी केला आहे. मात्र आमची सर्व उत्पादनं सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
पीडित महिला ओव्हेरियन कॅन्सरग्रस्त (अंडाशयाचा कर्करोग) होती, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही महिला जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पावडर आणि शॉवर टू शॉवरचा अनेक वर्षांपासून वापर करत होती.
संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश न्यायलयाने कंपनीला दिला आहे. जॅकलीन फॉक्सच्या कुटुंबीयांना सेंट लुईसच्या सर्किट कोर्टाने 10 मिलियन डॉलर ‘अॅक्च्युअल डॅमेज’ म्हणजेच प्रत्यक्ष नुकसान आणि 62 मिलियन डॉलरचं ‘प्युनिटिव्ह डॅमेज’ म्हणजे दंडात्मक नुकसान भरपाई देण्याचा दिला आहे.
बर्मिंगहमच्या अलबामामध्ये राहणाऱ्या जॅकलीन फॉक्स 35 वर्षांपेक्षा जास्त काळ बेबी पावडर आणि शॉवर टू शॉवरचा वापर केला होता. तीन वर्षांपूर्वी तिला ओव्हेरियन कॅन्सरचं निदान झालं. मागील वर्षी वयाच्या 62 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला, असा दावा कोर्टात केला होता.
कोर्टाने कंपनीला फसवणूक, निष्काळजीपणा आणि कट रचल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं, असं महिलेच्या कुटुंबीयांच्या वकिलांनी सांगितलं.
दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयानंतर कंपनीच्या प्रवक्त्या कॅरेल गुडरिच म्हणाल्या की, “ग्राहकांची सुरक्षा आणि आरोग्य आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. पण न्यायालयाच्या निर्णयामुळे निराशा झाली आहे. आम्हाला पीडित महिलेच्या कुटुंबीयांविषयी सहानुभूती आहे. मात्र आमची टॅल्कम पावडर पूर्णत: सुरक्षित असून आमच्याकडे वैज्ञानिक पुरावेही आहेत.”
पास न केल्यास आत्महत्या, 20 वर्ष नापास विद्यार्थ्याची धमकी
पाटणा : अनेक वेळा अपयश पदरी येऊनही धीराने संकटांचा सामना करणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो. मात्र गेली 20 वर्ष वैद्यकीय शाखेच्या दुसऱ्या वर्षाला नापास होणाऱ्या विद्यार्थ्याने यातून धडा न घेता टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. 52 वर्षांच्या व्यक्तीने आपल्याला पास न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी मुख्याध्यापकांना दिली आहे.
पाटण्याच्या दरभंगा मेडिकल कॉलेजमधल्या कपिल देव चौधरीने ही धमकी दिल्याचं वृत्त ईटीव्हीने दिलं आहे.
1995 मध्ये कपिलने एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. परंतु दुसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम काही त्याला झेपेना. प्रत्येक वेळी परीक्षा झाली की कपिल मुख्याध्यापकांना मला पास करा, असा मेसेज करा. मात्र कपिलच्या हट्टाकडे अर्थातच मुख्याध्यापकांनी लक्ष दिले नाही. अखेर 20 वर्षांनंतर कपिलने पास न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.
‘मला डॉक्टर होऊन देशाची सेवा करायची आहे. त्यामुळे त्यांनी मला परीक्षेत पास करावं. जर मला पास केलंत तर देवही तुमचं भलं करेल’ असं कपिलने यावेळी मेसेजमध्ये लिहिलंय.
इतकंच नाही, तर आपल्या गुणवत्तेला दोष न देता, आपण दलित असल्यामुळे पास करण्यात येत नसल्याचा ठपकाही त्याने ठेवला आहे.
मात्र मेसेजचा काहीही फायदा होत नसल्याचं लक्षात येताच इरेला पेटलेल्या कपिलने आत्महत्येची धमकी दिली आहे. पोलिसांनी कपिलविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
आशिया कप : भारताविरुद्ध पाकिस्तानची नवी चाल
इस्लामाबाद : आशिया चषक आणि टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मात देण्यासाठी पाकिस्तानाने नवी चाल खेळली आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने आपले जुने मोहरे बाहेर काढले आहेत. जखमी बाबर आझम आणि रुम्मान रईस यांच्या जागी शर्जिल खान आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सामी यांचा संघात समावेश केला आहे.
याशिवाय इफ्तिखार अहमदच्या जागी खालिद लतीफलाही टीममध्ये संधी दिली आहे.
सरावादरम्यान आझमच्या हाताला जखम झाली, तर रईसला स्नायूदुखीचा त्रास होत आहे, त्यामुळे त्यांना विश्रांती दिल्याचं पीसीबीने म्हटलं आहे.
शर्जिल, सामी आणि लतीफने सध्या सुरु असलेल्या पीसीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना संघात समावेश केल्याचं पाकिस्तानच्या निवड समितीचे अध्यक्ष हारुन रशीद यांनी सांगितलं.
शर्जिल खान आणि सामीचं पीसीएलमधील प्रदर्शन पाहून, कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि मुख्य प्रशिक्षक वकार युनूसनेच यांची निवड केली आहे.
'नीरजा'ची गगनभरारी, पाच दिवसांत कोटींचा गल्ला
मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरचा ‘नीरजा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली भरारी घेताना दिसत आहे. या सिनेमाने पहिल्या पाच दिवसात चांगली कमाई केली असून आठवड्याभराचा गल्ला 35 कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नीरजा चित्रपटाची पाच दिवसांची एकूण कमाई 29.12 कोटी झाली आहे. ओपनिंग विकेंड म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवारमध्ये 22 कोटींचं कलेक्शन झालं होतं.
दिवस – कमाई
शुक्रवार- 4.70 कोटी
शनिवार- 7.60 कोटी
रविवार – 9.71 कोटी
शनिवार- 7.60 कोटी
रविवार – 9.71 कोटी
संजय दत्त चार्टर्ड प्लेनने येणार, प्रथम सिद्धिविनायक चरणी
मुंबई : अभिनेता संजय दत्तची उद्या येरवडा तुरुंगातून सुटका होणार असून, मीडिया आणि चाहत्यांना टाळण्यासाठी तो पुणे ते मुंबई हा प्रवास चार्टर्ड विमानाने करणार आहे. पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेने प्रवास त्रासदायक ठरण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
रस्त्याने आल्यास मोठ्या संख्येने मीडियाची वाहने त्याच्या मागे राहतील. मागील आठवड्यातच हा महामार्ग ब्लॉक झाला होता, या पार्श्वभूमीवर चार्टर्ड प्लेनचा पर्याय निवडण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास संजय दत्त तुरुंगातून बाहेर येणार आहे. अन्य आरोपींप्रमाणेच संजयलाही तुरुंगातून बाहेर सोडण्यात येईल. तुरुंगातून बाहेर पडताना जेल कर्मचाऱ्यांना तो संजय दत्तच असल्याची ओळख पटवावी लागेल. त्याला नेण्यासाठी पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलं येणार आहेत.
वांद्र्यातील संजय दत्तच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी पाहता सुरक्षेसाठी हा बंदोबस्त ठेवला जाईल.
संजय दत्त मुंबईला आल्यावर सर्वप्रथम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार आहे. तिथून आई नर्गिस यांच्या समाधीचं दर्शन घेऊन तो निवासस्थानी परतेल. घरी गेल्यावर वडील संजय दत्त यांच्या तसवीरीची पूजा करेल, अशी माहिती आहे.
गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का?
- राष्ट्रगीत म्हटलं की सर्वसामान्यांचं देशप्रेम उफाळून येतं, याचाच फायदा घेत प्रकाश झा यांनी गंगाजलच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर केला आहे. पोलीस दलातील महिलांना मानवंदना असं सांगत प्रियांका चोप्रा, स्वत: प्रकाश झा आणि पोलीसांच्या वेशातील अन्य जन गण मन गातात, असं या राष्ट्रगीताचे स्वरुप आहे.राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि ते सुरू असताना प्रत्येकानं उठून उभे राहणे हे आवश्यकच आहे. परंतु राष्ट्रगीताचा वापर गंगाजल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करावा का हा प्रश्न आहे. कारण, हे राष्ट्रगीत संपल्यानंतर जय गंगाजल अशी चित्रपटाची जाहिरातही याच व्हिडीयोमध्ये येते.राष्ट्रगीत हा इतका संवेदनशील विषय आहे की, जे मान देत नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवण्यास खूपजण मोकळे होतात, परंतु राष्ट्रगीताचा असा व्यावसायिक कारणासाठी वापर करणं योग्य ठरतं का प्रश्न अनुत्तरीतच राहतो.हा व्हिडीयो प्रियांका चोप्राने 26 जानेवारी रोजी शेअर केला होता. हाच व्हिडीयो अनेक मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येत आहे. त्यात एक शक्यता आहे की हे गंगाजलची जाहिरात करणारे राष्ट्रगीत दाखवण्यासाठी मल्टिप्लेक्सही चांगलीच किंमत वसूल करत असणार.गंगाजलमध्ये पोलीस सुपरिटेंडेंटच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा झळकत असून प्रकाश झांचं दिग्दर्शन आहे. हा विषय अत्यंत चांगला आहे यात काही वाद नाही, परंतु हा व्हिडीयो प्रकाश झा प्रॉडक्शनने देशभक्ती दाखवण्यासाठी चित्रपटगृहात दाखवलाय की चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी हा प्रश्न शिल्लक राहतोच.तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रगीताचा असा सिनेमाच्या जाहिरातीसाठी वापर करणं योग्य आहे?
भारतातील मुस्लिम सुरक्षित आहेत म्हणत जिहादीने दिला होता हल्याला नकार
- नवी दिल्ली, दि. २४ - 'भारतातील मुस्लिमांची परिस्थिती इतर देशांशी तुलना करता चांगली आहे', असं म्हणत जिहादी अब्दुल अजिज उर्फ गिद्दाह याने भारतावर हल्ला करण्यास नकार दिला होता. अब्दुल अजिज उर्फ गिद्दाह याला १९९७ साली भारतावर हल्ला कऱण्याची सुचना करण्यात आली होती. मात्र भारतात मुस्लिम सुरक्षित आहेत सांगत त्याने हल्यास नकार दिला होता.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्ताप्रमाणे १९९७ मध्ये हँण्डलर मोहम्मद इस्माईल आणि लष्कर-ए-तोयबा ऑपरेटीव्ह सलीम जुनेदने अजिजला भारतात जिहाद पुकारण्यास सांगितले होते. मात्र अजिजने भारतात याची गरज नाही असं सांगितल होतं. भारतातील मुस्लिमांची परिस्थिती इतर देशांतइतकी वाईट नाही आहे असं सांगत अजिजने भारतात जिहाद पुकारण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर सौदीमधील एनजीओ इंटरनॅशनल इस्लामिक रिलीज ऑर्गनायजेशनचा प्रमुख शेख अहमद याने बाबरी मशिदीच्या घटनेचा उल्लेख करत अजिजचं मन वळवलं आणि भारतात जिहाद पुकारण्यासाठी त्याला तयार केले. शेख अहमदने अजिजला या कामासाठी ९.५ लाख रुपये दिले होते.२००५मध्ये अब्दुल अजिजला सौदीमध्ये अटक करण्यात आली होती. अब्दुल अजिज आंध्रप्रदेशात बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी आरोपी आहे. सौदीमधील तेलाची ठिकाणे उडवून देण्याच्या कट रचल्याप्रकरणी २००५मध्ये सौदीमध्ये जिहादी अब्दुल अजिजला अटक करण्यात आली होती. सौदीमध्ये १० वर्ष कारावास भोगल्यानंतर त्याला २ फेब्रुवारीला भारताच्या हवाली करण्यात आलं.
घाटी शब्द अनेकांसाठी अपमानास्पद - मुंबई उच्च न्यायालय
- मुंबई, दि. २४ - घाटी हा शब्द महाराष्ट्रात अनेकांना अपमानास्पद वाटतो असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका प्रकरणाच्या सुनावणीत सांगितले. बद्री अय्यर या २५ वर्षाच्या चार्टड अकाऊंटसीच्या विद्यार्थ्याच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले.कुलाबा पोलिस स्थानकाच्या उपनिरिक्षकांनी बद्री विरोधात सरकारी कर्मचा-याला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे आणि जाणीवपूर्वक अपमान करणे या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी बद्रीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.मात्र उच्च न्यायालयाने बद्रीला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. बद्रीने दाखल केलेल्या याचिकेनुसार ३१ डिसेंबरच्या रात्री बद्री आणि त्याची मैत्रिण पार्टीसाठी कुलाबा क्लबमध्ये गेले होते. रात्री पावणेदोनच्या सुमारास ते दोघे टॅक्सीची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी एक पोलिस तिथे आला आणि त्याने दोघांना तिथून निघण्यास सांगितले.त्यावेळी बद्रीने त्या पोलिसाला आपल्या मैत्रिणीला बरे वाटत नसून, आपण टॅक्सीसाठी थांबलो आहोत असे सांगितले. त्यावेळी दोन पोलिस तिथे आले आणि त्यांनी चौकशी सुरु केली. या पोलिसांनी मुलीच्या कपडयांवरुन शेरेबाजीही केली. त्यावरुन पोलिसांबरोबर वादावादी सुरु असताना पोलिसांनी मारहाण केल्याचे बद्रीने याचिकेमध्ये म्हटले आहे.पण एफआयआरमध्ये पोलिसांनी बद्रीने मारहाण केली व अपमान करण्याच्या हेतूने घाटी म्हटले असे लिहीले आहे. सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी बद्रीला घाटी शब्द का वापरला असे विचारले. तुला घाटी शब्द वापरायची गरज नव्हती असे न्यायाधीशांनी सांगितले.त्यावर बद्रीच्या वकिलांनी बद्री घाटी हा शब्द पोलिसांना नाही स्वत:ला उद्देशून बोलला असा दावा केला. त्यावर न्यायाधीशांनी महाराष्ट्रात घाटी हा शब्द अनेकांना अपशब्द, अपमानास्पद वाटतो असे सांगितले.
मुंबई; महिला पीएसआयशी असभ्य वर्तन
- मुंबईतील एका पोलीस हवालदाराने दारू पिऊन आपल्याच पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षकाशी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे आपल्याच वरिष्ठांशी हुज्जत घालणारे असले महाभाग शहरातील अन्य तरुणी, महिलांच्या सुरक्षेची काय दक्षता घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘आॅनड्युटी’ घडलेल्या या घटनेने खात्यातील बेशिस्त चव्हाट्यावर आली आहे. याबाबत संबंधित हवालदारावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नसला, तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी योग्य खबरदारीचे आदेश आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची माहिती अशी एका महिला उपनिरीक्षकांची नाइट ड्युटी असल्याने, त्या सहकाऱ्यासमवेत मोबाइल क्रमांक ५, बीट क्र.२ मध्ये गस्तीवर होत्या. त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पटेल टीटी चौकी येथे त्या तपासणीसाठी गेल्या असताना, त्यांना तेथे हवालदार आव्हाड झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला उठवले असता, त्याने मद्यपान केल्याचे निदर्शनास आले. आव्हाडकडे विचारणा केल्यावर त्याने या महिला अधिकाऱ्याला उद्धटपणे उत्तरे दिली. ‘तुम्ही कोण मला विचारणार? मी काहीही करीन,’ असे तो असभ्यपणे बरळत राहिला. हा प्रकार हाताबाहेर जात असल्याचे पाहून पीएसआयने ही माहिती तातडीने पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली, तसेच त्याच्या कृत्याबाबतची ‘डायरी’त नोंद करण्यात आली. त्यानंतर आव्हाडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तो दारू प्यायलेला असल्याचे स्पष्ट झाले.
५,००० कोटी रुपये खर्च करुन १.५५ लाख टपाल कार्यालये होणार डिजिटल
- नवी दिल्ली, दि. २४ - ४,९०९ कोटी रुपये खर्च करुन देशातील १.५५ लाख टपाल कार्यालये डिजिटल माध्यमातून जोडली जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत दिली आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री प्रसाद म्हणाले, हा प्रकल्पाद्वारे टपाल विभागातील सर्व कामकाज एका मध्यवर्ती सर्व्हरशी जोडले जाईल त्यात एकात्मिक मॉड्यूलर आणि स्केलचा समावेश असेल.ग्रामीण भागातील टपाल कार्यालये कोअर बॅंकिंग सेवेशी जोडली जाणार आहेत. शिवाय टपाल विभागाकडून येत्या तीन महिन्यांत एक हजार एटीएम केंद्र सुरू करून एटीएम सेवा पुरविली जाणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना दूरसंपर्काच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या अंतर्गत पोस्टमनजवळील सर्वच कामे डिजिटली होणार आहेत. २२ फेब्रुवारी २०१६ नुसार, १७०५७ टपाल कार्यालये कोअर बॅंकिंग सेवेशी जोडली गेली आहेत. तर ८०५ मुख्य तसेच उप कार्यालये कोअर बॅंकिंग सेवेशी जोडली गेली आहेत. या सेवेअंतर्गत ५१० एटीमचा वापर केला जातो अशी माहीती प्रसाद यांनी लोकसभेतील प्रश्न-उत्तराच्या तासात दिली.
फिजीमधील चक्रीवादळात ४२ जणांचा मृत्यू
- फिजी, दि. २४ - विन्स्टन चक्रीवादळामुळे फिजी देशातील ४२ जणांनी आपला जीव गमावला आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या वादळामुळेफिजी देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.न्यूजीलंडने नौदलाचे २ जहाज तसंच बचावकार्य पथक पाठवत असल्यांचं सांगितल आहे मात्र ते अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही. मंगळवारी २९वर असणारा मृतांचा आकडा आज ४२वर पोहोचला आहे. हा आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती फिजी सरकारचे प्रवक्ते डॅन यांनी ट्विटरवरुन दिली आहे. आपत्ती पथक शक्य तितक्या ठिकाणी पोहोचण्याच प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
नेपाळधील बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले, सर्व प्रवासी ठार
- काठमांडू, दि. २४ - पश्चिम नेपाळकडील पर्वत रांगांमध्ये बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले असून विमानातील सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याचे नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले.तारा एअरच्या ' दि ट्विन ऑटेर ' या विमानाने बुधवारी सकाळी पोखरा येथून जोमसोमच्या दिशेने उड्डाण केले, मात्र अवघ्या काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाले. या विमानात १८ प्रवासी व ३ क्रू मेंबर्स असे एकूण २१ जण प्रवास करत होते.नेपाळच्या पर्वतरांगांमध्ये विमान बेपत्ता झाल्याचे वृत्त येताच विमानाच्या शोधासाठी तीन हेलिकॉप्टर पाठवण्यात आली तसेच बचावकार्यासाठी टीमदेखील पाठवण्यात आली. मात्र धुक्यामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याची माहिती नेपाळ लष्कराच्या अधिका-याने दिली. अखेर दुपारच्या सुमारास नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांनी या विमानाचे अवशेषच सापडल्याचे सांगत सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट केले. विमानातील प्रवाशांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा तसेच दोन लहान मुलांचा समावेश होता. हरिहरी योगी या पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार काही रुपशे गावातील काही स्थानिक लोकांनी मोठा स्फोट झाल्याचं ऐकल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणीदेखील शोध सुरु होता. विमान प्रवास करत असलेल्या रस्त्यात कोठेच लॅडींगसाठी जागा नसल्याने विमानाचा अपघात झाल्याची दाट शक्यता विमानतळ अधिकारी योगेंद्र कुंवर यांनी दर्शवली होती.
भगव्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्यानेच जेएनयूतील विद्यार्थ्यांवर कारवाई’
उपस्थित केल्यामुळेच केंद्र सरकारने त्यांच्यावर कारवाई केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी लोकसभेत केला. रोहित वेमुला आत्महत्या आणि जेएनयू या प्रकरणांवर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. चर्चेमध्ये भाग घेताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजपचे नेते जरी सबका साथ, सबका विकास म्हणत असले, तरी देशातील लोक आता किसका साथ, किसका विकास असा प्रश्न विचारत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रसारासाठी देशातील प्रशासकीय व्यवस्थेचा दुरुपयोग करीत आहे. रोहित वेमुला प्रकरणावरून हे स्पष्टपणे दिसून आले आहे. जेएनयूमधील ज्या विद्यार्थ्यांनी भगव्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. केवळ आठ ते दहा विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण संस्थेला बदनाम करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
=======================================मंचाखालील सिलिंडरच्या स्फोटामुळे आग, चौपाटीवरील आगप्रकरणी अहवाल सादर
‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्त गिरगाव चौपाटीवर मागील आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमाच्या रंगमंचाला लागलेल्या आगीचा अहवाल अग्निशमन दलाने बुधवारी पालिका आयुक्तांकडे सादर केला. मंचाच्या खाली सहा सिलिंडर ठेवण्यात आले होते यातील एकाचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रमात आगीपासून गणपतीची प्रतिकृती साकारण्यासाठी हे सिलिंडर ठेवण्यात आले होते. स्फोट झाला त्यावेळी मंचाजवळ ज्वलनशील वस्तू असल्याने आग पटकन पसरली. दरम्यान, कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच अग्निशमन दलाने पाहणी अहवाल इव्हेंट कंपनीला पाठवून दिला होता. पाहणीत सिलिंडर न वापरण्याचा सल्ला अग्निशमन दलाकडून आयोजकांना देण्यात आला होता. तरीसुद्धा कार्यक्रमाच्या दिवशी सिलिंडर वापरण्यात आले, असे नमूद करून झालेल्या घटनेला आयोजकांचे ढिसाळ नियोजनच जबाबदार असल्याचे अग्नीशमन दलाने अहवालात म्हटले आहे. अग्निशमन दलाने पालिका आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर तो आता मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे.
=======================================मलेशिया: सात हजार हिंदुंची मुस्लिम म्हणून नोंद
क्यालालांपूर - मलेशियामध्ये सरकारदरबारी तब्बल सात हजार हिंदू नागरिकांची मुस्लिम म्हणून नोंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नागरिकांना सरकारच्या या प्रकाराविरूद्ध न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.
‘हिंदू संगम‘ या संघटनेचे अध्यक्ष मोहन शान यांनी मलेशियातील एका स्थानिक वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली. विविध ठिकाणच्या सात हजार हिंदू नागरिकांची मुस्लिम म्हणून नोंद करण्यात आली आहे. मुस्लिमबहुल मलेशियामध्ये एखाद्या मुस्लिम नसलेल्या नागरिकाची अनावधनाने जरी मुस्लिम म्हणून नोंद झाली तरीही त्या व्यक्तीला माहितीमध्ये बदल करण्यासाठी शरियत न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसा तेथे कायदाही करण्यात आला आहे. मलेशियातील अल्पसंख्यांकांसाठी काम करणाऱ्या आठ स्वयंसेवी संस्था या सात हजार हिंदू नागरिकांच्या मदतीसाठी आल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 500 हिंदूंशी संपर्क साधून त्यांना मदत केली आहे. मुस्लिम लॉयर्स असोसिएशननेही यासंदर्भात मदत करण्याचं आश्वासन दिल्यानं हिंदूंना दिलासा मिळाला आहे.
‘हिंदू संगम‘ या संघटनेचे अध्यक्ष मोहन शान यांनी मलेशियातील एका स्थानिक वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली. विविध ठिकाणच्या सात हजार हिंदू नागरिकांची मुस्लिम म्हणून नोंद करण्यात आली आहे. मुस्लिमबहुल मलेशियामध्ये एखाद्या मुस्लिम नसलेल्या नागरिकाची अनावधनाने जरी मुस्लिम म्हणून नोंद झाली तरीही त्या व्यक्तीला माहितीमध्ये बदल करण्यासाठी शरियत न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसा तेथे कायदाही करण्यात आला आहे. मलेशियातील अल्पसंख्यांकांसाठी काम करणाऱ्या आठ स्वयंसेवी संस्था या सात हजार हिंदू नागरिकांच्या मदतीसाठी आल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी 500 हिंदूंशी संपर्क साधून त्यांना मदत केली आहे. मुस्लिम लॉयर्स असोसिएशननेही यासंदर्भात मदत करण्याचं आश्वासन दिल्यानं हिंदूंना दिलासा मिळाला आहे.
झारखंडःवरिष्ठाची हत्या करून जवानाची आत्महत्या
रांची- केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानाने वरिष्ठ अधिकाऱची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली.
अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तलेहर जिल्ह्यात असलेल्या छावनीमध्ये ही घटना घडली. जवान महिपाल व त्याचे वरिष्ठ अधिकारी संजय यांच्यामध्ये आज दुपारी साडेबाराच्या सुमारास शाब्दिक चकमक झाली. यावेळी महिपालने बंदुकीतून संजय याच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर महिपालने स्वःतवर गोळी झाडून घेतली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.‘
‘घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. दोघांच्या भांडणामधूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे,‘ असेही अधिकाऱयांनी सांगितले.
=======================================
भारतातील मुस्लिम चांगल्या स्थितीत- अझीज
हैदराबाद- जगभरातील मस्लिमांपेक्षा भारतातील मुस्लिमांची स्थिती चांगली आहे, असे आंध्र प्रदेशात स्फोटात स्फोटाचा कट रचणारा आरोपी अब्दुल अझीज ऊर्फ गिद्दाह याने म्हटले आहे.
अझीज सौदी अरेबियामध्ये दहा वर्षांची शिक्षा भोगून या महिन्याच्या सुरवातीला भारतात परतला आहे. सौदी अरेबियातील पूर्व भागात स्फोट घडवून आणण्याच्या कटामध्ये तो काम करत होता. शिवाय, विविध दहशतवादी संघटनांमध्ये तो सहभागी होता. याबद्दल त्याला 2005 मध्ये सौदी अरेबियात अटक करण्यात आली होती.
अझीज म्हणाला, ‘जगभरातील मुस्लिम नागरिकांची स्थिती पाहता भारतातील मुस्लिम खूपच चांगल्या स्थितीत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले आहेत.‘
=======================================
बलात्कार पीडित चिमुकलीला शाळेचेही दरवाजे बंद
=======================================
अर्थसंकल्प ऑनलाइनच वाचा; छपाई कमी होणार
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पाच्या आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या म्हणजेच ईकॉनॉमिक सर्वेच्या प्रती कमी छापण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेच्या स्थायी समितीने छपाई कमी करून अर्थसंकल्प ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची शिफारस केली होती. पर्यांवरणाचा र्हास, वृक्षांची होणारी कत्तल आणि प्रती छापण्यावर करण्यात येणारा मोठा खर्च लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने अनेक मोठ्या कंपन्यांना देखील वार्षिक आर्थिक अहवाल आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने संसदेच्या पटलावर दोन्ही महत्त्वाची कागदपत्रे ठेवल्यानंतर हे दस्तऐवज ऑनलाईन उपलब्ध करण्यात येणार आहेत. दोन्ही कागदपत्रे कमी प्रतीत छापण्याचे ठरवल्याने छापील प्रतींची संख्या कमी होणार आहे. वर्तमानपत्रांना ती उपलब्ध करून दिली जातील. अर्थसंकल्पाची आणि सर्वेक्षणाच्या छापील प्रती माध्यमांना पुरवल्या जाणार असून सर्व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना प्रत्येकी एक प्रत दिली जाणार आहे. स्थायी समितीने अर्थसंकल्पाच्या प्रतींची संख्या कमी करून तो ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे सूचवले आहे.
=======================================
उत्तर प्रदेश; मोटारीत संभोग करणाऱ्याचा अपघाती मृत्यू
पिलीभित (उत्तर प्रदेश)- धावत्या मोटारीमध्ये संभोग करणाऱ्या चालकाचा मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक (वय 31) हा पुरापूनर येथून आपल्या प्रेयसीला (वय 24) घेऊन पिलीभितकडे मोटारीतून निघाला होता. धावत्या मोटारीमध्ये ते संभोग करत होते. प्रवासादरम्यान मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटार ट्रकवर जोरात जाऊन आदळली. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याची प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी गुजरौला पोलिस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मोटारीची जोरात धडक बसल्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला. युवती गंभीर जखमी झाली असून, उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस अधिकारी राजेश यादव यांनी दिली.
=======================================
द.चिनी समुद्रात चिनी क्षेपणास्त्रे,लढाऊ विमाने
वॉशिंग्टन - दक्षिण चिनी समुद्राच्या वादग्रस्त भागामध्ये चीनने लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रे तैनात केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
या भागातील पॅरासेल द्वीपसमुहामधील वूडी बेटांवर चिनी हवाई दलामधील शेनयांग जे-11 व शिआन जेएच-7 ही लढाऊ विमाने तैनात करण्यात आल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने म्हटले आहे. अमेरिकेच्या प्रशांत महासागरमधील नौदल विभागाचे प्रवक्ते कॅप्टन डॅरीन जेम्स यांनीही या वृत्तास पुष्टी दिली आहे. मात्र याआधीही चीनकडून येथे लढाऊ विमाने तैनात करण्यात आल्याचे जेम्स यांनी स्पष्ट केले आहे. 1990 च्या दशकापासून हवाई तळ म्हणून वापरात असलेल्या वूडी बेटांवर तैवान व व्हिएतनाम या देशांनीही दावा सांगितला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर चीनची ही कृती सूचक मानली जात आहे. या वादग्रस्त भागामध्ये चीन सातत्याने अत्याधुनिक लष्करी सामुग्री आणत असल्याने चिंता वाटत असल्याची प्रतिक्रिया जेम्स यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. याआधी, गेल्या आठवड्यात वूडी बेटांवर "शस्त्रे‘ आणण्यात आल्याच्या वृत्तास चीनकडून पुष्टी मिळाली होती. हा निर्णय घेण्यास आपण सार्वभौम असल्याचे चीनने म्हटले होते. याशिवाय, या भागामध्ये चीनने सुमारे 200 किमी पल्ला असलेली; व जमिनीवरुन जमिनीवर मारा करु शकणारी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.
=======================================
'नीरजा' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त
नवी दिल्ली - अभिनेत्री सोनम कपूरची भूमिका असलेला "नीरजा‘ चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सोनम कपूरने ट्विटद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. "नीरजा चित्रपट तातडीने करमुक्त केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे खूप आभार‘, अशी माहिती देत तिने सरकारचे आभार मानले आहे. दिग्दर्शक राम माधवानी यांनी, जर सरकारने हा "नीरजा‘ चित्रपट करमुक्त केला तर नीरजाची कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि ती लोकांच्या लक्षात राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. नीरजा हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केल्यानंतर नीरजा नावाच्या एका हवाईसुंदरने स्वत:चे कौशल्य पणाला लावून अनेकांचे प्राण वाचवले होते. याच कथेवर हा चित्रपट आधारलेला आहे.
=======================================
भाजप लोहा कार्यकारणीच्या बैठकीने कार्यकर्त्यांना मिळाली उर्जा
[सुरेश मोरे, लोहा]
दि. २० रोजी लोहा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. हि बैठक गाडगेबाबा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मुक्तेश्वर धोंडगे, सदाशिव अंबुरे, गीते महाराज, ता. अ. सुरेश पाटील हिलाल सरपंच संघटना अध्यक्ष मारोती पाटील, सरचिटणीस प्रकाश पाटील, केरबा केंद्रे, जेष्ठ नेते दत्ताराव बाबर व युवा तालुकाध्यक्ष सुरेश मोरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment