[अंतरराष्ट्रीय]
१- पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर पाकिस्तानातून फरार
२- कोणत्या कायद्याखाली कोहिनूर हिरा परत मागावा - लाहोर उच्च न्यायालय
३- इसिसः 4 वर्षीय मुलाकडून घडविला मोटारीचा स्फोट
४- पॅरीस; माहितीची सुरक्षितता पाळा; फेसबुकला नोटीस
५- हेडली हा तर भारताने पेरलेला एजंट - पाकिस्तान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- झुंज अपयशी, लान्स नायक हनुमंतप्पा शहीद
७- हेडलीकडून जबरदस्तीनं इशरतचं नाव वदवून घेतलं: आव्हाड
८- ईशरत दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांबरोबर काय करत होती? - डी. जी. वंजारा
९- दंगलीदरम्यान करण्यात आलेली मोबाईल बंदी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी योग्य - सर्वोच्च न्यायालय
१०- पाकिस्तानचे संपूर्णपणे उघडे पडले; तरीही पाकिस्तानबरोबर चांगले संबंध हवेत - राजनाथ सिंह
११- रोहित प्रकरण; नागपुरात मुख्यमंत्री आणि स्मृती इराणी यांच्या कार्यकमादरम्यान घोषणाबाजी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- राज्यातील 66 सिंचन प्रकल्पांची नव्याने होणार चौकशी
१३- हनुमंतप्पांनी उरी बाळगलेलं ते स्वप्न अधुरंच राहिलं
१४- पंजाब विधानसभा निवडणूक जिंकू- केजरीवाल
१५- सम-विषम फॉर्म्युल्याच्या दुस-या टप्प्यातून व्हीआयपी व महिलांना वगळणार - अरविंद केजरीवाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- मुंबईकरांना दिलासा, मुंबई मेट्रोची दरवाढ तूर्तास लांबणीवर
१७- पंढरपूर; बापाच्या हौसेला मोल नाही, लग्नात मुलीची हेलिकॉप्टरमधून पाठवणी
१८- कर्नाटकात अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणा-या भावाला अटक
१९- 'स्नॅपडील'च्या महिला कर्मचाऱयाचे अपहरण
२०- बंगळूर: बिबट्यांच्या भयामुळे शाळा बंद
२१- शहीद हणमंतप्पांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या कर्नाटकमधील धारवाड येथील मूळगावी अंत्यसंस्कार
२२- नागपूर: अकोला कारागृहातून पळालेला कैदी देवकर याला भौरद येथे अटक
२३- १४ फेब्रु. रोजी मानवता विचार मंचाच्यावतीने अपर्णाताई रामतीर्थकर यांचे मुखेडला व्याख्यान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- अंडर 19 वर्ल्डकप : भारत-विंडीजमध्ये अंतिम लढत
२५- सनी लिऑनला योग्य तो मान द्यायला हवा - कतरिना कैफ
२६- अब्रुनुकसानीपोटी धोनीचा 100 कोटींचा दावा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
कधीही लहान-लहान चुकांपासून स्वतला सावरा कारण ठेच लहान दगडांपासूनच लागते, पर्वतांपासून नव्हे.
(अरुण बागल, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4
=====================================================
झुंज अपयशी, लान्स नायक हनुमंतप्पा शहीद
नवी दिल्ली : सियाचीनमध्ये मृत्यूला चकवा देणाऱ्या देशाचा वीर हनुमंतप्पा यांना अखेर काळाने गाठलं. धारवाडचा वीर हनुमंतप्पा कोप्पड यांना वीरमरण आलं आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही हनुमंतप्पांची झुंज अपयशी ठरली. हनुमंतप्पा यांच्यावर दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी आज सुमारे पावणेबाराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान हनुमंतप्पांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या हनुमंतप्पा यांच्या पत्नी आणि आईसह कुटुंबातील सहा जण दिल्लीत आहेत. यापूर्वी डॉक्टरांनी पुढील 24 तास हनुमंतप्पांसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. मात्र हनुमंतप्पांची झुंज अखेर अपयशी ठरली.
गावावर शोककळा, गावकऱ्यांना अभिमानाचा हुंदका
दरम्यान, हनुमंतप्पांच्या मृत्यूची बातमी कळताच, त्यांच्या कर्नाटकातील धारवाडजवळच्या बेटादूर गावावर शोककळा पसरली. मात्र गावाचा जवान देशासाठी कामी आला, हा अभिमानाचा हुंदकाही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
=====================================================मुंबईकरांना दिलासा, मुंबई मेट्रोची दरवाढ तूर्तास लांबणीवर
मुंबई: मुंबई मेट्रोची भाववाढ पुन्हा एकदा टळली आहे. मेट्रो भाववाढीच्या याचिकेवरची सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आजच्या सुनावणीत राज्य सरकार आणि रिलायन्स या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील तांत्रिक बाबी सुधारल्याची माहिती दिली.
यानंतर दोन्ही पक्षांची बाजू ऐकून कोर्टाने पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला ठेवली आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयामुळे काही काळ प्रवाशांना दिलासा मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान याआधीच्या सुनावणीत उच्च न्यायालायनं एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो वन या कंपनीवर सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल ताशेरे ओढले होते. उच्च न्यायालयानं १७ डिसेंबर रोजी मेट्रोच्या भाडेवाढीला २९ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, प्रस्तावित भाडेवाढ कशाप्रकारे योग्य आहे, हे सांगत मुंबई मेट्रो वन लिमिटडने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयानं मेट्रो-वनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याच्या भूमिकेवर ताशेरे ओढत प्रस्तावित भाडेवाढीवर पुन्हा एकदा स्थगितीचा निर्णय दिला होता.
बापाच्या हौसेला मोल नाही, लग्नात मुलीची हेलिकॉप्टरमधून पाठवणी
पंढरपूर: ‘हौसेला मोल नसतं’ असं म्हणतात. याचीच प्रचिती पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील ग्रामस्थांना आली.
इथले सराफी व्यावसायिक दत्तात्रय मोहिते यांनी मुलीच्या लग्नासाठी तिची पाठवणी थेट हेलिकॉप्टरमधून केली. इवल्याशा गावात भलं-मोठं हेलिकॉप्टर उतरल्यामुळे, गावकऱ्यांनी हेलिकॉप्टरभोवती गराडा घातला.
दत्तात्रय मोहिते यांची इंजिनिअर मुलगी प्राजक्ता हिचा विवाह सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या कौठाळी येथील सुरज कदम यांच्याशी आज अकलूज इथं होणार आहे. यासाठी मुलीची पाठवणी हेलिकॉप्टरमधून करण्यात आली.
यावेळी केवळ उपरीचेच ग्रामस्थ नव्हे, तर आसपासच्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी हजेरी लावली.
विवाह सोहळ्यासाठी मुलीची पाठवणी परिस्थितीनुसार जीप, सुमो, ट्रॅव्हलर अथवा आलिशान कारमधून केल्याचं आपण पाहिलं आहे.
पण दत्तात्रय मोहिते यांनी मुलगी प्राजक्ताची पाठवणी चक्क हेलिकॉप्टरमधून केल्याने पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
विवाहाच्या निमित्ताने मुलीची हौस करण्यासाठी वडील दत्तात्रय मोहिते यांनी पुणे येथून भाड्याने हेलिकॉप्टर आणलं. बुधवारी सकाळी 11 वाजता गावात हेलिकॉप्टरचा आवाज घुमताच गावकऱ्यांनी ते पाहण्यासाठी एकच गर्दी केली. मुलीची हेलिकॉप्टरमधून लग्नासाठी पाठवण्याची घटना फारच क्वचित पाहायला मिळते. त्यात उपरीसारख्या ग्रामीण भागात तर या निमित्ताने इतिहासच घडला आहे. त्यामुळे उपरीवासियांना ‘हौसेला मोल नसते’ याचीच प्रचिती आली.
=====================================================हेडलीकडून जबरदस्तीनं इशरतचं नाव वदवून घेतलं: आव्हाड
मुंबई: इशरत जहाँच्या चकमकीनंतर तिला शहिदाचा दर्जा देणारे राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहेत. इशरत राहत असलेल्या मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे यांनी इशरतच्या कुटुंबियांना सहानुभूती दर्शवली होती.
आजही सरकारने इशरतविरोधात हेडलीची साक्ष वदवून घेतल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे. ‘उज्ज्वल निकम यांनी विचारले प्रश्न आणि हेडलीनं दिलेली उत्तरं ही फारच विसंगत आहेत. त्यामुळे ओढूनताणून इशरतच नाव वदवून घेतलं आहे.’ असंही आव्हाड म्हणाले.
‘इशरत प्रकरणी आजवर जितके न्यायालयीन निकाल आले त्यामध्ये ही चकमक खोटी असल्याचं त्यात सांगण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टानंही तसाच निकाल दिले आहेत. इशरत जर तुमच्या हातात सापडली होती तर तुम्ही तिला मारलंत का?, उलट आम्हाला तर पुरावा हवाच होता.’ असं आव्हाड म्हणाले.
निवडणुकीत सतत होणाऱ्या पराभवामुळे राजकारणासाठी इशरतला गोवण्यात येत असल्याचंही आव्हाड म्हणाले. डावखरेंनी एन्काऊंटरनंतर इशरतच्या कुटुंबाला आर्थिक मदतही दिली होती. तसेच इशरतच्या बनावट एन्काऊंटर खटल्यात आव्हाडांनी तिच्या घरच्यांना कायदेशीर बाबींमध्ये मदत केली होती. दरम्यान, या प्रकरणात डावखरेंची भूमिका काय आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही.
हनुमंतप्पांनी उरी बाळगलेलं ते स्वप्न अधुरंच राहिलं
नवी दिल्ली: सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज देणारे लढवय्ये हनुमंतप्पा कोप्पड यांची प्राणज्योत अखेर आज मालवली. त्याचसोबत त्यांनी पाहिलेलं एक स्वप्नही अधुरं राहिलं.
33 वर्षीय हनुमंतप्पा हे मागील चार वर्षापासून सियाचिन पोस्टवर तैनात होते. 13 वर्षाच्या लष्कराच्या नोकरीत हनुमंतप्पा हे सात वर्षापासून बॉर्डरवर तैनात होते. हिवाळ्यात ज्यावेळेस दिवसा -15 अंश आणि रात्री -55 अंश तापमान असतानाही ते आपलं कर्तव्य चोखपणे बजावत होते. त्यावेळेसही जेव्हा निसर्गानं आपला रुद्रावतार धारण केला होता. जेव्हा त्यांचे नऊ साथीदार हे शहीद झाले होते. तरीही सहा दिवस हनुमंतप्पा मृत्युशी झुंज देतच होते.
हनुमंतप्पा यांचा गावातील मित्र अर्जुन ताकरे सांगतो की, हा लढवय्येपणा त्याच्यात लहानपणापासूनच होता. कर्नाटकमधील धारवाडच्या बेटादूर या गावी हनुमंतप्पा यांचं लहानपण गेलं. या लहानशा गावात बरेच जण शेती करतात. चार भावांमध्ये सर्वात लहान असणाऱ्या हनुमंतप्पा यांचे कु़टुंबीय दोन एकरमध्ये शेती करुन आपली गुजराण करतात.
मागील वर्षी जून महिन्यात हनुमंतप्पा गावी सुट्टीवर आले होते. हनुमंतप्पा यांचे शिक्षक इस्माइल नदा सांगतात की, हनुमंतप्पा हे जेव्हा कधी गावी यायचे त्यावेळेस गावातील युवकांशी देशभक्तीच्या गोष्टींवरच गप्पा मारायचे. तसंच सियाचीनमधील त्यांचे काही खास किस्सेही सांगायचे.
चार वर्षापूर्वीच हनुमंतप्पा यांचं लग्न झालं होतं. त्यांना एक दीड वर्षाची लहान मुलगी आहे. मृत्युशी शेवटपर्यंत लढवय्याप्रमाणे झुंजणाऱ्या हनुमंतप्पा यांचं एक स्वप्न मात्र, पूर्ण होऊ शकलं नाही. हनुमंतप्पा यांचं सुरुवातीचं शिक्षण हे गावातील शाळेमध्येच झालं होतं. त्यामुळे निवृत्तीनंतर गावातील शाळेत येऊन येथील मुलांना शिकवण्याची त्यांची इच्छा होती. पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं.हनुमंतप्पा यांची मृत्युला झुंज देण्याची जिद्दही एक मिसाल बनून राहिली आहे.
अंडर 19 वर्ल्डकप : भारत-विंडीजमध्ये अंतिम लढत
अंडर 19 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ईशान किशनच्या टीम इंडियासमोर वेस्ट इंडिजचं आव्हान असेल. भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला अंतिम सामना 14 फेब्रुवारीला मिरपूरमध्ये खेळवला जाईल.
दरम्यान वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत यजमान बांगलादेशवर तीन विकेट्स राखून विजय मिळवला. मिरपूरमध्ये झालेल्या या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 227 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडीजने हे आव्हान 48.4 षटकात पूर्ण केलं.
वेस्ट इंडिजचा कर्णधार शिमरॉन हेथमायर आणि शामर स्प्रिन्गरने शानदार अर्धशतक झळकावलं. हेथमायरने 59 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची खेळी केली. तर स्प्रिन्गरने 88 चेंडूंत नाबाद 59 धावा केल्या. त्यालाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
राज्यातील 66 सिंचन प्रकल्पांची नव्याने होणार चौकशी
औरंगाबाद – 11 फेब्रुवारी : राज्यातील 66 जलसिंचन प्रकल्पांची नव्या चौकशी होणार आहे. यामध्ये नाशिकमधील किकवी आणि अकोल्यातील कांचनपूरा लघू सिंचन प्रकल्पाची विषेश चौकशी होणार आहे.
अयिमीतता असल्याने हे सर्व प्रकल्प कोर्टाने रद्द केले होते. मात्र हे प्रकल्प सुरू होण्यापुर्वीच कंत्राटदारांना ऍडवान्स रक्कम देण्यात आली होती. औरंगाबाद खंडपीठाने एक जनहित याचिकेवर सुनावणी करतांना या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यासाठी बुधवारी सरकारने 4 सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. 3 महिन्याच्या आत ही समिती आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करणार आहे.
=====================================================सनी लिऑनला योग्य तो मान द्यायला हवा - कतरिना कैफ
प्रत्येक व्यक्तिला मग ती कुणीही असो योग्य तो मान द्यायला हवा. कुणी कलाकार असतो, कुणी पत्रकार असतो, कुणी आणखी काही वेगळं काम करतो, अशा कामांमध्ये भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तिला मान द्यायला हवा, तिचा आदर करायला हवा असं मत कतरिना कैफनं व्यक्त केलं आहे. सनी लिऑनला, नुकतंच एका वृत्तवाहिनीवर अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. तर राखी सावंत सारखे अनेक जण तिच्या भूतकाळावरून गरळ ओकताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सनी लिऑनबद्दल कतरिनानं वरील मत व्यक्त केलं आहे.
=====================================================कर्नाटकात अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणा-या भावाला अटक
कर्नाटकच्या नेजारमध्ये बहिण-भावाच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या दाक्षिणा कन्नड जिल्ह्यात नेजारमध्ये सख्ख्या भावाने अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कर्नाटक पोलिसांनी सख्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणा-या नराधम भावाला अटक केली आहे. श्रीधर असे आरोपीचे नाव आहे. डीएनए चाचणीतून बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी श्रीधरला (२२) अटक केली.
पिडित मुलगी १४ वर्षांची आहे. जून ते ऑगस्ट २०१५ दरम्यान श्रीधर दारु पिऊन आल्यानंतर त्याने प्रत्येकवेळी आपल्या अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केला. पिडीत मुलीचे आई-वडिल दैनंदिन रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. त्याना श्रीधरच्या गुन्ह्याची पूर्ण माहिती होती. तरीही ते मूक बनून राहिले.
जेव्हा मुलगी गर्भवती राहिल्याचे समजले तेव्हा त्यांनी मुलीचा गर्भपात केला. स्थानिक रुग्णालयाने ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार करुन मुलगी आरोपीचे नाव सांगण्यास धजावत नव्हती.
बाहेरची व्यक्ती यामध्ये सहभागी नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घरातील पुरुषांची चौकशी सुरु केली. त्यांची डीएनए टेस्ट केली. स्थानिक न्यायालयाने श्रीधरला २७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
=====================================================ईशरत दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांबरोबर काय करत होती? - डी. जी. वंजारा
ईशरत जहाँ ही एक महिला होती, विद्यार्थिनी होती तिच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मी एकच विचारतो की तीन दहशतवादी होते, त्यातले दोन नि:संशय पाकिस्तानी होते, त्यांच्याबरोबर ती काय करत होती असा सवाल आता तिला बनावट चकमकीत मारल्याचा आरोप असणा-या गुजरात दहशतवादवरोधी पथकाचे तत्कालिन अधिकारी डी. जी. वंजारा यांनी उपस्थित केला आहे. वंजारा यांच्यावर बनावट चकमकीत ईशरतसह चारजणांना मारल्याचा ठपका आहे. मात्र, हेडलीच्या साक्षीनंतर वंजारा यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाला पुन्हा वाचा फोडली आहे.
जे दहशतवादी शरण येतात त्यांना आम्ही पकडतो, जे गोळीबार करतात त्यांना प्रत्युत्तर दिलं जातं असं सांगत ते फेक एन्काउंटर नव्हतं असा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, गुजरात पोलीस राजकीय षडयंत्राचे बळी पडल्याचा आरोपही वंजारा यांनी केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाया केल्या जातात, आणि त्याआधारे दहशतवादविरोधी पथक काम करतं, मात्र केवळ गुजरात पोलीसांना वेगळा न्याय लावल्याचा आणि त्यामागे देश विदेशातील सूत्रांनी राजकीय षडयंत्र रचलं होतं असा आरोप त्यांनी केला आहे.
=====================================================पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर पाकिस्तानातून फरार
पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर जानेवारी महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानमधून फरार झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मसूद अजहर हा पाकिस्तानमधून फरार झाला असून तो अफगणिस्तानमध्ये पळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यानंतर अजहरवर कारवाई करण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती.
४७ वर्षीय अजहरला अटक करण्याची मागणी भारताने केली होती. भारताच्या मताशी अमेरिका व ब्रिटनही सहमत होते. त्यानंतर पाकिस्तानवरील दबाव वाढला व त्यांनी काही काळासाठी त्याला ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्याशी मसूदचा संबंध नसल्याचे सांगत त्याला क्लीन चीट दिली.
अखेर आज मसूद अझहर फरार झाल्याचे वृत्त आले.
=====================================================पंजाब विधानसभा निवडणूक जिंकू- केजरीवाल
पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, आम आदमी पक्ष (आप) ही निवडणूक नक्की जिंकेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप‘चे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला.
पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, ‘पंजाब विधानसभा निवडणूक ‘आप‘ नक्की जिंकेल. राज्यामध्ये ही लढाई ‘आप‘ व कॉंग्रेसदरम्यान होईल. भारतीय जनता पक्षाशी (भाजप) नसेल. ‘आप‘ने आपली ताकद दिल्लीमध्ये दाखवून दिली आहे. पंजाबमध्येही अशीच ताकद पाहायला मिळेल.‘ ‘सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंजाबमध्ये पक्षाने 4 जागा मिळविल्या आहेत. विधानसभा निवडणूकीच्यावेळी ‘आप‘चे नेते घरोघरी जाऊन पक्षाचा प्रचार करणार आहेत,‘ असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
=====================================================
कोणत्या कायद्याखाली कोहिनूर हिरा परत मागावा - लाहोर उच्च न्यायालय
लाहोर - कोणत्या कायद्याअंतर्गत पाकिस्तानने ब्रिटनकडे कोहिनूर हिरा परत मागावा याची माहिती दोन आठवड्यांत द्यावी, असे आदेश लाहोर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिले आहेत.
ब्रिटनच्या ताब्यात असलेला कोहिनूर हिरा पाकिस्तानचा असून तो परत मिळावा यासाठी जावेद इक्बाल जाफरी यांनी लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या हिऱ्यावर भारताचाही दावा आहे. अनेक वर्षे मागणी करूनही भारताला तो परत देण्यात आलेला नाही. जाफरी यांनी या प्रकरणी ब्रिटिश महाराणी, पाकिस्तानमधील ब्रिटिश उच्चायुक्त आणि पाकिस्तानी सरकारला प्रतिवादी ठरविण्यात आले आहे. पाकिस्तान सरकारने ब्रिटश सरकारकडे कोहिनूर परत देण्याची मागणी करावी असेही म्हटले आहे. कोणत्या कायद्यांतर्गत पाकिस्तान सरकारने ब्रिटन सरकारकडे कोहिनूर हिरा परत मागावा याबाबत याचिकाकर्त्याने दोन आठवड्यांत उत्तर द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.=====================================================
दंगलीदरम्यान करण्यात आलेली मोबाईल बंदी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी योग्य - सर्वोच्च न्यायालय
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोबाईल तसेच इंटरनेट सेवा बंद करण्यामध्ये काहीही चूक नसल्याचे आज सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
गुजरातमध्ये पटेल आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान सरकारने कायदा आणि सुव्यवस्था प्रभावीपणे नियंत्रणात ठेवण्यासाठी साधारण दहा दिवसांसाठी मोबाईलसह इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सुरेशभाई व्यास यांनी गुजरातच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने व्यास यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मोबाईल इंटरनेट सेवा बंद करणे हे बेकायदेशीर असल्याचे याचिकेत म्हटले होते. याप्रकरणी न्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि न्यायाधीश आर. भानुमती यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशाप्रकारे बंदी लावली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.=====================================================
इसिसः 4 वर्षीय मुलाकडून घडविला मोटारीचा स्फोट
लंडन- ‘इसिस‘ या दहशतवादी संघटनेने नुकताच एक व्हिडिओ प्रसारित केला असून, यामध्ये एका चार वर्षाच्या ब्रिटिश मुलगा मोटारीतील तिघांना उडवून देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आले आहे.
इसा डेअर असे स्फोट घडवून आणणाऱया मुलाचे नाव आहे. सन 2012 मध्ये त्याच्या कुटुंबियाने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. संबंधित व्हिडिओ हा एक महिनापूर्वीचा आहे. एका मोटारीमध्ये तीन ‘इसिस‘च्या गुन्हेगारांना बसविण्यात आले असून, ही मोटार इसाने उडवून दिली आहे. इसा याने ‘इसिस‘ची कपडे घातली आहेत. एक ब्रिटिश नागरिक चेहरा झाकून त्याच्याजवळ उभा आहे. तिघा गुन्हेगारांना मोटारीमध्ये बांधून ठेवण्यात आले असून, इसाने जवळ जाऊन मोटार उडवून दिली. मोटारीचा स्फोट झाल्याचे व्हिडिओमध्ये शेवटचे दृश्य आहे.
=====================================================
माहितीची सुरक्षितता पाळा; फेसबुकला नोटीस
पॅरिस - फेसबुकने पुढील 90 दिवसांत फ्रान्समधील माहितीच्या सुरक्षिततेच्या कायद्याचे पालन करावे, अशी नोटीस फ्रान्समधील माहितीच्या संरक्षणाचे काम करणाऱ्या विभागाने (सीएनआयएल) फेसबुकला पाठविली आहे.
माहितीच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅण्डस्, स्पेन येथील काही समूहांनी एकत्रितपणे माहितीच्या सुरक्षिततेसाठी काही शिफारसी केल्या आहेत. या शिफारशींचा फ्रान्समधील माहितीच्या सुरक्षिततेच्या कायद्यात (फ्रेंच डेटा प्रोटेक्शन ऍक्ट) समावेश करण्यात आला आहे. सीएनआयएलने केलेल्या ऑनलाईन पाहणीमध्ये या कायद्यातील नियमावलींचे फेसबुककडून पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सीएनआयएलने फेसबुकला नोटीस पाठवली आहे. या नोटीसीवर पुढील 90 दिवसांत कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.
=====================================================माहितीच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या फ्रान्स, बेल्जियम, नेदरलॅण्डस्, स्पेन येथील काही समूहांनी एकत्रितपणे माहितीच्या सुरक्षिततेसाठी काही शिफारसी केल्या आहेत. या शिफारशींचा फ्रान्समधील माहितीच्या सुरक्षिततेच्या कायद्यात (फ्रेंच डेटा प्रोटेक्शन ऍक्ट) समावेश करण्यात आला आहे. सीएनआयएलने केलेल्या ऑनलाईन पाहणीमध्ये या कायद्यातील नियमावलींचे फेसबुककडून पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सीएनआयएलने फेसबुकला नोटीस पाठवली आहे. या नोटीसीवर पुढील 90 दिवसांत कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे.
'स्नॅपडील'च्या महिला कर्मचाऱयाचे अपहरण
नवी दिल्ली- स्नॅपडील या कंपनीत काम करत असलेली महिला कर्मचारी कामावरून सुटल्यानंतर तिचे अपहरण झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप्ती सरना ही महिला कर्मचारी बुधवारी (ता. 10) सायंकाळी कामावरून सुटून घरी निघाली होती. घरी जाण्यासाठी ती मेट्रो व रिक्षाचा वापर करत होती. यावेळी तिचे अपहरण झाले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
=====================================================
बंगळूर: बिबट्यांच्या भयामुळे शाळा बंद
बंगळूर - कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळूर शहराच्या आजुबाजुच्या भागामध्ये बिबटे दिसल्याने येथील 100 पेक्षा जास्त शाळा आज (गुरुवार) बंद ठेवण्यात आल्या आहेत.
याआधी गेल्या रविवारी येथील एका शाळेच्या आवारात घुसलेल्या एका बिबट्याने पाच जणांना जखमी केले होते. या बिबट्यास पकडण्यासाठी चार तासांचा कालावधी गेला होता. यानंतर काल (बुधवार) याच भागामध्ये आणखी दोन बिबटे दिसल्याचे वृत्त होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी (2015) करण्यात आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये भारतामध्ये किमान 12-14 हजार बिबटे असल्याचे निष्पन्न झाले होते. या बिबट्यांच्या नैसर्गिक आश्रयस्थानांवर वाढत्या नागरीकरणाने गदा येत असल्याने, बिबटे नागरी वसतिमध्ये घुसण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. बिबट्या हा देशातील सर्वाधिक संख्या असलेला शिकारी प्राणी आहे.
याआधी गेल्या रविवारी येथील एका शाळेच्या आवारात घुसलेल्या एका बिबट्याने पाच जणांना जखमी केले होते. या बिबट्यास पकडण्यासाठी चार तासांचा कालावधी गेला होता. यानंतर काल (बुधवार) याच भागामध्ये आणखी दोन बिबटे दिसल्याचे वृत्त होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी (2015) करण्यात आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये भारतामध्ये किमान 12-14 हजार बिबटे असल्याचे निष्पन्न झाले होते. या बिबट्यांच्या नैसर्गिक आश्रयस्थानांवर वाढत्या नागरीकरणाने गदा येत असल्याने, बिबटे नागरी वसतिमध्ये घुसण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. बिबट्या हा देशातील सर्वाधिक संख्या असलेला शिकारी प्राणी आहे.
=====================================================
हेडली हा तर भारताने पेरलेला एजंट - पाकिस्तान
इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हिड हेडली याने मुंबईवर घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (26/11) दिलेली साक्ष ही निखालस खोटी असल्याचा दावा पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी केला आहे. हेडली याच्याकडून सोयीची साक्ष मिळवून पाकिस्तानची कुप्रसिद्धी करण्याचा भारताचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, हेडली हा भारताची गुप्तचर संस्था असलेल्या रॉचाच एजंट असल्याचा दावाही मलिक यांनी यावेळी केला.
"मुंबई येथे दहशतवादी हल्ला घडविण्यासाठी रॉने हेडली याला पेरले होते. यानंतर त्याच्याकडून दिशाभूल करणारी साक्ष मिळविण्यात आली. हेडली याच्या प्रवासाचा खर्च कोणी केला व या हल्ल्यासाठी त्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांची भरती कोणाच्या इशाऱ्यावरुन केली, याचे पुरावे आमच्याकडे आहेत,‘‘ असे मलिक म्हणाले. मुंबई येथे घडविण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असल्याबद्दल 55 वर्षीय हेडली याला अमेरिकेमध्ये 35 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात हेडलीने आज (गुरुवार) धक्कादायक कबुली देत मुंब्रामधील इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित हस्तक असल्याचे सांगितले. याचबरोबर, 26/11 हल्ल्यापूर्वी पाकिस्तानमधून आर्थिक मदत झाल्याचे चौकशी दरम्यान समोर आले.हेडलीची जबानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारपासून नोंदविण्यात येत आहे.
=====================================================
अब्रुनुकसानीपोटी धोनीचा 100 कोटींचा दावा
नवी दिल्ली - मॅच फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या एका हिंदी दैनिकाविरुद्ध भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात नोटीस पाठविली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. इंग्लंडविरुद्ध 2014 मध्ये एक कसोटी सामना फिक्स करण्याचा आरोप संबंधित संबंधित हिंदी दैनिकाने केला होता. या सामन्यासाठी सुनिल देव हे भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. ओलसर खेळपट्टी असतानाही धोनीने या सामन्यात जाणूनबुजून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन दिवसांतच भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागल्याचा दावा संबंधित दैनिकाने केला होता. आता धोनीच्या वकीलाने नऊ पानांची नोटीस दिली आहे. त्यामध्ये "केवळ बदनामीच्या हेतूने माझ्या अशीलावर असे आरोप करण्यात आले आहेत. या माहितीचे स्रोत असणारे भारतीय क्रिकेटचे संघाचे तथाकथित अधिकारी (सुनिल देव) यांनीही हे वृत्त फेटाळून लावले आहे‘, असे म्हटले आहे. तसेच या बदनामीमुळे जो त्रास सहन करावा लागला त्याची नुकसानभरपाई म्हणून 100 कोटी रुपयांचा दावा करण्याचा माझ्या अशीलाला अधिकार असल्याचेही नोटीसमध्ये म्हटले आहे.
=====================================================
१४ फेब्रु. रोजी मानवता विचार मंचाच्यावतीने रविवारी अपर्णाताई रामतीर्थकर यांचे व्याख्यान
मुखेड :-
मानवता विचार मंच मुखेड च्या वर्धापन दिनानिमित्य शहरातील बालाजी मंदिर प्रांगणात दि.१४ फेब्रुवारी रोजी रविवारी सायंकाळी ६ वाजता अँड.अर्पणाताई रामतीर्थकर यांचे 'चला नाती जपू या' या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.
गेल्या एक वर्षापासुन तालुक्यातील प्रत्येक गावात दर रविवारी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी मानवता विचार मंचाच्या माध्यमातुन समाजातील निर्व्यसनी, चारित्रवान जीवन बाबत समाज प्रबोधन व जागृती, प्रभातफेरी, व्याख्याने आयोजित करुन समाज प्रबोधनाचा नवा पायंडा तालुक्यात निर्माण केला आहे. जेष्ठ नागरिकांच्या या कार्यास बघुन युवक तरुण कार्यकर्तेही मानवता विचार मंचाच्या माध्यमातुन समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत.
मानवता विचार मंचाच्या प्रथम वर्धापन दिना निमीत्य प्रसिद्ध व्याख्याते अँड. अर्पणाताई रामतीर्थकर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डाँ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज हे राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार डाँ.तुषार राठोड, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार अविनाश घाटे, नगराध्यक्षा सौ.कालिंदीबाई गेडेवाड, माजी नगराध्यक्ष बाबुसावकार देबडवार, श्रीराम गरुडकर, डाँ.दिलीप पुंडे, अनिल जाजु, डाँ.अशोक कौरवार, शिवकुमार महाजन आदींची उपस्थिती राहणार आहे. याकार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंचाचे अध्यक्ष मारोती पा.कार्लेकर, सचिव शेख अ.रशिदसाब, बालाजी लिंगनवाड, शिवकुमार बंडे, मारोती मालीलवाड, व्यंकट जायनुरे, विठ्ठल पांचाळ, बबनसिंह ठाकुर, श्रीराम पा.पांडुर्णीकर, विनोद दंडलवाड, काशीनाथ बाचे, लक्ष्मीकांत पांपटवार, विलास चव्हाण, स.स.मस्कले, अँड.बाळासाहेब देशमुख, विलास चौहाण, अशोकराव पांपटवार यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment