Saturday, 6 February 2016

नमस्कार लाईव्ह ०६-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 

१- तैवान, नेपाळ, बिहारला भूकंपाचे झटके 

२- कोलंबो : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष सिरीसीना यांची घेतली भेट 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

३- हेमा मालिनी भूखंड प्रकरणात गुंतागुंत, खडसेंच्या माघारी महसूल सचिवांसह मुख्यमंत्र्यांचा निर्णय 

४- थुकरटांनो सावधान, रस्त्यावर थुंकाल, तर चारचौघात साफसफाईची शिक्षा 

५- कायदेमंडळाला काम करायला आवडत नाही, अणेंची राजकारण्यांवर पुन्हा टीका 

६- लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी संसदेच्या कामकाजात अडथळा - मोदी  

७- बहाणे सांगू नका; देश चालवा - राहुल गांधी  

८- पवारांच्या आदेशाला हरताळ, भुजबळ समर्थक पुन्हा राडा करणार 

९- हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न- शरद पवार  

१०- मोत्याची शेती’ योजनेचा सरकारकडून स्वीकार 

११- प्रत्येक हल्ल्याकडे वर्णद्वेषातून पाहू नका - सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

१२- स्मार्ट सिटी योजना फसवी - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 

१३- मुंबईची नवी ओळख ड्रग्जची राजधानी  

१४- नवसारी ST अपघात : मृतांचा आकडा 42 वर, तर 37 प्रवासी जखमी 

१५- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात 6% ची वाढ 

१६- दाट धुक्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१७- समाजातून बहिष्काराची ओडिशा मंत्र्याला भीती  

१८- चेन्नई; गायक शान जॉन्सनचा आढळला मृतदेह 

१९- हिट अँड रन‘ प्रकरणात अभिनेता सलमान खान हाच मद्यप्राशन करून गाडी चालवित होता- महाराष्ट्र सरकार  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

२०- झेनफोन 2 स्पेशल एडिशन लवकरच, तब्बल 256 जीबी इंटरनल मेमरी 

२१- पीटरसन, इशांत शर्मा पुण्याच्या संघात 

२२- आयपीएल लिलाव -प्रीती झिंटाच्या पंजाबने मोहित शर्माला ६.५ कोटी रुपये देऊन केले खरेदी 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[नांदेड]

२३- नंदीग्राममधील पाच कार्यालये फोडली, वजिराबाद पोलीस ठाण्यासमोर चोरी 

२४- पाण्याच्या टँकरसाठी सर्वाधिक तरतूद, जिल्ह्यात साडेतेरा कोटी रुपये खर्च अपेक्षित 

२५- भोकर; दलित वस्तीच्या कामात अपहाराची तक्रार 

२६- महापालिकेतर्फे गोदाकाठी मंगळवारी स्वच्छता अभियान 

२७- 'हुंड्याला बदनाम करू या' ही युवकांची चळवळ व्हावी - जिल्हाधिकारी काकाणी 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[वाढदिवस]

चैतन्यबापू देशमुख, अमोल शिंदे, प्रशांत कऱ्हाळे, अविनाश वाघमारे, श्रीप्रसाद बोरलेपवर, संजय बल्लानी 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

जीवनात एवढ्याहि चुका करू नका,

कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल

आणि ........

रबराला एवढाही वापरू नका,

कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.

(मिनाक्षी मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

विकणे आहे 

भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.

संपर्क- 7350625656

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

घरांची आर्टिफिशिअल सजावट 

फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://goo.gl/lE9S67

*****************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4

================================================

हेमा मालिनी भूखंड प्रकरणात गुंतागुंत, खडसेंच्या माघारी महसूल सचिवांसह मुख्यमंत्र्यांचा निर्णय

हेमा मालिनी भूखंड प्रकरणात गुंतागुंत, खडसेंच्या माघारी महसूल सचिवांसह मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनी यांना नृत्य अकादमीसाठी ओशिवरामध्ये दिलेल्या भूखंडावरुन वादंग माजल्यानंतर सरकारनं आता हा नियम बदलण्याचा विचार सुरु केला आहे. महाराष्ट्र सरकारचा यासंदर्भातला 1983 चा कायदा बदलून नवा कायदा पारीत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी महसूल सचिवांसोबत बसून हा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसेंना थांगपत्ता देखील नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंना अंधारात ठेवून सरकार निर्णय घेतंय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या निर्णयामुळे खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना 2 हजार स्क्वेअर फूटच्या भूखंडासाठी नव्या कायद्याप्रमाणं अधिकचे पैसे भरावे लागतील.

================================================

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात 6% ची वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात 6% ची  वाढ
मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6% वाढ करण्याचा निर्णय घेत वित्त विभागाने त्याविषयीचा जीआरही आज जारी केला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढ मिळते. 1 जानेवारी आणि 1 जुलै अशा दोन सहामाहीत हा महागाई भत्ता वाढवला जातो. 
1 जानेवारी 2015 रोजी राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 107% वरून 113% केला होता. हा निर्णय 15 ऑक्टोबर रोजी पूर्वलक्षी प्रभावाने घेऊन त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून करण्यात आली तर 15 जानेवारी 2016 रोजी स्वतंत्र जीआर काढून 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2015 या काळातील थकबाकी रोखीने देण्याचे आदेश जारी करण्यात आले. 
15 जानेवारीचा जीआर निघाला तेव्हाच जुलै-डिसेंबर या सहामाहीच्या महागाई भत्त्याचं काय? असा प्रश्न शासकीय कर्मचाऱ्यांमधून विचारला जात होता. त्यावर आज (5 फेब्रुवारी 2016) जीआर काढून 1 जुलैपासून महागाई भत्त्यात पुन्हा 6% ची वाढ करून तो 113% वरून 119% करण्यात आला आहे. 
हा वाढीव महागाई भत्ता 1 फेब्रुवारी 2016 पासून चालू महिन्याच्या पगारासोबतच मिळणार आहे. तसंच 1 जुलै 2015 ते 31 जानेवारी 2016 पर्यंतच्या सात महिन्यांची महागाई भत्त्यांची थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठी स्वतंत्रपणे आदेश जारी केले जाणार आहेत.
================================================

झेनफोन 2 स्पेशल एडिशन लवकरच, तब्बल 256 जीबी इंटरनल मेमरी!

झेनफोन 2 स्पेशल एडिशन लवकरच, तब्बल 256 जीबी इंटरनल मेमरी!
मुंबई: मोबाइल कंपनी आसुस लवकरच झेनफोन 2चं नवं व्हर्जन मोबाइल बाजारात लाँच करणार आहे. झेनफोन 2 डिलेक्स स्पेशल एडिशनमध्ये अपग्रेडशन करण्यात आलं आहे. 
या स्मार्टफोनमध्ये 2.5GHz इनटेल Z3590 प्रोसेसर देण्यात आलं आहे. तर तब्बल 256 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून एसडी कार्डच्या मदतीनं मेमरी वाढविता येणार आहे. या अपग्रेडेड व्हर्जन स्मार्टफोनचे बरेचसे फीचर आधीच्या स्मार्टफोनप्रमाणेच आहेत. 5.5 फूल एचडी डिस्प्ले असून 1080×1920 पिक्सल रेझ्युलेशन आहे. तर यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. 
या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 3000mAh आहे. तर यामध्ये अँड्रॉईड 5.1 लॉलिपॉप सपोर्ट आहे. या नव्या हॅण्डसेटमध्ये 4G एलटीई सपोर्ट आहे. तर ड्यूल सिम कार्ड सपोर्ट आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि लाँचिंगच्या तारखेबाबत सध्यातरी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

================================================

तैवान, नेपाळ, बिहारला भूकंपाचे झटके

तैवान, नेपाळ, बिहारला भूकंपाचे झटके
नवी दिल्ली: नेपाळ, तैवान आणि भारतातील बिहारच्या सीमाभागाला काल भूकंपाचे धक्के जाणवले. 
तैवानमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये एक रहिवासी इमारत कोसळली.यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 154 जण जखमी आहेत. 
या इमारतीतून जवळपास 120 नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं. आणखी काही जण अडकल्याची भीती आहे. भूकंपामुळं बऱ्याच इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. 
नेपाळमध्येही हादरे 
नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 15 जण यात जखमी झाले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडूपासून 16 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र होतं. 
भूकंपाच्या धक्यांमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं, त्यामुळं लोकं घराबाहेर आले.
================================================

नवसारी ST अपघात : मृतांचा आकडा 42 वर, तर 37 प्रवासी जखमी

नवसारी ST अपघात : मृतांचा आकडा 42 वर, तर 37 प्रवासी जखमी
नवसारी : गुजरातमधील नवसारी-बारडोली रस्त्यावर एस टी बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 42  झाली आहे. तर 37 प्रवासी जखमी आहेत. 
मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. यामध्ये नंदुरबारमधल्या तीन, धुळ्यातील दोन आणि नालासोपाऱ्यातल्या एकाचा समावेश आहे.
बस 20 फूट नदीत कोसळली
गुजरात महामंडळाची एसटी बस नवसारीवरून उकाईकडे जात होती. यावेळी पूलावरुन बस पूर्णा नदीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे घटनास्थळी धाव घेतली. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
अपघात झाला त्यावेळी 77 प्रवाशी बसमध्ये होते. याआधीही काही वर्षापूर्वी या पुलावरुन बस कोसळली होती. मात्र तरीही पुलाचं काम करण्यात आलेलं नाही. या पुलाला कठडेही नाही. 
मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 प्रवाशांचा समावेश 
नवसारीमधील भीषण अपघातात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. यामध्ये नंदुबार जिल्ह्यातील नवापूर शहारातील 3 प्रवासी, तर धुळे जिल्ह्यातील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 
या भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमी प्रवाशांवर बारडोलीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना गुजरात सरकारने 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 
अपघातात मृत्यू झालेले महाराष्ट्रातील प्रवासी
नंदुरबार
1-निकहत परवीन सफीकोद्दीन शेख- वय ३५
2-मुबिनोद्दीन हफीनोद्दीन शेख-70
3-रुकय्या मुबिनोद्दीन शेख-६५
 धुळे
1-प्रफुल कुलकर्णी-25
2-जगदीश लालकृष्ण कुलकर्णी-55
आणि
नालासोपारा,मुंबई येथील
१-पवनकुमार सोमनाथ दुबे-३२
================================================

थुकरटांनो सावधान, रस्त्यावर थुंकाल, तर चारचौघात साफसफाईची शिक्षा!

थुकरटांनो सावधान, रस्त्यावर थुंकाल, तर चारचौघात साफसफाईची शिक्षा!
मुंबई : पान किंवा गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकायची तुम्हाला सवय असेल तर सावधान. कारण अशा ‘थुकरट’ लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने नामी युक्ती शोधून काढली आहे. यापुढे रस्त्यात थुंकणाऱ्या व्यक्तीला केलेली घाण स्वतःच साफ करावी लागणार आहे. 
सरकारने या संदर्भातील नवीन मसुदा तयार केला असून लवकरच संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 
आतापर्यंत रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीला आर्थिक दंडाची तरतूद आहे. पण स्वत: केलेली घाण चारचौघात साफ करायची शिक्षा दिली, तर त्या व्यक्तीला त्याच्या कृत्याची लाज वाटण्याची शक्यता आहे, असं आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी सांगितलं.
================================================

पीटरसन, इशांत शर्मा पुण्याच्या संघात

LIVE - पीटरसन, इशांत शर्मा पुण्याच्या संघात
बंगळुरु: आयपीएलच्या नवव्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव होत आहे. इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसनला ‘रायझिंग पुणे’ संघाने आपल्या टीममध्ये घेतलं आहे. पीटरसनसाठी पुण्याने साडेतीन कोटी रुपयांची बोली लावली. याशिवाय इशांत शर्माही पुण्याच्या संघात दाखल झाला आहे.
* आयपीएल लिलाव- स्टुअर्ट बिन्नीसाठी रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरनं लावली 2 कोटींची बोली, तर कॉलिन मुनरोसाठी केकेआरनं मोजले 30 लाख रुपये 
* आयपीएल लिलाव- मार्टिन गप्टिल, पुजारा, अमला, जयवर्धने, बद्रिनाथ, मनोज तिवारी, रवी बोपारा, दिलशानसाठी बोली नाही 
* आयपीएल लिलाव-इरफान पठाण पुण्याकडून खेळणार, इरफानसाठी पुण्यानं मोजले एक कोटी रुपये

*आयपीएल लिलाव- मनोज तिवारी, रवी बोपाराला बोली नाही 
*आयपीएल लिलाव- अॅरॉन फिन्च, उस्मान ख्वाजा, जॉर्ज बेली, मायकल हसी, ब्रॅड हॅडिन या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर बोली नाही 
*आयपीएल लिलाव- दिनेश कार्तिक गुजरात लायन्सकडून खेळणार, कार्तिकसाठी गुजरातनं मोजले 2 कोटी 30 लाख रुपये 
* आयपीएल लिलाव- इंग्लडचा जोस बटलर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, बटलरसाठी मुंबईनं मोजले 3 कोटी 80 लाख रुपये 
*आयपीएल लिलाव- संजू सॅमसन दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणार, सॅमसनसाठी दिल्लीनं लावली 4 कोटी 20 लाखांची बोली 
*चेतेश्वर पुजारा आणि हाशिम अमलासाठी बोली नाही 
* न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिल आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिन्चसाठी बोली नाही 
*आयपीएल लिलाव- डेल स्टेन गुजरात लायन्सच्या ताफ्यात, ‘स्टेनगन’साठी गुजरातनं मोजले 2 कोटी 30 लाख रुपये 
*युवराज सिंगसाठी सनरायझर्स हैदराबादची 7 कोटींची बोली, नेहरापाठोपाठ युवराज हैदराबाद संघात 
*आयपीएल लिलाव- आशीष नेहरा सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात, नेहरासाठी हैदराबादनं लावली 5 कोटी 50 लाखांची बोली 
*आयपीएल लिलाव- शेन वॉटसनसाठी रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरनं लावली तब्बल 9 कोटी 50 लाख रुपयांची बोली 
*केविन पीटरसन पुण्याच्या संघात, ‘रायजिंग पुणे सुपर जाएंट्स’ संघाकडून पीटरसनची साडेतीन कोटी रुपयांत खरेदी 
*आयपीएल लिलाव- ईशांत शर्मा पुण्याच्या संघाकडून खेळणार, ईशांतसाठी पुण्यानं लावली 3 कोटी 80 लाखांची बोली 
*आयपीएल लिलाव- वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ द गुजरात लायन्स संघाकडे, स्मिथसाठी गुजरातनं लावली 2 कोटी 30 लाखांची बोली 
या लिलावात आठ फ्रँचायझी एकूण 351 खेळाडूंसाठी बोली लावत आहे. त्यात 230 भारतीय आणि 131 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 
युवराज सिंग, इशांत शर्मा आणि केविन पीटरसनसारख्या खेळाडूंसाठी फ्रँचायझींमध्ये चुरस रंगण्याची शक्यता आहे. 
त्याशिवाय डेल स्टेन, शेन वॉटसन, अरॉन फिन्चं, ड्वेन स्मिथसाठीही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
या लिलावात रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स या दोन नव्या फ्रँचायझी आपल्या टीम्सची उभारणी कशी करतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
================================================
कायदेमंडळाला काम करायला आवडत नाही, अणेंची राजकारण्यांवर पुन्हा टीका
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून खळबळ उडवलीय. कायदेमंडळाला काम करायला आवडत नाही, शक्य असतं तर ते संपावरही गेले असते, अशा शब्दांत अणे यांनी टीकेची झोड उडवलीय. कायदेमंडळ, न्यायपालिका आणि प्रशासन हे लोकशाहीतले तीन महत्वाचे स्तंभ आहेत. पण यातील कायदेमंडळ आणि प्रशासन त्यांची जबाबदारी योग्य तर्‍हेनं पार पाडत नसल्याचं अणे यांनी म्हटलंय. रोटरी क्लब ऑफ नागपूरच्या वतीने आयोजित जनहित याचिका या विषयांवरील व्याख्यानात ते बोलत होते.
कायदेमंडळाला काम करायला आवडत नाही. त्यांना संपावर जाणं शक्य असतं तर ते गेलेही असते. उदाहरण देतो. मी एक विधान केलं. स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे म्हणून 2 आठवडे हे कायदेमंडळ माझ्या विधानावर चर्चा करत होते. माझ्या विधानावर तुम्हाला आक्षेप असण्याचा हक्क आहे. पण नागपुरात तुम्हाला ज्या कामासाठी पाठवलं आहे, ते तर करा. जनतेचा पैसा त्यावर खर्च होतो. मग काय होतं, कायदेमंडळ आपलं कर्तव्य पार पडत नाही, आणि मग कोर्टाला मध्ये पडावं लागतं. कोर्टाला कायदेमंडळाचं काम करावं लागतं असा टोलाही त्यांना राजकारण्यांना लगावला. यापूर्वीही वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलून अणे यांनी वाद निर्माण केला होता.
दरम्यान, श्रीहरी अणे यांना पदमुक्त करण्याची मागणी करणारं पत्र विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
================================================
पवारांच्या आदेशाला हरताळ, भुजबळ समर्थक पुन्हा राडा करणार

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुंटुंबियाभोवती ईडीने कारवाईचा फास आवळलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भुजबळांच्या पाठीशी उभं राहतं राष्ट्रवादी आंदोलन करणार नाही असं जाहीर केलंय. पण, आता भुजबळ समर्थकांनी पवारांच्या आदेशाला हरताळ फासत रस्त्यावर पुन्हा उतरण्याचा निर्णय घेतलाय.
छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यातील वजनदार नेते. पुतण्या समीर नाशिकचा माजी खासदार तर मुलगा पंकज हा नांदगाव-मनमाड चा आमदार. बेनामी मालमत्ता प्रकरणी समीर भुजबळला ईडीनं ताब्यांत घेतलं आणि भुजबळांच्या या अभेद्य गडाला खिंडार पडतंय की काय असं चित्र निर्माण झालं. अलीकडे छगन भुजबळ हे परदेशात तर दुसरीकडे मुलगा आमदार पंकज संपर्क क्षेत्राच्या बाहेर अशी वेळ भुजबळ कुटुंबियांवर सध्या आली आहे. आणि हे सरकारचं षडयंत्र असल्याचा थेट आरोप नाशिक राष्ट्रवादीनं केलाय. शहर,ग्रामीण,पदाधिकारी,जिल्हा परीषद सदस्य,आमदार यांच्या वेगवेगळ्या 4 बैठका आज या राष्ट्रवादी भवनात झाल्या. सरकारनं केलेले खोटे आरोप मागे घ्यावे,समीर भुजबळ यांना सोडावं नाहीतर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून राडा करेल असा निर्णय या बैठकीत झालाय. विशेष म्हणजे समीर भुजबळ यांना अटक झाल्यानंतर शरद पवार यांना राष्ट्रवादी आंदोलन करणार नाही असं स्पष्ट केलं होतं. भुजबळ कुटुंबियांविरुद्ध ईडीनं आपल्या कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर नाशिकमधील हे राष्ट्रवादी भवन आंदोलनाचं केंद्रबिंदू झालंय. त्यामुळे आता भुजबळ समर्थकांनी पवारांच्या आदेशाला हरताळ फासत आता आक्रमकपणे आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.
================================================

दाट धुक्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली


मुंबईत आज पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर पसरली असून त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही दिसून आला. दाट धुक्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने सुरू आहे. 
मध्य रेल्वेच्या कल्याण ते मुंब्रा स्थानकापर्यंत एवढे दाट धुके होते की समोरील व्यक्ती दिसणेही शक्य नव्हते मुंब्र्याच्या पुलाचा भाग धुक्यामुळे पूर्णपणे दिसेनासा झाला होता. पश्चिम रेल्वेवरही तीच गत असून तेथील गाड्याही १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणा-या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

================================================

हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न- शरद पवार 


देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न सुरू असून, अल्पसंख्याक समाजाबद्दल द्वेष पसरविला जात आहे. देशाच्या एकतेसाठी हा प्रकार घातक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भाजपाचे थेट नाव न घेता केली.
नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात पवार यांनी देशातील निवडक इतिहासकार, लेखक, विचारवंतांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे पडद्यामागील सूत्रधार आ. जितेंद्र आव्हाड होते. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर या वेळी चर्चा झाली. या वेळी पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा सरकारला निशाणा साधला. ते म्हणाले, हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी इतिहास आणि शालेय अभ्यासक्रमातील बदल देशाच्या एकतेला बाधक आहेत. येणाऱ्या भावी पिढीला मोडतोड झालेला इतिहास दिला जाऊ
नये, त्यांना योग्य तो इतिहास कळावा यासाठी आता इतिहास संशोधकांनी
पुढे यायला हवे; आणि ठाम भूमिका घेत योग्य ती माहिती समोर द्यायला हवी. अन्यथा भारतीय इतिहासात भाकडकथा घुसवून इतिहासाची मोडतोड चालूच राहील. (प्रतिनिधी)शनी-शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत पवार म्हणाले की, या घटनेला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. जो देव स्रीला प्रवेश नाकारतो तो देवच मी मानत नाही.
तो इतिहास कल्पनाविलासच!
साधनांशिवाय लिहिलेला इतिहास कल्पनाविलासच असतो. तो काळाच्या कसोटीवर टिकत नाही. तो टिकायचा असेल तर सत्य ठामपणे सांगावेच लागेल, असे मत इतिहास संशोधकांनी या वेळी व्यक्त केले. दिल्लीचे प्रो. के.एम. श्रीमाळी म्हणाले, देशाच्या संसदेत बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत सेक्युलर हा शब्दच नव्हता असे धादांत खोटे सांगितले जाते. मुळात सेक्युलर ही संकल्पना आहे व बाबासाहेबांनी ती पानोपानी मांडलेली असताना खोटे दाखले देणे सुरू झाले आहे.
================================================

मुंबईची नवी ओळख ड्रग्जची राजधानी 



ड्रग्जने पोखरले गेलेले देशातील राज्य कुठले? तर उत्तर येते ते म्हणजे पंजाब. मुंबईची सर्वसाधारण ओळखही ‘देशाची आर्थिक राजधानी’ अशीच आहे. पण, मुंबई आता पंजाबच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईदेखील ड्रग्जची राजधानी बनू पाहत आहे. मुंबईतील अंडरवर्ल्डचे कंबरडे पोलिसांनी मोडले. पण, सध्या ड्रग्जमाफियांचे रॅकेट पाहता अंडरवर्ल्डपेक्षाही भयावह स्थिती मुंबईत बनल्याचे दिसून येत आहे. मुंबईत ड्रग्जसाठी नामचीन मानल्या जाणाऱ्या गोवंडी आणि रे रोड या परिसरात ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. यातून समोर आलेल्या वास्तवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनियुक्त पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी गांभीर्याने लक्ष न घातल्यास अख्खी मुंबई पोखरून निघण्याची शक्यता आहे.गेल्या काही काळात म्याँव म्याँव अर्थात एमडी हे जीवघेणे ड्रग्ज सहज उपलब्ध होत होते. मुंबई पोलिसांनी त्याविरुद्ध कारवाई तीव्र करत काही प्रमाणात आळा जरूर घातला. पण त्यानंतर ही कारवाई कुठेतरी थंडावल्याचे चित्र आहे. कारवाई केल्यानंतर पोलिसांच्या ‘हफ्त्यां’ची रक्कम वाढवून आधीपेक्षा अधिक वेगाने हे धंदे फोफावत असल्याचे दिसून येत आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्येदेखील गोवंडी हे ड्रग्जचे हब बनल्याचेच दिसून आले. गोवंडीत सध्याच्या घडीला शंभरहून अधिक पॅडलर्स ड्रग्जच्या धंद्यात सक्रिय असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. ड्रग्जचा धंदा तेजीत असल्याने करोडोंची उलाढाल होऊन गुन्हेगारी कारवायादेखील वाढत आहेत.
विशेष म्हणजे शहरातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी अमलीपदार्थांची तस्करी पूर्णपणे बंद झालीच पाहिजे, असे आदेश मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दीड वर्षापूर्वी संबंधित यंत्रणांना दिले होते. त्यानंतर काही दिवस पोलिसांनी शहरामध्ये छापेमारी करत मोठ्या प्रमाणात हे धंदे उधळून लावले. मात्र सध्या पोलिसांच्याच आशीर्वादाने अमलीपदार्थांची तस्करी बहरलेली आहे.
स्थानिक पोलिसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना मोठ्या प्रमाणात हप्ता जात असल्याने गोवंडीत हे धंदे वाढतच आहेत. सध्या या व्यवसायात अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात शिताफीने वापर केला जात असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले आहे.1नवी मुंबई, बोरीवली आणि ठाण्याच्या काही परिसरातून हे ड्रग्ज गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात आणले जाते. त्यानंतर या ठिकाणी असलेले मोठे तस्कर हा माल विकत घेऊन अन्य छोट्या विक्रेत्यांना विकतात. पाच ते सहा पट नफा या धंद्यात असल्याने दिवसेंदिवस ड्रग्जच्या पॅडलर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2उच्चभ्रू वस्तीतील तरुण याकडे आकर्षित होत आहेत. ड्रग्जच्या आहारी गेलेले अनेक धनाढ्य ग्राहक मोठमोठ्या वाहनांमधून शिवाजीनगर परिसरात ड्रग्ज खरेदीसाठी येतात.3गोवंडीतील काही परिसरात तर भररस्त्यात ड्रग्जची विक्री केली असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंगमधून समोर आले आहे. या परिसरातील अनेक तरुण आणि विशेष म्हणजे लहान मुलेदेखील या विळख्यात गुरफटली आहेत.
================================================
स्मार्ट सिटी योजना फसवी - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात मतभिन्नता असल्याचे दिसले. स्मार्ट सिटी संकल्पानाच स्पष्ट होत नाही, त्यामुळे अशा संदिग्ध योजना राबविण्याऐवजी प्राथमिक गरजांची, पायाभूत सोयी-सुविधांची पूर्तता करून नागरिकांना राहण्यायोग्य अशी शहरे बनवावीत, असा सूर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लावला. ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या व अखेरच्या सत्रात पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेवर अनेक प्रश्नचिन्हे लावली. या योजनेचे निकषच चुकीच्या निष्कर्षांवर आधारलेले असून स्मार्ट सिटीची व्याख्यादेखील संदिग्ध असल्याची टीका त्यांनी केली. या योजनेबाबत आपण माहितीच्या अधिकारातून तसेच थेट मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातूनही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याबाबत मौन पाळण्यात आले. ही गुप्तता संदिग्ध आहे, असा आरोप करीत चव्हाण यांनी सरकारवर संशयाची सुई रोखली. या योजनेत सुरुवातीस प्रस्तावित केलेल्या उल्हासनगर, नांदेड व पिंपरी-चिंचवड या शहरांना अंतिम यादीतून का वगळण्यात आले, या प्रश्नावर केंद्राच्या निकषानुसार ६० गुण व राज्याच्या निकषानुसार ४० गुण या आधारावर स्मार्ट सिटीसाठी शहरांची निवड केल्याचे व त्याबाबतचा मंत्रिमंडळात निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. परंतु २३ जुलैला झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयांच्या इतिवृत्तात त्याची नोंद नाही. ही माहिती मिळविण्यासाठी आपण माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला. दीड महिन्यानंतरही त्याचे उत्तर मिळाले नाही. त्यावर आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. मुख्यमंत्र्यांनी माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतो, असे सांगितले. पुढे काय झाले ते कळले नाही, परंतु मला माझ्या अर्जावर अद्यापि काहीही माहिती मिळाली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात १०० नवी स्मार्ट शहरे बनविण्याचे आश्वासन दिले होते, आता मात्र जुन्याच शहरांना आणि जुन्याच योजनेला नवा मुलामा देण्याचा सरकारचा प्रयत्न हास्यास्पद असून तो अखेपर्यंत टिकेल किंवा नाही याबाबतही आपण साशंकच आहोत अशी टीकाही करीत स्मार्ट सिटी योजनेच्या हेतूबद्दलच त्यांनी प्रश्न उपस्थित केला. केंद्रातील काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेच्या माध्यमातून (जेएनयूआरएम) शहरांचा विकास करण्याची योजना तयार केली. त्याचा बराच फायदा राज्याला झाला. त्याच योजनेचे आता स्मार्ट सिटी असे भाजप सरकारने नामांतर केल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगमंत्र्यांचाही विरोधी सूर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी योजना राबविण्यास विरोध केला. शिक्षणमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी मात्र स्मार्ट सिटीचे जोरदार समर्थन केले. मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नवीन कल्पना म्हणजे स्वप्न असते, त्याला वेगळा ढाचा नाही, असा स्मार्ट सिटीच्या विरोधात सूर लावला. एखादी नवीन योजना असेल, तर ती कुणासाठी, कशासाठी आणि मला त्याचा फायदा काय, असे प्रश्न उभे होतात, त्याची उत्तरे दिल्याशिवाय फारसे काही साध्य होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. शहरात राहणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या वेळेनुसार पाण्याच्या वेळा हव्यात, झोपडपट्टीवासीयांना शौचालयांसारख्या प्राथमिक नागरी सुविधा देण्याची गरज आहे, वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून रस्ते रुंद हवेत, घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, एकंदरीत प्राथमिक गरजांची पूर्तता करणाऱ्या, नागरिकांना राहण्यायोग्य परिपूर्ण शहरांची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष हेतू खासगी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी योजना राबविण्याच्या निर्णयास त्यांनी विरोध केला. महानगरपालिकांची स्वायत्तता धोक्यात आणणारा हा निर्णय आहे असे ते म्हणाले. त्याऐवजी लोकप्रतिनिधींचा व तज्ज्ञांचा समावेश असलेली महापालिकेचीच एक समिती स्थापन करावी व त्या माध्यमातून स्मार्ट सिटी योजना राबवावी, अशी सूचना त्यांनी केली. विनोद तावडे यांनी स्मार्ट सिटी योजनेचे समर्थन केले. स्मार्ट सिटी संकल्पनेच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे नियोजन करण्याची संधी मिळाली आहे. तुमच्यातील कौशल्याला आणि कर्तृत्वाला वाव देणारी ही योजना आहे. त्यातून शहरांचा नियोजनबद्ध विकास होईल, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या पाच कोटींहून जास्त आहे, त्या प्रमाणात १२ शहरांची निवड व्हायला हवी होती; परंतु फक्त दहाच शहरांची निवड झाली. महाराष्ट्रापेक्षा कमी नागरी लोकसंख्येच्या तामिळनाडूतील १२ शहरांचा कसा समावेश झाला? स्मार्ट सिटीसाठी निवड झालेल्या शहरांना प्रत्येकी १०० कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. आता ११ हजार लोकसंख्येच्या शहरालाही १०० कोटी आणि दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईलाही १०० कोटी रुपये, हा पोरखेळ आहे. -पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 
================================================
मोत्याची शेती’ योजनेचा सरकारकडून स्वीकार

गडचिरोली जिल्हय़ातील प्रगत शेतकरी संजय गंडाते यांची ‘मोत्यांची शेती’ ही संकल्पना राज्य सरकारच्या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच गडचिरोली जिल्हा कारागृहातील कैद्यांना देखील ‘मोत्यांच्या शेती’चे धडे देण्यात येणार आहेत. यासोबत महाराष्ट्रासह इतर दहा राज्यांतील शेतकरी ‘मोत्यांच्या शेती’चे प्रशिक्षण घेत आहेत. अल्पावधीत ही शेती प्रसिद्धीला आली आहे. नक्षलग्रस्त अतिदुर्गम गडचिरोली जिल्हय़ातील प्रगतशील शेतकरी संजय गंडाते मोत्यांची शेती करून वर्षांकाठी दहा लाखांचे उत्पन्न घेत आहेत. त्यांची शेती अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. राज्य सरकारने गडचिरोली कृषी विभागाला या शेतीचा समावेश सरकारी योजनेत करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. या संदर्भातील अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्य सरकारचे पत्र मिळताच ‘आत्मा’च्या प्रकल्प उपसंचालक प्रिती हिरलकर यांनी गुरुवारी संजय गंडाते यांच्या शेतात जाऊन ‘मोत्यांच्या शेती’ची माहिती घेतली. तसेच प्रशिक्षणासंदर्भातही माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे गंडाते यांनी गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या ६ किलोमीटरवर असलेल्या पारडी या गावी शेतकऱ्यांना या शेतीचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. गंडाते यांची मोत्याची शेती ही रोजगाराचे मुख्य केंद्र बनू शकते. गडचिरोलीसह राज्यात सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे राज्य सरकार ही योजना संपूर्ण राज्यभर राबवून शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपतब्ध करून देणार आहे. मोत्यांच्या शेतीचा लाभ.. * प्रगत शेतकरी संजय गंडांते यांची ‘मोत्याची शेती’ ही गडचिरोलीसह राज्यातील बेकारीच्या प्रश्नावर मोठा उतारा ठरू शकते. * बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेशासह महाराष्ट्र या दहा राज्यांतील ५० पेक्षा अधिक शेतकरी गंडांते यांच्याकडून सध्या प्रशिक्षण घेत आहेत. * गडचिरोली जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले यांनीही कारागृहातील कैद्यांना प्रशिक्षण देण्याची विनंती गंडांते यांना केली आहे. 
================================================
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन यांच्या मुलीला कवडीमोल दराने जमीन


अहमदाबाद - कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात दिल्याच्या आरोपावरून गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मुलगी अनार पटेल हिला दिल्याचा आरोप होत असताना, आता अनार पटेलने मी काहीही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे.
एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर विरोधा पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेसने आनंदीबेन पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गीर अभयारण्याजवळ सुमारे 400 एकरवर अनार जयेश पटेल यांच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीसाठी गुजरात सरकारने 2010-11 मध्ये 250 एकर जमीन या कंपनीला कवडीमोल भावात देण्यात आल्याचे समोर आले आहे. ही जमीन अवघी 15 रुपये प्रती स्केअर मीटर दराने दिली आहे. ही पूर्ण जमीन शेतजमीन होती, ती बिगरशेती करण्यात आली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते आणि आनंदीबेन पटेल या महसूलमंत्री होत्या. 
या आरोपांनंतर अनार पटेल यांनी म्हटले आहे, की मी आणि माझे पती गेल्या 22 वर्षांपासून समाजसेवा करत आहोत. कुटुंब चालविण्यासाठी मी शिक्षण पूर्ण करून व्यवसायात उतरले. माझ्या मते चांगल्या नैतिकतेच्या आधारावर कंपनी चालविण्याचा हक्क सर्वांनाच आहे. नागरिकांनी नैतिकतेवर कितीही प्रश्न उपस्थित केले तरी विजय सत्याचाच होतो. 
काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी आरोप केले आहेत, की अनार पटेल यांना गुजरात सरकारने ही जमीन अवघी 60 हजार रुपये प्रती एकर भावाने सव्वा कोटी रुपयांना सर्व जमीन देण्यात आली. त्यावेळी जमीनीचे भाव 50 लाख रुपये प्रती एकर होता. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. न्यायालयाच्या देखरेखीखाली याची चौकशी करण्यात यावी. 
================================================
प्रत्येक हल्ल्याकडे वर्णद्वेषातून पाहू नका - सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह 

परदेशी विद्यार्थ्यांवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याकडे ‘वर्णद्वेषा‘च्या दृष्टीने पाहू नये असे आवाहन वरिष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह यांनी केले आहे. 

नायजेरियातील विद्यार्थीनीवर हैद्राबादमध्ये जमावाने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर सिंह बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘या प्रकरणाकडे वर्णद्वेषाच्या दृष्टीकोनातून पाहणे म्हणजे मोठी शोकांतिकाच आहे. ही जमावाची कृती आहे. आणि जमावाला रंग देणे म्हणजे समाजात फूट पाडून भारत-आफ्रिकेतील संबंधांमध्ये बाधा पोचविण्यासारखे आहे. हैदराबादच्या घटनेत स्थानिकांनी बंदूक दाखवून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे नायजेरियन विद्यार्थीनीने सांगितले आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून सखोल चौकशी करण्याची गरज आहे.‘ परदेशी विद्यार्थी भारतामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी असते, असेही सिंह पुढे म्हणाल्या.
================================================
चेन्नई; गायक शान जॉन्सनचा आढळला मृतदेह

गायक आणि संगीतकार शान जॉन्सन (वय 29) यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. माजी संगीतकार जॉन्सन यांची ती कन्या आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील अशोकनगर भागात राहत असलेल्या शान जॉन्सन यांच्या घरातच त्यांचा मृतदेह आढळला. त्यांची आई व मित्र आज (शनिवार) सकाळी त्यांच्या घरी पोचले असता, दरवाजा आतमधून बंद होता. तसेच फोनवरुनही संपर्क होत नव्हता. अखेर दरवाजा तोडल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. आज सकाळी शान संगीत रेकॉर्डिंगसाठी जाणार होती.

================================================
हिट अँड रन‘ प्रकरणात अभिनेता सलमान खान हाच मद्यप्राशन करून गाडी चालवित होता- महाराष्ट्र सरकार 


आज सर्वोच्च न्यायालयात सांगत सलमानला निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय बदलावा, अशी मागणी केली. महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

मुंबईमध्ये 28 सप्टेंबर 2002 मध्ये हा अपघात होऊन त्यामध्ये पदपथावर झोपलेला एक जण ठार;तर चार जण जखमी झाले होते. न्या. जे. एस. शेखर आणि न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा "अमान्य‘, "चुकीचा‘ आणि "न्यायाची दिशाभूल करणारा‘ असल्याचे महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे ऍडव्होकेट जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. अपघातावेळी सलमान हाच गाडी चालवित होता आणि त्याचा वाहनचालक म्हणून सांगण्यात आलेल्या व्यक्तीचा मुद्दा हा घटनेनंतर तेरा वर्षांनंतर "घुसविला‘ गेला, असा दावा रोहतगी यांनी केला. घटनाक्रम आणि याप्रकरणी झालेल्या साक्षींचा संदर्भ देत रोहतगी म्हणाले की, अपघातावेळी सलमान खान, त्याचा गायक मित्र कमाल खान आणि एक कॉन्स्टेबल हे गाडीत होते. या वेळी सलमानच गाडी चालवित होता, असे काही विधानांवरून स्पष्ट होत आहे. अपघातानंतर बारा तासांच्या आत घेतलेल्या सलमानच्या रक्‍ताच्या नमुन्यात मद्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक होते आणि सलमानकडे 2002 मध्ये वाहन परवानाही नव्हता, हे रोहतगी यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी रोहतगी यांनी अशाच एका अपघातप्रकरणी दिल्लीमधील उद्योगपती संजीव नंदा यांना झालेल्या शिक्षेचे उदाहरणही दिले. 

सलमानचा वाहनचालक अशोक ब्रह्मदेव सिंह हा गाडी चालवित होता, या दाव्यालाही रोहतगी यांनी विरोध केला. ते म्हणाले की, 2002 ते 2015 या काळात या वाहनचालकाचा कोठेही उल्लेख नाही. अचानक तेरा वर्षांनंतर त्याचे नाव पुढे आणण्यात आले. फक्त एका वाहनचालकाला वाचविण्यासाठी एखादा अभिनेता तेरा वर्षे कसा काय शांत बसू शकतो. मुंबई उच्च न्यायालयाने सलमानचे पोलिस बॉडिगार्ड रवींद्र पाटील यांची साक्ष मान्य केली नव्हती. अपघाताची प्रथम माहिती देणारे पाटील यांनी सलमान फक्त मद्यप्राशन करून गाडी चालवित नव्हता;तर हळू जाण्याचा सल्ला झुगारून वेगात गाडी चालवित होता, असे सांगितले होते. सलमान खानची बाजू प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी मांडली. या सुनावणीनंतर न्यायालयाने सलमान खानला कोणतीही नोटीस बजावली नसून पुढील सुनावणीसाठी 12 फेब्रुवारी ही तारीख निश्‍चित केली आहे.
================================================
लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी संसदेच्या कामकाजात अडथळा - मोदी 


मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी एक कुटुंब संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्यामुळे गरिबांना फायदेशीर ठरणारी अनेक विधेयके अडकून पडली असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता केला. 

ईशान्य भारताच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आसाममध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला. गांधी कुटुंबावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, की मला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांतही असे नेते आहेत, ज्यांची संसदेचे कामकाज सुरळीत चालावे अशी इच्छा आहे. मात्र, एक कुटुंब राज्यसभेचे कामकाज रोखून धरत आहे. 

मोदी यांनी आज सकाळी ढिब्रूगडमध्ये एका पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना त्यांनी अनेक घोषणाही केल्या. मोदी म्हणाले की, विरोधक आमच्या कामात अडथळा आणत आहेत आणि संसदेचे कामकाज चालू देत नाहीत. विरोधक राज्यसभेचे कामकाज रोखून गरिबांसाठी काम करू देत नाहीत. आसाममध्ये गरिबांचे ऐकणारे सरकार पाहिजे. मजुरांसाठी जगणारे सरकार हवे आहे. 
2014च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या आणि 400 खासदारांवरून 40 खासदारांवर आलेल्या लोकांनी मोदींना काम करू द्यायचे नाही असे ठरवले आहे. अडथळे आणि कठीण परिस्थिती निर्माण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांनी पराभूत करणाऱ्या गरीब कामगारांपासून जनतेचा बदला घेण्याचे ठरवले आहे. अशा नकारात्मक राजकारणाचा त्यांना तसेच जनतेलाही फायदा होणार नाही, असा हल्ला मोदींनी चढविला. 
ईशान्य भागाच्या विकासावर भर देणार असल्याचे नमूद करताना राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नावाचा दोनवेळा उल्लेख केला. दोन प्रकल्पांच्या उद्‌घाटनानंतर ते म्हणाले, की भारतात "आनंद‘ आहे आणि आसाममध्ये "सर्वानंद‘ आहे. हे दोन्ही प्रकल्प 25 वर्षांपूर्वी पूर्ण केले असते तर आसाममध्ये सर्वानंदाचे वातावरण असते. 
देशाच्या सर्वंकष विकासावर विश्‍वास ठेवत असल्यामुळे ईशान्य भागाचा विकास करणे याला आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. आसाममधील युवकांनी राज्यात उद्‌घाटन झालेल्या दोन प्रकल्पांचा फायदा उठविण्यासाठी छोट्या कंपन्या सुरू कराव्यात, ज्यामुळे देशाची आर्थिक स्थिती भक्‍कम होईल. 
================================================
बहाणे सांगू नका; देश चालवा - राहुल गांधी 


 "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात गरीब, शेतकरी रडत आहेतच; पण आता तर ज्यांच्यासाठी सरकार स्थापन करण्यात आले आहे, ते उद्योगपतीही रडत आहेत. पंतप्रधानांचे काम देश चालविण्याचे आहे; पण मोदी दीड वर्षापासून केवळ बहाणे सांगत आहेत,‘ अशा कडवट शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली. 

"मनरेगा‘च्या (पूर्वाश्रमीची नरेगा) दहाव्या वर्धापनानिमित्त सर्व प्रदेश शाखांना दोन फेब्रुवारीला राज्यस्तरीय संमेलन घेण्यास सांगण्यात आले होते. "यूपीए‘च्या काळात गेमचेंजर ठरलेली ही योजनाच पुन्हा एकदा आपली गरीब, मागासवर्गीय आणि आदिवासी मतपेढी परत मिळवू शकते, असे राहुल गांधींचे मानणे आहे. त्यामुळे प्रदेश शाखांना "मनरेगा‘ संमेलनाबाबत अतिशय काटेकोर राहण्यास सांगण्यात आले होते. एवढे नव्हे, तर या संमेलनांच्या यशापयशाचा राहुल गांधी जातीने आढावा घेतील, असेही खलिते कॉंग्रेस मुख्यालयातून पाठविण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक झाली. सर्व प्रदेशाध्यक्षांसोबतच राज्यांचे प्रभारी सरचिटणीस, संघटना सरचिटणीस जनार्दन द्विवेदी, खजिनदार मोतीलाल व्होरा, माजी ग्रामविकासमंत्री जयराम रमेशही उपस्थित होते. 
केंद्रातील आणि राज्यांमधील भाजप सरकारांकडून कॉंग्रेसने आणलेल्या "मनरेगा‘, आदिवासी हिताच्या कायद्यांना धाब्यावर बसविण्याचे काम सुरू आहे, असे गाऱ्हाणे मांडणाऱ्या प्रदेशाध्यक्षांना राहुल गांधींनी भाजप सरकारांना जाब विचारण्याचे आदेश दिले. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, की भाजप गरिबांसाठी सरकार चालवत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत, मजूर रडत आहेत. गरिबांसाठीच्या योजनांवर संघ आणि मोदींचे आक्रमण सुरू असून "मनरेगा‘, आदिवासींसाठीच्या कायद्यांना मोडीत काढले जात आहे; पण कॉंग्रेस पक्ष मोदींना उद्योगपतींसाठी सरकार चालवू देणार नाही, असा इशारा राहुल गांधींनी दिला. 
================================================
समाजातून बहिष्काराची ओडिशा मंत्र्याला भीती 
भुवनेश्‍वर - एखाद्याला समाजातून बहिष्कृत करण्याचे इशारे दिले जातात. पण आता खुद्द ओडिशाच्या एका मंत्र्यालाच या इशाऱ्याला सामोरे जावे लागले आहे. आपल्या मुलीला एका ब्राह्मण मुलाबरोबर विवाह करण्याची परवानगी देणे हा या मंत्र्यांचा "अपराध‘ आहे. 
राज्याचे अनुसूचित जाती-जमाती, क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री सुदाम मरांडी यांच्यावर ही वेळ आली आहे. ते स्वतः संथाळ समाजाचे असून, त्यांची मुलगी संजीवनी हिने बिजू जनता दलाचे विद्यार्थी नेते सुनील सरंगी यांच्याबरोबर नुकताच येथे विवाह केला. संजीवनी डॉक्‍टर आहेत. विवाह समारंभास राज्यपाल एस. सी. जमीर आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. 
या विवाहामुळे संथाळ नेते नाराज झाले असून, समाजातील ज्येष्ठ नेते आता मेळावा घेऊन मरांडी यांच्यावर बहिष्कार घालण्याची तयारी करीत आहेत. आंतरजातीय विवाह संथाळांच्या परंपरेविरुद्ध असल्याचा या ज्येष्ठांचा दावा आहे. झारखंड, पश्‍चिम बंगाल, बिहार आणि ओडिशात वास्तव्यास असलेला हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा समाज आहे. या समाजातील मरांडी हे तडफदार नेते म्हणून ओळखले जातात. ते लोकसभेचे माजी खासदार असून, 2014 मध्ये बिजू जनता दलात दाखल झाले. मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळाले. संथाळांनी आंतरजातीय विवाह करण्यास मरांडी यांचा पूर्वी विरोध होता. आता त्यांच्या कन्येनेच परंपरा मोडल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. आता बहिष्कारापासून स्वतःला वाचविण्यासाठी त्यांनी समाजातील ज्येष्ठांच्या भेटी-गाठी सुरू केल्या आहेत.
================================================

No comments: