[अंतरराष्ट्रीय]
१- तैवान; भूकंपात कोसळलेल्या इमारतीच्या विकासकाला अटक
२- उत्तर कोरियाने रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचा दावा केल्यानंतर उत्तर-पूर्व आशियातील तणाव वाढला
३- इस्लामाबाद; पाक व कतारमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा करार...
४- जर्मनी; दोन रेल्वे अपघातात 4 ठार 150 जखमी
५- कोझिकोडे : पोटात गर्भ वाढत असल्याच्या भ्रमाने ‘तो’ चिंतित
६- कोरिया; जिल्हादंडाधिकाऱयांच्या आदेशानंतर 'शेळी' अटकेत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- सिद्धीविनायक मंदिरही टार्गेट होतं : हेडली
८- उज्ज्वल निकमांच्या 'त्या' प्रश्नावर हेडली भडकला
९- मृत्यूला हरवणाऱ्या जवानाच्या भेटीला मोदींचा ताफा
१०- भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मिरवर पाकिस्तान कधीही ताबा मिळवू शकत नाही - फारुख अब्दुल्ला
११- Under 19 WC : भारताची फायनलमध्ये धडक
१२- भाजपकडे 608 कोटींचा निधी; 'आप'कडेही २७५ टक्यांची वाढ
१३- सराफांनी पुकारला देशव्यापी बंद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- दर्ग्यातील महिला प्रवेशाला राज्य सरकार अनुकूल
१५- माझ्याकडेही पक्ष स्थापनेसाठी भांडवल नव्हतं, मी फक्त हिंमत केली: राज
१६- ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ स्थगित, राज्य सरकारचा निर्णय
१७- कोणतीही चूक केलेली नाही; चौकशीला सामोरे जाण्यास तयार – भुजबळ
१८- किरीट सोमय्यांनी पराचा कावळा केला : भुजबळ
१९- कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी पुढील सुनवाणी २३ फेब्रुवारीला होणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- श्रीनगर; अफजलच्या फाशीच्या दिवसामुळे कडक सुरक्षा
२१- पुण्यातील तरुणांकडून अमेरिकनांना गंडा
२२- आदर्श प्रकरणी खा.अशोकराव चव्हाण यांच्यावरील चौकशीचे आदेश रद्द करावे - मा.आ.बेटमोगरेकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- "व्हॅलेंटाईन डे'ला पुरुषांचा खर्च महिलांपेक्षा जास्त - एक अहवाल
२४- विन डीजलसोबत दीपिका पदुकोणचा पहिला व्हिडिओ
२५- सॉलिड स्मार्टफोन झाला स्वस्त, किंमतीत बरीच घट
२६- स्टीव्ह वॉ स्वार्थी क्रिकेटपटू - शेन वॉर्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
आळस सुखावतो, पण काम केल्याने समाधान मिळते
[क्रिश्ना सामन्तो, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
चॉकलेट-डे साठी खास चॉकलेट
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट उपलब्ध, अगदी लगेच...
लिप्स चॉकलेट, हार्ट चॉकलेट, गिफ्ट चॉकलेट आणि बरेच प्रकार
अधिक माहितीसाठी कॉल करा.
संपर्क- 9423785456, 7350625656
ढिंच्याक चॉकलेटच्या अधिक माहितीसाठी लिंक- https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/05/blog-post_17.html
व्हिडीओ पहा - https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/dhinchyak-chocklate.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4
============================================================
उज्ज्वल निकमांच्या 'त्या' प्रश्नावर हेडली भडकला
मुंबई : मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्याचा मास्टर-माईंड डेव्हिड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होत असलेल्या साक्षीदरम्यान, पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. मुंबई हल्ल्यात हाफिज सईद आणि पाकिस्तानचा कसा हात होता, हे त्याने उघड केलं आहे.
याशिवाय हल्ल्यावेळी सीएसटी आणि ताजसह इतर ४ ठिकाणांवर हल्ला करण्याचा बेत होता, अशी धक्कादायक माहिती दहशतवादी डेव्हिड हेडलीनं आज मोक्का कोर्टाला दिली. यात सिद्धिविनायक मंदिर, मुंबई पोलीस हेडक्वार्टर, तसंच एअरफोर्सच्या कार्यालयांवर घातपाताचा विचार होता.. असं डेव्हिडनं सांगितलं.
‘त्या’ प्रश्नावर हेडली भडकला
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हेडलीवर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. निकम अनेक प्रश्न विचारुन त्याच्याकडून माहिती घेत आहेत. यादरम्यान, उज्ज्वल निकम यांनी हेडलीला एक प्रश्न विचारला, त्यावर हेडली चांगलाच वैतागला.
निकम यांनी हेडलीला विचारलं, तुला लष्कर- ए- तोएबा आणि आयएसआयकडून पैसा मिळतो का? त्यावर हेडलीने तुमच्याकडे या प्रश्नाला काय आधार आहे? असा प्रतिप्रश्न केला. यावेळी तो चांगलाच चिडला आणि अस्वस्थ झाला.
Under 19 WC : भारताची फायनलमध्ये धडक
ढाका: ईशान किशनच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 97 धावांनी धुव्वा उडवून, एकोणीस वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली.
या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करून 50 षटकांत नऊ बाद 267 धावांची मजल मारली होती. पण श्रीलंकेला विजयासाठी 268 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचं आव्हान पेलवलं नाही. त्यांचा डाव 42.2 षटकांत अवघ्या 170 धावांत आटोपला.
भारताकडून मयांक डागरनं तीन आणि आवेश खाननं दोन विकेट्स काढल्या. त्याआधी अनमोलप्रीतसिंगनं 72 धावांची, सरफराज खाननं 59 आणि वॉशिंग्टन सुंदरनं 43 धावांची खेळी उभारून भारताच्या डावाला आकार दिला होता.
माझ्याकडेही पक्ष स्थापनेसाठी भांडवल नव्हतं, मी फक्त हिंमत केली: राज
मुंबई: ‘माझ्याकडेही पक्ष स्थापनेसाठी भांडवल नव्हतं, मी फक्त हिंमत केली. चढ-उतार येत असतात. आज उतार आहे उद्या चढ येईल. समुद्रातसुद्धा भरती-ओहटी येत असते.’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एका कार्यक्रमात म्हणाले.
मनसेकडून महिला उद्योग परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत. याच कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी महिला उद्योजिकांना मार्गदर्शन केलं. ‘महिला उद्योजिका सक्षमीकरणासाठी आजवर खूप शिबीरं झाली, मात्र, किती महिला उद्योजिका झाल्या हे बघायला हवं?’ असं सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
‘उद्योग उभारायला भांडवल नाही तर हिंमत लागते’
‘उद्योग उभारायला भांडवल नाही तर हिंमत लागते. महिलांनी आता पापड लोणची यापलिकडे जाऊन जगभरात उद्योग स्थापन केले पाहिजेत. संधी ओळखा आणि त्याचा योग्य वापर करा.’ असंही राज ठाकरे म्हणाले.
‘बँकाकडे लाखाचे कर्ज मागू नका, कोटींमध्ये कर्ज घ्या पण…’
‘बँकाकडे लाखाचे कर्ज मागू नका, कोटींमध्ये कर्ज घ्या, पण उद्योगाची कल्पनाही तशीच असायला हवी. माझ्याकडेही पक्ष स्थापनेसाठी भांडवल नव्हतं. मी फक्त हिंमत केली. चढ-उतार येत असतात.’ असं म्हणत राज ठाकरें यांनी त्यांच्या पक्षाच्या आजच्या स्थितीवरही भाष्य केलं.
मृत्यूला हरवणाऱ्या जवानाच्या भेटीला मोदींचा ताफा
नवी दिल्ली: नवी दिल्लीत उपचारासाठी दाखल झालेला देशाचा जवान हणमंतप्पा यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
आज दुपारी हणमंतप्पा यांना दिल्लीत आणल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा लष्कराच्या रुग्णालयाकडे वळवण्यात आला.
विन डीजलसोबत दीपिका पदुकोणचा पहिला व्हिडिओ
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉलिवूडच्या ‘xXx: The Return of Xander Cage’ दिसणार आहे. सध्या याच सिनेमाच्या शूटींगमध्ये ती व्यस्त आहे. या सिनेमात दीपिकासोबत हॉलिवूड अभिनेता विन डीजल देखील आहे.
शूटिंग दरम्यान, सेटवरील दोघांचा एक सोशल नेटवर्किंग वेबसाइट इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये डीजल म्हणतो की, “Be ready to entertain.” दीपिकाही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये त्याच्या बाजूला उभं राहून हसत होती.
सिद्धीविनायक मंदिरही टार्गेट होतं : हेडली
मुंबई: मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यावेळी सीएसटी आणि ताज हॉटेलसह सिद्धीविनायक मंदिर आणि इतर ४ ठिकाणांवर हल्ला करण्याचा बेत होता, अशी धक्कादायक माहिती दहशतवादी डेव्हिड हेडलीनं आज मोक्का कोर्टाला दिली.
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई पोलीस हेडक्वार्टर, तसंच नौदलाच्या हवाई तळावर घातपाताचा विचार होता, असं डेव्हिडनं कबुल केलं.
त्यासाठी सिद्धिविनायक मंदिराचीही डेव्हिडनं रेखीही केली होती. 2008 मधल्या दहशतवादी हल्ल्यात डेव्हिड हेडलीला माफीचा साक्षीदार बनवलं गेलं आहे. त्याची मुंबईच्या मोक्का न्यायालयात साक्ष नोंदवली जात आहे.
सॉलिड स्मार्टफोन झाला स्वस्त, किंमतीत बरीच घट
मुंबई: चायनीज स्मार्टफोन कंपनी ‘वनपल्स’ने नुकताच लाँच केलेल्या वनप्लस 2 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. हा स्मार्टफोन आता 349 डॉलरला (23,999 रु.) असणार आहे. सुरुवातीला या 64 जीबी मॉडेलची किंमत 389 डॉलर होती.
या स्मार्टफोनमध्ये करण्यात आलेली कपात लवकर भारतातही लागू करण्यात येईल अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे. भारतात वनप्लस 2 च्या 16 जीबी मॉडेलची किंमत रु. 22,999 आहे तर 64 जीबी मॉडेलची किंमत 24,999 रु. आहे.
कंपनीच्या मते, या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट-स्कॅनर उपलब्ध आहे. तसेच वनप्लस 2चा फिंगरप्रिंट-स्कॅनर आयफोनच्या टचपेक्षाही चांगला असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. ज्यामध्ये आपण पाच फिंगरप्रिट-स्कॅनर एकाच वेळेस सेव्ह करु शकता.
वनप्लस 2 स्मार्टफोनचे खास फीचर:
5.5 इंच डिस्प्ले, 1080×1920 पिक्सल रेझ्युलेशन
कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4 प्रोटेक्शन
ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टम
4 जीबी रॅम
13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ स्थगित, राज्य सरकारचा निर्णय
राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेले आणि अनेक गावांचा सक्रीय पाठिंबा लाभलेले ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्याचे उपसचिव रुचेश जयवंशी यांनी परिपत्रक काढून हे अभियान स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये स्वच्छता अभियान राबवत असताना उदंड प्रतिसाद मिळालेले ग्राम स्वच्छता अभियान स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत २०१४-१५ मधील जिल्हा व विभागस्तरीय तपासणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील ही प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागण्याची शक्यता गृहीत धरून हे अभियान स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गेल्या शनिवारी या संदर्भातील शासकीय आदेश जारी करण्यात आला. आर. आर. पाटील राज्याच्या ग्राम विकास खात्याचे मंत्री असताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात केली होती. या अभियानांतर्गत विविध ग्राम पंचायतींना पुरस्कारही देण्यात येत होते. राज्यातील विविध ग्राम पंचायतींनी या अभिनायामध्ये सक्रीय सहभाग घेऊन गावातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले होते.
============================================================
कोणतीही चूक केलेली नाही; चौकशीला सामोरे जाण्यास तयार – भुजबळ
‘महाराष्ट्र सदन’ बांधकाम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे मंगळवारी अमेरिकेहून मुंबईत आगमन झाले. यावेळी मुंबई विमानतळावर त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी करत घोषणाबाजी केली. भुजबळ यांनी यावेळी कार्यकर्त्यांचे आभार मानताना मी कोणतीही चूक केली नसल्याचे सांगितले. भुजबळ कुटुंबीय चौकशी यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे. कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरा जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. समर्थकांनी शांतता बाळगावी, असेही आवाहन त्यांनी केले. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने भुजबळपुत्र पंकज यांना चौकशीसाठी आज पाचारण केले आहे. त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यास समीर यांच्याप्रमाणेच त्यांनाही अटक होऊ शकते, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. तर गेल्या आठवड्यात अटक झालेल्या समीर भुजबळ यांची २२ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. समीरला अटक झाली त्याच्या आदल्याच दिवशी छगन भुजबळ हे अमेरिकन काँग्रेसमध्ये भाषण करण्याकरिता वॉशिंग्टन डीसीला रवाना झाले होते.
============================================================पुण्यातील तरुणांकडून अमेरिकनांना गंडा
पुणे : संगणकामध्ये व्हायरस असल्याचे सांगून तो काढून देण्याच्या बहाण्याने लाखो अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बीपीओ सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. हा बीपीओ चालविणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
आदित्य रवींद्र राठी (वय २५, रा. बावधन), हरीश नारायणदास खुशलानी (वय २६, रा. पिंपरी) आणि रितेश खुशाल नवानी (वय २९, वाघेरा कॉलनी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी अमेरिकेतील ५ ते १० लाख नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. बावधन येथील कोलते-पाटील प्लाझामध्ये असेलल्या आयस्पेसमध्ये एका बीपीओ सेंटरमधून मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. गुन्हे शाखेकडील सायबर सेल व संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पहाटे सेंटरमध्ये छापा टाकण्यात आला.
============================================================
तैवानमध्ये भूकंपात कोसळलेल्या इमारतीच्या विकासकाला अटक
शनिवारच्या भूकंपामध्ये तैवानमध्ये इमारत कोसळून ३९ जणांना प्राण गमवावे लागले होते. या इमारतीच्या विकासकाला अटक करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
शनिवारी पहाटे तैवानला भूकंपाचा धक्का बसला. तैवानसाठी नव्या वर्षाचा उदय होणार होता आणि ही दुर्घटना घडली. यावेळी तैनानमधली वी गुआन गोल्डन ड्रॅगन ही १७ मजली इमारत भूकंपाचा धक्का न सोसल्याने कोसळली आणि ३७ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य ठिकाणी २ जणठार झाले.
त्यानंतर या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. अद्यापही जवळपास १०० जण गाडले गेले असावेत असा कयास असून बचावकार्य सुरू आहे.
याप्रकरणी बांधकामाचा दर्जा व वापरण्यात आलेले साहित्य यांच्याबाबत शंका उपस्थित केल्या जात असून इमारतीचा विकासक आणि अन्य दोघांविरोधात शहर प्रशासनाचे डेप्युटी गव्हर्नर जनरल लिउ शी चुंग यांनी अटक वॉरंट बजावले आहे.
============================================================कोझिकोडे : पोटात गर्भ वाढत असल्याच्या भ्रमाने ‘तो’ चिंतित
कोझिकोडे : टॉम हुपर यांच्या ‘द डॅनिश गर्ल’ या चित्रपटातील लिली एल्बी या पात्राला आपण स्त्री असल्याचे वाटत राहते. एवढेच नव्हे, तर त्याच्या पत्नीचीही तशीच समजूत होते. एडी रेडमायनी यांनी वठवलेले एल्बीचे पात्रही गाजले होते; मात्र रील लाईफमधील असे कथानक रियल लाईफमध्ये अनुभवण्याचा विचित्र प्रकार कोझिकोडे येथे चर्चेचा विषय बनला आहे.
कोझिकोडे येथील ५२ वर्षीय इसम दोन मुलांचा बाप आहे. त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, सध्या बेरोजगार बनला आहे. त्याला पोटात गर्भ असल्याची जाणीव होत असल्याने त्याचे कुटुंबीय हैराण झाले आहेत. शेवटी त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा मार्ग अवलंबला. मला पोटात बाळाच्या हालचाली जाणवतात. नेहमीपेक्षा वेगळी अशी संवेदनशीलता जाणवते असे त्याचे म्हणणे आहे. पुरुषाला मूल होऊ शकत नाही, हे मानायलाही तो तयार नाही.
============================================================उत्तर कोरियाने रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचा दावा केल्यानंतर उत्तर-पूर्व आशियातील तणाव वाढला
सेऊल : उत्तर कोरियाने रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचा दावा केल्यानंतर उत्तर-पूर्व आशियातील तणाव वाढला आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिका स्व संरक्षणासाठी एक मिसाईलप्रणाली उभारण्याच्या विचारात आहे. याला चीन आणि रशिया यांचा विरोध आहे.
मागील महिन्यातील हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीनंतर उत्तर कोरियाने रविवारी यशस्वी रॉकेट प्रक्षेपण केले. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने तातडीची बैठक घेऊन उत्तर कोरियाच्या या कृतीचा निषेध केला आहे. तथापि, उत्तर कोरियावरील निर्बंध आणखी कडक करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या बैैठकीत असे मत मांडण्यात आले की, उत्तर कोरियाच्या या प्रक्षेपणाकडे जरी रॉकेट प्रक्षेपण अथवा अंतराळ यान म्हणून पाहिले तरीही ही कृती अण्वस्त्र विकासात योगदान देत असल्याचे दिसून येते. उत्तर कोरियाचे हे रॉकेट प्रक्षेपण म्हणजे गंभीर धोका आहे, अशी भीती यावेळी अमेरिकेने व्यक्त केली आहे. चीन आणि रशियाने मात्र या परिस्थितीवर तोडगा काढण्याची भूमिका मांडली. तथापि, उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय समुदायाचे मत विचारात न घेता ही कृती केल्याचे मतही चीनने व्यक्त केले आहे.
============================================================स्टीव्ह वॉ स्वार्थी क्रिकेटपटू - शेन वॉर्न
ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नच्या मनात आपला एकेकाळचा संघ सहकारी स्टीव्ह वॉ बद्दल जो राग, आकस आहे तो पुन्हा एकदा समोर आला आहे. मी ज्या क्रिकेटपटूंबरोबर खेळलो त्यात स्टीव्ह वॉ मी पाहिलेला सर्वात स्वार्थी क्रिकेटपटू आहे असा आरोप वॉर्नने टीव्ही चर्चेच्या एका कार्यक्रमात केला.
स्टीव्ह वॉ मला आवडता नाही त्यामागे अनेक कारणे आहेत. तो एक स्वार्थी क्रिकेटपटू आहे असे चॅनल टेनच्या कार्यक्रमात बोलताना वॉर्न म्हणाला.
१९९९ साली वेस्टइंडिज विरुध्दच्या अखेरच्या सामन्यात स्टीव्ह वॉ ने आपल्याला संघातून वगळल्याची आठवण वॉर्नने या कार्यक्रमात सांगितली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया १-२ अशी पिछाडीवर होती.
मला ज्या सामन्यातून वगळले तेव्हा मी ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार होतो. टीम निवडण्यासाठी आम्ही टेबलावर बसलो त्यावेळी त्याने मला वगळण्याचा निर्णय जाहीर केला. मी त्याला विरोध केला. पण स्टीव्हने सांगितले मी कर्णधार आहे. तु संघात खेळणार नाही. मी त्याच्या निर्णयाने निराश झालो असे वॉर्नने सांगितले.
दर्ग्यातील महिला प्रवेशाला राज्य सरकार अनुकूल
मुंबई - देशभरातील धार्मिक प्रार्थनास्थळांमध्ये महिलांच्या प्रवेशावरून वाद निर्माण झाला असताना महिलांच्या हाजी अली दर्ग्यातील प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारने अनुकूलता दर्शविली आहे.
अलिकडेच शनिशिंगणापूर येथील मंदिरात महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर मुस्लिम महिलांनी हाजी अली ट्रस्टने महिलांना दर्ग्यातील प्रवेशावर असलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आपले मत कळवावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान आज या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान महिलांचा समानतेचा हक्क नाकारता येत नसल्याचे म्हणत महाराष्ट्र सरकारने दिलेल्या उत्तरात महिलांच्या हाजी अली दर्ग्यातील प्रवेशासाठी अनुकूलता दर्शविली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने सर्व पक्षांना पुढील दोन आठवड्यांत लेखी उत्तरे देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाप्रमाणेच केरळमधील शबरीमाला मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या निर्णयानंतरच या प्रकरणावर निर्णय देण्यात येईल असेही न्यायालयाने म्हटले आहे.
============================================================अलिकडेच शनिशिंगणापूर येथील मंदिरात महिलांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर मुस्लिम महिलांनी हाजी अली ट्रस्टने महिलांना दर्ग्यातील प्रवेशावर असलेल्या बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आपले मत कळवावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान आज या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान महिलांचा समानतेचा हक्क नाकारता येत नसल्याचे म्हणत महाराष्ट्र सरकारने दिलेल्या उत्तरात महिलांच्या हाजी अली दर्ग्यातील प्रवेशासाठी अनुकूलता दर्शविली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने सर्व पक्षांना पुढील दोन आठवड्यांत लेखी उत्तरे देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाप्रमाणेच केरळमधील शबरीमाला मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या निर्णयानंतरच या प्रकरणावर निर्णय देण्यात येईल असेही न्यायालयाने म्हटले आहे.
पाक व कतारमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा करार...
इस्लामाबाद - कतार व पाकिस्तानमधील संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशार्थ पाक पंतप्रधान नवाझ शरीफ हे कतारला भेट देणार असून या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध महत्त्वपूर्ण करार केले जाणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान कतारकडून पाकिस्तानला सुमारे 15 वर्षांपर्यंतच्या काळासाठी द्रवरुपात नैसर्गिक वायुचा पुरवठा करण्यासंदर्भातील करार केला जाण्याचीही शक्यता आहे. या कराराची किंमत तब्बल 15 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
शरीफ हे कतारचे एमीर शेख तमीम बिन हमाद बिन खलिफा अल-थानी यांची भेट घेणार असल्याचे पाकिस्तानतर्फे आज प्रसिद्ध करण्यात निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. याबरोबरच आरोग्य, शिक्षण, संशोधन, रेडिओ अशा विविध क्षेत्रांतील अनेक महत्त्वपूर्ण करार या भेटीदरम्यान होणार आहेत.
पाकिस्तानमध्ये सध्या इंधनाच्या तुटवड्याची गंभीर समस्या असून कतारबरोबरील हा उर्जा करार या पार्श्वभूमीवर अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. उर्जा क्षेत्रासहितच व्यापार व गुंतवणूक, संरक्षण या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा शरीफ यांचा प्रयत्न आहे. कतारमध्ये सध्या एक लाखपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक कार्यरत आहेत.
============================================================
श्रीनगर; अफजलच्या फाशीच्या दिवसामुळे कडक सुरक्षा
श्रीनगर- दहशतवादी अफजल गुरूला फासावर लटकाविण्यात आले त्यास आज (मंगळवार) तीन वर्षे झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफजल गुरूला तिहार कारागृहामध्ये 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमध्ये विविध संघटनांनी आज बंद पुकारला आहे. दुकाने बंद असून रस्त्यांवर वाहतूक तुरळक प्रमाणात दिसत आहे. अनेक नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. विविध भागांमध्ये सुरक्षा रक्षकांचा ताफा असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. अफजल गुरूच्या सोपोर येथील घराजवळ सुरक्षा दलांनी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये व वातावरण शांत राहण्यासाठी काळजी घेत आहोत, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
============================================================
भाजपकडे 608 कोटींचा निधी; 'आप'कडेही २७५ टक्यांची वाढ
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाला गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वाधिक 608.21 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आम आदमी पक्षाच्या पक्षनिधीमध्ये सर्वाधिक 275 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला 2013-14 मध्ये 170.86 कोटी तर 2014-15 मध्ये 437.35 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर ‘आप‘ला 2013-14 मध्ये 9.42 कोटी तर 2014-15 मध्ये 35.28 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये 275 टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तर कॉंग्रेसला 2014-15 मध्ये 141.46 कोटींचा निधी प्राप्त झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. बहुजन समाज पक्ष गेल्या 10 वर्षांपासून 20 हजारांपेक्षा अधिक निधी नाही. देशातील पाच प्रमुख राष्ट्रीय पक्षांचा निधी 2013-14 मध्ये 247.77 कोटी होता तर 2014-15 मध्ये 622.38 कोटी असल्याचे अहवालात म्हटले आहे.============================================================
सराफांनी पुकारला देशव्यापी बंद
नवी दिल्ली : केंद्र सरकारने दोन लाख आणि त्यावरील व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य केल्याच्या निर्णयाला विरोध करत देशभरातील 300 पेक्षा जास्त ज्वेलर्स संघटनांनी अखेर संप पुकारला आहे. उद्या (बुधवार) देशातील सर्व दागिन्यांचे व्यापारी एक दिवसीय संपावर जातील.
"सरकारने दोन लाख व त्यावरील व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य केल्याचा निर्णय घेतल्यामुळे आम्हाला संप पुकारणे भाग आहे", असे मत ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन अर्थात जीजेएफचे पुर्व विभागाचे अध्यक्ष संकर सेन व्यक्त केले.
दोन लाखांवरील खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी उद्युक्त करणे कठीण जात आहे. यामुळे अप्रत्यक्षरित्या रोजगारावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण पॅन कार्ड अनिवार्य झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सोने खरेदीपासून मुकावे लागेल. परिणामी, अर्थव्यवस्थेच्या साखळीला बाधा पोचण्याची शक्यता आहे. विशेषत: ग्रामीण भागातील किरकोळ विक्रेत्यांना फटका बसेल, असे या संघटनेचे मत आहे.
पॅन कार्ड अनिवार्यतेसाठीची मर्यादा दोन लाखांवरून वाढवून दहा लाख रुपये करावी, अशी मागणी "जीजेएफ‘ने सरकारकडे केली आहे.
============================================================जर्मनी; दोन रेल्वे अपघातात 4 ठार 150 जखमी
फ्रॅंकफर्ट- दक्षिण जर्मनीमध्ये दोन रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या अपघातात 4 ठार तर 150 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बवारिया शहराजवळ असलेल्या बाद अईब्लिंग शहराजवळ आज सकाळी नऊच्या सुमारास दोन रेल्वे गाड्यांमध्ये अपघात झाला. अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात 150 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 40 जणांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.‘‘घटनास्थळी बचाव दलाचे पथक, पोलिस व मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. गंभीर जखमींना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात हलविण्यात येत आहे. अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे,‘ अशी माहिती पोलिस प्रवक्ते स्टिफन सोन्नटॅग यांनी दिली.
============================================================
कोरिया; जिल्हादंडाधिकाऱयांच्या आदेशानंतर 'शेळी' अटकेत
कोरिया (छत्तीसगड)- येथील जिल्ह्याचे जिल्हादंडाधिकारी हेमंत रात्रे यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या बागेत ‘घुसखोरी‘ करून चारा खाल्याबद्दल शेळीला अटक करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिले. पोलिसांना यामुळे संबंधित शेळीला अटक करावी लागली आहे.
पोलिस निरीक्षक आर. पी. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जिल्हादंडाधिकाऱयांच्या बंगल्याला लोखंडी कंपाउंड आहे. परंतु, अब्दुल हसन यांची शेळी कंपाऊंडवरून उडी मारून बंगल्यात ‘घुसखोरी‘ करत होती. शेळी बागेतील काही गवतही खात होती. बागेची देखभाल करणाऱ्या नोकराने हसन यांच्याकडे शेळीची तक्रार केली होती. मात्र, शेळी बागेत प्रवेश करून गवत खातच होती. यामुळे नोकराने थेट जिल्हादंडाधिकाऱयांनाच याबाबतची माहिती दिली. जिल्हाधिकारयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सांगून शेळीला अटक करण्याचे आदेश दिले. यामुळे शेळीला अटक करण्यात आली आहे.‘ ‘पोलिसांनी शेळीला अटक केल्यामुळे पोलिस चौकीत गेलो. पोलिसांनी मलाही ताब्यात घेऊन दंड केला आहे,‘ असे हसन यांनी सांगितले.
============================================================
"व्हॅलेंटाईन डे'ला पुरुषांचा खर्च महिलांपेक्षा जास्त!
येत्या 14 फेब्रुवारी रोजी असलेला "व्हॅलेंटाईन डे‘ साजरा करण्यासंदर्भातील वाढत्या आकर्षणाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या एका अभ्यासमोहिमेमध्ये या दिवशी महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खर्च करत असल्याचे आढळून आले आहे.
गिफ्टईज डॉट कॉम या एका भेटवस्तुंचे पोर्टल असलेल्या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये पुरुष ते प्रेम असलेल्या महिलांच्या कौतुकासाठी जास्त पैसे खर्च करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वेक्षणांतर्गत 18 ते 45 या वयोगटातील 3000 जणांचे मत "व्हॅलेंटाईन डे‘संदर्भात जाणून घेण्यात आले. या अभ्यासाद्वारे पुरुषांची भेटवस्तुंच्या खरेदीसाठी सरासरी 740 रुपये; तर महिलांची सरासरी 670 रुपये खर्च करण्याची तयारी असल्याचे दिसून आले.
""व्हॅलेंटाईन डे साजरा करणे हे आता केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नसून छोटी शहरे, गावांमध्येही हा प्रकार मूळ धरु लागला आहे. भेटवस्तुंमध्ये पांढरी फुले व चॉकलेट्सला प्राधान्य असले; तरी इतर "नॉटी गिफ्ट्स‘ प्रकारातील भेटवस्तुंनाही वाढती मागणी आहे,‘‘ असे या संस्थेचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिश चंदानी यांनी सांगितले.
============================================================
किरीट सोमय्यांनी पराचा कावळा केला : भुजबळ
मुंबई : महाराष्ट्र सदन किंवा कलिना भूंखडप्रकरणात कोणताही घोटाळा झालेला नाही. भाजप नेते किरीट सोमय्यांनी पराचा कावळा केला आहे. आम्ही एसीबीला पूर्ण सहकार्य करत आहोत, मात्र तरीही आम्ही सहकार्य करत नसल्याचा दावा करून, अटकेचा फार्स का केला जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला.
पुतणे समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर छगन भुजबळ अमेरिकहून आज परतले आहेत. त्यानंतर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळ कुटुंबीयांवरील सर्व आरोप फेटाळून लावले.
============================================================आदर्श प्रकरणी खा.अशोकराव चव्हाण यांच्यावरील चौकशीचे आदेश रद्द करावे - मा.आ.बेटमोगरेकर
" मा.आ.बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा ईशारा "
मुखेड :-
राज्यात काँग्रेसचा वाढता प्रभाव पाहुन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात भाजपा सरकार सुडबुध्दीचे राजकारण करत आदर्श प्रकरणी सीबीआयवर दबाव आणून पुन्हा हा प्रकार उकरुन खा.चव्हाण वर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी मुखेड तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. तद् नंतर आदर्श प्रकरणी खा.चव्हाण यांच्यावरिल चौकशीचे अादेश रद्द करावे यामागणीचे निवेदन मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना देण्यात आले.
याप्रसंगी मा.आ.बेटमोगरेकर म्हणाले की, कृतीशुन्य ठरलेल्या भाजपा सरकारने आपले अपयश झाकण्याकरीता आदर्श प्रकरणात निर्दोष असलेल्या माजी खा.अशोकराव चव्हाण यांची पुन्हा चौकशीची फाईल सीबीआय कडे देण्याचे षडयंत्र करीत आहे. तत्कालीन राज्यपालांनी आदर्श प्रकरणी खा.अशोकराव चव्हाण यांना 'क्लिन चिट' दिलेली असतनाही काँग्रेस पक्षाची घौडदौड पाहुन राजकीय सुडबुध्दीने भाजपा सरकार आदर्श प्रकरणी खा.चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याप्रकरणी खा.चव्हाण यांची चौकशी रद्द करण्यात यावी अन्यथा काँग्रेस कमेटीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगीतले. शासनाच्या या कार्यवाहीचा निषेध करीत मा.राज्यपाल यांना तहसीलदार मार्फत निवेदन पाठविण्यात आले. खा.चव्हाण यांच्या विरोधातील चौकशी रद्द करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर सह तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, तालुका सरचिटणिस श्रावण रँपनवाड, प्रवक्ता दिलीप कोडगीरे, उत्तमअण्णा चौधरी, माधवराव पा.वडजे, राजु पाटील रावणगावकर, हैदर परदेशी, संजय पा.बोमनाळीकर, युवक तालुकाध्यक्ष गोटू पाटील बिल्लाळीकर, सुरेश पाटील बेळीकर, दिगांबर पाटील गोजेगावकर, महावीर शिवपुजे, विश्वांभर पा मसलगेकर, खाजा धुंदी, अखिल येवतीकर, रमजान सौदागर, मोहन तुरटवाड, मारोती घाटे, पंकज गायकवाड़, ज्ञानेश्वर वडजे उंद्रीकर, नागनाथ पाटील बेळीकर, गोविंद भालके, इमरान पठाण, बाळु आकुलवाड सह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment