Sunday, 7 February 2016

नमस्कार लाईव्ह ०७-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 

१- २६/११ हल्ला प्रकरणात डेव्हिड हेडलीची व्हिडीओ लिंकवरुन साक्ष 

२- इसिसचा दहशतवाद रोखणार माहीम दर्ग्याचा अ‍ॅप 

३- शनिशिंगणापूरमध्ये चौथ-यावर पूजा-याशिवाय कोणी जाणार नाही, दोन्ही बाजूंमध्ये सहमतीने हा निर्णय -श्री.श्री.रविशंकर 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

४- औरंगाबाद; महापालिकेचा हलगर्जीपणा, खोदलेल्या नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू 

५- उल्हासनगर; ATM फोडताना चोरटा रंगेहाथ अटक, सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई 

६- मुंबई; यापुढे बेकायदा बांधकामांना २०० टक्के दंड 

७- मुंबईत अंधेरी विमानतळाजवळ पोलीस-अारोपीत गोळीबार, आरोपीचा मृत्यू 

८- हेल्मेटसक्ती ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी- दिवाकर रावते  

९- शिवसेनेकडून पुण्यात हेल्मेटची अंतयात्रा  

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१०- अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार 

११- शीर नसलेला तो मृतदेह अभिनेत्री सासीरेखाचा, नव-याला अटक 

१२- मुंबई; चेंबूरमधील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, 7 तरुणींची सुटका

१३- चेंबुर; हाय प्रोफाईल मसाज सेंटरवर छापा, 9 जणांना अटक 

१४- जळगाव रावेर तालुक्यात तामसवाडीमध्ये दरड कोसळून दोन कामगार ठार 

१५- नांदेड; बोन्डार येथे युवकाचा खून, मयत इसम बारडचा रहिवासी, खुनाचे कारण अस्पष्ट 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

१६- आयपीएलमुळे फॅक्टरी कामागाराचा मुलगा नाथू करोडपती 

१७- कोण म्हणतं रणबीरशी ब्रेकअप झालंय- कतरिना 

१८- स्वतःच्याच बॉडीगार्डवर सलमानने हात उचलला 

१९- शेन वॉटसन ठरला धनकुबेर 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आपण काय आहोत, यावरून आपली किंमत ठरते. आपल्याकडे काय आहे, यावरून नव्हे

(गजानन नरवाडे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~

विकणे आहे 

भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.

संपर्क- 7350625656

~~~~~~~~~~~~~~~~~~~

घरांची आर्टिफिशिअल सजावट 

फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://goo.gl/lE9S67

**********************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.

http://goo.gl/uS8DX4

====================================================

औरंगाबाद महापालिकेचा हलगर्जीपणा, खोदलेल्या नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

औरंगाबाद महापालिकेचा हलगर्जीपणा, खोदलेल्या नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
औरंगाबाद औरंगाबाद महापालिका आणि कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे 8 वर्षीय चिमुरड्य़ाचा जीव गेला आहे. ही घटना काचीवाड्याच्या धोबीघाट परिसरात घडली. आनंद बाळकृष्ण जाधव असं मृत मुलाचं नाव आहे. 
भूमिगत गटारासाठी खोदलेल्या खडड्ड्यात पडून आनंदचा मृत्यू झाला. आनंद शनिवारपासून बेपत्ता होता. आज पहाटे नाल्यात त्याचा मृतदेह सापडला. 
गेल्या 3 महिन्यांपासून खोदलेल्या गटाराचं काम बंद असून पालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला.
====================================================

उल्हासनगर; ATM फोडताना चोरटा रंगेहाथ अटक, सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई

उल्हासनगरात ATM फोडताना चोरटा रंगेहाथ अटक, सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई
उल्हासनगर उल्हासनगरमधल्या कॅम्प क्रमांक 3 मधून आयसीआयसी बँकेचं एटीएम फोडत असताना चोरट्याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. 
प्रदीप आयवर असं या 18 वर्षीय चोरट्याचं नाव आहे. तो छत्तीसगडमधला रहिवाशी असल्याची माहिती मिळते आहे. उल्हासनगरमधील मिठाईच्या दुकानात काम करतो 
उल्हासनगरमधल्या खरडमल चौकात असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजता एक युवक एटीएम फोडत होता. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमधून बँकेच्या कंट्रोलरुमध्ये दिसल्यानंतर ही बाब पोलिसांना लक्षात आणून दिली. त्यानंतर काही मिनिटात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी चोराला अटक केली.
====================================================

अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार


अंधेरी येथील विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत गुडगावमधील कुख्यात गुंड संदीप गडोली ठार झाला. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संदीपवर हरयाणा पोलिसांनी सव्वालाखाचे इनाम ठेवले होते. 
संदीपच्या शोधात हरयाणा पोलिस मुंबईत दाखल झाले. संदीप गडोली अंधेरीतील विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये लपला असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई पोलिसांसह हरयाणा पोलिस संदीप रहात असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले. पोलिस संदीपच्या रुमजवळ पोहोचताच त्याने गोळीबार सुरु केला. 
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संदीप गंभीर जखमी झाला. जखमी संदीपला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. संदीपने केलेल्या गोळीबारात दोन पोलिस जखमी झाले. सकाळी साडेअकराच्या सुमारासा अंधेरी पूर्वेला विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये ही चकमक झाली. 
====================================================

आयपीएलमुळे फॅक्टरी कामागाराचा मुलगा नाथू करोडपती


इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर आतापर्यंत बरीच टीका झाली असली तरी, या स्पर्धेने अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून दिल्याचे नाकारता येणार नाही. आयपीएलमध्ये पैशांचा जो वापर होतो त्यावर टीका होत असली तरी, या स्पर्धेने अनेक गरजू क्रिकेटपटूंना 'अच्छे दिन'ही दाखवले आहेत. अशाच क्रिकेटपटूंपैकी एक आहे नाथू सिंह. 
आयपीएल स्पर्धेसाठी शनिवारी झालेल्या लिलावात राजस्थानातील फॅक्टरी कामागाराचा मुलगा असलेल्या नाथू सिंहला तब्बल तीन कोटी २० लाख रुपयांचा भाव मिळाला. नाथूला इतक्या रक्कमेला आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले आहे. 
वेगवान गोलंदाजीचा नाथूमध्ये असलेला स्पार्क सर्वप्रथम राहुल द्रविडने हेरला. त्यानंतर नाथूची प्रगती सुरु झाली. घरची परिस्थिती बेताची असलेल्या नाथूने प्रचंड मेहनतीने, कष्टाने इथवरचा टप्पा गाठला आहे. तो रहात असलेल्या मुरलीपुराच्या गल्लीमध्ये नाथूने टेनिस बॉलने गोलंदाजीला सुरुवात केली होती. 
आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन आपली क्षमता सिद्ध करायची. भारतीय संघात प्रवेश मिळवण्याचे आयपीएल एक व्यासपीठ आहे असे नाथूने सांगितले. २०१५-१६ मध्ये रणजी करंडक स्पर्धे दरम्यान राजस्थानचा आघाडीचा गोलंदाज पंकज सिंह जायबंदी झाल्यानंतर नाथूला संधी मिळाली. तिथून नाथूचा प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरु झाला. 
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी इतकी प्रचंड रक्कम मिळाल्यानंतर आई-वडिल आणि भावासाठी मोठे घर बांधण्याची इच्छा नाथूने व्यक्त केली आहे. 
====================================================

शीर नसलेला तो मृतदेह अभिनेत्री सासीरेखाचा, नव-याला अटक


महिन्याभरापूर्वी चेन्नईत कचराकुंडीजवळ शीर नसलेला महिलेचा मृतदेह सापडला होता.  पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असून, हा मृतदेह दूरचित्रवाहिनी अभिनेत्री सासीरेखाचा आहे. ३६ वर्षीय सासीरेखाची पती रमेश आणि त्याची प्रेयसी लॉकिया या दोघांनी मिळून हत्या केली होती. 
पोलिसांनी दोघांना अटक करुन हत्या, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. चौकशीमध्ये रमेश आणि लॉकियाने सासीरेखाची हत्या केल्याची कबुली दिली. सासीरेखाची हत्या करुन तिचा मृतदेह दोन ठिकाणी टाकल्याचे त्यांनी सांगितले. 
सासीरेखाच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. रमेशला व्यवसायात मोठा तोटा झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी आणि पालकांनी आत्महत्या करुन जीवन संपवले. त्यानंतर तो अभिनयाच्या क्षेत्राकडे वळला. 
रमेश आणि लॉकिया २०१२ पासून एकत्र रहात होते. चित्रपटात काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन रमेशने अनेकांकडून पैसे उकळले होते. लॉकियासोबत प्रेम प्रकरण सुरु असतानाचे त्याची सासीरेखाबरोबर ओळख झाली. 
सासीरेखाला आठवर्षांचा मुलगा होता. ऑगस्ट २०१५ मध्ये त्यांनी लग्न केले. सासीरेखाबरोबर वाद सुरु झाल्यानंतर तो पुन्हा लॉकियाबरोबर राहू लागला. 
====================================================
कोण म्हणतं रणबीरशी ब्रेकअप झालंय- कतरिना

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचे ब्रेकअप झाले असल्याची चर्चा सर्वत्र आहे. मात्र, हे ‘अजब प्रेम‘ कधी झालेच नव्हते अशी ‘गजब कहानी‘ कतरिना सांगत आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रणबीरबद्दल विचारल्यावर कतरिना म्हणाली, "कोण म्हणतं माझा रणबीरशी ब्रेकअप झाला आहे. हा प्रश्नच चुकीचा आहे. रणबीरशी माझे ब्रेकअपही झाले नाही, कारण मी रणबीरसोबत कधी रिलेशनशिपमध्ये नव्हतेच. ते नाते संपल्याची चर्चा व्यर्थ आहे."
बॉलिवूडसंबंधी एका संकेतस्थळाने अलीकडेच रणबीर-कतरिना वेगळे झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. "त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु तसे जमले नाही. त्यांच्यातील मतभेद संपणार नाहीत हे त्यांनी समजून घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला," असे सूत्रांनी सांगितले. 
रणबीर नुकताच कतरिनाच्या घरातून आई-वडिलांसोबत राहायला गेला. परंतु, ती रणबीरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती हे उघड गुपीत होते. ब्रिटिश-भारतीय असलेल्या 32 वर्षीय कॅटने प्रथमच रणबीरसंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केली. कतरिनाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ती सिंगल आहे. 
====================================================
शेन वॉटसन ठरला धनकुबेर 

बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगच्या नवव्या सत्रातील लिलावातही क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसन या लिलावातील सर्वाधिक धनकुबेर क्रिकेटपटू ठरला. त्याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ कोटी ५० लाख रुपये मोजले. दुसरीकडे हिंदुस्थानच्या अष्टपैलू युवराज सिंगची पत यंदाच्या लिलावात निम्म्याहून अधिक किमतीने घसरली. त्याला सनरायझर्स हैदराबादने ७ कोटी रुपयांत खरेदी केले. गतवर्षी युवीला सर्वाधिक १६ कोटी रुपये भाव मिळाला होता. असे असताना दिल्लीचा अष्टपैलू पवन नेगीला ८ कोटी ५० लाख रुपयांची लॉटरी लागली. हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरलेल्या पवन नेगीला दिल्ली डेअरडेविल्सने खरेदी केले. किंग्स इलेव्हन पंजाबने हरयाणाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मासाठी ६ कोटी ५० लाख रुपये मोजले. वेगवान गोलंदाज आशीष नेहराला सनरायझर्स हैदराबादने ५ कोटी ५० लाख रुपयांना विकत घेतले. यंदाच्या आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या पुणे सुपरजाईट्स संघाने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श (४ कोटी ८० लाख), मुरूगन अश्‍विन (४ कोटी ५० लाख), वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा (३ कोटी ८० लाख) व केविन पीटरसन (३ कोटी ५० लाख) या महत्त्वाच्या खेळाडूंना खरेदी करण्यात यश मिळविले. 
====================================================
मुंबई; यापुढे बेकायदा बांधकामांना २०० टक्के दंड

मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) – मुंबईत वाढत चाललेल्या बेकायदा बांधकामांना चाप लावण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. ही बेकायदा बांधकामे शोधण्यासाठी पालिका ‘लीडार सर्व्हे’ करणार आहे. तसेच बेकायदा बांधकामांवर २०० टक्के दंड ठोठावला जाणार आहे. त्याचबरोबर एखाद्या प्रभागात अनधिकृत बांधकाम वाढल्यास त्याला सहाय्यक आयुक्त जबाबदार राहणार आहेत. महापालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी काटकसर करण्याबरोबरच उत्पन्नाचे विविध स्रोत वाढवण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सध्या असलेल्या बेकायदा बांधकामांवर दंड आकारून महसूल वाढवण्याबरोबरच ‘छूप छूप के’ होणार्‍या बांधकामांना आळा घालण्याचा निर्धार केला आहे. सध्या बेकायदा बांधकामांकडून वर्षाला जितका दंड वसूल केला जातो त्याच्या २०० पट दंड आकारण्यात येणार आहे. या दंडाची पावती पालिकेने दिली तरी बांधकामे मात्र अधिकृत होणार नाहीत. 
====================================================
इसिसचा दहशतवाद रोखणार माहीम दर्ग्याचा अ‍ॅप

मुंबई, दि. ६ – इसिसच्या जाळ्यात अडकणार्‍या मुस्लिम तरुणांना रोखण्यासाठी आता थेट माहीमच्या हजरत मकदूम फकीअली माहीम दर्ग्याने कंबर कसली आहे. ‘इसिस’च्या वाढत्या दहशतवादी कारवायांचा अंत करण्यासाठी माहीम पीर मकदूमसाहब चॅरिटेबल ट्रस्टने एक अ‍ॅप बनवला आहे. इसिसकडून मुसलमान तरुणांची होणारी दिशाभूल रोखण्याचे आणि त्यांना दहशतवादी कारवायांपासून परावृत्त करण्याचे काम या अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येणार असून गेल्या पाच दिवसांत तब्बल पाचशेहून अधिक तरुणांनी हा अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. इसिसने जगभरात आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली असून त्यांच्या दहशतवादी कारवायांचा विळखा महाराष्ट्रालााही पडू लागला आहे. सोशल मीडिया आणि वेबसाइटच्या माध्यमातून इसिसने मुस्लिम तरुणांची भरती सुरू केली आहे. मुंबईसह देशातील मुस्लिम तरुण ‘इसिस’च्या या जाळ्यात अडकले असून इसिसच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करण्यासाठी निघालेल्या २१ तरुणांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. इसिसला रोखण्यासाठी आणि त्यांच्या जाळ्यात मुस्लिम तरुण अडकू नये यासाठी माहीम दर्गा ट्रस्टने ‘माहीम दर्गा’ नावाने एक मोबाईल अ‍ॅप बनवला आहे. प्रत्येक मुस्लिम तरुणाकडे मोबाईल असतो हीच बाब लक्षात घेऊन हा मोबाईल अ‍ॅप बनविल्याचे ट्रस्टचे आयटी विभागाचे संचालक साबीर सय्यद यांनी सांगितले. या अ‍ॅपच्या माध्यमातून माहीम दर्ग्याच्या उपक्रमांबाबतही मुस्लिमांना माहिती उपलब्ध होणार आहे. 
====================================================

स्वतःच्याच बॉडीगार्डवर सलमानने हात उचलला



मुंबई : अभिनेता सलमान खान बॉलिवूडमध्ये जितका त्याच्या दिलदारपणासाठी प्रसिद्ध आहे, तितकंच सलमानचा राग अनावर झाल्याने त्याने काढलेल्या खरडपट्टीचे किस्सेही चवीने चघळले जातात. यावेळी मात्र सलमानच्या बॉडीगार्डलाच त्याची चपराक खावी लागली. 
स्पॉटबॉय.कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार सलमानने त्याच्या अंगरक्षकांवरच हात उचलला. अभिनेत्री प्रिटी झिंटाच्या बर्थडे पार्टीनंतर सल्लू सुझान खान आणि प्रिटीला निरोप देत होता. त्यावेळी माध्यमातील काही प्रतिनिधी त्याच्या जवळ येऊन ठेपले. यावेळी बॉडीगार्डने त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला असता सलमानने बॉडीगार्डला चपराक लगावली. 
काहीच महिन्यांपूर्वी सलमानच्या एका बॉडीगार्डने मीडियाच्या प्रतिनिधीसोबत गैरवर्तन केलं होतं आणि मीडियाने सलमानवर बहिष्कार टाकला. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सलमानने स्वतःच्याच बॉडीगार्डवर हात उचलला.
====================================================

मुंबईत अंधेरी विमानतळाजवळ पोलीस-अारोपीत गोळीबार, आरोपीचा मृत्यू


मुंबई : मुंबईत एअरपोर्टजवळ गुडगाव क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि आरोपी यांच्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला आहे. संदीप गडोली असं या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पकडण्यासाठी गुडगाव क्राईम ब्रँचची टीम खास मुंबईत आली होती. 
एअरपोर्टजवळच्या एका हॉटेलमध्ये हा आरोपी राहत असल्याची माहिती या टीमला मिळाली. त्यानुसार क्रांईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या रूममध्ये प्रवेश केला. त्यावेळी आरोपीनं क्राईम ब्रँचच्या टीमवर गोळीबार केला. यात आरोपी संदीम गडोली हा गंभीर जखमी झाला. 
जखमी आरोपी संदीप गडोलीला गोळीबारानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
====================================================

मुंबईत चेंबूरमधील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, 7 तरुणींची सुटका


मुंबई : मुंबईतल्या चेंबूर परिसरात तंत्र स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत 7 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. यापैकी 6 तरुणी थायलंडच्या असल्याची माहिती मिळते आहे. 
तंत्र या स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 
थायलंडच्या सहा तरुणींना स्पा सेंटरमध्ये काम करण्यासाठी भारतात आणलं होतं. पोलिसांनी स्पा सेंटरचे 3 मॅनेजर आणि एका दलालला अटक केली असून पीटा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सातही तरुणींना महिला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
====================================================
हेल्मेटसक्ती ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी- दिवाकर रावते 

राज्यात झालेल्या हेल्मेट सक्तीला पुण्यामध्ये जोरदार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर हेल्मेट विरोधक आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामध्ये बैठक झाली. पण हेल्मेट सक्तीवर दिवाकर रावते ठाम आहेत. हेल्मेट सक्ती ही फक्त पुण्यात नाही, तर संपूर्ण राज्यात आहे, अशी प्रतिक्रिया दिवाकर रावतेंनी या बैठकीत दिली आहे.
हेल्मेटसक्तीबाबत पुणेकरांच्या भावना समजून घेण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज (रविवारी) तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत, पुण्यात हेल्मेटसक्ती कायम असली तरी मात्र पुणेकरांच्या भावना कोर्टापर्यंत पोहोचवणार असल्याचं रावतेंनी स्पष्ट केलं आहे. त्याचंबरोबर, हेल्मेटची आवश्यकता पुणेकरांनी नाकारली नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
====================================================
शिवसेनेकडून पुण्यात हेल्मेटची अंतयात्रा 

हेल्मेट सक्तीविरोधात शिवसेनेने पुण्यात हेल्मेटची अंतयात्रा काढून राज्य सरकारला घरचा आहेर दिला. आधी रस्ते चांगले करा, असं म्हणत शिवसैनिकांनी हेल्मेट सक्तीला जोरदार विरोध दर्शवला. पुण्यात हेल्मेटसक्तीला जोरदार विरोध करण्यात येत आहे. भाजपा, राष्ट्रवादी आणि मनसेने हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवला. त्यानंतर आज पुण्यात शिवसेनाही हेल्मेट सक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरली. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली हेल्मेटची अंत्ययात्रा काढून या सक्तीचा निषेध नोंदवण्यात आला. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हेल्मेट सक्ती करू नये, यासाठी पोलिसांना आदेश द्यावेत, अशी मागणी बाबर यांनी केली आहे. तसंच मृत्यू हा फक्त हेल्मेट न घातल्याने होत नसल्याचं सांगत चांगले रस्ते बांधण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.तर दुसरीकडे निगडी इथे शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी हेल्मेट परिधान करून आंदोलन करत हेल्मेट सक्तीचे जोरदार समर्थन केलं. तसंच आधी जनजागृती करावी. त्यानंतरच हेल्मेट सक्ती करावी, या मागणीचं निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिलं आहे.
====================================================
चेंबुरमध्ये हाय प्रोफाईल मसाज सेंटरवर छापा, 9 जणांना अटक 

चेंबुरमध्ये हाय प्रोफाईल स्पा मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. यात 6 विदेशी मुलींसह 7 मुलींची सुटका करण्यात आली. स्पाच्या नावाखाली तिथे वेश्याव्यवसाय सुरू होता, असा पोलिसांचा आरोप आहे. चेंबुरच्या प्रसिद्ध आणि उच्चभ्रू असलेल्या डायमंड गार्डनजवळ तंत्र थाई स्पा हे मसाज सेंटर सुरू होते. यात विदेशी मुलींकडून देहव्यापार करून घेतला जात होता. बिजनेस वीझाच्या नावाखाली या मुलींना थायलंडमधून आणण्यात आलं होतं. तंत्र थाई याच्या देशभरात 40च्या वर शाखा आहेत. या छाप्यात पोलिसांनी दलाल आणि दुकान मालक आणि कर्मच्यार्‍यांसह 9 जणांना अटक केली आहे. महिलांना चेंबुरच्या महिला सुधारगृहात पाठवण्यात आलं असून पुढील तपास चेंबुर पोलीस करत आहेत.
===============================================

२६/११ हल्ला प्रकरणात डेव्हिड हेडलीची व्हिडीओ लिंकवरुन साक्ष


मुंबईवरील भीषण अशा २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलोमन हेडलीची सोमवारी मुंबईच्या विशेष न्यायालयासमोर साक्ष होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत व्हिडीओ लिंकव्दारे हेडलीची साक्ष नोंदवण्यात येणार आहे अशी माहिती या खटल्याचे विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांनी दिली. 
भारताच्या कायदेशीर इतिहासात प्रथमच एक परदेशी दहशतवादी व्हिडीओ लिंकवरुन पुरावे देणार आहे आणि त्या पुराव्याची नोंद करण्यात येणार आहे. हेडलीची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण राहिल कारण त्यामुळे अजूनही माहित नसलेल्या या कटासंबंधीच्या अनेक गोष्टी उघड होतील असे निकम यांनी सांगितले. 
हेडलीकडून मिळणा-या पुराव्याचे महत्व अधोरेखित करताना निकम म्हणाले कि, हेडलीकडून मिळणारे पुरावे दोन कारणांसाठी महत्वपूर्ण आहेत. भारतातील एक दहशतवादी अबू जिंदाल पाकिस्तानात असून त्याच्या विरोधातील खटला प्रलंबित आहे. त्यामुळे हेडलीच्या साक्षीमुळे या खटल्याच्या सुनावणीवर व्यापक परिणाम होणार आहे 
तसेच हा कट का रचला ? तसेच या कटामागे कोणकोण आहेत त्यावरही प्रकाश पडणार आहे. २६/११ हल्ल्यापूर्वी हेडली भारतात येऊन संभाव्य हल्ला स्थळांची पाहणी करुन गेला होता. तो आता अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात आहे. 
==============================================



No comments: