[अंतरराष्ट्रीय]
१- नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली भारतदौ-यावर आले असून त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची घेतली भेट
२- महाराष्ट्रासह न्यूयॉर्कमध्येही शिवजयंती, शिवरायांच्या वैभवशाली इतिहासाचा जागर
३- पाकिस्तानच्या पॉर्न स्टारचा खळबळजनक खुलासा
४- दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला दहशतवादी कारवायांसाठी अमेरिकेत अटक
५- हायड्रोजन बॉम्बची चाचणी आणि त्यानंतर रॉकेटचे प्रक्षेपण करणाऱ्या उत्तर कोरियाविरुद्ध नवे निर्बंध
६- इस्रायलमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या भारतीय विद्यार्थ्याचे पार्थिव भारतात परत आणणार - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- हरियाणात जाट आरक्षणाला हिंसक वळण, तिघांचा मृत्यू
८- व्हायरल सत्य: कन्हैया देशभक्त की देशद्रोही, फोटो-व्हिडिओचं सत्य काय?
९- टीम इंडियाला मोठा धक्का, शमी आशिया चषक मालिकेतून बाहेर
१०- नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, राहूल गांधींची वाढली, पाहणीचा कौल
११- प्रख्यात शास्त्रज्ञ के. एन. व्यास यांची भाभा अणू संशोधन केंद्राच्या संचालकपदी निवड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- 'मुंबईत नवीन वाहन विक्रीवर बंदी आणा', वाहतूक विभागाची शिफारस
१३- रु. 251 किंमतीच्या स्मार्टफोनच्या वेबसाइटवर विक्री क्लोज्ड
१४- अरूणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट हटवली, कलिखो पूल नवे मुख्यमंत्री
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- पंढरपूर; कौठली या गावात घरोघरी शिवाजीराजे पुजले जातात
१६- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला, वाहतूक ठप्प
१७- भिमाशंकरला जाणारा ट्रक घाटात कोसळून चौघांचा मृत्यू, 35 जखमी
१६- शिवसेना खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी - जिल्हाप्रमुख भुजंग पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- विश्वविक्रम: शेवटच्या कसोटीत मॅक्युलमनं झळकावलं वेगवान शतक
१८- 'त्या' प्रश्नावर विराट कोहली भडकला
१९- स्वस्त मोबाइलसाठी 2 दिवसात 5 कोटी नोंदणी, कंपनीचा दावा
२०- मॅक्युलमनं मोडला विव्ह रिचर्डचा विक्रम, 54 चेंडूत 100
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
माणिक मोरे, गजानन पानपट्टे, महेश पाईकराव, सचिन खर्डेकर, विश्वास गुंडावार, व्ही.आर. पटेल, नयन पुडलवाड गुर्मिन्दर सिंग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
========================================

हायड्रोजन बॉम्बची चाचणी आणि त्यानंतर रॉकेटचे प्रक्षेपण करणाऱ्या उत्तर कोरियाविरुद्ध नवे निर्बंध
========================================
शिवसेना खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी - जिल्हाप्रमुख भुजंग पाटील
" शिवसेना खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी - जिल्हाप्रमुख भुजंग पाटील "
' मुखेड तालुक्यात सर्कल निहाय बैठक संपन्न "
मुखेड :-
शिवसेनेने आज पर्यंत राजकारण कमी व समाजकारण जास्त केला आहे. सध्या शेतकरी दुष्काळामुळे होरपळला असुन शेतक-यांनी हिम्मत सोडु नये शिवसेना शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे असे मत जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी युवासेना जिल्हा युवा अधिकारी विक्रम साबणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य व्यंकट लोहबंदे, तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनुरकर, गंगाधर पिटलेवाड, मनोज गौंड, शंकर पाटील लुट्टे आदींनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
मुखेड तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजीत जाहूर, येवती येथे सर्कल निहाय बैठकीत ते बोलत होते. दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या मदत व्हावी या हेतुने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शासनाचा मदत न घेता शेतक-यांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अमलात आणली असुन, आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांच्या मुलिंचे मोफत लग्न लावुन देण्यात येणार आहे. तेव्हा गरजु शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाप्रमुख भुजंग पाटील केले आहे. याबैठकीस शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावुन आपल्या अडीअडचणी व्यक्त केल्या. येवती येथील बैठकीस सर्कल प्रमुख पंढरी पाटील येवतीकर, डाँ.कोंडिबा सुडके, लक्ष्मण पाटील गोपनर, रमेश सुरावाड, संतोष सोमावार, बालाजी गोपनर, गंगाधर सुडके आदी उपस्थित होते. तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील येवती, जाहुर, मुक्रमाबाद, बा-हाळी येथे जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्कल निहाय बैठका घेण्यात आले. यावेळी युवासेनेचे विक्रम साबणे, तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुरकर, व्यंकट लोहबंदे, शहर प्रमुख नागनाथ लोखंडे, संघटक राजु गंदपवाड, पवन पोतदार, कृष्णा कामजे, कैलास बेळीकर सह शिवसैनिक उपस्थित होते.

पंढरपूर; कौठली या गावात घरोघरी शिवाजीराजे पुजले जातात
पंढरपूर: महाराष्ट्राचा सन्मानबिंदू असलेल्या रयतेच्या हृदयावर ३८६ वर्षे राज्य करणाऱ्या राजांची जयंती जगभर साजरी केली जाते. पण पंढरपूर तालुक्यातील कौठाळी हे राज्यात एकमेव गाव आहे जिथे राजाला घरोघरी देव्हाऱ्यात ठेऊन पूजलं जातं.
जात धर्म पंथ यांच्या कक्षा मोडून इथं प्रत्येक घरात शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपतींच्या वर जीवापाड प्रेम करणारा हा गाव तसा ८०० घरांचाच. यात हिंदू असो किंवा मुस्लिम समाजातील घरातही शिवाजी महाराजांची जयंती सोहळा मनापासून साजरा केला जातो .
महाराजांची जयंती हे गाव तिथी आणि तारखेच्या वादात न पडता सरकारी तारखेनुसारच साजरी करते. गावात घरोघरी रांगोळ्या काढून या उत्सवाची सुरुवात होते. घरांच्यावर महाराजांचा भगवा ध्वज लावण्यात येतो. घरात देवाच्या देव्हाऱ्याजवळ महाराजांच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन सहकुटुंब केले जाते. घरात या दिवशी सणाप्रमाणे गोडधोड बनवलं जात. गावातील बच्चे कंपनी याच दिवशी घरासमोर किल्ले बनवतात. महाराजांच्या जयंती साजरी करताना त्यांचे विचार आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे गावकरी जावेद इनामदार सांगतात.
कौठाळी गावातील सार्वजिक शिवजयंती सोहळा देखील आगळावेगळ्या पद्धतीने साजरा होतो. राज्य सरकार महाराजांचे समुद्रात स्मारक बनविण्याच्या तयारीत असताना यावर्षी गावकऱ्यांनीही चंद्रभागेच्या पात्रात तरंगते शिवमंदिर उभारून यात महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. नदी मध्ये कार्डबोर्ड, छापड्या व इतर साहित्याच्या सहाय्याने किल्ला बनवून त्याच्या खाली मोकळी पिपे जोडून तरंगणारे सुरेख मंदिर बनविण्यात आले आहे. या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाला देखील पाण्यातून होडीमध्ये बसून जावं लागतं
हरियाणात जाट आरक्षणाला हिंसक वळण, तिघांचा मृत्यू
– हरियाणात जाट आरक्षणाला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, सुषमा जेटली, अरूण जेटली, मनोहर पर्रिकर हे मंत्री या बैठकीला उपस्थित होते. आंदोलन रोखण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे सुद्धा या बैठकीला हजर होते.
– हरियाणातून सुटणाऱ्या 500 रेल्वे गाड्या रद्द, शहरातील अनेक शाळा-महाविद्यालये बंद
हरियाणा: आरक्षणाच्या मुद्द्यावरून हरियाणातील जाट समाजानं पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहतकमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे तर 61 जण जखमी झाले आहेत. तब्बल 23 जणांना पोलिसांच्या गोळ्या लागल्या आहेत. तरीही आंदोलकांनी आंदोलनाची धार कमी झालेली नाही
रोहतक आणि भिवानीमध्ये परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर जाऊ यासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच लष्करालाही पाचारण करण्यात आलं असून कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी ते प्रशासनाला मदत करतील.
दरम्यान, आंदोलकांनी हरियाणातले मंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घरावर हल्ला चढवला तसेच त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न केला. तर भाजप आमदार मनीष ग्रोवर यांचं घर पेटवून दिलं. तसेच रोहतक-दिल्ली मार्गावर आंदोलकांनी पोलिसांची एक जीपही पेटवून दिली. आंदोलनाचे लोण इतरत्र पसरू नये, यासाठी रोहतक जिल्ह्यामधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
विश्वविक्रम: शेवटच्या कसोटीत मॅक्युलमनं झळकावलं वेगवान शतक
ख्रिस्टचर्च (न्यूझीलंड): आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या ब्रँडन मॅक्युलमनं अक्षरश: वादळी खेळी केली. या स्फोटक फलंदाजाची ही खेळी क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच लक्षात ठेवली जाईल.
ब्रँडन मॅक्युलम या वादळी खेळाडूनं आपल्या शेवटच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक जलद शतक ठोकण्याचा भीम पराक्रम केला आहे. मॅक्युलमने अवघ्या 54 चेंडूत शतक ठोकून 30 वर्षापूर्वीचा सर रिचर्ड्स यांचा विक्रम मोडीत काढला. आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणाऱ्या मॅक्युलमने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हा विक्रम रचला.
मॅक्युलमनं आपल्या या स्फोटक खेळीत अवघ्या 79 चेंडूत 145 धावा केल्या. ज्यामध्ये 21 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. मॅक्युलमनं आपलं अर्धशतक 34 चेंडूमध्ये पूर्ण केलं तर त्यानं पुढील 50 धावा अवघ्या 20 चेंडूतचं केले. त्यानं 54 चेंडूतमध्येच शतकाला गवसणी घातली. ज्यामध्ये 16 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
मॅक्युलम 78 मिनिटं मैदानावर होता. वेळेच्या बाबतीत कसोटी क्रिकेटमधील हे चौथं वेगवान शतक आहे. वेळाचा बाबतीत ऑस्ट्रेलियाचा जीएम ग्रेगरी याचा पहिला क्रमांक लागतो. त्यानं 1921 साली 70 मिनिटात शतक झळकावलं होतं.
'त्या' प्रश्नावर विराट कोहली भडकला
मुंबई: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत असणाऱ्या नात्याबाबत खुलेपणानं बोलायचा. इतकंच नव्हे तर, मैदानात शतक ठोकल्यानंतर समोर बसलेल्या अनुष्काला फ्लाइंग किस देण्यासही तो मागेपुढे पाहत नसे. पण आता विराट मात्र, बॉलिवूडच्या प्रश्नांवर चांगलाच भडकतो.
मुंबईत एका घडळ्याचा प्रमोशनसाठी विराट आला होता. त्याचवेळी पत्रकार परिषदेमध्ये त्याला त्याच्या रिलेशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी विराट चांगलाच भडकला. ‘मी काही सल्लागार नाही. तुम्ही कोणाबाबतच्या रिलेशनविषयी मला विचारता आहात? मी कोणाचाही सल्लागार नाही. हा प्रश्न तुम्ही मला नको विचारायला नको होता.’ असं म्हणत विराटनं आपला राग व्यक्त केला.
याच वेळी विराटला असाही प्रश्न विचारण्यात आला की, अशाप्रकारचं घड्याळ त्याला बॉलिवूडमध्ये सगळ्यात आधी गिफ्ट द्यायचं असल्यास तो कोणाला देईल. या प्रश्नाला देखील विराटनं सरळसरळ उत्तर दिलं नाही. विराट म्हणाला की, ‘हे घड्याळ मी सगळ्यात आधी आमच्या कुटुंबातील कोणाला तरी भेट देईल. पण मला कळत नाही तुम्ही मला असे प्रश्न का विचारत आहात? इथं या प्रश्नांचा काहीही संबंध नाही. असं म्हणत विराटनं त्या प्रश्नाला बगल दिली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला, वाहतूक ठप्प
लोणावळा: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तेलाचा एक टँकर उलटल्यानं येथील दोन्ही लेनवरील वाहतूक ठप्प झाल्याचे प्राथमिक वृत्त समजते आहे. एक्सप्रेस वेच्या खंडाळा एक्झिटजवळच हा टँकर उलटला आहे.
एक्सप्रेस वेवर तेलाचा टँकर उलटल्यानं मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही लेनवर ऑइल पसरलं आहे. त्यामुळे सुरक्षेची उपाययोजना म्हणून एक्सप्रेस वेवरील वाहतूक बंद करण्यात आली असून ही वाहतूक जुन्या मुंबई-पुणे हायवेवर वळविण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे खोपोली आणि लोणावळाजवळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे.
दरम्यान, वीकेंड असल्यानं मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची अधिक गर्दी असते त्यातच वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्ववत साधारण एका तासाचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
'मुंबईत नवीन वाहन विक्रीवर बंदी आणा', वाहतूक विभागाची शिफारस
मुंबई: देशाची राजधानी दिल्लीमधील प्रदूषण आणि ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी ऑड-इव्हन फॉर्म्युलाचा प्रयोग सुरू आहे. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ट्रॅफिक आणि प्रदूषणाच्या समस्येचं काय?, असा सवाल अनेक दिवसांपासून विचारला जातो आहे. याच धर्तीवर मुंबई महापालिकेनं सीएमपी म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव मोबॅलिटी प्लॅन सादर केला आहे.
मुंबईत नव्या वाहनांच्या विक्रीवर बंदी घाला, वर्षाकाठी विक्री होणाऱ्या वाहनांची संख्या निश्चित करा आणि पार्किंगची व्यवस्था असणाऱ्यांनाचवाहन खरेदीची परवानगी द्या. मुंबईतील प्रदूषणाची आणि ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी हे उपाय सुचवण्यात आले आहेत.
मुंबई महागनरपालिकेनं नेमलेल्या सल्लागारांनी दोन वर्षांच्या सर्वेक्षणानंतर कॉम्प्रेहेन्सिव मोबॅलिटी प्लॅन सादर केला आहे. प्रदूषण आणि ट्रॅफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राजधानीत ऑड-इव्हन फॉर्म्युल्याचा प्रयोग सुरू आहे. त्याच धर्तीवर मुंबईत देखील तातडीची उपाययोजना करण्याची गरज आहे.
मुंबई महापालिकेचा कॉम्प्रेहेन्सिव मोबॅलिटी प्लॅन एमएमआरडीएकडे पाठवण्यात आला आहे. वाहतूक आराखडा करताना एमएमआरडीए या प्लॅनचा विचार करू शकते. मात्र, या प्लॅनची अंमलबजावणी करायची की नाही हे सरकारच्या हातात असणार आहे. तसंच या प्लॅनच्या योग्य अंमलबजावणीसाठी एमएमआरडीए, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये समन्वय असणं देखील तेवढंच गरजेचं आहे.
भिमाशंकरला जाणारा ट्रक घाटात कोसळून चौघांचा मृत्यू, 35 जखमी
पुणे: भिमाशंकरला जाताना पुण्याजवळील शिरुर येथील मंदोशी घाटात एक ट्रक खाली कोसळून भीषण अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त समजतं आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 35 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती समजते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटातून जात असताना चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक घाटातून थेट खाली कोसळला. या अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या ट्रकमध्ये वारकरी मंडळी होती. ही वारकरी मंडळी भिमाशंकरला दर्शनासाठी जाताना हा अपघात घडला.
हा अपघात एवढा भीषण होता की, यामधील चार जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. सध्या जखमींना मंचरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रासह न्यूयॉर्कमध्येही शिवजयंती, शिवरायांच्या वैभवशाली इतिहासाचा जागर
मुंबई: जाणता राजा म्हणून ज्यांचा गौरव केला जातो अशा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. शिवजयंतीचा उत्सव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर सातासमुद्रापार न्यूयॉर्कमध्ये देखील साजरा करण्यात आला. हर हर महादेवच्या गर्जना ऐकून शिवनेरी पासून लाल किल्ल्यांपर्यंत सर्व ऐतिहासिक वास्तू शहारल्या.
अफगाण, मुघल, पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या लुटारू नजरा देशावर असताना, आई जिजाऊच्या पोटी तेजस्वी सूर्य जन्माला आला. नाव शिवबा…
शिवनेरी: हा दिवस नसता तर कदाचित आपला इतिहास काहीतरी वेगळाच असता आणि म्हणूनच या दिवसाची कृतार्थ भावना मनात जपत छत्रपतींच्या जन्मोत्सवासाठी किल्ले शिवनेरी गडावर जमले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज या सोहळ्याला उपस्थित होते. जन्मोत्सव बघण्यासाठी आलेल्या शिव प्रेमींसाठी खास पर्वणी म्हणजे हेलिकॉप्टरमधून महाराजांच्या पुतळ्यावर होणारी पुष्पवृष्टी. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवप्रेमींनी या सोहळ्याला आपल्या डोळ्यात साठवलं.
बुलडाणा: आई जिजाऊंच्या माहेरी म्हणजे छत्रपतींच्या आजोळी बुलडाण्यात घराघरातून शिवबा निघाले. तब्बल 382 शिवबांची शहरातून मिरवणूक निघाली. महाराजांच्या मिरवणुकीनंतर जन्मोत्सवाचा सोहळा साजरा झाला..
कोल्हापूर: कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी शिवरायांच्या मूर्तीचं पूजन केलं. महाराजांची भव्य मिरवणूक कोल्हापुरात निघाली आणि मर्दानी खेळही सादर करण्यात आले.
सोलापूर: जातीधर्माच्या विचाराला महाराजांनी कधीच थारा दिला नाही आणि म्हणूनच आज सोलापुरातल्या मुस्लिम बांधवांनी शिवजयंती साजरी केली. शहरात काढलेली भव्य मिरवणूक महाराजांच्या महत्तेची पावती आहे.
परभणी: मराठवाड्यात पडलेल्या भयवह दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्यासमोर मुलांच्या लग्नाचा प्रश्न उभा राहिला आहे. सेलू येथील सामाजिक संघटना आणि युवकांनी पुढे येत शिवजयंतीच्या मिरवणुकीला फाटा देत मोठ्या प्रमाणत खर्च न करता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.
मुंबई: मुंबईतलं शिवाजी पार्क म्हणजे राज्यातल्या कला, क्रिडा आणि संस्कृतीचा जिवंत आखाडा. महाराजांचा प्रवेशद्वारावरचा अश्वारूढ पुतळा म्हणजे मुंबईकरांचं दैवत. राज्यपालांनी पुष्पाहार अर्पण करत शिवजयंती साजरी केली.
आग्रा: छत्रपतींच्या बुद्धीमत्तेची आणि गनिमी काव्याची साक्ष असलेला आग्रा किल्ला. मुगलांच्या हातावर तुरी दिल्या म्हणूनच महाराष्ट्राचा डंका उत्तरेत आजही वाजतो. या किल्ल्यासमोर सैन्यदल आणि वायूदलानं महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला.
न्यूयॉर्क: राजे सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले. पण दैदिप्यपमान कर्तृत्वाच्या बळावर आज सातासमुद्रापार न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती साजरी झाली. टाईम्स स्क्वेअरवर हरहर महादेवचा गजर झाल्यावर आज सह्याद्रीचा ऊरही अभिमानानं भरून आला असेल. अशा या दिग्विजयी राजाला… माझाचा मानाचा मुजरा…
व्हायरल सत्य: कन्हैया देशभक्त की देशद्रोही, फोटो-व्हिडिओचं सत्य काय?
नवी दिल्ली: सोशल मीडियावरुन जेएनयू वादाला आणखी खतपाणी घातलं जात आहे. अटकेत असलेल्या कन्हैया कुमारचा फोटो ट्विटर आणि फेसबुकवरुन व्हायरल होतो आहे. मात्र खऱ्या फोटोशी छेडछाड करुन हा फोटो व्हायरल केल्याचं समोर आलं आहे.
जेएनयूमधल्या वादग्रस्त घोषणाबाजीवरुन देशभर विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर कन्हैय्या कुमारचा एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये कन्हैय्या कुमार भाषण देत असताना त्याच्यामागे भारताच्या नकाशाचं एक पोस्टर आहे. मात्र या पोस्टरमध्ये भारताचे अनेक तुकडे झाल्याचं दाखवलं आहे.
आम्ही या फोटोची सत्यत्ता तपासण्याचा प्रयत्न केला आणि समोर धक्कादायक माहिती आली. कन्हैय्या कुमारच्या मागे कोणतंही पोस्टर नव्हतं. पण फोटोशॉपच्या माध्यमातून कन्हैय्याच्या फोटोला वेगळ्याच पद्धतीनं पसरवण्यात आलं.
पाकिस्तानच्या पॉर्न स्टारचा खळबळजनक खुलासा
वॉश्गिंटन: अमेरिकेतील पाकिस्तानी पॉर्न स्टार नादिया अली आपल्या एका मुलाखतीमुळं बरीच चर्चेत आहे. तिने एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासा केले आहेत.
मागील वर्षभरापासून नादिया चर्चेत आली आहे. पण सध्या तिच्यावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील अनेक लोक तिचा तिरस्कारच करतात. नादिया अलीची खास गोष्ट म्हणजे ती आपल्या पॉर्न व्हिडिओमध्ये आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न करीत नाही.
मागील वर्षीच लेबनानी अमेरिकन पॉर्न स्टार मिया खलीफाला तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, नादियानं दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते की, ती धर्माला या सगळ्या गोष्टीमध्ये आणू इच्छित नाही. पाकिस्तानी कल्चर प्रमोट करण्यासाठीच ती हिजाब परिधान करते असं तिचं म्हणणं आहे.
नादियाच्या मते, धर्मासाठी नव्हे तर पाकिस्तानी कल्चरसाठी आपण हिजाब परिधान करतो. जर मी माझी खोटी ओळख सांगितली असती तरी काही बिघडलं नसतं पण मी तसं केलं नाही. असंही नादिया म्हणते.
नादिया म्हणते की, माझे नातेवाईक पॉर्नबाबत माझ्यासोबत नाहीत. मात्र, माझ्या या कामाबाबत त्यांना काही हरकत नाही. नादियाला देखील धमक्या मिळत असल्याचं ती सांगते. पण आपण त्याकडं दुर्लक्ष करीत असल्याचं तिनं सांगितलं.
स्वस्त मोबाइलसाठी 2 दिवसात 5 कोटी नोंदणी, कंपनीचा दावा
नवी दिल्ली: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणजेच 251 रूपयांना मिळणाऱ्या मोबाईलसाठी दोन दिवसात 5 कोटीहून जास्त नोंदणी झाल्याचा दावा रिंगिंग बेल कंपनीनं केला आहे.
कंपनी ऑनलाईन नोंदणी घेत असून अद्याप मोबाईलची विक्री सुरू नाही. काल पहिल्याच दिवशी प्रत्येक सेंकदाला सहा लाख हिट्स मिळत असल्यानं त्याचा प्रचंड ताण सर्व्हरवर आला. त्यामुळे साइट क्रॅश झाली होती. मात्र, आता या वेबसाईटचं अपग्रेडशन करण्यात आलं असल्याचं कंपनीनं सांगितलं.
साइट क्रॅश झाल्यानंतर कंपनीनं २४ तास साइट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज दुपारी 2 वाजेपर्यंत मोबाईलसाठी 5 कोटीहून अधिक नोंदणी झाल्या. नोंदणी केलेल्या ग्राहकांना एप्रिलमध्ये मोबाइल मिळणार आहे.
फ्रीडम 251 स्मार्टफोनचे खास फीचर:
अँड्रॉईड 5.1 ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4 इंच असणार आहे. ३जी कनेक्टिव्हीटी देखील यामध्ये मिळणार आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर प्रोसेसर आहे. तर 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरीही आहे. तसेच 32 जीबी पर्यंत ही मेमरी वाढविताही येऊ शकते.
तसेच या स्मार्टफोनमध्ये 3.2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये स्वच्छ भारत, वुमन सेफ्टी, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर यासारखे अॅप पहिल्यापासूनच इंस्टॉल असतील.
याची बॅटरी 1,450mAh क्षमता असणार आहे. तसेच फोनच्या सर्विससाठी देशभरात 650 केंद्र असणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर 18 फेब्रुवारीपासून याची प्री-ऑर्डर नोंदणी करता येणार आहे.
खुशखबर: रु. 251 किंमतीच्या स्मार्टफोनची वेबसाइट पुन्हा सुरु
मुंबई: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन अशी ख्याती मिळविल्यानंतर फ्रीडम 251 या स्मार्टफोनच्या ऑनलाइन खरेदीसाठी काल सकाळी अक्षरश: उड्या पडल्या. www.freedom251.com त्यामुळे ही वेबसाइट काही क्षणातच क्रॅश झाली. इतकंच नव्हे तर कंपनीला ही वेबसाइट 24 तास बंदही ठेवावी लागली.
याबाबत बोलताना कंपनीनं स्पष्ट केलं की, ‘सहा लाख हिट्स प्रत्येक सेंकदाला मिळत असल्यानं त्याचा प्रचंड ताण सर्व्हरवर आला. त्यामुळे साइट क्रॅश झाली. मात्र, या वेबसाईटचं अपग्रेडशन करण्यात आलं आहे.’ साइट क्रॅश झाल्यानंतर कंपनीनं २४ तास साइट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
आता मात्र, ज्यांना या स्मार्टफोनची खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे. कारण की, आज सकाळपासून ही वेबसाइट पुन्हा सुरु झाली असून आता हा रु. 251 किंमतीचा स्मार्टफोन बूक करता येणार आहे.
अरूणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट हटवली, कलिखो पूल नवे मुख्यमंत्री
गुवाहटी: अरूणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यात भाजपला अखेर यश आलं आहे. अरूणाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून कलिखो पूल यांनी आज शपथ घेतली. सुप्रीम कोर्टानं अरूणाचल प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेली आज राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली.
राष्ट्रपती राजवट हटविण्यात आल्यानंतर राजभवनमध्ये शपथविधीची प्रक्रिया देखील सुरू झाली. भाजपच्या पाठिंब्यासह कलिखो पूल यांनी 14 बंडखोर आमदारांसह अरूणाचलमध्ये सत्ता स्थापन केली.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या 14 बंडखोर आमदारासंदर्भात गुवाहटी उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम राखला. तसंच अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवटीसंदर्भात दिलेला अंतरिम आदेश देखील मागे घेतला आहे. आता अरूणाचल प्रदेशमध्ये जुळून आलेलं नवं राष्ट्रीय समीकरण किती दिवस टिकत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का, शमी आशिया चषक मालिकेतून बाहेर!
मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं दुखापतीमुळं आगामी आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. शमीऐवजी निवड समितीनं भुवनेश्वर कुमारचा भारताच्या टी-20 संघात समावेश केल्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे.
शमीच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले होते. त्यामुळं तो गेले काही महिने संघातून बाहेरच होता. शमीला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी काही काळ विश्रांतीची गरज असल्याचं बीसीसीआयच्या मेडीकल टीमनं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे शमीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह असतानाही त्याची टी-20 विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, आता या स्पर्धेत शमीच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
मॅक्युलमनं मोडला विव्ह रिचर्डचा विक्रम, 54 चेंडूत 100
- ख्राइस्टचर्च (न्यूझीलंड), दि. 20 - न्यूझीलंडचा कप्तान ब्रँडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमधल्या वेगवान शतकाचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत मॅकयुलमने अवघ्या 54 चेंडूंमध्ये शतक झळकावले आहे. कारकिर्दीतलं बारावं शतक झळकावताना मॅक्युलमने 16 चौकार व 4 षटकार फटकावले.याआधीचा विक्रम विवियन रिचर्ड व मिसबाह उल हकच्या नावावर होता. रिचर्डने इंग्लंडविरुद्ध अँटिग्वामध्ये खेळताना तर मिसबाहने ऑस्ट्रेलिविरुद्ध अबुधाबीमध्य खेळताना 56 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. मॅक्युलमचं आज नशीबही जोरावर होतं, कारण तो 39 वर असताना मिशेल मार्चने सूर मारत एक अफलातून झेल घेत त्याला बाद केलं होतं. परंतु, नंतर रिप्लेमध्ये तो नो बॉल असल्याचं निष्पन्न झालं.मॅक्युलमची ही 101वी व शेवटची कसोटी असून ती तो टी-20 सारखी खेळत आहे.कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला असून त्याने 101 षटकार आत्तापर्यंत मारले आहेत. हा विक्रम याआधी 100 षटकार मारणा-या अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता.
दाऊद इब्राहिमच्या पुतण्याला दहशतवादी कारवायांसाठी अमेरिकेत अटक
- मुंबई, दि. 20 - दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकर याला दहशतवादाच्या आरोपाखाली अमेरिकेत अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. विदेशी दहशतवाद्यांना बेकायदेशीररीत्या शस्त्रास्त्रे विकण्याचा व त्यांना मदत करण्याचा त्याच्यावर आरोप आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सोहेल व अन्य दोन पाकिस्तानी व्यक्तिंना अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने अटक केली आहे. विशेष म्हणजे ही अटक डिसेंबर 2015 मध्येच झाली असून दाऊदने ही बातमी फुटू नये म्हणून आपले सामर्थ्य पणाला लावले होते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने टाइम्सने दिली आहे. सोहेल हा दाऊदचा भाऊ नूराचा मुलगा आहे. दाऊदने सोहेलसाठी बडा वकिल दिला असून जर सोहेल दोषी आढळला तर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. याचा अर्थ तो किमान 25 वर्षे तुरुंगात जाईल. सोहेलची मॅनहॅटन फेडरल कोर्टात सुनावणी असून क्षेपणास्त्रांची बेकायदेशीर विक्री, अमली पदार्थांची तस्करी आदी आरोप आहेत. दाऊदसाठी सोहेलची अटक ही शरमेची बाब मानण्यात येत असून दाऊदच्या साम्राज्याला खिंडार पडत असल्याचेही हे लक्षण मानण्यात येत आहे.
नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली, राहूल गांधींची वाढली, पाहणीचा कौल
- नवी दिल्ली, दि. 20 - पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही भारतातील सगळ्यात लोकप्रिय नेते असले तरी त्यांची लोकप्रियता एका वर्षापूर्वीच्या तुलनेत किंचितशी घटल्याचे व या कालावधीत राहूल गांधींची लोकप्रियता वाढल्याचे समोर येत आहे.इंडिया टुडे व कार्वी इनसाईट्सनी केलेल्या पाहणीमध्ये नरेंद्र मोदींना 58 टक्के सहभागींनी पाठिंबा दर्शवला आहे, जे प्रमाण आधी 61 टक्के होते. तर राहूल गांधींची लोकप्रियता 8 टक्क्यांवरून वाढून तब्बल 22 टक्के झाली आहे.या पाहणीमध्ये आढळलेल्या काही बाबी पुढीलप्रमाणे:- 53 टक्के लोकांना वाटतं की मोदींच्या विदेश दौ-यांचा देशाला फायदा झाला आहे, तर 27 टक्के म्हणतात काही उपयोग झाला नाही.- 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नितिश कुमार, सोनिया गांधी किंवा अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत राहूल गांधीच नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकतात असं लोकांचं मत आहे.- उच्चवर्णीयांमधील 54 टक्क्यांनी मोदींना पसंती दिली आहे, तर मागासवर्गीयांमधील केवळ 33 टक्क्यांनी मोदींच्या बाजुने कौल दिला आहे.- राहूल गांधींना अवघ्या 20 टक्के हिंदूंनी तर 38 टक्के मुस्लीमांनी पाठिंबा दर्शवला आहे.- संसदेचं कामकाज ठप्प होण्यासाठी 35 टक्के लोकांनी UPA ला जबाबदार धरलं आहे तर, अवघ्या 19 टक्के लोकांनी यासाठी NDA ला जबाबदार धरलं आहे.- आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान यावर लोकांचा कौल इंदिरा गांधी असा आहे. मोदींचे गुण यामध्येही 30 टक्क्यांवरून 14 टक्के इतके घसरले आहेत.- जर आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA जिंकेल असं कौल सांगतो, परंतु त्यांच्या जागांमध्ये घट होऊन ती 286 इतकी कमी झाली आहे.- या पाहणीमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 40 टक्केंना असहिष्णूता वाढल्याचे वाटत आहे.
हायड्रोजन बॉम्बची चाचणी आणि त्यानंतर रॉकेटचे प्रक्षेपण करणाऱ्या उत्तर कोरियाविरुद्ध नवे निर्बंध
- वॉशिंग्टन : हायड्रोजन बॉम्बची चाचणी आणि त्यानंतर रॉकेटचे प्रक्षेपण करणाऱ्या उत्तर कोरियाविरुद्ध कारवाईचा फास आवळत नव्याने प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी याबाबतच्या प्रतिबंधावर स्वाक्षरी केली आहे.व्हाईट हाऊसने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, काँग्रेसने मंजूर केलेल्या याबाबतच्या उपाययोजना स्वीकारण्यात आल्या आहेत. यानुसार उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र वा हत्याराशी संबंधित तंत्रज्ञान कुणालाही घेता येणार नाही. किंवा आयात करता येणार नाही. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश हर्नेस्ट म्हणाले की, उत्तर कोरियातील घडामोडींमुळे येथील प्रशासन चिंतेत आहे. या प्रतिबंधामुळे उत्तर कोरियावर दबाव वाढेल अशी आम्हाला आशा आहे.गेल्या महिन्यात उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले. उत्तर कोरियाने एका रॉकेटचे प्रक्षेपण केले.दरम्यान, हे तर बॅलेस्टिक मिसाईल असल्याचा दावा काही राष्ट्रांकडून करण्यात येत आहे. यामुळे उत्तर कोरियाने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचे उल्लंघन केले.या विधेयकानुसार आता प्रतिबंधित कारवाया करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जसे की, संपत्तीची जप्ती, व्हिसा रोखणार आणि सरकारी ठेकेदारीवरही प्रतिबंध अशा कारवाईचा यात समावेश आहे.
========================================
शिवसेना खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी - जिल्हाप्रमुख भुजंग पाटील
" शिवसेना खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी - जिल्हाप्रमुख भुजंग पाटील "
' मुखेड तालुक्यात सर्कल निहाय बैठक संपन्न "
मुखेड :-
शिवसेनेने आज पर्यंत राजकारण कमी व समाजकारण जास्त केला आहे. सध्या शेतकरी दुष्काळामुळे होरपळला असुन शेतक-यांनी हिम्मत सोडु नये शिवसेना शेतक-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे असे मत जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी युवासेना जिल्हा युवा अधिकारी विक्रम साबणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य व्यंकट लोहबंदे, तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनुरकर, गंगाधर पिटलेवाड, मनोज गौंड, शंकर पाटील लुट्टे आदींनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
मुखेड तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजीत जाहूर, येवती येथे सर्कल निहाय बैठकीत ते बोलत होते. दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांच्या मदत व्हावी या हेतुने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शासनाचा मदत न घेता शेतक-यांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत व्हावी यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अमलात आणली असुन, आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांच्या मुलिंचे मोफत लग्न लावुन देण्यात येणार आहे. तेव्हा गरजु शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाप्रमुख भुजंग पाटील केले आहे. याबैठकीस शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावुन आपल्या अडीअडचणी व्यक्त केल्या. येवती येथील बैठकीस सर्कल प्रमुख पंढरी पाटील येवतीकर, डाँ.कोंडिबा सुडके, लक्ष्मण पाटील गोपनर, रमेश सुरावाड, संतोष सोमावार, बालाजी गोपनर, गंगाधर सुडके आदी उपस्थित होते. तालुका शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील येवती, जाहुर, मुक्रमाबाद, बा-हाळी येथे जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्कल निहाय बैठका घेण्यात आले. यावेळी युवासेनेचे विक्रम साबणे, तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनुरकर, व्यंकट लोहबंदे, शहर प्रमुख नागनाथ लोखंडे, संघटक राजु गंदपवाड, पवन पोतदार, कृष्णा कामजे, कैलास बेळीकर सह शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment