[अंतरराष्ट्रीय]
१- रुरकेला; सिमीच्या 4 दहशतवाद्यांना अटक
२- कारगिल युद्ध हे खंजीर खुपसण्यासारखे- शरीफ
३- इस्लामाबाद; भारतीय प्रियकरावर पाकमध्ये हेरगिरीचा गुन्हा
४- बगदादमध्ये अपहरण केलेल्या तीन अमेरिकन नागरिकांची सुटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- कन्हैयाविरोधात पुरावे नाहीत, गृहमंत्रालयाच्या सूत्रांची PTIला माहिती
६- आमीर खान ‘जलयुक्त शिवार’ योजनेत सहभागी होणार
७- देशभरातील नोकरदारांना EPFOकडून खुशखबर, पीएफच्या व्याजदरात वाढ!
८- ‘मेक इन इंडिया’त खासदार हेमामालिनींचं नृत्य चुकीचं, काँग्रेसचा आक्षेप
९- आधुनिक भारताचे शिल्पकार कोण?
१०- ईशान्येवर राज्य करण्याची नरेंद्र मोदींची इच्छा
११- महाराष्ट्रासह देशभरात लवकरच ई-टोल - गडकरी
२१- भाजपा 18 ते 20 फेब्रुवारी देशभरात स्वाभिमान रॅली काढणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
२२- 'आवश्यकता आहे तिथं चारा छावण्या सुरु होणार', खडसेंची माहिती
२३- मुख्यमंत्र्यांनी गायलं तेरी दिवाणी, फडणवीसांच्या गाण्याला भरभरुन दाद
२४- अरबी समुद्रातील शिवरायांच्या पुतळ्यावरुन राज ठाकरेंची टीका
२५- चिक्की घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीस राज्य सरकारचा नकार
२६- एसी केबिनमध्ये बसून योजना आखणं फार सोपं असतं: श्रीहरी अणे
२७- ...यांना सत्तेची मस्ती आली आहे: अजित पवार
२८- आंध्र आणि गुजरातचे महाराष्ट्राला थेट आव्हान!
२९- मुंबईत छमछम, ७० डान्सबारना परवानगी
३०- मराठवाड्यात ४३ दिवसात १२४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
३१- नागपूर; तुझ्यासाठी काय पण..,सात प्रेयसींसाठी चोरी, घरफोड्या !
३२- वाशिमचा चिमुरडा ‘गुगल बॉय’, काय पण विचारा उत्तर बिनचूकच !
३३- ...तर राष्ट्रपतीजी मी आत्महत्या करेन; तेरा वर्षाच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रपतीना पत्र
३४- पुण्यात पाणीपट्टीत अखेर बारा टक्के वाढ
३५- उस्मानाबाद - छावणी चालकांनी जणावरांना चारा देणे केले बंद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३६- गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील 'संघर्षयात्रे'चा प्रदर्शनासाठी संघर्ष
३७- २८ वर्षानंतर शाहरुखने स्वीकारली ग्रॅज्युएशनची पदवी
३८- अपघातमुक्त नागपूरचे प्रणेते राजू वाघ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३९- उमरी; डिजिटल शाळेसाठी लोकवर्गणीतून अडीच लाख
४०- शिवजन्मोत्सव फेरीत या वर्षी प्रथमच महिलांचे ठोल पथक; दोन महिन्यांपासून सराव
४१- बारावीत कॉपीमुक्तीसाठी आधुनिक तंत्राचा वापर - जिल्हाधिकारी
४२- ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेला लाखोंचा गुटखा भस्म
४३- हदगाव तहसीलचा लिपिक लाच स्वीकारतांना एसीबीच्या जाळ्यात
४४- पिंपळगाव येवला येथील बलात्कार प्रकरणी एकास सक्त मजुरी
४५- किनवट; आ. प्रदीप नाईक यांच्या हस्ते एलईडी बल्ब वाटप योजनेचा शुभारंभ
४६- प्रकाश कौडगे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
४७- २० व २१ रोजी आर्य-वैश्य समाज परिचय मेळावा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संगीता बंग, रुपाली खोट, सचिन थेटे, विकास कपाटे, गोपाल देसाई, अमित रास्मे, राजकुमार देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे
[अविनाश पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
==========================================

‘मेक इन इंडिया’त खासदार हेमामालिनींचं नृत्य चुकीचं, काँग्रेसचा आक्षेप
मुंबई – 16 फेब्रुवारी : मेक इंडियाच्या कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांसमोर खासदार हेमामालिनी यांनी नृत्य सादर करणे हे चुकीचं आहे असा आक्षेप काँग्रेसजनांनी घेतलाय. मुंबई महापालिकेच्या सभागृहात मेक इन इंडियावरून बराच गदारोळ झाला. हेमामालिनींच्या नृत्यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला. खासदार महिलेने परदेशी पाहुण्यांसमोर नाचणं अयोग्य आहे, असं काँग्रेसच्या नगरसेविका वकार उन्निसा यांचं म्हणणं आहे. परदेशी पाहुण्यांसमोर लावणी करणार्या महिलांना नाचवलं, असाही त्यांचा आरोप आहे. काँग्रेसच्या या भूमिकेचा भाजपने कडाडून विरोध केलाय. काँग्रेसची ही वैचारिक दिवाळखोरी आहे अशी टीका भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी केलीये.
प्रेयसीसाठी काय पण करण्यासाठी प्रियकर नेहमी एका पायावर तयार असतो. पण, ओमप्रकाश खांडवे या भामट्याने तर काय पणाची हद्दच केली. याला एक नव्हे तर सात प्रेयसी आहे. आणि आपल्या या सातही प्रेयसींना महागडे गिफ्ट देण्याचा छंदच या भामट्याला लागला होता. पण, ही हौस पूर्ण कऱण्यासाठी ओमप्रकाशने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. सुरुवातील त्याने रेल्वेत चोरी करायचा. प्रवासात सोनसाखळी,मोबाईल लुटायचा. पण त्यानंतरही हाैस फिटत नसल्यामुळे त्याने घरफोड्या करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांत नागपूर आणि परिसरात या चोरट्यानं तब्बल नऊ ठिकाणी घरफोडी केलीय. घरातील मिळेल त्या वस्तू लंपास करायच्या आणि त्याची विक्री करायची, मिळालेल्या पैशात आपल्या सात गर्लफ्रेण्ड्सची तो हौस भागवायचा. मुळचा बुलडाणा जिल्ह्यातला हा चोरटा विदर्भ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही चोरी करायचा. पण याची चोरीच याला महागात पडली. चोरलेला मोबाईल विक्री करायला गेलेल्या या चोरट्याला मानकापूर पोलिसांनी गजाआड केलं. त्याच्याकडून 17 महागडे मोबाईल, दागिणे, टीव्ही, लॅपटॉप आणि बाईक्सही पोलिसांनी पोलीसांनी जप्त केले आहे.
==========================================
वाशिमचा चिमुरडा ‘गुगल बॉय’, काय पण विचारा उत्तर बिनचूकच !
हा आहे वाशिम जिल्ह्यातला गुगल बॉय…प्रणव मोरे…वय 2 वर्षं 4 महिने…या वयातल्या मुलांना जे प्रश्न कळणारही नाहीत त्याची उत्तर प्रणव चुटकीसरशी देतो. राष्ट्रपती, पंतप्रधान ते गावचा पोलीस पाटील काहीही विचारा…सारंकाही बिनचूक…इतकंच नाही तर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी,त्यांची नावं आणि पदंही तो क्षणात सांगतो. बाराखडी, एबीसीडी, इंग्रजी कविता हे तर त्याला तोंडपाठच आहे. म्हणूनच त्याला नाव मिळालंय गुगल बॉय. घरची बेताची परिस्थिती आहे. आई-वडील मोलमजुरी करतात. आपल्या मुलानं शिकावं आणि तल्लख बुद्धीमत्तेच्या जोरावर यश मिळवावं अशी त्यांची इच्छा आहे.
==========================================
आधुनिक भारताचे शिल्पकार कोण?
ईशान्येवर राज्य करण्याची नरेंद्र मोदींची इच्छा
आंध्र आणि गुजरातचे महाराष्ट्राला थेट आव्हान!
==========================================
==========================================
==========================================
==========================================
==========================================
रुरकेला; सिमीच्या 4 दहशतवाद्यांना अटक
...तर राष्ट्रपतीजी मी आत्महत्या करेन; तेरा वर्षाच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रपतीना पत्र
वडोदरा (गुजरात)- राष्ट्रपतीजी मुख्याध्यापकांनी माझे लैंगिक शोषण केले असून, मला दहा दिवसांमध्ये न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेल. एका तेरा वर्षांच्या विद्यार्थिनीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्रात म्हटले आहे.
आनंद जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील आठवीच्या वर्गात एक विद्यार्थिनी शिकत आहे. मुख्याध्यापक किरण म्हस्के यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.
विद्यार्थिनीने राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘दहा दिवसांमध्ये न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेल. माझ्या कुटुंबीयांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला शाळेतील 4 अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरावे.‘ दरम्यान, असा कोणातही प्रकार घडला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
==========================================
कारगिल युद्ध हे खंजीर खुपसण्यासारखे- शरीफ
इस्लामाबाद- कारगिल युद्ध म्हणजे भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे होते, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
शरीफ म्हणाले, ‘भारत-पाकिस्तानच एकच आहे, फक्त मध्ये एक सीमा आहे. एकाच भूमिवरील सदस्य आहोत. वाजपेयी साहेबांनीसुद्धा हे मान्य केले आहे. कारगिल युद्ध करून पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. खंजीर कोणी खुपसला हे सर्वांनाच माहित आहे. परंतु, नाव कोणाचे घेऊ.‘
‘वाजपेयी साहेबांच्या जागेवर मी असतो तरी सुद्धा हेच बोललो असतो. भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पण, नाव घेऊ शकत नाही,‘ असेही शरीफ म्हणाले.
==========================================
अपघातमुक्त नागपूरचे प्रणेते राजू वाघ
नागपूर - दरवर्षी रस्त्यांवरच्या अपघातात शेकडो जखमी होतात, तर अनेक मृत्युमुखी पडतात. एका व्यक्तीचा अकाली मृत्यू म्हणजे एका संपूर्ण कुटुंबावरच आघात ठरतो. एकदा घराबाहेर पडलेला आपला आप्तस्वकीय, सुखरूप घरी पोहोचेलच, याची कोणतीही शाश्वती नसते. महत्त्वाचे म्हणजे अपघातग्रस्ताला वेळेवर मदत न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक असते. अशा अपघातग्रस्तांसाठी नागपूरचा राजू वाघ हा साक्षात देवदूतच ठरला.

इस्लामाबाद; भारतीय प्रियकरावर पाकमध्ये हेरगिरीचा गुन्हा
इस्लामाबाद- पाकिस्तानमधील प्रेयसीसाठी भेटायला गेलेल्या भारतीय अभियंत्यावर पाकिस्तानमध्ये हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो कारागृहात आहे.
सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकच्या माध्यमातून हमिद नेहाल अन्सारी याची पाकिस्तानमधील युवतीशी ओळख झाली होती. हमिद प्रेयसीला भेटण्यासाठी नोव्हेंबर 2012 मध्ये अफगणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये गेला होता. एका हॉटेलमध्ये त्याने वास्तव्य केले होते. पोलिसांनी त्याला लष्कराच्या ताब्यात दिले होते. गेल्या तीन वर्षांपासून तो कारागृहात खितपत पडला आहे. लष्कराच्या न्यायालयाने त्याच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पेशावरमधील मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. दरम्यान, हमिदचे कुटुंबीय त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत.
==========================================
पुण्यात पाणीपट्टीत अखेर बारा टक्के वाढ
पुणे - शहरात 24 तास समान व शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेअंतर्गत पाणीपट्टीमध्ये 12 टक्के वाढ करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आठ तासांच्या चर्चेनंतर मतदानाने मंजुरी दिली. महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला. कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने प्रस्तावास विरोध केला.
महाराष्ट्रासह देशभरात लवकरच ई-टोल - गडकरी
मुंबई - टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात ई-टोल सुरू करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. 16) येथे केली. ई-टोल प्रणालीत वाहनावर ई-स्टिकरचा वापर करण्यात येणार असून, हे स्टीकर बॅंकांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
१- रुरकेला; सिमीच्या 4 दहशतवाद्यांना अटक
२- कारगिल युद्ध हे खंजीर खुपसण्यासारखे- शरीफ
३- इस्लामाबाद; भारतीय प्रियकरावर पाकमध्ये हेरगिरीचा गुन्हा
४- बगदादमध्ये अपहरण केलेल्या तीन अमेरिकन नागरिकांची सुटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- कन्हैयाविरोधात पुरावे नाहीत, गृहमंत्रालयाच्या सूत्रांची PTIला माहिती
६- आमीर खान ‘जलयुक्त शिवार’ योजनेत सहभागी होणार
७- देशभरातील नोकरदारांना EPFOकडून खुशखबर, पीएफच्या व्याजदरात वाढ!
८- ‘मेक इन इंडिया’त खासदार हेमामालिनींचं नृत्य चुकीचं, काँग्रेसचा आक्षेप
९- आधुनिक भारताचे शिल्पकार कोण?
१०- ईशान्येवर राज्य करण्याची नरेंद्र मोदींची इच्छा
११- महाराष्ट्रासह देशभरात लवकरच ई-टोल - गडकरी
२१- भाजपा 18 ते 20 फेब्रुवारी देशभरात स्वाभिमान रॅली काढणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
२२- 'आवश्यकता आहे तिथं चारा छावण्या सुरु होणार', खडसेंची माहिती
२३- मुख्यमंत्र्यांनी गायलं तेरी दिवाणी, फडणवीसांच्या गाण्याला भरभरुन दाद
२४- अरबी समुद्रातील शिवरायांच्या पुतळ्यावरुन राज ठाकरेंची टीका
२५- चिक्की घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीस राज्य सरकारचा नकार
२६- एसी केबिनमध्ये बसून योजना आखणं फार सोपं असतं: श्रीहरी अणे
२७- ...यांना सत्तेची मस्ती आली आहे: अजित पवार
२८- आंध्र आणि गुजरातचे महाराष्ट्राला थेट आव्हान!
२९- मुंबईत छमछम, ७० डान्सबारना परवानगी
३०- मराठवाड्यात ४३ दिवसात १२४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
३१- नागपूर; तुझ्यासाठी काय पण..,सात प्रेयसींसाठी चोरी, घरफोड्या !
३२- वाशिमचा चिमुरडा ‘गुगल बॉय’, काय पण विचारा उत्तर बिनचूकच !
३३- ...तर राष्ट्रपतीजी मी आत्महत्या करेन; तेरा वर्षाच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रपतीना पत्र
३४- पुण्यात पाणीपट्टीत अखेर बारा टक्के वाढ
३५- उस्मानाबाद - छावणी चालकांनी जणावरांना चारा देणे केले बंद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३६- गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील 'संघर्षयात्रे'चा प्रदर्शनासाठी संघर्ष
३७- २८ वर्षानंतर शाहरुखने स्वीकारली ग्रॅज्युएशनची पदवी
३८- अपघातमुक्त नागपूरचे प्रणेते राजू वाघ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३९- उमरी; डिजिटल शाळेसाठी लोकवर्गणीतून अडीच लाख
४०- शिवजन्मोत्सव फेरीत या वर्षी प्रथमच महिलांचे ठोल पथक; दोन महिन्यांपासून सराव
४१- बारावीत कॉपीमुक्तीसाठी आधुनिक तंत्राचा वापर - जिल्हाधिकारी
४२- ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेला लाखोंचा गुटखा भस्म
४३- हदगाव तहसीलचा लिपिक लाच स्वीकारतांना एसीबीच्या जाळ्यात
४४- पिंपळगाव येवला येथील बलात्कार प्रकरणी एकास सक्त मजुरी
४५- किनवट; आ. प्रदीप नाईक यांच्या हस्ते एलईडी बल्ब वाटप योजनेचा शुभारंभ
४६- प्रकाश कौडगे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
४७- २० व २१ रोजी आर्य-वैश्य समाज परिचय मेळावा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संगीता बंग, रुपाली खोट, सचिन थेटे, विकास कपाटे, गोपाल देसाई, अमित रास्मे, राजकुमार देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे
[अविनाश पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
==========================================
==========================================
आमीर खान ‘जलयुक्त शिवार’ योजनेत सहभागी होणार
आमीर खान फोर्ब्सच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. 104.25 कोटी एवढी आमीरची कमाई आहे.
मुंबई : असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्याने टीकेचा धनी ठरलेल्या अभिनेता आमीर खानला राज्याच्या जलयुक्त शिवार योजनेचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आलंय. आज यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांची विनंती आणि आमीरचा होकार
‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या उद्घाटनाला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहभोजन दिले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई दाखवत पंतप्रधानांच्या उपस्थितीत आमीरला राज्याच्या जलयुक्त शिवार योजनेचा ब्रॅड अॅम्बेसेडर बनण्याची विनंती केली होती. आमीरनेही मुख्यमंत्र्यांची विनंत लगेच मान्य केल्याचीह माहिती मिळते आहे.
कन्हैयाविरोधात पुरावे नाहीत, गृहमंत्रालयाच्या सूत्रांची PTIला माहिती
नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातल्या देशविरोधी घोषणांप्रकरणी नवी माहिती पुढे आली आहे. देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी ज्या कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला दाखल झाला, त्यानं देशविरोधी घोषणा दिल्याच नव्हत्या, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं दिली आहे.
कन्हैयाने देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत!
ज्यावेळी घोषणा दिल्या जात होत्या त्यावेळी कन्हैय्या कुमार त्याठिकाणी उपस्थित होता.मात्र, त्यानं कोणतेही देशविरोधी नारे लगावले नाहीत, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी पीटीआयला दिली. मात्र, अतिउत्साहात दिल्ली पोलिसांनी त्यावर देशद्रोहाचा खटला भरला, असं पीटीआयचं वृत्त आहे.
'आवश्यकता आहे तिथं चारा छावण्या सुरु होणार', खडसेंची माहिती
मुंबई: ‘जिथं चाऱ्याची गरज आहे तिथं उद्या सकाळपर्यंत चारा छावण्या सुरु करण्यात येतील. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.’ अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसेंनी दिली आहे. एबीपी माझाच्या ‘माझा विशेष’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये मुबलक चार उपलब्ध असल्याचा दावा करत सरकारनं चारा छावण्या बंद केल्या होत्या. त्यानंतर आता एकनाथ खडसेंनी पुन्हा चारा छावण्या सुरु करणार असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारा छावणी बंदीचा पुनर्विचार करायला पाहिजे असं स्पष्ट केलं होतं. चारा छावणी मंत्री आणि आमदारांच्या भावना तीव्र आहेत. त्या खडसेंना कळविण्यात आल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.
सोमवारीच लातूर, बीड आणि उस्मानाबादमधील चारा छावण्या बंद करण्याचे आदेश महसूल खात्यानं दिले होते. सध्या पुढचे तीन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे, त्यामुळं चाराछावण्यांची गरज नसल्याचं खडसेंनी म्हटलं होतं. त्यानंतर काल दिवसभर मराठवाड्यात तीव्र आंदोलनंही झाली.
मुख्यमंत्र्यांनी गायलं तेरी दिवाणी, फडणवीसांच्या गाण्याला भरभरुन दाद
मुंबई: ‘गेट वे ऑफ इंडिया’वर सुरु असलेल्या एलिफंटा फेल्टिव्हलमध्ये मुख्यमंत्र्यांनी ‘तेरी दिवाणी’ गाणं गाऊन सगळ्यांनाच चकीत केलं. यावेळी प्रसिद्ध पार्श्वगायक कैलाश खेर यांच्या गाण्याचा कार्यक्रम सुरु होता.
गायक कैलाश खेर यांच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिट्टी लिहून ‘तेरी दिवाणी’ गाण्याची फर्माईश कैलाश खेर यांच्याकडे केली. त्यामुळं कैलाश खेर यांनीच मुख्यमंत्र्यांजवळ येऊन ‘तेरी दिवाणी’ गाणं गाण्याची विनंती केली.
मुख्यमंत्र्यांनीही कैलाश खेर यांचा मान राखत ‘तेरी दिवाणी’ गाणं गात उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. मुख्यमंत्र्यांच्या या गाण्यानंतर उपस्थितांनीही त्यांना भरभरुन दाद दिली. यानंतर कैलाश खेर यांनीही तेरी दिवाणी गाणं गायलं.
अरबी समुद्रातील शिवरायांच्या पुतळ्यावरुन राज ठाकरेंची टीका
पुणे: ‘केवळ पुतळे उभे करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा शिवरायांचे गड-किल्ले जपा.’ असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा केलं आहे. ते पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आज बोलत होते.
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुनही राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘अश्वारुढ पुतळा तोही स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा ही कल्पना कुणाच्या मनात सुचली काय माहिती?’ असं म्हणत राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं.
दरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी देखील पुतळे आणि स्मारकं याला विरोध केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्याला शिवसेना आणि भाजप कशाप्रकारे उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एसी केबिनमध्ये बसून योजना आखणं फार सोपं असतं: श्रीहरी अणे
मुंबई: राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुंबईच्या एसी केबिनमध्ये बसून योजना आखणं फार सोपं आहे. मात्र, वास्तविक त्या प्रत्यक्षात जाऊन त्याठिकाणी राबवणं हे एक आव्हान असतं. अस मत अणेंनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत राज्य सरकारची बाजू मांडताना व्यक्त केलं.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत मुंबई हाईकोर्टात दाखल सु मोटो याचिकेवर सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत 2016च्या अवघ्या दीड महिन्यांत राज्यभरात 124 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक कबुली सरकारनं दिली. ज्यात औरंगाबादमध्ये 89 तर उस्मानाबाद जिल्ह्यात हा आकडा 20 असल्याचीही माहीती समोर आली आहे.
जानेवारी – फेब्रुवारीत जर ही परिस्थिती असेल तर येत्या काळात परिस्थिती अधिक भयावह होईल हे हायकोर्टाने अधोरेखित केलय. आणि मग ग्रामीण भागात अन्न, पाणी आणि रोजगार यांच्या शोधात गावच्या गाव शहरांकडे कूच करतात आणि मग फ्लाईओवर खाली नाही तर फुटपाथ वर आपला संसार मांडून राहतात. या परिस्थितिचा सामना कसा करणार? असा सवाल देखील हायकोर्टाने विचारला.
...यांना सत्तेची मस्ती आली आहे: अजित पवार
तासगाव: दुष्काळावरुन अजित पवार आणि राज्य सरकार तसंच सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
दुष्काळात पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करण्याची गरज असते. मात्र, हे सरकार चारा छावण्या बंद करतं आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना सत्तेची मस्ती आल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. या सरकारला सत्तेची मस्ती आल्याचेही टीका अजित पवारांनी केली.
तासगावामधील अंजनी इथं आर. आर. पाटील यांच्या श्रद्धांजली सभेसाठी अजित पवार आले होते, त्यावेळी अशाप्रकारची टीका केली आहे.
देशभरातील नोकरदारांना EPFOकडून खुशखबर, पीएफच्या व्याजदरात वाढ!
मुंबई: देशभरातील नोकरदारांसाठी एक खुशखबर आहे. भविष्य निर्वाह निधी (EPFO) 2015-16 साठी पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. 2014-15 साठी पीएफचा व्याजदर हा 8.75% होता. याच व्याजदरात 0.05 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आता पीएफवरील व्याजदर 8.80% असणार आहे.
भविष्य निर्वाह निधी (EPFO) 2015-16 साठी आपल्या खातेदाराना बोनस देण्याच्या विचारात होतं. मात्र, तूर्तास तरी हा निर्णय बाजूलाच ठेवण्यात आला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.95% व्याजदर देण्याचा प्रस्ताव ईपीएफओने ठेवला होता. याच प्रस्तावावर आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि 8.80% व्याजदर निश्चित करण्यात आला.
ईपीएफओनो 2013-14 आणि 2014-15 साठी 8.75% व्याजदर लागू केला होता. बोनसच्या पर्यायावर पहिल्यांदाच विचार करण्यात येत होता. पण गेल्या 12 महिन्यांपासून पैसे जमा होत असलेल्या खातेदारांनाच हा बोनस मिळणार होता. पण या प्रस्तावाला मान्यता न देता व्याजदरामध्येच वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा पाच कोटी खातेदारांना फायदा मिळणार आहे.
‘मेक इन इंडिया’त खासदार हेमामालिनींचं नृत्य चुकीचं, काँग्रेसचा आक्षेप
==========================================
नागपूर; तुझ्यासाठी काय पण..,सात प्रेयसींसाठी चोरी, घरफोड्या !
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं…’पण इथं एका भामट्याने प्रेमाची व्याख्याच बदलू टाकलीये. या भामट्याला एक नव्हे तर तब्बल सात प्रेयसी आहे. आणि या सात प्रेयसींना खूश ठेवण्यासाठी घरफोड्या करण्याचा मार्ग पत्कारला. त्याच्याकडून तब्बल 17 मोबाईल, दागिणे आणि बाईक नागपूर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ओमप्रकाश खांडवे असं या अट्टल चोराचं नाव आहे.
वाशिमचा चिमुरडा ‘गुगल बॉय’, काय पण विचारा उत्तर बिनचूकच !
वाशिम जिल्ह्यात सध्या सगळ्यांच्या तोंडावर नाव आहे ते प्रणव मोरे या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलाचं…अडीच वर्षांच्या प्रणवला सध्या लोक गुगल बॉय म्हणून ओळखतात. कोण आहे हा प्रणव ?
आधुनिक भारताचे शिल्पकार कोण?
आधुनिक भारताचे शिल्पकार कोण? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार? केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘आधुनिक भारताचे निर्माते’ या ग्रंथमालिकेतील नामावलीवर नजर टाकल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतो आहे. या ग्रंथमालिकेच्या सूचीमध्ये गांधीजींचे तर नावच नाही, जवाहरलाल नेहरूंचे नावही वगळण्यात आले आहे, तर हेडगेवार यांच्याबरोबरच हिंदू राष्ट्रवाद किंवा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडणारे मदनमोहन मालवीय, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सध्याचे सरकार बराच उदोउदो करीत असले तरी त्यांना केवळ हिंदूी ग्रंथमालेपुरते स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रकाशन विभागाच्या वतीने विविध विषयांवर पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. त्यातच ‘आधुनिक भारत के निर्माता’ ही हिंदीत व ‘बिल्डर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ ही इंग्रजी भाषेतील ग्रंथमालिका प्रकाशित करण्यात आली आहे. केंद्रात ज्या पक्षाचे सरकार त्या पक्षाचा या प्रकाशन मालिकेवर प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसते. २०१३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रंथमालिकेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, विनोबा भावे, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि अर्थातच डॉ. हेडगेवार, पंडित दीनदयाळ उपाध्याय, मदनमोहन मालवीय यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या हिंदूी ग्रंथमालिकेतही डॉ. आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांना स्थान देण्यात आले आहे. केंद्रातील सत्तांतरानंतर म्हणजे भाजप सत्तेवर आल्यानंतर २०१५ च्या हिंदी आणि इंग्रजी प्रकाशन मालिकेतून नेहरू, इंदिरा गांधी गायब झाले आहेत. हिंदी ग्रंथमालिकेत पुन्हा आंबेडकर, हेडगेवार आहेत; परंतु इंग्रजीत आंबेडकर दिसत नाहीत. काँग्रेसी दलित नेते बाबू जगजीवनराम यांना काँग्रेस व भाजप सरकारनेही शिरोधार्य मानले आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र शासकीय प्रकाशन संस्थेच्या ग्रंथमालिकेत आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून अभावानेच स्थान देण्यात आले आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद किंवा हिंदू राष्ट्रवादाचे आणि सनातन धर्माचेही समर्थन करणारे मदनमोहन मालवीय, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनाही मानाचे स्थान देण्यात आले आहे. त्यात काँग्रेस सरकारनेही कसूर केलेली नाही. विशेष म्हणजे आधुनिक भारताचे शिल्पकार ग्रंथमालिकेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद, दादाभाई नौरोजी, न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले यांचा बहुमान करण्यात आला आहे; परंतु त्यांचेच समकालीन व कृतिशील समाजक्रांतिकारक जोतिबा फुले यांची दखलही घेण्यात आलेली नाही. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तर आधुनिक भारताच्या शिल्पकार मालिकेत उपेक्षाच करण्यात आली आहे.
==========================================ईशान्येवर राज्य करण्याची नरेंद्र मोदींची इच्छा
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. नागपूरमधील रिमोट कंट्रोलद्वारे ईशान्येकडील राज्यांवर हुकूमत प्रस्थापित करावयाची आणि या राज्यांमधील शांतता आणि संस्कृतीची परंपरा नष्ट करण्याची मोदी यांची इच्छा आहे, असे गांधी म्हणाले. आसाम, मणिपूर अथवा अरुणाचल प्रदेश येथील कारभार नागपूरच्या रिमोट कंट्रोलद्वारे चालविण्याची मोदी यांची इच्छा आहे, वर्षांनुवर्षे चालत आलेली शांततेची आणि संस्कृतीची परंपरा खंडित करून मोदी यांची केवळ एका ओळीचा विचार लादण्याची इच्छा आहे, असे गांधी येथे काँग्रेसच्या मेळाव्यात म्हणाले. मोदी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दूरध्वनी करून काँग्रेसने ४० वर्षांत केला नाही तो ऐतिहासिक नागा करार केल्याची माहिती दिली. सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना याबाबत आसाम, नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून याबाबत माहिती घेण्यास सांगितले. मात्र या सर्व मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या कराराबाबत कानावर हात ठेवले, असे राहुल म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनीही याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगितले, असेही ते म्हणाले. नागा करार करून मोदी यांनी काय साध्य केले, मोदी कोणता विचार करीत आहेत.
==========================================आंध्र आणि गुजरातचे महाराष्ट्राला थेट आव्हान!
‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी असा राज्याचा प्रयत्न असला तरी शेजारील गुजरात आणि आंध्र प्रदेश सरकारांच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रालाच आव्हान दिले आहे. उद्योग आणि गुंतवणुकीत महाराष्ट्राला मागे टाकत आंध्र प्रदेश क्र. १चे राज्य होईल, असा निर्धार आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी केला. विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव सादर होणे आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये गुजरातच आघाडीवर असल्याचे सांगत आनंदीबेन यांनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले. नवीन राज्य असले तरी यंदा दुसऱ्या क्रमांकावर असलेले आंध्र प्रदेश राज्य गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रात पुढील वर्षी पहिला क्रमांक गाठेल, असा ठाम विश्वास चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला. राज्यात गुंतवणुकीचे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केले. तसेच देशात महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकाचे राज्य असेल, असा विश्वास व्यक्त केला होता; पण फडणवीस यांच्या दाव्याला छेद देत आनंदीबेन आणि चंद्राबाबू या दोन मुख्यमंत्र्यांनी स्पर्धेत आम्हीच महाराष्ट्राच्या पुढे आहोत, असे चित्र निर्माण केले. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेश राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तरीही गेल्याच महिन्यात चार लाख, ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. संयुक्त आंध्रचे मुख्यमंत्री असताना आपण हैदराबादचा कायापालट केला होता. विभाजनानंतर मूळ आंध्रचा त्याच धर्तीवर विकास करण्यात येईल, असे जाहीर केले.
==========================================मुंबईत छमछम, ७० डान्सबारना परवानगी
सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर गृहखात्याने मुंबईत ७० डान्सबार सुरु करण्यास अंतरिम परवानगी दिली आहे. गृहखात्याकडे डान्सबार सुरु करण्याच्या परवान्यासाठी १०० अर्ज आले होते. सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवताना डान्सबारसाठी काही निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने डान्सबारचा परवाना मिळवण्यासाठी २६ अटी घातल्या आहेत. डान्सबारना तुम्ही सरसकट बंदी करू शकत नाही. मात्र, तेथे काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अटी मात्र जरूर घालू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविताना स्पष्ट केले होते. त्यामुळे डान्सबारच्या परवान्यासाठी २६ अटी घातल्या आहेत. या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच अंतिम परवानगी दिली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार १०० पैकी २६ फेटाळण्यात आले तर, चार अर्जांवर अद्यापही निर्णय झालेला नाही. अर्जदाराने तो या अटींच्या पूर्ततेस सक्षम आहे का, याचा स्वत: आढावा घेऊन, तसे लेखी देणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही निरीक्षकामार्फत लेखा परीक्षण करून संबंधितास परवाना मिळेल.अर्ज नामंजूर होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. काही अर्ज अशा व्यक्तींच्या नावे होते, ज्यांच्याकडे यापूर्वी परवाना होता. मात्र, ती व्यक्ती आता हयात नाही. काही प्रकरणांत बार ज्या सोसायटीत आहे, तेथील रहिवाशांचे ना हरकत प्रमाणपत्र नव्हते.डान्सबार सुरु झाल्यानंतर तिथे अश्लीलता असू नये असे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवतानाच स्पष्ट केले होते. त्यामुळे नव्या अटींनुसार डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक आहे आणि सीसीटीव्हीचे थेट कनेक्शन नजीकच्या पोलिस स्थानकाला जोडलेले असले पाहिजे.
गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील 'संघर्षयात्रे'चा प्रदर्शनासाठी संघर्ष
- मुंबई, दि. १७ - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारीत 'संघर्षयात्रा' चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा रखडण्याची शक्यता आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी १९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. तशा जाहीरातीही प्रसिध्द झाल्या होत्या.मात्र गोपनीथ मुंडे यांच्या कन्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्याने पुन्हा या चित्रपटाचे प्रदर्शन रखडण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांनी सेन्सॉर मंडळाला पत्र लिहून चित्रपटाला परवानगी न देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे पुन्हा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. हा चित्रपट आधी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण त्यावेळी अन्य कारण सांगून प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. शरद केळकरने गोपीनाथ मुंडे यांची तर, श्रुती मराठेने पंकजा मुंडे यांची व्यक्तीरेखा साकारली आहे.चित्रपटाच्या प्रसिध्दीमध्ये कलाकार व्यस्त असताना पहिल्यांदा या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. चित्रपटाबद्दल पंकजा यांना नेमके काय आक्षेप आहेत त्याबद्दल चित्रपटाशी संबंधित कोणीही बोलायला तयार नाहीत.
२८ वर्षानंतर शाहरुखने स्वीकारली ग्रॅज्युएशनची पदवी
- नवी दिल्ली, दि. १७ - बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरुख खानने कॉलेज सोडल्यानंतर तब्बल २८ वर्षांनी मंगळवारी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये जाऊन ग्रॅज्युएशनची पदवी स्वीकारली.हा माझ्यासाठी विशेष क्षण आहे. १९८८ साली मी कॉलेज सोडले त्यानंतर आज कॉलेजमध्ये आलो आहे. मला याप्रसंगी माझ्या मुलांची उणीव जाणवतेय. ते माझ्यासोबत आलेले नाहीत. त्यांना मला माझ्या कॉलेजचा प्रत्येक कोपरा दाखवायचा होता असे शाहरुखने पदवी स्वीकारताना सांगितले.शाहरुखच्या पदवीदान सोहळयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनीकॉलेजमध्ये प्रवेश करणारी शाहरुखची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. असहिष्णूतेसंदर्भात शाहरुखने केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी एबीव्हीपीने आंदोलन केले.
मराठवाड्यात ४३ दिवसात १२४ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली
- औरंगाबाद, दि. १७ - दुष्काळ, अवकाळी, गारपीट आणि पूर्वमोसमी पाऊस अशा चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सततची नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे नैराश्य येऊन मराठवाड्यात या वर्षीच्या सुरवातीच्या ४३ दिवसात १२४ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. म्हणजेच दिवसाला सरासरी तीन शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं आहे.मराठवाडा विभागीय आयुक्ताच्या कार्यालयातून मिळालेल्या आकडीवारीनुसार या वर्षीच्या १२ फेब्रुवारी पर्यंत मराठवाठ्यात १२४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मराठवाड्यात २०१५ मध्ये ११३० तर २०१४ मध्ये ५५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. प्रत्येक वर्षाला हा ग्राफ वाढत असल्याचे दिसते आहे.गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची विविध कारणे सांगितली जात आहेत. त्यात दुष्काळ, अवकाळी, गारपीट आणि पूर्वमोसमी पाऊस, पाण्याचे तुरक प्रमाण, नापीक जमीन शेतकऱ्यांचा कर्जबाजारी पणा अशी अनेक प्रमुख कारणे आहेत.
चिक्की घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीस राज्य सरकारचा नकार
- मुंबई : चिक्की घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्यास मंगळवारी राज्य सरकारने नकार दिला. ही चौकशी राज्याच्या मुख्य सचिवांद्वारेच केली जाईल, अशी ठाम भूमिका सरकारने उच्च न्यायालयात घेतली. उच्च न्यायालयानेही यावर आक्षेप न घेता ही चौकशी सुरू ठेवण्यास परवानगी दिली.महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एका दिवसात २४ अधिसूचना काढत आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांसाठी चिक्की, चटई, प्लेट विकत घेण्यासाठी कंत्राट दिले होते. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप नवी मुंबईचे सचिन अहिर यांनी केला आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमावे व या पथकावर न्यायालयाने देखरेख ठेवावी, अशी मागणी अहिर यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे.
रुरकेला; सिमीच्या 4 दहशतवाद्यांना अटक
रुरकेला - ओडिशातील रुरकेला येथे स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाच्या (सिमी) चार संशयित दहशतवाद्यांना आज (बुधवार) सकाळी अटक करण्यात आली आहे.
राज्य गुप्तचर विभागाचे विशेष पोलिस महासंचालक अरुण सारंगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशा, तेलंगण पोलिस आणि गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या कारवाई करत या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. स्टिल सिटी म्हणून ओळख असलेल्या रुरकेला शहरातील माला रोड भागातून यांना अटक करण्यात आली. सिमीशी संबंधित असलेले हे चौघेजण चार-पाच वर्षांपासून येथे राहत होते. कारवाईदरम्यान यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही याला चोख प्रत्युत्तर दिले.
मोहम्मद खालिद, अमजद खान, झाकीर हुसेन आमि एस. के. मेहबूब अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघेही मध्य प्रदेशातील खांडवा भागातील रहिवाशी आहेत. त्यांच्यावर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच हे काही दहशतवादी कृत्यांमध्येही सहभागी होते. यांच्याकडून पाच बंदुका आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
==========================================...तर राष्ट्रपतीजी मी आत्महत्या करेन; तेरा वर्षाच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रपतीना पत्र
वडोदरा (गुजरात)- राष्ट्रपतीजी मुख्याध्यापकांनी माझे लैंगिक शोषण केले असून, मला दहा दिवसांमध्ये न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेल. एका तेरा वर्षांच्या विद्यार्थिनीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्रात म्हटले आहे.
आनंद जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील आठवीच्या वर्गात एक विद्यार्थिनी शिकत आहे. मुख्याध्यापक किरण म्हस्के यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे.
विद्यार्थिनीने राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘दहा दिवसांमध्ये न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेल. माझ्या कुटुंबीयांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला शाळेतील 4 अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरावे.‘ दरम्यान, असा कोणातही प्रकार घडला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
==========================================
कारगिल युद्ध हे खंजीर खुपसण्यासारखे- शरीफ
इस्लामाबाद- कारगिल युद्ध म्हणजे भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे होते, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
‘वाजपेयी साहेबांच्या जागेवर मी असतो तरी सुद्धा हेच बोललो असतो. भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. पण, नाव घेऊ शकत नाही,‘ असेही शरीफ म्हणाले.
==========================================
अपघातमुक्त नागपूरचे प्रणेते राजू वाघ
नागपूर - दरवर्षी रस्त्यांवरच्या अपघातात शेकडो जखमी होतात, तर अनेक मृत्युमुखी पडतात. एका व्यक्तीचा अकाली मृत्यू म्हणजे एका संपूर्ण कुटुंबावरच आघात ठरतो. एकदा घराबाहेर पडलेला आपला आप्तस्वकीय, सुखरूप घरी पोहोचेलच, याची कोणतीही शाश्वती नसते. महत्त्वाचे म्हणजे अपघातग्रस्ताला वेळेवर मदत न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक असते. अशा अपघातग्रस्तांसाठी नागपूरचा राजू वाघ हा साक्षात देवदूतच ठरला.
2001 साली त्रिमूर्तीनगर येथील एका अपघातापासून त्यां
ना अपघातमुक्त नागपूरची प्रेरणा मिळाली. जेव्हा त्या अपघातात केवळ वेळेवर मदत न मिळाल्यामुळे एका अपघातग्रस्ताचा मृत्यू झाला. माणसे भीतीपोटी फक्त बघ्याची भूमिका घेतात आणि अपघातग्रस्ताला वेळेवर मदत करण्यास पुढे येत नाहीत. दरवर्षी नागपुरात तीनशे ते चारशे माणसे अपघातात मृत्यू पावतात तर पंधराशेच्या वर जखमी होतात. यातही अनेक अपघातांची नोंदही होत नाही. अपघातमुक्त नागपूर या उपक्रमाच्या माध्यमातून, राजू वाघ यांनी आजवर दोनशेच्या वर अपघातग्रस्तांना मदत केली आहे. अपघातमुक्त नागपूरचे एक रोल मॉडेलच त्यांनी रिंगरोडवरील आयटी पार्क ते बंडू सोनी ले-आउटपर्यंत निर्माण केले. या भागातील प्रत्येक घरी व्यक्तिश: भेटून, अपघातमुक्त व्यक्ती, अपघातमुक्त परिवार, अपघातमुक्त परिसराबाबत जनजागृती राबवली. या ठिकाणी बॅनर, स्टीकर, फलक लावून लोकांची मानसिकता तयार करण्याचे कार्य त्यांनी केले. शासन फक्त नियम किंवा कायदे बनवू शकते, त्याचे पालन मात्र लोकांनाच करावे लागेल. विशेष म्हणजे हे कार्य राजू वाघ कोणत्याही पुरस्काराच्या भावनेपलीकडे मागील 16 वर्षांपासून सातत्याने करताहेत. त्यांच्या अपघातमुक्त नागपूरचे हे मॉडेल नुकतेच कळमेश्वर तसेच नागपुरातील अनेक जिल्ह्यांनी स्वीकारले आहे,
==========================================इस्लामाबाद; भारतीय प्रियकरावर पाकमध्ये हेरगिरीचा गुन्हा
सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकच्या माध्यमातून हमिद नेहाल अन्सारी याची पाकिस्तानमधील युवतीशी ओळख झाली होती. हमिद प्रेयसीला भेटण्यासाठी नोव्हेंबर 2012 मध्ये अफगणिस्तानमधून पाकिस्तानमध्ये गेला होता. एका हॉटेलमध्ये त्याने वास्तव्य केले होते. पोलिसांनी त्याला लष्कराच्या ताब्यात दिले होते. गेल्या तीन वर्षांपासून तो कारागृहात खितपत पडला आहे. लष्कराच्या न्यायालयाने त्याच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पेशावरमधील मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. दरम्यान, हमिदचे कुटुंबीय त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत.
==========================================
पुण्यात पाणीपट्टीत अखेर बारा टक्के वाढ
पुणे - शहरात 24 तास समान व शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेअंतर्गत पाणीपट्टीमध्ये 12 टक्के वाढ करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आठ तासांच्या चर्चेनंतर मतदानाने मंजुरी दिली. महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला. कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने प्रस्तावास विरोध केला.
पाणीपट्टीत पहिल्या वर्षी म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षापासून 12 टक्के; तर पुढील चार वर्षे प्रत्येकी 15 टक्के दरवाढ होणार आहे. स्पेशल पर्पज व्हेईकलऐवजी (एसपीव्ही) महापालिका स्वतः या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. पाणीपट्टी, नळजोड देणे, नळदुरुस्ती करणे, टॅंकरने पाणी देणे, बिगरघरगुती वापर, मीटरभाडे, लायसन्स प्लंबर शुल्क, नळ देताना घ्यावयाचा कायमस्वरूपी दर यामध्ये वाढ झाली आहे. 24 तास समान पाणीवाटप योजनेसाठी सुमारे 2900 कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्र व राज्य सरकार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांच्या मदतीने महापालिका हा प्रकल्प पूर्ण करणार आहे.
==========================================महाराष्ट्रासह देशभरात लवकरच ई-टोल - गडकरी
मुंबई - टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरात ई-टोल सुरू करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. 16) येथे केली. ई-टोल प्रणालीत वाहनावर ई-स्टिकरचा वापर करण्यात येणार असून, हे स्टीकर बॅंकांमध्ये उपलब्ध होणार आहेत.
मेक इन इंडिया सप्ताहाला भेट दिल्यानंतर गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की देशभरात यापुढे वाहनांना ई-स्टिकर देण्यात येतील. ई-स्टिकर वाहनचालकांना बॅंकेमार्फत खरेदी करता येणार असून, ते पुन्हा रिचार्जसुद्धा करता येणार आहेत. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी असणाऱ्या टोल नाक्यांवर वाहनांना विनाअडथळा प्रवास करता येईल. महाराष्ट्रासह देशभरातील वाहनांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. ई-स्टिकरसंदर्भात बॅंकांसोबत बोलणी झाली आहेत.
==========================================
No comments:
Post a Comment