Saturday, 20 February 2016

शाहिर अण्णाभाऊ साठे विद्यालयात निरोप व पालक मेळावा संपन्न

 शाहिर अण्णाभाऊ साठे विद्यालयात निरोप व पालक मेळावा संपन्न "
" शाहिर अण्णाभाऊ साठे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपुर्ण निरोप "
मुखेड :-
     शाहिर अण्णाभाऊ साठे विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना येणा-या परीक्षेत निर्भयपणे यशाचे शिखर गाठण्यासाठी व विद्यालयाची उज्वल यशांची परंपरा कायम ठेवण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी 17 फेब्रुवारी रोजी निरोप व पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले भावपुर्ण मनोगत व्यक्त करत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. याकार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रा.डाँ.पंडित आनंदराव शिंदे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.बी.जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मुख्याध्यापक एस.वाय.बारमाळे, माजी उपप्राचार्य जी.एम.कांबळे, पालक प्रतिनिधी मंगेश कोडगीरे, प्रा.पांडुर्णीकर, भांगे सर, पर्यवेक्षक पी.बी.चल्लावार, जायनुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष रियाज शेख आदी उपस्थित होते. याप्रसंगी नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन दहावीच्या विद्यार्थ्यांना भावी कार्यास भावपुर्ण शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेबद्दल आवडत्या शिक्षकवृंदाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केले. पालकप्रतिनिधी म्हणुन प्रा.भालचंद्र गांजरे, जायनुरे मामा, प्रा.पांडुर्णीकर, यांनी शाळेने राबवीत असलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रशंसा केली. याकार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अविनाश घाटे यांनी शुभेच्छा संदेश पाठवुन कार्यक्रमास शूभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बी.जी.वडजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षीका, कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

No comments: