Sunday, 28 February 2016

नमस्कार लाईव्ह २७-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- एका गोळीस उत्तर अनेक गोळ्या; दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर - राजनाथसिंह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- 'मन की बात'मध्ये मोदींसोबत सचिन, विश्वनाथन 
३- सत्ता शिवसेना-भाजपच्या डोक्यात गेलीय, शरद पवारांचा घणाघात 
४- फौजदारी कायद्यामध्ये दुरुस्ती हवी - प्रणव मुखर्जी  
५- अहमदाबाद; मनमोहनसिंग यांचा दौरा भाजपमुळेच रद्द - वाघेला 
६- रोहितच्या आईने घेतली सोनिया गांधींची भेट 
७- स्मृती इराणी यांच्याविरुद्ध हक्कभंग 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- ठाणे; एकाच कुटुंबातील 14 जणांची हत्या, आरोपीची आत्महत्या 
९- शिवसेनेचं चांगलं काम दिसत नाही, मारहाण लगेच डोळ्यावर : उद्धव 
१०- केंद्राने थकविले राज्याच्या वाट्याचे 2500 कोटी 
११- ..म्हणून मुंबई पोलिसांचे व्हॉट्सअॅप डीपी एकसारखे 
१२- महिला पोलिसाला मारहाणीचा राजकीय संबंध नाही : प्रवीण दीक्षित 
१३- चेन्नई; अब्दुल कलाम यांचे वैजानिक सल्लागार राजकारणात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- सिमला; 'पठाणकोट शहीदांच्या सन्मानार्थ भारत-पाक मॅच रद्द करा ' 
१५- गोरेगाव; प्लॅटफॉर्मवरील व्यक्तीला टपली मारताना खांबावर आदळून मृत्यू 
१६- संकटातील बळिराजाला हवे जगण्याचे बळ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- प्रेशर में खुद से लढकर टीम को जिता देते है, उसे विराट कोहली कहते है : अख्तर 
१८- भारताचा पाकिस्तानवर 'विराट' विजय 
१९- पती आणि सासूने हुंडयासाठी माझा छळ केला - करिष्मा कपूर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, भोकर, मुदखेड, हिमायतनगर तालुक्यात गारपीट 
२१- भवनिकता हेच आंबेडकरी चळवळीच्या ऱ्हासाची कारण - डॉ. रावसाहेब कसबे 
२२- मालेगाव येथे ट्रकची तीन घरांना धडक, एक महिला जखमी 
२३- नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीची जम्बो कार्यकारणी जाहीर 
२४- हेमंत पाटील मंत्री हवेत; आमच्या त्यांना पाठींबा; चव्हाणांची टोलेबाजी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
ज्ञानेश्वर सुनेगावकर, शिवश्री पाटील, ऋषी गायकवाड, अजय वाठोरे, नरेश सोमाणी, सोनू चिन्नामवार, शंकर गरदासवार, सचिन धुतुरे, रितेश तेहरा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि आल्याशिवाय डोळे उघडत नाही
(पंकज पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


==========================================

ठाण्यात एकाच कुटुंबातील 14 जणांची हत्या, आरोपीची आत्महत्या

ठाण्यात एकाच कुटुंबातील 14 जणांची हत्या, आरोपीची आत्महत्या
ठाणे : एका भीषण हत्याकांडामुळे ठाण्यातील कासारवडवली परिसर हादरला आहे. आपल्याच कुटुंबातील 14 जणांची हत्या करुन आरोपीने आत्महत्या केली आहे, शनिवारी रात्री ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. ठाण्याच्या कासारवडवली परिसरातील वडवली मशिदीजवळ हे हत्याकांड घडलं.
वरेकर कुटुंबातील चौदा जणांची सुरीने भोसकून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्यांमध्ये 7 मुलं, 6 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. एक महिला जखमी असल्याची माहिती आहे. त्यानंतर आरोपी हस्नील वरेकरने स्वतःचंही आयुष्य संपवलं. या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
==========================================

'मन की बात'मध्ये मोदींसोबत सचिन, विश्वनाथन

'मन की बात'मध्ये मोदींसोबत सचिन, विश्वनाथन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी रेडिओवरुन ‘मन की बात’ करत आहेत. यावेळी क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि चौसष्ट घरांचा सम्राट विश्वनाथन आनंदही त्यांच्यासोबत असतील. बोर्डाच्या परीक्षांबाबत मोदी आपले विचार मांडणार आहेत.
पंतप्रधानांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. मन की बातचा हा 17 वा भाग आहे. गेल्या महिन्यात म्हणजे 31 जानेवारी रोजी त्यांनी खादीला उत्तेजन, स्टार्ट अप मोहिमेबाबत माहिती दिली होती.
मन की बातमधून पंतप्रधान मोदी अनेक समस्या, प्रश्नांवर आपलं मत व्यक्त करतात. देशभरातील अनेक नागरिकांचे कान मोदींच्या भाषणाकडे लागून राहिले असतात.
==========================================

शिवसेनेचं चांगलं काम दिसत नाही, मारहाण लगेच डोळ्यावर : उद्धव

शिवसेनेचं चांगलं काम दिसत नाही, मारहाण लगेच डोळ्यावर : उद्धव
मुंबई : ठाण्यात महिला कॉन्स्टेबलला मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांवर टीका केली आहे. महिला कॉन्स्टेबलला मारणारा शिवसैनिक तुम्ही शोधलात, तसा दोन मुलींचे जीव वाचवणाऱ्या रमेश वाळुंजचा तुम्ही कुठेही ठळकपणे शिवसैनिक असा उल्लेख का केला नाही, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
महिला कॉन्स्टेबलला मारहाण करणारा कोणीही असो, त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
वांद्र्यात सेल्फी घेताना बुडणाऱ्या मुलींचे प्राण वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या रमेश वाळुंजचा कुठेही ठळकपणे शिवसैनिक असा उल्लेख केला नाही, मात्र दुर्दैवाने मारहाणीच्या प्रकरणात शिवसेनेशी संबंधित व्यक्ती आढळल्यास तिला लगेच राजकीय पक्षाशी जोडलं जात असल्याचं ते म्हणाले.
ठाण्याच्या घटनेनंतर पोलीस महासंचालक दीक्षित यांनी त्या घटनेत राजकीय संबंध असल्याची शक्यता फेटाळली आहे.
==========================================

सिमला; 'पठाणकोट शहीदांच्या सन्मानार्थ भारत-पाक मॅच रद्द करा '

'पठाणकोट शहीदांच्या सन्मानार्थ भारत-पाक मॅच रद्द करा '
सिमला : धर्मशालामध्ये येत्या 19 मार्च रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा टी20 क्रिकेट विश्वचषकातील सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहीदांच्या सन्मानार्थ हा सामना रद्द करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते, हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी केली आहे.
पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ हा सामना रद्द करावा, अशी मागणी शांता कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मागणी केली आहे.
‘हिमाचल प्रदेश ही साहसी जवानांची भूमी आहे. पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्यात धारातीर्थी पडलेले जवान याच भूमीचे पुत्र होते. मॅच होणाऱ्या स्टेडिअमपासून काही अंतरावरच त्यांचं स्मारक आहे.’ असं पत्र लिहून शांता कुमार यांनी मॅच रद्द करण्याचं म्हटलं आहे.
==========================================

प्रेशर में खुद से लढकर टीम को जिता देते है, उसे विराट कोहली कहते है : अख्तर



ढाका : पाकिस्तानला अवघ्या 83 धावात गुंडाळल्यानंतर भारत सहजासहजी सामना जिंकेल अशी आशा तमाम भारतीयांना होती. मात्र मोहम्मद आमीरच्या पहिल्याच षटकात रोहित शर्मासारखा बुरुज शून्यावर ढासळला, त्यानंतर लगेचच अजिंक्य रहाणेसारखा महत्त्वाचा कडा कोसळला. मग सारी मदार सुरेश रैनावर एकवटली असताना, मोहम्मद आमीरचा तोफखाना पुन्हा धडाडला आणि रैनाही कोसळला…भारताची अवस्था 3 बाद 8. 
समोर मोहम्मद आमीरचे वायूवेगाने जाणारे चेंडू पाहून संपूर्ण देशाची धडधड क्षणाक्षणाला वाढत होती. मात्र जगातला सर्वात स्टायलिश फलंदाज विराट कोहली मैदानात पहाडासारखा उभा होता. त्याच्या दुसऱ्या बाजूला नेटाने फलंदाजी करू, असा विश्वास घेऊन युवराज सिंह होता. 
3 बाद 8 अशा कोसळलेल्या फलंदाजीच्या जखमा घेऊन कोहली – युवराज नेटाने उभे राहिले. उसळणारे चेंडू सोडले..एक चूकही महागात पडू शकते., हे त्यांनी पुरतं ओळखलं होतं. समोर मोहम्मद आमीरच्या साथील सात फुटाचा मोहम्मद इरफान आणि पाकिस्तानचं खास अस्त्र मोहम्मद सामी होते. या तिघांच्या वेगवान माऱ्याने विराट-युवराजला काही वेळ हलू दिलं नाही. 
मात्र जगाला हेवा वाटावा अशी फलंदाजी कोहलीने केली. कोहलीने आधी उसळणाऱ्या खेळपट्टीवर जम बसवला. अडखळत खेळणाऱ्या युवराजला धीर दिला आणि मग वेळ मिळेल, चेंडू येईल तशी फटकेबाजी केली.
भारताची ही जोडी एकदा सेट झाल्यानंतर पाकिस्तानचा आधीच सुटलेला धीर पुरता निसटला. मोहम्मद आमीरने पहिल्या षटकात पाकिस्तानला विजयाची आशा दाखवली होती. मात्र विराट ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, त्याचं कौतुक करताना, ना वासिम आक्रम थकत होता ना शोएब अख्तर…
==========================================

..म्हणून मुंबई पोलिसांचे व्हॉट्सअॅप डीपी एकसारखे

..म्हणून मुंबई पोलिसांचे व्हॉट्सअॅप डीपी एकसारखे !
मुंबई : वर्दीवर हात उचलण्याचं धाडस वाढताना दिसत आहे. लातूरच्या पानगावमध्ये पोलिसांना झालेली मारहाणीची घटना ताजी असताना, ठाण्यातही महिला वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण झाली. राजकीय आशिर्वादामुळेच पोलिसांना मारहाण होत असल्याचा आरोप होत आहे.
पोलीस वगळता इतर कोणत्याही सरकारी कर्मचारऱ्यांऩा मारहाण झाली असती, तर संप पुकारले गेले असते. पण मनात असूनसुद्धा ड्युटी करावी लागते, अशी भावना पोलिसांमध्ये आहे. हीच भावना मनात ठेवून, पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुपचे डीपी एकसारखे ठेवून पोलिसांना झालेल्या मारहाणीच्या निषेध नोंदवला आहे.
मुंबई पोलिसांतील अनेकांनी स्वत:चे आणि व्हॉट्स ग्रुपचे फोटो एकसारखे ठेवले आहेत. या फोटोवर ‘आम्ही सर्व पोलीस एक आहोत’ असा मजकूर लिहिला आहे.
==========================================

भारताचा पाकिस्तानवर 'विराट' विजय

भारताचा पाकिस्तानवर 'विराट' विजय
ढाका: विराट कोहली आणि युवराज सिंह यांच्या संयमी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हाय होल्टेज सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 विकेट्स राखून धूळ चारली. कोहलीचं अर्धशतक एका धावेने हुकलं असलं तरी त्याच्या फलंदाजीने भारतीयांचीच नव्हे तर पाकिस्तानी चाहत्यांचीही मनं जिंकली.
धोनीच्या टीम इंडियानं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात करून आशिया चषकात आपला सलग दुसरा विजय साजरा केला. मिरपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात गोलंदाजांचंच वर्चस्व पाहायला मिळालं.
आधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 83 धावांवर गुंडाळलं. हार्दिक पंड्यानं तीन तर रवींद्र जाडेजानं दोन विकेट्स काढल्या. त्यानंतर विजयासाठी 84 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचीही पडझड झालेली पाहायला मिळाली.
==========================================

प्लॅटफॉर्मवरील व्यक्तीला टपली मारताना खांबावर आदळून मृत्यू

प्लॅटफॉर्मवरील व्यक्तीला टपली मारताना खांबावर आदळून मृत्यू
मुंबई : मुंबई लोकलमधील मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवरच्या व्यक्तीला टपली मारण्याच्या नादात, समोरच्या खांबावर धडकून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव स्टेशनवर काल दुपारी ही घटना घडली.
मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये मस्ती करणं, कसं जीवावर बेतू शकतं हे पुन्हा स्पष्ट झालं आहे.
==========================================

महिला पोलिसाला मारहाणीचा राजकीय संबंध नाही : प्रवीण दीक्षित

महिला पोलिसाला मारहाणीचा राजकीय संबंध नाही : प्रवीण दीक्षित
पुणे एकीकडे महाराष्ट्रभर पोलिस राजकीय गुंडांच्या मुजोरीला बळी पडत आहेत. तरीही पोलीस महासंचालकांना मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप दिसेनासा झाला आहे. कारण ठाण्याच्या घटनेनंतर पोलीस महासंचालक दीक्षित यांनी त्या घटनेत राजकीय संबंध असल्याची शक्यता फेटाळली आहे. ते पुण्यात बोलत होते.
 ठाण्यात दिवसाढवळ्या महिला पोलिसावर शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखानं हात उचलला. नाकातोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली. पोलिसांच्या अब्रूची लक्तरं काढली. त्यानंतर पोलिसांवर दबाव आणण्यासाठी फोनाफोनी केली. तरीही पोलीस महासंचालकांना मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप दिसेनासा झाला आहे.
 हर्सुल दंगल, पलूसमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यानंतर गावागावात पोलिस अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले पोलिसांचं मनोबल खच्ची करणारे आहेत. अशावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना धीर देण्याऐवजी गांधारीची भूमिका घेऊन राजकीय बाजू पत्करणं किती योग्य आहे? हा प्रश्न आता विचारला जातो आहे.
==========================================

सत्ता शिवसेना-भाजपच्या डोक्यात गेलीय, शरद पवारांचा घणाघात

सत्ता शिवसेना-भाजपच्या डोक्यात गेलीय, शरद पवारांचा घणाघात
मुंबई : सत्ता येते आणि जाते पण ती सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी शिवसेना-भाजपला दिला आहे. मुंबईमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. सत्ता शिवसेना भाजपच्या डोक्यात गेली आहे, अशी घणाघाती टीकाही शरद पवारांनी सेना-भाजपवर केली.
पानगावला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाला. हे बरोबर नाही. ठाण्यातही महिला पोलीसावर हल्ला झाला, असे म्हणत शरद पवारांनी पोलिसांवर वाढत्या हल्ल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
समाजात अस्वस्थता पवार
समाजात अस्वस्थता आहे. विशिष्ट लोकांवर लक्ष्य केंद्रित करून काही गोष्टी सुरू आहेत. सत्तेच्या आधारावर वेगळ्या विचारांच्या लोकांना संपवायचं काम सुरु आहे. रोहित वेमुलाच्या हत्येवरुनही पवारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जेएनयूमध्ये काय चललंय असा सवालंही यानिमित्तानं पवारांनी उपस्थित केला.
==========================================

अब्दुल कलाम यांचे वैजानिक सल्लागार राजकारणात


  • चेन्नई, दि. २८ - भारताचे दिवंगत राष्ट्रपती आणि प्रसिध्द वैज्ञानिक अब्दुल कलाम यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही.पोनराज राजकारणात प्रवेश करणार आहेत. पोनराज यांनी शनिवारी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. 
    रविवारी रामेश्वरम येथे अब्दुल कलाम स्मारकाचे दर्शन घेतल्यानंतर ते त्यांची पुढील राजकीय वाटचाल, राजकीय पक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. अब्दुल कलाम यांना अभिप्रेत असलेले तामिळनाडू घडवूया असे त्यांनी तामिळनाडूच्या जनतेला आवाहन केले आहे. 
    युवकांच्या संम्मेलनाला संबोधित करताना पोनराज यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. पोनराज यांच्या राजकारण प्रवेशाचे समर्थन करण्यासाठी विविध जिल्ह्यातून युवक मोठया संख्येने आले होते. बदलासाठी नव्हे तर, तामिळनाडूचे विकसित राज्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी राजकारणात प्रवेश करत असल्याचे पोनराज यांनी सांगितले.
==========================================

फौजदारी कायद्यामध्ये दुरुस्ती हवी - प्रणव मुखर्जी 

  • कोची : सध्या देशभर देशद्रोह कायद्याची व्याप्ती आणि अर्थ यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी १५५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या भारतीय दंड विधानात म्हणजेच फौजदारी कायद्यात (इंडियन पीनल कोड-आयपीसी) बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन येथे केले.
    पोलीस दलही गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने काम करीत आहे. मात्र जगभरात पोलीस दलात व व्यवस्थेत अनेक बदल झाले असून, त्याच प्रकारे भारतातील पोलीस व्यवस्थाही बदलणे आवश्यक बनले आहे, असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.
    भारतीय दंड विधानाला १५५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने कोचीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, ब्रिटिशांनी तयार केलेल्या या कायद्याची अनेक कलमे आज कालबाह्य झाली आहेत. अनेक नवे गुन्हे समोर येत असून, त्यांच्याबाबतीत कायद्यात तरतुदी नसल्याचे जाणवत आहे. त्यापैकी काही गुन्हे शिक्षापात्र असले तरी जुन्या कायद्यात त्याविषयी उल्लेख नसल्याचेही आढळून येत आहे.
    अशा परिस्थितीत आयपीसीमध्ये कालानुरूप अनेक बदल करणे गरजेचे आहे. आर्थिक गुन्ह्यांची संख्या वाढत असून, त्यामुळे देशाच्या विकासात, प्रगतीत अडथळे येत आहेत. अशा गुन्ह्यांसाठी अधिकाधिक कडक कायदे आवश्यक आहेत, असे प्रणव मुखर्जी यांनी नमूद केले.
    अनेकदा पोलीस ज्या प्रकारे कारवाई करतात, त्यावरून त्यांची जनमानसातील प्रतिमा बनत असते. एकतर्फी कायदा लागू करण्याच्या भूमिकेतून बाहेर येत पोलिसांनी पुढे जाणे गरजेचे आहे, असे पोलीस व्यवस्थेतील सुधारणांविषयी त्यांनी बोलून दाखवले.
==========================================

पती आणि सासूने हुंडयासाठी माझा छळ केला - करिष्मा कपूर


  • मुंबई, दि. २८ - बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरच्या वैवाहिक आयुष्यातील वाद विकोपाला गेला आहे. करिष्माने मुंबईतील खार पोलिस स्थानकात पती संजय कपूर विरोधात हुंडयासाठी छळकेल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस लवकरच संजय कपूरला चौकशीसाठी बोलवू शकतात. 
    घटस्फोट आणि मुलांचा ताबा मिळवण्यासाठी दोघांमध्ये आधीपासूनच कायदेशीर लढाई सुरु आहे. करिष्माच्यावतीने तिच्या वकिलांनी पोलिसांना एक अर्ज दिला. त्यात करिष्माने पती संजय कपूरवर शारीरीक छळ केल्याचा आरोप केला आहे. 
    आम्ही तक्रार दाखल केली असून, आरोपांच्या आधारावर चौकशी करु. येत्या आठवडयात संजय आणि त्याच्या आईची चौकशी करु असे खार पोलिस स्थानकातील अधिका-याने सांगितले. २०१२-१३ मध्ये या दोघांनी मिळून आपला छळ केला असे करिष्माने तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी करिष्मा त्यांच्याबरोबर खार येथे रहात होती. चौकशीपूर्वी कोणालाही अटक करणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 
==========================================
केंद्राने थकविले राज्याच्या वाट्याचे 2500 कोटी
ग्रामीण भागातील चित्र; आश्‍वासनांवर बोळवण 
मुंबई - निधीअभावी ग्रामीण भाग पक्‍क्‍या रस्त्यांनी जोडण्याच्या धोरणाचा बट्ट्याबोळ झाला असून, केंद्र सरकारने राज्याच्या वाट्याचा तब्बल 2500 कोटी रुपयांचा निधी थकविल्याने राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याची माहिती मंत्रालयातील ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या निधीबाबत मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न करूनही केंद्राकडून केवळ आश्‍वासने मिळत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

केंद्र सरकारने 2001 मध्ये ग्रामीण भागातील गावे मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना अमलात आणली. तीन वर्षांपासून या योजनेचा निधी राज्याला वेळेत प्राप्त झाला; परंतु केंद्रात सत्तांतर झाल्यापासून, म्हणजेच 2014 पासून या योजनेच्या पैशांना गळती सुरू झाली. 2014 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी राज्याच्या वाट्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली. त्यानंतर 2014-15 या वर्षासाठी 207 कोटी, तर 2015-16 साठी 358 म्हणजेच एकूण 565 कोटी रुपयांचा निधी वितरित केला. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या वाट्याचे तब्बल 2435 कोटी रुपये केंद्राकडे थकले आहेत. राज्य सरकारने या निधीसाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला असून यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना भाग-1 अंतर्गत 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 25 वाड्या-वस्त्या जोडण्याचा प्रस्ताव टप्पा-13 अंतर्गत केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी चार महिन्यांपूर्वी पाठविला असून, त्याला अद्यापपर्यंत केंद्राची मान्यता मिळाली नाही. केंद्राने पैसे देताना हात आखडता घेतल्याने आधी झालेल्या कामांची तब्बल 530 कोटी रुपयांची बिले प्रलंबित असल्याने कंत्राटदारांनी कामे बंद केली आहेत. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत प्रादेशिक आढावा बैठकांमध्येही राज्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करण्याची मागणी राज्याने केली. यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी एक जून 2015 रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि ग्रामविकासमंत्री यांची दिल्लीत भेट घेऊन निधीची मागणी केली. तसेच, एक ऑगस्ट 2015 रोजी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे निधीची मागणी केली. मात्र, आजपर्यंत केंद्र सरकारने राज्याच्या मागणीची दखल घेतली नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. 
==========================================
संकटातील बळिराजाला हवे जगण्याचे बळ
औरंगाबाद - मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांत आत्महत्या करणारे शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नाही आणि शेतीही जेमतेमच असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ‘सकाळ’ने केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. आजपर्यंत ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या नावावर अंदाजे एक लाख किंवा त्यापेक्षा थोडे अधिक कर्ज होते, असेही या सर्वेक्षणात आढळले असून, संकटातील शेतकऱ्याला जगण्याचे बळ देण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आज ‘सकाळ’ने राज्यातील जनतेसमोर मांडला आहे. २०१५ या वर्षभरात आत्महत्या झालेल्या प्रत्येक घरात जाऊन वस्तुस्थिती बारकाईने समजून घ्यावी, या हेतूने हे सर्व्हेक्षण केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत यापूर्वी विदर्भातही ‘सकाळ’ने अशी पाहणी केली होती. या वेळच्या सर्वेक्षणातील माहिती मांडताना केवळ आकडेवारीचे विश्‍लेषण केलेले नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची एकंदरीत परिस्थिती आणि त्या कुटुंबासमोर असलेले आव्हान समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्याबाबत इतर काही स्वयंसेवी संघटनांनी सर्वेक्षण केलेले असेल; मात्र मागील वर्षभरात आत्महत्या झालेल्या प्रत्येक घरात जाऊन ‘सकाळ’ने हे सर्वेक्षण केले आहे. यात ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक पातळीवर नेमकेपणाने केलेले हे सर्वेक्षण खरे पाहता दुखःदायक चित्र निर्माण करणारे त्यासोबतच एक नवी दिशा देणारेही आहे. 
==========================================
भाजप सरकारकडून सुडाचे राजकारण - शरद पवार 
मुंबई - सत्ताधारी भाजप सरकारवर सध्या देशातील जनता नाराज असून, ही नाराजी दुसरीकडे वळविण्यासाठी व या नाराजीपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपकडून देशद्रोह व राष्ट्रभक्ती यांसारखे मुद्दे उपस्थित करून सुडाचे राजकारण केले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलताना केली.
खासदार शरद पवार यांनी आपल्या भाषणात देशातील व राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारचे वाभाडे काढले. सत्तेच्या आधारे वेगळ्या विचारांच्या नेत्यांना संपविण्याचे काम सुरू आहे. सत्ता येताच सत्ताधारी पक्षाचे लोक हे पोलिस दलावरही हल्ला करू लागले आहेत. सत्ता येते व जाते त्यामुळे आपले पाय नेहमी जमिनीवरच ठेवायचे असतात. सत्तेची हवा डोक्‍यात जाऊ द्यायची नसते, असा टोला या वेळी त्यांनी शिवसेना-भाजप सरकारला लगावला.
सूरज परमार प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, की आमचा माणूस दोषी असेल तर मी त्यांना पाठीशी घालणार नाही. पण, परमार यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, त्यांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केली. परमार यांच्या चुकीच्या गोष्टींवर आमच्या नगरसेवकांनी बोट ठेवले, तर त्यांना दोषी ठरवून तुरुंगात डांबले जात आहे आणि हे सुडाचे राजकारण आहे. 
==========================================
मनमोहनसिंग यांचा दौरा भाजपमुळेच रद्द - वाघेला
अहमदाबाद - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा गांधीनगर येथील दौरा सुरक्षेचे कारण देत अखेरच्या क्षणी "स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप‘कडून (एसपीजी) रद्द झाल्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. हा दौरा रद्द होण्यामागे भाजपच आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे.

सुरक्षेचे कारण देत डॉ. मनमोहनसिंग यांच्या दौऱ्यास "एसपीजी‘ने हरकत घेऊन अखेरच्या क्षणी परवानगी नाकारली होती. वाघेला यांनी स्थापन केलेल्या एका शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाचे निमंत्रण डॉ. सिंग यांनी स्वीकारले होते. येथील एका इमारतीचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, डॉ. सिंग यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्‍यता व्यक्त करत राज्य सरकारने त्यांचा हा दौरा रद्द केला. हा भाजप आणि "एसपीजी‘ने आखलेला कट होता, असा आरोप वाघेला यांनी यानंतर केला आहे. "एसपीजी‘ने सांगितल्याप्रमाणे सुरक्षेच्या सर्व तरतुदींची पूर्तता करण्यात आली होती. एवढा मोठा खर्च आणि तयारी केल्यानंतर अखेरच्या क्षणी दौरा रद्द करण्यात आला. "एसपीजी‘वर पंतप्रधान कार्यालयाचे नियंत्रण असल्याचेच यावरून दिसून येते, अशी टीका वाघेला यांनी केली. भाजपाध्यक्ष अमित शहा यांचेही आज गुजरातमध्ये काही कार्यक्रम असून, त्यांना अधिक प्रसिद्धी मिळवून देण्यासाठीच भाजपने ही खेळी खेळली असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. 
==========================================
रोहितच्या आईने घेतली सोनिया गांधींची भेट 
नवी दिल्ली - हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेला दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आईने आणि भावाने आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर राजकीय नेत्यांची भेट घेतली. शैक्षणिक संस्थांमध्ये होत असलेला जातीभेद दूर करण्यासाठी "रोहित कायदा‘ तयार करण्यासाठी पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी या नेत्यांकडे केली. सोनिया गांधी यांच्याबरोबरच त्यांनी कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी आणि संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी या नेत्यांची भेट घेतली. रोहितला याप्रकरणी न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली.
==========================================
स्मृती इराणी यांच्याविरुद्ध हक्कभंग
रोहित वेमुलाप्रकरणी कॉंग्रेसचा निर्णय 
नवी दिल्ली - रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत दिलेली माहिती पूर्णपणे असत्य असल्याने त्यांच्याविरुद्ध हक्कभंग आणण्याचे कॉंग्रेसने आज जाहीर केले. मात्र, हक्कभंग प्रस्ताव लोकसभेत आणणार की राज्यसभेत, याबाबतचा निर्णय नंतर केला जाईल, असेही पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. रोहितच्या आत्महत्येला स्मृती इराणी, मंत्री बंडारू दत्तात्रेय आणि हैदराबाद विद्यापीठाचे उपकुलगुरू अप्पाराव पोडिले हेच जबाबदार असल्याच्या आरोपाचा कॉंग्रेसने पुनरुच्चार केला. 
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), तसेच हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाबाबत लोकसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान स्मृती इराणी यांनी आवेशात भाषण केले होते. या वेळी त्यांनी केलेल्या युक्तिवादामुळे विरोधी पक्ष निरुत्तर झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, खुद्द रोहितच्या आईनेच (श्रीमती राधिका) हा युक्तिवाद खोडून काढल्यानंतर राज्यसभेत आक्रमक झालेल्या विरोधकांपुढे स्मृती इराणीच नव्हे, तर संपूर्ण सरकारच बचावात्मक भूमिकेत गेल्याचे दिसले. स्मृती इराणी यांचे दावे पूर्णपणे असत्य असल्याची टीकाही विरोधकांनी केली होती. तसेच, या मुद्द्यावरून स्मृती इराणींविरुद्ध हक्कभंग आणण्याची चाचपणीही सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, राज्यसभेतील खासदार व माजी मंत्री कुमारी सेलजा, तसेच मनीष तिवारी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन स्मृती इराणींवर हक्कभंग आणणार असे जाहीर केले. 
==========================================
एका गोळीस उत्तर अनेक गोळ्या - राजनाथसिंह

पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना आज गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानने एक गोळी झाडली तर त्याला अनेक गोळ्यांनी उत्तर द्यावे लागेल, त्या वेळेस भारत गोळ्यांची संख्या मोजत बसणार नाही, असे खडे बोल त्यांनी सुनावले. उत्तराखंडमध्ये खटिमा येथे एका महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कथित देशविरोधी घोषणाबाजीचा मुद्दाही राजनाथसिंह यांनी उपस्थित केला. अशा प्रकारची घोषणाबाजी कोणत्याही स्थितीमध्ये सहन केली जाणार नाही, असे त्यांनी नमूद केले. 
आम्ही सर्व काही सहन करू शकतो; पण देशविरोधी घोषणाबाजी कोणत्याच परिस्थितीमध्ये खपूवन घेतली जाणार नाही, केंद्रात पुन्हा आमचे सरकार सत्तेत येईल की नाही, हे आम्हाला माहीत नाही; पण देशाची एकता आणि अखंडता यांच्याशी भाजप कधीच तडजोड करणार नाही, असे त्यांनी नमूद केले. या वेळी राजनाथसिंह यांनी लष्कराच्या जवानांचे तोंडभरून कौतुक केले. सीमेवरील गोळीबारास त्यांनी जशास तसे उत्तर द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
==========================================

No comments: