[अंतरराष्ट्रीय]
१- मॉलसाठी पेशावरमधील प्राचीन हिंदू मंदिर पाडले
२- नेपाळमध्ये २३ प्रवाशांना घेऊन निघालेले विमान पर्वतात कोसळले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य पोलिसांना शरण
४- मुंबईवरील हल्ल्यात ‘आयएसआय’च्या सहभागाची माजी प्रमुखांची कबुली
५- जवान शहीद होत असताना मशिदीत 'जीवे पाकिस्तान'च्या घोषणा
६- जो ' वंदे मातरम' म्हणणार नाही, तो भारतीय नाही - भाजपा नेता
७- संघाचे विचार थोपविण्याचा प्रयत्न-मायावती
८- राजीव गांधी हत्येतील दोषी नलिनी पॅरोलवर बाहेर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- नियम धाब्यावर बसवून बांधकाम अधिकृत? कोर्टाची फडणवीसांना चपराक
१०- म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आज 4275 घरांची सोडत
११- अलाहाबाद; गंगा स्वच्छ अभियानाच्या अधिकाऱ्यांचं गंगेतच मूत्रविसर्जन
१२- मुंबई; मारामारी महागात! 19 जणांना झाडू मारण्याची शिक्षा
१३- पंकजा मुंडेंचं वादग्रस्त पोस्टर फेसबुकवर व्हायरल
१४- महाराष्ट्र सरकारतर्फे पतंजलीला 547 एकर जमीन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपुरात 7 जणांवर गुन्हा
१६- चेन्नई; वाढदिवसाला कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण, हातावर जयललितांचा टॅटू
१७- औरंगाबाद; कॉपी पुरवण्यासाठी शिक्षकाची पैशाची मागणी, विद्यार्थींनीची पत्राद्वारे तक्रार
१८- कोल्हापूर; मुस्लीम बांधवही अंबाबाईच्या सेवेत
१९- तूरडाळीचे साठे पडून; विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यंतील शेतकऱ्यांना या सरकारी उदासीनतेची सर्वाधिक झळ
२०- नागपूर; गोपालच्या अवयवांनी तिघांना जीवदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- फेसबुकवर व्हर्च्युअल शुभेच्छांना लाईव्ह टच, एफबीचं नवं फीचर
२२- कपिल अँड टीमचं कमबॅक, कपिल शर्माच्या नव्या शोची पहिली झलक
२२- आशिया कप : भारताविरुद्ध पाकिस्तानची नवी चाल
२३- लिओनार्डोच्या ऑस्करसाठी करीनाची प्रार्थना
२४- कोहलीला विजय मिळाल्यास धोनीला हटवा: अजय जडेजा
२५- कायमची सिगारेट सोडण्यासाठी हा एक उपाय आहे!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
साईनाथ कदम, गजानन शिंदे, विक्रम मुधोळकर, श्रीनिवास पवार, हरमीत सिंघ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
=======================================
=======================================
=======================================

तुम्ही आता तुमच्या मित्राच्या बर्थडेला 15 सेकंदांचा व्हिडिओ पाठवून विश करु शकाल. सोमवारी फेसबुककडून या नव्या फीचरबाबत घोषणा करण्यात आली. मित्राच्या टाईमलाईनवर हा व्हिडिओ शेअर करुन तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही मित्राला खुश करु शकाल.
iOS डिव्हायसेसवर सोमवारपासून हे नवं फीचर रोलआऊट व्हायला सुरुवात झाली आहे. अँड्रॉईड यूझर्सना मात्र यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. बर्थ डे विशेस ध्यानात ठेवूनच हे फीचर तयार करण्यात आलं आहे. यावर अनेक बर्थडे थीम्स आणि फ्रेम्सचाही ऑप्शन असेल.
=======================================

=======================================

अलाहाबादमधील वरिष्ठ अधिकारी, सेव्ह गंगा प्रकल्पाच्या जिल्हास्तरीय पथकातील ओपी शर्मा यांनी चक्क गंगेतच मूत्रविसर्जन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मोदींच्या ‘नमामि गंगे’ मोहिमेत माध्यमांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं कौतुक करण्यासाठी शर्मा यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. नमामि गंगेचे टीशर्टही त्यांनी परिधान केले, मात्र टीशर्टच्या वरील संदेश त्यांच्या वृत्तीत उतरला नाही.
गंगेच्या किनारी जात मीडियाच्या उपस्थितीत खुल्यावरच त्यांनी नैसर्गिक विधी आटपला. आपल्याला मधुमेह असल्याने लघुशंका करण्यावाचून पर्याय नसल्याची सारवासारव त्यांनी आधी केली.
न्यूज’शी बोलताना त्यांनी नदीकिनारी मूत्रविसर्जन केल्याचा दावा खोडून काढला. आपण फक्त हात धुत होतो, मीडियाने आपल्या कृत्याचा विपर्यास केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

=======================================

=======================================

अंबरनाथमध्ये विमको आणि आयटीसी कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या अखात्यारित असलेल्या जमिनीवर अनधिकृतरित्या बांधकाम केलं. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ पालिकेला बांधकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. या स्थगितीला कंपन्यांकडून राज्य सरकारकडे आव्हान देण्यात आलं.
दरम्यान न्यायालयाने यावर संबंधित फाईल मागवली. या फाईलवर ‘मुख्यमंत्री फडणवीस योग्य ती कारवाई करा’ असा शेरा मारला होता. यावर कायद्याने तुम्हाला तसे करता येत नसून तुमच्या मंत्र्यांच्या मनात आले म्हणून बंदी उठवण्याचे आदेश देणे योग्य नाही असे कोर्टाने दरडावून सांगितले.
न्यायालयात अशा याचिकांवर युक्तिवाद केल्यास या याचिका न्यायालयात टिकणार नाही असं सांगत उच्च न्यायालयानं फडणवीस सरकारचे कान उपटले.
=======================================

राज्यातील सिंचन घोटाळ्यात वादग्रस्त ठरलेल्या एफए कंस्ट्रक्शन कंपनीचे 5 भागीदार आणि त्यांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे घोडाझरी कालव्याचे 101 कोटींचे कंत्राट मिळवून देण्यात मदत करणाऱ्या दोन तत्कालीन अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
एफए कंस्ट्रक्शन कंपनीने खोटी कागदपत्रं सादर करत घोडाझरी कालव्याचे कंत्राट मिळवल्याचा आरोप एसीबीने केला आहे.
=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
नेपाळमध्ये २३ प्रवाशांना घेऊन निघालेले विमान उड्डाणानंतर बेपत्ता
नेपाळमधील पोखरा विमानतळावरून उड्डाण घेतलेले खासगी प्रवासी विमान बुधवारी सकाळी बेपत्ता झाले. या विमानात ३ कर्मचाऱ्यांसह एकूण २३ प्रवासी होते. प्रवाशांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. नेपाळमधील पर्वतरांगांमध्ये हे विमान बेपत्ता झाले असून, त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येतो आहे. तारा एअर या खासगी कंपनीचे हे विमान पोखरा ते जॉमसम या २० मिनिटांच्या प्रवासासाठी निघाले होते. नेपाळमधील प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसात वाजता या विमानाने पोखरामधून उड्डाण केले. त्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. मुत्सांगचे पोलीस प्रमुख हरिहर योगी यांनी हे विमान बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमानामध्ये एकूण २० प्रवासी आणि तीन कर्मचारी होती. प्रवाशांमध्ये दोन परदेशी प्रवासी आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
=======================================
तूरडाळीचे साठे पडून; विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यंतील शेतकऱ्यांना या सरकारी उदासीनतेची सर्वाधिक झळ
मुंबईवरील हल्ल्यात ‘आयएसआय’च्या सहभागाची माजी प्रमुखांची कबुली
संघाचे विचार थोपविण्याचा प्रयत्न-मायावती

नेपाळमध्ये प्रवासी विमान पर्वतात कोसळले
काठमांडू - नेपाळमध्ये आज (बुधवार) सकाळी 21 प्रवाशांना घेऊन जात असलेल्या छोट्या प्रवासी विमानाला अपघात झाला असून, सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राजीव गांधी हत्येतील दोषी नलिनी पॅरोलवर बाहेर
महाराष्ट्र सरकारतर्फे पतंजलीला 547 एकर जमीन
गोपालच्या अवयवांनी तिघांना जीवदान
वडिलांनी केले मुलाचे डोळे व किडनी दान
=======================================
१- मॉलसाठी पेशावरमधील प्राचीन हिंदू मंदिर पाडले
२- नेपाळमध्ये २३ प्रवाशांना घेऊन निघालेले विमान पर्वतात कोसळले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य पोलिसांना शरण
४- मुंबईवरील हल्ल्यात ‘आयएसआय’च्या सहभागाची माजी प्रमुखांची कबुली
५- जवान शहीद होत असताना मशिदीत 'जीवे पाकिस्तान'च्या घोषणा
६- जो ' वंदे मातरम' म्हणणार नाही, तो भारतीय नाही - भाजपा नेता
७- संघाचे विचार थोपविण्याचा प्रयत्न-मायावती
८- राजीव गांधी हत्येतील दोषी नलिनी पॅरोलवर बाहेर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- नियम धाब्यावर बसवून बांधकाम अधिकृत? कोर्टाची फडणवीसांना चपराक
१०- म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आज 4275 घरांची सोडत
११- अलाहाबाद; गंगा स्वच्छ अभियानाच्या अधिकाऱ्यांचं गंगेतच मूत्रविसर्जन
१२- मुंबई; मारामारी महागात! 19 जणांना झाडू मारण्याची शिक्षा
१३- पंकजा मुंडेंचं वादग्रस्त पोस्टर फेसबुकवर व्हायरल
१४- महाराष्ट्र सरकारतर्फे पतंजलीला 547 एकर जमीन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपुरात 7 जणांवर गुन्हा
१६- चेन्नई; वाढदिवसाला कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण, हातावर जयललितांचा टॅटू
१७- औरंगाबाद; कॉपी पुरवण्यासाठी शिक्षकाची पैशाची मागणी, विद्यार्थींनीची पत्राद्वारे तक्रार
१८- कोल्हापूर; मुस्लीम बांधवही अंबाबाईच्या सेवेत
१९- तूरडाळीचे साठे पडून; विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यंतील शेतकऱ्यांना या सरकारी उदासीनतेची सर्वाधिक झळ
२०- नागपूर; गोपालच्या अवयवांनी तिघांना जीवदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- फेसबुकवर व्हर्च्युअल शुभेच्छांना लाईव्ह टच, एफबीचं नवं फीचर
२२- कपिल अँड टीमचं कमबॅक, कपिल शर्माच्या नव्या शोची पहिली झलक
२२- आशिया कप : भारताविरुद्ध पाकिस्तानची नवी चाल
२३- लिओनार्डोच्या ऑस्करसाठी करीनाची प्रार्थना
२४- कोहलीला विजय मिळाल्यास धोनीला हटवा: अजय जडेजा
२५- कायमची सिगारेट सोडण्यासाठी हा एक उपाय आहे!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
साईनाथ कदम, गजानन शिंदे, विक्रम मुधोळकर, श्रीनिवास पवार, हरमीत सिंघ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
=======================================
उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य पोलिसांना शरण
देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य जेएनयूमधील हे दोन विद्यार्थी मंगळवारी मध्यरात्री दिल्ली पोलिसांना शरण आले. दिल्ली उच्च न्यायालयाने दोघांचेही अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पोलिसांना शरण जाण्याचा मार्ग स्वीकारला.
एका कारमधून उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना जेएनयू कॅम्पसमधून बाहेर आणलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने दोघांना ताब्यात घेऊन त्यांना वसंत विहार पोलिस्ट स्टेशनमध्ये घेऊन गेले. या दोघांना भारतीय दंडविधान कलम 124 अ अंतर्गत ताब्यात घेण्यात आल्याचं सहपोलिस आयुक्त आरएस कृष्णय्य यांनी सांगितलं.
दरम्यान, आशुतोष कुमार, रामा नागा, अनंत प्रकाश हे तीन विद्यार्थी अद्याप शरण आलेले नाहीत.
शरण आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोघांनाही अज्ञात स्थळी हलवंल आहे. आज दोघांनाही कोर्टात हजर केलं जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या पोलिस ठाण्याबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार तसंच उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार तसंच उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून आज 4275 घरांची सोडत
आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाचे अर्ज भरलेल्या ग्राहकांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या घरांची सोडत आज निघणार आहे.
वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 4275 घरांसाठी ही सोडत पार पडणार आहे. कोकण विभाग विरार-बोळींज, ठाण्यातील कावेसर आणि बाळकुम तसेच वेंगुर्ला परिसरात 4 हजाराहून अधिक घरं बांधणार आहे.
घरांसाठीची संगणकीय सोडत आज पार पडणार आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न कोण साकार करतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
कुठे किती घरं?
- विरार – 3,755 घरं
- बाळकुम (ठाणे) – 19 घरं
- कावेसर (ठाणे) – 164 घरं
- मीरा रोड – 310 घरं
- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – 27 घरं
कोणत्या गटासाठी किती घरं?
- अत्यल्प उत्पन्न गट – 329 घरं
- अल्प उत्पन्न गट – 2,630 घरं
- मध्यम उत्पन्न गट – 1,311
- उच्च उत्पन्न गट – 6
डिपॉझिट किती?
- अत्यल्प उत्पन्न गट – 5 हजार 300 रुपये
- अल्प उत्पन्न गट – 10 हजार 300 रुपये
- मध्यम उत्पन्न गट – 15 हजार 300 रुपये
- उच्च उत्पन्न गट – 15 हजार 300 रुपये
कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा :
- अत्यल्प उत्पन्न गट – 16 हजार रुपयांपर्यंत
- अल्प उत्पन्न गट – 16,001 ते 40,000 रुपये
- मध्यम उत्पन्न गट – 40,001 ते 70,000 रुपये
- उच्च उत्पन्न गट – 70,001 पेक्षा जास्त
घरांच्या किंमती:
- अत्यल्प उत्पन्न गट – 4 ते 12 लाख रुपयांदरम्यान घर
- अल्प उत्पन्न गट – 18 ते 24 लाख रुपयांदरम्यान घर
- मध्यम उत्पन्न गट –18 लाख रुपये (वेंगुर्ला), 41 लाख रुपये (विरार)
- उच्च उत्पन्न गट – सुमारे 41 लाख रुपये
जवान शहीद होत असताना मशिदीत 'जीवे पाकिस्तान'च्या घोषणा
एकीकडे देशाचे जवान सुरक्षेसाठी प्राण अर्पण करत असताना दुसरीकडे काश्मीरमधील फुटीरतावादी देशाचं वातावरण बिघडवत आहे. पम्पोरमध्ये भारतीय जवान आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरु असताना, स्थानिक मशिदीच्या भोंग्यातून पाकिस्तान आणि अतिरेक्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. मशिदीत ”जीवे जीवे पाकिस्तान, हम चाहते है आझादी” अशा घोषणा दिल्या जात होत्या, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या पम्पोरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन कॅप्टनसह पाच जवान शहीद झाले. तर भारतीय सैन्याने तीन दहशवाद्यांना कंठस्नान घातलं. शिवाय एका नागरिकाचाही यात मृत्यू झाला. ही चकमक सुमारे दोन दिवस सुरु होती. अखेर सोमवारी संध्याकाळी हे लष्कराचं ऑपरेशन संपलं.
=======================================फेसबुकवर व्हर्च्युअल शुभेच्छांना लाईव्ह टच, एफबीचं नवं फीचर
मुंबई : फेसबुकच्या रिमाइंडरमुळे अनेक विसराळूंना आपल्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देता येतात. अनेक जण आपले जुने फोटो, कोलाज, आठवणी जागवून फेसबुकवर व्हर्च्युअल सेलिब्रेशन करतात. मात्र आता या शुभेच्छांना एक लाईव्ह टच देता येणार आहे.
तुम्ही आता तुमच्या मित्राच्या बर्थडेला 15 सेकंदांचा व्हिडिओ पाठवून विश करु शकाल. सोमवारी फेसबुककडून या नव्या फीचरबाबत घोषणा करण्यात आली. मित्राच्या टाईमलाईनवर हा व्हिडिओ शेअर करुन तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही मित्राला खुश करु शकाल.
iOS डिव्हायसेसवर सोमवारपासून हे नवं फीचर रोलआऊट व्हायला सुरुवात झाली आहे. अँड्रॉईड यूझर्सना मात्र यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. बर्थ डे विशेस ध्यानात ठेवूनच हे फीचर तयार करण्यात आलं आहे. यावर अनेक बर्थडे थीम्स आणि फ्रेम्सचाही ऑप्शन असेल.
वाढदिवसाला कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण, हातावर जयललितांचा टॅटू
चेन्नई : अम्मा इडली, अम्मा कढीभात, अम्मा मिनरल वॉटर, अम्मा सिमेंटनंतर आता अम्मा टॅटूही पाहायला मिळत आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने एआयडीएमकेच्या एक हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आपल्या हातावर जयलिलातांचं चित्र असलेल टॅटू काढला आहे. जयललितांचा फोटो आणि खाली अम्मा असं लिहलेला हा टॅटू काढण्यासाठी कार्यकर्त्यांची मंगळवारी एकच झुंबड उडाली होती. जयललितांवरील प्रेम दर्शवण्यासाठी त्यांचं चित्र असलेला टॅटू काढत असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांन दिली. लाल, हिरवा आणि जांभळ्या रंगाचा हा टॅटू आहे. जयललिता यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त 68 जोडप्यांचे सामूहिक विवाह लावले जाणार आहे. तर संध्याकाळी चेन्नईच्या पोईस गार्डनमध्ये वाढदिवसाचा सोहळा रंगणार आहे.14.75 लाख जणांनी फोनच्या माध्यमातून जयललिता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गंगा स्वच्छ अभियानाच्या अधिकाऱ्यांचं गंगेतच मूत्रविसर्जन
अलाहाबाद : गंगा नदीतील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरु केले आहेत. नदीचं पात्र स्वच्छ करण्यासाठी गंगा स्वच्छता मोहीम सुरु असताना त्याच्या पत्रकार परिषदेतच या अभियानाला हरताळ फासला गेल्याचं समोर आलं आहे.
अलाहाबादमधील वरिष्ठ अधिकारी, सेव्ह गंगा प्रकल्पाच्या जिल्हास्तरीय पथकातील ओपी शर्मा यांनी चक्क गंगेतच मूत्रविसर्जन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मोदींच्या ‘नमामि गंगे’ मोहिमेत माध्यमांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचं कौतुक करण्यासाठी शर्मा यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. नमामि गंगेचे टीशर्टही त्यांनी परिधान केले, मात्र टीशर्टच्या वरील संदेश त्यांच्या वृत्तीत उतरला नाही.
गंगेच्या किनारी जात मीडियाच्या उपस्थितीत खुल्यावरच त्यांनी नैसर्गिक विधी आटपला. आपल्याला मधुमेह असल्याने लघुशंका करण्यावाचून पर्याय नसल्याची सारवासारव त्यांनी आधी केली.
न्यूज’शी बोलताना त्यांनी नदीकिनारी मूत्रविसर्जन केल्याचा दावा खोडून काढला. आपण फक्त हात धुत होतो, मीडियाने आपल्या कृत्याचा विपर्यास केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
=======================================
कपिल अँड टीमचं कमबॅक, कपिल शर्माच्या नव्या शोची पहिली झलक
मुंबई : ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा शो बंद झाल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या टीमसह सज्ज झाला आहे. सोनी टीव्हीवरील सुरु होणाऱ्या या शोच्या प्रोमो शूटदरम्यान कपिल त्याच्या टीमसह दिसला. प्रोमो शूटसाठी दादी (अली अजगर), गुत्थी (सुनील ग्रोव्हर) पलक (किकू शारदा), जज नवज्योतसिंह सिद्धू, सुमोना, चंदन आणि या शोची क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रिती सिमोस हजर होते. इतकंच नाही तर कपिल शर्माच्या टीमचे हजारो चाहत्यांनीही तिथे प्रचंड गर्दी केली होती.
या शोचं नाव कपिल शर्माच्या नावावरच ठेवलं जाऊ शकतो. प्रोमो शूटला संपूर्ण टीमने खूपच धम्माल केली. शिवाय त्यानंतर काही फोटोही शेअर केले. हे फोटो पाहिल्यानंतर ही टीम लवकरच धडाकेबाज पुनरागमन करणार असा अंदाज आहे.
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ बंद होणार असल्याची घोषणा झाल्याने चाहते निराश झाले होते. पण आता तीच टीम नवा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. तर शोच्या पहिल्याच एपिसोडचा पाहुणा सुपरस्टार शाहरुख असेल, असं कळतं. शाहरुख या एपिसोडमध्ये त्याच्या आगामी फॅन या सिनेमाचं प्रमोशन करताना दिसेल.
आशिया कप : भारताविरुद्ध पाकिस्तानची नवी चाल
इस्लामाबाद : आशिया चषक आणि टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला मात देण्यासाठी पाकिस्तानाने नवी चाल खेळली आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने आपले जुने मोहरे बाहेर काढले आहेत. जखमी बाबर आझम आणि रुम्मान रईस यांच्या जागी शर्जिल खान आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सामी यांचा संघात समावेश केला आहे.
याशिवाय इफ्तिखार अहमदच्या जागी खालिद लतीफलाही टीममध्ये संधी दिली आहे.
सरावादरम्यान आझमच्या हाताला जखम झाली, तर रईसला स्नायूदुखीचा त्रास होत आहे, त्यामुळे त्यांना विश्रांती दिल्याचं पीसीबीने म्हटलं आहे.
शर्जिल, सामी आणि लतीफने सध्या सुरु असलेल्या पीसीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना संघात समावेश केल्याचं पाकिस्तानच्या निवड समितीचे अध्यक्ष हारुन रशीद यांनी सांगितलं.
शर्जिल खान आणि सामीचं पीसीएलमधील प्रदर्शन पाहून, कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि मुख्य प्रशिक्षक वकार युनूसनेच यांची निवड केली आहे.
शर्जिलने डिसेंबर 2013 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला आहे. तर सामीने तब्बल 3 वर्षानंतर 2015 मध्ये पाकिस्तानी संघात पुनरागमन केलं. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी देण्यात आली होती. तर लतीफ पाकिस्तानकडून जून 2012 साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
दरम्यान मोहम्मद सामीने भारताविरुद्ध नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळेच गेली अनेक वर्षे पाकिस्तानी संघाबाहेर असलेल्या सामीला पुन्हा संधी दिल्याचं सांगण्यात येत आहे.
नियम धाब्यावर बसवून बांधकाम अधिकृत? कोर्टाची फडणवीसांना चपराक
मुंबई : अनधिकृत बांधकामां प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फटकारलं आहे. मंत्र्यांच्या मनात आलं म्हणून नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामांवरील स्थगिती उठवणार का? असा सवाल न्यायालयानं केला.
अंबरनाथमध्ये विमको आणि आयटीसी कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या अखात्यारित असलेल्या जमिनीवर अनधिकृतरित्या बांधकाम केलं. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ पालिकेला बांधकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. या स्थगितीला कंपन्यांकडून राज्य सरकारकडे आव्हान देण्यात आलं.
दरम्यान न्यायालयाने यावर संबंधित फाईल मागवली. या फाईलवर ‘मुख्यमंत्री फडणवीस योग्य ती कारवाई करा’ असा शेरा मारला होता. यावर कायद्याने तुम्हाला तसे करता येत नसून तुमच्या मंत्र्यांच्या मनात आले म्हणून बंदी उठवण्याचे आदेश देणे योग्य नाही असे कोर्टाने दरडावून सांगितले.
न्यायालयात अशा याचिकांवर युक्तिवाद केल्यास या याचिका न्यायालयात टिकणार नाही असं सांगत उच्च न्यायालयानं फडणवीस सरकारचे कान उपटले.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपुरात 7 जणांवर गुन्हा
नागपूर : सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपूरच्या एसीबी पथकानं सात जणांवर कारवाई केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राज्यातील सिंचन घोटाळ्यात वादग्रस्त ठरलेल्या एफए कंस्ट्रक्शन कंपनीचे 5 भागीदार आणि त्यांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे घोडाझरी कालव्याचे 101 कोटींचे कंत्राट मिळवून देण्यात मदत करणाऱ्या दोन तत्कालीन अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.
एफए कंस्ट्रक्शन कंपनीने खोटी कागदपत्रं सादर करत घोडाझरी कालव्याचे कंत्राट मिळवल्याचा आरोप एसीबीने केला आहे.
कोहलीला विजय मिळाल्यास धोनीला हटवा: अजय जडेजा
नवी दिल्ली: कर्णधार धोनी दुखापग्रस्त झाल्यानं आशिया चषकाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण दुसरीकडे टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अजय जडेजानं एबीपी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
‘जर धोनी आशिया चषक खेळू शकत नसेल तर त्यावेळी जर विराट कोहलीनं कर्णधार पदाची जबाबदारी संभाळून आशिया चषक भारताला जिंकून दिल्यास त्याला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधारपद देण्यात यावं.’ असं वक्तव्य जडेजानं केलं आहे.
जडेजा म्हणाला की, ‘टीम ऑटो मोडमध्ये आहे. (धोनीनेही तसंच सांगितलं आहे.) अशावेळी विजयी टीम आणि कर्णधारालाच विश्वचषकासाठी पाठविण्यात यावं.’
‘कोहली टीम इंडियाचं भविष्य आहे. त्यामुळे त्याला विजय मिळाल्यास कर्णधार बदलण्याची गरज नाही. पण धोनी देखील चांगला खेळाडू आहे. त्यामुळे तो संघासोबत राहिलच.’
मारामारी महागात! 19 जणांना झाडू मारण्याची शिक्षा
मुंबई: मारामारी करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या 19 तरुणांना हायकोर्टानं तीन महिने झाडू मारण्याची शिक्षा सुनावली आहे.
मीरारोड रेल्वे स्टेशन आणि मीरारोड मधील पालिका शाळांमध्ये ३ महिने झाडू मारुन साफसाफाई करण्याची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मीरारोडमधील गोराई बीचवर सुरु असलेल्या एका पार्टी दरम्यान रात्री उशीरापर्यंत नाचगाणे सुरु होते. यावेळी 20-22 वय असलेल्या तरुणांच्या दोन गटात गाणे वाजवण्यावरुन वाद झाला आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी घटनास्थळी वेळीच पोलीस आल्याने हाणामारी करणाऱ्या 19 तरुणांना ताब्यात घेऊन
पोलीसांनी एफआयआर दाखल केला. प्रकरण मिटवण्यासाठी दोन्ही गटांनी हायकोर्टात अर्ज केला होता. त्यावर कोर्टानं तरुणांना 3 महिने झाडू मारण्याची शिक्षा सुनावली.
कायमची सिगारेट सोडण्यासाठी हा एक उपाय आहे!
मुंबई: धुम्रपान करणं फारच धोकादायक आहे. मात्र, हे माहित असूनही या सवयीपासून दूर जाणं अनेकांना शेवटपर्यंत शक्य होत नाही. मात्र, आता ही सवयी सहज सोडता येणार आहे. अल्जायमर ठीक होण्यासाठी देण्यात येणाऱ्या एका औषधाच्या सेवनानं धुम्रपान करणं बंद होऊ शकतं.
एका नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. अशी अनेक सुरक्षित औषधं उपलब्ध आहेत. ज्यामुळं धूम्रपान सोडण्यास मदत होते. मात्र, नव्या रिपोर्टनुसार धुम्रपान सोडणाऱ्या व्यक्तींपैकी तीन चतुर्थांश व्यक्ती 6 महिन्यातच पुन्हा धुम्रपानाच्या आहारी जातात.
या संशोधनासाठी उंदीर आणि माणसावर प्रयोग करण्यात आला. संशोधकांनी समग्र निकोटीनच्या सेवनामध्ये 2 एसिटाइलकोलिनेस्टरेज (एसीएचईआयएस) ‘गैलेनटामीन और डोनेपेजिल’ यांच्या प्रभावाचं आकलन केलं.
उंदरांवर केलेल्या परीक्षणात संशोधकांना असं आढळून आलं की, एसीएचईआयएस दिल्यानंतर त्यांच्यातीस निकोटन सेवनाची तीव्रता कमी झाली आहे. तर 18-60 वयोगटातील 33 लोकांवर याचं परीक्षण करण्यात आलं.
अमेरिकेतील पेंसिल्वेनिया विद्यापीठात याबाबत संशोधन प्रकल्प सादर करण्यात आला असून याचे लेखक रेबेका एशेअर यांच्या मते, “ही दोन्ही औषधं शरीरात निकोटीनची मात्रा कमी करु शकतात. तसेच एसीएचईआयएसच्या कोणत्याही प्रकारच्या सेवनानं कोणतीही हानी पोहचत नाही.”
हे संशोधन “ट्रान्सलेशनल सायकियाट्री”मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.
पंकजा मुंडेंचं वादग्रस्त पोस्टर फेसबुकवर व्हायरल
जळगाव: पंकजा मुंडे समर्थकानं टाकलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टरमुळं जळगावातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या फेसबूकवरुन पंकजा सिंहासनावर तर बाजूला फडणवीस आणि गडकरी रक्षकाच्या वेशात दाखवले आहेत. या फोटोत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सिंहासनावर बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांचं अंगरक्षकाच्या वेशात उभं करण्यात आलं आहे.
भाजपचे माजी महानगराध्यक्ष आणि खडसे यांचे खदे समर्थक अशोक लाडवंजारी यांच्या नावानं असलेल्या फेसबुक अकाऊंटमधून ही पोस्ट करण्यात आली आहे. मात्र, माझ्या नावानं बनावट अकाऊंट उघडून ही पोस्ट व्हायरल केल्याचा दावा अशोक लाडवंजारींनं केला आहे.
कॉपी पुरवण्यासाठी शिक्षकाची पैशाची मागणी, विद्यार्थींनीची पत्राद्वारे तक्रार
औरंगाबाद: बारावीच्या परीक्षेत कॉपी करण्यासाठी शिक्षकानं पैशांची मागणी केल्याची तक्रार एका विद्यार्थीनं पत्राद्वारे औरंगाबाद विभागाकडं केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यातल्या आन्वा गावातील ‘आजुबाई प्रेसिडेन्सी’ कॉलेज मध्ये हा प्रकार होत असल्याचा आरोप या मुलीनं केला आहे. कॉपी पुरवण्यासाठी केंद्रप्रमुखाला पैसे द्यावे लागतात.. त्यासाठी दोन हजार रुपये द्यावे अन्यथा परीक्षेत नापास करण्याची धमकी दिल्याचं या विद्यार्थीनं पत्राद्वारे म्हटलं आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आपण आत्महत्या करू असं देखील म्हटलं आहे.
या पत्रातून आरोप करणाऱ्या विद्यार्थीनीची ओळख पटत नसली तरी या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याच शिक्षण उपसंचालकांनी म्हटलं आहे. दरम्यान, ‘आजुबाई प्रेसिडेन्सी ‘कॉलेजनं हे आरोप फेटाळले आहेत.
मॉलसाठी पेशावरमधील प्राचीन हिंदू मंदिर पाडले
- पेशावर, दि. २३ - पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एक प्राचीन हिंदू मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली गुप्तपणे पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जुन्या पेशावरमधील करीमपूरा भागात हे मंदिर होते. मॉल बांधण्यासाठी दुरुस्तीच्या नावाखाली गपचूप हे मंदिर पाडण्यात आल्याचे या भागातील स्थानिक रहिवाशांनी सांगितले.दहा दिवसांपूर्वी हे मंदिर पाडण्याचे काम सुरु झाले आणि कोणत्याही आठकाडीशिवाय हे काम अजूनही सुरु आहे. हेरिटेज वास्तू पाडणे हा गुन्हा आहे. या जागेवर व्यावसायिक इमारत उभारायची असल्याने हे पाडकाम सुरु आहे असे इथल्या स्थानिकांनी सांगितले.या मंदिराच्या पाडकामा विरोधात इथल्या स्थानिक रहिवाशांमध्ये असंतोष खदखदत आहे. मंदिर पाडून व्यावसायिक इमारत उभी करायला इथल्या स्थानिकांचा विरोध आहे. बिगर मुस्लिम मालमत्तांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या ईटीपीबी आणि पुरातत्व विभागाने पाडकाम करणा-यांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
जो ' वंदे मातरम' म्हणणार नाही, तो भारतीय नाही - भाजपा नेता
- रांची, दि. २४ - जे लोकं भारतात राहतात, या देशाचे अन्न खातात त्यांनी 'वंदे मातरम' आणि ' जन गण मन' म्हटलेच पाहिजे, आणि जे असं करणार नाहीत त्यांना भारतीय म्हणवण्याचा अधिकारच नाही,' असे वादग्रस्त विधान झारखंडमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते व शहर विकासमंत्री सीपी सिंह यांनी केले आहे.' ते विधानसभेच्या परिसरात बोलत होते.जेएनयूमध्ये (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) देशविरोधी घोषणा देणा-या विद्यार्थ्यांना पाठिबा दर्शवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राजकारण करत असल्याचा आरोपही सिंह यांनी केला. राहुल गांधी यांनी देशद्रोह्यांच्या बाजून उभं राहून देशद्रोहाचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.' जी व्यक्ती वंदे मातरम् वा जन गण मन म्हणू इच्छित नाही, त्या व्यक्तीला भारतीय म्हणवण्याचा अधिकार नाही. तुम्ही ज्या देशाचे अन्न खाता, तिथे खुलेपणे जगता, त्याच देशाला शिव्या कशा देऊ शकता? हा देशद्रोहच नव्हे का?' असे सवाल सिंह यांनी विचारले.
लिओनार्डोच्या ऑस्करसाठी करीनाची प्रार्थना
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २४ - यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळयात बॉलिवुडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा पुरस्कार प्रदान करणार असल्याने भारतीयांसाठी यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा तसा खास आहे. अन्य भारतीयांप्रमाणे अभिनेत्री करीना कपूरचेही यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांवर लक्ष असणार आहे.ती खास प्रियंकासाठी वेळात वेळ काढून हा पुरस्कार सोहळा पाहणार कि, नाही ते माहित नाही. पण आवडता अभिनेता लिओनार्डो डी कॅपरियोसाठी करीनाचे या पुरस्कार सोहळयावर लक्ष असेल. करीना लिओनार्डोची खूप मोठी चाहती आहे.निदान यंदा तरी त्याला ऑस्कर मिळावा अशी तिची मनापासून इच्छा आहे. लिओनार्डोला 'द रेवेनंट' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरच्या कॅटगरीमध्ये नामांकन मिळाले आहे. करिना लिओनार्डोचा एकही चित्रपट चुकवत नाही. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असली तरी, भारतात रेवेनंट प्रदर्शित झाल्यानंतर मी पाहणार आहे असे करीनाने सांगितले.खूप आधीच लिओनार्डोला ऑस्कर मिळायला हवा होता असे करीनाला वाटते. ४१ वर्षीय लिओनार्डोला सहावेळा ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले पण प्रत्येकवेळी त्याला पुरस्काराने हुलकावणी दिली.
मुस्लीम बांधवही अंबाबाईच्या सेवेत
- कोल्हापूर : कोल्हापूरची अंबाबाई ही कुण्या एका विशिष्ट धर्माची किंवा जातीची देवी कधीच नव्हती. ती सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असल्याची माहिती मोडीलिपीच्या अभ्यासातून पुढे आली आहे. देवीच्या चरणी याकूब गजबर शेख, मोहिदिन समशेरदिन जमादार, इम्रान मीरा महात, कादर दाऊल नगारजी हे सेवक म्हणून होते, अशी माहिती तत्कालीन जयराम गणेश चोपदार यांच्या जबानीतून पुढे आली आहे.येथील मोडीलिपीचे अभ्यासक व राष्ट्रीय मोडी इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह राजेयादव यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीची मोडी कागदपत्रे (खंड-२) हा ग्रंथ लिहिला आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या मोडी कागदपत्रांच्या अभ्यासातून देवीबद्दलची मनोरंजक माहिती पुढे आली आहे. या ग्रंथाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. २८) पुण्यात होणाऱ्या अखिल भारतीय मोडीलिपी साहित्य संमेलनात ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सदाशिव शिवदे यांच्या हस्ते होत आहे.या खंडामध्ये गोविंद आणाजी विजापूरकर, नारोबा मेवेकरी, गणू बहिरू मोरे, बाबाजी पोकले, गोपाळा गोविंदा कोमटी, मोहिद्दिन जमादार, वासुदेव पटवेकरी, कृष्णा पाटील आदींच्या करवीर संस्थान ईलाखा आॅफिसरसमोर झालेल्या जबानीचा समावेश आहे. या व्यक्ती करत असलेल्या कामाची माहिती त्यामध्ये आहे. या सर्व कागदपत्रांना निशाणी क्रमांक दिला असल्याने ऐतिहासिक साधनाच्या क्रमवारीत हे प्रथम स्थान क्रमांकाचे कागद आहेत. ही कागदपत्रे सन १७०० ते १८९६ या कालखंडातील असून मंदिर इतिहासातील अनेक अज्ञात दालने खुली होतील, असा विश्वास लेखक राजेयादव यांनी व्यक्त केला आहे
नेपाळमध्ये २३ प्रवाशांना घेऊन निघालेले विमान उड्डाणानंतर बेपत्ता
नेपाळमधील पोखरा विमानतळावरून उड्डाण घेतलेले खासगी प्रवासी विमान बुधवारी सकाळी बेपत्ता झाले. या विमानात ३ कर्मचाऱ्यांसह एकूण २३ प्रवासी होते. प्रवाशांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. नेपाळमधील पर्वतरांगांमध्ये हे विमान बेपत्ता झाले असून, त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येतो आहे. तारा एअर या खासगी कंपनीचे हे विमान पोखरा ते जॉमसम या २० मिनिटांच्या प्रवासासाठी निघाले होते. नेपाळमधील प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसात वाजता या विमानाने पोखरामधून उड्डाण केले. त्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. मुत्सांगचे पोलीस प्रमुख हरिहर योगी यांनी हे विमान बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विमानामध्ये एकूण २० प्रवासी आणि तीन कर्मचारी होती. प्रवाशांमध्ये दोन परदेशी प्रवासी आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
=======================================
तूरडाळीचे साठे पडून; विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यंतील शेतकऱ्यांना या सरकारी उदासीनतेची सर्वाधिक झळ
तूरडाळीची भाववाढ रोखण्यासाठी झालेल्या मोठय़ा आयातीने बाजारात भाव घसरत असतानाच सरकारनेही तूर खरेदी थांबविल्याने तूर डाळीचे साठे पडून राहिले आहेत. याचा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कापसाऐवजी पर्यायी पिकांकडे वळलेल्या विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यंतील शेतकऱ्यांना या सरकारी उदासीनतेची सर्वाधिक झळ बसली आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ‘शेतकरी कृती समिती’चे निमंत्रक प्रा. घनश्याम दरणे व प्रवीण देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. आधी आश्वासन दिल्याप्रमाणे ९५०० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी सुरू केली नाही तर शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा या पत्रात त्यांनी दिला आहे. यंदा देशभरातच तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा या आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यंमध्ये मोठय़ा प्रमाणावर तूर पीक घेतले जाते. या जिल्ह्यंमध्ये यंदा सोयाबिनचे उत्पादन सुमारे २५ टक्के झाले आहे. कपाशीचे उत्पादन ५० ते ६० टक्के असले तरी, चार ते साडेचार हजार रुपये प्रती क्विंटल एवढाच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही, असे प्रा. दरणे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारचे धरसोड धोरण तुरीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे ठरत आहे, असे त्यांनी सांगितले.
=======================================मुंबईवरील हल्ल्यात ‘आयएसआय’च्या सहभागाची माजी प्रमुखांची कबुली
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या आयएसआय या शक्तिशाली गुप्तचर यंत्रणेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले होते, अशी कबुली या हल्ल्यानंतर आयएसआयचे तत्कालीन प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली, मात्र त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास नकार दिला, असा गौप्यस्फोट सीआयएच्या माजी प्रमुखांनी नव्या पुस्तकात केला आहे. अल-कायदा, तालिबान, लष्कर-ए-तोयबा आणि हक्कानी या दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्याची वेळ आली तेव्हा पाकिस्तानातील नेत्यांच्या लबाडीमुळे नैराश्येची भावना आल्याचे मायकेल हेडन या सीआयएच्या माजी संचालकांनी आपल्या ‘प्लेइंग टू दी एज’ या पुस्तकात म्हटले आहे. पाकिस्तानचे लष्कर भारताविरुद्ध लढण्यासाठी आहे, दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी नव्हे, असे स्पष्ट करून पाकिस्तानातील नेत्यांनी, अमेरिकेने इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली होती, असे मायकेल हेडन यांनी पुस्तकात म्हटले आहे.
=======================================संघाचे विचार थोपविण्याचा प्रयत्न-मायावती
नवी दिल्ली - हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) विचार देशावर थोपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे, बहुजन समाज पक्षाच्या (बसप) मायावती यांनी म्हटले आहे. रोहित वेमुलाच्या आत्महत्येवर आज (बुधवार) राज्यसभेत चर्चा होत आहे. या चर्चेदरम्यान मायावती यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशभरात निदर्शने करण्यात आली होती. हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरु, केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय व स्मृती इराणी यांना हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. मायावती म्हणाल्या, ‘‘देशात दलित विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहे. सरकारकडून संघाचे विचार थोपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हैदराबाद विद्यापीठात दलित विद्यार्थ्यांचे शोषण करण्यात येत आहे. दलित असल्यानेच रोहितवर अन्याय करण्यात आला. रोहितच्या आत्महत्येप्रकरणी होत असलेल्या चौकशीवर आमचा विश्वास नाही. सरकारने चौकशी समितीत एकही दलित व्यक्तीचा समावेश का केला नाही.‘‘
=======================================नेपाळमध्ये प्रवासी विमान पर्वतात कोसळले
सरकारी अधिकारी योगेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील पर्वतरांगांमध्ये प्रवासी विमानाशी संपर्क तुटला. विमानात 21 प्रवासी आणि दोन कर्मचारी असे 23 जण होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर 18 मिनिटांतच विमान रडारहून बेपत्ता झाले. प्रवाशांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
काठमांडूजवळील पोखरा येथून या विमानाने उड्डाण घेतले होते. ते जामसोम येथे जात होते. पर्वतरांगांमध्ये विमानाचे अवशेष सापडले असून, बचाव पथक घटनास्थळी पोचले आहे. नेपाळमधील तारा एअरलाईन्सचे हे विमान होते.
=======================================राजीव गांधी हत्येतील दोषी नलिनी पॅरोलवर बाहेर
चेन्नई - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेली नलिनी एक दिवसासाठी पॅरोलवर कारागृहाबाहेर आली आहे.
नलिनी वेल्लोर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तिच्या वडीलांचे निधन झाले असून, त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या साठी नलिनी आज (बुधवार) सकाळी वेल्लोर कारागृहातून चेन्नईकडे रवाना झाली आहे. तिच्यासोबत दहा पोलिस कर्मचारी असणार आहेत.
नलिनी हिच्यासह अन्य सहा आरोपींना तमिळनाडुतील वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. या आरोपींना २८ जानेवारी १९९८ रोजी न्यायालयाने दोषी सिद्ध केले होते. दोषी असलेल्या नलिनी, मूरूगन, संथन आणि पेरारीवलन यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेत जन्मठेपेची शिक्षा सुनाविली होती.
=======================================महाराष्ट्र सरकारतर्फे पतंजलीला 547 एकर जमीन
नागपूर - विदर्भात विविध औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारने योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली ट्रस्टला 547 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पतंजलीतर्फे विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये आयुर्वेदिक औषधी उत्पादन व संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच प्रदेशात मेगा फूड पार्क उभारण्याचा पतंजलीचा मानस आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी याविषयी माहिती देताना म्हणाले, "‘मिहान‘ प्रकल्पात पतंजली ट्रस्टला 347 एकर जागा देण्यात येईल. त्यापैकी काहीतरी 108 एकर जागा ही स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये (एसईएझेड) आहे. तर उर्वरित 239 एकर बाहेर आहे. यामुळे येथे सुमारे 10,000 स्थानिक रोजगार निर्माण होतील."
"तसेच काटोल एमआयडीसीमध्ये संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी 200 एकर जागा देण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात जागा उपलब्ध करुन दिली जाईल व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.", असेही ते म्हणाले. शिवाय, मेगा फूड पार्कसाठी पतंजली ट्रस्टला अमरावती येथे जमीन उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
पतंजली समूहाचे आचार्य बालकृष्ण यांनी काटोल येथील बंद पडलेल्या शासकीय संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्याचा निवाडा झाल्यानंतर लगेच हा प्रकल्प सुरू केला जाईल. त्यासोबतच काटोल परिसरात विदर्भात उत्पादित संत्र्यासह अन्य फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारले जाणार आहेत, तसेच पतंजली समूहाच्या वतीने 500 एकरांवर मेगा फूड पार्क उभारण्याची ग्वाही आचार्य बालकृष्ण यांनी या वेळी बोलताना दिली.
=======================================गोपालच्या अवयवांनी तिघांना जीवदान
नागपूर - अवघ्या सतराव्या वर्षी एकुलत्या एक मुलाचे अपघातात जाणे कुठल्याही बापासाठी मोठा आघातच. दुःख अनावर झाले असतानाही सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन आपल्या मुलाची किडनी आणि डोळे दान करण्याऱ्या बापाच्या हिंमतीला सलामच केला पाहिजे.
जगनाडे चौक येथील रहिवासी ग्रामीण विकास विद्यालयाचे अध्यक्ष विजयराव कठाळकर यांचा मुलगा गोपाल (मोनू) याचा अपघात झाला. त्याला शंकरनगर चौकातील वोक्हार्ट इस्पितळात दाखल केले होते. मात्र, मंगळवारी त्याचे निधन झाले. तो अवघ्या सतरा वर्षांचा होता. मोनूच्या निधनाचे वृत्त कळताच कठाळकर कुटुंब सुन्न झाले. त्यांच्यावर दुःखाचा पहाडच कोसळला. कोणालाच काही सुचेनासे झाले. मात्र, विजयराव कठाळकर यांनी संयम राखला. आपला मुलगा गेला तरी त्याचे अवयव इतरांच्या कामी येऊ शकतात, काहींचे जगणे सुसह्य होऊ शकते याकरिता त्यांनी त्याचे डोळे आणि किडनी दान करण्याचे ठरविले. डॉक्टरांची भेट घेतली. मुलाचे डोळे व किडनी दान करायची इच्छा दर्शवली. त्यांच्या निर्णयाने दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली व किडनीमुळे एका व्यक्तीस जीवदान मिळाले. मुलाचे अवयव दान करून विजयराव कठाळकर यांनी एक आदर्श घालून दिला. गोपाल यांच्यावर उद्या, बुधवारी दुपारी दोन वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment