[राष्ट्रीय]
१- रेल्वे अर्थसंकल्पात राज्यावर 'प्रभू'कृपा होणार
२- डान्सबारवर लावलेले निर्बंध अयोग्य, सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं
३- 'तो मै अपना सर कलम करके आपके चरणों पर रख दूँगी' - स्मृती इराणी
४- अफझल गुरू कदाचित तेवढा दोषी नव्हता - चिदंबरम यांचं खळबळजनक मत
५- खुशखबर... क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंटवर आता सरचार्ज लागणार नाही
६- संजय दत्तच्या सुटकेला आव्हान, हायकोर्टात याचिका
७- महिलांसोबतच्या नृत्याच्या फोटोंमुळे ग्यानदेव आहुजा अडचणीत
८- ...तर काश्मीर भारताच्या हातून निसटेल-अब्दुल्ला
९- सरकारने केली कॉंग्रेस, डाव्यांची कोंडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- नरेंद्र मोदींच्या थापांना बळी पडलो - राज ठाकरे
११- संजय दत्त पुण्याहून मुंबईत दाखल
१२- मुंबई; संजय दत्तच्या सुटकेचा जश्न, चिकन-बिअर मोफत
१३- डान्सबार सुरु करण्यासाठी या आहेत सरकारच्या अटी
१४- चंडीगड; हिंसाचारात रोहतक होरपळत असतानाही लष्कराने लावले दोघांचे लग्न
१५- रिक्षा परवान्यासाठी चालकाला वाचावे लागणार मराठी बालभारती
१६- शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अखेर मुहूर्त सापडला
१७- तळेगाव; शहीद यशवंतच्या विवाहाचे स्वप्न राहिले अधुरे...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- मुंबईत रेल्वे स्टेशनवर भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
१९- नाशिक; हॉटेलात मिळणार केवळ अर्धा ग्लास पाणी
२०- शिर्डी-शनी शिंगणापूर मार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
२१- मुकेश अंबानी सर्वांंत श्रीमंत भारतीय
२२- बुलढाणा; देऊळगाव हे बारमाही टॅंकरचे पाणी पिणारे गाव
२३- सोलापूर; गुरु रविदास आणि डॉ. आंबेडकर यांच्यामुळे आमची गुलामी दूर झाली - चंद्रप्रकाश देगलूरकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- अक्षय कुमारच्या 'रुस्तम'चा फर्स्ट लूक रिलीज
२५- 'तू बातों से मानेगा? या लातों से?' संजय दत्तला सुनावलं होतं
२६- भारताची विजयी सलामी, बांगलादेशवर 45 धावांनी विजय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
राजवीर चव्हाण, संदीप शिंदे, सुधीर देशमुख, संजय पाटील, इशा इनामदार, रुपेश नागरगोजे, उमेश तालंगकर, योगेश जावरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय ठेवून समाजात वावरू लागते तेंव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात
(भक्ती पोहरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
==================================

==================================

दरम्यान, अभिनेता संजय दत्त सुटणार हे कळताच त्याच्या चाहत्यांनीही जय्यत तयारीही केली आहे. मुंबईतील भेंडी बाजारातील नूर मोहमंद हॉटेलने खास संजू बाबा चिकन नावाने डिश तयार केली आहे.

==================================
==================================

==================================

==================================

==================================

==================================

==================================

==================================

==================================

==================================

==================================

==================================
==================================
==================================
==================================
रिक्षा परवान्यासाठी चालकाला वाचावे लागणार मराठी बालभारती
शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अखेर मुहूर्त सापडला
शहीद यशवंतच्या विवाहाचे स्वप्न राहिले अधुरे...
तळेगावच्या ढाकणे कुटुंबाला जमीन देण्याचा शासनाला पडला विसर
==================================
मुकेश अंबानी सर्वांंत श्रीमंत भारतीय

...तर काश्मीर भारताच्या हातून निसटेल-अब्दुल्ला
श्रीनगर - देशातील मुस्लिम नागरिकांना संशयी नजरेने पाहणे न थांबविल्यास आणि बहुसंख्यांकाकडून अल्पसंख्यांकावर होत असलेली दादागिरी न रोखल्यास काश्मीर भारताच्या हातातून निसटायला वेळ लागणार नाही, असे माजी केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
सरकारने केली कॉंग्रेस, डाव्यांची कोंडी
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि हैदराबाद विद्यापीठातील घटनांवरील झालेल्या चर्चेला ‘राष्ट्रवाद विरुद्ध राष्ट्रद्रोह’ वादाचे स्वरूप देऊन लोकसभेत पहिल्याच दिवशी विरोधकांची; विशेषतः काँग्रेस आणि डाव्यांची कोंडी करण्यात सरकार पुरते यशस्वी ठरले. ‘जेएनयू’मध्ये देश तोडण्याची घोषणाबाजी झाली असल्याने पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे. परंतु, देशद्रोहाचा आरोप लावण्याचा निर्णय न्यायालयाचा असेल, असे स्पष्ट करून गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सरकारची मानगूट सोडवून घेतली, तर विरोधकांनी रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी विद्येच्या प्रांगणाचे रणांगण बनविल्याचा आरोप करणाऱ्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ‘इंदिरा गांधींनी सत्ता गमावली; पण त्यांच्या मुलाने कधी देशाच्या बरबादीच्या घोषणांना पाठिंबा दिला नव्हता,’ अशा शब्दांत सोनिया आणि राहुल गांधी यांना लक्ष्य केले. अत्यंत आवेशपूर्ण आणि तणावाच्या वातावरणात झालेल्या या चर्चेदरम्यान संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी तर ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी योग्य वेळी कारवाई केली जाईल,’ असा इशाराही देऊन टाकला.
==================================
नरेंद्र मोदींच्या थापांना बळी पडलो - राज ठाकरे
बारमाही टॅंकरचे पाणी पिणारे गाव
देऊळघाट (ता. बुलडाणा) - २५ विहिरी, १८ हातपंप असूनही गेल्या १० वर्षांपासून देऊळघाट ग्रामस्थांना पिण्यासाठीच नव्हे तर इतर वापरासाठीदेखील विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. गावातील सगळ्यात मोठ्या विहिरीचे गोडे पाणी खारट झाले आहे. विशेष म्हणजे गावासाठी दहिद धरणावरून पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन असतानाही सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ती निकामी झाली आहे.
गुरु रविदास आणि डॉ. आंबेडकर यांच्यामुळे आमची गुलामी दूर झाली - चंद्रप्रकाश देगलूरकर
१- रेल्वे अर्थसंकल्पात राज्यावर 'प्रभू'कृपा होणार
२- डान्सबारवर लावलेले निर्बंध अयोग्य, सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं
३- 'तो मै अपना सर कलम करके आपके चरणों पर रख दूँगी' - स्मृती इराणी
४- अफझल गुरू कदाचित तेवढा दोषी नव्हता - चिदंबरम यांचं खळबळजनक मत
५- खुशखबर... क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंटवर आता सरचार्ज लागणार नाही
६- संजय दत्तच्या सुटकेला आव्हान, हायकोर्टात याचिका
७- महिलांसोबतच्या नृत्याच्या फोटोंमुळे ग्यानदेव आहुजा अडचणीत
८- ...तर काश्मीर भारताच्या हातून निसटेल-अब्दुल्ला
९- सरकारने केली कॉंग्रेस, डाव्यांची कोंडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- नरेंद्र मोदींच्या थापांना बळी पडलो - राज ठाकरे
११- संजय दत्त पुण्याहून मुंबईत दाखल
१२- मुंबई; संजय दत्तच्या सुटकेचा जश्न, चिकन-बिअर मोफत
१३- डान्सबार सुरु करण्यासाठी या आहेत सरकारच्या अटी
१४- चंडीगड; हिंसाचारात रोहतक होरपळत असतानाही लष्कराने लावले दोघांचे लग्न
१५- रिक्षा परवान्यासाठी चालकाला वाचावे लागणार मराठी बालभारती
१६- शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अखेर मुहूर्त सापडला
१७- तळेगाव; शहीद यशवंतच्या विवाहाचे स्वप्न राहिले अधुरे...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- मुंबईत रेल्वे स्टेशनवर भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
१९- नाशिक; हॉटेलात मिळणार केवळ अर्धा ग्लास पाणी
२०- शिर्डी-शनी शिंगणापूर मार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
२१- मुकेश अंबानी सर्वांंत श्रीमंत भारतीय
२२- बुलढाणा; देऊळगाव हे बारमाही टॅंकरचे पाणी पिणारे गाव
२३- सोलापूर; गुरु रविदास आणि डॉ. आंबेडकर यांच्यामुळे आमची गुलामी दूर झाली - चंद्रप्रकाश देगलूरकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- अक्षय कुमारच्या 'रुस्तम'चा फर्स्ट लूक रिलीज
२५- 'तू बातों से मानेगा? या लातों से?' संजय दत्तला सुनावलं होतं
२६- भारताची विजयी सलामी, बांगलादेशवर 45 धावांनी विजय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
राजवीर चव्हाण, संदीप शिंदे, सुधीर देशमुख, संजय पाटील, इशा इनामदार, रुपेश नागरगोजे, उमेश तालंगकर, योगेश जावरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय ठेवून समाजात वावरू लागते तेंव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात
(भक्ती पोहरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
==================================
खुशखबर... क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंटवर आता सरचार्ज लागणार नाही
मुंबई: क्रेडिट कार्ड वापरणारे तसंच ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा कार्ड पेमेंट करताना आता सर्व्हिस टॅक्स आणि कन्विनिएंस फीस भरावी लागणार नाही. कॅशलेस ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी कॅबिनेटनं हा निर्णय घेतला आहे.
अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयानं ऑनलाईन व्यवहार जास्त स्वस्त होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन पेमेंटवर यापुढे कर लागणार नसल्यानं रोख व्यवहार कमी होण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. याच निर्णयाप्रमाणे आर्थिक व्यवहारात धोखाधडी संबंधी असणारे खटले लवकरात लवकर निकाली निघणार आहे.
तसेच क्रेडिट आणि ऑनालाईन पेमेंटच्या वापरामुळं खोट्या चलनाची समस्याही कमी होण्याची शक्यता आहे.
संजय दत्तच्या सुटकेचा जश्न, चिकन-बिअर मोफत
मुंबई: 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरलेला संजय दत्ता अखेर आज शिक्षा भोगून कायमचा सुटला आहे. संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईकडे रवाना झाला आहे. याचवेळी तुरुंगाबाहेर त्याचे अनेक चाहतेही उपस्थिती होते.
दरम्यान, अभिनेता संजय दत्त सुटणार हे कळताच त्याच्या चाहत्यांनीही जय्यत तयारीही केली आहे. मुंबईतील भेंडी बाजारातील नूर मोहमंद हॉटेलने खास संजू बाबा चिकन नावाने डिश तयार केली आहे.
संजय दत्त आज जेलमधून बाहेर पडल्यानंतर ग्राहकांना ही डिश मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतील कुलाबा परिसरातील गोकूळ बार आणि रेस्टॉरंट 300 बिअर मोफत वाटणार आहे.
==================================
संजय दत्त पुण्याहून मुंबईत दाखल
पुणे : अभिनेता संजय दत्तची अखेर सुटका झाली आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईकडे रवाना झाला आहे.
———————-
LIVE : संजय दत्त पुण्याहून मुंबईत दाखल
—————-
LIVE : जर संजू बाबाचं नाव सिद्दिकी बाबा असतं तर सर्वांनी त्याच्या धर्माला प्राधान्य दिलं असतं, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया
'तो मै अपना सर कलम करके आपके चरणों पर रख दूँगी' - स्मृती इराणी
‘अगर मेरा जवाब आपको संतुष्ट करनेवाला नही मिला, तो मै अपना सर कलम करके आपके चरणों पर रख दूँगी’, हा कुठल्या चित्रपटातला, किंवा एकता कपूरच्या सिरियलमधला डायलॉग नाही. तर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींचं राज्यसभेतलं वक्तव्य…कामकाज रोखून धरणाऱ्या मायावतींच्या दिशेनं काढलेले उद्गार.
मायावतींच्या खासदारांनी राज्यसभेत 2 वाजता अपेक्षित असलेली चर्चा होऊच दिली नाही. जेएनयू आणि हैदराबाद विद्यापीठातल्या रोहित वेमुलाची हत्या या प्रकरणावर एकत्र चर्चेची नोटीस देण्यात आलेली होती. मात्र हे दोन्ही विषय वेगळे आहेत. ते एकत्र करुन सरकार रोहितच्या प्रकरणाचं महत्व कमी करतंय असा आरोप करत बसपाच्या खासदारांनी सदनाचं कामकाज रोखून धरलं.
खरंतर चर्चेची ही नोटीस राज्यसभेत दिली ती सीपीएमचे सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी. या नोटीसीमध्ये त्यांनी दोन विद्यापीठांतल्या घटनांचा उल्लेख करुन एकत्र चर्चेची मागणी केली होती. मात्र मायावतींना अशी एकत्र चर्चा नको होती. त्यांचा सगळा फोकस होता तो रोहित वेमुलाच्या प्रकरणावर. साहजिकच उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ असल्यानं बसपाच्या खासदारांचा वाढलेला आवेश पहिल्याच दिवशी राज्यसभेत पाहायला मिळाला.
रेल्वे अर्थसंकल्पात राज्यावर 'प्रभू'कृपा होणार
नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. सुरेश प्रभू दुसऱ्यांदा रेल्वे बजेट सादर करतील. पहिल्या अर्थसंकल्पात मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देणाऱ्या सुरेश प्रभूंच्या बजेटकडून महाराष्ट्राच्या मात्र अनेक अपेक्षा आहेत.मात्र यंदाही कोणत्याही नवीन रेल्वे फेऱ्यांची घोषणा होणार नाही. तसंच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतु या व्यतिरिक्त ई-कॅटरिंग, तिकीट आरक्षण प्रणाली, प्रवाशांची सुरक्षा यासारख्या बाबींवर बजेटमध्ये भर असेल.राज्यात गेल्या काही वर्षांपासून अनेक मार्गांच्या मागण्या प्रलंबित आहेत. शिवाय नव्या मार्गांसह मुंबईतील लोकल प्रवास सुखी व्हावा, असं मुंबईकरांचं साकडं आहे. त्यामुळे यंदा तरी सुरेश प्रभू राज्यावर कृपा करतात का हे पाहावं लागेल आहे.
अक्षय कुमारच्या 'रुस्तम'चा फर्स्ट लूक रिलीज
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘रुस्तम’ सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या सिनेमात अक्षय एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
अक्षयने ट्विटवर करुन रुस्तमचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला. या ट्वीटमध्ये अक्कीने लिहिलं आहे की, “सजलेला अधिकारी, कुटुंबाला समर्पित, सन्मानासाठी लढतो, माहित आहे कोण? रुस्तम, त्याची कहाणी 12 ऑगस्टला जाणून घ्याK.”
मुंबईत रेल्वे स्टेशनवर भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील डॉकयार्ड रेल्वे स्टेशनवर भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. गणेश जांबरे (वय 45 वर्ष) आणि नसरीन इब्राहिम (वय 30 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.
रेल्वे स्टेशवर काही काम सुरु होतं. त्यावेळी गणेश जबरे आणि नसरीन नावाची महिला तिथून जात होती. मात्र त्याचवेळी रेल्वेच्या भिंतीचा काही भाग कोसळला आणि दोघेही त्याखाली अडकले. ढिगाऱ्याखालून काढल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या प्रकरणी रेल्वे कंत्राटदाराविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 अ/34 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या घटनेला रेल्वेचे अधिकारी जबाबदार असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
'तू बातों से मानेगा? या लातों से?' संजय दत्तला सुनावलं होतं!
मुंबई: ‘तू बातों से माने गा? या लातों से?’ अशा शब्दात जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या संजय दत्तला या भाषेत सुनावण्यात आलं होतं. संजय दत्त शिक्षा भोगण्यासाठी जेव्हा आर्थर रोड कारागृहात गेला त्याचवेळी त्याला अशा कडक शब्दात सुनावण्यात आलं होतं. जेलमध्ये कैद्यांचे कपडे घालण्यास आढेवेढे घेणाऱ्या संजय दत्तला आर्थर रोड जेलच्या तत्कालीन कारागृह प्रमुख स्वाती साठे यांनी समजुतीचा डोस दिला होता. स्वाती साठे यांच्या याच इशाऱ्यानंतर संजय दत्त सामान्य कैद्याप्रमाणे जेलमध्ये वावरू लागला होता. उद्या संजय दत्त कायमचा तुरुंगातून बाहेर पडणार आहे. त्यानिमित्त माझानं तुरूंग प्रशासन विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना बोलतं केलं आणि जाणून घेतलं गजाआडच्या संजय दत्त बाबत. त्यावेळी बोलताना स्वाती साठे यांनी त्या घटनेचा उलगडा केला. सुरुवातीला संजय दत्तला समज दिल्यानंतर तो इतर कैद्यांप्रमाणेच रोजची कामं करु लागला. जेलमध्ये असताना त्याला कागदी पिशव्या तयार करणं आणि त्यासारखी इतर कामंही देण्यात आली होती. असंही स्वाती साठे यांनी सांगितलं.
भारताची विजयी सलामी, बांगलादेशवर 45 धावांनी विजय
मिरपूर: आशिया चषकात धोनीच्या टीम इंडियानं बांगलादेशला 45 धावांनी हरवून विजयी सलामी दिली आहे. मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर भारतानं यजमान बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यात भारतानं दिलेल्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 20 षटकांत सात बाद 121 धावाच करता आल्या. त्याआधी रोहित शर्माच्या 83 धावांच्या दणदणीत खेळीमुळं भारतानं वीस षटकांत सहा बाद 166 धावांची मजल मारली होती.
दरम्यान, भारतीय गोलंदाजांनीही आज टिच्चून गोलंदाजी करीत बांगलादेशच्या फलंदाजांना वेसण घातली. भारताकडून आशिष नेहरानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर बुमरा, पंड्या आणि अश्विनने प्रत्येकी एक-एक गडी टिपला.
संजय दत्तच्या सुटकेला आव्हान, हायकोर्टात याचिका
मुंबई: संजय दत्त येरवडा जेलमधून बाहेर येण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. मात्र संजयच्या सुटकेविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
संजय दत्तने जेलमध्ये असं कोणतं चांगलं काम केलं की त्याला शिक्षा संपण्याच्या आधी जेलमधून सोडलं जातंय, असा सवाल याचिकेत करण्यात आला आहे.
देशभरातल्या जेलमध्ये कित्येक कैदी शिक्षा भोगत आहेत. पण त्यांच्याकडे कुणाचं लक्ष नसल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.
अभिनेता संजय दत्त उद्या तुरुंगाबाहेर येणार आहे. त्याच्या स्वागतासाठी दत्त कुटुंबियांनी जोरदार तयारी केली आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ वाजता तो येरवडा तुरुंगातून बाहेर पडेल. मात्र, शिक्षा संपण्याच्या 8 महिने आधीच तो तुरुंगातून सुटणार आहे.
1993 मधील बॉम्बस्फोटांच्यावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची 16 मे 2013 ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला मे 2013 मध्ये 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातली दीड वर्षांची शिक्षा संजयनं आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती. त्यानुसार तो ऑक्टोबरमध्ये तुरुंगाबाहेर येणं अपेक्षित होतं. पण शिक्षेच्या आठ महिनेआधीच तो जेलमधून बाहेर येणार आहे.
नाशकात यापुढे हॉटेलात मिळणार केवळ अर्धा ग्लास पाणी
नाशिक: गेल्या वर्षी पावसानं मारलेली दडी त्यामुळे ऐन फेब्रुवारीमध्येच पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे. त्यामुळे आता पाणी बचतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाशकातल्या हॉटेल रेस्टॉरन्ट असोसिएशननं प्रयत्न सुरु केले आहेत.
यापुढं नाशकातल्या हॉटेल्समध्ये केवळ अर्धा ग्लासच पाणी मिळणार आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. दररोज हजारो नागरिक हॉटेलमध्ये येतात. मात्र, पूर्ण भरलेल्या ग्लासमधील केवळ अर्धा ग्लास पाणी पिवून पाणी फेकून दिलं जातं.
नाशिक शहरात सध्या आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात येतं आहे. एप्रिल-मे मध्ये पाणीकपातीचं हे संकट अधिक तीव्र होणार असल्यानं आत्तापासूनच पाण्याची बचत करावी असं आवाहन महापालिकेसह सर्व संघटनांनी केलं आहे.
डान्सबारवर लावलेले निर्बंध अयोग्य, सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं
नवी दिल्ली: महाराष्ट्रातल्या डान्सबार प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलं आहे. बार मालकांवर परवान्यांसह लावलेले अनेक निर्बंध हे चुकीचे असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं बार बंदीस मनाई केली होती. त्यानंतर बारमालकांवर सरकारनं अनेक अटी लादल्या. त्यात बारमधील लाईव्ह फुटेज पोलीस स्टेशनला देणं. या अटीचाही समावेश होता. याविरोधात बार असोशिएशननं कोर्टात धाव घेतली होती.
त्यावर अशा पद्धतीची अट ही व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला आहे. असं मत कोर्टानं व्यक्त केलं. यावर कोर्टानं सरकारकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. याची पुढची सुनावणी 1 मार्चला होईल.
डान्सबार सुरु करण्यासाठी या आहेत सरकारच्या अटी
मुंबई: डान्सबार सुरु करण्यासाठी घातलेल्या 26 अटींपैकी काही अटींवर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टानं सरकारला सुनावलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात डान्स बार सुरु करण्यासाठी घातलेल्या अटींबाबत उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत.
महाराष्ट्रात डान्सबार सुरु करण्यासाठी राज्य सरकारनं 26 अटी घातल्या आहेत:
1. डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बसवणे
2. सीसीटीव्ही यंत्रणा स्थानिक पोलिस ठाण्याला जोडावी
3. 10 बाय 12 फुटांचं स्टेज असावं
4. डान्स फ्लोअर भोवती तीन फुटांचा घेरा घाला
5. डान्स फ्लोअर आणि खाण्यापिण्याच्या जागेत 5 फुटांचं अंतर असावं
6. नर्तिका आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचं अंतर बंधनकारक
7. ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही
8. फ्लोअरवर एकावेळी फक्त चार नर्तिका असाव्यात
9. त्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं
10. डान्सबारमध्ये धुम्रपानास बंदी घालावी
डान्सबार सुरु कऱण्यासाठी अशा अटींची पूर्तता करण्याची कसरत करावी लागणार आहे. मात्र बारमालक असोसिएशननं काही अटींवर आक्षेप नोंदवत सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
अटींबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश देऊनच सर्वोच्च न्यायालय थांबलं नाही, तर डान्स बार पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचं न्यायालयानं ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे डान्सबार बंदीवरुन घातलेल्या अटींमुळे सरकारला अटी आणि शर्ती रद्द करण्याचा पिंगा घालावा लागू शकतो.
शिर्डी-शनी शिंगणापूर मार्गावर प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद
शिर्डी: शिर्डी-शनी शिंगणापूर मार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केलं आहे. पोलिसांनी एकूण 7 जणांना बेड्या ठोकल्या असून त्यापैकी 2 जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सगळे आरोपी उच्चभ्रू घरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून या टोळीवर कारवाई करण्यासाठी सापळा रचून बसले होते. अखेर काल या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं.
हे सर्व आरोपी राहुरी शहरातील असून त्यांच्याकडून तलवार, लोखंडी गजासह मिरची पूड तसंच 3 बाईक जप्त करण्यात आले आहे.
अफझल गुरू कदाचित तेवढा दोषी नव्हता - चिदंबरम यांचं खळबळजनक मत
- नवी दिल्ली, दि. 25 - अफझल गुरूला फाशी देण्याचा आदेश काढताना सत्तेत असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं की प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अफझलचा 2001 मधल्या संसदेवरील हल्ल्यामधल्या सहभागाविषयी खरोखर संशय होता, त्याचा सहभाग नि:संदिग्ध होता असं म्हणता येणार नाही.ईकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार चिदंबरम यांनी ईटीच्या पत्रकाराशी बोलताना वरील मत व्यक्त केलं आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वाद विवाद झडतील अशी चिन्हे आहेत. अफझलची केस कदाचित योग्यपणे ठरवण्यात आली नाही अशी प्रांजळ कबुली चिदंबरम यांनी दिली आहे.अफझलच्या खटल्यामध्ये कोर्ट योग्य निष्कर्षाला पोचलं होतं का आणि फाशी ही योग्य शिक्षा होती का असा प्रश्न चिदंबरम यांना विचारण्यात आला होता. यावेळी चिदंबरम म्हणाले की, "मला वाटतं कीअफझल गुरूच्या बाबतीत योग्य निर्णय झाला नाही असं प्रामाणिक मत बनवणं शक्य आहे. पण, सरकारमध्ये असताना असं म्हणता येत नाही, कारण सरकार म्हणून तुम्हीच त्याच्यावर खटला भरलेला असतो. पण एक तटस्थ व्यक्ती या नात्याने या खटल्याचा निकाल योग्य नव्हता असं मत बाळगता येतं."
महिलांसोबतच्या नृत्याच्या फोटोंमुळे ग्यानदेव आहुजा अडचणीत
- जयपूर, दि. २५ - जेएनयूमध्ये दररोज तीन हजार कंडोम्स वापरले जातात, इथले विद्यार्थी रात्री आठ नंतर विवस्त्र नृत्य करतात अशी वादग्रस्त विधाने करणारे राजस्थानचे भाजप आमदार ग्यानदेव आहुजा यांची स्वत:ची काही वादग्रस्त छायाचित्रे समोर आली आहेत.त्यामुळे ग्यानदेव आहुजा यांच्या अडचणी वाढणार आहेत. ग्यानदेव आहुजा महिलांसोबत नृत्य करताना त्यांच्यावर पैशाची उधळपट्टी करत असल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांवरुन काँग्रेसने ग्यानदेव आहुजा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. २०१५ लोहरीच्या कार्यक्रमातील ही छायिचत्रे आहेत. ग्यानदेव आहुजा यांच्या गळयात पाचेश रुपयांच्या नोटांचा हार असल्याचेही काही फोटो आहेत. या छायाचित्रांवरुन सोशल मिडीयावर आहुजा यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत असून त्यांची टर उडवली जात आहे.
हिंसाचारात रोहतक होरपळत असतानाही लष्कराने लावले दोघांचे लग्न
- चंदीगड, दि, २५ - ओबीसी कोटयात आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने हरियाणासह रोहतक शहर होरपळत असताना लष्कराचे काही जवान तेथील शीख परिवारासाठी अक्षरश: देवाच्या रुपात प्रकटले. संपूर्ण हरियाणात हिंसाचार सुरू असतानाही लष्कराच्या जवानांनी नेहा मक्कड या भावी वधूला तिच्या परिवारासह कडेकोट बंदोबस्तात गुरूद्वारेत नेऊन तिचे लग्न लावण्यास मदत केली.गुरूचरणपुरा येथील रहिवासी असलेले सुरिंदर मक्कड यांची मुलगी नेहा हिचे २२ फेब्रुवारी रोजी त्याच शहरातील गौरव याच्याशी लग्न होणार होते, मात्र २० फेब्रुवारीपासूनच हरियाणातील जाट आंदोलनाला हिंसक वळण लागले. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असूनही शहरातील तणावामुळे हे लग्न पडेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. लग्न अवघ्या दोन दिवसांवर आलेले असतानाच उफाळलेल्या या हिंसाचारामुळे अवघ्या काही अंतरावर असलेल्या गुरूद्वारेत जाणेही शक्य नसल्याने मक्कड परिवार चिंताग्रस्त झाला.मकक्ड कुटुंबियांची ही अडचण त्याच परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या ३/५ गोरखा रायफल्स बटालियनच्या जवानांना समजली आणि त्यांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. संपूर्ण शहर जळत असतानाही जवानांनी नेहासह तिच्या कुटुंबियांना सुखरूपरित्या गुरूद्वारेत पोहोचवले आणि ठरल्या दिवशी, ठरल्या वेळीच नेहा आणि गौरव विवाहबद्ध झाले.लष्कराच्या जवानांच्या मदतीमुळे गौरवही अतिशय भारावला. ' या हिंसाचारात माझं दुकान जाळण्यात आलं, त्यामुळे मला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र लग्न निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे मी थोडा निश्चिंत झालो असून आता नेहाच्या साथीने आयुष्याची नव्याने सुरूवात करण्यास मी सज्ज आहे,' असे त्याने सांगितले.जाट आंदोलनाचा उत्तरेकडील राज्यांमधील रेल्वे सेवेला मोठा फटका बसला. सुमारे ७३६ रेल्वे रद्द केल्या तर, १०५ गाड्या अन्य मार्गाने वळत्या केल्या. रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूकदारांना सुमारे २०० कोटींचा फटका बसला. पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर या राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील सेवा ठप्प झाल्या आहेत.
रिक्षा परवान्यासाठी चालकाला वाचावे लागणार मराठी बालभारती
रिक्षा परवान्यासाठी संबंधित रिक्षा चालकाला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याने यंदा रिक्षा चालकांची भाषेच्या ज्ञानाची मौखिक चाचणी घेण्यात येणार आहे. यामध्ये मराठी बालभारतीच्या पुस्तकातील दहा ओळींच्या परिच्छेदाचे वाचन करावे लागणार आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षकांमार्फत पत्रकारांसमक्ष ही चाचणी घेण्यात येणार असून, पुणे व पिंपरी- चिंचवडमधील रिक्षा परवान्यासाठी २९ फेब्रुवारीपासून ही चाचणी सुरू होईल. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद महापालिका क्षेत्रांमध्ये एकूण ४२ हजार ७९८ रिक्षा परवान्यांचे वाटप करण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये ३,२०८ परवाने देण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवून त्यातूल लॉटरी पद्धतीने नावांचीही निवड करण्यात आली आहे. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार रिक्षा परवान्यासाठी संबंधित रिक्षा चालकाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे परवान्याचे अंतिम इरादापत्र देण्यापूर्वी संबंधिताची मराठी भाषेच्या ज्ञानाची मौखिक चाचणी करावी. त्यासाठी पत्रकारांची नियुक्ती करावी व संपूर्ण चाचणीचे चित्रीकरण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये २९ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत भाषेची मौखिक चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीसाठी उमेदवाराला मराठी बालभारती पुस्तकातील सुमारे दहा ओळींच्या परिच्छेदाचे वाचन करणे आवश्यक असेल. अशिक्षित उमेदवारास रिक्षा प्रवाशांशी होणाऱ्या संवादातील भौगोलिक माहितीशी संबंधित दहा प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या चाचणीमध्ये यशस्वी होणाऱ्यांना त्याच दिवशी रिक्षा परवान्याचे इरादापत्र देण्यात येणार आहे.
==================================शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अखेर मुहूर्त सापडला
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अखेर मुहूर्त मिळाला असून एप्रिल किंवा मे महिन्यात भूमिपूजन करण्याबाबत तयारी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. स्मारक उभारणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीने मान्यता दिली आहे. स्मारकासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून निविदा प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती घेतली. या बैठकीस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, अतिरिक्त मुख्य सचिव पी एस मीना, सुमित मलिक, प्रवीण परदेशी, नितीन करीर, सुनील पोरवाल आदी उपस्थित होते.
==================================शहीद यशवंतच्या विवाहाचे स्वप्न राहिले अधुरे...
तळेगावच्या ढाकणे कुटुंबाला जमीन देण्याचा शासनाला पडला विसर
उमराळे - तळेगाव (ता. दिंडोरी) येथील शहीद यशवंत अर्जुन ढाकणे हा भूमिपुत्र. त्याच्या विवाहाचा विचार आमच्या मनात आला... आमच्या यशवंतचा लवकरच विवाह होऊन नववधू आमच्या घरी येणार, अशा चर्चाही नातेवाइकांमध्ये सुरू झाल्या... अचानक कारगिल युद्ध सुरू झाले... काश्मीरमध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करताना आमचा वीरपुत्र शहीद झाला. शासनाने आम्हाला अनेक आश्वासने दिली. पंधरा लाख रुपये मिळाले; पण पाच एकर जमिनीचे आश्वासन पंधरा वर्षांनंतरही कागदावरच राहिले. यशवंत यांचे वडील अर्जुन यांच्या चेहऱ्यावरील खंत आजही जाणवते... स्मारकासाठी त्यांनीच खर्च करीत आपल्या पुत्राच्या बलिदानाच्या स्मृती तेवत ठेवल्या आहेत...
मुकेश अंबानी सर्वांंत श्रीमंत भारतीय
बीजिंग - रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळविला. अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण 26 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच 1.78 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. जगात त्यांच्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये 21 वा क्रमांक लागतो. सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स अजूनही पहिल्या स्थानी कायम आहेत.
भारतातील अतिश्रीमंतांची संख्या 111 वर पोचली आहे. चीन आणि अमेरिकेनंतर अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अब्जाधीशांच्या यादीत बिल गेट्स 80 अब्ज अमेरिकी डॉलरसह पहिल्या स्थानावर आहे. 100 अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती असणारे बिल गेट्स जगातील पहिली व्यक्ती आहे. त्यांनी त्यातील 20 अब्ज डॉलरची संपत्ती दान केली आहे, असे हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2016 या अहवालात म्हटले आहे.
गेट्स यांच्यानंतर 68 अब्ज अमेरिकी डॉलर संपत्तीसह वॉरन बफे यांचा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ अमांसिओ ऑर्टेगा 64 अब्ज अमेरिकी डॉलर, कार्लोस स्लिम हेलु 53 अब्ज अमेरिकी डॉलर आणि जेफ बेझोस 50 अब्ज अमेरिकी डॉलरसह पाचव्या स्थानावर आहे. सध्या जगात 2,188 अब्जाधीश (अतिश्रीमंत) आहेत. भारतातील अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती 308 अब्ज डॉलर आहे.
==================================...तर काश्मीर भारताच्या हातून निसटेल-अब्दुल्ला
नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अब्दुल्ला यांनी हे वक्तव्य केले आहे. अब्दुल्ला म्हणाले की, आज मुस्लिमांना संशयी नजरेने पाहण्यात येत आहे. मुस्लिम हे भारतीय नाहीत का? त्यांनी देशासाठी आपले बलिदान दिलेले नाही का? भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947 ला झालेल्या युद्धात हुतात्मा झालेल्या ब्रिगेडियर उस्मान यांना आपण विसरलो का? मुस्लिम हे भारताचे विरोधक नाहीत. मुस्लिमांना विरोधक ठरविणाऱ्या विचारांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. भारत हा मुस्लिमांच्या हृदयात आहे.
हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करुन स्वतःचा स्वार्थ साधून घेऊ नका. महात्मा गांधी, मौलाना आझाद ,शेर-ए-काश्मीर शेख अब्दुल्ला, जवाहरलाल नेहरु यांच्या अन्य जणांनी निर्माण केलेला हा भारत आहे, असेही अब्दुल्ला यांनी सांगितले.
==================================सरकारने केली कॉंग्रेस, डाव्यांची कोंडी
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि हैदराबाद विद्यापीठातील घटनांवरील झालेल्या चर्चेला ‘राष्ट्रवाद विरुद्ध राष्ट्रद्रोह’ वादाचे स्वरूप देऊन लोकसभेत पहिल्याच दिवशी विरोधकांची; विशेषतः काँग्रेस आणि डाव्यांची कोंडी करण्यात सरकार पुरते यशस्वी ठरले. ‘जेएनयू’मध्ये देश तोडण्याची घोषणाबाजी झाली असल्याने पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे. परंतु, देशद्रोहाचा आरोप लावण्याचा निर्णय न्यायालयाचा असेल, असे स्पष्ट करून गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सरकारची मानगूट सोडवून घेतली, तर विरोधकांनी रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी विद्येच्या प्रांगणाचे रणांगण बनविल्याचा आरोप करणाऱ्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ‘इंदिरा गांधींनी सत्ता गमावली; पण त्यांच्या मुलाने कधी देशाच्या बरबादीच्या घोषणांना पाठिंबा दिला नव्हता,’ अशा शब्दांत सोनिया आणि राहुल गांधी यांना लक्ष्य केले. अत्यंत आवेशपूर्ण आणि तणावाच्या वातावरणात झालेल्या या चर्चेदरम्यान संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी तर ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी योग्य वेळी कारवाई केली जाईल,’ असा इशाराही देऊन टाकला.
==================================
नरेंद्र मोदींच्या थापांना बळी पडलो - राज ठाकरे
मालवण - "एकवेळ पूर्वीचे कॉंग्रेसचे सरकार परवडले; मात्र सध्या सत्तेत असलेले सरकार भयानक आहे. या सरकारकडे कोणतेही नियोजन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर जनतेला फक्त भूलभुलैया दाखविला. त्यांनी जनतेची फसवणूक केलीच; पण मीसुद्धा त्यांच्या थापांना बळी पडलो,‘‘ असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केले.
ठाकरे सध्या मालवण दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी (ता.25) आंगणेवाडी यात्रेला जाणार आहेत. आज त्यांनी तारकर्लीतील पर्यटनाचा आनंद घेतला. पत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या. सध्याच्या सरकारबाबत विचारले असता, पूर्वीचे सरकार परवडले, असा उपरोधिक टोला मारला. ते म्हणाले, ""सध्याचे सरकार अपरिपक्व आहे. त्यांच्याकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. मोदी यांनी तर जनतेला भूलभुलैया दाखविला. मी गुजरातमध्ये गेलो होतो तेव्हा मलाही त्यांनी तिथल्या काही कल्पना दाखविल्या. माझाही त्यावर विश्वास बसला होता; मात्र गेल्या दीड वर्षाचा कारभार पाहता त्यांच्या थापा उघड झाल्या आहेत.‘‘
ते म्हणाले, की सध्या कोकणात जे आमदार, खासदार आहेत, त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही. आमच्या लोकांकडे सत्ता आली असती, तर आम्ही हे करून दाखविले असते; मात्र जनतेने आता यातून धडा घेण्याची आवश्यकता आहे. सी-वर्ल्डसारखा प्रकल्प कोकणचे भवितव्य बदलू शकला असता; मात्र राजकारणामुळे आज हा प्रकल्प अडकला, याचे खरे दुःख आहे.
==================================बारमाही टॅंकरचे पाणी पिणारे गाव
निजामकाळातील महत्त्वाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या या गावात आजही लहान किल्ला, गावाभोवती परकोट शाबूत आहेत, तसेच नवाबाचे वंशज गावात वास्तव्यास आहेत. काही वर्षांपूर्वी पाणीटंचाई जाणवल्याने गावात सार्वजनिक विहिरी खोदण्यात आल्या. मात्र, पाऊसमान कमी झाल्यामुळे विहिरीही कोरड्या पडू लागल्या, त्यामुळे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिद धरणावरून गावापर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली. या योजनेमुळे ग्रामस्थांना पाणी मिळत होते. मात्र, ग्रामपचांयतीच्या राजकारणामुळे या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. त्यानंतर शासनाकडून चार टॅंकर मंजूर करण्यात आले. या टॅंकरच्या दिवसभरात प्रत्येकी तीन अशा १२ फेऱ्या होणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे घडत नाही. दहिद पाणीपुरवठा योजना सध्या निकामी झाली आहे. केवळ मुठभर लोकांच्या स्वार्थापोटी २५ हजार ग्रामस्थांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
==================================गुरु रविदास आणि डॉ. आंबेडकर यांच्यामुळे आमची गुलामी दूर झाली - चंद्रप्रकाश देगलूरकर
सोलापूर दि. (प्रतिनिधी) : हजारो वर्ष आमच्या बापजाद्यानी देवाधर्माची आणि सनातनी व्यवस्थेची गुलामी केली परंतु आम्हाला माणुसकीचे जीवन मिळाले नाही, गुरु रविदास, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आमची गुलामी दूर झाली व आम्ही माणसात आलो असे भावपूर्ण उदगार अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते मा. चंद्रप्रकाशजी देगलूरकर यांनी काढले.
गुरु रविदास मा. बहुउददेशिय समाजसेवी संस्था व अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद यांचे संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे गुरु रविदास, छ. शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज यांची संयुक्त जयंती सोमवार दि.२२/२/२०१६ रोजी निराळे वस्ती सोलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून मा. चंद्रप्रकाशजी देगलूरकर बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रणितीताई शिंदे, मा. चंद्रप्रकाश देगलूरकर, मा. बाळासाहेब वाघमारे, मा. केरु जाधव, सौ. कल्पनाताई भोसले, मा. अरुण शिखरे, मा. पंकज ढसाळ, मा. मानतेश होननाकोरे, मा. गोविंद कांबळे, मा. उदय शिखरे, डाॅ. प्रकाश टोणपे, मा. महेश गाडेकर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुनिल डांगे यांची उपस्थिती होती.
आपल्या अडीच तासांच्या प्रखर भाषणात चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदास हे समाज क्रांतिकारी महामानव होते, त्यांच्या नावाचा देखिल योग्य उल्लेख केला जात नाही, त्यांचे चित्र चर्मोद्योग करतानाचे काढले आणि त्यांचे चरित्र चमत्कारानी भरून ठेवले हे एक मनुवादी षड़यंत्र आहे. धर्म संघटनेच्या माध्यमातून मनुवाद रुजविला जात आहे. शिकलेल्या लोकांनी याचा पर्दाफाश केला पाहिजे.
सकाळच्या सत्रात महिलांना मार्गदर्शन व भव्य रक्तदान शिबिर हा उपक्रम झाला आणि सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक कलेच्या माध्यमातून अंधश्रदधा, हुंडाबळी, पाणी वाचवा, विज वाचवा या विषयावर भारुडाचा कार्यक्रम झाला. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या प्रभावी भाषणाने दिवसभराच्या जयंती कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर होनकळस, मदन चाबुकसवार, सर्जेराव क्षिरसागर, तुकाराम शिंदे, चंद्रकांत शिंदे, सौरभ डांगे, राजू शिंदे, कृष्णा कांबळे, रुषभ डांगे, रेणुका शिंदे, शकुंतला शिंदे, जयश्री कांबळे, सुभद्रा शिंदे, मंगल सनके, सिताबाई शिंदे, प्रभाताई डांगे यांनी परिश्रम घेतले.
==================================
No comments:
Post a Comment