[अंतरराष्ट्रीय]
१- पठाणकोट हल्ल्याशी मसूद अझरचा संबंध नाही - पाकची परस्पर क्लीन चीट
२- इंडोनेशियात गावठी दारू पिल्याने 26 जणांचा मृत्यू
३- मोगलीच्या 'द जंगल बुक'चा नवा कोरा ट्रेलर रिलीज
४- एअर इंडियाचे एआय ११५ (दिल्ली-लंडन) हे विमान फ्रँकफूर्ट (जर्मनी) येथे तांतिक बिघाडामुळे उतरण्यात आले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- २६/११ हल्ल्याचे हाफिज सईदकडून आदेश- डेव्हिड हेडलीचा खुलासा
६- हेडलीच्या जबानीमुळे मुंबईवरील हल्ल्यामागचा पाकिस्तानी हात उघड
७- बदलासाठी लोकसहभाग आवश्यक: नरेंद्र मोदी
८- फेसबुकला 'ट्राय'चा दणका, 'फ्री बेसिक्स' नामंजूर, नेट न्यट्रॅलिटीचा विजय
९- ई-तिकीटाच्या बुकिंगनंतरही स्टेशन बदला एका क्लिकवर
१०- इस्कॉन मंदिर हा धर्मांतरण व पैसा कमावण्याचा अड्डा - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
११- उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजप सज्ज-शहा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- भोंदूगिरी नाही, स्वामींच्या हातातच माळ : अमृता फडणवीस
१३- पोस्टात आता तरुणाईला भावणाऱ्या भेटवस्तूंची विक्री
१४- जम्मू-कश्मीर मध्ये सरकार स्थापण्याचा निर्णय १५ फेब्रुवारीनंतर होणार
१५- चड्डी-बनियन गँगचे अटक केलेले ४ जणं उस्मनाबाद जिल्ह्यातील इतकूरचे
१६- इंदोर; नेदरलँड्सच्या एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा-या २ जणांना पोलिसांनी केली अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- वसई; समुद्रात उडी मारून पोलिसाची आत्महत्या
१८- हैदराबादेत फार्मा कंपनीत स्फोट;6 जणांचा मृत्यू
१९- जळगाव; आश्रमशाळेतील 24 विद्यार्थ्यांना विषबाधा
२०- ...आंबेडकरी जनता उत्तर देईल:आनंदराज आंबेडकर
२१- अलाहाबाद'; मौनी अमावस्येला सव्वा कोटी भाविकांचे स्नान
२२- डासमुक्ती व चांगल्या आरोग्यासाठी नागरीकांनी घरातील सांडपाणी शोषखड्डयातच मुरवावे - जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर
२३- पालकांनी मुलांच्या शिक्षणाबरोबरच कला गुणांना वाव द्यावा - सौ. वर्षाताई भोसीकर
२४- मुखेड; दि.९ रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांची होणार बैठक
२५- नाशिक - मालेगाव स्टॅण्डवर दारू पिण्याच्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- जिंदादिल शायर काळाच्या पडद्याआड, निदा फाजली कालवश
२७- अनुष्कासाठी कायपण... विराटचे लव्ह लेडीसाठी पुन्हा प्रयत्न
२८- माझ्यावर रोज कुणी ना कुणी बरं वाईट लिहित असतं, कारण मी सॉफ्ट टार्गेट - सनी लिऑन
२९- ‘रोझ डे’ सेलिब्रेशन, आदित्यकडून कतरिनाला १ लाख गुलाबांची भेट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
अडचणीत लोकांना मदत करा, ते तुमची आठवण काढतील, पुन्हा अडचणीत आल्यावर
(गंगाधर गच्चे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4
=====================================
फेसबुकला 'ट्राय'चा दणका, 'फ्री बेसिक्स' नामंजूर, नेट न्यट्रॅलिटीचा विजय
नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) फेसबुकच्या ‘फ्री बेसिक्स’ मोहिमेला जोरदार दणका दिला आहे. फेबबुकची ‘फ्री बेसिक्स’ मोहीम रद्द करत ट्राय नेट न्युट्रॅलिटीच्या बाजूने उभी राहिली आहे. मनमानी पद्धतीने इंटरनेटसाठी दर आकारता येणार नाहीत, असे ट्रायने स्पष्ट केले आहे.
इंटरनेट डेटासाठी वेगवेगळे दर आकारल्यास टेलिकॉम कंपन्यांना 50 हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. काही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना इंटरनेटच्या खास ऑफर देतात. मात्र, ट्रायने यावरही बंदी आणली आहे.
ट्रायच्या निर्णयामुळे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मोठा धक्का मानला जातो आहे. ग्रामीण भागातील लोकांना इंटरनेटशी जोडण्यासाठी फेसबुकने ‘फ्री बेसिक्स’ची मोहीम सुरु केली होती. मात्र, मार्क झुकरबर्ग यांच्या महत्त्वाकांक्षी ‘फ्री बेसिक्स’ मोहिमेला ट्रायने दणका दिला आहे.
भोंदूगिरी नाही, स्वामींच्या हातातच माळ : अमृता फडणवीस
पुणे : राज्यात एकीकडे बुवाबाजी प्रतिबंधक कायदा अमलात आला असताना पुण्यातील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये एका स्वामीने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीसमोरच धूळफेक केली.
पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. या सोहळ्याला गुरुवानंद स्वामींची विशेष उपस्थिती होती. पुरस्कार वितरण सोहळा पार पडल्यानंतर अमृता यांनी स्वामींना नमस्कार केला. त्यानंतर या स्वामींनी हवेत हात फिरवत एक सोनसाखळी काढली आणि ती अमृता फडणवीस यांना दिली.
या भोंदूगिरीनंतर बाबाजी की जय हो या नाऱ्यांनी आख्खं इन्स्टिट्यूट गजबजून गेलं. स्वामी गुरुवानंद हे तिरुपतीचे आहेत.
अमृता फडणवीस यांचं स्पष्टीकरण
गुरुवानंद स्वामी आणि मी त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो. ते माझ्या आजोबांच्या वयाच्या असल्याने मी त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. त्यांनीच मला स्टेजवर आशीर्वाद घ्यायला बोलावलं होतं. भारतीय संस्कृतीच्या मूल्यांप्रमाणे त्यांना नमस्कार करणं साहजिकच होतं.
स्वामींनी हवेत हात फिरवून माळ काढली नसून ती त्यांच्या हातातच होती, असंही स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिलं आहे.
संजय चोरडिया, कार्यक्रमाचे आयोजक
स्वामींनी दिलेल्या वस्तू हवेतून काढल्या की आणखी काही, याची मला कल्पना नाही. मी या कार्यक्रमात व्यस्त होतो. त्यामुळे फार बोलू शकणार नाही.
जिंदादिल शायर काळाच्या पडद्याआड, निदा फाजली कालवश
मुंबई : उर्दू आणि हिंदी शायरीच्या माध्यमातून जगाचं दुःख मांडणारे जिंदादिल शायर निदा फाजली यांचं आज निधन झालं. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी वृद्धपकाळानं अखेरचा श्वास घेतला.
रझिया सुल्तान, सूर, सरफरोश अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. जी गाणी आजही लहान थोरांच्या ओठांवर असतात. लफ्झों के फुल, मोर नाच, सफर मे धूप तो होगी, दुनिया एक खिलोना है. हे त्यांचे काही गाजलेले काव्य़संग्रह प्रसिद्ध आहेत.
1998 साली निदा फाजली यांना साहित्य अकादमी पुरस्कारनं गौरवण्यात आलं. तर 2013 साली पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला. निदा फाजलींच्या जाण्यानं उर्दू शाहरीच्या विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अनुष्कासाठी कायपण... विराटचे लव्ह लेडीसाठी पुन्हा प्रयत्न
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या ब्रेकअपच्या चर्चा गेल्या अनेक दिवस सुरु आहेत. पण अद्याप दोघांनी याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. पण मीडिया रिपोर्टसनुसार, अनुष्का इतक्यात लग्नाला तयार नसल्यानं दोघांमध्ये दुरावा आला आहे.
या दोघांच्या कहाणीत मात्र, आता एक नवा ट्विस्ट आला आहे. बॉलिवूड लाइफमधील वृत्तानुसार, आता यांच्या नात्यात नव्या ट्विस्ट आला असून विराट कोहली आपल्या लेडी लव्हला कोणत्याही परिस्थितीत दूर जाऊ देणार नाही. त्यामुळे विराट आता अनुष्काला समजविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समजतं आहे.
विराट आणि अनुष्का यांच्या एका जवळच्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, ‘या दोघांमध्ये अजूनही सारं काही संपलेलं नाही. विराटचा अजूनही पूर्ण प्रयत्न सुरु असून अनुष्कासोबतची आपली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न चालू आहे.
दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाली होती.
दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाली होती.
मोगलीच्या 'द जंगल बुक'चा नवा कोरा ट्रेलर रिलीज
मुंबई : मोगलीच्या ‘द जंगल बुक’ या 3D अॅक्शन सिनेमाचा नवा कोरा आणि दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. डिस्नेच्या बॅनरअंतर्गत बनलेला हा 1967 मध्ये आलेल्या सिनेमाचं अॅनिमेटड व्हर्जन आहे.
डिस्नेचा ‘द जंगल बुक’ हा सिनेमा 15 एप्रिल 2016 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील जंगल 3Dमध्ये अनुभवता येणार आहे. शिवाय चित्रपटातील डायलॉगही अप्रतिम आहेत.
असा आहे ट्रेलर!
घनदाट जंगलात राहणारा एक लहान मुलगा अर्थात मोगली आणि त्याचे मित्र म्हणजे जंगलातील प्राण्यांसह ट्रेलरची सुरुवात होते. अवघ्या दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये 1967 च्या सिनेमातील बऱ्याच गोष्टी आहेत. मात्र अनेक गोष्टी नव्याने आणि वेगळ्या पद्धतीने मांडल्या आहेत. सिनेमाचा ट्रेलरच दमदार असल्याने चित्रपटाची उत्सुकताही वाढली आहे.
सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सिनेमात एकच मानवी पात्र आहे, ते म्हणजे मोगलीचं. भारतीय वंशाचा बालकलाकार नील सेठी यात मोगलीची भूमिका साकारत आहे.
ई-तिकीटाच्या बुकिंगनंतरही स्टेशन बदला एका क्लिकवर
नवी दिल्ली : रेल्वेच्या ई-तिकीटाचं बूकिंग केल्यानंतर ट्रेनमध्ये चढण्याचं स्थानक बदलायची वेळ आली, तर प्रवाशांच्या नाकी नऊ येतात. रेल्वेच्या तिकीट खिडकीवर जा, कागदपत्रं भरा अशा सतराशे साठ प्रक्रियांमधून आता तुमची सुटका होणार आहे. कारण बोर्डिंग स्टेशन ऑनलाईनच बदलण्याची सोय रेल्वेतर्फे करुन देण्यात येणार आहे.
आतापर्यंत ज्या स्टेशनवरुन तुम्हाला प्रवासाला सुरुवात करायची आहे, त्यात बदल करायचा असेल, तर रिझर्व्हेशन सेंटरवर जाण्यावाचून पर्याय नव्हता. ई-तिकीटाच्या फोटोकॉपी (झेरॉक्स) सोबतच फोटो आयडी देणं अनिवार्य होतं. या लांबलचक प्रक्रियेनंतरच त्यांच्या बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल शक्य होता.
जर तुम्ही कंटाळा करुन बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल न करताच दुसऱ्या स्टेशनवरुन तुमच्या प्रवासाला सुरुवात केलीत, तर टीटीईला तुमचं तिकीट रद्द करण्याचा अधिकार असतो. ही सुविधा 15 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे प्रवासाच्या दोन दिवस अगोदरही हा बदल करणं शक्य आहे.
काय आहे प्रक्रिया?
प्रवाशांना आयआरसीटीसीच्या रिझर्व्हेशन पोर्टलवर जावं लागेल. तिथे बूक केलेलं तिकीटाचं बोर्डिंग स्टेशन बदलण्याचा पर्याय उपलब्ध असेल. बुक केलेल्या दोन स्टेशनच्या दरम्यान असलेल्या स्थानकांपैकी एक स्थानक निवडण्याचा पर्याय दिसेल. मात्र प्रवासाचं अंतर कमी झालं तरीही तिकीटाचे मूळ दरच लागू राहतील. तुमचे पैसे परत मिळणार नाहीत.
२६/११ हल्ल्याचे हाफिज सईदकडून आदेश- डेव्हिड हेडलीचा खुलासा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला ‘लष्कर-ए-तोयबा’चा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी अतिरेकी डेव्हिड हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष मोक्का कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. हेडलीने यावेळी २६/११ हल्ला प्रकरणाशी संबंधित अनेक गौप्यस्फोट केले. पाकिस्तानातच दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण मिळाल्याची कबुली देत हाफिज सईद हाच लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असून त्यानेच मुंबई हल्ल्याचे आदेश दिले, असा महत्त्वपूर्ण खुलासा हेडलीने केला. याशिवाय, हाफिज सईदच्या भाषणाने प्रभावित होऊनच २००२ साली ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये सामील झालो, असेही हेडलीने मान्य केले आहे. ‘आयएसआय’शी संबंधित अधिकारी लष्करात सामील असल्याचाही खुलासा त्याने केला आहे. हेडलीने केलेल्या खुलास्यानंतर पाकिस्तानचा मुंबईतील हल्ल्यातील सहभाग अधिक स्पष्ट असून, पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर आला आहे. ‘लष्कर-ए-तोयबा’चा अतिरेकी साजिद मीरच्या सांगण्यावरूनच मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याचीही कबुली हेडलीने दिली. तसेच एकूण आठ वेळा भारतात येऊन गेल्याचेही त्याने सांगितले. २६/११ च्या आधीच मुंबईवर हल्ला होणार होता, पण दोन वेळा हल्ल्याचा कट फसला. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो अयशस्वी ठरल्याचाही महत्त्वपूर्ण खुलासा हेडलीने केल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
==========================================================माझ्यावर रोज कुणी ना कुणी बरं वाईट लिहित असतं, कारण मी सॉफ्ट टार्गेट - सनी लिऑन
माझ्यावर रोज कुणी ना कुणी बरं वाईट लिहित असतं, कारण मी सॉफ्ट टार्गेट आहे, असं म्हणत सनी लिऑननं आपण निबर कातडीची नसून मलाही दु:ख होतं, वेदना होतात अशी भावना व्यक्त केली आहे.
हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सनीनं जगात अनाथ मुलांचे, रस्त्यावरच्या कच-याचे, अशिक्षित मुलांचे इतके प्रश्न आहेत, पण मलाच लक्ष्य करून का हल्ला केला जातो असा सवाल विचारला आहे. माझ्यावर विनाकारण हल्ला करणा-या या लोकांचं मिशन काय आहे हेच कळत नसल्याची खंतही तिनं व्यक्त केली आहे.
माझ्याविरोधात मोर्चे काढण्यासाठी पैसे फुकट घालवण्यापेक्षा लहान मुलांसाठी पुस्तकं खरेदी करा असा सल्लाही तिनं दिला आहे.
एका वृत्तवाहिनीवर सनी लिऑनला अत्यंत वाईट पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले, त्यामागे पुरूषी वृत्ती दिसत असल्याचा आरोपही अनेकांनी केला. त्याबाबत बोलताना ती म्हणते, पाच मिनिटातच माझा संयम संपला होता, पण त्या कार्यक्रमातून निघून जाऊन, तो अँकर माझ्याबद्दल जे काही बोलत आहे, ते बरोबर आहे असा ग्रह निर्माण होऊ नये म्हणून मी निघून गेले नाही.
माझा भूतकाळ याआधीही विचारला गेला आहे, परंतु ज्या प्रकारे या कार्यक्रमात त्याचा उल्लेख झाला त्याबद्दल वाईट वाटलं, असं सनी सांगते.
अर्थात, त्या मुलाखतीनंतर मला फिल्म इंडस्ट्रीमधल्या अनेकांनी पाठिंबा दिला, जो याआधी कधीही मिळाला नव्हता असं सनीनं म्हटलं आहे. आमीर खाननेही सनी लिऑनला दिलेल्या पाठिंब्यासाठी तिने आभार मानले आहेत.
==========================================================हेडलीच्या जबानीमुळे मुंबईवरील हल्ल्यामागचा पाकिस्तानी हात उघड
डेव्हिड हेडलीच्या साक्षीमुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील पाकिस्तानचा हात अधिक स्पष्ट होत असून याचा फायदा पाकवर जास्त दबाव टाकण्यासाठी होऊ शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे हेडलीची चौकशी केली. यावेळी हेडलीने पाकिस्तानच्या ISI च्या मेजर इक्बाल, मेजर अली यांची ओळख झाल्याचे सांगितले, तसेच हाफिज सईद व झकी उर रेहमान लखवी यांच्याकडून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याने सांगितले.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्यांवर कारवाई करावी अशी मागणी भारत सातत्याने करत असून हेडलीच्या साक्षीनंतर भारताच्या मागणीला जास्त धार येणार आहे. हेडलीची जबानी नव्या डोसियरच्या स्वरुपात पाकिस्तानला सादर केली जाईल आणि लष्कर ए तयबा सारख्या यात गुंतलेल्या संघटनांवर कारवाईची मागणी केली जाईल अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
आज सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत निकम यांनी हेडलीची जबानी घेतली असून आत्ताशी केवळ २५ टक्केच प्रश्न विचारून झाल्याचे निकम म्हणाले. उद्या पुन्हा साक्ष नोंदवण्यात येणार असून अमेरिकेला न दिलेली माहिती हेडली भारताशी बोलताना उघड करेल अशी आशा निकम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
==========================================================पठाणकोट हल्ल्याशी मसूद अझरचा संबंध नाही - पाकची परस्पर क्लीन चीट
पठाणकोटमध्ये भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मोलाना मसूद अझरचा सहभाग नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. जानेवारीमध्ये पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये पाकिस्तानातून आलेल्या सहा दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता. जवळपास ८० तासांच्या चकमकीनंतर या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
हे दहशतवादी मौलाना मसूद अझरने पाठवले होते असे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आणि पाकिस्तानने कारवाई करावी अशी मागणी भारत सरकारने केली. भारताने याबाबतचा टेलिफोन कॉल रेकॉर्ड्सचा पुरावा पाकिस्तानला दिला असूनही पाकिस्तानने मात्र मौलाना मसूद अझरचा या हल्ल्याशी संबंध नसल्याची भूमिका घेतली असल्याचे वृत्त आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द केल्या आहेत.
==========================================================‘रोझ डे’ सेलिब्रेशन, आदित्यकडून कतरिनाला १ लाख गुलाबांची भेट
‘फितूर’ चित्रपटाचे स्टारकास्ट आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांनी मोठ्या उत्साहात ‘रोझ डे’चे सेलिब्रेशन केले. ‘फितूर’च्या प्रमोशनसाठी कतरिना आणि आदित्य जयपूरच्या ‘जय महाल’मध्ये असताना ‘रोझ डे’च्या निमित्ताने आदित्यने यावेळी कतरिनाला १ लाख गुलाबं भेट देऊन सरप्राईज दिले. गुलाबांनी भरलेला ट्रक पाहून कतरिना थक्कच झाली आणि तिने आदित्यचे आभार व्यक्त केले. कतरिनाला ट्रकभरून गुलाबं भेट देण्याची कल्पना ‘रोझ डे’ च्या दोनच दिवस अगोदर आदित्यला सुचली. त्यानंतर त्वरित तशी तयारी करण्यात आली आणि कतरिनाच्या नकळत आदित्यने ट्रकभरुन गुलाब मागविली. दरम्यान, दिग्दर्शक अभिषेक कपूरचा ‘फितूर’ हा चित्रपट १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री तब्बूचीही भूमिका आहे.
==========================================================पोस्टात आता तरुणाईला भावणाऱ्या भेटवस्तूंची विक्री
जीपीओमध्ये नवीन सोव्हेनिअर विक्रीची सुरुवात; रंगीबेरंगी पोस्टकार्ड, छापलेले टी शर्ट, स्टेशनरी वस्तू उपलब्ध रंगीबेरंगी स्टॅम्प किंवा पोस्टकार्डाची विक्री, एखादा स्टॅम्प प्रिंट केलेला टी-शर्ट किंवा जीपीओच्या देखण्या इमारतीची प्रतिकृती असलेली की-चेन अशा अनेकविध वस्तू संग्रही ठेवायला कोणालाही आवडेल. आता थेट पोस्टानेच अशा ‘पौष्टिक’ गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाऊल उचलले आहे. शुक्रवार, ५ फेब्रुवारीपासून मुंबईच्या जीपीओ येथील इमारतीत पोस्टाचे पहिलेवहिले सन्मानचिन्ह विक्री दालन उघडले असून या दालनात अनेक गोष्टी विकत घेता येणार आहेत. ब्रिटिशांच्या काळापासून गावागावांतल्या लोकांशी जोडल्या गेलेल्या काही खात्यांपैकी एक म्हणजे पोस्ट खाते. सुरुवातीला शालांत परीक्षेचा निकालही पोस्टाने समजत असे. त्याचप्रमाणे सुखदु:खाच्या कथा-व्यथाही पोस्टामार्फतच आप्तेष्टांपर्यंत पोहोचवल्या जात असत. आजही न्यायालयाची नोटीस असो किंवा विजेचे बिल असो, पोस्टाशी सामान्य माणसांचा संबंध तुटलेला नाही. काळानुरूप तरुण पिढी पोस्टापासून थोडीशी तुटली असली, तरी अनेक पिढय़ांचा पोस्टाशी असलेला ऋणानुबंध कायम आहे. याचीच दखल घेत पोस्ट खात्याने आता या जोडलेल्या पिढीशी नाते दृढ करण्यासाठी आणि तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी सन्मानचिन्ह विक्री दालन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी या दालनाचे उद्घाटनही मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या हस्ते झाल्याची माहिती मुंबई क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल रणजित कुमार यांनी दिली. या दालनात जीपीओच्या ऐतिहासिक इमारतीची छोटी प्रतिकृती असलेल्या की-चेन, त्याचप्रमाणे रंगीबेरंगी पोस्टकार्ड, काही सुप्रसिद्ध स्टॅम्प, काही स्टॅम्प छापलेले टी-शर्ट्स अशा गोष्टी विकत मिळतील. त्याशिवाय पोस्टात लागणाऱ्या इतर स्टेशनरी वस्तूंची विक्रीही या दालनात होणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. पोस्ट खाते हे पेन्शनीत निघालेले खाते नसून माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात पुढील काळात पोस्ट खात्याचे महत्त्व वाढणार आहे.जीपीओमध्ये तळमजल्यावरच हे दालन सर्वासाठी खुले असेल. आम्ही विविध योजनांद्वारे लोकांच्या जास्तीत जास्त संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सन्मानचिन्ह विक्री दालन हादेखील त्यातलाच एक भाग असून येथील वस्तूंची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यातली असेल.
==========================================================वसई; समुद्रात उडी मारून पोलिसाची आत्महत्या
वसई पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विनोद पारधी (३०) यांनी समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सकाळी पाणजू येथील समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह आढळून आला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले होते. वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विनोद शनिवार सायंकाळपासून घरी परतले नव्हते. त्यांच्या पत्नीने विनोद बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. विनोद यांचा शोध सुरू असतानाच नायगाव येथील पाणजू बेटाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. विनोद पारधी यांनी समुद्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे वसई पोलिसांनी सांगितले. एका महिला सहकाऱ्याला अश्लील शिव्या दिल्याप्रकरणी पारधी यांना नुकतेच निलंबित करण्यात आले होते व त्यांची विभागीय चौकशीही सुरू होती, असे पालघर जिल्ह्य़ाच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी सांगितले. या कारवाईमुळे त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली असावी, असा कयास आहे. विनोद पारधी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, वरिष्ठांच्या जाचामुळे पारधी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, अधीक्षक शारदा राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
==========================================================
बदलासाठी लोकसहभाग आवश्यक: नरेंद्र मोदी
ग्रामीण भागामध्ये बदल घडविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) केले. "पंतप्रधान ग्रामीण विकास स्नातक (पीएमडीआरएफ)‘ या राष्ट्रीय योजनेंतर्गत देशाच्या विविध भागात कार्यरत असलेल्या 200 हून अधिक तरुणांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
यावेळी या योजनेस अधिक प्रभावी बनविण्याकरिता सल्ला वा सूचना सुचविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी या प्रतिनिधींना केले. याचबरोबर, देशातील ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी वचनबद्ध झालेल्या या प्रतिनिधींचे पंतप्रधानांनी कौतुकही केले. या प्रतिनिधींशी झालेल्या संवादानंतर बोलताना मोदी यांनी लोकसहभाग हे या विकासात्मक चर्चेमधील सामाईक सूत्र असल्याचे मत व्यक्त केले. या प्रतिनिधींपैकी 11 निवडक प्रतिनिधींनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छ भारत, एक भारत-श्रेष्ठ भारत अशा विविध संकल्पनांवर आधारलेल्या कामाचे पंतप्रधानांसमोर सादरीकरण केले. यानंतर पंतप्रधानांनी यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.
==========================================================
इंडोनेशियात गावठी दारू पिल्याने 26 जणांचा मृत्यू
जकार्ता (इंडोनेशिया)- मध्य जावामध्ये गावठी दारू पिल्यामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योग्याकर्ता शहरातून दोघांनी गावठी दारू विकत आणली होती. दारू प्यायल्यानंतर सर्वांनाच त्रास सुरू झाला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान 26 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत.
दरम्यान, गावठी दारूची विक्री करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
==========================================================
इस्कॉन मंदिर हा धर्मांतरण व पैसा कमावण्याचा अड्डा - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
अलाहाबाद- इस्कॉन मंदिर हा धर्मांतरण व पैसा कमावण्याचा एक अड्डा झाला आहे, असा आरोप शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना शंकराचार्य म्हणाले, ‘मुस्लिम व हिंदू धर्माचे नागरिक नसलेल्या राज्यांमध्ये इस्कॉनची मंदिरे का उभारली जात नाहीत. भगवान कृष्णाचे मंदिर जर अगोदरच असेल तर तेथे इस्कॉन मंदिर पुन्हा उभारायची गरजच काय? इस्कॉन मंदिरामध्ये हिंदू नागरिकांचे धर्मांतरण केले जात आहे. येथून मोठ्या प्रमाणात पैसा अमिरेकेत जात आहे. केंद्र सरकारने इस्कॉन मंदिरांची चौकशी करावी.‘ ‘इस्कॉन मंदिरांच्या स्थापनेचा जो मुळ उद्देश होता, त्याच्या विरोधात काम होताना दिसत आहे. कृष्ण भक्तांनी इस्कॉन मंदिरांऐवजी पूर्वीपासून असलेल्या भारतीय मंदिरांमध्ये जाऊन पूजा करावी,‘ असेही शंकराचार्य म्हणाले.
==========================================================
हैदराबादेत फार्मा कंपनीत स्फोट;6 जणांचा मृत्यू
हैदराबाद - शहरालगत असलेल्या हसिथा औषधनिर्माण कंपनीत आज (सोमवार) सकाळी झालेल्या स्फोटात सहा कामगारांचा मृत्यू झाला. तर, पाचजण जखमी झाले आहेत.
पोलिस अधिकारी नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा स्फोट झाला. फॅक्टरीतील भट्टीत (रिऍक्टर) स्फोट झाल्याने त्याठिकाणी काम करत असलेल्या 11 कामगारांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मृत कामगारांपैकी चार जण छत्तीसगड आणि दोघे आंध्र प्रदेशातील रहिवाशी आहेत. या सर्वांचे कुटुंबीयही फॅक्टरीच्या परिसरातच राहत होते. या स्फोटानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी आंदोलन केले.
==========================================================जळगाव; आश्रमशाळेतील 24 विद्यार्थ्यांना विषबाधा
अमळनेर - जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील नानासाहेब उत्तमराव पाटील आश्रमशाळेतील दहा ते 14 वर्ष वयोगटातील 23 विद्यार्थ्यांना काल (ता. 7) मध्यरात्री दोनच्या सुमारास अन्नातून विषबाधा झाली. या विद्यार्थ्यांना अमळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 24 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांना अधिक उपचारासाठी धुळे सामान्य रुग्णालयात हलविले आहे. 11 विद्यार्थ्यांवर अमळगाव रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. अमळगाव येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या देखरेखीखाली डॉ. लांबोळे, पातोंड्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरोळे, मांडळचे वैद्यकीय अधिकारी चंदन पवार उपचार करीत आहेत.
==========================================================...आंबेडकरी जनता उत्तर देईल:आनंदराज आंबेडकर
औरंगाबाद - देशात लोकशाही असतानाही विषारी विचारधारेतून समाजात जाती समुदयात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक काम सुरू झाले असून, याला आंबेडकरी जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला, त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली. रोहित वेमूल या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात केंद्रातील भाजप सरकारची दलितविरोधी जातीयवादी भूमिका समोर आली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल केल्याने सरकार दलित चळवळ दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीय दादागिरी थांबवावी, अन्यथा आंबेडकरी जनता ठोकशाहीचा पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. येत्या काळात रिपब्लिकन सेना गायरान जमीन व हक्काच्या स्मशानभूमीचा प्रश्न मराठवाड्यातून मार्चमध्ये सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या मातेने जन्म दिला, तिलाच शनिमंदिरात जाऊ दिले जात नाही, ही शोकांतिका आहे. महिलांना चार भिंतींच्या आत दडवून ठेवण्याचा जातीय संघटनांचा डाव स्पष्ट दिसतो, असेही त्यांनी सांगितले.
इंदू मिल येथे स्मारकाचा आराखडा आपल्याला मान्य नाही. कारण त्या ठिकाणी उद्यान नको, तर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष के. व्ही. मोरे, प्रा. विजय घोरपडे, प्रशांत म्हस्के, रूपचंद गाडेकर, प्रा. सिद्धोधन मोरे यांची उपस्थिती होती.
==========================================================इंदू मिल येथे स्मारकाचा आराखडा आपल्याला मान्य नाही. कारण त्या ठिकाणी उद्यान नको, तर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष के. व्ही. मोरे, प्रा. विजय घोरपडे, प्रशांत म्हस्के, रूपचंद गाडेकर, प्रा. सिद्धोधन मोरे यांची उपस्थिती होती.
अलाहाबाद'; मौनी अमावस्येला सव्वा कोटी भाविकांचे स्नान
संगम (अलाहाबाद)- मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर सोमवारी स्नान करण्यासाठी रविवारपर्यंत सुमारे तीस लाख भाविक व यात्रेकरू अलाहाबाद येथील संगमाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. या स्नानासाठी व यात्रेसाठी सुमारे सव्वा कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.
माघ यात्रेनिमित्त येथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, या परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. मौनी अमावस्येनिमित्त येथील संगमावर स्नान करणे पवित्र मानले जाते. या स्नानासाठी येथी आश्रम, तंबू, संतांचे मंडप, मठ अशा ठिकाणी पोचलेल्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे चार हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांचे लोंढे लक्षात घेऊन यात्रा पोलिसांनी रविवारी सुरक्षेचे उपाय वाढविले असून, घाट व इतर ठिकाणची गर्दी नियंत्रित करण्याच्या योजना आखल्या आहेत.
==========================================================
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजप सज्ज-शहा
लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज असून, कार्यकर्त्यांना तयारीस लागण्याचे सांगितल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका सहजतेने न घेण्याचे भाजपने ठरविले आहे. या निवडणुकांची दखल घेत अमित शहा यांनी रविवारी भाजप कार्यकर्ते व नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला. भाजपचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांचा कालावधी यावर्षी डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे नवा अध्यक्षांच्या निवडणुकीखाली निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
अमित शहा म्हणाले की, राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार झालो आहोत. पक्षाकडून अद्याप प्रदेशाध्यक्षपदाची चाचपणी सुरु करण्यात आलेली नाही. पण, आम्ही या निवडणुका सहजरित्या घेणार नाही.
डासमुक्ती व चांगल्या आरोग्यासाठी नागरीकांनी घरातील सांडपाणी शोषखड्डयातच मुरवावे - जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर
नांदेड 7- डासमुक्ती व चांगल्या आरोग्यासाठी नागरीकांनी आपल्या घरातील सांडपाणी शोषखड्डयातच मुरवावे व आपले गाव गटारमुक्त करावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी गटारमुक्त अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पानभोसी ता.कंधार येथे केले. दिनांक 6.02.2016 रोजी पानभोसी येथे मोठया प्रमाणावर शोषखड्डंच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच त्या पुढे म्हणाल्या, गटामुक्त अभियान ही काळाची गरज बनली असून आपले गाव डासमुक्त व रोगमुक्त करुन साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविता येईल जेणेकरुन आपल्या ग्रामीण भागातील लोकांचा दवाखाना व औषधीवरील होणारा खर्च टळेल. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून पंचायत समितीचे सभापती बालाजी पांडागळे, उपसभापती सौ.सुनिता कांबळे, जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, गट विकास अधिकारी किरण सायमोते, सरपंच सौ.सुवर्णा नाईकवाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनिल मुनाळे, मिनी बिडीओ गोविंद मांजरमकर, शिवराज कौळ, शेख बाबुसाब, गजानन नाईकवाडे, मन्मथ नाईकवाडे, विश्वांभर डूबूकवाड, बालाजी भातमोडे, महादू कांबळे, किशनराव वल्लमपल्ले, ग्रामसेवक जे.डी.देवकत्ते लाभार्थी व समस्त गावकरी उपस्थित होते.
==========================================================पालकांनी मुलांच्या शिक्षणाबरोबरच कला गुणांना वाव द्यावा - सौ. वर्षाताई भोसीकर
==========================================================
मुखेड; महर्षी मार्कण्डेय ऋषी जयंती व भुमीपुजन सोहळ्याचे आयोजन मुखेड :- रियाज शेख
पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी मार्कण्डेय ऋषीची जयंती उत्सव दि.11 फेब्रुवारी 2016 रोजी हिब्बट रोड येथील श्री मार्कण्डेय मंदिर येथे होणार असल्याची माहीती पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष संजय बेळीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महर्षी मार्कण्डेय ऋषी जयंती उत्सव व आमदार डाँ.तुषार गोविंदराव राठोड यांच्या स्थानीक विकास निधीतुन सभागृह उभारणीसाठी पाच लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असुन त्याचा भुमिपुजन सोहळा दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार किशनराव राठोड, उद्घाटक आ.डाँ.तुषार राठोड, आ.सुभाषराव साबणे, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड सह प्रमुख उपस्थिती माधव अण्णा साठे, प्रमुख व्याख्याते प्रा.डाँ.रामकृष्ण बदने आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी प्रकाश सुर्यकांत गुजलवार होनवडजकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या जयंती उत्सवामध्ये जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहण पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष संजय बेळीकर, महिला अध्यक्षा कांताबाई संभाजी बेतेवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
==========================================================
मुखेड; दि.९ रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांची होणार बैठक
मुखेड :- रियाज शेख
'आदर्श' प्रकरणी खा.अशोकराव चव्हाण यांच्याविरुध्द सत्ताधा-यांनी सुडभावनेतुन सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात मुखेड काँग्रेस कमेटीच्यावतीने काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आज दि.9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या जनसंपर्क कार्यालय होणार असल्याची माहीती प्रवक्ते दिलीप कोडगीरे यांनी दिली.
> राज्यातील सत्ताधारी भाजप युतीच्या विरोधात जनमत संग्रह होतो आहे. सरकारच्या धोरणाविरुध्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी रणशिंग फुंकले. त्यामुळे सत्ताधारी हैराण झाले आहेत. पुर्वीच्या राज्यपालाने परवानगी नाकारल्यानंतरही राजकीय द्वेषातून पुन्हा सीबीआय चौकशीचा निर्णय सत्ताधा-यांनी घेतला असुन याविरुध्द मुखेड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बेटमोगरेकर यांच्या कार्यालयात आयोजित केली आहे. तसेच याप्रकरणी मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. याबैठकीस सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर, सुभाष पा.दापकेकर, तालुका सरचिटणिस श्रावण रँपनवाड, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, कार्याध्यक्ष दिलीप कोडगीरे, युवक तालुकाध्यक्ष गोटू पाटील बिल्लाळीकर, अखिल येवतीकर, शिवा मुद्देवाड, एन.एस.यु.आय.चे खाजा धुंदी, मारोती घाटे, महिला आघाडीच्या श्रीमती अलका चिद्रे यांनी केले आहे.
==========================================================



No comments:
Post a Comment