[अंतरराष्ट्रीय]
१- पाकः चिमुकल्यावर बलात्कार करून खून
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- सुप्रीम कोर्टाने केजरीवाल सरकारला फटकारले, एसीमध्ये बसून कोर्टाच्या आदेशाची वाट बघू नका
३- गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधात कोल्हापूरच्या पठ्ठ्याचाही समावेश
४- नीरजाचा मारेकरी भोगतोय १६० वर्षांचा तुरुंगवास
५- Freedom 251: एका हॅण्डसेटमागे कंपनीला ३१ रुपयांचा फायदा, संचालकांचा दावा
६- हिंदी निव्वळ प्रादेशिक भाषा: अदूर गोपालकृष्णन
७- बलात्काराच्या खोट्या तक्रारींपासून संरक्षण हवे - सत्र न्यायाधीश निवेदिता अनिल शर्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- सलमानला ठार करु, मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल
९- दादर स्टेशनवर टीसीची प्रवाशाला मारहाण
१०- शिवाजी पार्कमध्ये देशातील सर्वात उंच तिरंगा फडकणार?
११- मणिपूरमध्ये आढळले दुसऱ्या महायुद्धातील बॉंब
१२- छत्तीसगड; ...अन् 'त्या' वृद्धेसमोर मोदी झाले नतमस्तक
१३- कोल्हापूर: खड्ड्यामुळे प्रसूती झाली रिक्षातच
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- पुणे; 6 वर्षाच्या चिमुकल्याची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या
१५- लातुर: MIM कडून पानगाव प्रकरणाचं धार्मिक राजकारण
१६- श्रीनगर; दोन्ही हात गमावूनही क्रिकेटर होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात
१७- मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर दुरूस्तीचे काम सुरू, ११ मार्चपर्यंत एक लेन बंद राहणार
१८- चेन्नईत ज्येष्ठ नागरिक करणार मोफत बस प्रवास
१९- वाराणसी; मोदींच्या कार्यक्रमात घोषणा देणाऱ्याला मारहाण
२०- देशात वाढत असलेल्या अराजकतेच्या विरोधात मुखेडमध्ये तीव्र निदर्शने
२१- मुखेड; महादेव पार्वती मंदीर जून्ना याञा महोत्सव निमित्य जंगी कुस्त्यांचा सामना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- सोनम कपूरच्या 'नीरजा'ची तीन दिवसात बक्कळ कमाई
२३- कशाला हवंय ऑस्कर, त्यांनाच येऊ दे इकडे - दिग्दर्शक उमेश कुलकर्णी
२४- क्रिकेट आता करिअरचा पर्याय- कपिल देव
२५- दैनंदिन व्यवहारात मराठीची खिचडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जगाबरोबर लढा पण पण आपल्या माणसांसोबत नाही, कारण आपल्या माणसांसोबत जिंकायचे नसते तर जगायचे असते
[गिरीश वाकोडीकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================
=======================================
सुप्रीम कोर्टाने केजरीवाल सरकारला फटकारले, एसीमध्ये बसून कोर्टाच्या आदेशाची वाट बघू नका
Freedom 251: एका हॅण्डसेटमागे कंपनीला ३१ रुपयांचा फायदा, संचालकांचा दावा
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर दुरूस्तीचे काम सुरू, ११ मार्चपर्यंत एक लेन बंद राहणार
हिंदी निव्वळ प्रादेशिक भाषा: अदूर गोपालकृष्णन
मुंबई - हिंदी ही अत्यंत सुंदर भाषा असली; तरी ती एक "प्रादेशिक भाषा‘ असून इतरांवर लादली जाऊ नये, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले आहे.
"हिंदी ही नि:संशय अत्यंत सुंदर भाषा आहे. हिंदीमधून लिहिणारे अनेक उत्कृष्ट लेखकही आहेत. मात्र हिंदी ही भाषा प्रशासकीय मार्गाने वा इतरही कोणत्याही माध्यमामधून इतरांवर लादण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. भारत हा अनेक संस्कृती, भाषा, जीवनशैलींचा देश आहे. तेव्हा ही वस्तुस्थिती समजावून घेऊन त्याचा आदर ठेवावयास हवा,‘‘ असे परखड मत गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले.
"हिंदी ही राष्ट्रभाषा असून इतर भाषा या प्रादेशिक असल्याची धारणा चुकीची आहे. एखादी भाषा राष्ट्रभाषा ठरविण्यासाठी ती सर्व देशाची भाषा असणे आवश्यक आहे. हिंदी ही भारतामधील अनेक भागांमधील समुदायांची भाषा नसल्याने तिची गणनाही प्रादेशिक भाषा म्हणूनच करावयास हवी,‘‘ असे गोपालकृष्णन यांनी सांगितले.
=======================================
"बलात्काराच्या खोट्या तक्रारींपासून संरक्षण हवे'
नवी दिल्ली - महिलांच्या आत्मसन्मानाच्या संरक्षणार्थ संघर्ष करत असतानाच आता बलात्काराच्या बनावट प्रकरणांमध्ये अडकविल्या जात असलेल्या पुरुषांचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांची निर्मितीही आवश्यक असल्याचे मत दिल्लीमधील एका न्यायालयाने व्यक्त केले आहे. अशा स्वरुपाच्या एका प्रकरणामधून पुरुष आरोपीची निर्दोष सुटका करताना येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश निवेदिता अनिल शर्मा यांनी यासंदर्भातील न्यायालयाची भूमिका स्पष्ट केली.
""अशा स्वरुपाच्या एखाद्या प्रकरणामध्ये अडकविण्यात आलेल्या आरोपीच्या झालेल्या मानहानीची भरपाई कदाचित कधीच करता येणार नाही; मात्र त्याची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयामधून कदाचित त्याला थोडी मन:शांती लाभेल. शिवाय आरोपी आता अब्रुनुकसानीची तक्रार करु शकतो. महिलांच्या संरक्षणार्थ कायदे आहेत. मात्र अशा कायद्यांचा गैरवापर झाल्यास पुरुषांचे संरक्षण करणारे कायदे कोठे आहेत? तेव्हा पुरुषांचेही संरक्षण करणे आवश्यक आहे,‘‘ असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.
या प्रकरणामध्ये एका महिलेने ऑक्टोबर 2013 मध्ये आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचे; तसेच त्याआधी सुमारे दीड वर्षभरापूर्वी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपीने महिलेशी सुमारे पाच वर्षांपासूनची ओळख असून शारीरिक संबंध हे परस्पर सहमतीनेच ठेवण्यात आल्याचे म्हटले होते. महिलेच्या फिर्यादीमध्ये परस्पर विरोधी बाबी असल्याचे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने आरोपीस मुक्त केले.
=======================================
कशाला हवंय ऑस्कर, त्यांनाच येऊ दे इकडे - दिग्दर्शक उमेश कुलकर्णी
मिरज- शिक्षणव्यवस्थेने आपल्यात न्यूनगंड तयार केलांय. त्यामुळे ऑस्करला अवास्तव महत्त्व आलंय. कशाला पाहिजे ऑस्कर ? त्यांनाच येऊ दे आपल्याकडे‘ अशा शब्दांत ‘देऊळ‘ चे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी ऑस्करची खिल्ली उडवली. बालगंधर्व नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या लघुचित्रपट महोत्सवाची सांगता त्यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर त्यांनी रसिकांशी संवाद साधला. रोखठोक प्रश्न, तितकीच रोखठोक उत्तरे असा संवादाचा पूल तयार होत गेला.
ते म्हणाले, "ऑस्करला एन्ट्री पाठवावी हे ठीक. त्यामुळे आपण कोठे आहोत हे समजून येते; मात्र उदोउदो कशाला? ते मिळालंच पाहिजे याचा हट्ट नको. आपलं मूल्यांकन ऑस्करने का करावं? आपल्याकडेही राष्ट्रीय पारितोषिके आहेत. कितीजण ते चित्रपट पाहतात हा प्रश्न आहे. ऑस्कर म्हणजे मोक्षप्राप्ती नव्हे.‘‘
संवाद हरवतोय
ते म्हणाले, "संवाद हरवत चाललाय. नातेसंबंधातला गोडवा कमी होतोय. कधीतरी एकत्र येणारी भावंडे मोबाईलशिवाय संवाद साधू शकत नाहीत. दुसऱ्याला समजून घेणारा संवाद घडत नाहीये. संवाद झालाच तर दुसऱ्याला पूर्णपणे मारून टाकलं जातं; त्याचं ऐकून घेतलं जात नाही. संवादाची प्रक्रिया सुरू ठेवण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. परंपरांवर विश्वास ठेवूया, पण त्यातून काहीतरी नवं घडवण्याचा मानस असला पाहिजे. चित्रपट महोत्सवासारखे प्लॅटफार्म उपयोगात येतील. आजूबाजूला काय घडतंय याकडे डोळे उघडून पाहिलं पाहिजे, ही ताकद माध्यमांत आहे.‘‘
=======================================
क्रिकेट आता करिअरचा पर्याय- कपिल देव
नवी दिल्ली- क्रिकेट आता करियरसाठी युवकांना नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. पालकांना मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कपिल देव यांनी व्यक्त केले. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीने (एफआयसीसीआय) आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी बोलताना कपिल देव म्हणाले, ‘क्रिकेटमुळे (आयपीएल) खेळाडूला 40 दिवसांत तब्बल 10 कोटी रुपये मिळू लागले आहेत. खरोखरच ही एक मोठी गंमत आहे. क्रिकेट आता करिअरचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.‘
पालकांची विचार करण्याची पद्धत सुद्धा आता बदलली आहे. पूर्वी पालक अभ्यासाकडे लक्ष दे म्हणून सांगायचे. परंतु, आताचे पालक क्रिकेट खेळून सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड सारखा तयार हो म्हणून सांगताना दिसतात. शाळेमध्ये खेळत असतानाच खेळाडूमधील गुण दिसू लागतात. शिवाय, तेथे खेळाडू तयारही होतात. चाळीस टक्के खेळाडू हे शाळेत तयार होऊन आल्याचे पाहायला मिळते, असेही कपिल म्हणाले.
=======================================
मणिपूरमध्ये आढळले दुसऱ्या महायुद्धातील बॉंब
इंफाळ - मणिपूर राज्यातील म्यानमार देशाच्या सीमारेषेजवळील एका भागामध्ये दुसऱ्या महायुद्ध काळातील 87 जिवंत बॉंब सापडले आहेत. सीमारेषेस लागून असलेल्या मोरेह या गावामध्ये एका वीजनिर्मिती प्रकल्पाच्या इमारतीचे काम सुरु असताना कामगारांना हे बॉंब आढळून आले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (1944) जपानी लष्कराने भारतावर केलेल्या आक्रमणावेळी हे बॉंब येथे ठेवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, येथील काम तत्काळ थांबविण्यात येऊन येथील बॉंब सुरक्षित स्थळी नेण्यात आले. ब्रिटीश सैन्य व जपानमध्ये 1944 मध्ये झालेली "इंफाळची लढाई‘ आशियात झालेल्या महायुद्धामधील अत्यंत महत्त्वाची लढाई मानली जाते.
=======================================
चेन्नईत ज्येष्ठ नागरिक करणार मोफत बस प्रवास
चेन्नई (तमिळनाडू)- शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साठ वर्षे पूर्ण असणाऱ्या नागरिकांसाठी मोफत बस प्रवास योजना बुधवारपासून सुरू होत आहे. प्रत्येक महिन्याला ज्येष्ठ नागरिकाला दहा पास मिळणार आहेत. यासाठी साठ वर्षे वय पूर्ण असल्याचे पुरावे व छायाचित्र जमा केल्यानंतर मोफत बस प्रवासाचा पास मिळू शकेल. शहरातील 42 बस स्थानकांवर हे पास उपलब्ध असणार आहेत. शिवाय, www.mtcbus.org या संकेतस्थळावरूनही अर्ज डाऊनलोड करता येणार आहेत.
=======================================
मोदींच्या कार्यक्रमात घोषणा देणाऱ्याला मारहाण
छत्तीसगड; ...अन् 'त्या' वृद्धेसमोर मोदी झाले नतमस्तक

कुर्रुभट (छत्तीसगड)- धामतरी जिल्ह्यातील एका 104 वर्षीय वृद्ध महिलेने आपल्याकडील शेळ्या विकून घराजवळ शौचालय बांधल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या वृद्धेसमोर एका कार्यक्रमादरम्यान अक्षरशः नतमस्तक झाले. गावांना आधुनिक सुविधांच्या माध्यमातून जोडण्यासाठी पंतप्रधानांनी ‘आर-अर्बन मिशन‘ला रविवारपासून प्रारंभ केला. यावेळी वृद्ध महिलेचा मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘धमतरी या गावातील कन्वर बाई (वय 104) यांनी आपल्या 10 शेळ्या विकून आलेल्या पैशांमधून शौचालय बांधले आहे. त्या टीव्ही पाहात नाही अथवा वर्तमानपत्रही वाचत नाही. परंतु, त्यांनी ‘स्वच्छ भारत‘ योजनेसाठी मोठे काम केले आहे. नागरिकांसमोर त्यांनी एक आदर्श समोर ठेवला आहे,‘ असे मोदी म्हणाले. ‘गावातील महिलांच्या हातात रिमोट आल्यामुळे गाव विकास होत आहे. यामुळे ‘स्वच्छ भारत‘ अभियानाचे स्वप्न साकार होणार आहे. युवकांसाठी त्यांनी एक आदर्श ठेवला आहे,‘ असेही मोदी म्हणाले.
=======================================
कोल्हापूर: खड्ड्यामुळे प्रसूती झाली रिक्षातच
दैनंदिन व्यवहारात मराठीची खिचडी
सांस्कृतिक राजधानी समजले जाणारे पुणे शहर हे बहुविविधतेने नटलेले आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या वेगवेगळ्या भागातील लोक पुण्यात राहतात. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा आपल्याला ऐकायला मिळते. मात्र, महाराष्ट्रीयनच नव्हे, तर अस्सल पुणेकरांच्या भाषेवरही आता प्रचंड परिणाम झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सर्वत्रच ‘भाषेची खिचडी‘ अनुभवायला मिळत आहे. हिंदी-इंग्रजीत बोलणे ही तर ‘स्टेट्स‘ची गोष्ट बनली आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मराठीचे स्वरूप कसे झाले आहे? याचा वेध घेतला आहे, ‘सकाळ‘च्या प्रतिनिधींनी मातृभाषा दिनाच्या निमित्ताने.
=======================================
पाकः चिमुकल्यावर बलात्कार करून खून
कराची- पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एका आठ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केल्यानंतर त्याच्यावर बलात्कार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकल्याचे शनिवारी (ता. 20) अपहरण झाले होते. डेरा मुराद जमाली गावामध्ये रविवारी त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्यावर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
=======================================
देशात वाढत असलेल्या अराजकतेच्या विरोधात मुखेडमध्ये तीव्र निदर्शने
मुखेड :-
सत्ताधारी पक्षाच्या अराजकतेच्या विरोधात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा. दिल्ली येथील जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार निर्दोष असुन त्याच्यावरिल देशद्रोहाचा खटला मागे घ्यावा आदी मागण्यासाठी एस.एफ.आय. व तन्जीम ए इन्साफ च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौस अली सलगरकर, काँ.बालाजी लंगेवाड, रियाज शेख, जाकेर बा-हाळीकर, काँ.अंकुश माचेवाड, आसद बल्खी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हैद्राबाद येथील विद्यापीठात दलित स्काँलर रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी, बंडारू दत्तात्रय यांच्या वर खुनाचा गुन्हा दाखल करावा, कन्हैयाकुमारची बिनशर्त सुटका करावी, तन्जीम ए इन्साफचे दिल्ली सचिव आमेक जामेई यांना मारहाण करणारे भाजपा आमदार ओ.पी.शर्मा यांचे विधानसभा सदसत्व रद्द करावे, माकपच्या कार्यालयावर हल्ला करणा-या व काँ.सीताराम येचुरी यांना धमकी देणा-यावर गुन्हें दाखल करावेत, जातीयवाद व तणाव निर्माण करणा-या अभावीप व आर.एस.एस. वर बंदी आणावी, पानगाव येथील पोलिस अधिकारी शेख यांना मारहाण करणा-या गुंडाना तात्काळ अटक करावी, शेतकरी विरोधी वक्तव्य करणा-या खा.शेट्टीचे लोकसभा प्रतिनिधित्व रद्द करावे यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. याचे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. याआंदोलनात सामाजिक कार्यकर्ते गौस अली सलगरकर, जाकेर बा-हाळीकर, एस.एफ.आय.चे काँ.बालाजी लंगेवाड, काँ अंकुश माचेवाड, संभाजी बिग्रेडचे संतोष पाटील इंगोले, इन्साफचे आसद बल्खी, शेख महेताब, संजय पिल्लेवाड, योगेश फुलारी, मुस्तफा पिंजारी, हाफिज माजीद, अस्लम दौलताबादी, आयुब चिखलीकर, बालाजी काब्दे, दत्ता चिंतलवाड, मोतीपाशा पाळेकर, अनिल सलगरकर, अमजत पठाण, आनंदा बनकर, मिलिंद लोहबंदे आदी सह एस.एफ.आय, तन्जीम ए इन्साफ चे कार्यकर्ते सहभागी होते.
=======================================
मुखेड; महादेव पार्वती मंदीर जून्ना याञा महोत्सव निमित्य जंगी कुस्त्यांचा सामना
श्री महादेव पार्वती मंदीर जून्ना याञा महोत्सव निमित्य जंगी कुस्त्यांचा सामना "
मुखेड
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी तालुक्यातील मौजे जुन्ना येथील महादेव पार्वती मंदीर येथे भव्य याञा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याञेनिमित्य आयोजित कुस्त्यांचा फडात सहभागी होण्याचे आवाहन वैद्य निवृत्ती पाटील वडेर यांनी प्रसिध्दी पञका द्वारे केली आहे.
दरवर्षी तालुक्यातील जुन्ना येथील महादेव पार्वती मंदीर येथे याञा महोत्सव साजरा केला जातो. यावेळी 25 फेब्रूवारी रोज गुरुवारी सकाळी 9 ते 11 वाजता दरम्यान कुंभमेळा, व 11 ते 02 वाजता महादेवपार्वतीचा रूद्राभिषेक आणि महाप्रसाद दुपारी 03 ते 05 वाजता व राञी ठिक 8 वाजता आतिषबाजी (बारुदाचा) कार्यक्रम होईल. तसेच गुरुवारी सकाळी ह.भ.प. नामदेव महाराज दापकेकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम व पहाटे पालकी मिरवणुक व काल्याचे किर्तन ह.भ.प.साहेबराव महाराज पांचाळ नांदेड यांच्या हस्ते होईल. 26 फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी 3 वाजता भव्य कूस्त्यांचा फड रंगणार आहे. तरी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्ये मध्ये पहेलवान व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजक वैद्य निवृत्ती पाटील वडेर आणि समस्त गावकरी मंडळी मौजे जुन्ना ता.मुखेड यांनी केले आहे.
=======================================
=======================================
=======================================
१- पाकः चिमुकल्यावर बलात्कार करून खून
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- सुप्रीम कोर्टाने केजरीवाल सरकारला फटकारले, एसीमध्ये बसून कोर्टाच्या आदेशाची वाट बघू नका
३- गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधात कोल्हापूरच्या पठ्ठ्याचाही समावेश
४- नीरजाचा मारेकरी भोगतोय १६० वर्षांचा तुरुंगवास
५- Freedom 251: एका हॅण्डसेटमागे कंपनीला ३१ रुपयांचा फायदा, संचालकांचा दावा
६- हिंदी निव्वळ प्रादेशिक भाषा: अदूर गोपालकृष्णन
७- बलात्काराच्या खोट्या तक्रारींपासून संरक्षण हवे - सत्र न्यायाधीश निवेदिता अनिल शर्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- सलमानला ठार करु, मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल
९- दादर स्टेशनवर टीसीची प्रवाशाला मारहाण
१०- शिवाजी पार्कमध्ये देशातील सर्वात उंच तिरंगा फडकणार?
११- मणिपूरमध्ये आढळले दुसऱ्या महायुद्धातील बॉंब
१२- छत्तीसगड; ...अन् 'त्या' वृद्धेसमोर मोदी झाले नतमस्तक
१३- कोल्हापूर: खड्ड्यामुळे प्रसूती झाली रिक्षातच
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- पुणे; 6 वर्षाच्या चिमुकल्याची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या
१५- लातुर: MIM कडून पानगाव प्रकरणाचं धार्मिक राजकारण
१६- श्रीनगर; दोन्ही हात गमावूनही क्रिकेटर होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात
१७- मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर दुरूस्तीचे काम सुरू, ११ मार्चपर्यंत एक लेन बंद राहणार
१८- चेन्नईत ज्येष्ठ नागरिक करणार मोफत बस प्रवास
१९- वाराणसी; मोदींच्या कार्यक्रमात घोषणा देणाऱ्याला मारहाण
२०- देशात वाढत असलेल्या अराजकतेच्या विरोधात मुखेडमध्ये तीव्र निदर्शने
२१- मुखेड; महादेव पार्वती मंदीर जून्ना याञा महोत्सव निमित्य जंगी कुस्त्यांचा सामना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- सोनम कपूरच्या 'नीरजा'ची तीन दिवसात बक्कळ कमाई
२३- कशाला हवंय ऑस्कर, त्यांनाच येऊ दे इकडे - दिग्दर्शक उमेश कुलकर्णी
२४- क्रिकेट आता करिअरचा पर्याय- कपिल देव
२५- दैनंदिन व्यवहारात मराठीची खिचडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जगाबरोबर लढा पण पण आपल्या माणसांसोबत नाही, कारण आपल्या माणसांसोबत जिंकायचे नसते तर जगायचे असते
[गिरीश वाकोडीकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
=======================================
6 वर्षाच्या चिमुकल्याची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या
पुणे : पूर्ववैमन्यसातून ६ वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून हत्या करण्यात आली आहे. बारामती शहराजवळच्या पिंपळी इथं ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आरोपी बापूराव देवकातेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जुन्या भांडणाच्या वादातून बापूरावने शेजारी राहत असलेल्या ओम खिलारेच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घातला. बापूरावच्या या निर्दयी कृत्यानंतर चिमुकल्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी बापूरावला अटक करण्यात आली आहे.
सलमानला ठार करु, मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. खुद्द सलमानला धमकी आली नसली, तरी अज्ञाताने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करुन त्याला ठार मारण्याचा इशारा दिला आहे.
पोलिसांना 11 दिवसांपूर्वी हा धमकीचा फोन आला होता. याबाबत चौकशी सुरु आहे, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं.
प्रथमदृष्ट्या कोणीतरी चेष्टा मस्करी करत असल्याचं दिसत आहे. मात्र याबाबत सखोल चौकशी करुन धमकी देणाऱ्याची ओळख पटवली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दादर स्टेशनवर टीसीची प्रवाशाला मारहाण
मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा तिकीट चेकरची गुंडागर्दी समोर आली आहे. दादर स्टेशनवर टीटी नरेश कुमार यांनी एका प्रवाशाला मारहाण केल्याचा आरोप आहे.
टीटी नरेश कुमार यांची गुंडागर्दी एका प्रवाशाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. नरेश कुमार यांनी दोन प्रवाशांना पकडून कानशिलात लगावल्या. त्यानंतर त्यांचे कॉलर पकडून तिकीट चेकिंग रुममध्ये फरफटत नेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं
दरम्यान, सध्यातरी याप्रकरणाची अधिकृत तक्रार कुठेही दाखल झालेली नाही.
दरम्यान, सध्यातरी याप्रकरणाची अधिकृत तक्रार कुठेही दाखल झालेली नाही.
कोण आहे नरेश कुमार?
नरेश कुमार हरियाणाचे आहेत. त्यांनी पंजाबच्या कबड्डी संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे.
यापूर्वीही नरेश कुमार आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मुंबईतच हार्बर मार्गावर कुर्ला स्टेशनवर सीबीआयच्या टीमवरही हल्ला केला होता. त्यावेळी तीनही टीसींना दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.
यापूर्वीही नरेश कुमार आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मुंबईतच हार्बर मार्गावर कुर्ला स्टेशनवर सीबीआयच्या टीमवरही हल्ला केला होता. त्यावेळी तीनही टीसींना दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.
गुरुत्वाकर्षण लहरींच्या शोधात कोल्हापूरच्या पठ्ठ्याचाही समावेश
Photo - facebook
मुंबई : सुमारे शंभर वर्षानंतर लागलेल्या गुरुत्वाकर्षण लहरींच्या संशोधनात कोल्हापूरचा पठ्ठ्या चिन्मय कलघटगीचाही हातभार आहे. जगाला हेवा वाटावा असं काम या पठ्ठ्याने केलं आहे. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शंभर वर्षांपूर्वी ज्या गुरुत्वाकर्षण लहरींचं भाकित केलं होतं, त्यांचा शोध लावण्यात काही दिवसांपूर्वीच शास्त्रज्ञांना यश आलं आहे. जगभरात या संशोधनाचं कौतुक होत आहे. या संशोधनकार्यात चिन्मयनेही मोलाची भूमिका बजावली. कोल्हापूरचा 24 वर्षीय चिन्मय अमेरिकेतील कार्डिफ युनिव्हर्सिटीत पीएचडी करतोय. गुरुत्वाकर्षण लहरींबाबत जे संशोधन सुरु होतं, त्या टीममध्ये चिन्मयचाही समावेश होता.
छत्रपती शाहू विद्यालयाचा विद्यार्थी
चिन्मयचं कुटुंब कोल्हापुरातील लक्ष्मीनगर परिसरात राहतं. चिन्मयने आपलं शालेय शिक्षण कोल्हापूरच्या छत्रपती शाहू विद्यालयातून पूर्ण केलं. चिन्मयला पहिल्यापासून अवकाश, ग्रह, तारे, गुरुत्वाकर्षण याबाबत उत्सुकता होती. त्यामुळेच त्याने पुढील शिक्षण या क्षेत्राशी निगडीतच घेण्याचं ठरवलं. शालेय शिक्षण पूर्ण करून चिन्मय 2010 मध्ये चेन्नईला रवाना झाला. चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटमध्ये त्याने गुरुत्वाकर्षण लहरींबाबत प्रथामिक संशोधन अभ्यास केला. त्यानंतर मग त्याने थेट अमेरिका गाठून कार्डिफ विद्यापीठात प्रवेश घेतला.
लातुर: MIM कडून पानगाव प्रकरणाचं धार्मिक राजकारण
लातुर : पानगावात पोलिसांना झालेल्या मारहाण प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न एमआयएमनं सुरु केला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी यांच्या प्रक्षोभक ट्विटनंतर आज आमदार इम्तियाज जलील हे लातुरमध्ये मोर्चा काढणार आहेत. शिवजयंतीनिमित्तानं 18 तारखेला पानगावमधील उत्साही तरुणांनी आंबेडकर चौकातील संवेदनशील ठिकाणी भगवे झेंडे लावण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवून दिलं. मात्र शिवजयंतीदिवशी पुन्हा आंबेडकर चौकात गर्दी झाली आणि घोषणाबाजीसह झेंडे फडकावले जाऊ लागले. त्यामुळं वातावरण चिघळू नये यासाठी पोलीस शिपाई युनूस शेख आणि आवसकर यांनी जमावाला अटकाव केला. त्यामुळं जमावानं थेट पोलिसांवर हल्ला करुन त्यांना मारहाण केली. ज्यात दोन्ही पोलीस जखमी झालेत. मात्र इम्तियाज जलील आता त्याचं धार्मिक राजकारण करुन वातावरण तापवण्याचा प्रयत्न करु लागले आहेत.
शिवाजी पार्कमध्ये देशातील सर्वात उंच तिरंगा फडकणार?
मुंबई : मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये लवकरच देशातील सर्वात उंच तिरंगा फडकण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेचा खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात फ्लॅग फाऊण्डेशन इंडियाकडे परवानगी मागितली असून मुंबई हेरिटेज समितीकडे प्रस्ताव मांडला आहे, अशी माहिती ‘डीएनए’ वृत्तपत्राने दिली आहे. बेलापूरच्या नवी मुंबई म्युन्सिपल समितीमध्ये सध्या भारतातला सर्वात उंच तिरंगा फडकतो. या तिरंग्याची उंची 70 मीटर आहे, तर शिवाजी पार्क परिसरात प्रस्तावित तिरंग्याची उंची 74 मीटर (साधारण 240 फूटांपेक्षा अधिक) असेल. सर्व परवानग्या मिळाल्यास महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे पूर्वी तिरंगा फडकवण्याचा मानस आहे. सर्वात उंच तिरंग्यामुळे शिवाजी पार्कला शहरात वेगळी ओळख मिळेल, असं म्हटलं जात आहे. हा झेंडा वांद्रा-वरळी सी लिंकवरुनही पाहता येईल. झेंड्याच्या खांबाच्या उंचीचं काम सुरु झालं असून, झेंड्याच्या लांबी-रुंदीबाबत अद्याप निश्चित करणं बाकी असल्याचं शेवाळेंनी ‘डीएनए’ला सांगितलं आहे. राष्ट्रध्वज असल्यामुळे त्याबाबत कोणताही ढिसाळपणा केला जाणार नसल्याचंही शेवाळेंनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाशेजारी तिरंग्याचा खांब असावा, असा राहुल शेवाळेंचा मानस आहे. यासाठी 50 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
सोनम कपूरच्या 'नीरजा'ची तीन दिवसात बक्कळ कमाई
मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरचा ‘नीरजा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पकड घेताना दिसत आहे. या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात बक्कळ कमाई केली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या कमाईचा आकडा 22 कोटींपर्यंत पोहोचला आहे.
या सिनेमाने शुक्रवारी 4.70 कोटी, शनिवारी 7.60 कोटी आणि रविवारी 9.71 कोटींचा गल्ला जमवला.
या सिनेमात सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहे. सोनमच्या अभिनयाचा कस लागला आहे. याशिवाय शबाना आझमी, योगेंद्र टिक्कू आणि शेखर रवजियानी यांचीही भूमिका या सिनेमात आहे.
अपहरण झालेल्या विमानातील प्रवाशांचा जीव वाचवताना बळी पडलेल्या फ्लाइट पर्सर नीरजा भानौतच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. 5 सप्टेंबर 1986ची कराचीमधील दुर्घटना. मुंबई- फ्रँकफर्ट विमानप्रवासादरम्यान कराचीला विमान हायजॅक होतं. अन् त्या विमानातील भारतीय, पाक अन् अमेरिकेतील नागरिकांच्या आयुष्याला निर्माण झालेला धोका. तो जिवावर बेतणारा प्रसंग… पण त्या सगळ्यावर मात करणारी ही सर्वसामान्य मुलगी. हा सर्व थरार नीरजा सिनेमामध्ये दाखवण्यात आला आहे.
दोन्ही हात गमावूनही क्रिकेटर होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात
श्रीनगर : हात-पाय धडधाकट असूनही अनेकांना मेहनतीचा कंटाळा असतो. तर दुसरीकडे अपंग असूनही मनाने अभंग असलेल्या काही व्यक्ती प्रयत्नांच्या जोरावर यशस्वी होतातय दक्षिण काश्मीरमध्ये राहणाऱ्या 20 वर्षांच्या आमीर हुसेनने दोन्ही हात गमावल्यानंतरही क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे.
काश्मीरमधल्या बिजबेहारामध्ये राहणाऱ्या आमीरने आत्मविश्वासाला मेहनतीची जोड देऊन क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकारलं. वयाच्या आठव्या वर्षी मशिनमध्ये अडकून त्याला अपघात झाला, त्यात त्याने आपले दोन्ही हात गमावले.
सर्व अडथळ्यांवर मात करुन आमीरने गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण असे क्रिकेटचे सर्व पैलू आत्मसात केले. विशेष म्हणजे आता तो पॅरा क्रिकेट टीमचा कर्णधार म्हणून राज्याचं प्रतिनिधित्वही करत आहे. जम्मू-काश्मीरचे पहिले आंतरराष्ट्रीय खेळाडू परवेझ रसूलही आमीरच्या म्हणजेच बिजबेहारा गावचे आहेत.
लहानपणापासूनच आमीरची क्रिकेटपटू होण्याची इच्छा होती. मात्र विलो कटिंग युनिटजवळ खेळताना मशिनमध्ये त्याचे हात अडकले आणि त्याच्या स्वप्नांना ग्रहण लागलं. मात्र हताश न होता त्याने संकटांशी सामना करण्याचं ठरवलं.
आमीरच्या वडिलांनी आपल्या मुलाला पुन्हा उभारी देण्यासाठी सगळी संपत्ती विकली. अपघातानंतर तीन वर्ष तो हॉस्पिटलमध्ये होता. त्यानंतर आजीच्या मदतीने त्याने छोटी-छोटी कामं शिकायला सुरुवात केली. तो पायांनी आंघोळ करणं, केस विंचरायला शिकला. इतकंच नाही तर ओठांच्या मदतीने पाण्याने भरलेली बालदीही तो उचलू शकतो.
नीरजाचा मारेकरी भोगतोय १६० वर्षांचा तुरुंगवास
- नवी दिल्ली, दि. २२ - 'नीरजा' या चित्रपटामुळे नीरजा भानोत या भारतीय हवाई सुंदरीची विस्मृतीत गेलेली शौर्य कथा आज नव्या पिढीपर्यंत पोहोचली आहे. १९८६ साली पॅलेस्टाईनच्या अबू निदाल दहशतवादी संघटनेने पॅन एएम फ्लाईट ७३ चे कराची येथून अपहरण केले होते.या विमानाच्या अपहरणकर्त्यांपैकी एकाला अमेरिकेच्या एफबीआयने २००१ साली बँकॉक येथून अटक केली होती. झायद हसन अब्द अल लतीफ मसूद अल सफारीनी असे या अतिरेक्याचे नाव होते.अपहरणाचा उद्देश सफल होत नसल्याचे लक्षात येताच त्याने नीरजा आणि विमानातील अन्य प्रवाशांवर गोळया झाडल्या होत्या.एफबीआयने २००१ मध्ये त्याला बँकॉकमधून अटक केल्यानंतर अमेरिकेत खटला चालला. झायद हसनला अमेरिकन न्यायालयाने १६० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून, तो कोलोरॅडो येथील तुरुंगात आहे.या अपहरणातील अन्य चार दहशतवादी २००८ मध्ये पाकिस्तानातील अदायला तुरुंगातून फरार झाले. जानेवारी २०१० मध्ये या फरार अतिरेक्यांपैकी एकाचा उत्तर वझरिस्तानात ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला. मात्र या अतिरेक्याच्या मृत्यूची ठोस माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे अजूनही एफबीआयच्या मोस्ट वॉंटेड अतिरेक्यांमध्ये त्यांचा समावेश असून, त्यांच्यावर पन्नास लाख डॉलरचे इनाम अमेरिकेने ठेवले आहे.पाच सप्टेंबर १९८६ रोजी या अतिरेक्यांनी कराची येथून अमेरिकेच्या पॅन एएम फ्लाईटचे अपहरण केले होते. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नीरजाने अतिरेक्यांचा सामना करताना जे शौर्य, धाडस दाखवले त्याला तोड नाही. विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवताना नीरजाने स्वत:च्या प्राणांची पर्वा केली नाही. अशोक चक्र या शौर्य पुरस्काराने सन्मानित होणारी नीरजा भानोत ही सर्वात तरुण भारतीय आहे.
सुप्रीम कोर्टाने केजरीवाल सरकारला फटकारले, एसीमध्ये बसून कोर्टाच्या आदेशाची वाट बघू नका
हरियाणातील जाट आंदोलनामुळे दिल्ली शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाल्याप्रकरणीच्या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला चांगलीच चपराक लगावली. न्यायालयाने सोमवारी हरयाणा सरकारला यासंदर्भातील परिस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी दिल्ली सरकारनेही मुनाक कालव्यावर पुरेशी सुरक्षाव्यवस्था तैनात करावी यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायमूर्ती यू. यू. ललीत यांनी ही याचिका दाखल करून घेण्यास नकार देत केजरीवाल सरकारला चांगलेच फटकारले. या प्रकारच्या समस्या दोन्ही राज्य सरकारांच्या पातळीवर सामंजस्याने सोडवण्याऐवजी तुम्ही त्या न्यायालयात आणता. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश हवे असतात. तुम्हाला सगळे आयत्या ताटात वाढून हवे असते, अशा शब्दांत न्यायालयाने ‘आप’ सरकारची कानउघडणी केली. यावेळी दिल्लीचे जलसंपदा मंत्री कपिल मिश्रादेखील न्यायालयात उपस्थित होते. याबद्दल न्यायालयाने त्यांची कानउघडणी करताना म्हटले की, तुम्ही मंत्री प्रत्यक्ष बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा न्यायालयात येऊन बसता. वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून तुम्ही फक्त न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघता, असे खडे बोल न्यायमूर्ती यू. यू. ललीत यांनी सुनाविले. दरम्यान, यावेळी दिल्ली सरकारचे वकील राजीव धवन यांनी सरकारची बाजू चिकाटीने लावून धरल्याने न्यायालयाने मुनाक कालव्यातून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.
=======================================Freedom 251: एका हॅण्डसेटमागे कंपनीला ३१ रुपयांचा फायदा, संचालकांचा दावा
सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून चर्चेत आलेला फ्रीडम २५१ या हॅण्डसेटच्या विक्रीतून कंपनीला प्रतिहॅण्डसेट ३१ रुपयांचा फायदा होणार असल्याचा दावा रिंगिग बेल्सचे संचालक मोहित गोएल यांनी केला आहे. इंग्रजी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. सर्वांत स्वस्त स्मार्टफोन म्हणून फ्रीडम २५१ कडे आणि या फोनची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. या कंपनीच्या कारभारात गैरव्यवहार असल्याचा आरोपही काही जणांकडून करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर इतक्या स्वस्तात फोन विकूनही कंपनीला ३१ रुपयांचा फायदा होत असल्याचा दावा संचालकांनी केल्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे. दिल्लीजवळील नॉएडामध्ये रिंगिंग बेल्स कंपनीचे कार्यालय आहे. २५१ रुपयांत हॅण्डसेट उपलब्ध करून देण्याच्या दाव्याची वैधता अबकारी आणि प्राप्तिकर खात्यांकडून पडताळून पाहिली जात आहे. कंपनीने गेल्या आठवडय़ात फ्रीडम २५१ हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन सादर केला होता. दरम्यान, प्रप्तिकर खाते या कंपनीच्या आर्थिक रचनेची माहिती घेत असून कंपनीच्या नोंदणी प्रमाणपत्रासह कागदपत्रे मागवून घेण्यात आली आहेत. ‘कंपनीला अबकारी आणि प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी बेट दिल्याची माहिती खरी आहे. आम्ही मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि स्टार्ट-अप इंडिया या उपक्रमांतर्गत महत्त्वाचे काम करत आहोत. त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे आखून दिल्या आणि सहकार्य केले, असे रिंगिंग बेल्सचे अध्यक्ष अशोक चड्ढा यांनी सांगितले.
=======================================मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर दुरूस्तीचे काम सुरू, ११ मार्चपर्यंत एक लेन बंद राहणार
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’च्या दुरूस्तीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात झाली असून, ११ मार्चपर्यंत ‘एक्स्प्रेस वे’च्या तीनपैकी एक लेन बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन राज्य रस्ते विकास मंडळाने(एसएसआरडीसी) केले आहे. अमृतांजन पूल ते खंडाळा बोगद्यादरम्यान एक लेन दरड दुरूस्तीसाठी बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरूस्ती करण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. या काळात मुंबई-पुणे जुना महामार्ग वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. या मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी दरडदुरुस्तीचे काम करण्यात आले होते.
=======================================हिंदी निव्वळ प्रादेशिक भाषा: अदूर गोपालकृष्णन
"हिंदी ही नि:संशय अत्यंत सुंदर भाषा आहे. हिंदीमधून लिहिणारे अनेक उत्कृष्ट लेखकही आहेत. मात्र हिंदी ही भाषा प्रशासकीय मार्गाने वा इतरही कोणत्याही माध्यमामधून इतरांवर लादण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. भारत हा अनेक संस्कृती, भाषा, जीवनशैलींचा देश आहे. तेव्हा ही वस्तुस्थिती समजावून घेऊन त्याचा आदर ठेवावयास हवा,‘‘ असे परखड मत गोपालकृष्णन यांनी व्यक्त केले.
"हिंदी ही राष्ट्रभाषा असून इतर भाषा या प्रादेशिक असल्याची धारणा चुकीची आहे. एखादी भाषा राष्ट्रभाषा ठरविण्यासाठी ती सर्व देशाची भाषा असणे आवश्यक आहे. हिंदी ही भारतामधील अनेक भागांमधील समुदायांची भाषा नसल्याने तिची गणनाही प्रादेशिक भाषा म्हणूनच करावयास हवी,‘‘ असे गोपालकृष्णन यांनी सांगितले.
=======================================
"बलात्काराच्या खोट्या तक्रारींपासून संरक्षण हवे'
""अशा स्वरुपाच्या एखाद्या प्रकरणामध्ये अडकविण्यात आलेल्या आरोपीच्या झालेल्या मानहानीची भरपाई कदाचित कधीच करता येणार नाही; मात्र त्याची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयामधून कदाचित त्याला थोडी मन:शांती लाभेल. शिवाय आरोपी आता अब्रुनुकसानीची तक्रार करु शकतो. महिलांच्या संरक्षणार्थ कायदे आहेत. मात्र अशा कायद्यांचा गैरवापर झाल्यास पुरुषांचे संरक्षण करणारे कायदे कोठे आहेत? तेव्हा पुरुषांचेही संरक्षण करणे आवश्यक आहे,‘‘ असे मत न्यायाधीशांनी व्यक्त केले.
या प्रकरणामध्ये एका महिलेने ऑक्टोबर 2013 मध्ये आरोपीने आपल्यावर बलात्कार केल्याचे; तसेच त्याआधी सुमारे दीड वर्षभरापूर्वी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपीने महिलेशी सुमारे पाच वर्षांपासूनची ओळख असून शारीरिक संबंध हे परस्पर सहमतीनेच ठेवण्यात आल्याचे म्हटले होते. महिलेच्या फिर्यादीमध्ये परस्पर विरोधी बाबी असल्याचे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने आरोपीस मुक्त केले.
=======================================
कशाला हवंय ऑस्कर, त्यांनाच येऊ दे इकडे - दिग्दर्शक उमेश कुलकर्णी
ते म्हणाले, "ऑस्करला एन्ट्री पाठवावी हे ठीक. त्यामुळे आपण कोठे आहोत हे समजून येते; मात्र उदोउदो कशाला? ते मिळालंच पाहिजे याचा हट्ट नको. आपलं मूल्यांकन ऑस्करने का करावं? आपल्याकडेही राष्ट्रीय पारितोषिके आहेत. कितीजण ते चित्रपट पाहतात हा प्रश्न आहे. ऑस्कर म्हणजे मोक्षप्राप्ती नव्हे.‘‘
संवाद हरवतोय
ते म्हणाले, "संवाद हरवत चाललाय. नातेसंबंधातला गोडवा कमी होतोय. कधीतरी एकत्र येणारी भावंडे मोबाईलशिवाय संवाद साधू शकत नाहीत. दुसऱ्याला समजून घेणारा संवाद घडत नाहीये. संवाद झालाच तर दुसऱ्याला पूर्णपणे मारून टाकलं जातं; त्याचं ऐकून घेतलं जात नाही. संवादाची प्रक्रिया सुरू ठेवण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. परंपरांवर विश्वास ठेवूया, पण त्यातून काहीतरी नवं घडवण्याचा मानस असला पाहिजे. चित्रपट महोत्सवासारखे प्लॅटफार्म उपयोगात येतील. आजूबाजूला काय घडतंय याकडे डोळे उघडून पाहिलं पाहिजे, ही ताकद माध्यमांत आहे.‘‘
=======================================
क्रिकेट आता करिअरचा पर्याय- कपिल देव
पालकांची विचार करण्याची पद्धत सुद्धा आता बदलली आहे. पूर्वी पालक अभ्यासाकडे लक्ष दे म्हणून सांगायचे. परंतु, आताचे पालक क्रिकेट खेळून सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड सारखा तयार हो म्हणून सांगताना दिसतात. शाळेमध्ये खेळत असतानाच खेळाडूमधील गुण दिसू लागतात. शिवाय, तेथे खेळाडू तयारही होतात. चाळीस टक्के खेळाडू हे शाळेत तयार होऊन आल्याचे पाहायला मिळते, असेही कपिल म्हणाले.
=======================================
मणिपूरमध्ये आढळले दुसऱ्या महायुद्धातील बॉंब
इंफाळ - मणिपूर राज्यातील म्यानमार देशाच्या सीमारेषेजवळील एका भागामध्ये दुसऱ्या महायुद्ध काळातील 87 जिवंत बॉंब सापडले आहेत. सीमारेषेस लागून असलेल्या मोरेह या गावामध्ये एका वीजनिर्मिती प्रकल्पाच्या इमारतीचे काम सुरु असताना कामगारांना हे बॉंब आढळून आले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (1944) जपानी लष्कराने भारतावर केलेल्या आक्रमणावेळी हे बॉंब येथे ठेवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, येथील काम तत्काळ थांबविण्यात येऊन येथील बॉंब सुरक्षित स्थळी नेण्यात आले. ब्रिटीश सैन्य व जपानमध्ये 1944 मध्ये झालेली "इंफाळची लढाई‘ आशियात झालेल्या महायुद्धामधील अत्यंत महत्त्वाची लढाई मानली जाते.
=======================================
चेन्नईत ज्येष्ठ नागरिक करणार मोफत बस प्रवास
चेन्नई (तमिळनाडू)- शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साठ वर्षे पूर्ण असणाऱ्या नागरिकांसाठी मोफत बस प्रवास योजना बुधवारपासून सुरू होत आहे. प्रत्येक महिन्याला ज्येष्ठ नागरिकाला दहा पास मिळणार आहेत. यासाठी साठ वर्षे वय पूर्ण असल्याचे पुरावे व छायाचित्र जमा केल्यानंतर मोफत बस प्रवासाचा पास मिळू शकेल. शहरातील 42 बस स्थानकांवर हे पास उपलब्ध असणार आहेत. शिवाय, www.mtcbus.org या संकेतस्थळावरूनही अर्ज डाऊनलोड करता येणार आहेत.
=======================================
मोदींच्या कार्यक्रमात घोषणा देणाऱ्याला मारहाण
वाराणसी - बनारस हिंदू विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
पंतप्रधान आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आज बनारस हिंदू विद्यापीठात पदवीप्रदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदींचे भाषण झाल्यानंतर आशुतोष सिंह या विद्यार्थ्याने घोषणा देण्यास सुरवात केली. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांबाबत आशुतोषने घोषणा दिल्या. पोलिसांनी आशुतोषला ताब्यात घेतले आहे. काही विद्यार्थ्यांनी आज काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.
गेल्या महिन्यात लखनौमधील विद्यापीठात दोन विद्यार्थ्यांनी मोदींविरोधात घोषणा दिल्या होत्या. या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.
=======================================छत्तीसगड; ...अन् 'त्या' वृद्धेसमोर मोदी झाले नतमस्तक
कुर्रुभट (छत्तीसगड)- धामतरी जिल्ह्यातील एका 104 वर्षीय वृद्ध महिलेने आपल्याकडील शेळ्या विकून घराजवळ शौचालय बांधल्याची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या वृद्धेसमोर एका कार्यक्रमादरम्यान अक्षरशः नतमस्तक झाले. गावांना आधुनिक सुविधांच्या माध्यमातून जोडण्यासाठी पंतप्रधानांनी ‘आर-अर्बन मिशन‘ला रविवारपासून प्रारंभ केला. यावेळी वृद्ध महिलेचा मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘धमतरी या गावातील कन्वर बाई (वय 104) यांनी आपल्या 10 शेळ्या विकून आलेल्या पैशांमधून शौचालय बांधले आहे. त्या टीव्ही पाहात नाही अथवा वर्तमानपत्रही वाचत नाही. परंतु, त्यांनी ‘स्वच्छ भारत‘ योजनेसाठी मोठे काम केले आहे. नागरिकांसमोर त्यांनी एक आदर्श समोर ठेवला आहे,‘ असे मोदी म्हणाले. ‘गावातील महिलांच्या हातात रिमोट आल्यामुळे गाव विकास होत आहे. यामुळे ‘स्वच्छ भारत‘ अभियानाचे स्वप्न साकार होणार आहे. युवकांसाठी त्यांनी एक आदर्श ठेवला आहे,‘ असेही मोदी म्हणाले.
=======================================
कोल्हापूर: खड्ड्यामुळे प्रसूती झाली रिक्षातच
कोल्हापूर - सुभाष रोड म्हणून परिचित असलेला जवाहरनगरला जाणारा रस्ता नगरोत्थान योजनेतून चकाचक करण्यासाठी निधी मंजूर झाला. मंजूर निधीला पाच वर्षे पूर्ण झाली तरी आजही खड्ड्यात रस्ता अशीच अवस्था तेथील नागरिक, वाहनधारक रोज अनुभवतात. याच खड्ड्यामुळे आज एका महिलेची प्रसूती रिक्षातच झाली. या रस्त्यावरून किमान तीन-चार नगरसेवक रोज ये-जा करतात. मात्र त्यांना हे खड्डे पाहण्यासाठी वेळ मिळाला तर मतदारांचे नशीबच. महापालिकेच्या ढिम्म प्रशासनाचा फटका आज एका महिलेला बसला. आता आणखी काय होण्याची महापालिका वाट पाहणार आहे? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. सुभाषनगरला जाणारा रस्ता म्हणजे ‘सुभाष रोड’ असे या रस्त्याचे नामकरण झाले आहे. टायटन शोरूम (दसरा चौक) ते आर. के. नगर असा हा रस्ता. रेणुका मंदिरापासून थोड्या अंतरावरून हा रस्ता खड्ड्यात आहे की काय, असाच अनुभव येथे रोज वाहनधारक घेत आहेत. याच रस्त्यावरून रोज काही नगरसेवक ये-जा करतात. तरीही ते महापालिकेत याबाबत अलीकडच्या काळात शब्दही काढत नाहीत. या रस्त्यावर आज पहाटे सुभाषनगरातील रिक्षाचालक विवेक सातपुते रिक्षातून एका महिलेला बाळंतपणासाठी (डिलिव्हरी)साठी रुग्णालयात घेऊन जात होता. सुभाषनगरातून गॅस पंपापर्यंत तो अतिशय सावकाश आला. मात्र गॅस पंपाजवळील मोठ्या खड्ड्यात रिक्षाचे संपूर्ण चाकच गेल्यामुळे महिलेची डिलिव्हरी रिक्षातच झाली. परप्रांतीय असलेल्या या कुटुंबीयांना धक्काच बसला. कसेबसे त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना झालेला मुलगा सुखरूप आहे. महिलाही सुखरूप आहे; पण यामुळे खड्ड्यांची स्थिती चर्चेत आली.
=======================================दैनंदिन व्यवहारात मराठीची खिचडी
सांस्कृतिक राजधानी समजले जाणारे पुणे शहर हे बहुविविधतेने नटलेले आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या वेगवेगळ्या भागातील लोक पुण्यात राहतात. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा आपल्याला ऐकायला मिळते. मात्र, महाराष्ट्रीयनच नव्हे, तर अस्सल पुणेकरांच्या भाषेवरही आता प्रचंड परिणाम झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सर्वत्रच ‘भाषेची खिचडी‘ अनुभवायला मिळत आहे. हिंदी-इंग्रजीत बोलणे ही तर ‘स्टेट्स‘ची गोष्ट बनली आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मराठीचे स्वरूप कसे झाले आहे? याचा वेध घेतला आहे, ‘सकाळ‘च्या प्रतिनिधींनी मातृभाषा दिनाच्या निमित्ताने.
=======================================
पाकः चिमुकल्यावर बलात्कार करून खून
कराची- पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात एका आठ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केल्यानंतर त्याच्यावर बलात्कार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकल्याचे शनिवारी (ता. 20) अपहरण झाले होते. डेरा मुराद जमाली गावामध्ये रविवारी त्याचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्यावर बलात्कार करून खून करण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
=======================================
देशात वाढत असलेल्या अराजकतेच्या विरोधात मुखेडमध्ये तीव्र निदर्शने
मुखेड :-
सत्ताधारी पक्षाच्या अराजकतेच्या विरोधात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा. दिल्ली येथील जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार निर्दोष असुन त्याच्यावरिल देशद्रोहाचा खटला मागे घ्यावा आदी मागण्यासाठी एस.एफ.आय. व तन्जीम ए इन्साफ च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौस अली सलगरकर, काँ.बालाजी लंगेवाड, रियाज शेख, जाकेर बा-हाळीकर, काँ.अंकुश माचेवाड, आसद बल्खी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हैद्राबाद येथील विद्यापीठात दलित स्काँलर रोहित वेमुलाच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी, बंडारू दत्तात्रय यांच्या वर खुनाचा गुन्हा दाखल करावा, कन्हैयाकुमारची बिनशर्त सुटका करावी, तन्जीम ए इन्साफचे दिल्ली सचिव आमेक जामेई यांना मारहाण करणारे भाजपा आमदार ओ.पी.शर्मा यांचे विधानसभा सदसत्व रद्द करावे, माकपच्या कार्यालयावर हल्ला करणा-या व काँ.सीताराम येचुरी यांना धमकी देणा-यावर गुन्हें दाखल करावेत, जातीयवाद व तणाव निर्माण करणा-या अभावीप व आर.एस.एस. वर बंदी आणावी, पानगाव येथील पोलिस अधिकारी शेख यांना मारहाण करणा-या गुंडाना तात्काळ अटक करावी, शेतकरी विरोधी वक्तव्य करणा-या खा.शेट्टीचे लोकसभा प्रतिनिधित्व रद्द करावे यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. याचे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. याआंदोलनात सामाजिक कार्यकर्ते गौस अली सलगरकर, जाकेर बा-हाळीकर, एस.एफ.आय.चे काँ.बालाजी लंगेवाड, काँ अंकुश माचेवाड, संभाजी बिग्रेडचे संतोष पाटील इंगोले, इन्साफचे आसद बल्खी, शेख महेताब, संजय पिल्लेवाड, योगेश फुलारी, मुस्तफा पिंजारी, हाफिज माजीद, अस्लम दौलताबादी, आयुब चिखलीकर, बालाजी काब्दे, दत्ता चिंतलवाड, मोतीपाशा पाळेकर, अनिल सलगरकर, अमजत पठाण, आनंदा बनकर, मिलिंद लोहबंदे आदी सह एस.एफ.आय, तन्जीम ए इन्साफ चे कार्यकर्ते सहभागी होते.
=======================================
मुखेड; महादेव पार्वती मंदीर जून्ना याञा महोत्सव निमित्य जंगी कुस्त्यांचा सामना
श्री महादेव पार्वती मंदीर जून्ना याञा महोत्सव निमित्य जंगी कुस्त्यांचा सामना "
मुखेड
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी तालुक्यातील मौजे जुन्ना येथील महादेव पार्वती मंदीर येथे भव्य याञा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याञेनिमित्य आयोजित कुस्त्यांचा फडात सहभागी होण्याचे आवाहन वैद्य निवृत्ती पाटील वडेर यांनी प्रसिध्दी पञका द्वारे केली आहे.
दरवर्षी तालुक्यातील जुन्ना येथील महादेव पार्वती मंदीर येथे याञा महोत्सव साजरा केला जातो. यावेळी 25 फेब्रूवारी रोज गुरुवारी सकाळी 9 ते 11 वाजता दरम्यान कुंभमेळा, व 11 ते 02 वाजता महादेवपार्वतीचा रूद्राभिषेक आणि महाप्रसाद दुपारी 03 ते 05 वाजता व राञी ठिक 8 वाजता आतिषबाजी (बारुदाचा) कार्यक्रम होईल. तसेच गुरुवारी सकाळी ह.भ.प. नामदेव महाराज दापकेकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम व पहाटे पालकी मिरवणुक व काल्याचे किर्तन ह.भ.प.साहेबराव महाराज पांचाळ नांदेड यांच्या हस्ते होईल. 26 फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी 3 वाजता भव्य कूस्त्यांचा फड रंगणार आहे. तरी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्ये मध्ये पहेलवान व भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजक वैद्य निवृत्ती पाटील वडेर आणि समस्त गावकरी मंडळी मौजे जुन्ना ता.मुखेड यांनी केले आहे.
=======================================
=======================================
=======================================

No comments:
Post a Comment