Friday, 5 February 2016

नमस्कार लाईव्ह ०५-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 

१- अमेरिका इस्लामला दडपत नाही : ओबामा 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

२- सियाचीनमधील हिमस्खलनात दहा जवान शहीद, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त 

३- शरद पवारांचं 70 इतिहासकारांसोबत चर्चासत्र 

४- --म्हणून बिजनेसमनने केजरीवालांना 364 रुपयांचा डीडी पाठवला

५- गुरुजींच्या अधिवेशनावर कोर्टाची फुली, शिक्षकांच्या विशेष पगारी रजा रद्द 

६- सोनू निगमच्या गाण्यामुळे पाच हवाई सुंदरी निलंबित 

७- कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेसला अपघात, २० प्रवासी जखमी 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

८- चंदगडच्या तहसीलदारांचा अतिउत्साह, 'मराठी टायगर्स'ला विरोध 

९- अशोक चव्हाण आता प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा ‘आदर्श’ दाखवतील का ? 

१०- मुंबई; कम्बोळीत हॉल तिकीट न मिळल्यानं बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या 

११- रतनगडावरील धोकादायक सेल्फी व्हायरल 

१२- सूरज परमार यांचे आत्महत्येआधीचे पत्र.. 

१३- माकडांसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

१४- मालगाडीचा घसरलेला डबा हटवला, वाहतूक मंदगतीने सुरु 

१५- टीव्ही अभिनेत्रीच्या घरी चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ, पाच लाखांची लूट 

१६- दुर्गम मेळघाटात ही गावं होणार डिजिटल, गावकर्‍यांसाठी 3 जी आणि एटीएम सेवा 

१७- बारामतीचा बँडवादक तरूण बनला साहेब, एमपीएससीच्या परीक्षेत आला पहिला 

१८- पूजा बंद ठेऊन केरळमधल्या मंदिराने मुस्लिम युवकाला वाहिली श्रध्दांजली 

१९- लोहा; महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना जिल्ह्यातील ग्रामीण स्तरांवरील ग्रामसभेच्या अटी संबंधी माहिती फलक लावण्याबाबत निवेदन 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

२०- अजिंक्य रहाणे की मनीष पांडे, निवड समितीसमोर पेच 

२१- जगभरातील कमाई 'एअरलिफ्ट' 200 कोटींच्या घरात 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[नांदेड]

२२- आदिवासी विद्यार्थ्यांचे सलग १३ दिवसापासून जिल्हा कचेरीसमोर आंदोलन; केली शासनाची तेरवी 

२३- नांदेड पोलीस मुख्यालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह, आठ 'सीसीटीव्ही'पैकी पाच बंद, आत्महत्येचे गूढ कायम 

२४- नांदेडसह तीन बाजार समित्यांची निवडणूक लवकरच, अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध, पंधरा दिवसात अधिसूचनेची शक्यता 

२५- सेफ्टी साठी हेल्मेट; जिल्ह्यात ३ लाख २२ हजार दुचाकीस्वार, हेल्मेट तुटवड्याने धावपळ उडणार 

२६- महावितरणाची वीजचोरांविरोधात रात्रीची पेट्रोलींग तेजीत 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

[वाढदिवस]

प्राची चौधरी, राज पवार, विकास मालीवाल, सोनू रावणगावकर, वैजनाथ जाधव, उमाकांत चव्हाण, कुवरचंद मंडले, किशन ठाकूर, अनिल सरोदे, सुष्मिता चौव्हाण, धनाजी जाधव, नीरज कुमार, आकाश लेडंगे, विवेकानंद स्वामी, शैलेश सिंग, कृष्णा शिंदे, संजय कदम, उत्तम शेळके, सचिन पंडित, राहुल गांधी  

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.

[डॉ. वर्षा चौरे, नमस्कार लाईव्ह वाचक]

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

घरांची आर्टिफिशिअल सजावट 

फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://goo.gl/lE9S67

*****************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4

=========================================

अमेरिका इस्लामला दडपत नाही : ओबामा


अमेरिकी अध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या प्रचारात काही नेत्यांनी केलेली मुस्लिमविरोधी वक्तव्ये ‘अक्षम्य’ असल्याचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले असून, अमेरिका इस्लामला दडपत नाही हे दाखवून देणेच दहशतवादाचा मुकाबला करण्याची सर्वात चांगली पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
मेरिलँडमधील बाल्टीमोर येथील एका मशिदीत मुस्लिम समुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, अमेरिका इस्लामला दडपत नाही, हे जगाला दाखवून देणे आणि याबाबतच्या प्रचाराचा इन्कार करणे हाच दहशतवादाशी लढा देण्याचा उत्तम मार्ग आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ओबामा यांनी प्रथमच एका मशिदीला भेट देऊन मुस्लिम समुदायाला संबोधित केले. त्यात त्यांनी अलीकडेच काही नेत्यांनी केलेल्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांचा उल्लेख केला. ओबामा म्हणाले की, अमेरिका एखाद्या धर्माविरुद्ध कट्टर धोरण स्वीकारणार नाही. तसे झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. एखाद्या धर्मावरील हल्ला हा सर्व धर्मावरील हल्ला केला जाण्याचा प्रकार होईल. जेव्हा एखाद्या समूहाला निशाणा बनविले जाते तेव्हा अमेरिकी नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे. आम्ही सर्वच धर्मांचा आदर केला पाहिजे. कोणत्याही धर्माला मानण्याचे आम्हाला स्वातंत्र्य आहे.
ओबामा म्हणाले की, संपूर्ण मुस्लिम समुदायासाठी आताची स्थिती चिंताजनक आहे. थोडे स्पष्टच सांगावयाचे झाल्यास स्थिती भयभीत करणारी आहे. सर्व अमेरिकी नागरिकांप्रमाणे आपण सर्वजण दहशतवादाच्या धोक्याने चिंतित आहात. मूठभर लोक हिंसाचार करतात आणि त्यासाठी संपूर्ण समुदायाला दोषी ठरविले जाते. त्यातही आपण अमेरिकी नागरिक असल्याने चिंता वाढली आहे.
==============================================

अजिंक्य रहाणे की मनीष पांडे, निवड समितीसमोर पेच

अजिंक्य रहाणे की मनीष पांडे, निवड समितीसमोर पेच
मुंबईअजिंक्य रहाणे, की मनीष पांडे? आयसीसी वर्ल्ड ट्वेन्टी20मध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोण करणार याचा निर्णय आज होईल. ट्वेन्टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड शुक्रवारी दिल्लीत केली जाणार आहे. त्यासाठी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची बैठक दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून, दुपारपर्यंत भारतीय संघाचं चित्र स्पष्ट होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेन्टी20 मालिकेत भारताची शानदार कामगिरी पाहता, टीम इंडियात फारसे बदल होण्याची शक्यता नाही, असे संकेत धोनीनं आधीच दिले आहेत.
टीम इंडियात रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीचं स्थान निश्चित मानलं जातंय. मात्र मधल्या फळीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणाला उतरवायचं हे कोडं अजून सुटलेलं नाही. त्यासाठी रहाणे आणि मनीष पांडेमध्ये चुरस आहे.
हाताला झालेल्या दुखापतीनंतर रहाणेला ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी20 मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तर दुसरीकडे मनीष पांडेनं सिडनी वन डेत लक्षवेधक कामगिरी बजावली होती. आता या दोघांपैकी कुणाला विश्वचषकाचं तिकिट मिळतंय, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
संभाव्य संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पांड्या, इरफान पठाण, हरभजन सिंग, अमित मिश्रा, अक्षर पटेल आणि अजिंक्य रहाणे/ मनीष पांडे
=================================================

रतनगडावरील धोकादायक सेल्फी व्हायरल

पुणे: सह्याद्रीच्या पर्वतरांगातील रतनगडच्या धोकादायक टोकावरुन काढलेला सेल्फी फेसबूकवर व्हायरल होत आहे. पण त्यामुळे सेल्फी महत्वाचा की सेफ्टी हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुणी गगनचुंबी इमारतीच्या टोकावरून सेल्फी काढतंय, कुणी समुद्रात माशांसोबत, कोणी मृत्यूच्या दाढेतून सेल्फी काढतंय.
परदेशात असलेलं सेल्फीचं वेड, आपल्या घरा-दारात पोहोचलंय. नुकताच फेसबुकवर देशातला सर्वात रोमांचकारी सेल्फी पोस्ट झाला आणि व्हायरलही झाला… तोही आपल्या सह्याद्रीच्या रांगांमधल्या रतनगडवरचा.
पुण्याच्या प्रतीक खर्डेकर या ट्रेकरनं हा फोटो फेसबुकवर टाकताच टीकेचा भडिमार सुरु झाला. अशा सेल्फींमुळे अनावश्यक साहसाला खतपाणी घातलं जात असल्याची चर्चा सुरु झाली. इतकंच नव्हे… तर हा फोटो ट्रेकर्सना चिथावण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.
एकीकडे टीकेचा भडिमार सुरु असताना, काही ट्रेकर्स मात्र बचावासाठी पुढे आले.
कमाल ट्रिक फोटोग्राफीची असेलही, पण अशा फोटोंमुळे अनावश्यक साहसाला प्रोत्साहन मिळतं त्याचं काय?
दिवसातून पाच सेल्फी काढणं हे मानसिक आजाराचं लक्षण मानलं जातं. याच सेल्फीच्या नादानं बँडस्टँडच्या समुद्रात दोघांचा जीव गेला. मुरुडच्या दुर्घटनेतही सेल्फी हेच कारण असल्याचं बोललं जातंय. त्यात गोप्रोसारख्या तंत्रज्ञानामुळे सेल्फीतल्या रोमांचानं शिखर गाठलंय. पण सिर सलामत तो सेल्फी पचास या न्यायानं धोकादायक सेल्फींना ब्लॉक करणं साऱ्यांच्याच हिताचं..

=================================================

मुंबई; कम्बोळीत हॉल तिकीट न मिळल्यानं बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

हॉल तिकीट न मिळल्यानं बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
नवी मुंबई: क्षुल्लक कारणावरुन आयुष्य संपवण्याची घातक मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस बळावत चालली आहे. कॉलेजकडून हॉल तिकिट मिळालं नाही म्हणून बारावीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात घडली आहे.
लिनता मानकामे असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे. लिनता ही सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात शिकत होती. हॉल तिकिट मिळालं नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे. असं लिनतानं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. तसंच परिक्षेत कमी   मार्क कमी पडल्यास आई वडिलांची बदनामी होईल. अशी भीती देखील लिनताला सतावत होती. यामुळे तिनं आत्महत्या केली.
दरम्यान, क्षुल्लक कारणांसाठी विद्यार्थी जीवन संपवण्याचा निर्णय का घेतात यावर विचारमंथन करण्याची गरज आहे.
=================================================

जगभरातील कमाई 'एअरलिफ्ट' 200 कोटींच्या घरात

जगभरातील कमाई 'एअरलिफ्ट' 200 कोटींच्या घरात
मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’ सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या सिनेमाने देशातील कमाईत 110 कोटींचा आकडा पार केला आहे. तर परदेशातील कमाई मिळून ‘एअरलिफ्ट’ने 190 कोटींचा टप्पा गाठला आहे. जगभरात या सिनेमाने 186.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘एअरलिफ्ट’ हा अक्षय कुमारचा चौथा सिनेमा आहे, ज्याने 100 कोटींचा टप्पा सहज पार केला आहे.
एअरलिफ्ट हा सिनेमा 26 जानेवारीला रिलीज झाला होता. या सिनेमात देशप्रेम, सत्य घटना, अक्षय कुमारची भूमिका यामुळे चाहत्यांनी सिनेमाला चांगलंच डोक्यावर घेतला आहे. राजा कृष्ण मेनन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल अक्षय कुमारने आनंद व्यक्त केला आहे. ‘एअरलिफ्ट’ला अपेक्षापेक्षा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं अक्षयने सांगितलं.
सत्य घटनांवर आधारित सिनेमे हे परिणामकारक असतात. त्यामुळे अशा सिनेमांना माझे प्रधान्य राहिल. वास्तववादी सिनेमांना तुलनेने प्रतिसाद कमी मिळतो, मात्र ‘एअरलिफ्ट’ने हा अंदाज खोडून टाकला, असं अक्षय म्हणाला.
सुमारे 26 वर्षांपूर्वी 1990 मध्ये कुवेत आणि इराकमध्ये झालेल्या युद्धादरम्यान, कुवेतमध्ये 1 लाख 70 हजार भारतीय अडकले होते. त्यावेळी त्यांची सुटका कशी झाली, यावर आधारित एअरलिफ्ट सिनेमाचं कथानक आहे.
‘स्पेशल 26’ आणि ‘बेबी’ यासारख्या सिनेमानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा एअरलिफ्टमध्ये आपल्या भूमिकेची चमक दाखवली आहे.
=================================================

चंदगडच्या तहसीलदारांचा अतिउत्साह, 'मराठी टायगर्स'ला विरोध

चंदगडच्या तहसीलदारांचा अतिउत्साह, 'मराठी टायगर्स'ला विरोध
कोल्हापूर: बेळगाव जिल्ह्यावर महराष्ट्र दावा करत असतानाच, महाराष्ट्रातील अधिकारी मात्र बेळगावच नव्हे तर कोल्हापूरही कन्नडीगांच्या तालावर चालवण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतं. कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी या गावात ‘मराठी टायगर्स’ या सिनेमाला तिथल्या तहसीलदारांनी बंदी घातली आहे. या भागात सीमावासीय राहात असल्याने चित्रपटाला विरोध होऊन, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं कारण आप्पासाहेर समिंदर या तहसीलदार महाशयांनी दिलं आहे.
मात्र कर्नाटक हायकोर्टानेही परवानगी दिली असताना, महाराष्ट्रातच मराठी सिनेमाला आपलेच अधिकारी विरोध करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय महाराष्ट्रात राहणाऱ्या सीमावासियांच्या भीतीने सिनेमाचा खेळ रद्द करणं, हे कोणतं शहाणपण असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.
चंदगडच्या शिवसैनिकांनी कोणत्याही परिस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वाजता शिनोळी येथे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्धार केला आहे .
येळ्ळूरच्या घटनेवर सिनेमाची कथा
बेळगावमधील येळ्ळूरमध्ये 25 जुलै 2014 रोजी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारावर ‘मराठी टायगर्स’ हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात अमोल कोल्हे प्रमुख भूमिकेत आहेत. मात्र या सिनेमावर बंदी घालण्याची धमकी बेळगाव जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात दिली होती. याविरोधात ‘मराठी टायगर्स’ टीमने कर्नाटकात धाव घेतली होती.
कर्नाटक हायकोर्टाचा हिरवा कंदील
सीमावासीयांच्या वेदनेचे दर्शन घडविणाऱ्या ‘मराठी टायगर्स’ चित्रपटाला कर्नाटक उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. ‘मराठी टायगर्स’ चित्रपटावर बंदी घालावी म्हणून एका तथाकथित कन्नड नेत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण उच्च न्यायालयाने ही याचिका निकालात काढून कर्नाटक सरकारला चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेण्यास सांगितलं.
असं असताना चंदगडच्या तहसीलदारांनी मात्र शिनोळीत सिनेमावर बंदी घालण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला.
 बेळगावात विरोध
येळ्ळूरमध्ये 25 जुलै 2014 रोजी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बेळगाव जिल्हा प्रशासनाने बंदी घातली होती. हे कमी म्हणून की काय पोलिस उपायुक्त अनुपम अगरवाल यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक घेऊन शहरातील शांततेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य केले जाऊ नये, अशी ताकीद दिली होती.
मराठी भाषिक गेल्या पाच दशकाहून अधिक काळ आपल्या न्याय मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. मराठी भाषिक दरवर्षी कन्नड राज्योत्सव दिनी काळा दिन पाळत आले आहेत. बेळगावात अधिवेशन घेतले जाते त्यावेळी त्याला प्रत्युत्तर म्हणून सीमामेळावा आयोजित केला जातो.
शिनोळीत तंबू उभारून सिनेमा दाखवणार
कर्नाटक सरकारने छुप्या पद्धतीने मराठी टायगर्स हा चित्रपट बेळगावात प्रदर्शित होणार नाही याची काळजी घेतली . पण बेळगाव जवळील शिनोळी येथे वातानुकुलीत तंबू उभारून चित्रपट दाखविण्याचा निर्धार चित्रपटाच्या टीमने घेतला. शुक्रवारी सकाळपासून तंबू उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला . सायंकाळी चार हजार स्क्वेअर फूटचा तंबू उभारण्याचे काम पूर्णत्वाला आले. तंबूत पाचशे खुर्च्या घालून चित्रपट पाहण्याची सोय केली आहे .
चित्रपटात अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असल्यामुळे तेथील शिवसैनिक चित्रपटाच्या प्रदर्शनात कोणतीही कसर राहू नये याची काळजी घेत आहेत. चित्रपटाची तिकिटे बेळगावात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत . चंदगड तालुक्यातील शिनोळी येथेही काही तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत . कर्नाटकच्या सीमेवर कर्नाटक पोलिसाकडून वाहनांचे नंबर नोंद करण्याचे काम सुरु आहे . कर्नाटकच्या पोलिसांनी देखील गुरुवारी शिनोळीला भेट देऊन माहिती घेतली .
=================================================

मालगाडीचा घसरलेला डबा हटवला, वाहतूक मंदगतीने सुरु

मालगाडीचा घसरलेला डबा हटवला, वाहतूक मंदगतीने सुरु
मुंबई: सीएसटी-मस्जिद स्थानकादरम्यान घसरलेला मालगाडीचा डबा हटविण्यात अखेर रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, तरीही हार्बरवरील वाहतूक पूर्ववत होण्यास अजून काही काळ जाणार असल्याचे समजते आहे. 
हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असल्यानं वडाळा बेस्ट डेपोतून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. चाकरमानी मोठ्या प्रमाणात हार्बर मार्गावर प्रवास करतात. याचाच विचार करुन बेस्टनं अधिक बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान वाहतूक सुरु झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
————————- 
मुंबई: सीएसटी-मस्जिद स्थानकादरम्यान हार्बर लाईनवर मालगाडीचा डबा घसरल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सीएसटीजवळ अप मार्गावर खडी वाहून नेणाऱ्या गाडीचा डब्बा घसरल्यानं वडाळा-सीएसटीदरम्यान दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सध्या हार्बर मार्गाच्या फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. त्यासाठी रोज रात्री मेगाब्लॉक घेण्यात येतो. त्याच दरम्यान ही घटना घडली. आज पहाटे 4 वाजून 9 मिनिटांनी हा डब्बा घसरला आहे. यामुळे वडाला ते सीएसटी ही वाहतुक पूर्णपणे बंद आहे.
सध्या पनवेल ते वडाला आणि पनवेल ते अंधेरी अशी वाहतूक सुरु आहे. दुर्घटनाग्रस्त डबा बाजूला काढण्याचं काम सुरु असून त्यास अद्याप तरी त्यात यश आलेलं नाही. सकाळीच वाहतूक ठप्प झाल्यानं हार्बरवरील प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून अंधेरी आणि पनवेलवरुन नव्या गाड्या सोडण्यात आल्या असून रेल्वेनं हार्बरच्या प्रवाशांना मध्य रेल्वेवरुन प्रवासाची परवानगी दिली आहे.
हार्बरवरील वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेता बेस्ट प्रशासनाला अधिक बसेस सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
=================================================

शरद पवारांचं 70 इतिहासकारांसोबत चर्चासत्र

शरद पवारांचं 70 इतिहासकारांसोबत चर्चासत्र
मुंबई: केंद्रात सत्ताबदलानंतर सुरु झालेल्या इतिहास विद्रुपीकरणाचा आरोपांबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महत्वाची आणि एक आगळी-वेगळी बैठक घेत आहेत.
विविध राज्य आणि शहरातील ७० इतिहासकार आणि राजकीय जाणकार मंडळींसोबत पवार आज चर्चा करणार आहेत. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
असहिष्णुतेचं प्रकरण, भाजप सरकारवर होणारा इतिहास बदलाचा आरोप आणि महत्वाच्या पदांवर वादग्रस्त ठरलेल्या नियुक्त्या, अशा विविध बाबींचा या बैठकीत उहापोह होईल.
भजापकडून इतिहास बदलण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला होता. त्या सर्व पार्श्वभूमीवर या बैठकीत काय चर्चा होते., यावर सर्वाचं लक्ष लागून आहे.
=================================================

सियाचीनमधील हिमस्खलनात दहा जवान शहीद, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

सियाचीनमधील हिमस्खलनात दहा जवान शहीद, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : सियाचीनमध्ये हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेले दहा भारतीय जवान शहीद झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरवर सर्व दहा जवान शहीद झाल्याची माहिती दिली. सियाचीनमध्ये बुधवारी हिमकडा कोसळल्याने दहा जवान बेपत्ता झाले होते.
जवानांना वाचवण्यासाठी मागील 40 तासांपासून सियाचीनमध्ये युद्धापातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु होतं. जसजशी वेळ सरत गेली तसतशी जवान जिवंत असल्याची आशाही मावळत गेली.
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन जवानांच्या धैर्याला सलाम करत त्यांना वीरमरण आल्याची माहिती दिली. जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करत सियाचीनमध्ये झालेला अपघात अतिशय दु:खद होता, असंही पंतप्रधान म्हणाले.
सैन्याची एक तुकडी 5800 मीटर म्हणजेच 19000 फूट उंचीवर गस्त घालत होती, त्यावेळी हिमकडा कोसळल्याने बर्फात दहा जवान अडकले होते. यामध्ये एका ज्युनियर कमिशन्ड अधिकाऱ्यासह (जेसीओ) दहा जवानांता समावेश होता.

=================================================

टीव्ही अभिनेत्रीच्या घरी चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ, पाच लाखांची लूट

टीव्ही अभिनेत्रीच्या घरी चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ, पाच लाखांची लूट
मुंबई : मुंबईत सामान्य नागरिकांमध्ये चड्डी बनियान गँगची दहशत असताना आता कलाकारांनाही त्याचा फटका बसला आहे. टीव्ही कलाकार लवलीन कौर ससन हिच्या घरातून चड्डी बनियान गँगच्या चोरांनी पाच लाख रुपयांचा ऐवज लुटला.
मीरारोडमधील पूनम सागर कॉम्प्लेक्सच्या रिगल आर्केडमध्ये लवलीन कौर राहते. चड्डी बनियान गँग बुधवारी रात्री तिच्या घरी घुसले आणि पाच लाख रुपयांचा ऐवज चोरी केला.
इतकंच नाही तर चड्डी बनियान गँगच्या चोरांनी इमारतीच्या  वाचमनलाही बेदम मारहाण केली. नयानगर पोलिस स्टेशनमध्ये या चोरीची तक्रार नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.
=================================================

म्हणून बिजनेसमनने केजरीवालांना 364 रुपयांचा डीडी पाठवला

म्हणून बिजनेसमनने केजरीवालांना 364 रुपयांचा डीडी पाठवला
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विशाखापट्टणमच्या एका व्यक्तीने 364 रुपये पाठवले आहेत. त्या पैशांमधून नवे शूज खरेदी करण्याचा सल्लाही त्याने दिला आहे. बिझनेसमनअसलेल्या सुमीत अग्रवालने डिमांड ड्राफ्टसह एक खुलं पत्र पाठवलं आहे. केजरीवाल, आपल्याला चांगला पगार असूनही तुम्ही पायात सँडल का घालता, असा या पत्रात विचारला आहे.
राष्ट्रपती भवनात 26 जानेवारीच्या संध्याकाळी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या सन्मानार्थ अट होम हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पायात सँडल घातली होती.
केजरीवाल यांच्या साधेपणावर सुमीत काय म्हणाला?
सुमीत अग्रवालचं म्हणणं आहे की, केजरीवाल राष्ट्रपती भवनात देशाचं प्रतिनिधित्व करत होते. ते कोणत्याही धरणं, रामलीला मैदान किंवा जंतरमंतरवर आम आदमी पक्षाच्या कोणत्याही रॅलीमेध्ये सहभागी झाले नव्हते.
– अग्रवाल यांनी विचारलं की हा पब्लिसिटी स्टंट नव्हता का? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा पगार सुमारे दोन लाख रुपये. तरीही ते अशा खास सोहळ्यात सँडल घालून जातात. हा सोहळा कोणा मित्राची बर्थ डे पार्टी नव्हती, राष्ट्रपती भवनचं डिनर होतं.
– प्रत्येक सोहळ्याचं एक महत्त्व असतं. शो-ऑफ करणं चांगली गोष्ट नाही, पण आपल्या साधेपणाचं गरजेपेक्षा जास्त प्रदर्शन करणं हे फारच चुकीची गोष्ट आहे.
Kejriwal_Sandals
आणखी काय लिहिलं आहे सुमीतने?
– सुमीतने लिहिलं आहे, ”अनेक प्रयत्नांनंतरही मला फक्त 364 रुपये जमा करता आले. खरंतर एका मुख्यमंत्र्यासाठी हे पैसे खूपच कमी आहेत.”
– ”पण माझी तुम्हाला विनंती आहे की, कृपया हे छोटंसं योगदान स्वीकारा आणि स्वत:साठी एक जोडी चांगले ब्लॅक फॉर्मल शूज खरेदी करा”
–  ”जर तुम्हाला आणखी पैशांची गरज असेल तर मला पत्र लिहा. गरज भासल्यास मी फेरी संपूर्ण शहरातून आणखी पैसे जमा करेन”
सुमीतने सांगितलं का लिहिलं पत्र?
– सुमीतने लिहिलं आहे की, माझ्या शहरात या आठवड्यात इंटरनॅशनल फ्लीट रिव्यू होणार आहे. हे कार्यक्रम स्वत:च्या क्षमतेचं प्रदर्शन आणि दुसरे देशांसोबत मैत्रीचे संबंध बनवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी असतात.
– या सोहळ्यात 60 देशांचे प्रतिनिधी येणार आहे. यासाठी तुम्हालाही (केजरीवाल) आमंत्रण मिळेल, अशी आशा आहे. बस, यामुळेच मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे, असं सुमीतने सांगितलं आहे.
कोण आहे सुमीत?
– सुमितच्या दाव्यानुसार, त्याच्याकडे मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी आहे.
– तो विशाखापट्टणममध्ये मायक्रो स्केल इंड्रस्ट्री चालवतो.
=================================================

गुरुजींच्या अधिवेशनावर कोर्टाची फुली, शिक्षकांच्या विशेष पगारी रजा रद्द

गुरुजींच्या अधिवेशनावर कोर्टाची फुली, शिक्षकांच्या विशेष पगारी रजा रद्द
औरंगाबाद/उस्मानाबाद : नवी मुंबईच्या अधिवेशनाला जाण्याचा गुरुजींचा बेत अखेर रद्द होण्याच्या मार्गावर आहे. कारण शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या विभागाने सारासार विचार न करता मंजूर केलेली विशेष पगारी रजा औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. शिवाय अशा अधिवेशनाची गरज काय असा सवालही हायकोर्टाने विचारला आहे.
दरवर्षी नवनव्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांची होणारी अधिवेशनं हा एका मोठ्या आर्थिक उलाढालीचाही भाग आहे. ज्यात मुख्य प्रवाहातील राजकारणापेक्षा मोठमोठ्या चाली खेळल्या जात आहेत.
दोन वर्षापूर्वी ओरोसच्या अधिवेशनामुळंही मोठा गहजब माजला होता. त्यानंतर शिक्षकांची अधिवेशनं फक्त सुट्टीच्या काळात होतील असा धोरणात्मक निर्णय झाला होता. न्यायालयाने ओरोस अधिवेशन काळात शिक्षक गोव्याच्या बीचवर दिसल्याचाही उल्लेख केला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या दुसऱ्या गटाने अधिवेशनाच्या विरोधात पुण्याच्या धर्मदाय आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती.
त्यावर संघटनेची नवीन कार्यकारिणी घोषित करु नये. जमा झालेला पैशाचं स्वतंत्र खातं करावं. त्याचा हिशेब अधिवेशन संपताच आयुक्तांना द्यावा. तसंच अधिवेशन न म्हणता शिक्षक परिषद असा उल्लेख करावा अशा सूचना धर्मादाय आयुक्तांनी दिल्या.
1914 साली स्थापन झालेल्या शिक्षक संघटनेत दोन गट आहेत. माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचा एक तर संभाजी थोरांताचा दुसरा गट आहे. शिक्षकांच्या पैशाच्या जोरावर संघटनेने राज्यभरात मोठी संपत्ती उभी केली आहे.
Aurangabad_Bench
– शिवाजीराव पाटील प्रतिष्ठानच्या नावे औरंगाबादच्या शंकरराव काळे पतसंस्थेत 80 लाखाची एफडी आहे.
– भेंडाळा ता गंगापूरला कोट्यावधींच शैक्षणिक संकुल आहे.
– पुण्यात शिवाजीनगर, धनकवडीत संघांची कार्यालय आहेत.
– अहमदनगरला शॉपिंग सेंटर आहे.
– प्रत्येक जिल्हा बँकेत लाखोंच्या बचतीचं खात आहे.
त्यामुळे पैशासाठी राजकारण्यांना लाजवेल असा संघर्ष दोन्ही गटात सुरु आहे.
अशा अधिवेशनामुळे शिक्षकांची पेन्शन, सुट्टी, रजा यासारखे अनेक प्रश्न सुटले आहेत. पण अलीकडची अधिवेशनं कोण किती दिवस शाळा बंद ठेवू शकतो हे दाखवण्यासाठीचे आखाडे झाले आहेत.
=================================================
दुर्गम मेळघाटात ही गावं होणार डिजिटल, गावकर्‍यांसाठी 3 जी आणि एटीएम सेवा !

04 फेब्रुवारी : कुपोषणाने कुप्रसिद्ध असणार मेळघाटातील हरिसाल गाव भारतातल पहिले डिजिटल गाव तयार होणार आहे. गावामध्ये डिजिटलायजेशन चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसंच 3 जी सुविधा, एटीएम आणि गावकर्‍यांना एटीएम कम डेबिट कार्ड देण्यात येणार आहे.
हरिसाल गावासोबत मेळघाटातील 56 गाव जोडल्या जाणार आहेत. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने 100 दिवसांत हरिसाल हे गाव डिजिटल होणार आहे. मेळघाटात एकूण 334 गाव आहेत आणि यापैकी अनेक गावंमध्ये कुपोषणासारख्या गंभीर समस्यांना स्थानिकांना तोंड द्यावं
लागतंय. मुळात मेळघाटामध्ये संपर्काचा सर्वात गंभीर प्रश्न आहे. कुठल्याही मोबाईलच टॉवर नसल्याने वेळेत कुठलीही सेवा स्थानिक लोकांपर्यंत पोहचू शकत नाही.एटीएम सेवा, बँकिंग सेवा,इंटरनेट यांसारख्या सुविधा नसल्याने मेळघाट कधीच मुख्य प्रवाहत येऊ शकला नाही . यामुळे कुपोषण बालमृत्यु यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत असतात. डिजिटल व्हिलेज झाल्यानंतर तरी मेळघाट मुख्य प्रवाहात येईल असी अपेक्षा स्थानिकाना आहेत.
=================================================
बारामतीचा बँडवादक तरूण बनला साहेब, एमपीएससीच्या परीक्षेत आला पहिला !

अनंत अमुची ध्येयासक्ती…याचा प्रत्यय देणारं यश मिळवलंय बारामतीच्या शेखर नामदास या तरुणानं. बँडमध्ये ताशा वाजवणार्‍या शेखरनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून त्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. मंत्रालय सहायक वर्ग-2 या पदावर त्याची नेमणूक होणार आहे.
बारामती तालुक्यातल्या वाणेवाडी-लक्ष्मीनगर या छोट्या वस्तीत राहणारा शेखर नामदास…तिथल्याचं एका बँड पथकात ताशा वाजवण्याचं काम शेखर करायचा. बँडमध्ये काम करत असतानाच त्यानं एका मोठ्या यशाला गवसणी घातली. भल्याभल्यांची भंबेरी उडवणारी एपीएसीची परीक्षेत शेखरनं बाजी मारली इतकंच नाही तर अनुसूचित जाती प्रवर्गातून तो राज्यात पहिला आला.शेखरची आई मजुरी करते तर वडील ट्रॅक्टर चालक आहेत. शेखरच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट उपणार्‍या माऊलीला मुलाचं यश पाहून आकाश ठेंगणं झालंय.ज्या बँडमध्ये शेखर काम करत होता. तिथंही त्याची छाप होती. सुरुवातीला हातात काठीही न धरता येमारा शेखर नंतर मात्र पट्टीचा ताशा वादक झाला. त्याच्या या यशाने बँडमधले त्याचे सहकारीही भाराऊन गेलेत.जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर गरिबीशी संघर्ष करता येतो. आणि यशाची उत्तुंग भरारी घेता येते हेच शेखरने दाखवून दिलंय.
=================================================
अशोक चव्हाण आता प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा ‘आदर्श’ दाखवतील का ?
आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अडचणीत आले आहे. त्यांच्यावर खटला दाखल करण्याची परवानगी राज्यपालांनी दिल्यानं राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. पण हे आपल्याविरोधात षड्‌यंत्र असल्याचा आरोप चव्हाणांनी केलाय. तर पुराव्यांच्या आधारे सीबीआय कारवाई करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आदर्श घोटाळा प्रकरण अशोक चव्हाणांची पाठ सोडायला तयार नाही असंच दिसतंय. ‘अशोक चव्हाणांवर खटला दाखल करा’ अशी परवानगी राज्यपालांनी दिली. पदाचा गैरवापर करून नातेवाईकांना फ्लॅट दिल्याच्या कारणामुळे चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. त्यात आता सीबीआयला परवानगी मिळाल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा अडचणीत आले आहे.
यापूर्वीच्या राज्यपालांनी खटला चालवण्याची परवनागी नाकाराली होती. पण, आता मात्र 8 ऑक्टोबर 2015 ला युती सरकारच्या मंत्रिमंडळाकडून राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी मत मागवलं आणि चव्हाणांविरोधात खटल्याला परवानगी दिली. त्यामुळे अडचणीत आलेल्या चव्हाणांनी हे सूडबुद्धीचं राजकारण असल्याचा आरोप केलाय.
पण, सरकारनं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. आधी भुजबळ आणि आता अशोक चव्हाण यांच्या कारवाईमुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. आदर्श प्रकरणामुळे अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार आहे का असाही सवाल विचारला जाऊ लागलाय.
=================================================
सोनू निगमच्या गाण्यामुळे पाच हवाई सुंदरी निलंबित

प्रसिध्द गायक सोनू निगमला विमानात गाण्याची परवानगी देणं जेट एअरवेजच्या ५ हवाई सुंदरींना चांगलंच महागात पडले आहे. सोनू निगमला गायनाची परवानगी देणा-या पाचही हवाई सुंद-यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना निलंबित करण्यात आलेय. ४ जानेवारीला सोनू निगम जोधपूरहून मुंबईला जात होता. त्यावेळेस विमानातील काही प्रवाशांनी सोनूला गाण्याचा आग्रह केला होता. त्यावर विमानातील हवाई सुंदरींनीही सोनूला विमानाच्या अॅड्रेस सिस्टिमवरून गाण्याची परवानगी दिली होती.  नंतर सोनूने ‘वीर झारा’ मधील ‘दो पल रुका ख्वाबों का कारवां…’ आणि ‘रिफ्युजी’ चित्रपटातील पंछी नदियां पवन के झोंके…’ ही गाणी गायली.  मात्र विमानात झालेल्या या घटनेचा व्हिडीओ काही प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सदर गोष्टीचे गांभीर्य ओळखून डीजीसीएने विमान कंपनीला संबंधित हवाई सुंदरींना निलंबित कऱण्याचे आदेश दिले. हवाई सुंदरींना गाण्यामुळे किंवा नृत्यामुळे निलंबित करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी एका खासगी एअरलाईनने विमानातील क्रूला ‘बलम पिचकारी’ गाण्यावर नृत्य करण्यामुळे निलंबित केले होते. 
=================================================
सूरज परमार यांचे आत्महत्येआधीचे पत्र..

भ्रष्टाचाऱ्यांवर बोट ठेवतानाच चुकांचीही कबुली ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्रही या आरोपपत्रात समाविष्ट आहे. या पत्रात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्या पत्रात परमार यांनी चार नगरसेवकांवर बोट ठेवतानाच स्वत:च्या चुकाही नमूद केल्या आहेत. तसेच आपल्या चुकांमुळे कंपनी आणि कुटुंबियांचे भवितव्य उद्ध्वस्त झाल्याची खंतही त्यात व्यक्त आहे. परमार यांचे सुमारे २० पानांचे हे पत्र तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागले होते. त्यात सरकारची चुकीची धोरणे, महापालिका अधिकाऱ्यांची मनमानी, नगरसेवकांनी दिलेला त्रास नमूद होता. या नगरसेवकांची नावे खोडली होती मात्र ती प्रयोगशाळेतून उघड झाली होती. त्याच आधारे पोलिसांनी राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण या चार नगरसेवकांना अटक केली होती. परमार यांच्या या पत्रामध्ये सरकार, राजकारणी, कुटुंब, मुले, पत्नी, भागीदार, भाऊ, मित्रमंडळी आणि कॉसमास प्रकल्पातील ग्राहक अशा आठजणांना उद्देशून परमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच चार नगरसेवकांवर बोट ठेवतानाच गेल्या दोन-तीन वर्षांत स्व:त केलेल्या व्यावसायिक चुकांचाही उल्लेख केला आहे. भिवंडी, पुणे आणि काव्या प्रकल्पासाठी वादग्रस्त जमिनी खरेदी केल्या. भागीदारांच्या ‘पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी’चाही गैरवापर केला. योगी प्रकल्पातली गुंतवणूक चुकीची ठरली. भागीदारांनी आणि कुटुंबाने विश्वास दाखविला असतानाही कंपनीचा कारभार सांभाळू शकलो नाही. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर प्रचंड दबावाखाली असल्यामुळे तपशील दिला पण, तो द्यायला नको होता, असे सांगत परमार यांनी भागीदारांची माफी मागितली आहे. म्हणून स्वत:ला संपविले.. तुमचे वडील ‘चीटर’ नव्हते, असे मुलांना सांग, असे त्यांनी या पत्रात पत्नीला उद्देशून लिहिले आहे. स्वत:ला हुशार समजत होतो पण, चुका आणि मूर्खपणाच झाला. यामुळे कॉसमॉसच्या गैर व्यवस्थापनास मी जबाबदार आहे. यामुळे तोंड दाखवायची लाज वाटत होती. गेल्या दोन महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होतो, पण कुणालाही जिवे मारू शकत नसल्यामुळे स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 
=================================================

माकडांसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार


माकाडांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी तामिळनाडूच्या वन खात्याने राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये माकडांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. माकडांच्या पुनर्वसनासाठी जागा आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत. 

माकडांना ठेवण्यासाठी पिंजरे  उपलब्ध असून, अन्य आवश्यक साहित्य लवकरच विकत घेण्यात येईल असे वन खात्याच्या पत्रकात म्हटले आहे. वेळोवेळी करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये माकडांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. 

वाढणा-या संख्येमुळे माकडांकडून नागरीकांना होणारा उपद्रवही वाढला आहे त्यामुळे माकडांसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. माकडांची वाढती संख्या रोखण्यासाठी यापूर्वी केलेल्या सर्व उपायोजना अयशस्वी ठरल्या आहेत. 

=================================================

पूजा बंद ठेऊन केरळमधल्या मंदिराने मुस्लिम युवकाला वाहिली श्रध्दांजली


केरळमधल्या एका मंदिराने २३ वर्षीय मुस्लिम युवकाच्या मृत्यूबद्दल दोन दिवस मंदिरातील पूजा बंद ठेऊन दुखवटा व्यक्त केला. केरळमधल्या मंदिराने मुस्लिम युवकाला अशा प्रकारे श्रध्दांजली वाहण्याची ही दुर्मिळ घटना आहे. एम.व्ही.शब्बीर असे या युवकाचे नाव आहे. मागच्यावर्षी पूजे दरम्यान घडलेल्या एका घटनेवरुन रविवारी दुपारी चौघांनी शब्बीरला बेदम मारहाण केली होती. त्यात शब्बीरचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीने या संपूर्ण मारहाणीचा व्हिडीओ चित्रीत केला होता. 
यासंबंधी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तिरुअनंतपूरम जिल्ह्यात पुथेनाडा येथील शिव मंदिरात उत्सव आयोजित केला जातो. शब्बीर या उत्सव आयोजित करणा-या समितीचा सदस्य होता. सोमवारी आणि मंगळवारी मंदिराच्या विश्वस्तांनी शब्बीरच्या सन्मानार्थ शंख आणि घंटानाद न करण्याचा निर्णय घेतला. 
या शिव मंदिरात दिवसाला पाच पूजा होतात. पण सोमवारी आणि मंगळवारी सकाळच्या दर्शनानंतर मंदिरात शंख आणि घंटानाद झाला नाही. ही धर्मापलीकडची मैत्री आहे. मंदिर समितीमध्ये असलेल्या शब्बीरला आम्ही कधीही मुस्लिम समजले नाही असे मंदिर महोत्सव समितीचे सदस्य असलेल्या एन.उन्नी यांनी सांगितले. 
=================================================

कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेसला अपघात, २० प्रवासी जखमी


तामिळनाडूतील वेल्लोरे जिल्ह्यातील सोमानयाकानपट्टी आणि पाटचूर रेल्वे स्थानकांदरम्यान कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेस रुळावरुन घसरली. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत वीस प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वेचे पीआरओ अनिल सक्सेना यांनी दिली. 
या अपघातात एकूण ११ डब्यांचे नुकसान झाले. आठ डबे रुळावरुन घसरले तर, तीन डबे पलटी झाल्याची माहिती सक्सेना यांनी दिली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. 
या अपघातामुळे चेन्नई-बंगळुरु मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दक्षिण रेल्वेने चेन्नई-बंगळुरु दरम्यान धावणा-या काही गाडया रद्द केल्या आहेत. 

=================================================
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना जिल्ह्यातील ग्रामीण स्तरांवरील ग्रामसभेच्या अटी संबंधी माहिती फलक लावण्याबाबत निवेदन 

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याना नांदेड दौऱ्याच्या वेळी भेटून भाजपा युवामोर्चा अध्यक्ष सुरेश मोरे व भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश पाटिल खांबेगावकर यांनी जिल्यातील ग्रामीण स्तरावर ग्रामसभा सम्बदी अटी,नियम व सदस्याचे सांविधानिक अधिकार या संबंदीचे सूचना व माहिती फलक लावण्याचे आदेश जि. प. कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिकारी नांदेड याना द्यावे 
अशा मागणीचे निवेदन दिले आहे.........
=================================================

No comments: