Friday, 5 February 2016

नमस्कार लाईव्ह ०५-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- समलैंगिकतेला गुन्ह्याचा दर्जा दिला तर आपण १५व्या शतकात जाऊ - श्री श्री रवीशंकर 
२- समुद्र, टेकड्या, पर्वतांवर सहलबंदी, नवी नियमावली 
३- मी खूप चूका केल्या, परमार यांच्या चिठ्ठीतील धक्कादायक खुलासा 
४- टांझानियाच्या युवतीवर हल्ला केलेल्या आरोपीत एक भाजपचा सदस्य 
५- सेलिब्रिटीजना स्वस्तात भूखंड देणारी १९८३ची अधिसूचना रद्द होणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तानचा बंगला लिलावात? 
७- लखनौ; महिला कलेक्टरसोबत सेल्फी महागात, तरुण तुरुंगात 
८- मुलांना मारले तर आईवडील जाणार खडी फोडायला 
९- गुजरात; अंबिका नदीत बस कोसळून झालेल्या अपघातात ४ मृत्यू, ३० जखमी
१०- बिहार : राघोपुरमधील कच्ची दर्गा परिसरात एलजेपी नेते बैजंती सिंह यांची गोळ्या घालून हत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- संतापजनक, मुंबईत 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार 
१२- वाशीम; रेती माफियाचा नायब तहसीलदारांना उडवण्याचा प्रयत्न 
१३- औरंगाबाद; सहकारी डॉक्टरकडून बलात्कार, महिला डॉक्टरचा आरोप 
१४- दुष्काळी सोलापूरात झाली पाण्याची नासाडी
१५- किनवट येथे 6 व 7 फेब्रुवारी रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन 
१६- लातूरला मिळणार १६ दिवसांनी पाणी 
१७- लातूर; उद्रेक सुरु झाला, पाण्याच्या टॅंकरचालकाला मारहाण 
१८- महाविद्यालयीन युवकांनी स्‍वच्‍छतेची जनजागृती केल्‍यास स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र होण्‍यास वेळ लागणार नाही – जि.प. अध्‍यक्षा गुंडले
१९- मुखेड; शालेय व्यवस्थापन समितीने जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी - विस्तार अधिकारी प्रकाश जाधव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- आमीर खानसोबतचा करार वाढविण्यास स्नॅपडिलचा नकार 
२१- पेच सुटला, अजिंक्य रहाणे भारतीय संघात 
२२- शिलेदार निवडले आता मोहीम फत्ते करा.. 
२३- एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास व्हॉट्स अॅपवरुन तक्रार नोंदवा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही पण लाखो पुस्तके लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंखांसाठी म्हणून कधीच उडावे लागत नाही पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही पण नाव करण्यासाठी मात्र कामच करावे लागते.
[ डॉ. वर्षा चौरे ]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://goo.gl/uS8DX4

============================================================

वाशीम; रेती माफियाचा नायब तहसीलदारांना उडवण्याचा प्रयत्न

वाशिम : वाशिममध्ये रेती माफियांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रेती माफियांनी नायब तहसीलदार राहुल वानखेडे यांना चक्क ट्रकने उडविण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर जप्त केलेला रेतीचा ट्रकही पळवला. काल रात्री 11 च्या सुमारास हा थरार रंगला.
काय आहे प्रकरण?
अनधिकृत रेती उपसाप्रकरणी वाशिममध्ये धडक मोहिम सुरु आहे. या कारवाईअंतर्गत काल दुपारी सचिन सुभाष श्रीनिवार यांचा ट्रक जप्त करण्यात आला होता. मात्र श्रीनिवार यांनी कोणालाही न जुमानता थेट तहसील कार्यलयाबाहेरून ट्रक पळवून नेला. यादरम्यान तहसीलदारांनी त्यांचा पाठलाग केला, त्यावेळी तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तहसीलदारांनी ट्रकचा पाठलाग करून तो ताब्यात घेतला. मात्र ट्रकचालक आणि रेती माफिया फरार झाले.
याप्रकरणी सचिन श्रीनिवारवर वाशिममध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सचिन श्रीनिवारवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही वाशिम आणि हिंगोलीत त्याचे रेतीचे ट्रक अडवले होते. त्यावेळीही त्याने ट्रक न थांबवता धूम ठोकली होती. त्यावेळीही गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. माढा तालुक्यातील शेटफळ कुर्डूवाडी रस्त्यावर वाळूमाफियांनी तुकाराम मुंढे यांच्या वाहनावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला होता.
========================================================

महिला कलेक्टरसोबत सेल्फी महागात, तरुण तुरुंगात

महिला कलेक्टरसोबत सेल्फी महागात, तरुण तुरुंगात
लखनौ : सध्या अनेकांना सेल्फीने पछाडलं आहे. कुठे जा तुम्हाला सेल्फी घेणारे हमखास दिसतील. सेल्फीच्या नादात अनेकांनी जीवही गमावला आहे. मात्र आता सेल्फी घेतल्याने एका तरुणाला थेट जेलची हवा खावी लागली आहे.

उत्तर प्रदेशातील एका तरुणाने बुलंदशहरच्या जिल्हाधिकारी बी चंद्रकला यांच्यासोबत सेल्फी घेतल्याने त्याला तुरुंगात जावं लागलं.

काय आहे प्रकरण?

कलेक्टर बी चंद्रकला या कमालपूरच्या गावकऱ्यांशी चर्चा करत होत्या. त्यावेळी फराज नावाचा तरुण त्याठिकाणी आला. फराजने कलेक्टर चंद्रकला यांच्याच मोबाईलवरून फोटो काढायला सुरुवात केली. हद्द म्हणजे फराज कोणतीही परवानगी न घेता महिला कलेक्टरांसोबत सेल्फी घेऊ लागला.

यानंतर पोलिसांनी फराजला ताब्यात घेतलं.

दरम्यान, कलेक्टर चंद्रकला यांनी फराजला माफ केलं आहे, मात्र सध्यातरी फराज 14 दिवसांच्या कोठडीत आहे.

मी एक अधिकारी असलो, तरी महिलाही आहे, हे लोकांनी लक्षात ठेवायला हवं. महिलांचा सन्मान ठेवायला हवा, असं चंद्रकला यांनी म्हटलं आहे.

========================================================

औरंगाबाद; सहकारी डॉक्टरकडून बलात्कार, महिला डॉक्टरचा आरोप

सहकारी डॉक्टरकडून बलात्कार, महिला डॉक्टरचा आरोप
औरंगाबाद : सहकारी डॉक्टरने बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप एका महिला डॉक्टरने केला आहे. औरंगाबादमधील महिला डॉक्टरने हा आरोप केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप डॉक्टर विवेक पाटील यांच्यावर करण्यात आला आहे.

याप्रकरणी विवेक पाटील यांच्यावर सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

राज्यात आणि देशात बलात्काराच्या घटना वाढत असताना, औरंगाबादमध्येही हायप्रोफाईल रेप केसचा प्रकार समोर येत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सुरु आहे.
========================================================

मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तानचा बंगला लिलावात?

मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तानचा बंगला लिलावात?
फोटो सौजन्य: यूट्यूब
मुंबई: मुंबईतील पहिला डॉन हाजी मस्तान याचा पेडर रोडवरील बंगला लवकरच विक्रीत निघणार आहे. या बंगल्यावरुन हाजी मस्तानच्या मुली आणि हाजी मस्तानचा खास माणूस असणाऱ्या अब्दुल करीम यांच्या मुलांमध्ये वाद सुरु होता. अखेर दोन्ही पक्षांमध्ये परस्पर सामजस्यांने हा वाद सोडविण्याचा निर्णय घेतला आहे.

70च्या दशकात सोन्याच्या तस्करीतून हाजी मस्तानने कोट्यवधीची संपत्ती कमावली होती. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आणि त्याच्या साथीदारांच्या मुलांमध्ये संपत्तीवरुन वाद सुरु झाले. यातील सगळ्यात मोठा वाद हा पेडर रोडवरील त्याच्या बंगल्याबाबत आहे. ज्याची किंमत 90 ते 100 कोटींचा घरात आहे.

1994ला हाजी मस्तानचा मृ्त्यू झाला. तेव्हापासूनच संपत्तीवरुन वाद सुरु झाला होता. मृत्यूआधी हाजी मस्तानने आपल्या मृत्यूपत्रात हा बंगला आपल्या तीन मुली कमरुनिसा, मेहरुनिशा आणि शमशाद आणि अब्दुल करीमचे तीन मुलं शकील, समीर आणि रेहाना यांच्यात वाटून दिला होता. बंगल्यामध्ये करीम यांच्या मुलांची 30 टक्के भागीदारी होती.

हाजी मस्तानच्या मृत्यूनंतर त्यांच्या तीनही मुलींची लग्न झाली. कधी-कधी या तिघीही या बंगल्यात येत-जात असंत. याचवेळी करीमच्या दोन मुलांनी खोट्या मृत्युपत्राच्या आधारे बंगल्यावर ताबा मिळवला. या गोष्टीचा जेव्हा मस्तान यांच्या मुलींना सुगावा लागला त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावेळी आपण या तिघींकडून बंगला खरेदी केल्याचा त्यांनी दावा केला. पण पोलिसांनी त्या तिघांनाही अटक केली होती. त्यामुळं गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेला वाद संपवून हा बंगला विकण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. त्यातून प्रत्येकाला हिस्सा मिळणार आहे. पण आता यामध्ये एक नवा पेच निर्माण झाला आहे.

हाजी मस्तान यांनी दत्तक घेतलेला मुलगा सुंदर मस्ताननं या गोष्टीला विरोध केला आहे. सुंदर मस्तानाचं म्हणणं आहे की, कोणत्याही परिस्थितीत हा बंगला तो विकू देणार नाही. कारण की, हा बंगला त्यांच्या वडीलांची शेवटची निशाणी आहे.
========================================================

समुद्र, टेकड्या, पर्वतांवर सहलबंदी, नवी नियमावली

मुंबई: मुरुडमधल्या दुर्घटनेत 14 विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर, राज्य सरकारने शाळा-कॉलेजच्या सहलींबाबत अंकुश ठेवला आहे.

विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी एक परिपत्रक जारी केलं आहे. ज्यात महाविद्यालयं आणि शिक्षकांसाठी अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.

नदी, समुद्र, उंच ठिकाणांवर सहल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचसोबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक नियम घालून देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक-माध्यमिक शाळा, आणि कनिष्ठ महाविद्यालयांना हे नियम लागू करण्यात आल्याचं शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, नदी, समुद्र, उंच ठिकाण यासारख्या पर्यटनस्थळी सहली नेण्यास बंदी घातल्याने, सहली न्यायच्या तर कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सहलीबाबतची नियमावली
  1. समुद्र किनारे,उंच पर्वतावरील ठिकाणे, नदी, तलाव, विहीर,उंच टेकड्यांवर सहल नेण्यास बंदी
  2. सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना 2 प्रशिक्षित शिक्षकांकडून आपत्कालीन परस्थितीत बचाव करण्याचं प्रशिक्षण
  3. प्रथमोपचार पेटी, स्थानिक डॉक्टर, शासकीय रुग्णालयाचे संपर्क क्रमांक सोबत ठेवावेत
  4. गरज भासल्यास पालकांचा प्रतिनिधी सोबत ठेवा
  5. सहलीपूर्वी विद्यार्थ्यांनी पालकांकडून संमतीपत्र घेणं बंधनकारक
  6. आरटीओ मान्यताप्राप्त वाहनातूनच सहल न्यावी
  7. दहा विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असावा
========================================================

पेच सुटला, अजिंक्य रहाणे भारतीय संघात

पेच सुटला, अजिंक्य रहाणे भारतीय संघात !
मुंबई : ट्वेन्टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेचा अनुभव आणि परफॉर्मन्स हा मनीष पांडेपेक्षा वरचढ ठरला आहे. रहाणेला संघात स्थान मिळालं आहे.

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठीचं युद्ध अवघ्या महिन्याभरावर आलेलं असताना संदीप पाटील यांच्या निवड समितीनं आज नवी दिल्लीत पंधरासदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील या संघावर अष्टपैलूचा ठसा उमटला आहे. या संघात पाच निव्वळ फलंदाज, सात अष्टपैलू आणि तीन निव्वळ वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. नव्या दमाच्या मनीष पांडेऐवजी अजिंक्य रहाणेच्या अनुभवाला झुकतं माप देण्यात आलं आहे.

रहाणेशिवाय फिरकीपटू पवन नेगीची सरप्राईज एण्ट्री झाली आहे. तसंच अनुभवी आशिष नेहरा आणि हरभजन सिंह यांनाही निवड समितीने संधी दिली आहे.

– धोनी(कर्णधार), रैना, रोहित शर्मा, कोहली, शिखर धवन, युवराज, रहाणे, जाडेजा, अश्विन, शमी, नेहरा, बुमरा, हार्दिक पंड्या, हरभजन, रहाणे, पवन नेगी 
========================================================

शिलेदार निवडले आता मोहीम फत्ते करा..

शिलेदार निवडले आता मोहीम फत्ते करा...
नवी दिल्ली: पुढील महिन्यात वर्ल्ड टी-20 विश्वचषक होणार असून यासाठी भारतीय संघाची आज निवड करण्यात आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा विश्वचषक भारतातच खेळविण्यात येणार आहे. 8 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत टी-20चं युद्ध रंगणार आहे. हा विश्वचषक धोनी अॅण्ड कंपनी पटकावणारा का? याकडेच देशवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे. आज भारतीय संघातील 15 जणांची निवड करण्यात आली आहे. धोनीच्या ‘ब्ल्यू ब्रिगेड’वर एक नजर

कर्णधार धोनी: टी-20 स्पेशालिस्ट धोनीने आतापर्यंत 55 टी-20 सामने खेळले असून ज्यामध्ये त्याने 899 धावा केल्या आहेत. तर 48 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. पण हे आकडे धोनीचं यश दाखवत नाही. जेव्हा-जेव्हा भारतीय संघ संकटात अडकतो त्या-त्या वेळेस कर्णधार धोनी संकटमोचक म्हणून धावून येतो.

विराट कोहली: जबरदस्त फॉर्मात असणारा उप-कर्णधार विराट कोहलीवर सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. विराटने आजवर 33 टी-20 सामने 12 अर्धशतकांसह 1215 धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियासोबतच्या टी-20 मालिकेत विराटने 199 धावा करुन मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता.

रोहित शर्मा: जगभरातील गोलंदाजांवर दहशत गाजविणारा टीम इंडिया धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मावर यंदा फारच मोठी जबाबदारी असणार आहे. सलामीचा फलंदाज म्हणून जोरदार सुरुवात करुन देणं हे रोहितचं पहिलं काम असणार आहे. रोहितनं आतापर्यंत 47 टी-20 सामने खेळला असू त्यानं 1010 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

शिखर धवन: रोहित शर्मासोबत सलामीला येणारा टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज शिखर धवनवरही मोठी जबाबदारी असणार आहे. कांगारुंविरुद्ध टी-20 मालिकेत धवनने चांगली कामगिरी केली असून त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आतापर्यंत धवनने 11 टी-20 सामन्यात शिखरनं 188 धावा केल्या आहेत.

सुरेश रैना: टी-20 सामन्यातील तुफानी फलंदाज अशी ओळख असणाऱ्या सुरेश रैनाचीही भारतीय संघात निवड झाली आहे. नुकताच झालेल्या कांगारुविरुद्धच्या टी-20 संघातही रैनानं कमाल केली होती. रैनानं आतापर्यंत 49 टी-20 सामने खेळले असून त्यात 1073 धावा केल्या आहेत. रैनाचा फॉर्म हा भारतीय संघासाठी फारच महत्त्वाचा आहे.

अजिंक्य रहाणे: मनीष पांडे की अंजिक्य रहाणे असा पेच असताना बीसीसीआयने रहाणेच्या अनुभवाला महत्त्व दिलं आणि त्याचा टी-20 संघात समावेश केला आहे. मधल्या फळीत खेळताना अखेरपर्यंत खेळण्याचं आव्हान रहाणे समोर आहे. आवश्यक असल्यास रहाणे जलद आणि डाव सांभाळणारी खेळी रचू शकतो. रहाणेने भारतासाठी खेळलेल्या 13 सामन्यांमधअये 273 धावा केल्या आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन पैकी दोन सामन्यात त्याने अर्धशतकं ठोकली आहेत.

युवराज सिंह: स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करुन ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान पटकवणाऱ्या युवराज सिंहने विश्वचषकाच्या संघातही आपलं स्थान पक्कं केलं आहे. 2007 साली भारतीय संघानं टी-20 विश्वचषक पटकावला होता. त्यावेळेस युवराजने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅचविनिंग खेळी केल्या होत्या. यंदा देखील युवराजकडून अशाच खेळाची अपेक्षा करण्यात येत आहे.

रविंद्र जडेजा: टीम इंडियातील ऑलराऊंडर रविंद्र जडेजानंही आपली प्रबळ दावेदारी सिद्ध करीत विश्वचषक संघात स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक विकेट मिळविण्याच्या बाबतीत जडेजानं दुसऱ्या क्रमांकावर होता. जडेजानं आतापर्यंत 25 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत.

रविंद्र जडेजा: टीम इंडियातील ऑलराऊंडर रविंद्र जडेजानंही आपली प्रबळ दावेदारी सिद्ध करीत विश्वचषक संघात स्थान मिळवलं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक विकेट मिळविण्याच्या बाबतीत जडेजानं दुसऱ्या क्रमांकावर होता. जडेजानं आतापर्यंत 25 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत.

आर. अश्विन: यंदाचा विश्वचषक भारतीय मैदानात होत आहे. भारतात सामने होत असतील तर अश्विनपेक्षा मोठा मॅनविनर कोणीही नाही. आर. अश्विनवर स्पिन अटॅकची संपूर्ण जबाबदारी असेल. अश्विन भारतासाठी 31 सामने खेळला असून त्याने 33 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने सहा विकेट्सही मिळवल्या आहेत.

हरभजन सिंह: ऑस्ट्रेलियात दौऱ्यात हरभजन सिंहला भलेही खेळण्याची संधी मिळाली नसेल, पण अनुभव त्याच्या गाठीशी असल्याने बीसीसीआयने भज्जीवर विश्वास दाखवला आहे. हरभजन सिंह हा संघातील अनुभवी गोलंदाज आहे. संघाचा फिरकी आक्रमणाला धार देण्याचं काम भज्जीवर असेल. हरभजनने 27 सामन्यांमध्ये 24 विकेट्स मिळवल्या आहेत.

जसप्रित बुमरा: आयपीएलपासून चर्चेत असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरानं आपल्या आगळ्यावेगळ्या गोलंदाजीच्या अॅक्शननं ऑस्ट्रेलियन फलंदाजाना चांगलंच तंगवलं होतं. बुमरानं अवघ्या तीन सामन्यातच आपल्यातील चुणूक दाखवून दिली आहे. बुमरामुळं भारताच्या वेगवान गोलंदाजीला चांगलीच धार आली आहे. बुमरानं तीन टी-20 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकात धोनी बुमरावर मोठा डाव खेळू शकतो. कारण की, 2007 च्या टी-20 विश्वचषकात धोनीनं जोगिंदर शर्माला शेवटची ओव्हर देऊन विश्वचषक पटकावला होता.

 आशिष नेहरा: दांडगा अनुभव, कर्णधार धोनीचा विश्वास, आयपीएलमधील चांगली कामगिरी आणि आता ऑस्ट्रेलियातील उत्तम गोलंदाजीनंतर आशिष नेहराची ट्वेन्टी 20 विश्वचषकासाठी निवड झाली आहे. 2003 आणि 2011 च्या विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या नेहराने देशासाठी 11 ट्वेन्टी-20 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहेत. नेहरा या संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात तरुण गोलंदाजांसह स्वत:ला लयीत ठेवावं लागेल. नेहराच्या चार षटकांचा अनुभव मालिकेत टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

हार्दिक पंड्या: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्यावर निवड समितीने पुन्हा विश्वास दाखवला आहे. कर्णधार धोनी पांड्यावर खुश आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पांड्याने 3 सामन्यात 3 विकेट घेतल्या आहे. भारतीय भूमीवर पांड्याचं प्रदर्शन उत्तम राहिलं आहे.

पवन नेगी: आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघातील पवन नेगीला टीम इंडियात स्थान मिळालं आहे. धोनीने नेगीवर विश्वास दाखवत, त्याला संघात स्थान दिलं आहे. नेगीने देशांतर्गत क्रिकेट सामन्यात 56 टी 20 सामन्यात 20 च्या सरासरीने 479 धावा केल्या आहेत, तर 46 विकेट टिपल्या आहेत.

मोहम्मद शमी: भारताचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीचा टी ट्वेण्टी संघात समावेश झाला आहे. शमी गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये शमीने भेदक गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र शमीला दुखापतीने ग्रासलं होतं. त्यामुळे तो टीम इंडियातून बराच काळ बाहेर राहिला. शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमनाची संधी मिळाली होती, मात्र दुखापतीने उचल खाल्ल्याने त्याला संघाबाहेर राहावं लागलं.

मोहम्मद शमी: भारताचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीचा टी ट्वेण्टी संघात समावेश झाला आहे. शमी गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकपमध्ये शमीने भेदक गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र शमीला दुखापतीने ग्रासलं होतं. त्यामुळे तो टीम इंडियातून बराच काळ बाहेर राहिला. शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमनाची संधी मिळाली होती, मात्र दुखापतीने उचल खाल्ल्याने त्याला संघाबाहेर राहावं लागलं.
========================================================
संतापजनक, मुंबईत 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

मुंबईत एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी नराधमाला अटक करण्यात आलीये.
गोरेगावजवळच्या दिंडोशी परिसरातली ही घटना आहे. आरोपीला आजूबाजूच्या लोकांनी धरून पोलिसांच्या हवाली केलं. आरोपी सकाळपासून दारू पित होता. आणि रात्री साडे अकराच्या सुमाराला ही मुलगी आरोपीच्या घरातून बाहेर आली. तिचा फ्रॉक रक्तानं माखला होता. आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा आरोपीला विचारलं, की रक्त कसं काय येतंय, तेव्हा ती पडल्यामुळे तिच्या पायाला जखम झाली, असं उत्तर त्यानं दिलं. स्थानिकांचा या नराधमाचा संशय बळावला आणि त्याला चोप दिल्यावर त्यानं हे कृत्य केल्याचं कबूल केलं. त्यानं चॉकलेटचं आमिष दाखवून मुलीला घरी बोलवलं होतं, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली असून बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय.
========================================================
मी खूप चूका केल्या, परमार यांच्या चिठ्ठीतील धक्कादायक खुलासा

ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी नुकतंच चार नगरसेवकांच्या विरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यात परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचाही समावेश आहे. परमार यांचं सुमारे 20 पानांचे हे पत्र तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र या पत्रातून अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या पत्रात परमार यांनी 4 नगरसेवकांवर बोट ठेवतानाच स्वत:च्या चुकांची कबूली दिली आहे. तसंच आपल्या चुकांमुळे कंपनी आणि कुटुंबियांचं भवितव्य उद्‌ध्वस्त झाल्याची खंतही त्यात व्यक्त केली आहे.
‘गेल्या दोन तीन वर्षांत मी खूप चूका केल्या. कायद्याचा व्यवस्थित अभ्यास केला नाही. माझ्या वकिलांनी योग्य सल्ले दिले नाहीत. पुणे आणि भिवंडीतील काव्या प्रकल्पांसाठी खरेदी केलेल्या जमिनींचे टायटल क्लीअर नव्हते. भागिदारांनी मोठ्या विश्वासाने दिलेल्या पॉवर ऑफ ऍटर्नीचा मी गैरवापर केला. ‘कॉसमॉस’मध्ये झालेल्या सार्‍या गैरव्यवस्थापनास मी एकटा जबाबदार आहे. मी स्वतःला स्मार्ट समजत होतो, परंतु, मी कंपनीचा कारभार योग्य प्रकारे सांभाळू शकलो नाही. मी केवळ चुका आणि मूर्खपणाच केला. माझ्या वकिलांनीही योग्य सल्ला न देता मोठ्या चुका केल्या. माझ्या या कृत्यामुळे मी कंपनी आणि माझ्या कुटुंबीयांचे भवितव्य उध्वस्त करत असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. ‘माझ्या गैरव्यवस्थापनामुळे मला कुणाला तोंड दाखवायची लाज वाटत होती. परंतु, आपल्या मुलांना सांग तुमचे वडील ‘चीटर’ नव्हते,’ असंही त्यांनी आपल्या पत्नीला उद्देशून लिहिलेल्या म्हटलं आहे.
========================================================
आमीर खानसोबतचा करार वाढविण्यास स्नॅपडिलचा नकार
देशातील असहिष्णूतेच्या मुदयावरून आमिरने केलेले वक्तव्य त्याला अतिशय महागात पडले असून इतर ब्रँड्ससह आता त्याला ‘स्नॅपडील’चे सदिच्छादूत पद गमवावे लागले आहे. स्नॅपडिल कंपनीने त्याचे कॉन्ट्रॅक्ट वाढवून न देण्याचा निर्णय घेतला आहे.याआधी आमीर खानला अतुल्य भारत योजनेच्या सदिच्छादून पदावरुन दूर करण्यात आले होते. ऑनलाईन शॉपिंग साइट स्नॅपडीलचा सदिच्छादूत म्हणून असलेला आमीरचा करार या महिन्यात संपत आहे. स्नॅपडीलच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार एक वर्षासाठी वाढवण्यात येणार होता. परंतू आमीर खानच्या असहिष्णुतेवरील वक्तव्यावरुन आमीरविरुद्ध वातावरन बघता स्नॅपडीलने कराराचे नुतनीकरन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असले तरी कंपनी आता खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने आमीरऐवजी दुस-या कोणत्याच सेलिब्रिटीला सदिच्छादूत नेमणार नाही. तर सध्या असलेल्या ग्राहकांनाच टिकवणे, नवनवीन कॅटग्री लाँच करणे आणि वेगेवगळ्या योजनांद्वारे ग्राहकांना खरेदीस उद्युक्त करणे, यावर त्यांचा भर असेल. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात असहिष्णूतेच्या मुद्यावरून आमिरने केलेल्या वक्तव्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसापासून आमीर खानने असहिष्णू वातावरणबाबत केलेल्या वक्तव्याचा फटका स्नॅपडीलला बसत होता. अभिनेता आमीर खान हा स्नॅपडीलचा सदिच्छादूत असल्याने अनेकांनी स्नॅपडीलचे अ‍ॅप डिलिट करुन त्याने केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत होते. नेटिझन्सनी आमीरसोबतच कंपनीचाही निषेध नोंदवण्यात आला होता. 
========================================================
टांझानियाच्या युवतीवर हल्ला केलेल्या आरोपीत एक भाजपचा सदस्य

टांझानियाच्या युवतीवर जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका भाजपचा सदस्य असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘हिंदुस्थान टाईम्स’ने या संदर्भात वृत्त दिले असून त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लोकेश बांगरी असे या सदस्याचे नाव असून, तो चिक्काबनवारा ग्राम पंचायतीचा सदस्य आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली होती, तेथून पोलिसांनी एक ओळखपत्र जप्त केले. त्या आधारावर त्यांनी लोकेश बांगरी याला अटक केली असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, लोकेश बांगरी याचा मित्र आणि ग्राम पंचायत सदस्य कबीर अहमद याने बांगरी पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. घटना घडली त्यावेळी लोकेश बांगरी तिथे उपस्थित होता. मात्र, तो जमावाला रोखण्याचा प्रयत्न करून पीडित तरुणीला मदत करण्याचा प्रयत्न करीत होता. पण जमाव खूपच संतप्त असल्यामुळे त्याला मदत करता आली नाही. यावेळी झालेल्या झटापटीतच त्याचे पाकिट आणि ओळखपत्र तिथे पडले आणि ते पोलिसांना मिळाले, असे कबीर अहमदने म्हटले आहे. गेल्या रविवारी बंगळुरूमध्ये एका वाहनाने धडक दिल्याने रस्त्यावर ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने या वाहनाच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनातील २१ वर्षीय टांझानियाच्या विद्यार्थिनीवर हल्ला केला होता. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून केंद्रीय गृह मंत्रालयाने कर्नाटक सरकारला अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपींबाबत काय कारवाई करण्यात आली आणि संबंधित युवतीला सुरक्षा देण्यात आली का? याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. 
========================================================

सेलिब्रिटीजना स्वस्तात भूखंड देणारी १९८३ची अधिसूचना रद्द होणार

सेलिब्रिटिजना स्वस्तात भूखंड देणारा १९८३ ची अधिसूचना महाराष्ट्र सरकार रद्द करणार असल्याचे वृत्त असून याचा फटका हेमामलिनी यांना बसेल अशी चिन्हे आहेत. हेमामालिनी यांच्या नृत्यप्रशिक्षण संस्थेला अवघ्या ९० हजारांमध्ये मुंबईत आंबिवली, अंधेरी येथे भूखंड देण्याचे जाहीर झाल्यावर टीकेची झोड उठली होती. तर याबाबत बोलताना हेमामालिनी यांनी २० वर्षांपूर्वीची प्रलंबित मागणी आत्ता मंजूर झाल्याचे सांगितले होते.
शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने जनमताची दखल घेत ही अधिसूचना रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सूत्रांच्या सांगण्यानुसार यांसदर्भात नवीन कायदा बनवण्यात येत आहे. अर्थात, हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार नाही. त्यामुळे ज्यांना भूखंडाचे हस्तांतरण झाले आहे, त्यांना झळ बसणार नाही. परंतु ज्यांना भूखंडाते हस्तांतरण झालेले नाही, त्यांना नवीन कायद्याप्रमाणे जास्त किंमत भरून भूखंड मिळेल.
त्यामुळे हेमामलिनी यांनाही सदर भूखंड ९० हजारांमध्ये न मिळता, रेडीरेकनरच्या दराने घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

========================================================

एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास व्हॉट्स अॅपवरुन तक्रार नोंदवा

छापील एमआरपी किंमती पेक्षा जास्त रक्कम वसूल करणारे दुकानदार आणि हॉटेल्स विरोधात ग्राहकांना आता थेट व्हॉट्स अॅपवरुन तक्रार दाखल करता येणार आहे. 
नागरीकांना आता दुकानात अथवा हॉटेलमध्ये असा फसवणुकीचा अनुभव आला तर, ग्राहकांनी थेट ९८६९६९१६६ किंवा ०२२-२२८८६६ या क्रमांकांवर सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाचवाजेपर्यंत व्हॉट्स अॅपवरुन तक्रार नोंदवावी असे राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने सांगितले. 
तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. लोकांच्या माहितीसाठी वरील क्रमांक प्रसिध्द करणे दुकानदार, हॉटेल्सना बंधनकारक करण्याचा विचार आहे. चोवीस तास हा दूरध्वनी क्रमांक सुरु ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. 

========================================================

दुष्काळी सोलापूरात झाली पाण्याची अशी नासाडी

सोलापूरपासून अवघ्या २५ किलोमीटरवर असलेल्या लांबोटी येथे जलवाहिनी फुटल्यामुळे अक्षरश: लाखो लिटर पाणी फुकट गेलं आहे. प्रचंड दुष्काळाचा सामना करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पाण्याची अशी नासाडी होताना पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूरची ओळख रब्बीचा जिल्हा अशी आहे. सर्वाधिक ज्वारीचं उत्पन्न घेणारा हा जिल्हा यंदा भीषण दुष्काळाच्या सावटात आला असून ५० वर्षांत प्रथमच दुष्काळ जाहीर करण्यापर्यंत पोचला आहे. असं असताना पाण्याचा एकेक थेंब जपून वापरावा अशी अपेक्षा असताना जलवाहिनी फुटण्यासारख्या व त्याद्वारे पाण्याचा प्रचंड अपव्यय होताना बघणे क्लेषदायी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

========================================================

समलैंगिकतेला गुन्ह्याचा दर्जा दिला तर आपण १५व्या शतकात जाऊ - श्री श्री रवीशंकर

 समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवलं तर आपण १५व्या शतकाइतक्या मागास व्यवस्थेत जाऊ असं स्पष्ट शब्दात सांगत श्री श्री रवीशंकर यांनी ३७७ कलम हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही स्तरावर महिला व पुरूष भेदभाव असता कामा नये असं सांगत शनीशिंगणापूरप्रकरणी पण चर्चेने हा प्रश्न सोडवला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
नेटवर्क १८ शी बोलताना रवीशंकर म्हणाले की, रविवारी आपण शनीशिंगणापूरच्या विश्वस्तांना भेटणार आहोत. त्यांनी काशी विश्वनाथ आणि तिरुपती बालाजी या दोन मॉडेलप्रमाणे आचरण करावे असा सल्ला ते देणार आहेत. या दोन्ही ठिकाणी स्त्री-पुरूष भेदभाव नसल्याचे रवीशंकर म्हणाले.
हिंदू धर्मामध्ये असा भेदभाव नसून, गेल्या काही काळात तो तयार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेत स्त्री पुरूष समानता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थात काही ठिकाणी काही शतके वेगळ्या परंपरा पाळल्या जात आहेत, आणि त्या मोडण्याचं धैर्य अनेकांमध्ये नाहीये. तुम्ही परंपरा मोडलीत तर काहीतरी वाईट घडेल अशी मानसिक भीती यामागे आहे.
आंदोलनं करून किंवा जोरजबरदस्ती करून हा तिढा सुटणार नाही तर चर्चा करून पटवून देऊन यावर मार्ग काढता येईल असे श्री श्री रवीशंकर म्हणाले. धर्म आणि अध्यात्म भीतीच्या पायावर नसावं, परंतु जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये ही भीती आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

========================================================
मुलांना मारले तर आईवडील जाणार खडी फोडायला

मास्तरांचीही खैर नाही ‘बाल न्याय व मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा-२०१५’ लागू – आशीष बनसोडे मुंबई, दि. ४ – शिस्त लावण्यासाठी किंवा संतापाच्या भरात जर तुमच्या मुलांना मारहाण केलीत तर सावधान! आईबाबांना तुरुंगाची हवा खाऊन खडी फोडायला जावे लागेल. वाचून धक्का बसेल पण हे खरे आहे. मुलांवर अन्याय, अत्याचार करणार्‍यांना जरब बसविण्यासाठी ‘बालन्याय व मुलांची काळजी आणि संरक्षक कायदा-२०१५’ हा कठोर शिक्षा करणारा महत्त्वपूर्ण कायदा देशात नुकताच लागू झाला आहे. त्यानुसार मुलांचा छळ केल्यास तीन वर्षे खडी फोडावी लागणार असून एक लाखाचा दंड भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे या कायद्यातून आईवडील आणि शिक्षकांचीही सुटका नाही. मजुरी, भीक मागायला लावणार्‍यांना कठोर शिक्षा शिकण्याच्या, खेळण्याबागडण्याच्या वयात बालकांना मजुरी व भीक मागण्याच्या दलदलीत ओढणार्‍यांना आता कठोर शिक्षा होणार आहे. यासंबंधित असलेल्या शिक्षेत वाढ करून तीन वर्षे कैद व एक लाख दंड अशी करण्यात आली आहे. हे कराल तर याद राखा! – उठाबशा काढायला लावणे – पट्टीने मारणे – कान धरून ओढणे – ओणवे उभे राहण्यास सांगणे – कानशिलात लगावणे – धपाटे मारणे – शारीरिक छळ करणे तंबाखू आणायला सांगितला तर ७ वर्षे कैद ‘तंबाखूची पुडी आण, गुटखा घेऊन ये’ असे मुलांना फर्मान सोडणार्‍यांचेही आता खरे नाही. तंबाखुजन्य पदार्थांसह दारू किंवा अमली पदार्थ मुलांना देणार्‍या, त्यांना आणायला सांगणार्‍याला सात वर्षे कैद आणि एक लाखाचा दंड अशी शिक्षा होणार आहे. 

========================================================

किनवट येथे 6 व 7 फेब्रुवारी रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद

भीमयान बुद्ध विहार समितीच्यावतीने दि.6 व 7 रोजी मार्शल केतन पिंपळापुरे स्मृती परिसर किनवट येथे सहावी जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती परिषदेचे स्वागताध्यक्ष व माजी आ.भीमराव केराम, मुख्य संयोजक अरुण आळणे यांनी दिली. 6 व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन शनिवारी दुपारी भुतान येथील भदंत लामा दोरजी, भदंत अश्वजित व आदरणिय भिक्खू संघ यांच्या हस्ते संपन्न होणार असून धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोहन मोरे हे राहणार आहेत. 

प्रमुख अतिथी म्हणून दिलीप सावते अध्यक्ष नागवंश संस्था कळमनुरी, देवानंद गायकवाड, गणेश खडसे, शेषराव रांजनकर, माधव जोंधळे आदींची उपस्थिती राहणार आहे. थायलंड येथील भदंत आरकैनो काबेनो व उपस्थित भिक्खू संघाच्यावतीने धम्मदेसना संपन्न होईल. धम्म परिषदेत अग्रगामी स्मरणिका तसेच लेखक एस.एम. लोखंडे, ‘बीऍन्ड द होरायझन’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. दोन दिवसीय धम्म परिषदेत धम्मसंवाद, धम्मसत्कार, धम्म काव्य संवाद, धम्म नाट्य, प्रबोधन संध्या, बालकलाकार व धम्म नृत्य हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पत्रकार श्याम कांबळे, शाहीर आनंद किर्तने, डॉ.यु.बी.मोरे, चित्रकार श्रीधर अंभोरे, डॉ.भीमराव शेजुळे यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या धम्म परिषदेला खा. असोद्दीन ओवेसी, आ.प्रा.जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, वसंतराव पुरके, सय्यद मोईन, राजाभाऊ भोसले, श्रीधर साळवे, मनोहर भगत, बापुराव गजभारे, रवीभाऊ शेंडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी या बौद्ध धम्म परिषदेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष भीमराव केराम, संयोजक अरुण आळणे, विनोद खैरे, निखील वाघमारे, मनोज हिंगोले, कुमार सोनकांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

========================================================

लातूरला मिळणार १६ दिवसांनी पाणी

लातूर शहरातील पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी प्रशासन विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. लातूर नजिकच्या साई बंधार्‍यात मोठे चर घेऊन पाणी जमवणे सुरु झाले आहे. त्याला यशही येत आहे. टॅंकर ऐवजी नळानेच पाणी द्यावे अशी मागणी जोर धरीत आहे. याचा विचार करीत आज मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी झोनच्या बैठका घेतल्या. येत्या सात तारखेपासून लातूर शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाईल. हे पाणी केवळ अर्धा तास सोडले जाईल, दर सोळा दिवसांनी सोडले जाईल ते जपून वापरावे असे आवाहन सुधाकर तेलंग यांनी केले आहे.
========================================================

लातूर; उद्रेक सुरु झाला, पाण्याच्या टॅंकरचालकाला मारहाण

पाण्याची टंचाई लातूरला कुठे नेऊन ठेवेल हे आज सांगता येत नाही. पाण्यासाठी नगरसेवक आणि नागरिक पाण्याच्या टाकीवर एकमेकाचे गळे धरीत आहेत. नगरसेवक टाकीवर आंदोलन करीत आहेत. आज तर कहरच झाल. पाण्यासाठी कासावीस झालेल्या काही नागरिकांनी एका टॅंकरचालकालाच मारहाण केली. महापौर अख्तर शेख यांच्या प्रभागात पाणी देऊन परतताना दीपक गरड यांचा टॅंकर काही नागरिकांनी अडवला. मनपाच्या पाण्याचे टॅंकर का विकतोस असं म्हणत दीपक गरड या टॅंकरचालकाला मारहाण केली. मुजफ्फर गल्लीत मशिदीसमोर हा प्रकार घडल्याचे गरड सांगतात. 
दीपक गरड महापौर अख्तर शेख यांच्या प्रभागात पाणी टाकून येत असताना मुजफ्फर गल्लीत मशीद समोर, पाणी विकायला नेतोस असं म्हणत चौघांनी मारहाण केली. टॅंकरचालक संघटनेनं या प्रकाराचा निषेध केला आहे. आवश्यक संरक्षण द्यावं, जुनी बिलं ताबडतोब द्यावीत, टॅंकरचे दर परवडत नाहीत ते वाढवून द्यावेत किंवा टेंडर नव्याने काढावे अशी मागणी असल्याचे टॅंकर मालक शिवाजी रेड्डी यांनी सांगितले.

========================================================
महाविद्यालयीन युवकांनी स्‍वच्‍छतेची जनजागृती केल्‍यास स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र होण्‍यास वेळ लागणार नाही  – जि. प. अध्‍यक्षा गुंडले

महाविद्यालयीन युवकांनी प्रेरक होऊन स्वच्‍छतेची जनजागृती केल्‍यास महाराष्‍ट्र स्‍वच्‍छ होण्‍यास वेळ लागणार नाही, असं प्रतिपादन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई गुंडले यांनी केले.
     जिल्‍हा परिषदेच्‍या पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाच्‍या वतीनं यशवंतराव चव्‍हाण सभागृहात जिल्‍हास्‍तरीय स्‍वच्‍छतामित्र वक्‍तृत्‍व करंडक स्‍पर्धा शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी घेण्‍यात आली, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. शिक्षण व आरोग्‍य सभापती संजय बेळगे, जिल्‍हा परिषद सदस्‍य राठोड, वसंत सुगावे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड, प्रा.जयपाल वाघमारे, विलास ढवळे, प्रा.शंतनू कैलासे, प्रा.शिवाजीराव अंबुलगेकर, प्रशासकीय अधिकारी डी.टी.गवळे आदींची उपस्थिती होती.
       पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, स्‍वच्‍छ पाणी आणि स्‍वच्‍छता क्षेत्रात महाविद्यालयीन युवकांचा सहभाग घेण्‍यासाठी राज्‍यस्‍तरीय स्‍वच्‍छतामित्र वक्‍तृत्‍व करंडक स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येते. युवाशक्‍ती एकवटली तर कोणतीही गोष्‍ट साध्‍य करता येते, या शक्‍तीचा स्वच्‍छतेसाठी वापर केल्‍यास स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र होण्‍यास वेळ लागणार नाही, असे मत जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई आनंद गुंडले यांनी व्‍यक्‍त केले.
      प्रारंभी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्‍या प्रतिमेचे पूजन करुन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई गुंडले यांच्याहस्‍ते दिप प्रज्‍वलन करण्‍यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्‍य सभापती संजय बेळगे यांनी युवकांना मार्गदर्शन केलं ते म्‍हणाले, महाविद्यालयीन युवकांमध्‍ये विविध कलागुण असतात. या कलेला प्रोत्‍साहीत करण्‍यासाठी या स्‍पर्धा घेतल्‍या जात आहेत. जिल्‍हयातील अनेक म‍हाविद्यालयातील युवकांनी सहभाग घेऊन स्वच्‍छतेचे प्रबोधन करणार असल्‍याचे सांगून राज्‍यस्‍तरावर निवड होणा-या युवकांना त्‍यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.
      कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड यांनी केले ते म्‍हणाले, या स्‍पर्धेत यश मिळविणा-या युवकांना स्‍वच्‍छता प्रेरक म्‍हणून काम करण्‍याची संधी मिळणार आहे. यासाठी युवकांनी स्‍पर्धेत यश मिळवून स्‍वच्‍छता क्षेत्रात सहकार्य करावे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मिलिंद व्‍यवहारे यांनी मानले.
       या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रविण पाटील, चिगळे विठ्ठल, महेंद्र वाठोरे, विशाल कदम, चैतन्‍य तांदुळवाडीकर, नंदलाल लोकडे, प्रविण खंदारे, स्मिता हंबर्डे, कपेंद्र देसाई, राम तरटे, संतोष पंडीत, सुनिल भोपाळकर, चंद्रमुनी कांबळे, अरुण वाघमारे, राहेरकर, निकिशा इंगोले,नागेश कंधारे, सुर्यकांत हिंगमीरे, दिपक मेकाले,दिपक श्रीमनवार यांनी परिश्रम घेतले. 

========================================================
 शालेय व्यवस्थापन समितीने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी - विस्तार अधिकारी प्रकाश जाधव 

" पालकांनी शैक्षणिक बाबतीत लक्ष द्यावे - विस्तार अधिकारी प्रकाश जाधव "

मुखेड :- रियाज शेख

         विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी दररोज आपल्या मुलांचा गृहपाठ पहावा. तसेच शालेय व्यवस्थापन समिती ने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली तर देशाचा भविष्य उज्वल होवु शकतो असे मत विस्तार अधिकारी प्रकाश जाधव यांनी व्यक्त केले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्यांची सहविचार सभेत ते बोलत होते.
      शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील हंगरगा प.क. या केंद्राची सलगरा खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष यांची सहविचार सभा आयोजीत करण्यात आली होती. याकार्यक्रमाचे अध्यक्ष विस्तार अधिकारी प्रकाश जाधव, प्रमुख पाहुणे सरपंच सौ.वासमवाड, केंद्रप्रमुख येवतीकर शिवाजी, तंटामुक्ती अध्यक्ष डांगे आदींची प्रमुख उपस्थित होती. यावेळी प्रकाश जाधव म्हणाले की, पालकांनी पाल्याच्या शैक्षणिक बाबीवर विशेष लक्ष द्यावे. शक्यतो रात्री 7 ते 9 दरम्यान टी.व्ही.संच बंद ठेवावा. चाचणी परिक्षाचे पेपर पालकांनी तपासावे. दररोज किमान एक तास गृहपाठ घ्यावा. तसेच यावेळी मुक्त शाळा, ज्यादा तासिका व व्यवस्थापन समिती रचना, अधिकार व कर्तव्य याबाबत चर्चा करण्यात आली. यासहविचारसभेत परिसरातील हिब्बट, हंगरगा, बावलगाव, डोंगरगाव, हंगरगा प.क., कर्णा, नंदगाव, सलगरा खु. येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, अध्यक्षासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
========================================================

========================================================

No comments: