Saturday, 27 February 2016

नमस्कार लाईव्ह २७-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकमधील कोहलीच्या चाहत्याला जामीन 
२- अफगाणिस्तानमधील काबुल शहरात पोलीस मुख्यालयाजवळ स्फोट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- अयोध्या प्रकरणाची सुनावणी रोज: स्वामी 
४- सत्तेची नव्हे, एकात्मतेची चिंता- राजनाथसिंह  
५- पोलिसांनीच हल्लेखोरांना जाऊ दिले - कन्हैयाकुमार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- ...म्हणून माझी मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये : राज ठाकरे 
७- तेजस ठाकरेने शोधलेल्या खेकड्याच्या प्रजातीला ठाकरे कुटुंबाचं नाव 
८- ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटला मुख्यमंत्र्यांची मंजुरी 
९- सरकारलाच माहिती नाही मालगुंडचा जिल्हा? 
१०- कानपूर; सुब्रमण्यम्‌ स्वामी यांच्या गाडीवर फेकले अंडे! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- गोरेगाव; प्लॅटफॉर्मवरील व्यक्तीला टपली मारताना खांबावर आदळून मृत्यू 
१२- कल्याण; बहिणीने रिमोट काढून घेतल्याने 11 वर्षीय मुलाचा गळफास 
१३- पश्चिम बंगालमध्ये आयसीसचा संशयित अटक. 
१४- अभिनेत्री करिश्मा कपूरने पती संजय आणि सासूविरोधात तक्रार दाखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- विराटच्या 'त्या' पाकिस्तानी चाहत्याबाबत मोठा निर्णय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
(पंकज सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.


=====================================

प्लॅटफॉर्मवरील व्यक्तीला टपली मारताना खांबावर आदळून मृत्यू

प्लॅटफॉर्मवरील व्यक्तीला टपली मारताना खांबावर आदळून मृत्यू
मुंबई : मुंबई लोकलमधील मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवरच्या व्यक्तीला टपली मारण्याच्या नादात, समोरच्या खांबावर धडकून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव स्टेशनवर काल दुपारी ही घटना घडली. 
मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये मस्ती करणं, कसं जीवावर बेतू शकतं हे पुन्हा स्पष्ट झालं आहे.
goregaon cctv1
दरम्यान, मुंबई लोकलमधील ही ग्रँडमस्ती नवी नाही. यापूर्वी अनेक जण जीवघेण्या कसरती करत असल्याचं कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. अशी मस्ती करू नका, असं आवाहन वारंवार रेल्वेकडून केलं जातं. मात्र तरीही टवाळखोरांना त्याच्याशी काहीही देणं-घेणं नसतं, याचीच प्रचिती अशा प्रसंगांवरू येते.
=====================================

...म्हणून माझी मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये : राज ठाकरे

...म्हणून माझी मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये : राज ठाकरे
मुंबई : मराठीही इंग्रजीसारखी सर्वसमावेशक हवी, नवे शब्द सामील करून घ्यायला हवेत. माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकतात, पण त्यांच्यावर मराठीचे संस्कार आहेत, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
मराठी दिनानिमित्त ‘मटा साहित्य मैफल’मध्ये राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी राज ठाकरेंना बोलतं केलं.
यावेळी राज ठाकरेंनी शरद पवारांपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत, साहित्यापासून संस्कृतीपर्यंत सर्व विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
महाराष्ट्रात मराठीचा सन्मान हवाच
सर्व पाट्या मराठीत असायला हवा हा कायदा असताना, ते होत नव्हतं म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं. प्रत्येक वेळेला आंदोलनाची वेळ का आणता? या महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला पाहिजे इतकंच माझं म्हणणं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
मराठीपण टिकवण्यासाठी मी जरी काम करत असलो तरी ही माझी एकट्याची नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं राज म्हणाले.
आत्मचरित्रातून प्रेरणा
“मला आत्मचरित्रं वाचायला खूप आवडतात. खूप गोष्टी करायचं प्रोत्साहन आत्मचरित्रातून मिळतं. सावरकरांच आणि माझ्या आजोबांचं आत्मचरित्रं सगळ्यात जास्त आवडलं. धनंजय कीर यांनी लिहलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं आणि पुपुल जयकरांनी लिहिलेलं इंदिरा गांधींचं चरित्र सर्वात जास्त आवडली” असं राज ठाकरे म्हणाले.
शरद पवारांचं आत्मचरित्र चाळलं. पण यशवंतरावांचं आत्मचरित्र जास्त आवडलं, असंही त्यांनी नमूद केलं. अत्रे, पुलं, तेंडुलकर, दळवी, कुरुंदकर हे माझे आवडते लेखक आहेत, असंही राज म्हणाले.
=====================================

तेजस ठाकरेने शोधलेल्या खेकड्याच्या प्रजातीला ठाकरे कुटुंबाचं नाव

तेजस ठाकरेने शोधलेल्या खेकड्याच्या प्रजातीला ठाकरे कुटुंबाचं नाव
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा पुत्र तेजसने खेकड्याच्या काही प्रजाती शोधून काढल्या आहेत. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबीयांचं नाव एका प्रजातीला देण्यात आलं आहे. ‘गुबेरनॅटोरिआना ठाकरी’ आणि इतर चार प्रजाती त्याने सावंतवाडीजवळ शोधल्या आहेत.
तेजसने लाल-जांभळट कवच आणि केशरी रंगाची नांगी असलेल्या काही खेकड्याच्या प्रजाती शोधल्या. सिंधुदुर्ग तालुक्यातील सावंतवाडीमध्ये गोड्या पाण्यात हे खेकडे आढळतात.
तेजस सध्या कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. जंगल, झाडं आणि वन्य प्राण्यांचा अभ्यास करणं हा त्याचा छंद आहे. गेल्या वर्षी तो सापाच्या दुर्मीळ प्रजातींचा शोध घेण्यासाठी कोकणात गेला होता. त्यावेळी रघुवीर घाटातील एका धबधब्यात गोड्या पाण्यातील खेकड्याच्या पाच प्रजातींचा शोध लागला. 
गुबेरनॅटोरिआना ठाकरी, घातिमा अॅट्रोपर्पुरेआ, घातिआना स्प्लेन्डिडा, गुबेरनॅटोरिआना अल्कोकी आणि गुबेरनॅटोरिआना वाघी अशी या पाच प्रजातींची नावं ठेवण्यात आली आहेत.
=====================================

विराटच्या 'त्या' पाकिस्तानी चाहत्याबाबत मोठा निर्णय

विराटच्या 'त्या' पाकिस्तानी चाहत्याबाबत मोठा निर्णय
इस्लामाबाद : पाकिस्तानातील घरावर तिरंगा फडकवल्याप्रकरणी तुरुंगवास ठोठवण्यात आलेल्या विराट कोहलीच्या ‘त्या’ पाकिस्तानी चाहत्याला कोर्टाने दिलासा दिला आहे. पंजाब प्रांतातील कोर्टाकडून उमेर दराझ या चाहत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून तो तुरुंगात होता.

50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. या चाहत्याने त्याच्या घराच्या छतावर भारताचा तिरंगा फडकावला आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्याविरोधात 16 एमपीओ आणि 123 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
=====================================

ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
ठाणे : ठाण्यातल्या अनधिकृत, धोकादायक तसंच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबईप्रमाणेच क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे. ठाण्यासाठीच्या क्लस्टर योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आहे. 
ठाण्यातल्या जुन्या आणि धोकादायक इमारतींसह अनधिकृत इमारतींतील रहिवाशांनाही याअंतर्गत घरं मिळणार आहेत. झोपडपट्ट्यांनाही या योजनेत सामावून घेतलं जाणार आहे. ही योजना मंजूर झाल्यानं 5 लाख ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. 
या योजने अंतर्गत अधिकृत इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या सध्याच्या घराच्या क्षेत्रफळावर वाढीव 25 टक्के तर अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना 323 चौरस फुटाचं घर दिलं जाणार आहे. झोपडीधारकांना 269 चौरस फुटांचं घर मिळणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे गेल्या 10 वर्षांपासून या योजनेसाठी पाठपुरावा करत होते. 
=====================================

बहिणीने रिमोट काढून घेतल्याने 11 वर्षीय मुलाचा गळफास

बहिणीने रिमोट काढून घेतल्याने 11 वर्षीय मुलाचा गळफास
ठाणेमोठ्या बहिणीने टीव्हीचा रिमोट हिसकावून घेतल्याने ११ वर्षीय चिमुकल्याने आत्महत्या केली आहे. कल्याणजवळच्या वालधुनी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गेश प्रभूनाथ सोनी असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. 
दुर्गेश बुधवारी रात्री दहा वाजता अभ्यास करत होता. त्यावेळी काही कारणास्तव त्याचा 12 वर्षीय बहिणीशी वाद झाला. या वादात दुर्गेशचं पुस्तक फाटल्यामुळे दुर्गेश खूपच चिडला होता. त्यातच बहिणीने दुर्गेशच्या हातातील टीव्हीचा रिमोट काढून घेऊन, तिच्या आवडीचं चॅनेल लावलं. 
या प्रकारामुळे आपला अपमान झाल्याची भावना दुर्गेशच्या मनात होती. यातूनच त्याने रात्रीच्या सुमारास घराच्या बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. 
दुर्गेशला वडिल नसून त्याची आई दोन्ही मुलांसह वालधुनीतल्या शिवाजी नगर येथील बिहारी चाळीत राहात आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
=====================================
अयोध्या प्रकरणाची सुनावणी रोज: स्वामी
कानपूर - रामजन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आता दररोज सुनावणी होणार असल्याचा दावा भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज केला. त्यामुळे अयोध्या प्रकरणाचा लवकरच निकाल लागेल, अशी अपेक्षा स्वामी यांनी या वेळी व्यक्त केली. 

येथील एका खासगी कॉलेजमध्ये आयोजित सेमिनारमध्ये जागतिक दहशतवादावर ते बोलत होते. स्वामी म्हणाले, की रामजन्मभूमीसंदर्भात 574 पानांचा अहवाल अगोदरच सादर केला आहे. या अहवालात त्या ठिकाणी रामजन्मभूमी असल्याचे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालय लवकरच दररोज सुनावणी घेणार असून, त्यामुळे भारतीयांना त्याचा निकाल लवकरच मिळेल. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवरील देशद्रोही गुन्ह्याअंतर्गत केलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले, की जेएनयू चार महिन्यांसाठी बंद करावी, अशी शिफारस केली होती. या काळात जेएनयूमधील वसतिगृह आणि परिसरातील राष्ट्रविघातक शक्तींना पायबंद घालता येईल. याशिवाय भारतातील अनेक ठिकाणी देशविरोधात कारवाया सुरू असून, त्या ठिकाणी साफसफाई करणे गरजेचे आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून मोटारीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्वामी म्हणाले, की हा हल्ला नैराश्‍यातून झाला असून, त्यांचे नेतेही यात सहभागी आहेत.
=====================================
सरकारलाच माहिती नाही मालगुंडचा जिल्हा?

पुणे - कवी केशवसुत यांच्या मालगुंड (जि. रत्नागिरी) या गावी पुस्तकांचे गाव उभारण्याची सरकारची योजना आहे. हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात असतानाही मराठी राजभाषा दिनानिमित्त दिलेल्या जाहिरातीत मालगुंड हे गाव सातारा जिल्ह्यात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्याच माहिती व जनसंपर्क विभागाला राज्याचा भूगोल माहीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मराठी भाषा दिनानिमित्त (ता. 27) महाराष्ट्र सरकारने आज काही वृत्तपत्रात मोठी जाहिरात दिली आहे. त्यामध्ये समृद्ध आणि प्रतिभासंपन्न मराठी भाषेसाठी सरकारच्या योजनांविषयी माहिती देण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयाने प्रसिद्धीस दिलेल्या या जाहिरातीत सातारा जिल्ह्यातील मालगुंड या गावाला पुस्तकांचे गाव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळेजवळ आहे. केशवसुत हे मराठीतील नामवंत साहित्यिक होते. त्यांच्या मालगुंड या गावी त्यांचे स्मारकही आहे. त्याच गावी पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे. मात्र, हे गाव सरकारच्या जनसंपर्क विभागाला नक्की कुठे आहे, हे माहीतच नाही. मालगुंड व्यतिरिक्त भिलार (ता. महाबळेश्‍वर) येथे पुस्तकांचे गाव उभारण्यात येणार आहे. भिलार हे गाव स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची स्वतंत्र ओळख देखील आहे. असे असूनही सदर जाहिरातीत भिलार ऐवजी महाबळेश्‍वर येथे पुस्तकांचे गाव उभारणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे गाव भिलारला होणार की महाबळेश्‍वरला? असा सवाल निर्माण झाला आहे.
=====================================
सुब्रमण्यम्‌ स्वामी यांच्या गाडीवर फेकले अंडे!
कानपूर - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या मोटारीवर आज (शनिवार) काही आंदोलकांनी टोमॅटो आणि अंडे फेकून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. 

सुब्रमण्यम्‌ स्वामी आज नवाबगंज येथील व्हीव्हीएसडी महाविद्यालयात एका परिसंवादात उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. दरम्यान कंपनी बाग चौकात पोचल्यानंतर त्यांच्या मोटारीवर काही आंदोलकांनी अंडे आणि टोमॅटो फेकले. याबाबत माहिती देताना त्यांच्या चालकाने सांगितले, "ते जखमी झालेले नाहीत. पण आंदोलकांनी मोटारीवर अंडे आणि टोमॅटो फेकले.‘ त्यानंतर आंदोलकांनी घेराव घातल्याचेही चालकाने सांगितले. मात्र, आंदोलक कोण होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
=====================================
सत्तेची नव्हे, एकात्मतेची चिंता- राजनाथसिंह 

खतिमा (उत्तराखंड) - आमच्या सरकारला पुन्हा सत्तेत येण्याची चिंता नाही पण देशाच्या एकात्मतेला आम्ही धक्का पोचू देणार नाही, असा इशारा केंद्रिय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिला आहे. 

दोन दिवस चालणाऱ्या खतिमा महोत्सवाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात सिंह बोलत होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांचे प्रकरण ताजे आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, ‘आपण जवळ जवळ सर्वकाही सहन करू शकतो. पण देशाच्या विभागणीबाबत दिलेल्या घोषणा कदापि सहन करू शकत नाही. मी सर्वांना खात्री देतो की आमच्या सरकारला पुन्हा सत्तेत येण्याची चिंता नाही. मात्र देशाच्या एकात्मतेला आम्ही धक्‍का पोचू देणार नाही.‘ तसेच सीमेपलिकडून होत असलेल्या गोळीबाराबाबत बोलताना त्यांनी "बंदुकीतील पहिली गोळी आम्ही चालवणार नाही. मात्र जर पाकने पहिली गोळी चालविली तर आमच्या गोळ्या मोजू नका.‘ असे म्हणत पाकला इशारा दिला आहे.
=====================================
पोलिसांनीच हल्लेखोरांना जाऊ दिले - कन्हैयाकुमार
वकीलांचे कपडे घालून आलेल्या हल्लेखोरांनी माझ्यावर हल्ला केल्यानंतर त्यांना पोलिसांनीच त्याठिकाणाहून जाऊ दिल्याचे, कन्हैया कुमारने चौकशीदरम्यान म्हटले आहे.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) भारताविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलेला आहे. सध्या तो कोठडीत असून, नुकतेच त्याला सुनावणीदरम्यान न्यायालयात मारहाण झाली होती. याबाबत कन्हैया कुमारने चौकशी दरम्यान दिल्ली पोलिसांवर आरोप केले आहेत. दिल्ली पोलिसांनी ओ. पी. शर्मा व दोन वकीलांना अटक केल्यानंतर लगेच त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. 

कन्हैया कुमार म्हणाला की, मला मारहाण करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी तेथून जाऊ दिले. त्यांना अटक केली नाही. वकीलांचे कपडे परिधान केलेला गट माझी न्यायालयात वाटच पाहत होता. मला त्यांनी जबर मारहाण केली. तरीही पोलिसांनी मलाच फरफटत तेथून नेले. मी एका हल्लेखोराला ओळखले होते. पण, पोलिसांनी माझे ऐकलेच नाही.
=====================================
पाकमधील कोहलीच्या चाहत्याला जामीन
लाहोर - विराट कोहलीच्या फलंदाजीवर फिदा होऊन घरावर तिरंगा फडकावल्याबद्दल अटक झालेला त्याचा चाहता उमर द्राझ याला आज (शनिवार) जामीन मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या महिनाभरापासून कारागृहात असलेल्या द्राझला ओकारा जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी द्राझचा जामीन अर्ज फेटाळला होता. मी विराटचा फार मोठा चाहता आहे आणि त्याच्यामुळे मी भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देत असतो. घरावर तिरंगा लावून मी विराटबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले होते, असे द्राझने अटक झाल्यानंतर सांगितले होते. 

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचा कट्टर चाहता असलेल्या पाकिस्तानातील उमर द्राझ या 22 वर्षीय तरुणाला स्वतःच्या घरावर भारताचा ध्वज फडकविल्याप्रकरणी उमर याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी त्याला गुरुवारी न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठाविली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील ओकारा जिल्ह्यात उमरचे गाव आहे. विराट कोहली प्रमाणे दिसणारा उमर हा विराटचा कट्टर चाहता आहे.
=====================================

No comments: