[अंतरराष्ट्रीय]
१- लैंगिक संबंधातून अमेरिकेत आला झिका व्हायरस
२- ‘अॅपल’ला ‘गुगल’चा हिसका!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- असदुद्दीन ओवेसी यांच्यावर गुन्हा दाखल, मारहाणीचा आरोप
४- भारतीय हॉकी टीमचा कर्णधार सरदार सिंहवर बलात्काराचा गुन्हा दाखल
५- उत्तर प्रदेश; आजपासून ऑटो एक्सपोला सुरुवात, नवनव्या कारचे मॉडेल पेश होणार!
६- अर्चना रामसुंदरम 'सशस्त्र सीमा दला'च्या प्रमुख
७- मागासवर्गीय नेता आहे म्हणून माझा बळी दिला जातोय -भुजबळ
८- दिल्लीत मोठा शस्त्रसाठा सापडला, विशेष पथकाने एका गाडीतून ५० पिस्तुल, शस्त्रास्त्र ताब्यात घेतली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- 'मेक इन इंडिया' गिरगाव चौपाटीवरच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
१०- मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, करवाढीची शक्यता कमी
११- भुजबळांच्या व्हॉट्सअॅप डीपीवरुन चर्चांना उधाण
१२- मुंबईचा श्वास घुसमटताना ‘पर्यावरणदादा’ कुठे होते? शेलारांचा रामदास कदमांवर घणाघात
१३- लवकरच संपूर्ण राज्यभरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार - रावते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर टँकर उलटून वाहतूक कोंडी
१५- नागपुरातील युग चांडकच्या मारेकऱ्यांना आज शिक्षा सुनावणार
१६- मुंबई; खासगी वाहतुकीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार, 15 फेब्रुवारीला लाक्षणिक संप
१७- 12 डब्यांच्या लोकलसाठी हार्बर लाईनवर आजपासून विशेष ब्लॉक
१८- पुणे; जुळ्या बहिणींच्या राहिल्या आता आठवणी
१९- मुंबई; पंख्यामुळे मोटरमन व महिला प्रवाशांत खडाजंगी
२०- परभणी; मानवतयेथील ताडबोरगावमध्ये आखडयावर दरोडा, तिघांचा खून, दोघे जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- काँग्रेस नेते बलराम जाखड यांचे निधन
२२- पाठ फिरवू नका, प्रयत्न करणं थांबवू नका: सचिन तेंडुलकर
२३- शाहरुखचा काजोलला चुकून लीप किस, व्हिडिओ व्हायरल
२४- मला विमान विकत घेण्याची इच्छा, पण पैसा नाही - शाहरुख खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२५- वडार समाजाचे अर्धनग्न अवस्थेत दगड्फोड आंदोलन
२६- किनवट; सहाय्यक जिल्हाधिकारी भारुड यांच्याकडून अपमानास्पद वागणूक, वकील संघाकडून कामकाज बंद
२७- हिंगोली; पोतदार इंग्लिश स्कूलला शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याची नोटीस
२८- तमसा; विषारी औषधामुळे १६ शेळ्यांचा मृत्यू
२९- औढा तालुक्यात अज्ञात आजाराचे थैमान, आरोग्य पथकाकडून तपासणी
३०- सेनगाव; आटोचालकांनी केली श्रमदानातून रस्त्याची डागडुजी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शिवाजी जाधव, बालाजी कदम, दत्ताराव मोहिते, बाळू पाटील, वैभव शिंदे, भारत कुमार, सचिन जाधव, शिवानंद टाकसाळे, लक्ष्मीकांत नंदनवार, मन्मथ तले, साहेबराव गुंडीले, प्रवीण आडे, विक्रम राठोड, राजकुमार घोडीचोर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
यंदा अर्थसंकल्प 36 हजार कोटींपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये मुंबई पालिकेची निवडणूक असल्यामुळे कोणत्याही करात वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
अर्थसंकल्पात गतवर्षीपेक्षा 7 ते 10 टक्क्यांनी तरतूद वाढण्याचीही शक्यता आहे. मागील वर्षीचे बजेट खर्च करण्यासाठी केवळ दोन महिने उरले असतानाही आतापर्यंत एकूण 33 हजार 514 कोटींच्या बजेटपैकी केवळ 25 टक्के रक्कमच खर्च झालेली आहे.
महापालिकेच्या यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा प्रभाव असू शकतो.
मुंबईकडे येणारी आणि वसईकडे जाणारी अशी दोन्ही दिशेची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे कार्यालयाच्या दिशेने जाणारे अनेक जण अडकून पडले आहेत.
१- लैंगिक संबंधातून अमेरिकेत आला झिका व्हायरस
२- ‘अॅपल’ला ‘गुगल’चा हिसका!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- असदुद्दीन ओवेसी यांच्यावर गुन्हा दाखल, मारहाणीचा आरोप
४- भारतीय हॉकी टीमचा कर्णधार सरदार सिंहवर बलात्काराचा गुन्हा दाखल
५- उत्तर प्रदेश; आजपासून ऑटो एक्सपोला सुरुवात, नवनव्या कारचे मॉडेल पेश होणार!
६- अर्चना रामसुंदरम 'सशस्त्र सीमा दला'च्या प्रमुख
७- मागासवर्गीय नेता आहे म्हणून माझा बळी दिला जातोय -भुजबळ
८- दिल्लीत मोठा शस्त्रसाठा सापडला, विशेष पथकाने एका गाडीतून ५० पिस्तुल, शस्त्रास्त्र ताब्यात घेतली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- 'मेक इन इंडिया' गिरगाव चौपाटीवरच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
१०- मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, करवाढीची शक्यता कमी
११- भुजबळांच्या व्हॉट्सअॅप डीपीवरुन चर्चांना उधाण
१२- मुंबईचा श्वास घुसमटताना ‘पर्यावरणदादा’ कुठे होते? शेलारांचा रामदास कदमांवर घणाघात
१३- लवकरच संपूर्ण राज्यभरात हेल्मेट सक्ती करण्यात येणार - रावते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर टँकर उलटून वाहतूक कोंडी
१५- नागपुरातील युग चांडकच्या मारेकऱ्यांना आज शिक्षा सुनावणार
१६- मुंबई; खासगी वाहतुकीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार, 15 फेब्रुवारीला लाक्षणिक संप
१७- 12 डब्यांच्या लोकलसाठी हार्बर लाईनवर आजपासून विशेष ब्लॉक
१८- पुणे; जुळ्या बहिणींच्या राहिल्या आता आठवणी
१९- मुंबई; पंख्यामुळे मोटरमन व महिला प्रवाशांत खडाजंगी
२०- परभणी; मानवतयेथील ताडबोरगावमध्ये आखडयावर दरोडा, तिघांचा खून, दोघे जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- काँग्रेस नेते बलराम जाखड यांचे निधन
२२- पाठ फिरवू नका, प्रयत्न करणं थांबवू नका: सचिन तेंडुलकर
२३- शाहरुखचा काजोलला चुकून लीप किस, व्हिडिओ व्हायरल
२४- मला विमान विकत घेण्याची इच्छा, पण पैसा नाही - शाहरुख खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२५- वडार समाजाचे अर्धनग्न अवस्थेत दगड्फोड आंदोलन
२६- किनवट; सहाय्यक जिल्हाधिकारी भारुड यांच्याकडून अपमानास्पद वागणूक, वकील संघाकडून कामकाज बंद
२७- हिंगोली; पोतदार इंग्लिश स्कूलला शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याची नोटीस
२८- तमसा; विषारी औषधामुळे १६ शेळ्यांचा मृत्यू
२९- औढा तालुक्यात अज्ञात आजाराचे थैमान, आरोग्य पथकाकडून तपासणी
३०- सेनगाव; आटोचालकांनी केली श्रमदानातून रस्त्याची डागडुजी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शिवाजी जाधव, बालाजी कदम, दत्ताराव मोहिते, बाळू पाटील, वैभव शिंदे, भारत कुमार, सचिन जाधव, शिवानंद टाकसाळे, लक्ष्मीकांत नंदनवार, मन्मथ तले, साहेबराव गुंडीले, प्रवीण आडे, विक्रम राठोड, राजकुमार घोडीचोर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
असदुद्दीन ओवेसी यांच्यावर गुन्हा दाखल, मारहाणीचा आरोप
नवी दिल्ली/ हैदराबाद : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओवेसी यांच्या समोर आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला असून ओवेसी यांना अटकही होऊ शकते.
ग्रेटर हैदराबाद नगर निगम निवडणुकांदरम्यान एमआयएम आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. काँग्रेस नेते शब्बीर अली यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
मीरचौक भागात यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येत पोलिस बल तैनात करण्यात आलं आहे.एमआयएम आणि काँग्रेस समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.यात काही नेते आणि कार्यकर्ते जखमी झाले.
====================================================================
'मेक इन इंडिया' गिरगाव चौपाटीवरच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ‘मेक इन इंडिया’चा कार्यक्रम घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
यापूर्वी मुंबई हायकोर्टाने 14 फेब्रुवारीला गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र नाईटच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला होता. गिरगाव चौपाटीवर विसर्जन वगळता इतर कोणतेही कार्यक्रम घेतले जात नसल्यानं हायकोर्टानं या कार्यक्रमावर आक्षेप घेत त्यासाठी मनाई केली आहे.
13 ते 15 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’च्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. ज्यासाठी राज्य सरकारनं मोठी तयारीही केली आहे. राज्य सरकारला या भव्य कार्यक्रमासाठी 2 लाख स्केअर फुटांची जागा 15 दिवसांच्या वापराकरता हवी आहे.
या कार्यक्रमासाठी क्वीन्स नेकलेसच्या बॅकड्रॉपवर राज्य सरकारने गिरगाव चौपाटीची निवड केली होती. मात्र, यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना हायकोर्टने स्पष्ट केलं की, याप्रकरणात 2005 साली हायकोर्टाने नेमून दिलेल्या समितीनं गिरगाव चौपाटीवर कोणते कार्यक्रम घ्यावेत याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे कोर्टाने गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम घेण्यास नकार दिला होता.
त्यानंतर राज्यसरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली. कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
====================================================================
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज, करवाढीची शक्यता कमी
मुंबई : मुंबई महापालिकेचा 2016-17 साठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. त्यामुळे समस्त मुंबईकरांचं पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलं आहे.
यंदा अर्थसंकल्प 36 हजार कोटींपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये मुंबई पालिकेची निवडणूक असल्यामुळे कोणत्याही करात वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
अर्थसंकल्पात गतवर्षीपेक्षा 7 ते 10 टक्क्यांनी तरतूद वाढण्याचीही शक्यता आहे. मागील वर्षीचे बजेट खर्च करण्यासाठी केवळ दोन महिने उरले असतानाही आतापर्यंत एकूण 33 हजार 514 कोटींच्या बजेटपैकी केवळ 25 टक्के रक्कमच खर्च झालेली आहे.
महापालिकेच्या यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा प्रभाव असू शकतो.
* मेक इन इंडिया योजनेसाठी भरीव तरतूद
* स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रकल्पांना प्राधान्य मिळण्याचे संकेत
* कोस्टल रोड
12 हजार कोटींचा हा प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी यंदा भरीव तरतुद होण्याची शक्यता आहे. पर्यावरण खात्याच्या परवानग्यांमुळे कोस्टल रोड रखडला, आता परवानगी मिळाली त्यामुळे तरतूद वाढणार
* गोरेगाव–मुलुंड लिंक रोड या 1300 कोटींच्या प्रोजेक्टसाठी भरीव तरतूद
पाणीपुरवठ्याच्या गारगाई पिंजाळ प्रोजेक्टला प्राधान्य, स्वच्छ भारत अभियानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य
गेल्या वर्षीच्या बजेटमधील हे प्रकल्प कागदावरच राहिले—
गोरेगाव-जोगेश्वरी उड्डाणपुलांसह 14 उड्डाणपुलांचे प्रकल्प
वाहनांच्या वाढत्या संख्येसाठीची वाहनतळ योजना
रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे प्रकल्प
मराठी शाळांसाठी असलेल्या योजना फसल्या
डम्पिंग ग्राऊंडवर वीजनिर्मितीच्या योजनेची आखणी, मात्र वीजनिर्मिती झालीच नाही
====================================================================
भारतीय हॉकी टीमचा कर्णधार सरदार सिंहवर बलात्काराचा गुन्हा दाखल
लुधियाना (पंजाब): भारतीय हॉकी टीमचा कर्णधार सरदार सिंहवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुधियानातल्या कुंबकला पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सरदार सिंहनं लग्नाचं आमिष देऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं लावला आहे. विशेष म्हणजे पीडित तरुणीनं गेल्या वर्षी तिच्या ट्विवटर अकांऊंटवरुन सरदार सिंहसोबत लग्न ठरलं असून लग्नाची तारीखही ठरल्याचं जाहीर केलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, सरदार सिंह आणि पीडित महिला मागील अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. पीडित तरुणी आणि सरदार सिंह यांची 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर दोघं एकत्र राहत होते. दरम्यान, या प्रकरणी सरदार सिंहकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
====================================================================
पाठ फिरवू नका, प्रयत्न करणं थांबवू नका: सचिन तेंडुलकर
अमरावती: ‘आयुष्यात कितीही मोठं झालात तरी, चांगला माणूस व्हायचा प्रयत्न कायम केला पाहिजे. तुमचं लक्ष्य तुमच्यासमोर असतं तुम्ही खूप प्रयत्नही करता, पण ऐनवेळी आपण पाठ फिरवतो. त्यामुळं शेवटपर्यंत पाठ फिरवू नका, प्रयत्न करणं थांबवू नका.’, असा मोलाचा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विद्यार्थ्यांना दिला. तो अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलत होता.
‘शाळेतील मित्र हे तुमचे खरे मित्र असतात आणि हेच मित्र तुमची गुंतवणूक असतात. आयुष्यात आपण कितीही मोठे झालो तरी मनुष्यधर्म सोडता कामा नये. कारण सर्वच गोष्टी या आपल्या सोबत कायम राहत नाही. राहतो तो फक्त आपला स्वभाव. त्यामुळं चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा’ असंही सचिन म्हणाला.
अमरावतीतल्या दर्यापूरमध्ये प्रबोधन विद्यालयात झालेल्या सत्कार समारंभात सचिननं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली. ‘सतत अपयश आलं तरी प्रयत्न सोडू नका’ असाही सल्ला सचिननं विद्यार्थ्यांना दिला.
====================================================================
आजपासून ऑटो एक्सपोला सुरुवात, नवनव्या कारचे मॉडेल पेश होणार!
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये आजपासून 13व्या ऑटो एक्सपोला सुरुवात होत आहे. त्यामुळे कार आणि बाईक प्रेमींसाठी ही एक खास पर्वणीच आहे.
ऑटो एक्स्पो हे आज आणि उद्या मीडिया आणि व्यासायिकांसाठी सुरु असणार आहे. तर सामान्य नागरिकांसाठी हे प्रदर्शन 5 ते 9 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
या प्रदर्शनात 80 हून अधिक नवे मॉडेल पेश करण्यात येणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कार आणि बाईक या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. ऑटो एक्सपोमध्ये मारुती, हु्युदांई, मर्सडीज आणि बीएमडब्ल्यूसह देश विदेशातील अनेक ऑटोमोबाइल कंपन्या सहभागी होणार आहेत.
सामान्य दिवशी याचं प्रवेश शुल्क 300 रुपये असेल तर शनिवार रविवारी यासाठी 400 रुपये मोजावे लागतील. ऑटो एक्सपो दर दोन वर्षांनी आयोजित केलं जातं.
====================================================================
शाहरुखचा काजोलला चुकून लीप किस, व्हिडिओ व्हायरल
मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘दिलवाले’ सिनेमा डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. मात्र, आता या सिनेमातील एका गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ भलताच व्हायरल होतो आहे.
‘दिलवाले’च्या शूटिंगदरम्यान, शाहरुखने अभिनेत्री काजोलला चुकून लिप किस केलं आहे. त्याचाच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘टुकुर टुकुर’ या गाण्याचा हा मेकिंग व्हिडिओ आहे.
दिलवाले सिनेमात टुकुर टुकर गाण्यामध्ये शाहरुख काजोलच्या गालावर किस करताना दाखविण्यात आलं आहे. पण जेव्हा या गाण्याचं शुटींग सुरु होत त्यावेळेस काजोलनं आपला चेहरा चुकून शाहरुखच्या दिशेनं केला. त्यावेळेस शाहरुखनं चुकून तिला लीप किस केलं. या प्रकारानंतर शाहरुखनं काजोलची माफीही मागितली.
====================================================================
मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर टँकर उलटून वाहतूक कोंडी
मुंबई : मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मीरा रोड-भाईंदरजवळ टँकर उलटल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या आहेत.घोडबंदर रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या जंक्शनवर असलेल्या फाऊण्टन हॉटेलजवळ टँकर उलटला आहे. त्यामुळे तासाभरापासून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मुंबईकडे येणारी आणि वसईकडे जाणारी अशी दोन्ही दिशेची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे कार्यालयाच्या दिशेने जाणारे अनेक जण अडकून पडले आहेत.
====================================================================
नागपुरातील युग चांडकच्या मारेकऱ्यांना आज शिक्षा सुनावणार
नागपूर : नागपुरातल्या युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आज मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ शिक्षा सुनावणार आहे. 30 जानेवारीला राजेश डावरे आणि अरविंद सिंग या दोन्ही आरोपींना अपहरण आणि हत्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. या निर्णयाकडे युगच्या कुटुंबीयांप्रमाणेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शाळेतून परतलेल्या युगचं अपहरण
एक सप्टेंबर 2014 रोजी युगचे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापरू नगर भागातील गुरु वंदन अपार्टमेंट समोरून अपहरण करण्यात आले होते. युगचे वडील मुकेश चांडक हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. युग शाळेतून परतला आणि आपल्या राहत्या गुरुवंदन अपार्टमेंटमधील वॉचमेनकडेच आपली बेग ठेऊन, लगेच बाहेर धावत गेला.
इमारतीच्यासमोर एका दुचाकीवर दोघे जण उभे होते. त्यांच्यासोबत युग काही क्षण बोलला आणि त्यानंतर त्यांच्याच सोबत दुचाकीवर बसून निघून गेला. उशिरापर्यंत तो न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले.
दरम्यान, ज्या पद्धतीने युग शांततेने दोन्ही अपहरणकर्त्यांसह गेला होता, त्याचा विचार करता कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे नागपूर पोलिसांची अनेक पथक नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात युगचा शोध घेत होती.
चिमुकल्या युगचा मृतदेह
या घटनेनंतर सर्वत्र नाकेबंदीही करण्यात आली होती, मात्र तरीही युगचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर 2 सप्टेंबर 2014 रोजी संध्याकाळी नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर लोणखैरी गावाजवळ एका निर्जनस्थळी पुलाच्या खाली पाईपमध्ये युगचा मृतदेह सापडला. अपहरणाची घटना समोर आल्यापासूनच पोलिसांनी अनेक संशयितांना पकडून चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं होतं.
राजेश डावरे आणि अरविंद सिंग अशी या दोघांची नावं होती. यातील धक्कादायक बाब म्हणजे राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात अकाऊंटटण्ट म्हणून कामाला होता. मात्र त्याने अकाऊंट्समध्ये काही घोळ केल्याने काही दिवसांपूर्वी त्याला डॉ. चांडक यांनी कामावरून काढले होते. त्याचा राग मनात ठेवून त्याने युगचे अपहरण केल्याचा आरोप होता.
राजेशने पैशासाठी किंवा डॉ मुकेश चांडक यांच्यावरील जुन्या रागामुळे 8 वर्षीय युगचे अपहरण करून त्याची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
====================================================================
भुजबळांच्या ‘या’ व्हॉट्सअॅप डीपीवरुन चर्चांना उधाण
मुंबई : ईडीच्या अटकेत असलेल्या समीर भुजबळांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याआधी त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली. भुजबळांच्या समर्थकांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.
समीर भुजबळांच्या अटकेनंतर छगन भुजबळांनी आपला व्हॉट्सअॅप डीपी बदलला आहे. पाठीत खंजीर खुपसतानाचा डीपी त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवला आहे. त्यामुळे भुजबळांच्या पाठीत खंजीर नेमका कुणी खुपसला, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि त्यातून मिळालेली बेहिशोबी मालमत्ता याप्रकरणी काल ईडीनं समीर भुजबळांना अटक केली आहे.
====================================================================
मुंबईचा श्वास घुसमटताना ‘पर्यावरणदादा’ कुठे होते? शेलारांचा रामदास कदमांवर घणाघात
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक जशी-जशी जवळ येते आहे, तसे शिवसेना आणि भाजपमधले वाद शिगेला पोहोचत आहेत. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांना आपल्याकडे वळवण्यात भाजपनं प्रयत्न सुरु केला आहे. कोकणी मतदारांसाठी घेतलेल्या अभिनंदन मेळाव्यात आशिष शेलारांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
कोकणी माणसाच्या मनात आपचा मित्रपक्ष गैरसमज पसरवत असून भाजपनंच कोकणी माणसासाठी काम केल्याचं शेलारांनी म्हटलं आहे. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदमांवरही शेलारांनी सडकून टीका केली.
…तेव्हा ‘पर्यावरण दादा’ कुठे होते?
मुंबईचा श्वास घुसमटत होता, तेव्हा पर्यावणमंत्री असणारे दादा कुठे गेले होते? असा सवाल करत आशिष शेलारांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. स्वतकडे असणाऱ्या खात्याचं काम अप्रमाणिकपणे करणारे दादा आमच्याकडे नाहीत, असं म्हणत शेलारांनी नाव न घेता रामदास कदम यांना लक्ष्य केलं.
“युवानेत्याला शिववडा नको, नाईट लाईफ हवीय”
आशिष शेलारांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “युवानेत्याला शिववडा नको आहे, त्यांना नाईट लाईफ हवी आहे.”, असं म्हणत आशिष शेलारांनी थेट अदित्य ठाकरेंना टीकेचं लक्ष्य केलं.
शिवाय महापालिकेतील नगरसेवकांच्या अंदमान दौऱ्यावरुनही शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकरमंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह कोकणातील भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी म्हणजे हा मेळावा आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी हा मेळावा आहे.”, असे भाजपचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे खऱ्या अर्थानं आतापासूनच मुंबई पालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.
====================================================================
खासगी वाहतुकीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार, 15 फेब्रुवारीला लाक्षणिक संप
मुंबई : येत्या 15 फेब्रवारी रोजी मुंबईतल्या रिक्षाचालकांना बंद पुकारला आहे. या बंदमध्ये हजारो रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. ऑटोरिक्षा आणि टॅक्सीमेन्स युनियनं हा बंद पुकारला आहे.
रिक्षाचालकांच्या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. ओला आणि उबेरसारख्या खासगी वाहतुकीवर बंदी आणण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.
आंदोलनाच्या दिवशी हजारोंच्या संख्येनं रिक्षाचालक बांद्रा येथील परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या बंदमध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधीलही हजारो रिक्षाचालक सहभागी होणार आहेत.
====================================================================
अर्चना रामसुंदरम 'सशस्त्र सीमा दला'च्या प्रमुख
नवी दिल्ली : सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या प्रमुख होणाऱ्या अर्चना रामसुंदरम या देशातील पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत.
अर्चना रामसुंदरम या 1980च्या तामिळनाडू कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.
सशस्त्र सीमा दल हे भूतान आणि नेपाळच्या सीमेवर तैनात आहे. शिवाय छत्तीसगड आणि बिहारमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत मदतही करतं.
देशातील पाच निमलष्करी दल
देशात पाच निमलष्करी दल आहेत. यामध्ये सशस्त्र सीमा दल (एसएसबी), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दर (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि भारत-तिबेट सीमा सुरक्षा पोलिस (आयटीबीपी) चा समावेश आहे. पण यापैकी कोणत्याही दलाची प्रमुख महिला नव्हती.
सीबीआयमधील नियुक्तीवर वाद
अर्चना रामसुंदरम यांची सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. परंतु त्यांच्या नियुक्तीवर प्रचंड वाद झाला होता. तामिळनाडू कॅडरमधून रिलीव्ह होण्यापूर्वीच त्यांनी सीबीआयचं अतिरिक्त संचालकपद स्वीकारलं. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. या बदलीमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने न्यायालयाने त्यांना पदभार स्वीकारण्यास मज्जाव केला. यानंतर अर्चना रामसुंदरम यांची राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या संचालकपदी निवड करण्यात आली.
====================================================================
मागासवर्गीय नेता आहे म्हणून माझा बळी दिला जातोय -भुजबळ
मी झुंझार नेता आहे. मागासवर्गीयांसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून देशभरात काम करतोय. त्यामुळं माझे शत्रू मला संपवण्यास पुढे सरसावले आहे. माझा नाहक बळी दिला जात आहे असा राजकीय बचाव राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने छगन भुजबळ यांच्याभोवती फास आवळण्यास सुरुवात केलीये. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांना चौकशीनंतर अटक करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडालीय. समीर भुजबळ आता 8 दिवस ईडीच्या कोठडीत असणार आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्ष भुजबळांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं. पण, आता खुद्द भुजबळ अमेरिकेतून आपला बचाव करण्यास मैदानात उतरले आहे.
====================================================================
12 डब्यांच्या लोकलसाठी हार्बर लाईनवर आजपासून विशेष ब्लॉक
मुंबई – 03 फेब्रुवारी : मुंबईमध्ये हार्बर लाईननं प्रवास करणार्यांसाठी दिलाशाची बातमी आहे. हा भाग मोठ्या वर्दळीचा आहे. मात्र, या लाईनवर अजूनही 9 डब्यांच्या गाड्या चालवल्या जातात. या गाड्या 12 डब्यांच्या कराव्यात अशी गेल्या कित्येक वर्षांपासूनची इथल्या प्रवाशांची मागणी आहे. आता ही मागणी पूर्ण होण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल पडतंय. त्यासाठी सीएसटीवर एकूण 72 तासांचा जंबो ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक सलग नसणार आहे, तर आज रात्रीपासून 9 दिवसांसाठी 3 तास ब्लॉक घेण्यात येईल. सीएसटी स्टेशनजवळ हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल पूर्ण तर काही अंशत: रद्द होणार आहेत.
या गाड्या रद्द होणार
- सीएसटी-अंधेरी – पहाटे 4.27 वा
– सीएसटी-वांद्रे – पहाटे 4.52 वा.
– वांद्रे-सीएसटी – पहाटे 4.30 वा.
– अंधेरी-सीएसटी – पहाटे 5.17 वा.
– सीएसटी-वांद्रे – पहाटे 4.52 वा.
– वांद्रे-सीएसटी – पहाटे 4.30 वा.
– अंधेरी-सीएसटी – पहाटे 5.17 वा.
या गाड्या अंशत: रद्द होणार
- पनवेल-सीएसटी (रात्री 11.47 वा. वडाळा ते सीएसटी यांदरम्यान खंडित)
– सीएसटी-पनवेल (पहाटे 4.23 वा. सीएसटी ते जुईनगर यांदरम्यान खंडित)
– सीएसटी-पनवेल (पहाटे 4.23 वा. सीएसटी ते जुईनगर यांदरम्यान खंडित)
====================================================================
‘त्या’ जुळ्या बहिणींच्या राहिल्या आता आठवणी
पुण्यातल्या जूना तोफखाना परिसरात जमलेली ही गर्दी आहे. मुमताज अन्सारी यांच्या राफिया आणि साफिया या जुळया मुलींच्या अंत्ययात्रेसाठी…मुरुड दुर्घटनेत सर्वात आधी ह्या दोन जुळया बहिणींना समुद्रानं गिळंकृत केलं. अंसारी कुटुंबावर तर काळानं घाला घातला आहेच…पण त्यांच्यासोबत दररोज कॉलेजमध्ये शिकणार्या मैत्रिणींना मात्र त्या आपल्यासोबत नाहीत, ही कल्पना मुळी सहन होत नाहीये.
कॉलेजच्या सहलीसाठी जेव्हा मुलं जातात, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणी घ्यायची ? अंसारी जुळ्या बहिणींचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, याची माहिती केवळ प्रसार माध्यमांमधूनच त्यांना ही दुदैर्वी माहिती मिळाली. पण कॉलेजनं त्यांना साधं कळवण्याची तसदीही घेतली नाही, असा त्यांनी आरोप केला आहे. पण कॉलेजच्या शिक्षकांनी त्यांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव केला होता. तरीही मुलं समुद्रात गेली. त्यामुळं या घटनेला मुलंच जबाबदार आहेत, असा दावा कॉलेजच्या विश्वस्तांनी केला आहे.
====================================================================
लैंगिक संबंधातून अमेरिकेत आला झिका व्हायरस
अमेरिकेतील टेक्सास प्रांतात झिका व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. डास चावल्यामुळे रुग्णाला झिका व्हायरसची लागण झालेली नसून, लैंगिक संबंधातून झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती टेक्सासच्या स्थानिक आरोग्य अधिका-यांनी दिली.
झिका व्हायरसचा गंभीर धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने आधीच आंतरराष्ट्रीय पब्लिक हेल्थ इमरजन्सी जाहीर केली आहे. झिका व्हायरसने बाधित असलेला संबंधित रुग्ण वेनेझुएला इथे गेला होता तिथून लैंगिक संबंधातून या रोगाची लागण झाली. या रुग्णाने दक्षिण अमेरिकन देशांमध्ये प्रवास केलेला नाही अशी माहिती अमेरिकन आरोग्य अधिका-यांनी दिली.
टेक्सासमध्ये डासांच्या चावण्यामधून हा रोग आलेला नाही असे अधिका-यांनी सांगितले. गर्भवती स्त्रियांना सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण झिका व्हायरसमुळे गर्भात असलेल्या मुलाच्या मेंदूवर परिणाम होते. झिका व्हायरसमुळे ब्राझीलमध्ये ऑक्टोंबरपासून अनेक सदोष मुले जन्माला आली आहेत. लॅटिन अमेरिकेत हा रोग वेगाने पसरत असून, अफ्रिका आणि आशिया खंडालाही या आजारापासून धोका आहे.
====================================================================
मला विमान विकत घेण्याची इच्छा, पण पैसा नाही - शाहरुख खान
बॉलिवुडचा बादशहा शाहरुख खान आजच्या घडीला इंडस्ट्रीतला सर्वाधिक कमाई करणारा, मानधन घेणारा कलाकार आहे. त्याच्याकडे स्वत:च्या मालकीचा आयपीएलमधला एक संघ आहे, बांद्रयातील मन्नत बंगला पाहिल्यानंतर त्याच्या ऐश्वर्याची प्रचिती येते. मात्र इतका पैसा असूनही अशा काही गोष्टी आहेत कि, ज्या शाहरुख विकत घेऊ शकत नाही.
मला स्वत:च्या मालकीचे विमान विकत घेण्याची इच्छा आहे मात्र माझ्याकडे तितका पैसा नाही. मी माझा सर्व पैसा चित्रपटांमध्ये लावतो. कामचा प्रचंड व्याप असल्यामुळे मला स्वत:च्या खासगी प्लेनमधून फिरण्याची इच्छा आहे. पण माझ्याकडे तितका पैसा नसल्यामुळे मी विमान विकत घेऊ शकत नाही.
एकदिवस नक्की माझ्या मालकीचे विमान असेल. माझ्यासमोर नेहमीच विमान विकत घेण्याचा आणि चित्रपट बनवण्याचा पर्याय असतो पण मी चित्रपटांची निवड करतो असे शाहरुखने सांगितले. ५० वर्षाचा शाहरुख मागच्या दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे.
===================================================================
‘अॅपल’ला ‘गुगल’चा हिसका!
जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचा मान ‘अल्फाबेट’ला! अल्फाबेट या गुगलच्या छत्राखालील कंपनीने जगातील सर्वात मौल्यवान कंपनी हा अॅपलचा मान हिसकावून घेतला आहे. अल्फाबेटच्या शेअर्सचे मूल्य हे जास्त असल्याने या कंपनीची आर्थिक ताकद वाढली आहे. व्यापार घडामोडींशी निगडित असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्फाबेटच्या शेअर्सचे एकूण बाजार मूल्य ५३०.१ अब्ज डॉलर्स आहे तर अॅपलच्या शेअर्सचे एकूण बाजार मूल्य ५३४.७ अब्ज डॉलर्स आहे. अल्फाबेटच्या शेअर्सचे मूल्य हे प्रत्येकी ७९१ डॉलर्स आहे. नॅसडॅक या न्यूयॉर्कमधील शेअर बाजारातील तिची आगेकूच कायम राहिली तर अल्फाबेट बाजारमूल्याच्या दृष्टिकोनातून अॅपलला खऱ्या अर्थाने मागे टाकेल. अल्फाबेटला तिमाहीत पाच टक्के जास्त नफा झाला असून ऑनलाइन जाहिरातीतून त्यांना ४.९२ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. सुटीच्या काळात इंटरनेटवर जे सर्च झाले आहे, त्यातून त्यांना हा महसूल मिळाला. शॉपिंग मोमेंटचे रूपांतर आता शॉपिंग मॅरॅथॉनमध्ये झाले आहे, असे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले. गुगलचा जाहिरातींचा महसूल वाढत असून तो मोबाइल व डेस्क टॉपवरील सर्चचा परिणाम आहे, असे अल्फाबेटचे मुख्य वित्त अधिकारी रूथ पॉरट यांनी सांगितले. गेल्या वर्षी शेवटच्या तीन महिन्यांत २१.३ अब्ज डॉलर्सचा महसूल कमावून गुगलने मोठी कामगिरी केली होती. चौथ्या तिमाहीत मोबाइलवर जाहिरातींचे सर्च, यू-टय़ूब जाहिराती यावर कंपनीने बाजी मारली आहे. यू-टय़ूबवर लाखो लोक तासनतास व्हिडिओ बघतात त्याचा फायदा गुगलला झाला आहे. अल्फाबेट कंपनी गुंतवणूकदारांसाठी कारभारात अधिक पारदर्शकता आणणार आहे. कारण गुगल आतबट्टय़ाच्या प्रकल्पात गुंतवणूक करीत असल्याची गुंतवणूकदारांना भीती आहे.
===================================================================
पंख्यामुळे मोटरमन व महिला प्रवाशांत खडाजंगी
लोहमार्ग पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण निवळले; मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मंगळवार सकाळची घटना कसाऱ्याहून निघालेल्या एका गाडीतील महिलांच्या डब्यातील पंख्यातील बिघाडाचे पर्यवसान या डब्यातील महिला व गाडीचा मोटरमन यांच्या भांडणात झाले. या भांडणात मोटरमन लॉबीतील इतर मोटरमेननी सहभाग घेतल्यानंतर या बाचाबाचीने गंभीर वळण घेतले. अखेर हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी या उभय पक्षांमध्ये समेट घडवून आणला. मात्र हे भांडण चालू असताना मोटरमननी ‘काम बंद आंदोलन’ करण्याची भाषा केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या सकाळच्या एका जलद गाडीतील महिला डब्यातील एक पंखा प्रचंड आवाज करत फिरत होता. हा पंखा भयानकरीत्या हलत असल्याने या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या मनात भीती होती. त्यांनी डब्यातील बटणांद्वारे तो बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. अखेर त्यांनी १३८ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केल्यावर कल्याण स्थानकात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी चिकटपट्टीच्या साहाय्याने हा पंखा चिकटवला. दरम्यान, गाडीतील महिला उतरणाऱ्या महिलांना ‘मोटरमनला पंखे बंद करण्यास सांगा,’ असे सांगत होत्या, पण या महिला प्रवासी मोटरमन केबिनकडे जाईपर्यंत गाडी सुटत होती. अखेर गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचल्यावर या डब्यातील सरोज देशपांडे यांनी मोटरमनला जाब विचारला. मात्र मोटरमनने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने देशपांडे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या महिलांचा पारा चढला. त्यांनी मोटरमनला त्याचे नाव विचारले असता त्याने नाव सांगण्यास नकार दिला. त्या वेळी देशपांडे यांनी या मोटरमनचे छायाचित्र काढले. इतर मोटरमनही येथे आल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. काही महिला प्रवाशांच्या म्हणण्याप्रमाणे मोटरमननी महिलांना धक्काबुक्की करीत ‘काम बंद आंदोलन’ करण्याची भाषा केली. हे प्रकरण अखेर लोहमार्ग पोलिसांकडे गेले. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. मात्र या उभय पक्षांत समेट घडवून देत तक्रार न नोंदवता या प्रकरणाची नोंद करून घेतली.
===================================================================
===================================================================
No comments:
Post a Comment