[अंतरराष्ट्रीय]
१- स्फोटके बनविण्यासाठी इसीसला भारतातून मदत
२- इसिसकडून झुकेरबर्ग, डोर्सी यांना धमकी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- रेल्वे बजेट; यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर
४- मिशन 2020: पाहिजे तेव्हा मिळणार रेल्वे कन्फर्म तिकीट
५- येत्या पाच वर्षांत 8.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट्य - सुरेश प्रभू
६- देशाची लाईफलाईन असलेली रेल्वे भाजपाच्या काळात ट्रॅकवरून घसरली - लालू प्रसाद यादव
७- रेल्वे अर्थसंकल्प दूरगामी आणि सकारात्मक परिणाम करणारा- नरेंद्र मोदी
८- रेल्वे अर्थसंकल्प कधी सादर झाला हे समजलेच नाही, शशी थरूर यांचा खोचक टोला
९- आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही आता रेल्वेची धडधड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- चर्चगेट-विरार, सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग
११- जेव्हा बाळासाहेबांनी संजय दत्तला जादू की झप्पी दिली होती...
१२- मी अतिरेकी नाही, माझा तसा उल्लेख करु नका : संजय दत्त
१३- चिदंबरम यांच्याकडून हुतात्म्यांचा अपमान:भाजप
१४- चिदंबरम् यांच्याकडून न्यायालयाचा अवमान- सेना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- WWE फाईटदरम्यान द ग्रेट खली घायाळ, प्रकृती गंभीर असल्यानं आयसीयूत
१६- सुटकेचा मार्ग सोपा नव्हता : संजय दत्त
१७- आग्रामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची हत्या
१८- जळगाव; जैन समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांचे निधन
१९- बारामुल्ला; जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी ताब्यात
२०- बोधन- मुखेड -लातुर रोड रेल्वे सर्वेक्षण मंजूर
२१- अंबरनाथ : येथील महालक्ष्मीनगर परिसरातील शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग
२२- नांदेड - काळवा येथे विहिरचं खोदकाम करतांना जिलेटिनचा स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी
२३- पालघर - कासा बुद्रुक येथिल जिल्हा परिषेदेच्या विद्यार्थांना विषबाधा
२४- पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांची निवड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- 15 मिनिटांत फुल चार्जिंग, ओपोचा नवा स्मार्टफोन लाँच
२६- कोल्हापूरच्या अनुजाची पुन्हा अष्टपैलू खेळी, भारताचा विजय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुख: भोगणारा भविष्यात सुखी होऊ शकतो..
पण दुख: देणारा कधीही सुखी राहू शकत नाही
(हृतिक देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
===========================================

रेल्वे अर्थसंकल्प दूरगामी आणि सकारात्मक परिणाम करणारा- नरेंद्र मोदी
रेल्वे अर्थसंकल्प कधी सादर झाला हे समजलेच नाही, शशी थरूर यांचा खोचक टोला
मागील वर्षांच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात गुंतवणूक केली जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
"सर्व रेल्वे प्रकल्पांना योग्य आर्थिक साह्य मिळेल याची तरतूद झाली आहे. त्यामुळे हे प्रकल्प येत्या 3-4 वर्षात पुर्ण होतील. तसेच आम्ही संस्थागत निधीची नवी तरतूद केली आहे. त्याअंतर्गत भारतीय आयुर्विमा मंडळाने रेल्वे विभागात 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे", असेही ते म्हणाले.
===========================================
आग्रामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची हत्या
===========================================
जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी ताब्यात
बारामुल्ला - लष्कर आणि पोलीसांच्या संयुक्त मोहिमेत आज (गुरूवार) जम्मू आणि काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या (जेईएम) एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश मिळाले आहे.
ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद सादीक गुज्जर (वय 17) असून तो पाकिस्तानमधील सियालकोट शहरातील निवासी आहे. तीन महिन्यांपूर्वी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्यात मोहम्मद सादीकचा सहभाग होता. त्याचे तीन साथीदार हुसैन, मलिक आणि रिझवान लष्करासोबत सोबत झालेल्या चकमकीत ठार झाले होते. पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी लष्कराच्या कोणत्याही तळावर फियादीन हल्ला करण्याचा कट रचला होता. हल्ल्यादरम्यान मोहम्मद सादीकला त्याच्या इतर साथीदारांनी लष्कराच्या तळावरील इंधनाच्या साठ्याला आग लावून काही वाहने जाळण्याचे आदेश दिले. तसेच त्यानंतर कुपवाडा येथे जाण्यास सांगितले. ‘हल्ल्यानंतर मला कुपवाडा येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर तीन दिवसांनी मी तांगधर येथून माझ्या हत्यारांसह एका सुमोमधून कुपवाडा येथे पोचलो. तेथून बारामुल्ला येथे जाण्यासाठी मी काही लोकांशी मैत्री केली.‘ अशी माहिती मोहम्मद सादीकने दिली आहे. त्याने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून तीन महिन्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही सांगितले.
===========================================
चिदंबरम यांच्याकडून हुतात्म्यांचा अपमान:भाजप
नवी दिल्ली - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेला दहशतवादी अफजल गुरु याच्याबद्दल केलेल्या विधानावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज (गुरुवार) सडकून टीका केली.
‘‘चिदंबरम यांचे विधान दुदैवी असून; ते संसदेचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेले हुतात्मा व
न्यायव्यवस्थेचाही अपमान करणारे असल्याची,‘ प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी व्यक्त केली. याआधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) सरकारच्या काळात गुरु याचा दयाअर्ज फेटाळण्यात आला होता. चिदंबरम हे यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते. अफजल गुरूचा हल्ल्यामध्ये सहभाग होता का याबद्दल शंका असल्याचे मत चिदंबरम् यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘मला प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की अफझल गुरूच्या प्रकरणामध्ये कदाचित योग्य निर्णय दिलेला नसेल‘.
===========================================
जळगाव; जैन समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांचे निधन
जळगाव : जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल जैन (79) यांचे मुंबई येथील जसलोक रूग्णालयात निधन झाले. गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या जसलोक रूग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी चार वाजून सात मिनीटांनी अखेरचा श्वास घेतला.
===========================================
चिदंबरम् यांच्याकडून न्यायालयाचा अवमान- सेना

मुंबई - अफझल गुरूबद्दल वक्तव्य करून माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम् यांनी न्यायालयाचा अवमान केल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना चिदंबरम् यांनी भारताच्या संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरूचा हल्ल्यामध्ये सहभाग होता का याबद्दल शंका असल्याचे वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, ‘कोण हे चिदंबरम्? ते न्यायालयाला आव्हान आहेत का? फाशीची शिक्षा ही कायद्याने आणि सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार झालेली आहे. चिदंबरम् यांच्या बोलण्याने न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाई करायला हवी‘ तसेच कॉंग्रेस सातत्याने दहशतवाद्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.
दरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्विनी कुमार म्हणाले, ‘मला असे वाटते की सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वात मोठे न्यायालय आहे. त्यांचे निर्णय योग्य असून ते घटनेनुसार असतात.‘
===========================================
स्फोटके बनविण्यासाठी इसीसला भारतातून मदत
अंकारा - इसीस या दहशतवादी संघटनेला स्फोटके तयार करण्यासाठी आवश्यक ते साहित्य पुरविणाऱ्या जगभरातील 20 देशांच्या यादीत भारताचेही नाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युरोपियन युनियन केलेल्या एका अभ्यासात ही बाब आढळून आली आहे. अमेरिका, तुर्कस्तान, ब्राझील, भारत या देशातील एकूण 51 कंपन्यांनी इसीसला स्फोटके बनविण्यासाठी आवश्यक ती सामुग्री पुरविली आहे. तब्बल वीस महिने करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. स्फोटके तयार करण्यासाठी 700 विविध प्रकारची सामुग्री या कंपन्यांनी पुरविली आहे. या कंपन्यांमध्ये तुर्कस्तानमधील सर्वाधिक 13 तर त्यानंतर भारतातील सात कंपन्यांचा समावेश आहे. इसीसने या सर्व सामुग्रीचा वापर करून व्यावसायिक पद्धतीने स्फोटके तयार केल्याचेही आढळून आले आहे.
===========================================
इसिसकडून झुकेरबर्ग, डोर्सी यांना धमकी

वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटेनेने मार्क झुकेरबर्ग व जॅक डोर्सी या फेसबुक व ट्विटर या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. इसिसची फेसबुक व ट्विटरवरील काही अकाऊंट्स नुकतीच बंद करण्यात आली आहे. यामुळे इसिसकडून हा इशारा देण्यात आला आहे.
"इसिसला सहानुभूती दर्शविणारी अकाऊंट्स बंद केली, तर फेसबुक व ट्विटरला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. फेसबुक व ट्विटर बंद करत असलेल्या एका अकाऊंटला प्रत्युत्तर म्हणून इसिसकडून प्रत्येकी 10 अकाऊंट्स बंद पाडण्यात येतील आणि अंतिमत: ही दोन्ही संकेतस्थळे पूर्णत: बंद पाडण्यात येतील, असे "सन्स खिलाफत आर्मी‘ या इसिसमधील हॅकर्सच्या तुकडीने म्हटले आहे.
फेसबुकवर अद्यापी इसिसची 10 हजारपेक्षा जास्त अकाउंट्स, सुमारे 150 गट (ग्रुप) आणि ट्विटरवर सुमारे 5 हजार अकाऊंट्स असल्याचे इसिसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
===========================================
बोधन- मुखेड -लातुर रोड रेल्वे सर्वेक्षण मंजूर
===========================================
१- स्फोटके बनविण्यासाठी इसीसला भारतातून मदत
२- इसिसकडून झुकेरबर्ग, डोर्सी यांना धमकी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- रेल्वे बजेट; यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर
४- मिशन 2020: पाहिजे तेव्हा मिळणार रेल्वे कन्फर्म तिकीट
५- येत्या पाच वर्षांत 8.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट्य - सुरेश प्रभू
६- देशाची लाईफलाईन असलेली रेल्वे भाजपाच्या काळात ट्रॅकवरून घसरली - लालू प्रसाद यादव
७- रेल्वे अर्थसंकल्प दूरगामी आणि सकारात्मक परिणाम करणारा- नरेंद्र मोदी
८- रेल्वे अर्थसंकल्प कधी सादर झाला हे समजलेच नाही, शशी थरूर यांचा खोचक टोला
९- आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही आता रेल्वेची धडधड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- चर्चगेट-विरार, सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग
११- जेव्हा बाळासाहेबांनी संजय दत्तला जादू की झप्पी दिली होती...
१२- मी अतिरेकी नाही, माझा तसा उल्लेख करु नका : संजय दत्त
१३- चिदंबरम यांच्याकडून हुतात्म्यांचा अपमान:भाजप
१४- चिदंबरम् यांच्याकडून न्यायालयाचा अवमान- सेना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- WWE फाईटदरम्यान द ग्रेट खली घायाळ, प्रकृती गंभीर असल्यानं आयसीयूत
१६- सुटकेचा मार्ग सोपा नव्हता : संजय दत्त
१७- आग्रामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची हत्या
१८- जळगाव; जैन समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांचे निधन
१९- बारामुल्ला; जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी ताब्यात
२०- बोधन- मुखेड -लातुर रोड रेल्वे सर्वेक्षण मंजूर
२१- अंबरनाथ : येथील महालक्ष्मीनगर परिसरातील शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग
२२- नांदेड - काळवा येथे विहिरचं खोदकाम करतांना जिलेटिनचा स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर जखमी
२३- पालघर - कासा बुद्रुक येथिल जिल्हा परिषेदेच्या विद्यार्थांना विषबाधा
२४- पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांची निवड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- 15 मिनिटांत फुल चार्जिंग, ओपोचा नवा स्मार्टफोन लाँच
२६- कोल्हापूरच्या अनुजाची पुन्हा अष्टपैलू खेळी, भारताचा विजय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुख: भोगणारा भविष्यात सुखी होऊ शकतो..
पण दुख: देणारा कधीही सुखी राहू शकत नाही
(हृतिक देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
===========================================
मी अतिरेकी नाही, माझा तसा उल्लेख करु नका : संजय दत्त
मुंबई : ‘मी दहशतवादी नाही. न्यायालयानेही मला दहशतवादी ठरवलेलं नाही. मला आर्म्स अॅक्ट अर्थात शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्याअंतर्गत शिक्षा झाली होती. त्यामुळे या सर्वप्रकरणात माझा उल्लेख करताना 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असा करु नये, असं भावनिक आवाहन संजय दत्तने माध्यमांना केलं. आर्म्स अॅक्ट अंतर्गत साडेतीन वर्षे शिक्षा भोगून मुंबईत परतेलल्या संजय दत्तने आज माध्यमांशी दिलखुलास संवाद साधला. त्याचवेळी आपल्या चिमुकल्या मुलांना आणि कुटुंबीयांना भेटताना त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.
WWE फाईटदरम्यान द ग्रेट खली घायाळ, प्रकृती गंभीर असल्यानं आयसीयूत
हलद्वानी (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील हलद्वानीमध्ये सुरु असलेल्या ‘द ग्रेट खली रिटर्न्स शो’मध्ये पहिल्याच दिवशी द ग्रेट खलीच्या चाहत्यांसाठी दुख:द बातमी समोर आली आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी खली गंभीर जखमी झाला असून त्याला बृजलाल हॉस्पिटलमध्ये आयसीयूत ठेवण्यात आलं आहे.‘द ग्रेट खील’ शोआधी कॅनडाचा रेसलर ब्रूडी स्टीलने खलीला आव्हान देत म्हटलं होतं की, “खलीला रिंगमध्ये पराभवाची धूळ चाखायला लावेन.” आणि दुर्दैवाने असंच काहीसं लढतीदरम्यान झालं.
ब्रूडी स्टीलविरोधात रेसलिंगदरम्यान द ग्रेट खली गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोळ्यांच्या वरील बाजूस लागल्याने मोठ्या प्रमामात रक्तस्त्राव झाल्याची माहिती मिळते आहे. त्यासोबतच खलीची मान, डोकं आणि छातीला गंभीर जखम झाली आहे.
ब्रूडी स्टील आणि खली यांच्यातील लढतीदरम्यान फायटर अपोलो आणि माइक नॉक्स रिंगमध्ये आले. त्या दोघांनीही खलीवर खुर्चीचे वार केले, यामध्ये खली गंभीर जखमी झाला.
खली जखमी झाल्यानंतर उपस्थित भारतीय प्रेक्षकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.
दरम्यान, या लढतीआधी खलीने डेथ वॉरंटवर स्वाक्षरी केल्याचीही माहिती मिळते आहे.
यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर
नवी दिल्ली : मुंबईतील सर्व लहान प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार. तसंच प्रचंड गर्दीचा मार्ग असलेल्या चर्चगेट – विरार आणि सीएसटी – पनवेल मार्गावर उन्नत मार्ग बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.
सुरेश प्रभू यांनी 2016-17 या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केलं. हे त्यांनी मांडलेलं सलग दुसरं बजेट होतं. यावर्षीही रेल्वेमंत्र्यांनी कोणत्याही नव्या लोकप्रिय घोषणा करण्याचं टाळलं. तसंच यंदाही पायाभूत सुविधांवरच भर दिला.
यावर्षीच्या रेल्वे बजेट मध्ये 8720 करोड रुपयांची बचत झाल्याचा दावा रेल्वे मंत्र्यांनी केला. तसंच मेक इन इंडियामार्फत रेल्वेत 40 हजार कोटींची गुंतवणूक होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
चर्चगेट-विरार, सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग
नवी दिल्ली/मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईकरांनी खास गिफ्ट दिलं आहे. प्रचंड गर्दीचा मार्ग असलेल्या चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल मार्गावर उन्नत मार्ग बांधण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.
सुरेश प्रभू यांनी 2016-17 या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केलं. हे त्यांनी मांडलेलं सलग दुसरं बजेट होतं. यावर्षीही रेल्वेमंत्र्यांनी कोणत्याही नव्या लोकप्रिय घोषणा करण्याचं टाळलं. तसंच यंदाही पायाभूत सुविधांवरच भर दिला.
कसा असेल उन्नत मार्ग?
– सीएसटी ते पनवेल असा 48 किलोमीटरचा उन्नत मार्ग असेल.
– एकूण 11 स्टेशन्सवर सीएसटी-पनवेल गाडीला थांबा असेल
– 4.5 ते 5 मिनिटाला एक गाडी याप्रमाणे तासाला 14 गाड्या धावतील
– गाडीचा कमाल वेग हा तासाला 100 किलोमीटर इतका असेल
सीएसटी पनवेल या हार्बर मार्गावरुन सध्या 41 लाख प्रवाशी प्रवास करतात. सिंगल लाईन असलेला हा ट्रॅक कायम प्रवाशांसाठी मनस्ताप देणारा आहे. त्यामुळे एलिव्हेटेड कॉरिडॉर झाला प्रवास सुखकर आणि जलद होण्यास मदत होणार आहे.
15 मिनिटांत फुल चार्जिंग, ओपोचा नवा स्मार्टफोन लाँच
मुंबई: मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2016 मध्ये अनेक नवनवे गॅझेट लाँच होत आहेत. याच इव्हेंटमध्ये मोबाइल कंपनी ओपोनंही आपला दमदार बॅटरी बॅकअप असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीनं दावा केला आहे की, Super VOOC चार्जिंगच्या मदतीनं हा स्मार्टफोन अवघ्या 15 मिनिटात संपूर्ण चार्ज होईल.
या तंत्रज्ञानामध्ये खास अल्गोरिद्मचा वापर करण्यात आल्याचं ओपोनं स्पष्ट केलं. ज्यामुळे हे डिव्हाइसला हाय स्पीड चार्जिंगवर तापमानाला नियंत्रित करेल
ही वेगवान चार्जिंग केवळ त्याच स्मार्टफोनवर काम करेल ज्याची बॅटरी क्षमता 2500 mAh आहे. दुसरी खास गोष्ट म्हणजे नवीन चार्जिंग तंत्रज्ञान फक्त ओपच्या स्मार्टफोनवरच मिळणार आहे. मात्र, ओपोच्या इंजिनिअर्सनं सॅमसंग, क्वॉलकॉमसह अनेक कंपन्यांना चार्जिंगच्या बाबतीत मागे टाकलं आहे.
मिशन 2020: पाहिजे तेव्हा मिळणार रेल्वे कन्फर्म तिकीट
नवी दिल्ली: 2016च्या रेल्वे बजेट मांडताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू संसदेत महत्त्वाची घोषणा केली. ‘पाहिजे तेव्हा प्रवाशांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळेल. अशी सुविधा 2020 पर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न आहे.’ असं म्हणत प्रभूंनी आपलं मिशन 2020 मांडलं.
रेल्वे प्रवासादरम्यान कन्फर्म तिकीट मिळणं हे फारच मोठ दिव्य असतं. चार महिने आधीच रेल्वेचं तिकीट बुक होतं. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अनेकदा गैरसोय होते. अशावेळी अनेकदा कन्फर्म तिकीटाची लालूच दाखवून दलाल प्रवाशांकडून बरेच पैसे उकळतात.
याचप्रमाणे ट्रेन लेट होत असल्यानंही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दोन ते 10 तास उशीरानं धावणाऱ्या रेल्वेंची संख्या बरीच आहे. त्यामुळे याबाबतही लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं प्रभू म्हणाले.
सुटकेचा मार्ग सोपा नव्हता : संजय दत्त
पुणे : अभिनेता संजय दत्त आज कायमचा तुरुंगाबाहेर पडला आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्तची सकाळी साडे आठ वाजच्या सुमारास येरवडा तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. चाहत्यांमुळे मी लवकर तुरुंगाबाहेर पडलो, अशी प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली.
तुरुंगाबाहेर पडताना त्याने फिल्मी स्टाईलनं कारागृहावरच्या तिरंग्याला सलामही केला. यावेळी दिग्दर्शक राजकुमार हिरानी, पत्नी मान्यता तुरुंगाबाहेर हजर होती.
येरवडा जेलमधून सुटल्यानंतर साधारण सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास संजय दत्तचं मुंबई विमानतळावर आगमन झालं. विमानतळावरुन संजय दत्तने थेट दादर गाठलं आणि सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर बडा कब्रस्तानमध्ये जाऊन आई नर्गिस दत्तच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.
जेव्हा बाळासाहेबांनी संजय दत्तला जादू की झप्पी दिली होती...
मुंबई : अभिनेता संजय दत्त अखेर पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगून कायमाचा बाहेर आला आहे. संजय दत्त पुण्याहून मुंबईकडे निघाला आहे. मुंबईत आल्यावर तो सर्वातआधी सिद्धीविनायकाच्या चरणी लीन होणार आहे. त्यानंतर मग बडा कब्रस्तानला जाऊन आईच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेईल. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला शिक्षा झाली होती. मात्र संजय दत्त पहिल्यांदाच जेलमध्ये गेलेला नव्हता. ही शिक्षा भोगण्यापूर्वी तो 1995 मध्येही 18 महिने तुरुंगात होता. त्यावेळी तुरुंगातून सुटल्यानंतर संजय दत्तने थेट ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती.
कोल्हापूरच्या अनुजाची पुन्हा अष्टपैलू खेळी, भारताचा विजय
कोलंबो: कोल्हापूरच्या अनुजा पाटीलनं सलग दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारतीय महिला संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. रांचीमधल्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारतानं श्रीलंकेचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला.
भारतानं या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
या सामन्यात एकता बिश्त आणि पूनम यादवनं प्रत्येकी तीन विकेट्स घेऊन श्रीलंकेला 20 षटकांत आठ बाद 107 असं रोखलं. अनुजा पाटीलनं श्रीलंकेच्या डावात चार षटकं टाकून केवळ सात धावा दिल्या. त्यानंतर तिनं कर्णधार मिताली राजच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी रचून भारताला विजयपथावर नेलं.
अनुजा पाटीलनं 33 चेंडूंत चार चौकारांसह 34 धावांची खेळी उभारली. मिताली राजनं कर्णधारास साजेशी खेळी रचून नाबाद अर्धशतक झळकावलं. तिनं 52 चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद 51 खेळी रचली.
येत्या पाच वर्षांत 8.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट्य - सुरेश प्रभू
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 25 - येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय रेल्वे 8.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असं सांगत भारतीय रेल्वे ही प्रत्येकासाठी गर्वाची बाब ठरेल असा आत्मविश्वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. हे बजेट माझं नसून लोकांचं बजेट असल्याचं सांगत या वर्षामध्ये 1.21 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट प्रभूंनी ठेवलं आहे.सुरेश प्रभूंच्या बजेट सादरीकरणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे:- 1 तास 15 मिनिटं सुरु असलेल्या सुरेश प्रभूंच्या भाषणातील प्रवाशांच्या दृष्टीने निष्कर्षाच्या बाबी - फक्त चार नव्या गाडयांची घोषणा, प्रवासी आणि माल भाडयात कोणतीही वाढ नाही.- अपघातमुक्त रेल्वेसाठी संकल्प - मिशन झीरो अॅक्सिडेंट द्वारा टक्कर रोखणारी यंत्रणा.- दिल्ली रिंग रेल्वेवर आणखी २१ स्टेशन्स- रेल्वेत १.५ लाख कोटी गुंतविण्यास एलआयसी तयार- १७ हजार बायो टाॅयलेट्स उभारणार- ४० टक्के जास्त प्रवासी वाहून नेण्यासाठी वातानुकूलित डबल डेकर रेल्वे- २०१८-१९ पर्यंत रोजगार क्षमता १४ कोटी मनुष्य दिवसापर्यंत वाढवणार- रेल्वे भरतीसाठी आॅन लाइन प्रक्रिया- मिझोरम- त्रिपुरा ब्राॅडगेजने जोडणार- रेल्वे कर्मचा-यांच्या स्टार्ट अप योजनेसाठी 50 कोटींचा निधी बाजूला काढला.- डब्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभ्यास करून सुधारणेवर भर देणार.- काही गाड्यांमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एफएम सुरू करणार.- 130 कि.मी. वेगाने धावणारी तेजस रेल्वे सुरु करणार.- 2020 पर्यंत रेल्वेच्या अंदाजित महसूलात चार हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे.- रेल्वेच्या प्रकल्पांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन व जीपीएस सिस्टीमचा वापर करणार.- 139 या क्रमांकावर फोन करून तिकीट रद्द करता येणार.- विद्युतीकरणामुळे रेल्वेचे 1300 कोटी रुपये वाचणार, ट्रेनच्या सर्व डब्ब्यात जीपीएस सुविधा असणार.- चेन्नईमध्ये देशातील पहिले रेल्वे ऑटो हब उभारणार.- जपान सरकारच्या मदतीने अहमदाबाद-मुंबई दरम्यान हायस्पीड पॅसेंजर कॉरिडोरची उभारणी करणार - सुरेश प्रभू.- रेल्वे तिकीट रद्द करण्याची सेवा अधिक सुलभ.- सीएसटी-पनवेलदरम्यान उन्नत रेल्वेमार्ग. मुंबईतील सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवणार.- गेल्या एका वर्षात ओव्हर ब्रिज व अंडर ब्रिज मिळून 820 पुलांचे काम पूर्ण झाले.92,714 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले 44 नवे प्रकल्प या वर्षी हाती घेणार.- चर्चगेट- विरार एलिव्हेटेड कॉरिडोअरचं लक्ष्य.- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्यया कामाला सुरूवात.- चर्चगेट- विरार एलिव्हेटेड कॉरिडोअरचं लक्ष्य.- रेल्वे स्थानकावरील हमाल आता हमाल नाही, सहाय्यक होणार, त्यांना प्रशिक्षण देणार.- दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र टॉयलेट्सची सोय.- प्रत्येक प्रवर्गामध्ये महिलांसाठी 30 टक्क्यांचे आरक्षण.- कचरा दिसल्यास तातडीने बोगीची स्वच्छता करण्याची मागणी करता येणार.- ट्रेन प्रवासात वीम्याची सुविधा, तीर्थ क्षेत्रासाठी सुरु करणार आस्था एक्सप्रेस.- उत्कृष्ट या डबल डेकर प्रवासी गाडीची घोषणा सुरेश प्रभूंनी केली असून त्यामुळे 40 टक्के जास्त प्रवासी प्रवास करू शकणार.- ऊर्जा वापराची पद्धत बदलून तीन हजार कोटी रुपये वाचवण्याची योजना आहे.- गेल्या एका वर्षात ओव्हर ब्रिज व अंडर ब्रिज मिळून 820 पुलांचे काम पूर्ण झाले.- तान्ह्या बाळांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी आधी बुकिंग केल्यास बेबीफूड आणि चिल्ड्रन्स मेन्यू देणार. मुलांचे डायपर चेंज करण्यासाठी टेबल मिळणार.- 124 खासदारांनी रेल्वे सुधारणा कार्यक्रमासाठी निधी दिला.- श्रीनगरला रेल्वे मार्गाने जोडणार. तिकीटांच्या रांगा कमी करण्याचा प्रयत्न करणार.- कोकण रेल्वे मार्गावर वृद्ध आणि विकलांगासाठी सारथी सेवा सुरु केली, आणखीं काही स्थानकांवर सुरु करणार.- ई-तिकिटं बुक करण्याची क्षमता प्रति मिनिट 2000 वरून 7000 इतकी वाढवण्यात आली आहे.- स्थानकांवर 2500 वॉटर व्हेंडिंग मशीन्स बसवणार.- व्यस्ततम मार्गावर डबल डेकर उदय एक्सप्रेस चालवणार.- महिलांसाठी 24 तास हेल्पलाईन क्रमांक 182 , कोणत्याही क्षणी मिळणार मदत.- भोपाळमधील हबीबगंज रेल्वे स्टेशन देशातलं पहिले मॉडेल स्टेशन बनणार. बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार.- सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुपरफास्ट अंत्योदय एक्सप्रेस चालवणार.- लवकरच बार-कोड तिकिट्स आणणार.- या वर्षी रेल्वेचे महसुली उत्पन्न 1,84,820 कोटी रुपये होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षीचे 18,720 कोटी रुपये शिल्लक आहेत, तर यंदा 1.21 लाख कोटी रुपयांच्या भाडवली खर्चाचे उद्दिष्ट्य.- जगातील पहिले बायोव्हॅक्युम टॉयलेट रेल्वेने विकसित केले आणि बिबरुगड राजधानी एक्सप्रेसमध्ये त्याचा वापर केला.- मेक इन इंडियाअंतर्गत रेल्वेचे दोन कारखाने सुरू होणार. सर्व प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार.- रेल्वेचा कुठलाही अपघात किंवा जिवीतहानीमुळे मला प्रचंड दु:ख होते.- मेक इन इंडियाच्या माध्यमातून रेल्वेमध्ये 40 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट्य.- जनरल बोगीमध्येही मोबाईल चार्जिंगची सुविधा होणार उपलब्ध. 2020 पर्यंत वेटिंग लिस्ट संपुष्टात आणणार.- रेल्वे स्थानकावरील भिंती चित्राच्या माध्यमातून सामाजिक जागृती करण्यात येतेय.- महिला व वृद्धांसाठी लोअर बर्थमध्ये विशेष कोटा.- प्रवासी वाहतुकीवरील दरात देण्यात आलेल्या सवलतीमुळे 30 हजार कोटींचा तोटा.- यंदाच्या वर्षी आम्ही 100 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा सुरु केली, पुढ्च्या दोन वर्षात 400 रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सुविधा देणार.- वाराणसी-नवी दिल्ली नवी रेल्वे सेवा सुरू करणार.- रेल्वे आणि सर्वसामान्य प्रवाशांमध्ये आज कुठलाही अडथळा नाही.- रेल्वेच्या 1600 किमी मार्गाचे विद्युतीकरण झाले, पुढच्यावर्षीपर्यंत 2000 किमी मार्गाचे विद्युतीकरण करण्याची योजना आहे.- बिहारसह पूर्वेकडील राज्यातील लोकांना रोजगार देणार.- मुंबई उपनगरीय रेल्वे रोज 74 लाख प्रवाशांची वाहतूक करते, ही संख्या दिल्ली मेट्रोच्या तिप्पट आहे.- सर्वसामान्य माणसाला डोळयासमोर ठेऊन आम्ही आमच्या योजना आखतो.मुंबई उपनगरीय रेल्वे रोज 74 लाख प्रवाशांची वाहतूक करते, ही संख्या दिल्ली मेट्रोच्या तिप्पट आहे.- सर्वसामान्य माणसाला डोळयासमोर ठेऊन आम्ही आमच्या योजना आखतो.- जालंधर-उधमपूर मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.- रेल्वेच्या कारभारात 100 टक्के पारदर्शकता आणण्याची आमची मोहिम आहे, सोशल मिडीयाची यामध्ये आम्हाला मदत होत आहे.- रेल्वेच्या विद्युतीकरमाच्या खर्चामध्ये यंदा 50 टक्के वाढ करण्यात येणार. असून पुढील वर्षीपर्यंत 20 हजार किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण झालेलं असेल.- 2020 पर्यंत वेटिंग लिस्ट संपुष्टात, 95 टक्के गाड्या वेळेवर धावतील यासाठी आमचे प्रयत्न.- या आर्थिक वर्षात इंधन बचतीच्या माध्यमातून 8720 कोटी रुपये वाचवण्याचे लक्ष्य.- रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी पुढच्या पाचवर्षात 8.5 लाख कोटी रुपये खर्च करणार.- यंदा रेल्वेच्या महसूलात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता.- यंदा आम्हाला 1 लाख 84 हजार कोटींच्या महसूलाची अपेक्षा आहे.- यंदा रेल्वेतील गुंतवणूक दुप्पट होईल.- मागच्यावर्षी रेल्वे अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांपैकी 139 घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली.- जगभरात मंदी असताना रेल्वेच उत्पन्न वाढवून रेल्वे नफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न.- मालवाहतूक दरात वाढ करुन प्रवासी वाहतूकीचा तोटा भरुन काढणार.- या वर्षी 1.21 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च रेल्वे करणार आहे.- गेल्या वर्षातील बचत झालेले 8,720 कोटी रुपये यावर्षी उपयोगात आणण्यात येतील.- भारतीय रेल्वेच्या रूळांची लांबी मोजली तर ती 1.08 लाख किलोमीटर आहे, जी पृथ्वीच्या परीघापेक्षा अडीचपट आहे.- रेल्वे अर्थसंकल्प हे व्यवहाराचं गणित नव्हे तर अपेक्षांचं प्रतीक.- रेल्वेची कर्मचारी संख्या 13,07109 आहे, भारतीय सैन्यदलांतील संख्या 13 लाख आहे. यावरून रेल्वेची व्याप्ती लक्षात येते.- भारतीय रेल्वे स्वच्छ भारत योजनेमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे आणि याचा मला आनंद आहे.- येत्या पाच वर्षांमध्ये रेल्वेमध्ये 8.5 लाख कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट - प्रभू- रेल्वे देशाला जोडण्याचे काम करते, आम्ही थांबणार नाही, झुकणार नाही.- देशाला जोडण्याचं काम रेल्वे करत आहे.- हे बजेट माझं नव्हे तर सर्व देशाचं.
देशाची लाईफलाईन असलेली रेल्वे भाजपाच्या काळात ट्रॅकवरून घसरली - लालू प्रसाद यादव
- पाटणा, दि. २५ - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेले रेल्वे बजेटमध्ये काहीही दम नसल्याचे सांगत भारताची लाईफलाईन असलेली रेल्वे भाजपा सरकारच्या काळात रुळांवरून घसरल्याची टीका माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी केली.सुरेश प्रभू यांनी आज संसदेत बजेट सादर करताना येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय रेल्वे ८.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असं सांगत भारतीय रेल्वे ही प्रत्येकासाठी गर्वाची बाब ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. मात्र या बजेटमधून सर्वसामान्यांना काहीही मिळाले नसल्याची टीका करत विरोधकांनी या बजेटबाबत तीव्र नाराजी दर्शवली.माजी रेल्वेमंत्री असलेले लालूप्रसाद यादव यांनी प्रभूंच्या बजेवर टीकास्त्र सोडले. हे बजेट अतिशय हलके होते, त्यात काहीही दम नाही. आम्ही रेल्वेला जर्सी गाय बनवलं होतं. ही रेल्वे एकेकाळी देशाची लाइफलाईन होती, पण आता भाजपाच्या काळात हीच लाइफलाइन ट्रॅकवरून खाली उतरली आहे, अशी टीका त्यांनी केली.तर या बजेटमध्ये बायोव्हॅक्युम टॉयलेट व्यतिरिक्त काहीही नवीन घोषणा नसून, हे कितपत यशस्वी ठरेल याबद्दल आपण साशंक आहोत, अशी प्रतिक्रिया माजी रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी दिली.
रेल्वे अर्थसंकल्प दूरगामी आणि सकारात्मक परिणाम करणारा- नरेंद्र मोदी
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेत दूरगामी आणि सकारात्मक काम करण्याला मदत करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मला आधीच्या सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पांवर टीका करायची नाही, पण आमच्या सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पामुळे अडीच पटीने गुंतवणूक वाढली असल्याची माहिती देखील मोदींनी यावेळी दिली. स्वच्छता, सुविधा आणि अत्याधुनिकीकरण हा गेल्या दोन रेल्वे अर्थसंकल्पांचा केंद्रबिंदू असून, आम्ही रेल्वे प्रवाशांना उत्तम सेवा देण्यास कटीबद्ध असल्याचेही मोदी पुढे म्हणाले. सर्वसामान्यांसाठी ‘अंत्योदय’ ही विनाआरक्षित रेल्वेगाड्या तसेच ‘हमसफर’, ‘तेजस’ आणि ‘उदय’ या नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेचे मोदींनी स्वागत केले.
===========================================रेल्वे अर्थसंकल्प कधी सादर झाला हे समजलेच नाही, शशी थरूर यांचा खोचक टोला
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प केव्हा सादर केला? हेच आम्हाला समजले नाही. सुरेश प्रभूंनी लोकसभेत आज केलेले भाषण हा जर रेल्वे अर्थसंकल्प असेल तर त्यात काहीच नव्हते, असा खोचक टोला काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी लगावला. तर, सुरेश प्रभूंच्या रेल्वे अर्थसंकल्पातून ‘खोदा पहाड और निकला चूहा’ अशी गत झाल्याची प्रतिक्रिया ‘राजद’चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. रेल्वे ही देशाची लाईफ लाईन होती, पण भाजपच्या राजवटीत रेल्वे पूर्णपणे रुळावरून खाली उतरली असल्याचे लालूप्रसाद म्हणाले. याशिवाय, देशाला बुलेट ट्रेनची गरज नसून, रेल्वेमंत्र्यांनी केवळ वायफळ बडबड केल्याची टीका लालूप्रसाद यांनी केली. सुरेश प्रभू यांनी गेल्यावेळी प्रमाणेच यंदाही कोणत्याही मोठ्या घोषणा न करता रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर भर देणारा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी यावेळी सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचे कौतुक केले. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विचार करता सुरेश प्रभूंनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प दूरदृष्टीपूर्ण असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, तर वास्तववादी उपाय योजना करून रेल्वेची भरभराट कशी होईल यासाठीचे प्रयत्न करून रेल्वे मंत्र्यांनी उत्तम रेल्वे अर्थसंकल्प सादर केल्याची प्रतिक्रिया संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.
===========================================
आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही आता रेल्वेची धडधड
भारतीय रेल्वे खात्याने येत्या आर्थिक वर्षाच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यासाठी विविध मार्गांची निवड केली आहे. प्रामुख्याने ‘ऑफशोअर रुपी बाँड्स‘, संस्थात्मक भागीदारी व शेअर बाजारातून ही तरतूद केली जाणार आहे. आर्थिक वर्ष 2016-17 करिता रेल्वे विभागाने 1.21 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च करण्याचे निश्चित केले आहे.
"सार्वजनिक क्षेत्रातील बँकांप्रमाणे आता रेल्वे विभागदेखील विविध संस्थांसोबत भागीदारी करुन भांडवल उभारण्याची योजना हाती घेत आहे. शिवाय, यासाठी प्रथमच परदेशी बाजारात कर्जरोख्यांची विक्री केली जाणार आहे.मागील वर्षांच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात गुंतवणूक केली जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
"सर्व रेल्वे प्रकल्पांना योग्य आर्थिक साह्य मिळेल याची तरतूद झाली आहे. त्यामुळे हे प्रकल्प येत्या 3-4 वर्षात पुर्ण होतील. तसेच आम्ही संस्थागत निधीची नवी तरतूद केली आहे. त्याअंतर्गत भारतीय आयुर्विमा मंडळाने रेल्वे विभागात 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे", असेही ते म्हणाले.
===========================================
आग्रामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची हत्या
आग्रा- विश्व हिंदू परिषदेच्या (विहींप) नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना आज (गुरुवार) घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण माहूर (वय 40) अशी हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. शहरातील एका युनिटचे ते उपाध्यक्ष होते. एका दुकानाचे उद्घाटन करून ते घरी निघाले होते. मिरा हुसानीजवळ त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, माहूर यांची हत्या झाल्याचे समजल्यानंतर ‘विहींप‘च्या हजारो कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. सर्व रस्ते जाम झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण माहूर (वय 40) अशी हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. शहरातील एका युनिटचे ते उपाध्यक्ष होते. एका दुकानाचे उद्घाटन करून ते घरी निघाले होते. मिरा हुसानीजवळ त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, माहूर यांची हत्या झाल्याचे समजल्यानंतर ‘विहींप‘च्या हजारो कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. सर्व रस्ते जाम झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
जैश-ए-मोहम्मदचा एक दहशतवादी ताब्यात
ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद सादीक गुज्जर (वय 17) असून तो पाकिस्तानमधील सियालकोट शहरातील निवासी आहे. तीन महिन्यांपूर्वी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्यात मोहम्मद सादीकचा सहभाग होता. त्याचे तीन साथीदार हुसैन, मलिक आणि रिझवान लष्करासोबत सोबत झालेल्या चकमकीत ठार झाले होते. पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी लष्कराच्या कोणत्याही तळावर फियादीन हल्ला करण्याचा कट रचला होता. हल्ल्यादरम्यान मोहम्मद सादीकला त्याच्या इतर साथीदारांनी लष्कराच्या तळावरील इंधनाच्या साठ्याला आग लावून काही वाहने जाळण्याचे आदेश दिले. तसेच त्यानंतर कुपवाडा येथे जाण्यास सांगितले. ‘हल्ल्यानंतर मला कुपवाडा येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर तीन दिवसांनी मी तांगधर येथून माझ्या हत्यारांसह एका सुमोमधून कुपवाडा येथे पोचलो. तेथून बारामुल्ला येथे जाण्यासाठी मी काही लोकांशी मैत्री केली.‘ अशी माहिती मोहम्मद सादीकने दिली आहे. त्याने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून तीन महिन्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही सांगितले.
===========================================
चिदंबरम यांच्याकडून हुतात्म्यांचा अपमान:भाजप
‘‘चिदंबरम यांचे विधान दुदैवी असून; ते संसदेचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेले हुतात्मा व
न्यायव्यवस्थेचाही अपमान करणारे असल्याची,‘ प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी व्यक्त केली. याआधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) सरकारच्या काळात गुरु याचा दयाअर्ज फेटाळण्यात आला होता. चिदंबरम हे यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते. अफजल गुरूचा हल्ल्यामध्ये सहभाग होता का याबद्दल शंका असल्याचे मत चिदंबरम् यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, ‘मला प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की अफझल गुरूच्या प्रकरणामध्ये कदाचित योग्य निर्णय दिलेला नसेल‘.
===========================================
जळगाव; जैन समूहाचे संस्थापक भवरलाल जैन यांचे निधन
जळगाव : जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भंवरलाल जैन (79) यांचे मुंबई येथील जसलोक रूग्णालयात निधन झाले. गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या जसलोक रूग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी चार वाजून सात मिनीटांनी अखेरचा श्वास घेतला.
===========================================
चिदंबरम् यांच्याकडून न्यायालयाचा अवमान- सेना
मुंबई - अफझल गुरूबद्दल वक्तव्य करून माजी केंद्रीय गृहमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम् यांनी न्यायालयाचा अवमान केल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना चिदंबरम् यांनी भारताच्या संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरूचा हल्ल्यामध्ये सहभाग होता का याबद्दल शंका असल्याचे वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, ‘कोण हे चिदंबरम्? ते न्यायालयाला आव्हान आहेत का? फाशीची शिक्षा ही कायद्याने आणि सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार झालेली आहे. चिदंबरम् यांच्या बोलण्याने न्यायालयाचा अवमान झाला आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाई करायला हवी‘ तसेच कॉंग्रेस सातत्याने दहशतवाद्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी केला.
दरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्विनी कुमार म्हणाले, ‘मला असे वाटते की सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वात मोठे न्यायालय आहे. त्यांचे निर्णय योग्य असून ते घटनेनुसार असतात.‘
===========================================
स्फोटके बनविण्यासाठी इसीसला भारतातून मदत
===========================================
इसिसकडून झुकेरबर्ग, डोर्सी यांना धमकी
वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटेनेने मार्क झुकेरबर्ग व जॅक डोर्सी या फेसबुक व ट्विटर या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. इसिसची फेसबुक व ट्विटरवरील काही अकाऊंट्स नुकतीच बंद करण्यात आली आहे. यामुळे इसिसकडून हा इशारा देण्यात आला आहे.
"इसिसला सहानुभूती दर्शविणारी अकाऊंट्स बंद केली, तर फेसबुक व ट्विटरला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. फेसबुक व ट्विटर बंद करत असलेल्या एका अकाऊंटला प्रत्युत्तर म्हणून इसिसकडून प्रत्येकी 10 अकाऊंट्स बंद पाडण्यात येतील आणि अंतिमत: ही दोन्ही संकेतस्थळे पूर्णत: बंद पाडण्यात येतील, असे "सन्स खिलाफत आर्मी‘ या इसिसमधील हॅकर्सच्या तुकडीने म्हटले आहे.
फेसबुकवर अद्यापी इसिसची 10 हजारपेक्षा जास्त अकाउंट्स, सुमारे 150 गट (ग्रुप) आणि ट्विटरवर सुमारे 5 हजार अकाऊंट्स असल्याचे इसिसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
===========================================
बोधन- मुखेड -लातुर रोड रेल्वे सर्वेक्षण मंजूर
===========================================

No comments:
Post a Comment