[अंतरराष्ट्रीय]
1- मेट्रो रेल्वेसाठी लाहोरमधलं ऐतिहासिक जैन मंदिर केलं जमीनदोस्त
2- इंडोनेशियाला 6.5 क्षमतेचा भूकंप, त्सुनामी नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
3- हेडलीने राजाराम रेगेंचं, तर रेगेंनी विलास वरदचं नाव घेतलं
4- नॅशनल हेराल्ड प्रकरणाला सामोरे जा, सुप्रीम कोर्टाचे सोनिया आणि राहुल गांधी यांना आदेश
5- कसाबच्या हातातील गंडा-धाग्याचं रहस्य हेडलीने उलगडलं
6- हिमगिरीचा वीर हनुमंतप्पा कोप्पाड अनंतात विलीन
7- राष्ट्रविरोधी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत- राजनाथ सिंह
8- नीरजा भानोत : दहशतवाद्यांशी दोन हात करणारी वीरांगना
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
9- रुग्णवाहिकेला जागा न देणाऱ्यांना जास्त दंड-रावते
10- महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच
11- अरविंद केजरीवाल 'विश्वास' गमावणार? - कुमार विश्वास
12- 'त्या चौघांनी माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि... '-सॉफ्टवेअर इंजिनिअर दीप्ती
15- ‘माझे शरीर, माझी मर्जी’, अमोल पालेकरांच्या पत्नीचे सनी लिओनीला पत्र
14- आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणेने साकारली रूपाली थोरात
16- ...तर 10वी हिंदीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार
17- जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हया कुमारची दिल्ली पोलिसांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
18- उस्मानाबाद; शेतकऱ्याच्या गळ्याला सावकारी फास, दीड लाखापोटी 20 लाख वसूल
19- पुणे; ताशा वाजवणारे शेखरचे हात मंत्रालयात सह्या करणार
20- मंगलोर; रामायणाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला मुस्लीम विद्यार्थिनीने
21- महर्षी मार्कण्डेय ऋषी मंदिर उभारणीस निधी कमी पडु देणार नाही - आमदार डाँ. तुषार राठोड
22- सहकार मंत्री चंद्रकांत पाटील नांदेड दौऱ्यावर
23- सोलापूर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर रुग्णालयात दाखल
24- राज्यातील ५७ मंदिरातील मूर्ती चोरणा-या टोळीला हिंजवडी पोलिसांकडून अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
25- सावरपाडा एक्स्प्रेस सुस्साट, कविता राऊतला रिओ ऑलिम्पिकचं तिकीट
26- पाकिस्तानचे पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी
27- लग्न माझ्या आयुष्यातील चांगली चूक : सौरव गांगुली
28- 'त्या' शुटिंगमुळं सनी लिऑन अडचणीत, पोलिसात तक्रार दाखल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
नुसत्या संख्येपेक्षाही दर्जा राखणे हे महत्वाचे आहे
(रवी नरवाडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4
================================================
महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच
मुंबई : महापालिका निवडणुकीआधी टोलमुक्ती मिळेल या आशेवर असलेल्या मुंबईकरांची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण सार्वजनिक बांधकाम खात्यानं नेमलेल्या आनंद कुलकर्णी समितीनं दिलेल्या अहवालात सध्या टोल बंद करणं सरकारला परवडणारं नसल्याचं सूचित केलं आहे.
तत्कालीन सरकारनं एमईपी कंपनीशी केलेले करार पाहता जर टोल बंद करायचा असेल तर सरकारला तब्बल 2021 कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे हा पर्याय व्यवहार्य नसल्याचं समितीने म्हटलं आहे.
त्यामुळे आता कुलकर्णी समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील जनतेला टोलमुक्तीचं वचन दिलं होतं. त्यामुळे सरकारसाठी हा प्रतिष्ठेचा विषय आहे.
हेडलीने राजाराम रेगेंचं, तर रेगेंनी विलास वरदचं नाव घेतलं
मुंबई : “शिवसेना भवनात जाण्यासाठी डेव्हिड हेडली आला होता. मात्र मी त्याला कधीही सेना भवनात घेऊन गेलो नाही. अवघ्या तीन मिनिटांची भेट होती”, असं स्पष्टीकरण राजाराम रेगे यांनी दिलं. ते एबीपी माझाशी बोलत होते.
26/11 चा मास्टरमाईंड दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीने काल इशरत जहाँचं नाव घेतल्यानंतर आज शिवसेना भवनही त्यावेळी टार्गेट होतं असं कबुल केलं. शिवसेना भवनात प्रवेश मिळवण्यासाठी राजाराम रेगे यांना दादरच्या शिवसेना भवनात भेटलो होतो. राजाराम रेगेंशी मी चांगली मैत्री केली होती, असा गौप्यस्फोट आज हेडलीने केला.
उस्मानाबाद; शेतकऱ्याच्या गळ्याला सावकारी फास, दीड लाखापोटी 20 लाख वसूल
उस्मानाबाद : सावकारीचा विळखा किती मोठा असतो हे उस्मानाबादमध्ये दिसून येत आहे. एका ट्रकचालक सावकाराच्या घरी धाड पडली, तेव्हा कोट्यवधींचं घबाड सापडलं. महिना 20 टक्क्यानं कर्ज देणाऱ्या या सावकाराच्या जाचाला कंटाळून सहा जण शहर सोडून गेली आहेत, तर एकानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
दीड वर्षाच्या एका बाळानं आपल्या वडिलांना एकदाही पाहिलेलं नाही. बाळाच्या आईचं म्हणजे रेखा यांचं पतीशी फक्त फोनवरुन संभाषण होतं. सावकाराच्या जाचाला कंटाळून या बाळाचे वडील धीरज घर सोडून मुंबईला निघून गेले आहेत.
धीरज यांनी सावकाराकडून 1 लाख 60 हजाराचं कर्ज घेतलं होतं. त्यांच्या वडिलांनी आतापर्यंत या कर्जाची तब्बल 20 लाख रुपयांची परतफेड केली आहे.
मुंदडा कुटुंबाच्या या वाताहतीला कारणीभूत ठरलाय अनिल पवार हा सावकार. अनिल प्रति महिना 20 टक्के दरानं शहरातल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना कर्ज देतो. वसुलीची पद्धत पठाणी. त्याच्या जाचानं आतापर्यंत सहा जणं शहर सोडून गेले आहेत, तर एकानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
सावकाराच्या या जाचाविरोधात मुंदडा परिवारानं सततचा पाठपुरावा केल्यानंतर सहाय्यक निबंधकांनी पवारच्या घरी धाड टाकली. त्यात विविध बँकांचे 46 चेक सापडले. त्यातल्या 12 चेकवर 28 लाख कर्जानं दिल्याची नोंद होती. 40 हून अधिक बाँड, तर दीड कोटींच्या नोंदी सापडल्या आहेत.
पुणे; ताशा वाजवणारे शेखरचे हात मंत्रालयात सह्या करणार
पुणे : बारामतीत एका बँडपथकात वाजंत्री म्हणून काम करणारा शेखर नामदास लवकरच मंत्रालयात बसणार आहे. आतापर्यंत बँड पथकात ताशा वाजवणारे हात महत्त्वाच्या फाईलींवर सह्या करतील. संघर्षातून सुरु झालेला त्याचा प्रवास जिद्दीच्या जोरावर सफल झाला आहे. ताशा वाजवणारा शेखर एमपीएससीची परीक्षा पास झाला आहे.
एका लग्नात ताशा वाजवत असताना बारामतीच्या शेखर नामदासला एमपीएससी परीक्षा पास झाल्याचा फोन आला. शेखरचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र त्याक्षणी तो ही गुडन्यूज कुणाला सांगू शकला नाही.
वडिल ट्रॅक्टरवर ड्रायव्हर आणि आई शेतमजूर असलेल्या शेखरचं हे सुवर्ण यश फक्त आणि फक्त त्याच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं फळ आहे. शेखरच्या यशानं बारामतीतल्या वाणेवाडीत आनंद साजरा केला जात आहे.
त्याच्या आईवडिलांना कल्पनाही नाही की त्यांच्या मुलानं कोणता पराक्रम केला आहे, मात्र तो साहेब होणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहतोय.
मिळालेलं यश मोठं आहे. ते टिकवून ठेवण्याचं, आणखी वाढवण्याचं ध्येय शेखरपुढे आहे. त्यातही तो यशस्वी होईल याच सदिच्छा.
'त्या चौघांनी माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि... '
नवी दिल्ली : गाझियाबादमधून बेपत्ता झालेली स्नॅपडिल कंपनीची सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणी दीप्ती सरना अखेर सापडली आहे. चार तरुणांनी चाकूच्या धाकाने अपहरण केल्याची माहिती दीप्तीने दिली आहे. या सर्व घटना घडताना आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधल्याचंही तिने म्हटलं आहे.
‘त्या चौघांनी दीप्तीशी कुठलेही गैरवर्तन केलं नाही. त्यांनी दीप्तीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला नाही. तिला वेळोवेळी खाण्यासही दिलं. पहाटे 3 किंवा 4 वाजण्याच्या सुमारास तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांनी एका मेट्रो स्टेशनजवळ तिला सोडलं. त्यानंतर सकाळी 7 च्या सुमारास तिने मला फोन करुन आपण सुखरुप असल्याचं सांगितलं.’ अशी माहिती दीप्तीच्या वडिलांनी दिली आहे.
दीप्तीने कुठलीही तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याची माहितीही तिच्या वडिलांनी दिली आहे.
सावरपाडा एक्स्प्रेस सुस्साट, कविता राऊतला रिओ ऑलिम्पिकचं तिकीट
गुवाहाटी : सावरपाडा एक्सप्रेस धावपटू कविता राऊतने रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. गुवाहाटीत दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत कविताने मॅरेथॉनचं सुवर्णपदक मिळवलं आणि ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा निकषही पार केला.
ऑलिम्पिक पात्रतेसाठी किमान 2 तास 42 मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण करणं आवश्यक असतं. कविताने 2 तास 38 मिनिटं आणि 38 सेकंदांत मॅरेथॉनचं अंतर कापलं आणि रिओ ऑलिम्पिकमधला प्रवेश निश्चित केला. 30 वर्षीय कवितानं कारकीर्दीत पहिल्यांदाच ऑलिम्पिक मॅरेथॉनमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
कविताने 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10 हजार मीटरचं कांस्यपदक मिळवलं होतं. तर 2010 सालच्याच आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने 10 हजार मीटर शर्यतीत रौप्य आणि 5 हजार मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली होती. आता रिओ ऑलिम्पिकच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी पात्र ठरणारी कविता भारताची चौथी महिला धावपटू ठरली आहे. ओपी जैशा, ललिता बाबर आणि सुधा सिंह यांनी आधीच रिओ ऑलिम्पिकचं तिकीट निश्चित केलं आहे.
दरम्यान, दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धेत पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये भारताच्या नितेंदर सिंह रावतने सुवर्णपदकाची कमाई केली तर भारताच्याच खेता रामने कांस्य पदक मिळवलं.
हिमगिरीचा वीर हनुमंतप्पा कोप्पाड अनंतात विलीन
बेटादूर : सियाचीनमधल्या हिमस्खलनातून आश्चर्यकारकरित्या बचावलेले परंतु मृत्यूशी झुंजताना वीरमरण पत्करलेले शहीद हनुमंतप्पा कोप्पड आज अनंतात विलीन झाले. धारवाड जिल्ह्यातल्या बेटादूर या त्यांच्या गावी लष्करी इतमातात आणि शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.
हनुमंतप्पा यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी बेटादूर गावात अलोट गर्दी झाली होती. आपल्या गावच्या सुपुत्राचा अभिमान आणि त्याला गमावल्याचं दुःख प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यात दिसत होतं. ‘हनुमंतप्पा अमर रहे, भारतमाता की जय हो’ अशा घोषणांनी अवघं बेटादूर दुमदुमून निघालं होतं.
बंदुकीच्या फैरी झाडून लष्करानं त्यांना सलामी दिली आणि भारतभूमीसाठी लढणारा भारतमातेचा सुपुत्र याच मातीत दफन झाला. केवळ बेटादूरवासीयच नव्हे, तर सगळ्याच भारतवासीयांना हनुमंतप्पा यांना अखेरचा निरोप दिला.
पाकिस्तानचे पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी
मुंबई : 2013 सालच्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी वादात अडकलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ यांच्यावर बीसीसीआयनं पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
रौफ यांनी आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावल्याचा तसंच बुकींकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आणि क्रिकेटची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर असद रौफ यांची आयसीसीच्या एलिट पॅनेलमधूनही हकालपट्टी करण्यात आली होती.
या प्रकरणी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, ज्योतिरादित्य सिंधिया आणि निरंजन शाह यांच्या समितीसमोर रौफ यांची सुनावणी झाली. मात्र वारंवार तारखा देऊनही रौफ यांनी समितीसमोर प्रत्यक्ष येऊन आपली बाजू मांडली नाही. अखेर रौफ यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात आल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं.
JNU मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा
नवी दिल्ली: दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी भारतविरोधी आणि संसद हल्ल्याप्रकरणी फासावर लटकवण्यात आलेला अफझल गुरूच्या समर्थनार्थही घोषणा दिल्या होत्या.
याशिवाय गुरुवारी दिल्ली प्रेस क्लबमध्येही पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आली होती.
याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसंच अशा व्यक्तिंना माफ केलं जाणार नाही, असंही राजनाथ म्हणाले.
जेएनयूमध्ये घोषणाबाजी
हिमवादळाशी झुंज देणारा लढवय्या वीरजवान हनुमंतप्पा कोप्पड दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात यांची मृत्यूशी झुंज सुरु असताना, दुसरीकडे जेएनयूमध्ये संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरुच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. इतकंच नाही तर यावेळी भारतविरोधी घोषणाबाजीही सुरु होती. 9 फेब्रुवारीला हा सर्व प्रकार सुरु होता.
कसाबच्या हातातील गंडा-धाग्याचं रहस्य हेडलीने उलगडलं
मुंबई: दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीनं आज अनेक धक्कादायक खुलासे केले. अजमल कसाबचा फोटो हेडलीला दाखवल्यानंतर त्याने कसाबला ओळखलं. कसाब पकडला गेल्यामुळे लष्कराचे सगळे जण दु:खी होते, असं हेडलीने खुलासा केला.
सोबतच भारतात 10 ही अतिरेक्यांचा प्रवेश सोपा व्हावा यासाठी हेडलीने दादरच्या सिद्धिविनायक मंदिरातून 15-20 गंडे-धागे पाकिस्तानात पाठवले होते. 26/11 हल्ल्यादरम्यान कसाबचा हातात गंडा घातलेला फोटो प्रसिद्ध झाला होता. तो गंडा-धागा हेडलीनेच पाठवला होता.
याचसोबत 26/11 मुंबई हल्ल्यावेळी लष्कर अतिरेक्यांच्या टार्गेटवर मुंबईचं विमानतळही असल्याचं हेडलीने कबूल केलं. पण केवळ 10 अतिरेक्यांना विमानतळावरची सुरक्षा भेदणं अशक्य असल्याने लष्करने अंतिम क्षणी हे ठिकाण रद्द केल्याचं हेडलीने सांगितलं.
मुंबईतल्या भाभा अणुसंशोधन केंद्राचंही आपण चित्रीकरण केल्याचं हेडलीने सांगितलं. आगामी काळात अणुसंशोधन केंद्रावर हल्ला करण्यासाठी बीएआरसीतल्या एका कर्मचाऱ्याचा वापर करण्याचं ठरलं होतं.
नीरजा भानोत : दहशतवाद्यांशी दोन हात करणारी वीरांगना
मुंबई : 7 सप्टेंबर 1963… चंदीगढ इथे राहणाऱ्या भानोत कुटुंबात एका मुलीचा जन्म झाला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणेच नीरजाला खेळण्या-बागडण्याच्या वयात आकाश खुणावत होतं. भातुकली-बाहुलीच्या जागी आकाशात मुक्त संचार करणारी विमानं तिला दिसायची. नीरजाच्या इच्छेप्रमाणे घरच्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. नीरजाने फ्लाइट अटेन्डण्टचं तंत्रशुद्ध शिक्षण घेऊन 16 जानेवारी 1986मध्ये एअरलाईन्स पॅन अॅम जॉईन केलं.
5 सप्टेंबर 1986…
मुंबईहून न्यूयॉर्कसाठी रवाना झालेल्या पॅन एम 73 या विमानाचं चार दहशतवाद्यांनी कराचीमध्ये अपहरण केलं आणि सर्व प्रवाशांना ओलिस ठेवलं. याच विमानात नीरजा सीनिअर फ्लाईट अटेण्डन्ट म्हणून काम पाहत होती. 17 तासांच्या या थरारनाट्यानंतर या दहशतवाद्यांनी प्रवाशांची हत्या करायला सुरुवात केली. पिरस्थिती आवाक्याबाहेर जात आहे, याचा अंदाज येताच नीरजाने प्रसंगावधान राखत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि प्रवाशांची सुटका केली.
खरंतर हा दरवाजा उघडताच नीरजा स्वत:ची सुटका करुन घेऊ शकली असती पण तसं न करता तिने प्रवाशांना या संकटातून बाहेर काढलं. तीन लहानग्यांना या विमानातून बाहेर काढत असताना जेव्हा दहशतवाद्यांना याची कुणकुण लागली तेव्हा त्यांनी या मुलांवर गोळी चालवली. मात्र नीरजाने मध्ये पडत ही गोळी आपल्या अंगावर झेलली आणि या मुलांची सुटका केली. याच चकमकीमध्ये नीरजाचा मृत्यू झाला. भानोतांच्या लाडक्या लाडोने या जगाचा निरोप घेतला होता.
23 वर्षीय नीरजाला मरणोत्तर अशोकचक्र प्रदान केलं. देशाचा सर्वोच्च शौर्य सन्मान मिळवणारी निरजा ही सर्वात लहान भारतीय आणि पहिली महिला आहे
लग्न माझ्या आयुष्यातील चांगली चूक : सौरव गांगुली
मुंबई : “लग्न ही मी केलेली चूक होती,” असं भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एका मुलाखतीत म्हटलं होतं. आयुष्यातील सर्वात चांगली चूक कोणती होती, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने उत्तर दिलं की, माझं लग्न.
'त्या' शुटिंगमुळं सनी लिऑन अडचणीत, पोलिसात तक्रार दाखल
नवी दिल्ली: बॉलिवूडची बेबी डॉल पुन्हा एकदा वादात अडकली आहे. यंदा सनी लिऑन आपल्या मस्तीजादे सिनेमामुळं वादात सापडली आहे. सनीसोबत तुषार कपूर, वीर दास आणि सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्मातेही अडकण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील आदर्शनगर पोलीस ठाण्यात सनी लिऑन आणि मस्तीजादेच्या टीमविरुद्ध धार्मिक भावना भडकवल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एक मंदिराच्या आत कंडोमचं प्रमोशन करताना सीन लिऑन दिसून आली आहे. त्यामुळं तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या मते, सनी लिऑनच्या या प्रकारामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. कंडोमचा हा सीन अतिशय अश्लाघ्य पद्धतीनं शूट करण्यात आला आहे. असा आरोपही करण्यात आला आहे.
एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, सिनेमातील कलाकार सनी लिऑन, तुषार कपूर, निर्माता यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आली असून चौकशी पूर्ण झाल्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
मस्तीजादे सिनेमात सनीनं डबल रोल केला आहे. हा सिनेमा सेक्सकॉमेडी असून मिलाप झवेरीनं तो दिग्दर्शित केला आहे.
अरविंद केजरीवाल 'विश्वास' गमावणार?
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास भाजपमध्ये सामील होऊ शकतात. कुमार विश्वास यांचा 11 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्याच पक्षाचे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित नव्हते. मात्र भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी ओम माथुर हजर होते. त्यामुळे कुमार विश्वास यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताला हवा मिळाली.
दिल्लीच्या चाणक्यपुरीमध्ये कुमार विश्वास यांची बर्थडे पार्टी होती. यावेळी माथुर आणि विश्वास यांच्यात काही वेळ एकांतात बातचीत झाली. मला वाढदिवासाच्या शुभेच्छा देण्यासाटी अनेक नेते आले होते, त्यामुळे मी त्या प्रत्येक पक्षात प्रवेश करणार का?, असा उलट सवाल विश्वास यांनी विचारला आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणाला सामोरे जा, सुप्रीम कोर्टाचे सोनिया आणि राहुल गांधी यांना आदेश
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याला सोनिया आणि राहुल गांधी यांना सामोरे जावेच लागेल, असे स्पष्ट मत नोंदवून सुप्रीम कोर्टाने सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले समन्स रद्द न करण्याचा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्यास नकार देण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला सोनिया आणि राहुल यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जे.एस.खेहार यांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत सोनिया आणि राहुल यांच्यासह इतर पाच काँग्रेस नेत्यांना खटल्याला सामोरे जाण्याचे आदेश दिले.
================================================‘माझे शरीर, माझी मर्जी’, अमोल पालेकरांच्या पत्नीचे सनी लिओनीला पत्र
बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले यांनी सनी लिओनीला पत्र लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीची सनी लिओनीची टिव्ही चॅनलवरीची एक मुलाखत चांगलीच गाजली होती. मुलाखतीत सनीला काही बोचरे प्रश्न विचारण्यात आले होते. यानंतर सनीला टिकेस सामोरे जावे लागले होते. याच मुलाखतीचा धागा पकडून संध्याने सनीला हे पत्र लिहीले आहे. हा सर्व प्रकार सनीने योग्यप्रकारे हाताळल्याने संध्याने तिचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रसंगांना सामोरे जाताना उपयोगी पडतील अशा काही टिप्सदेखील संध्याने तिला दिल्या आहेत. या पत्रातील एका भागात संध्या लिहितात, “टिव्हीवरील मुलाखतीदरम्यान तुला अडचणीत आणण्याचा मुलाखतकर्त्याचा प्रयत्न तू हाणून पाडल्याने न राहून मी तुला हे पत्र लिहीत आहे. तुझ्या भूतकाळाबद्दल तुला पश्चाताप वाटतो का? मुलाखतकर्त्याने तुला विचारलेल्या या पहिल्या प्रश्नातूनच फक्त टिआरपी मिळविणे हाच त्याचा एकमेव उद्देश असल्याचे स्पष्ट होते. मुलाखतीदरम्यान तू अँड्रिया ड्वोरकिन आणि कॅथरिना मॅक्निोन यांचा नामोल्लेख करायला हवा होता. जर आम्ही महिला ‘माझे शरीर, माझी मर्जी’वर विश्वास ठेवतो, तर मर्यादीत स्वरुपातील ‘पॉर्नोग्राफी’ का करू शकत नाही, असा प्रश्न आमिरशिवाय दुसऱ्या कोणाचे नाव न घेऊ शकलेल्या मुलाखतकर्त्याला तू विचारायला हवा होतास.”
================================================आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणेने साकारली रूपाली थोरात
सिनेमा म्हटला की तयारी आलीच. दिग्दर्शकापासून ते लेखकापर्यंत…निर्मात्यांपासून ते टेक्नीशिअन्सपर्यंत सगळेच आपले काम उत्तम व्हावे यासाठी धडपडत असतात. तर आपली भूमिका उत्तम पार पडावी यासाठी कलाकारही खास कष्ट करताना आपल्याला दिसतात. ‘पोश्टर गर्ल’ सिनेमासाठी सोनालीनेही बरीच मेहनत घेतली. ‘हात खाली, नजर खाली, फक्त नाव लक्षात ठेवायचं…’रूपाली’, म्हणत अख्या गावाला इंगा दाखवणारी ही ‘रूपाली थोरात’, आपल्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजाने गावातल्या पुरूषांच्या नाकी – नऊ आणते. पोश्टर गर्लमधल्या रूपालीच्या भूमिकेविषयी बोलताना सोनाली म्हणते, की या भूमिकेसाठी तिने आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. ज्यापध्दतीने त्यांनी एका छोट्या शहरातून आपली कारकीर्द सुरू करून आज एक उंची गाठली आहे, तशीच काही स्वप्न रूपालीचीही आहेत. एका छोट्या शहरातून आलेल्या रूपालीला खूप मोठे व्हायचे आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तिच्यात आहे.’ शिवाय आयपीएस पाटील एका उंचीवर असूनही ते ज्यापध्दतीने आपल्या मातीशी जोडलेले आहेत, हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचेही सोनाली म्हणाली.
================================================राष्ट्रविरोधी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत- राजनाथ सिंह
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात(जेएनयू) एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रविरोधी घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर योग्य कडक कारवाई केली जाईल, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
मंगळवारी दिल्लीतील जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांनी भारतविरोधी आणि संसद हल्ल्याप्रकरणी फासावर लटकवण्यात आलेला अफझल गुरूच्या समर्थनार्थही घोषणा दिल्या होत्या. याशिवाय गुरुवारी दिल्ली प्रेस क्लबमध्येही पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आली होती.
याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतविरोधी घोषणाबाजी करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसंच देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्यांना माफ केलं जाणार नाही, अशा कडक शब्दात राजनाथ यांनी ‘जेएनयू’मध्ये घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही याप्रकरणाचा निषेध व्यक्त केला. या देशातील कोणताही नागरिक भारत मातेचा अपमान सहन करू शकत नाही. राष्ट्रविरोधी वक्तव्या करणाऱयांवर कारवाई व्हायलाच हवी, असं मत इराणी यांनी व्यक्त केलं आहे.
================================================मंगलोर; रामायणाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला मुस्लीम विद्यार्थिनीने
वरचेवर असहिष्णू घटनांसाठी कुप्रसिद्ध झालेल्या मंगलोरमध्ये एका मुस्लीम विद्यार्थिनीने रामायणाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावत सहिष्णूतेचे दर्शन घडवले आहे. भारत संस्कृती प्रतिष्ठानने दोन महिन्यांपूर्वी रामायणावर परीक्षा घेतली होती. यामध्ये नववीत शिकणा-या फातिमाने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कर्नाटक केरळ सीमेवरील सुलीयापाडाऊ गावातल्या सर्वोदय हायस्कूलमध्ये ती शिकते. रामायण आणि महाभारताचा अभ्यास करण्याची तिची खूप इच्छा होती आणि यासाटी तिच्या काकांनी तिला मदत केल्याचे फातमिचे वडील इब्राहिम यांनी सांगितले. आता फातिमाला महाभारतावर आधारीत परीक्षेतही भाग घ्यायची इच्छा आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून हिंदू साहित्यामध्ये रस असलेल्या फातिमाने या विषयांचा अभ्यास केल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. पी सत्यशंकर भट या परीक्षेचे समन्वयक होते. या परीक्षांसाठी कुणालाही सक्ती करण्यात आली नाही, तसेच अभ्यास ज्याचा त्यानेच करायचा होता असे भट यांनी सांगितले आहे.
================================================मेट्रो रेल्वेसाठी लाहोरमधलं ऐतिहासिक जैन मंदिर केलं जमीनदोस्त
पाकिस्तानमधल्या लाहोरमधले ऐतिहासिक जैन मंदिर मेट्रो रेल्वेसाठी जमीनदोस्त करण्यात आले असून पाकिस्तानातल्या विरोधी पक्षांनी याचा निषेध केला आहे. पंजाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते मियाँ मेहमूद उर रशीद यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रशीद यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि हे ऐतिहासिक मंदिर जतन का करण्यात आलं नाही असा सवाल विचारला आहे. पंजाब सरकारने ऑरेंज लाइन मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पासाठीजैन मंदिर, महाराजा बिल्डिंग आणि कपुरथाला हाऊस या इमारतीही जमीनदोस्त केल्या आहेत. मेट्रो रेल्वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी लाहोरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या जैन मंदिराचं जतन करणंही सरकारचं कर्तव्य होतं असं मत रशीद यांनी व्यक्त केल्याचं टाइम्सनं म्हटलं आहे.
पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ, पाकिस्तान मुस्लीम लीग (क्यू), जमात ए इस्लामी आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षांनी या घटनेचा निषेध केला आणि निदर्शने केली आहेत.
याआधीही जैन मंदिराला काहीवेळा संकटांना सामोरे जावे लागले होते. बाबरी पतनानंतर बदला म्हणून या मंदिराचा खूपसा भाग जमावाकडून तोडण्यात आला होता. नंतर अनेक दुकानदारांनी मंदिराच्या आवारात अतिक्रमण केले होते, तर मंदिराच्या एका खोलीत एक मदरसाही चालवण्यात येत होता.
सरकार एका समाजाविषयीच अलिप्त आहे असं नाही तर ते शहराच्या ऐतिहासिक वारशाविषयीही अनभिज्ञ असल्याची टीका रशीद यांनी केली आहे.
...तर होऊ शकते तिसरे महायुद्ध- रशिया
जर्मनीतील एका जर्मन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मेदवेदेव बोलत होते. सीरियातील संघर्षाबाबत बोलताना ते म्हणाले, "अमेरिकेसह अरब देशांनी आपल्याला कायम स्वरुपी युद्ध हवे आहे का? यावर विचार करावा. सीरियातील संघर्षावर मात करण्यासाठी रशियाची मदत मिळावी यासाठी पाश्चिमात्य देशांसोबत सुरक्षा स्तरावर अतिशय तुरळक चर्चा झाली आहे.‘ तसेच या संघर्षावर मात करण्यासाठी जमिनीवरील सैन्याचा वापर केला तर त्याचा गंभीर परिणाम होऊन तिसरे महायुद्ध होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. अमेरिकेसह सीरियातील संघर्षावार मात करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मागील आठवड्यातच सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्र्यांनी सैन्य पाठविण्याची तयारी दर्शविली आहे.
================================================
...तर 10वी हिंदीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार
पुणे- शालेय स्तरावर हिंदी भाषा व विषयाला दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ दहावीच्या हिंदीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे राज्य हिंदी शिक्षक महामंडळाने जाहीर केले आहे. तसेच 22 फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
राज्य हिंदी शिक्षक महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे झाली. त्यामध्ये हिंदी बाबतच्या दुजाभावाच्या वागणूकी विषयी चर्चा झाल्याचे जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जोशी म्हणाले, "हिंदी राष्ट्रभाषा असूनही तिला सापत्न वागणूक दिली जात आहे. मागील 50 वर्षांपासून हिंदीवर अन्याय होत आहे. नववी व दहावीत हिंदी भाषेला द्वितीय स्थान मिळण्याऐवजी व्यवसायभिमुख शिक्षण, कार्यानुभव, संस्कृत यांसारखे विषय घेण्यासाठी परिपत्रके काढली जात आहेत.‘‘ हिंदी ऐवजी अन्य भाषेला द्वितीय स्थान देण्यासाठीचे परिपत्रक रद्द करावे, संस्कृत, व्यावसायभिमुख शिक्षण विषयासाठी स्वतंत्र निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच बालभारतीच्या कार्यालयासमोर लाक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे.
================================================राज्य हिंदी शिक्षक महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे झाली. त्यामध्ये हिंदी बाबतच्या दुजाभावाच्या वागणूकी विषयी चर्चा झाल्याचे जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जोशी म्हणाले, "हिंदी राष्ट्रभाषा असूनही तिला सापत्न वागणूक दिली जात आहे. मागील 50 वर्षांपासून हिंदीवर अन्याय होत आहे. नववी व दहावीत हिंदी भाषेला द्वितीय स्थान मिळण्याऐवजी व्यवसायभिमुख शिक्षण, कार्यानुभव, संस्कृत यांसारखे विषय घेण्यासाठी परिपत्रके काढली जात आहेत.‘‘ हिंदी ऐवजी अन्य भाषेला द्वितीय स्थान देण्यासाठीचे परिपत्रक रद्द करावे, संस्कृत, व्यावसायभिमुख शिक्षण विषयासाठी स्वतंत्र निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच बालभारतीच्या कार्यालयासमोर लाक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे.
इंडोनेशियाला 6.5 क्षमतेचा भूकंप, त्सुनामी नाही
जकार्ता- इंडोनेशियाच्या पूर्व किनारपट्टीजवळ 6.5 रिश्टर स्केल एवढ्या क्षमतेचा आज (शुक्रवार) भूकंपाचा धक्का बसला आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3 वाजून 32 मिनीटांनी भूकंप झाला. किनारपट्टीपासून तीन किलोमीटर आत व 30 किलोमीटर खोल भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. भूकंपात जीवित अथवा पडझडीचे वृत्त हाती आलेले नाही. शक्तिशाली भूकंप असला तरी त्सुनामीची शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, इंडोनेशियाला 12 जानेवारी रोजी 6.9 रिश्टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.
================================================
रुग्णवाहिकेला जागा न देणाऱ्यांना जास्त दंड-रावते
मुंबई - सायरन सुरु असलेल्या रुग्णवाहिकेला जागा उपलब्ध करून न देणाऱ्या वाहनचालकांना जास्त दंड आकारण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.
अत्यवस्थ रुग्णालया उपचारासाठी घेऊन जाताना जीवघेण्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा या कोंडीमुळे उपचाराअभावीच रुग्णाचा मृत्यू होतो. जीवन-मरणाच्या या काही श्वासांमधील अंतराचा "गोल्डन अवर‘ टिपण्याचा "सकाळ टीम‘ने प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर रावते बोलत होते. कोणत्याही वाहनाला रुग्णवाहिका बनवण्याचे प्रकार बंद करण्यासाठी निर्बंध लावण्याबाबत विचार सुरु असून सायरन सुरु असलेल्या रुग्णवाहिकेला जागा न देणाऱ्या वाहनचालकांना जास्त दंड आकारणेबाबत विचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान या वृत्ताची मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली असून स्वत:हून (सुमोटो) याचिका दाखल करून घेतली आहे. या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या यंत्रणेला याबाबत चार आठवड्यांत अहवाल देण्याचे आदेशही आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. आर. बन्नूरमठ यांनी दिले आहेत.
================================================
महर्षी मार्कण्डेय ऋषी मंदिर उभारणीस निधी कमी पडु देणार नाही - आमदार डाँ. तुषार राठोड
आमदार राठोड यांच्या हस्ते मार्कण्डेय ऋषी मंदिराचे भुमिपुजन
मुखेड :-
पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कण्डेय ऋषी यांच्या मंदिर उभारणीस निधी कमी पडु देणार नाही असे आश्वासन मुखेड- कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार डाँ.तुषार राठोड यांनी दिले. महर्षी मार्कण्डेय ऋषी जयंती व सभागृह भुमिपुजन निमित्य आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार डाँ. तुषार राठोड यांच्या स्थानिक विकास निधीतुन सभागृह उभारणीसाठी पाच लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असुन सभागृहाचे भुमिपुजन आमदार तुषार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर भाजपाचे शिवा नरंगले, पद्मशाली समाजाचे नेते माधव अण्णा साठे, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर, खुशालराव पाटील उमरदरीकर, डाँ वीरभद्र हिमगीरे, डाँ.माधव उच्चेकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अंतेश्वर पाटील बिल्लाळीकर, प्रा.डाँ.रामकृष्ण बदने, प्रा.डाँ.देविदास केंद्रे, चेअरमन केशव पाटील बेळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार डाँ. राठोड म्हणाले की, मुखेड तालुक्यातील विविध विकास कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही. राज्यासह केंद्रात भारतीय जनता पार्टी ची सत्ताअसल्यामुळे मतदारसंघात निधीसाठी पाठपुरवठा करुन मतदारसंघ सुजलाम सूफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार. श्री महर्षी मार्कण्डेय ऋषी यांच्या मंदीर निर्माणासाठी समाजाचे जेष्ठ नेते माधव अण्णा साठे यांनी आपली एक एकर शेती दान केली आहे. जयंती निमित्य शहरातुन भव्य मोटारसायकल रँली काढण्यात आली. प्रसिद्ध व्याख्याते प्रा.डाँ.रामकृष्ण बदने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष संजय बेळीकर, नरसिंग बेतेवाड, सचिन रामदिनवार, कैलास मादसवाड, रामराव बेळीकर, रामदास आंचेवार, सुभाष चटलावार, सरपंच अनिल कंनेवार, सरपंच सौ.रुक्मीणबाई आलेवाड, नामदेव यलकटवार, प्रकाश गुजलवार सह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. याजयंती उत्सवामध्ये तालुक्यातील शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
================================================
सहकार मंत्री चंद्रकांत पाटील नांदेड दौऱ्यावर
नांदेड विमानतळ येथे आगमन प्रसंगी महा.राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटिल व अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिशजी बापट यांचे पुष्प गुच्छ देऊन भाजपा ता.अध्यक्ष लोहा सुरेश पाटिल खांबे गावकर व युवा तालुका अध्यक्ष सुरेश मोरे यानि केले स्वागत करतेवेळी.........


No comments:
Post a Comment