Wednesday, 17 February 2016

नमस्कार लाईव्ह १७-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- चीनला धडकी भरवणारी तोफ लवकरच भारतीय लष्कराच्या ताफ्यात - पहा फोटो 
२- कॅनडातील शो मध्ये भारतीय मुलीची बाजी 
३- चीनमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना रजा! 
४- शेक्सपिअरला अनौरस मुलगा होता! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- पतियाळा कोर्टाबाहेर वकिलांचा आजही धुडगूस, कन्हैय्याला 2 मार्चपर्यंत कोठडी 
६- देशाविरोधी कुणी काही बोलत असेल, तर शिक्षा व्हायलाच हवी : श्री श्री रविशंकर 
७- 'जलयुक्त शिवार'च्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नाना का नाही?" 
८- पतियाळा हाऊस न्यायालयाबाहेर 'वकिलांकडून मारहाण होताना पोलिस बघत होते' 
९- महिंद्र करणार ‘एम ७७७ होवित्झर’ तोफांची जोडणी 
१०- एम.के.सुराणा यांची हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी निवड 
११- पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३२ पैसे कपात, डिझेलच्या दरात प्रतिलिटर २८ पैशांची वाढ 
१२- लोकांच्या सुरक्षेतेसाठी सीसीटीव्ही कधी लावणार, सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यात एक मंत्री - चंद्रकांत पाटील  
१४- देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना फोडून काढा : राज ठाकरे 
१५- एक बार जो मैने कमिटमेंट कर ली.. उदयनराजेंचा इशारा 
१६- केरळ: संघाच्या इमारतीवर फेकले गावठी बॉंब 
१७- मोदी गुजरातमधून बाहेर आलेच नाहीत-राज 
१८- क्रौंच पक्ष्यांना शिकाऱ्यांचा फास 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- वर्धा; पत्नीच्या आत्महत्येचा बनाव, वर्ध्यातील शेतकऱ्याला बेड्या 
२०- जळगाव: चोपडातून 100 तलवारी जप्त 
२१- मुखेड; बसव महामोर्चास आ.डाँ.तुषार राठोड यांचा पाठिंबा 
२२- आसनगावाजवळ ओव्हरडेड वायर तुटल्यामुळे कसारा ते कल्याणदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- सत्यमेव जयतेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान राबवणार - आमीर खान 
२४- विराट, तुझं कुटुंबात स्वागत : दीपिका 
२५- 'असा नट होणे नाही'; आमीरकडून नानाचे कौतुक 
२६- प्रियांका चोप्राची Hollywood Entry, झळकणार बे वॉचमध्ये 
२७- ‘या’ सवयीमुळे सचिनला ओरडा मिळत असे! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनात जे मिळवायचे ते मिळवा ,फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधी ही लोकांची मने तोडून जाणारा नसावा
(पवन वैष्णव, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4


=======================================

देशाविरोधी कुणी काही बोलत असेल, तर शिक्षा व्हायलाच हवी : श्री श्री रविशंकर

देशाविरोधी कुणी काही बोलत असेल, तर शिक्षा व्हायलाच हवी : श्री श्री रविशंकर
नवी दिल्ली देशविरोधी कुणी बोलत असेल, मग तो यूनिव्हर्सिटीत बोलत असो, यूनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये बोलत असो, वा बाहेर बोलत असो, त्याला कायद्याने शिक्षा मिळायलाच हवी, असे परखड मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलं आहे.
“तो विद्यार्थी आहे आणि त्याने देशद्रोही वक्तव्य केलं असेल, म्हणून तू बरोबर कसं असू शकतं?”, असा सवालही श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित केला.
“देशद्रोहाचं कुणी बोलत असेल, देशविरोधी बोलत असेल, तर त्याला कायद्यान्वये शिक्षा मिळायलाच हवी. नसेल शिक्षा द्यायची तर कायदाच काढून टाका आणि देशभरात सांगून टाका की, देशविरोधी काहीही बोलल्यास काहीही कारवाई होणार नाही. शिवाय, काहीही बोलण्याची सूट असल्याची घोषणाच करुन टाका.” असे श्री श्री रविशंकर यावेळी म्हणाले. 
कुणीतरी भडकवल्याशिवाय ही मुलं असे काही बोलणार नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 
“जगातील कोणत्याही देशात जा, सर्वत्र देशद्रोहासाठी कायदा आहेच आणि देशद्रोहाचं कुणी उल्लंघन करत असेल, तर त्याला त्यानुसार शिक्षा मिळायलाच हवी.”, असेही ते म्हणाले. 
श्री श्री रविशंकर पुढे म्हणाले, “कायदा ही एक शिस्त आहे, सामाजिक नियम आहे. स्वातंत्र्य ही एक वेगळी गोष्ट आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच. मात्र, देशाविरोधी कुणी बोलत असेल, तर कारवाई व्हावीच.”
=======================================

"'जलयुक्त शिवार'च्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नाना का नाही?" 

मुंबई : महराष्ट्राच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेत बॉलिवूड अभिनेता सक्रीय सहभाग घेणार आहे. मात्र, याच मुद्द्याला धरुन नेटिझन्सनी फडणवीस सरकारला सोशळ मीडियावर धारेवर धरलं आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या ब्रॅन्ड अॅम्बेसेडरपदी अभिनेते नाना पाटेकर यांची निवड का केली जात नाही, असा सवाल विचारला जातो आहे. सोशल मीडियावरुन महाराष्ट्र सरकारवर घणाघात होतो आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाना पाटेकर यांचा विचार का केला जात नाही? मकरंद अनासपुरे, अक्षय कुमार यांची नावंही का विचारात घेतली जात ना? असे सवाल सोशल मीडियावरुन विचारले जात आहेत. असहिष्णुतेवरुन टीकेचा धनी झालेला आमीर आता पुन्हा नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे. आमीर खानने शेतकऱ्यांसाठी काय केले? असा थेट सवाल नेटिझन्स फडणवीस सरकारला विचारताना दिसत आहेत. शिवाय, नानाला ब्रॅन्ड अॅम्बेसेडर करण्याची मागणीही जोर धरु लागली आहे.
=======================================

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यात एक मंत्री - चंद्रकांत पाटील 

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या प्रत्येक तालुक्यात एक मंत्री
मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळ आणि त्यावरील सरकारी उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने एक नवा उपक्रम जारी केलाय. सहकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज याबाबत माहिती दिली. 
राज्य सरकारच्या या नव्या दुष्काळ आढावा उपक्रमानुसार मंत्रिमंडळातील एकेक मंत्री दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्याचा एक दिवस दौरा करून स्थानिक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. सरकारने दुष्काळ निवारणासाठी राबवलेल्या योजनांची माहिती घेऊन, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होत आहे, याचाही आढावा हे मंत्री तालुका पातळीवरून घेणार आहेत. 
मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या दुष्काळी उपाय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत आहे की नाही, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय करायला हवं याचीही माहिती हे मंत्री आपल्या एक दिवसांच्या तालुका दौऱ्यात घेणार आहेत. 
सरकारने दुष्काळ निवारणासाठी आखलेल्या योजना खालच्या स्तरापर्यंत पोहोचत नसल्याचा कांगावा विरोधक करत आहेत, तो खरा आहे की नाही याचीही शहानिशा करण्यासाठी या मंत्र्यांना सांगण्यात आलंय. 
मराठवाड्यातील या प्रस्तावित तालुकास्तरीय दौऱ्याचा समन्वय पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि दीपक सावंत करणार आहेत. 
मंत्रिमंडळातील वेगवेगळ्या मंत्र्यांना नेमून दिलेल्या तालुक्याचा दौरा पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल संबंधित मंत्री मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.
=======================================

देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना फोडून काढा : राज ठाकरे 

देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना फोडून काढा : राज ठाकरे
मुंबई : देशविरोधी घोषणा करणाऱ्यांना फोडून काढा, असे राज ठाकरे जेएनयू प्रकरणावर बोलताना म्हणाले. मात्र, राज ठाकरेंनी यावेळी भाजपवरही जोरदार घणाघात केला. “कोण देशप्रेमी आणि कोण देशविरोधी, हे भाजपने ठरवू नये. देशभक्तीचे सर्टिफिकेट भाजपने वाटू नये.”, असे म्हणत राज यांनी भाजपलाही धारेवर धरलं. 
‘मेक इन इंडिया’वरही टीका 
‘मेक इन इंडिया’ हा केवळ इव्हेंट असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. “परदेशातील उद्योगपतींना भारतात बोलावण्याऐजी देशातील उद्योगपतींना प्रोत्साहन द्यायला हवं.”, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेनेची भूमिकाच तळ्यात-मळ्यातली आहे. शिवसेना विरोधात आहे की सत्तेत, हेच कळत नाहीय, असे म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली.
=======================================

एक बार जो मैने कमिटमेंट कर ली.. उदयनराजेंचा इशारा 

एक बार जो मैने कमिटमेंट कर ली.. उदयनराजेंचा इशारा
सातारा : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना मोटरसायकल भाडेतत्त्वावर काही दिवसात मिळणार असून या व्यवसायाला विरोध दर्शवण्यासाठी महाबळेश्वर, पाचगणी भागातील टॅक्सीसंघटनांनी चांगलाच विरोध केला आहे. त्यांच्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला आहेच, शिवाय या टॅक्सीचालकांसाठी चक्क उदयनराजेंनी रस्त्यावर उतरुन आंदोलनही केलं आहे. या व्यवसायाला प्रशासनाने परवानगी दिलीच तर यामुळे महाबळेश्वरातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.
‘एक बार जो मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनता….’ उदयनराजेंच्या स्टाईल मधील ही धमकी महाबळेश्वरातील टॅक्सी व्यवसायिकांसाठी आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या महाबळेश्वरमध्ये काही दिवसातच रेंटवर बाईक मिळणार आहेत. त्यामुळे येथील तब्बल दोन हजार टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. म्हणुनच उदयनराजेंसह सर्वांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.
=======================================

वर्धा; पत्नीच्या आत्महत्येचा बनाव, वर्ध्यातील शेतकऱ्याला बेड्या

पत्नीच्या आत्महत्येचा बनाव, वर्ध्यातील शेतकऱ्याला बेड्या
वर्धा : वर्ध्यातील शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येप्रकरणी नवीन बाबी समोर यायला लागल्या आहेत.  नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून लाडकर दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं आणि त्यात पत्नीला जीव गमवावा लागल्याचं वृत्त होतं, मात्र हा बनाव असल्याचं आज समोर आलं आहे. 
वर्ध्याच्या झंजाळा गावात हा प्रकार घडला आहे. लाडकर दाम्पत्याने आत्महत्येचा प्रत्यत्न केला आणि पत्नी सुधा लाडकर यांचा मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात अशोक आणि सुधा लाडकर यांच्यात नेहमी भांडण व्हायची. याला कंटाळून अशोकने काल आपली पत्नी सुधाची हत्या करुन स्वतः आत्महत्येचा बनाव केल्याचं उघड झालं आहे. 
सुरुवातीला प्रत्येकाला हे प्रकरण कर्जामुळे आत्महत्या केल्याचं वाटतं होतं. पण पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य अखेर समोर आलं आहे. सध्या या प्रकरणात पती अशोक लाडकर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
=======================================

विराट, तुझं कुटुंबात स्वागत : दीपिका 

विराट, तुझं कुटुंबात स्वागत : दीपिका
मुंबई : बॉलिवूड सुंदरी दीपिका पदुकोनने स्टायलिश क्रिकेटर विराट कोहलीचं कुटुंबात स्वागत केलं आहे. अनुष्का-विराटच्या ब्रेकअपच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दीपिकाचा ट्वीट वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हे कुटुंब वैयक्तिक नसून प्रोफेशनल असल्याचं उघड झालं आहे. 
‘टिसॉ’ कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी विराट कोहलीची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मात्र ओम शांती ओम चित्रपटामुळे 2007 मध्ये रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली दीपिका तेव्हापासूनच टिसॉची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे ट्विटरवर दीपिकाने विराटचं अभिनंदन केलं. 
‘विराट, तुझं कुटुंबात स्वागत’ असं ट्वीट करुन कोहली आणि टिसॉ कंपनीला मेन्शन केलं आहे. त्यानंतर विराटनेही याची अधिकृत घोषणा करत आभार मानले आहेत.
=======================================

‘या’ सवयीमुळे सचिनला ओरडा मिळत असे!

‘या’ सवयीमुळे सचिनला ओरडा मिळत असे!
धर्मशाला (हिमाचल प्रदेश) : सध्या सगळीकडेच स्वच्छतेचा बोलबाला आहे. केंद्र सरकारही देशव्यापी स्वच्छता मोहीम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर यूनिसेफ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि बीसीसीआयच्या टीमने स्वच्छ क्लिनिक लॉन्च केलं. 
यूनिसेफ आणि आयसीसीने एक व्हिडीओ शूट केला आहे, ज्यामध्ये चिमुरडे खेळताना दिसतात. जेव्हा चेंडू खराब ठिकाणी जातं, त्यावेळी त्या चेंडूला हात लावण्यापासून रोखलं जातं, असं एकंदरीत या व्हिडीओमध्ये आहे. 
व्हिडीओ लॉन्चिंगच्या कार्यक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. सचिन यूनिसेफचा गुडविल ब्रँड अम्बॅसेडर आहे. सचिनने यावेळी लहाणपणीचा अनुभव सांगत आईने दिलेला ओरड्याचा किस्साही सांगितला. 
सचिन म्हणाला, “मी जेव्हा लहान होतो, तेव्हा जेवणाआधी हात धुवत नसे. क्रिकेट खेळून ज्यावेळी घरी यायचो, त्यावेळी हात न धुवता डायनिंग टेबलवर बसायचो. त्यावेळी माझे हात धुवण्यासाठी आई ओरडत असे. जेवणाआधी हात धुवावे, अशी ती नेहमी सांगायची. प्रसंगी ओऱडायचीही. आईमुळेच आज मी निरोगी आहे.” 
यूनिसेफ आणि आयीसीची ही टीम स्वच्छ क्लिनिक आगामी टी-20 सामन्यांदरम्यान प्रत्येक सामन्यावेळी उपस्थित राहून स्वच्छतेचा प्रसार करणार आहे.
=======================================

पतियाळा कोर्टाबाहेर वकिलांचा आजही धुडगूस, कन्हैय्याला 2 मार्चपर्यंत कोठडी 


  • नवी दिल्ली, दि. १७ - जवाहरलाल नेहरू विदयापीठातील वातावरण आजही चिघळलेले असून वकिलांनी कन्हय्या कुमारला धक्काबुक्की केली तसेच सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीलाही शिवीगाळ केली. पतियाळा कोर्टाबाहेर घडलेला गंभीर प्रकार बघून न्यायालयाने कपिल सिब्बल, दुष्यंत दवे, हरीन रावल, राजीव धवन, एजीएन राव आणि अजित सिन्हा यांची समिती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेमली. ही समिती ज्यावेळी कोर्टात आली, त्यावेळी हुल्लडबाजी करणा-या वकिलांनी त्यांनाही शिवीगाळ केली आहे. समितीच्या सदस्यांनी दगडही फेकण्यात आल्याची तक्रार केली आहे.
    दरम्यान, न्यायालयाने कन्हय्या कुमारला 2 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कन्हैय्या कुमारला सुनावणीसाठी न्यायालयात आणले जात असताना वकिलांनी कन्हैय्या कुमारला मारहाण केली आहे. मात्र, दिल्ली पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी फारशी मारहाण झाली नसल्याचा व त्याची वैद्यकीय तपासमी करण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
    त्याअगोदर आज सकाळी न्यायालयाबाहेर वकिलांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती, यादरम्यान फर्स्ट पोस्टचे पत्रकार तारिक अन्वर यांनादेखील मारहाण करण्यात आली. सोमवारी पत्रकारांवर हल्ला करणारे वकिल म्हणाले की, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणा-यांना हिरो ठरवले जाते आणि आम्हाला गुंड म्हणतात असे घोषणाबाजी करणा-या वकिलाने सांगितले. 
    सर्वोच्च न्यायालयाने पतियाला हाऊस कोर्टात कन्हैयाच्या खटल्याच्या सुनावणीला कन्हैयाच वकिल, कुटुंबिय मित्र यांच्या व्यतिरिक्त वकिलांसह इतरांना हजर राहण्यास मनाई केली होती.
=======================================

प्रियांका चोप्राची Hollywood Entry, झळकणार बे वॉचमध्ये 

  • बॉलीवूडमधली आघाडीची हिरॉइन प्रियांका चोप्रा हॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून ड्वेन जॉन्सनबरोबर ती बे वॉचमध्ये झळकणार आहे. रॉक या नावाने ओळखल्या जाणा-या ड्वेनने टि्वटरच्या माध्यमातून ही बातमी कळवली आहे. प्रियांका बे वॉचच्या टीममध्ये जॉइन झाल्याचे त्यानं जाहीर केल्यावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. कुस्तीचा आखाडा गाजवलेल्या ड्वेननं हॉलीवूडमध्येही अॅक्शनपटांमध्ये छाप उमटवली असून त्याच्यासोबत प्रियांकाही आपली मोहर हॉलीवूडमध्ये उमटवेल अशी आशा आहे. विशेष म्हणजे प्रियांका बे वॉचमध्ये खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून उत्कृष्ट नायिका असलेली प्रियांका खलनायिका म्हणूनही चांगलं काम करेल असं कौतुक ड्वेननं केलं आहे.
    ड्वेनने प्रियांका ही जगातली सगळ्यात मोठ्या स्टार्सपैकी एक असल्याचं प्रशस्तीपत्रकही देऊन टाकलं असून त्यानं प्रियांकाबरोबरचे फोटो आणि व्हिडीयो क्लिपही शेअर केली आहे. 
    बे वॉच या अत्यंत लोकप्रिय मालिकेवर आधारीत हा सिनेमा असून एबीसी चॅनेलवरच्या क्वान्टिको या मालिकेतल्या अलेक्स परीश या एफबीआयच्या एजंटच्या रोलमुळे प्रियांका आधीच जगभरच्या प्रेक्षकांच्या परीचयाची झालेली आहे. बे वॉचमुळे तिची हॉलीवूडशी नाळ जुळत असून तिकडेही ती चांगलीच लोकप्रिय होईल अशी अपेक्षा आहे. 
    याआधी ऐश्वर्या रायने हॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवला होता, तर दिपिका पदुकोणही विन डिझेलबरोबर हॉलीवूडमधल्या एका चित्रपटात झळकत आहे. बॉलीवूडमधल्या नट्यांना हॉलीवूडमध्ये चांगले दिवस आलेले यावरून दिसत आहे.
=======================================

कॅनडातील शो मध्ये भारतीय मुलीची बाजी 


  • व्हॅनकोवर, दि. १७ - काही मुलांकडे लहान वयातच अचाट प्रतिभा असते, ही मुले आपल्यातील ही अंगभूत हुशारी आणि प्रतिभेने समोरच्याला थक्क करुन सोडतात. अशाच मुलांपैकी एक आहे १० वर्षांची इशिता कटियाल. पुण्याची रहिवासी असलेल्या १० वर्षाच्या इशिताने कॅनडातील व्हॅनकोयुव्हेर शहरात झालेल्या टीईडी २०१६ (टेक्नोलॉजी, एंटरटेनमेंट, डिझाईन) परिषदेत  आपल्या भाषणाने सर्वांचीच मने जिंकून घेतली. टीईडी ही बुध्दीवंतांची परिषद समजली जाते. या परिषदेला गुगल, टेसला, अॅपल, अशा बड्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. टीईडी परिषदेची सुरुवात इशिताच्या संबोधनाने झाली. मुलांना प्रथम प्राधन्य आणि मुलांना संधी द्या या विषयावर इशिताने संबोधित केले. दीड महिन्यापूर्वी पुण्यात झालेल्या लोकमतच्या महिला संमेलनाच्या कार्यक्रमातही इशिता सहभागी झाली होती.  मोठे झाल्यावर तुम्हाला काय बनायचे आहे असे मुलांना विचारण्यापेक्षा आता त्यांना काय बनायचे आहे ते विचारा. इशिता संबोधित करत असताना संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते. वर्तमानात आपण मुलांसाठी भरपूर काही करु शकतो. पण सध्या जगात अशा भरपूर शक्ती आहे ज्या मुलांच्या स्वप्नांविरोधात काम करत असल्याचे तिने सांगितले.  इशिताच्या भाषणा दरम्यान अनेक वाक्यांवर प्रेक्षकांनी टाळया वाजवून तिला दाद दिली. भूक, शिक्षण, युध्द या विषयांवर मुलांच्या नजरेतून मते मांडून तिने उपस्थितांची मने जिंकून घेतली.  अवघ्या दहा वर्षाच्या इशिताने सिमरन्स डायरी म्हणून पुस्तक लिहीले आहे. बालेवाडीतील विबग्योर शाळेत शिकणा-या इशिताने आपल्या शाळेत टीईडी परिषद आयोजित केल्यानंतर तिचे हे पुस्तक चर्चेत आले. 
=======================================
चीनमध्ये मासिक पाळीदरम्यान महिलांना रजा! 
बीजिंग (चीन) - महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळावा यासाठी पूर्व चीनमधील एका प्रांतात महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
चीनमधील एका स्थानिक वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. अहुनीतील शासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीदरम्यान त्रास होत असल्यास प्रत्येक महिन्यात एक किंवा दोन दिवसांची रजा देण्यात येणार आहे. जानेवारीमध्ये पूर्व चीनमधील एका  प्रांताच्या 67 व्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत महिला कर्मचाऱ्यांसाठी नवा कायदा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. मासिक पाळीची रजा घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याशिवाय या नव्या कायद्यात प्रसूती रजा आणि एक वर्षापेक्षा कमी वयाचे अपत्य असलेल्या महिलांना स्तनपानासाठी दररोज एक तासाची सूट देण्याचीही तरतूद केली आहे. चीनशिवाय दक्षिण कोरिया, तायवान, इंडोनेशिया यासह अन्य काही देशांमध्येही मासिक पाळीची रजा देण्यात येत आहे. जपानमध्ये सर्वप्रथम अशाप्रकारची रजा देण्यात आली होती.
=======================================
'असा नट होणे नाही'; आमीरकडून नानाचे कौतुक 
मुंबई - अभिनेता आमीर खानने नटसम्राट चित्रपटाच्या अभिनयाबद्दल नाना पाटेकरचे कौतुक केले असून नानाबद्दल ‘असा नट होणे नाही‘ असे गौरवोद्‌गार काढले आहेत. 
आमीरने ट्‌विटरद्वारे म्हटले आहे की, "मी काल रात्री नटसम्राट पाहिला. काय चित्रपट आहे! नानाचा अभिनय विलक्षण आहे. खरोखरच "असा नट होणे नाही‘ अभिनयावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट बघायला हवा. विक्रमजी हे ही काही कमी नाहीत. उत्कृष्ट! नाना आणि विक्रमजी यांच्या अभिनयाने मला खिळवून ठेवले. धन्यवाद महेश, नाना, विक्रमजी आणि संपूर्ण टीम.‘ 


दरम्यान "जलयुक्त शिवार‘ योजनेच्या ब्रॅण्ड ऍम्बेसिडरपदाबाबत आमीर खानच्या नावाची आज चर्चा करण्यात येत होती. दरम्यान ‘आमीर खान का? नाना पाटेकर का नाही?‘ असा प्रश्‍न उपस्थित करत नेटिझन्सनी नाना पाटेकरला ब्रॅण्ड ऍम्बेसिडर करावे अशी अपेक्षा व्यक्‍त करत आहेत. मात्र ब्रॅण्ड ऍम्बेसिडरपदी आमीर खानच्या नावाची बातमी खोटी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
=======================================
केरळ: संघाच्या इमारतीवर फेकले गावठी बॉंब 
कन्नूर - केरळमधील कन्नूर जिल्ह्यामधील थलासेरी गावामधील टेम्पल गेट भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविण्यात येणाऱ्या एका सेवा केंद्रामध्ये; तसेच भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) येथील एका कार्यकर्त्याच्या घरामध्येही आज (बुधवार) पहाटे गावठी बॉंब फेकण्यात आले. 
केरळमध्ये संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याच्या एक दिवसानंतरच हा प्रकार घडला आहे. या बॉंबफेकीमुळे कोणीही जखमी झालेले नाही. संघाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यासंदर्भात भाजपने डाव्या पक्षांवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपच्या उदयाने व्यथित झालेले डावे पक्ष खुनाच्या राजकारणामधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते एम जे अकबर यांनी या पार्श्‍वभूमीवर केली. केरळमधील सातत्याने चाललेल्या हिंसाचाराच्या राजकारणासंदर्भात डाव्या पक्षांकडे कोणतेही उत्तर उरले नसल्याचे सांगत, या राज्यामध्ये 200 हून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मात्र मार्क्‍सवादी पक्षाने हा आरोप फेटाळून लावला आहे. केरळमध्ये लवकरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
=======================================
'वकिलांकडून मारहाण होताना पोलिस बघत होते' 
नवी दिल्ली - पतियाळा हाऊस न्यायालयाबाहेर आज (बुधवार) वकिलांकडून मारहाण होत असताना दिल्ली पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत होते, असा आरोप पत्रकार तारिक अन्वर यांनी केला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना जोरदार मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा न्यायालयाबाहेर वकिलांकडून पत्रकारांना व विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आला होता. तरीही वकिल विक्रम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वकिलांच्या मोर्चाने पत्रकारांना मारहाण केली. तसेच वकिलांना न्यायालयाच्या आवारात वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. 
एका वृत्तसंस्थेचे पत्रकार तारिक अन्वर यांच्यावर वकिलांनी चांगलाच राग काढत त्यांना जोरदार मारहाण केली. पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, असे अन्वर यांनी म्हटले आहे. नुकतीच पतियाळा हाऊस न्यायालयात भाजपचे आमदार ओ. पी. शर्मा यांनी विद्यार्थी व वकिलांना मारहाण केली होती. भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या "जेएनयू‘मधील विद्यार्थी संघटनांचा प्रमुख असलेल्या कन्हैयाकुमार याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 
=======================================
जळगाव: चोपडातून 100 तलवारी जप्त 
जळगाव - जिल्ह्यातील चोपडा येथून आज (बुधवार) सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 100 तलवारी जप्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील एका आईस्क्रिम व्यावसायिकाकडून स्थानिक गुन्हे शाखेने 100 तलवारी जप्त केल्या आहेत. राजस्थान येथील शिरोही येथून मारुती कार मधून या तलवारी आणण्यात आल्या होत्या. या व्यावसायिकास अटक करण्यात आली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
=======================================
मोदी गुजरातमधून बाहेर आलेच नाहीत-राज 
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधून अद्याप बाहेर पडलेच नाहीत. मला वाटलेले देशाचा विचार होईल, पण तसे होत नाही. भाजप सरकार फक्त दिखावूपणा करण्यात हुशार आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे म्हणाले - 
चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्यानंतर आता तो बदलण्यात आला. अशी बोटचेपी भूमिका त्यांनी अनेकवेळा घेतली आहे.
- शिवसेनेची भूमिकाच आतापर्यंत कळली नाही
- सरकारमध्ये राहून फायदे घ्यायचे नंतर सरकारविरोधी धोरणांबद्ददल बोलायचे आणि नंतर लोकांना दायवायचे की आम्ही सरकारमध्ये आहेत आणि विरोधी पक्षातही आहोत
- मेक इन इंडियाचा अर्थच मला आतापर्यंत लागला नाही
- गुजरातमध्ये सिंह प्रसिद्ध असल्यानेच मेक इन इंडियाचा लोगोमध्ये सिंह आहे.
- निव्वळ एमओयूवर सह्या होणे म्हणजे उद्योग येणे असे नाही
- मेक इन इंडियाच्या कार्यक्रमावर अमाप खर्च करण्यात आला 
- मोदींना दर दोन महिन्यांनी असा एखादा कार्यक्रम घ्यावा लागतोच 
- या कार्यक्रमात नशीब फक्त आगच लागली. स्फोट नाही झाला. 
- उच्च न्यायालयाने सांगूनही यांनी काही ऐकले नाही. भाजप सरकार दिखावूपणा करण्यात व्यस्त आहे
- देशातील उद्योगपतींना प्रोत्साहन दिले पाहिजे, परदेशातील उद्योगपतींना आमंत्रण देऊन काय उपयोग?
- गुजरात आणि मुंबई यातून ते बाहेरच पडत नाही. मेक इन इंडिया मुंबईतच का घेतले, दुसऱ्या शहरांमध्ये असा कार्यक्रम का घेतला नाही?
- मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेनच का करण्यात आली?

भाजपविरोधात बोलले की देशद्रोही
देशविरोधी कारवाई करत असतील त्यांना अटक करा. भाजपविरोधात बोलले की देशद्रोही ठरविण्यात येते. तर, त्यांच्या बाजूने बोलले की देशप्रेमी ठरविण्यात येते. काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती करताना भाजपला लाज वाटली नाही का. त्यांनी भारताविरोधात आंदोलने केली होती, पाकिस्तानचे झेंडे फडकाविले होते, यामध्ये फक्त राजकारण करण्यात येत आहे. देशभक्तीचे प्रमाणपत्र भाजपने देण्याची गरज नाही. मतांच्या विभाजनासाठी भाजप सरकार दंगलीही घडवू शकते.
=======================================
क्रौंच पक्ष्यांना शिकाऱ्यांचा फास 


जगातील सर्वात सुंदर आणि उंच विहार करणारा पक्षी म्हणून ओळख असलेला क्रौंच पक्षी मध्य आशियातून लाखो किलोमीटरचे अंतर कापून येतो. भारतात या पक्ष्यांचे परदेशी पाहुणे म्हणून स्वागत केले जाते. मात्र, शिरूर कासार तालुक्यातील सिंदफणा नदीवर या पक्ष्यांची शिकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जगाच्या नकाशावर संकटकालीन पक्षी म्हणून नोंद असलेल्या या पाहुण्या पक्ष्याचे मांस पौष्टिक व चविष्ट असल्याने या पक्ष्यांची हत्या होत असून शिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पक्षिमित्रांनी केली आहे. जिल्ह्यात या वर्षी तीव्र दुष्काळ आहे. बहुतांशी तलावांनी तळ गाठला असला, तरी शिरूर तालुक्यातील सिंदफणा प्रकल्पात मात्र काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तलावाभोवती असणारे रब्बीचे धान्य आणि परिसरातील नसíगक सौंदर्याला भुलून क्रौंच पक्षी वर्षांनुवर्षे येथे वास्तव्यास येतात. जानेवारी महिन्यात लाखोंच्या संख्येने या पक्ष्यांचे थवे येऊन धडकतात. आकाशात सर्वात उंचीवरून येणारे हे पक्षी दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका, मध्य आशियातून लाखो किलोमीटर अंतर कापून येतात. तलावाच्या भोवती या पक्ष्यांची मनमोहक मांदियाळीच दिसते. पर्यटकही या पक्ष्यांना पाहण्यासाठी येथे येत असतात.
=======================================
चीनला धडकी भरवणारी तोफ लवकरच भारतीय लष्कराच्या ताफ्यात - पहा फोटो 












=======================================
महिंद्र करणार ‘एम ७७७ होवित्झर’ तोफांची जोडणी 

‘एम७७७ होवित्झर’ तोफांची जोडणी करण्यासाठी भारतातील महिंद्र उद्योग समुहाची निवड करण्यात आल्याची घोषणा ‘बीएई सिस्टम’ या सुरक्षा, संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने बुधवारी केली. १४५ तोफांची जोडणी आणि परिक्षण करण्यासाठीचा  प्रकल्प महिंद्र सुरू करणार असल्याचे ‘बीएई’ने एका निवेदनाद्वारे जाहीर केले. ‘बीएई’ ही बहुराष्ट्रीय कंपनी अमेरिकेत या तोफांची निर्मिती करते. भारत आणि अमेरिकेदरम्यान १४५ ‘एम७७७ होवित्झिर’ तोफा खरेदी करण्याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आपल्या युद्ध सामग्रीच्या माऱ्याची क्षमता उत्तम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारताने ७० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचा हा करार केला आहे. भारतीय सैन्यदलाची युद्ध सामग्री समृध्द करण्याचे मनोगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्यक्त केले आहे. परदेशी कंपन्या भारतात प्रकल्प उभारतील अशाप्रकारे करार व्हावेत असा पंतप्रधानांचा मानस आहे. असे केल्याने स्थानिक उद्योगाला चालना मिळण्याबरोबर तांत्रिक देवाण-घेवाण देखील समृध्द होईल. 
=======================================
शेक्सपिअरला अनौरस मुलगा होता! 
प्रख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर याला अनैतिक संबंधातून एक मुलगा होता व त्याच्यासाठी त्याने सुनीते लिहिली होती, असा दावा एका नव्या पुस्तकात केला गेला आहे. सॉनेट १२६ यातील सुनीते शेक्सपिअरने ‘माझ्या प्रिय मुलास’ या नावाने संबोधित केली आहेत. या मुलाचे नाव विल्यम डेव्हनंट होते. दोघांची छायाचित्रे बघितली तर त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्याभोवती सारख्या खुणा आहेत. ‘शेक्सपिअर्स बास्टर्ड’ या डेव्हनंट याच्यावर लिहिलेल्या पुस्तकात ही महत्त्वाची माहिती आली आहे. शेक्सपिअरच्या मृत्यूला यंदा चारशे वर्षे पूर्ण होत आहेत, त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे, असे द टाइम्सने म्हटले आहे. लेखक अँड्रय़ू स्टरलिंग यांनी म्हटले आहे की, त्या काळात शेक्सपिअर हा डेव्हनंटचा पिता असल्याच्या अफवा होत्या, पण त्या बुद्धिवंतांनी दाबून टाकल्या. त्यांना शेक्सपिअरच्या प्रतिमेस धक्का लावायचा नव्हता. शेक्सपिअरला त्याची पत्नी अ‍ॅनी हॅथवे हिच्यापासून हॅमेनट हा एकच मुलगा होता, तो वयाच्या अकराव्या वर्षी वारला होता. त्यांना दोन मुली होत्या.‘सॉनेट १२६’ या वेगळ्या प्रकारच्या प्रेमकविता आहेत. त्यांची सुरूवात, ‘ओ दाऊ माय लव्हली बॉय हू इन दाय पॉवर डुएस्ट होल्ड टाइम्स फिकल ग्लास.’ अशी आहे. यात समलिंगी संबंधाकडे निर्देश होतो, कारण कवितेच्या शेवटी तशी काही वाक्ये आहेत. ते सगळे उल्लेख अर्ल ऑफ साउथहॅम्पटनशी संबंधित नसून विल्यम डेव्हनंटशी संबंधित आहेत. त्याचा जन्म १६०६ मध्ये झाला होता. अ‍ॅलेक्झांडर पोप, सर वॉल्टर स्कॉट व व्हिक्टर ह्य़ुगो यांनी शेक्सपिअरबाबत असाच दावा केला होता. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. विल्यम शेक्सपिअर आणि विल्यम डेव्हलंट या दोघांची छायाचित्रे बघितली तर त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्याभोवती सारख्या खुणा आहेत, असे सांगत, असा दावा पुस्तकात करण्यात आला असून, दाव्याच्या पुष्टथ्र्य तपशील सादर करण्यात आल्याने त्यास वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. डेन डेव्हनंट मुलाची आई शेक्सपिअरच्या अनौरस मुलाची आई डेन डेव्हनंट ही होती व तिचा पती जॉन हा मद्याच्या व्यापारात काम करीत होता. डेव्हनंटची सात मुले लंडनमध्ये तरूण वयात वारली व नंतर हे दांपत्य ऑक्सफर्ड कॉलेजनजीक टॅटेलटन येथे स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी आणखी सात मुलांना प्रौढावस्थेपर्यंत वाढवले. तिचा पती शहराचा महापौर होता. 
=======================================
बसव महामोर्चास आ.डाँ.तुषार राठोड यांचा पाठिंबा 
" बसव महामोर्चास आ.डाँ.तुषार राठोड यांचा पाठिंबा "
मुखेड :-
       १२ व्या शतकातील सामाजिक समानतेचे महान क्रांतिकारी महामानव जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा नांदेड येथे भव्य पुतळा उभारण्यासाठी येत्या २२ फेब्रुवारी रोजी नांदेड महानगर पालिकेवर महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीच्या वतीने निघणा-या मोर्चास भारतीय जनता पक्षाचे आमदार डाँ.तुषार राठोड यांनी पाठिंबा जाहिर केला असुन मुखेड-कंधार विधानसभा मतदार संघातील हजारों कार्यकर्त्यांसह मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहीती दिली.
       नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीतील कौठा येथील नियोजित जागी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभरावा यासाठी मागील अनेक वर्षापासुन समाजबांधवांच्यावतीने आंदोलन चालु असुन मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करित आहे. नियोजित जागी महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारावा यामागणी साठी महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समितीच्या वतीने २२ फेब्रुवारीला निघणा-या महामोर्चास भारतीय जनता पार्टी तसेच आमदार डाँ.तुषार राठोड यांनी पाठिंबा जाहिर केला असुन सर्व कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी भाजपाचे खुशालराव पाटील उमरदरीकर, अंगद मैलारे, हणमंत मस्कले, डाँ. विरभद्र हिमगीरे, डाँ.माधव उच्चेकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर, तमप्पा गंदिगुडे, शिवाजी राठोड, टी.व्ही.सोनटक्के, बोधने, चिट्टे, चिवळीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments: