[अंतरराष्ट्रीय]
१- सिंगापूर; कच्च्या तेलाचे भाव सावरले
२- सीरियात बॉम्बस्फोटात 130 जणांचा मृ्त्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- सरकार अस्थिर करण्यासाठी अनेकांचे षडयंत्र : मोदी
४- उमर खालिद जेएनयूमध्ये परतला, अद्याप अटक नाही
५- मी मुस्लिम आहे, पण दहशतवादी नाही - उमर खालिद
६- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गप्पा मारणाऱ्यांना धोनीची चपराक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- लातूरमध्ये भगवा फडकवण्यास विरोध करणाऱ्या पोलिसांना मारहाण
८- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 मार्चपर्यंत दरडदुरुस्ती
९- राज्यभर 'पाणी'बाणी, मात्र कल्याणमध्ये महापूर, दोन दुचाकी वाहून गेल्या
१०- शिवरायांचे पुतळे आणि स्मारक करण्यापेक्षा गडकोट-किल्ल्यांचे जतन करा- राज ठाकरे
११- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी पाडणे सुरु
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- 'सिंगल' महिलांना मोबाईलबंदी, गुजरातमधील गावात फतवा
१३- कॅप्टन पवन कुमार यांची शेवटची फेसबुक पोस्ट
१४- हार्बर रेल्वे विस्कळीत, सीएसटीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड
१५- ठाणे; संघात मारायची वेळ आल्यावर बौद्धिक घेतात-पोंक्षे
१६- जाट आरक्षण आंदोलन - दिल्ली-अंबाला एनएच १ वर मूर्थाल येथे आंदोलकांनी पुन्हा वाहतूक रोखली.
१७- दिल्ली जल बोर्डाच्या सीईओंचे दिल्लीकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन.
१८- अहमदाबाद विमानतळावरील विद्युत स्टेशनमध्ये स्फोट होऊन मोठी आग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- मला बोल्ड, मादक अभिनेत्रीचा शिक्का पुसायचाय - सनी लिऑन
२०- हायटेक फीचर्स, सॅमसंग गॅलक्सी S7, S7 Edge लाँच
२१- वॅगनरचा बाऊन्सर स्मिथच्या डोक्यावर आदळला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गजानन दावे, मनोज विनकरे, स्वप्नील शिंदे, सतीश परदेसी, बालमा मस्के, विजय पेठकर, मोहम्मद शफिक, वैजनाथ स्वामी, प्रमोद देशमुख, दीपक डोंतेवाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
===================================

===================================

===================================

===================================

===================================

===================================

===================================

===================================
हार्बर रेल्वे विस्कळीत, सीएसटीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड
===================================
===================================
शिवरायांचे पुतळे आणि स्मारक करण्यापेक्षा गडकोट-किल्ल्यांचे जतन करा- राज ठाकरे
संघात मारायची वेळ आल्यावर बौद्धिक घेतात-पोंक्षे
सिंगापूर; कच्च्या तेलाचे भाव सावरले
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी पाडणे सुरु
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ धोकादायक दरडी पाडण्याच्या कामास रस्ते विकास महामंडळाच्या वतीने आज (सोमवार) सकाळी सुरवात करण्यात आली.
सीरियात बॉम्बस्फोटात 130 जणांचा मृ्त्यू
दमास्कस - सीरियातील दमास्कस व होम्स शहरात रविवारी रात्री झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात सुमारे 130 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्लामिक स्टेटने (इसिस) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दमास्कसमधील सैयदा जैनब येथे चार ठिकाणी आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आले. यात 83 नागरिकांचा मृत्यू झाला. सैयदा जैनब हे शिया धर्मियांचे पवित्र स्थान मानले जाते. तर, होम्स शहरात दोन ठिकाणी झालेल्या कार बॉम्बस्फोटात 57 नागरिकांचा मृत्यू झाला. शिया धर्मियांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले आहेत. इराक आणि सीरियातील दहशतवादी कारवाया करत असलेल्या इसिसने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सीरियातील अंतर्गत युद्ध विरामासाठी रशियाबरोबर एक करार करण्यात आल्याचे म्हटले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याशी केरी यांनी चर्चा केली, त्यानंतर युद्धबंदीबाबत चर्चा झाली. सीरियात सुरु असलेले युद्ध संपुष्टात आणण्यासाठी जगभरातील प्रमुख देश प्रयत्न करत आहेत.
===================================
मुनाक कालव्यावर लष्काराचे नियंत्रण
सरकार अस्थिर करण्याचा कट - मोदी

१- सिंगापूर; कच्च्या तेलाचे भाव सावरले
२- सीरियात बॉम्बस्फोटात 130 जणांचा मृ्त्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- सरकार अस्थिर करण्यासाठी अनेकांचे षडयंत्र : मोदी
४- उमर खालिद जेएनयूमध्ये परतला, अद्याप अटक नाही
५- मी मुस्लिम आहे, पण दहशतवादी नाही - उमर खालिद
६- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गप्पा मारणाऱ्यांना धोनीची चपराक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- लातूरमध्ये भगवा फडकवण्यास विरोध करणाऱ्या पोलिसांना मारहाण
८- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 मार्चपर्यंत दरडदुरुस्ती
९- राज्यभर 'पाणी'बाणी, मात्र कल्याणमध्ये महापूर, दोन दुचाकी वाहून गेल्या
१०- शिवरायांचे पुतळे आणि स्मारक करण्यापेक्षा गडकोट-किल्ल्यांचे जतन करा- राज ठाकरे
११- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी पाडणे सुरु
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- 'सिंगल' महिलांना मोबाईलबंदी, गुजरातमधील गावात फतवा
१३- कॅप्टन पवन कुमार यांची शेवटची फेसबुक पोस्ट
१४- हार्बर रेल्वे विस्कळीत, सीएसटीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड
१५- ठाणे; संघात मारायची वेळ आल्यावर बौद्धिक घेतात-पोंक्षे
१६- जाट आरक्षण आंदोलन - दिल्ली-अंबाला एनएच १ वर मूर्थाल येथे आंदोलकांनी पुन्हा वाहतूक रोखली.
१७- दिल्ली जल बोर्डाच्या सीईओंचे दिल्लीकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन.
१८- अहमदाबाद विमानतळावरील विद्युत स्टेशनमध्ये स्फोट होऊन मोठी आग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- मला बोल्ड, मादक अभिनेत्रीचा शिक्का पुसायचाय - सनी लिऑन
२०- हायटेक फीचर्स, सॅमसंग गॅलक्सी S7, S7 Edge लाँच
२१- वॅगनरचा बाऊन्सर स्मिथच्या डोक्यावर आदळला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गजानन दावे, मनोज विनकरे, स्वप्नील शिंदे, सतीश परदेसी, बालमा मस्के, विजय पेठकर, मोहम्मद शफिक, वैजनाथ स्वामी, प्रमोद देशमुख, दीपक डोंतेवाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
===================================
उमर खालिद जेएनयूमध्ये परतला, अद्याप अटक नाही
देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेला उमर खालिद जेएनयू कॅम्पसमध्ये परतला आहे. त्याच्यासोबत आणखी चार विद्यार्थीही कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत. माय नेम इज उमर खालिद, अँड आय एम नॉट अ टेररिस्ट, अशी डायलॉगबाजी उमर खलिदने कॅम्पसमध्ये परतल्यानंतर केली.
हे पाच विद्यार्थी काल रात्री उशिरा जेएनयूच्या कॅम्पसमध्ये दाखल झाल्याचं समजतं. यात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या उमर खालिदचा समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री आठच्या सुमारास आशुतोष, अनंत, रामा आणि अनिर्बान हे विद्यार्थी जेएनयू कॅम्पसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांसमोर भाषणही केलं. यावेळी उमरनेही विद्यार्थ्यांना संबोधीत केल्याचं समजतं.
===================================
कॅप्टन पवन कुमार यांची शेवटची फेसबुक पोस्ट
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पाम्पोरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कॅप्टन पवन कुमार यांना वयाच्या अवघ्या 23 वर्षी वीरमरण आलं. पण शहीद होण्यापूर्वी त्यांची फेसबुक पोस्ट ही मन हेलावणारी आणि देशातील सध्याच्या वातावरणावर भाष्य करणारी होती.
फेसबुकवरील शेवटची पोस्ट
शहीद कॅप्टन पवन कुमार यांची शेवटची फेसबुक पोस्ट होती, “किसी को रिझर्व्हेशन चाहिए तो किसी को आजादी भाई। हमें कुछ नहीं चाहिए भाई। बस अपनी रजाई”
देशात सुरु असलेलं जाट आंदोलन आणि जेएनयू वादावर कॅप्टन पवन कुमार यांनी टोला लगावला आहे. मात्र त्याचवेळी देशाच्या रक्षणासाठी प्राण अर्पण केलेल्या या वीरजवानाने आपल्याला काहीही नको असंही सांगितलं आहे.
===================================लातूरमध्ये भगवा फडकवण्यास विरोध करणाऱ्या पोलिसांना मारहाण
लातूर : शिवजयंतीच्या निमित्ताने भगवा झेंडा फडकवण्यास विरोध केलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना लातूरमधील पानगावात घडली आहे. याप्रकरणी 17 जणांना अटक करण्यात आली असून त्यात अल्पवयीन तरुणांचाही समावेश आहे. त्यांच्यावर दोन पोलिसांच्या हत्येचा आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रेणापूर तालुक्यातील पानगावमधील आंबेडकर चौक संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. याच चौकात 19 फेब्रुवारीला शिवाजी जयंती मंडळाचे तरुण भगवा फडकावण्यासाठी आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी जयंती मंडाळाचे दोन डझनहून अधिक तरुण आंबेडकर चौकात भगवा फडकवण्यासाठी आले होते. संवेदनशील परिसर असल्याने पोलिसांनी या तरुणांना भगवा फडकवण्यास मनाई केली. त्यानंतर ते तरुण तिथून निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चौकात येऊन पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. यानंतर तरुणांच्या गटाने पोलिसांना माराहाण केली. शिवाय दगडफेकही केली.
पोलिसांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. स्थानिक दुकानदाराने काढलेल्या फोटोंच्या आधारे एका 17 वर्षीय तरुणासह 17 जणांना अटके केल आहे, अशी माहिती लातूरचे पोलिस उपअधीक्षक विकास नाईक यांनी दिली.
===================================मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 11 मार्चपर्यंत दरडदुरुस्ती
पुढच्या 19 दिवसांत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरचा प्रवास काहीसा त्रासदायक ठरण्याची चिन्हं आहेत. कारण 22 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान या महामार्गावरील एक लेन दरड हटवण्याच्या कामासाठी बंद राहणार आहे.
अमृतांजन पूल ते खंडाळा बोगद्यादरम्यान एक लेन दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरुस्ती करण्यासाठी एक्सप्रेस वेच्या तीन लेनपैकी एक लेन 11 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.
या काळात मुंबई-पुणे जुना महामार्ग खुला राहिल. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन एमएसआरडीसीने केलं आहे.
दरडी कोसळल्यामुळे पावसाळ्यात मोठे अपघात घडले होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी दरडदुरुस्तीचं काम करण्यात आलं होतं. आता पुन्हा धोकादायक दरडी काढण्याचं काम केलं जात आहे.
==================================='सिंगल' महिलांना मोबाईलबंदी, गुजरातमधील गावात फतवा
अहमदाबाद : उत्तरेकडील काही राज्यांमधल्या गावांतील पंचायतींनी महिलांच्या वस्त्रांवर, मोबाईल वापरावर निर्बंध लादल्याच्या बातम्या यापूर्वी चर्चेत होत्या. याच प्रकारचे वारे गुजरातमधील काही गावांमध्ये पसरल्याचं चित्र आहे. अविवाहित तरुणींना मोबाईल वापरास बंदी घालण्याचा फतवा सुरज या गावात काढण्यात आला आहे.
गुजरातमधील मेहसाणा तालुक्यातील सुरज गावात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. अभ्यास आणि घरातील कामं करताना अडथळे येत असल्याचं कारण पुढे करत अविवाहित तरुणींना ही मोबाईलबंदी जारी करण्यात आली.
विशेष म्हणजे नियम मोडणाऱ्या तरुणींना 2100 रुपयांचा दंड ठोठवण्यात येणार आहे. एखादी तरुणी मोबाईल वापरत असल्याची माहिती दुसऱ्या व्यक्तीने दिल्यास, त्यांना 200 रुपयांचं बक्षीसही देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजीटल इंडियाच्या दिशेने वाटचाल केली असताना त्यांच्याच गुजरातमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीतलं मागासलेपण चर्चेचा विषय ठरत आहे.
हायटेक फीचर्स, सॅमसंग गॅलक्सी S7, S7 Edge लाँच
बार्सिलोना : सॅमसंगने गॅलक्सी सीरीजमधले S7 आणि S7 Edge हे त्यांचे महत्त्वाकांक्षी स्मार्टफोन लाँच केले आहेत. बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या प्री-इव्हेंटमध्ये हे लाँचिंग करण्यात आलं.
सॅमसंगच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये हायटेक फीचर्स आहेत. 11 मार्च 2016 पासून सॅमसंग गॅलक्सी S7 आणि S7 एज हे फोन यूझर्सना उपलब्ध होतील. दोन्ही फोनच्या किमती अद्याप सॅमसंगने जाहीर केलेल्या नाहीत.
सॅमसंग गॅलक्सी S7 चे फीचर्स :
5.1 इंचाचा सुपर AMLOED डिस्प्ले स्क्रीन
ऑलवेज ऑन डिस्प्ले, वेळ आणि कॅलेंडर पाहता येणार
क्विक अॅक्सेस कंटेंट टेक्नॉलॉजी
1.6GHz Exynos 8890 ऑक्टाकोअर प्रोसेसर
4GB रॅम
12 मेगापिक्सेल रेअर, 5 मेगापिक्सेलचा सेल्फी (फ्रंट) कॅमेरा, ड्यूएल एलईडी फ्लॅश
32GB मेमरी (मायक्रो SD कार्ड स्लॉट)
पूर्णपणे वॉटरप्रूफ स्मार्टफोन (IP68 सर्टिफिकेट)
3000mAh बॅटरी
वायरलेस चार्जिंग
सरकार अस्थिर करण्यासाठी अनेकांचे षडयंत्र : मोदी
भुवनेश्वर : सरकार अस्थिर करण्यासाठी आणि मला बदनाम करण्यासाठी अनेकजण षडयंत्र रचत आहेत, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. मात्र अशा षडयंत्रांसमोर न झुकता मी आपलं काम करतच राहणार, असं मोदी म्हणाले.
यावेळी मोदींचा निशाणा स्वयंस्वेवी संस्थांवर होता.
एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, ही बाबच अनेकजण अद्याप पचवू शकत नाहीत. त्यामुळेच हे सरकार पाडण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप मोदींनी केला.
आमचं सरकारहे गरीब, दलित आणि दबलेल्या समाजांच्या विकासासाठी आहे, असं मोदींनी नमूद केलं.
गडचिरोलीत नदीत बोट उलटून सहा प्रवासी बेपत्ता, शोध सुरु
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गोदावरी नदीत बोट उलटल्याने 6 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही बोट सिरोंचा तालुक्यातून तेलंगणामध्ये जात होती.
सिरोंचाहून बोटीने कन्नेपल्लीच्या दिशेने जात असताना बोट तात्पुरत्या पुलाला आदळली. यावेळी बोटीत एकूण 22 प्रवाशी होते. त्यापैकी 16 जणांना वाचवण्यात यश आलं असून 6 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. त्यांचा शोध अजूनही सुरु आहे.
गोदावरी नदीवर पुलाचं बांधकाम सुरु आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी तात्पुरता पूल बांधण्यात आला आहे. पण पुलाच्या कामामुळे नदीचा प्रवाह वळवण्यात आला. शनिवारपासून या भागातील रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे बोटीने प्रवास करण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नाही.
राज्यभर 'पाणी'बाणी, मात्र कल्याणमध्ये महापूर, दोन दुचाकी वाहून गेल्या
ठाणे: राज्यभर पाण्यासाठी वणवण सुरु असताना कल्याणमध्ये मात्र रस्त्यावरच महापूर आला आहे. पण हा महापूर पावसामुळं नाही तर अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळं आला आहे.
शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद असल्यानं एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जात नाही.पण याची बारवी धरणावरील अधिकाऱ्यांना कल्पनाच नसल्यानं त्यांनी एमआयडीसीसाठी पाणी सोडलं. पण त्या पाण्याची उचल झाली नसल्यानं हे सगळं पाणी रस्त्यावरुन अक्षरश: एखाद्या नदीला पूर आल्याप्रमाणं वाहू लागलंय.
धक्कादायक गोष्ट म्हणजे या पाण्यातून दोन मोटारसायकल देखील वाहून गेल्या आहेत. त्यामुळं या अधिकाऱ्यांच्या कारभारावर बोलण्यासाठी शब्दच नाहीत.
एकीकडे पाण्यावाचून नागरिक तडफडत असताना दुसरीकडे पाण्याचीही नासाडी परवडणारी नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गप्पा मारणाऱ्यांना धोनीची चपराक
मुंबई : नवी दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील वादावरून देशभरात राळ उठली आहे. देशाविरोधी घोषणा देण्याच्या वादानंतर, कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि क्रिकेटर शिखर धवन यांनी देशाचा सन्मान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला आहे.
धोनीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून भांडणाऱ्यांना टोमणा हाणला आहे. तसंच धोनीने देशाच्या जवानांचं आभार मानले आहेत. जवानांच्या सुरक्षा कवचामुळेच देशात आपण सुरक्षित राहू शकत असल्याचं धोनीने म्हटलं आहे.
धोनीने आज ट्विट करून आपलं म्हणणं मांडलं आहे.
धोनी म्हणतो, “देशाच्या जवानांचं सुरक्षा कवच आहे. त्यामुळेच आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल वादविवाद घालण्याची मोकळीक आहे”.
वॅगनरचा बाऊन्सर स्मिथच्या डोक्यावर आदळला
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीदरम्यान न्यूझीलंडचा गोलंदाज नील वॅगनरचा चेंडू स्टीव्हन स्मिथच्या डोक्याला लागला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला.
सामन्याच्या 76 व्या षटकात नील वॅगनरचा बाऊन्सर थेट स्टीव्हन स्मिथच्या डोक्याला आदळला. सुदैवानं स्मिथनं हॅल्मेट घातल्यामुळं त्याला गंभीर दुखापत झाली नाही. पण चेंडू जोरात लागल्यानं स्मिथ काही काळ मैदानावर पडून राहिला.
त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीनं उपचार केले. त्यानंतर स्मिथ पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. मग स्मिथनं आपलं कसोटी कारकीर्दीतलं चौदावं शतकही साजरं केलं.
हार्बर रेल्वे विस्कळीत, सीएसटीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड
- मुंबई, दि. २२ - ७२ तासांच्या जम्बोब्लॉक कोंडीतून हार्बरच्या प्रवाशांची सुटका होते ना होते तोच पुन्हा सोमवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सीएसटीजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बरमार्गावरील गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.या बिघाडामुळे वाशी, पनवेल आणि अंधेरीच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन प्रवाशांच्या कामावर जायच्यावेळी हा तांत्रिक बिघाड उदभवल्याने नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. मागच्या काही दिवसात हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक अनेकदा विस्कळीत झाली आहे.हार्बरवरील बारा डब्यांच्या लोकलसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कामांसाठी १९ फेब्रुवारीपासून ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. हे काम अखेर २१ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात आल्याने हार्बरवासीयांची अखेर ७२ तासांच्या ब्लॉककोंडीतून सुटका झाली होती.सीएसटीत पूर्ण केलेल्या सर्व कामानंतर आठवड्यातील पहिला कामाचा दिवस कोणताही बिघाड न होता व्यवस्थित जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र आठवडयाच्या पहिल्याच हार्बरच्या प्रवाशांना मनस्तापाच्या अनुभवातून जावे लागत आहे.
मला बोल्ड, मादक अभिनेत्रीचा शिक्का पुसायचाय - सनी लिऑन
- मुंबई, दि. २२ - बॉलिवुड अभिनेत्री सनी लिऑनला आपली प्रतिमा बदलायची आहे. तिच्यावर जो हॉट, बोल्ड, मादक अभिनेत्रीचाशिक्का बसला आहे तो तिला पुसायचा आहे. त्यामुळे सनीने यापूर्वी ज्या बोल्ड भूमिका केल्या त्यापेक्षा वेगळया भूमिका करण्याचा निर्णय घेतला आहे.अभिनयाला वाव मिळेल आणि अभिनेत्री म्हणून तिची क्षमता दिसेल असे काम करण्याची सनीची इच्छा आहे. मस्तीझादे चित्रपटानंतर माझ्या वाटयाला आणखीं विनोदी भूमिका येतील अशी मला अपेक्षा आहे. माझे आणखी दोन चित्रपट येत आहेत ज्यात माझ्या वेगळया भूमिका आहेत असे सनीने सांगितले. पटकथा वाचल्यानंतर त्यात माझ्या भूमिकेला वाव असेल तर, चित्रपटात काम करण्याचा उत्साह वाढतो असे सनीने सांगितले. बॉलिवुडमध्ये काम करत असताना व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राखणे कठिण जात असल्याचे सनीने सांगितले.
मी मुस्लिम आहे, पण दहशतवादी नाही - उमर खालिद
- नवी दिल्ली, दि. २२ - मागच्या सात वर्षात कॅम्पसमध्ये वावरत असताना कधीही मला मी मुस्लिम असल्याचे जाणवले नाही. मात्र मागच्या दहा दिवसात मला मी मुस्लिम असल्याचे वाटू लागले आहे.मी मुस्लिम आहे पण दहशतवादी नाही असे जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप असलेला उमर खालिद म्हणाला. मागच्या काही दिवसांपासून फरार असलेला उमर खालिद आणि अन्य पाच आरोपी रविवारी रात्री जेएनयूमध्ये दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना उमर खालिदने आपण देशविरोधी नसल्याचा दावा केला. देशविरोधी घोषणाबाजीनंतर सरकारने कारवाई सुरु केल्यानंतर उमर खालिद फरार झाला होता. मिडीया ट्रायलच्या माध्यमातून मला दहशतवादी ठरवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्याचाही खालिदने निषेध केला. ९ फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमामुळे विद्यापीठावर कारवाई झाली नाही तर, सरकारला कारवाई करण्यासाठी कारण हवे होते असे उमर खालिद विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना म्हणाला. गल्फ आणि काश्मिरमध्ये ८०० फोन केल्याचा आरोपही खालिदने फेटाळून लावला. उमर खालिद जेएनयूमध्ये असला तरी रात्री विद्यार्थ्यांनी केलेल्या विरोधामुळे पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. सोमवारी सकाळी दिल्ली पोलिस कारवाईची पुढची पावले उचलतील.
शिवरायांचे पुतळे आणि स्मारक करण्यापेक्षा गडकोट-किल्ल्यांचे जतन करा- राज ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे करण्यापेक्षाही त्यांची खरी स्मारकं असलेल्या गडकोट-किल्ले पोखरले जात आहेत, त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केले. गड-किल्ले हीच शिवरायांची स्मारकं असताना अरबी समुद्रातील स्मारकाची गरजच काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गार्डियन, गिरिप्रेमी इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटेनियिरगच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांच्या हस्ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ गिर्यारोहक एन. के. ऊर्फ आबासाहेब महाजन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गार्डियनचे अध्यक्ष मनीष साबडे, गिरिप्रेमी संस्थेचे संचालक उमेश झिरपे, विजय जोशी, सल्लागार समिती सदस्य उष:प्रभा पागे, आनंद पाळंदे आणि माजी महापौर माऊली शिरवळकर या वेळी उपस्थित होते. ‘‘बाबासाहेब पुरंदरे यांनी पारदर्शकतेने इतिहास मांडला. शिवाजी या तीन अक्षरांसाठी आयुष्य वेचलेल्या बाबासाहेबांना मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून कसले घाणेरडे राजकारण करता,’’ असा सवालही राज ठाकरे यांनी केला. ‘‘गड-किल्ल्यांवर जाणे ही एक कला आहे. मात्र, आता डोंगरच्या डोंगर एक तर खासगी मालकीने विकले तरी जात आहेत किंवा पोखरून तरी काढले जात आहेत. अमेरिकेमध्ये असे प्रकार घडण्याची सुरूवात झाली तेव्हा तेथील चित्रकारांनी अशा निसर्गदृश्यांची चित्रे चितारून प्रदर्शन भरविले आणि ही दृश्ये आता केवळ चित्रांतूनच पहावी लागणार असे सूचित केले. त्यानंतर अब्राहम िलकन यांनी नायगरा धबधबा आणि ग्रँट केनियन हे ताब्यात घेऊन राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केले. लवासा आणि अॅम्बी व्हॅली अशा खासगी प्रकल्पांमुळे आमचाच निसर्ग आम्हाला पैसे देऊन बघावा लागत आहे. पर्वतीवर तर गवत उगवावं तशा झोपडय़ा उगवल्या. गड-किल्ल्यांवर गिर्यारोहकांचा राबता असेल तर हे होणार नाही,’’ असेही त्यांनी सांगितले. गड-किल्ल्यांवर फिरण्याची आवड, गडांची वैशिष्टय़े, गडांवर फिरताना आलेले चांगले अनुभव आणि कटू प्रसंग यांना उजाळा उत्तरार्धातील बाबासाहेब पुरंदरे आणि एन. के. महाजन यांच्याशी झालेल्या मुलाखतीतून मिळाला. राहुल सोलापूरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. इतिहासाचा अभ्यास, संशोधन, चिकित्सा आणि चर्चा झाली पाहिजे. पण, हे करताना इतिहासाची आणि महापुरुषांची कुचेष्टा होता कामा नये, असे पुरंदरे यांनी सांगितले. गिर्यारोहण करताना गडावर चढण्यामध्ये येणारी मजा पैसे देऊनही विकत घेता येत नाही, असे महाजन यांनी सांगितले.
===================================संघात मारायची वेळ आल्यावर बौद्धिक घेतात-पोंक्षे
ठाणे - संघामध्ये बारा वर्ष शाखेत जात होतो; मात्र ते दंड शिकवितात; पण मारायची वेळ आल्यावर बौद्धिक घेतात. मला अनेक टाळकी फोडाविशी वाटतात; पण नुसती राखी वा नमस्ते सदा... म्हणून काहीही होणार नाही. म्हणून आपण संघातून बाहेर पडलो. असे परखड मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी रविवारी (ता. 21) व्यक्त केले. "मी नथुराम बोलतोय...‘ या गाजलेल्या नाटकाचे प्रयोग थांबविल्याबद्दल खंत व्यक्त करीत असतानाच नाटकातून नथुरामांच्या राष्ट्रभक्तीचाच प्रसार केला जात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
सध्या मराठी रंगभूमीमध्ये कोणीही येतो, काहीही लिहितो आणि त्याला नाटककार म्हटले जाते. काही जणांकडून काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी नाटके काढली जातात. त्यातून नाट्यचळवळीला काहीही फायदा होत नसून, मोठा फटका बसत आहे, असेही पोंक्षे यांनी सांगितले.
नाट्यसंमेलनातील नटवर्य मामा पेंडसे रंगमंचावर पोंक्षे यांच्याशी संवादक समीर लिमये यांनी मुक्त संवाद साधला. सुमारे सव्वा तास रंगलेल्या या संवादात पोंक्षे यांनी बालपणापासून मी नथुराम... ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाबाबत परखड भूमिका मांडली. त्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली. माझे नाटकाशी अतूट नाते आहे. मी नाटकाशिवाय जगू शकत नाही. सुमारे 20 ते 25 वर्षांपूर्वीच्या नाटकाची आठवण आजही काढली जाते; मात्र दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मालिकांचे भाग दुसऱ्या दिवशी आठवत नाहीत. अवघ्या दोन महिन्यांनंतरही मालिकाही विसरल्या जातात; मात्र सध्या मराठी रंगभूमीवर चांगली नाटके येत नाहीत. नाटक संपल्यावर प्रेक्षकांनी काही तरी संचित घेऊन जावे, असे नाटक हवे; मात्र आता नाटकाची पूर्वीची झिंग-नशा येत नाही. सध्या कोणीही येऊन नाटक काढतो, अशी स्थिती आहे. कोणालाही नाटककार म्हटले जाते. काहीही लिहिले जाते. काळा पैसा पांढरा काढण्यासाठी काही जणांकडून नाटके काढली जातात, या प्रकाराचा नाटकाला फटका बसत आहे, असे मत पोंक्षे यांनी व्यक्त केले.
===================================सिंगापूर; कच्च्या तेलाचे भाव सावरले
सिंगापूर - जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनवार मर्यादा घालण्यास सहमती दर्शवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आज (सोमवार) कच्च्या तेलाचे भाव सावरले. अमेरिकी कच्च्या तेलाचा भाव 30 डॉलर प्रती बॅरल झाला आहे.
मागील आठवड्यात प्रमुख तेल निर्यातदारांनी आंतरराष्ट्रीय बाजारात होणारा अतिरिक्त तेल पुरवठा रोखण्याचा करार करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. तेलाचा अतिरिक्त पुरवठा होत असल्याने महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या भावाने तेरा वर्षांतील नीचांक गाठला होता.
प्रत्येक देशाने नियम पाळल्यास सौदी अरेबिया व रशिया या प्रमुख उत्पादकांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनाचे प्रमाण कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. परंतु इराण व इराकने याविषयी समर्थन न दर्शविल्यामुळे गुंतवणूकदारांनी कराराच्या यशस्वितेबद्दल शंका निर्माण झाली होती. त्यामुळे मागील आठवडाभर कच्च्या तेलात घसरण कायम राहिली.
सध्या तेलाच्या किंमतींवर दबाव कायम राहण्याची चिन्हे असून अतिरिक्त पुरवठा कितपत कमी होईल याविषयी भारतीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
===================================मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरडी पाडणे सुरु
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ धोकादायक दरडी पाडण्याच्या कामास रस्ते विकास महामंडळाच्या वतीने आज (सोमवार) सकाळी सुरवात करण्यात आली.
दरडी पाडण्याच्या कामासाठी मुंबईहुन पुण्याकडे येताना यापट्ट्यात एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावर वाहतुकीची फारशी वर्दळ नाही. मात्र दरडी पाडण्याच्या कामामुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे. द्रुतगती मार्गावर किलोमीटर क्र.45/450 ते कि.मी.क्र. 45/950 या तीनशे मीटरच्या पट्ट्यात धोकादायक दरडींवर संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम सुरु आहे. यामुळे सुट्या झालेल्या दरडी धोकादायक स्थिती असल्याने रस्ते विकास महामंडळाच्या वतीने 22 फेब्रुवारी ते 11 सप्टेंबर दरम्यान द्रुतगती मार्गावर टप्प्या-टप्प्यात दरडी पाडण्याचे काम करण्यात येणार आहे.
सोमवारी (ता. 22) सकाळीच अमृतांजन पुलाजवळ द्रुतगती मार्गावर बॅरीकेंटींग करत एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत लूज स्केलिंगचे काम सुरु ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वाहतुकीचा त्रास टाळण्यासाठी द्रुतगती मार्गावरील कामाची स्थिती व माहीती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
===================================सीरियात बॉम्बस्फोटात 130 जणांचा मृ्त्यू
मुनाक कालव्यावर लष्काराचे नियंत्रण
हरियानातील मुनाक कालव्यातून दिल्लीला होणारा पाणीपुरवठा आज (सोमवार) सायंकाळपर्यंत पूर्ववत होणार असून, लष्कराने मुनाक कालव्यावर नियंत्रण मिळविले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लष्कराचे आभार मानले आहेत.
जाट आंदोलनामुळे दिल्लीला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर लष्करी जवानांनी आज सकाळी हरियानातील मुनाक कालव्यावर नियंत्रण मिळविले. दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री कपिला मिश्रा यांनी लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, सध्यातरी काही भीतीचे वातावरण नाही असे म्हटले आहे.
दिल्ली जल बोर्डाचे अधिकारी मुनाक कालव्यावर दाखल झाले असून, आज सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरु होईल. अरविंद केजरीवाल यांनी लष्कर व केंद्र सरकारचे आभार मानत, दिल्लीला मोठा दिलासा मिळाला असल्याचे म्हटले आहे.
===================================सरकार अस्थिर करण्याचा कट - मोदी
बारगड (ओडिशा) - देशातील काही असंतुष्ट स्वयंसेवी संस्था आणि काळा पैसावाले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असून, हीच मंडळी माझी बदनामी करत आहेत, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील किसान रॅलीत बोलताना केला; पण या आव्हानांसमोर आपण झुकणार नसल्याचा निर्धारही त्यांनी येथील सभेत बोलून दाखविला. एक चहावाला पंतप्रधान झाल्याचे अनेकांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे ही मंडळी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
भूतकाळातील घटनांमध्ये डोकावले तर नेहमीच माझ्यावर हल्ले झाल्याचे दिसून येते, काही लोक वारंवार हेच काम करत आहेत. मोदी पंतप्रधान झाले हे त्यांच्या पचनीच पडलेले नाही, असे सांगत त्यांनी नीम कोटिंग फॅक्टरीचे उदाहरण दिले. नीम कोटिंगचे काम आम्ही हातात घेतल्याने रसायन कारखाने आमच्यावर नाराज होणार नाहीत का?, जे मोदींच्या विरोधात आहेत त्यांना ही मंडळी मदत नाही का करणार? या स्वयंसेवी संस्थांना परदेशातून निधी मिळत असून, आम्ही याच संस्थांच्या खात्यांची तपासणी केली आहे. आता हीच सर्व मंडळी ‘मोदी को मारो’, अशी घोषणा देत एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
===================================
No comments:
Post a Comment