Tuesday, 16 February 2016

नमस्कार लाईव्ह १६-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- रशियातील मेडिकल अकॅडमीत आग, नवी मुंबई-पुण्याच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
२- कराची; हिंदू विवाह विधेयकातील वादग्रस्त कलम वगळा
३- जिनेव्हा; विश्वाच्या प्राथमिक स्थितीची प्रतिकृती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- सियाचीन हिमस्खलनाबाबत पूर्वकल्पना होती : मनोहर पर्रिकर
५- कॉ. पानसरेंवरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, तपास अजूनही दिशाहीन
६- ‘महाराष्ट्र रजनी’ चुकीच्या ठिकाणीच !, आग विझली आता राजकारण पेटलं
७- हरियाना; आयसीयूमध्ये लैंगिक जबरदस्ती करणा-या आरोपीची ओळख पटली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- शोभेचे फटाके फोडल्यानं भडकली आग, अग्निशमनची सूचना डावलल्याची चर्चा
९- देवाला हात जोडून प्रवासी रेल्वे प्रवास करतात: हायकोर्ट
१०- देशद्रोहाच्या आरोपाखाली एस ए आर गिलानी यांना अटक
११- देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना पैलवान योगेश्वर दत्तची कवितेतून चपराक
१२- राज्य सरकारने हिरावला मुक्या जनावरांचा घास; चारा छावण्या बंद
१३- उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी काढला एकत्र सेल्फी
१४- उद्योगांची पसंती महाराष्ट्रालाच
१५- पुण्यात नव्या विमानतळाची घोषणा
१६- दिल्ली; न्यायालयात विद्यार्थी, पत्रकारांना मारहाण
१७- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची आसाममधील शिवसागर जिल्ह्यात पदयात्रा
१८- मध्य प्रदेश : जर कोणी भारताच्या विरोधात घोषणा देत असेल, तर तो अक्षम्य गुन्हा आहे - शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी
२०- लखनऊ; कुमार विश्‍वास यांची पत्रकार परिषद उधळली
२१- केरळमध्ये रा.स्व. संघ कार्यकर्त्याची हत्या
२२- केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्ये प्रकरणी आठ जणांना अटक
२३- विरारमधून अपहरण झालेली शिल्पी वर्मा पंजाबमध्ये सापडली
२४- अलिबाग; गिधाड संवर्धनासाठी सायकल रॅली
२५- डॉकयार्ड रोड ते सीएसटी रेल्वे प्रवास होणार एलिव्हेटेड
२६- अहमदाबाद; ...म्हणे ‘महात्मा’ उपाधी टागोरांनी दिली नव्हती!
२७- दिल्ली; कुलगुरूंच्या बडतर्फीस राष्ट्रपतींकडून मंजुरी
२८- नागपूर; मेडिकलच्या शवविच्छेदगृहात गेले पंचवीस वर्षे मोहन तोमस्कर यांची सेवा
२९- कोल्हापूर: लक्ष्मीपुरी येथील दुकानांना आग
३०- जनावर पेलवेना अन्‌ गिऱ्हाईक मिळेना; शेतकऱ्याची व्यथा
३१- चंदगड; भाजीवालीचा मुलगा बनला सहायक पोलिस आयुक्त
३२- ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समाजाचे आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- भारताकडून पृथ्वी-दोन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
३४- सर्वात स्वस्त स्मार्टफोन बुधवारी होणार लाँच, किंमत 500 पेक्षाही कमी!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
भास्कर कापुरे, रामेश्वर शेगावकर, ज्ञानेश्वर पांचाळ, शुभम कुमठे, संतोष चारी, आनंद येलगे, स्वाती ठाकूर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवन कठीण असू शकत पण अशक्य नाही
(अर्शिता मोपले, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4



==========================================

शोभेचे फटाके फोडल्यानं भडकली आग, अग्निशमनची सूचना डावलल्याची चर्चा

शोभेचे फटाके फोडल्यानं भडकली आग, अग्निशमनची सूचना डावलल्याची चर्चा
मुंबई: जगभरातील 100 देशांचे प्रतिनिधी, शेकडो व्हीआयपी, नेते अभिनेत्यांनी सजलेल्या कार्यक्रमात कॉन्ट्रॅक्टरने अपशकुन केल्याचा आरोप होतो आहे. कारण अग्नीशमन दलानं कुठल्याही स्थितीत स्टेजवर शोभेचे फटाके फोडू नका असा आदेश दिला होता. मात्र, त्याला केराची टोपली दाखवल्यानंच ही दुर्घटना घडली.

…आता वाजले की बारावर पूजा सावंतनं ठेका धरला आणि मेक इन इंडियाच्या संगीत रजनीच्या स्टेजचे आगीच्या भडक्यानं बारा वाजले. 100 देशांच्या व्हीआयपींसमोर महाराष्ट्राला नामुष्की सहन करावी लागली. त्यामुळंच आग कशी लागली? आणि का लागली? याची डिसेक्शन आता सुरु झालं आहे.

सुप्रीम कोर्टानं गिरगाव चौपाटीवरच्या कार्यक्रमाला परवानगी दिली. सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन विझक्राफ्टला दिलं. तर स्टेज उभारण्याची जबाबदारी नितीन चंद्रकांत देसाईंकडे होती. चौपाटीवर वाहणारा वारा कार्यक्रमातला मुख्य अडथळा होता. त्यामुळं स्टेजवर कुठल्याही प्रकारचे शोभेचे फटाके किंवा कोल्ड पायरोंचा वापर टाळण्याची सक्त ताकीद अग्निशमन दलानं दिली होती. ज्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं.
==========================================

देवाला हात जोडून प्रवासी रेल्वे प्रवास करतात: हायकोर्ट

देवाला हात जोडून प्रवासी रेल्वे प्रवास करतात: हायकोर्ट
मुंबई: ‘प्रवासी देवाकडे हात जोडून रेल्वे प्रवास करतात. 80 टक्के प्रवाशांना दुसरा पर्यायच नसल्याने रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेला मात्र प्रवाशांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करते’, असे खडेबोले आज मुंबई हायकोर्टनं  रेल्वे प्रशासनाला सुनावले.

रेल्वेमध्ये 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्पोट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रवाशांनी रेल्वे प्रवास केला, कारण त्यांच्याकडे पर्याय नव्हता. वेळेवर उपचार न मिळाल्याने दररोज दहा रेल्वे प्रवाशांचा मृत्यू होतो. तरीही प्रवाशांच्या सुरक्षतेबाबत रेल्वे गंभीर नाही. असं मतही न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे व न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं.

रेल्वे अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत. अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी हायकोर्टात केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार पेटी, रूग्णवाहिका तयार ठेवण्याचे आदेश रेल्वेला दिले. त्यानुसार रेल्वेने दादर रेल्वे स्थानकावर याचा पायलट प्रोजेक्ट राबवला. 100 अपघात होणाऱ्या रेल्वे स्थानकांनाही रूग्णवाहिका मिळाली. तरीही रेल्वे अपघातात जखमींना तात्काळ उपचार मिळत नाही. रेल्वे स्थानकांच्या जवळ असलेली खाजगी रूग्णालये जखमींवर उपचार करत नसल्याचे झवेरी यांनी न्यायालयाच्या निर्देशनास आणले. त्यावर रेल्वे जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी विशेष पथक नेमण्याचे आदेशही न्यायालयाने रेल्वेला दिले.
==========================================

सर्वात स्वस्त स्मार्टफोन बुधवारी होणार लाँच, किंमत 500 पेक्षाही कमी! 

सर्वात स्वस्त स्मार्टफोन बुधवारी होणार लाँच, किंमत 500 पेक्षाही कमी!
मुंबई: स्मार्टफोन म्हणजे महागडा अशी आपली आजवर समजूत होती. मात्र, आता भारतीय कंपनी रिंगिंग बेल्स प्रा. लिमिटेड अवघ्या 500 रुपये किंमतीचा स्मार्टफोन लाँच करणार आहे.

मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया आणि स्किल इंडिया या योजनांना लक्षात घेऊन आजवरचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 लाँच लवकरच लाँच करणार आहे.

कंपनीनं याची किंमत 500 रुपयांच्या आसपास निश्चित केली आहे. हा स्मार्टफोन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते लाँच करण्यात येणार आहे. याच इव्हेंटमध्ये या स्मार्टफोनची नेमकी किंमत कळणार आहे. सध्या या स्मार्टफोनचं स्पेसिफिकेशन आणि फीचरबद्दल सध्या काही समजू शकलेलं नाही.

हँण्डसेटसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू या आयात करु हा स्मार्टफोन भारतातच तयार करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात शानदाक फीचरचा समावेश करुन हा स्मार्टफोन भारतातच पूर्णपणे डेव्हलप करण्याचा कंपनीचा मानस आहे.
==========================================

सियाचीन हिमस्खलनाबाबत पूर्वकल्पना होती : मनोहर पर्रिकर

 सियाचीन हिमस्खलनाबाबत पूर्वकल्पना होती : मनोहर पर्रिकर
नवी दिल्ली : सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात भारताला 10 जवान गमवावे लागले. मात्र या हिमस्खलनाच्या शक्यतेची पूर्वकल्पना असल्याची माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. सियाचीनमध्ये नेमकं कुठे हिमस्खलन होईल, याची कल्पना नव्हती असंही पर्रिकरांनी स्पष्ट केलं आहे.

‘सियाचीनमधील संभाव्य हिमस्खलनाची पूर्वकल्पना आम्हाला होती. मात्र जिथे दुर्घटना घडली, त्या जागेबाबत माहिती नव्हती.’ असं मेक इन इंडियाच्या मुंबईतील कार्यक्रमात मनोहर पर्रिकरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मद्रास रेजिमेंटच्या ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरसह 10 जवान सियाचीनमध्ये 19 हजार फूटांवर पाकिस्तानच्या एलओसीजवळ हिमाखाली अडकले. 9 जवानांचा मृत्यू झाला तर सहा दिवस मृत्यूला चकवा देणाऱ्या हनुमंतप्पा यांची प्राणज्योत 11 तारखेला मालवली. दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात
डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही हनुमंतप्पांची झुंज अपयशी ठरली.

दर महिन्याला सियाचीनमध्ये होणाऱ्या जवानांच्या मृत्यूंबाबत मी जागरुक असून त्याकडे मी जातीने लक्ष ठेवून आहे, असं पर्रिकरांनी 
==========================================

कॉ. पानसरेंवरील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, तपास अजूनही दिशाहीन

कॉ. पानसरेंवरील  हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, तपास अजूनही दिशाहीन
कोल्हापूर : कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र वर्षभरानंतरही कॉम्रेड पानसरेंच्या मारेकऱ्यांबाबत ठोस तपास करण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याचं दिसतं आहे. अजूनही आरोपी मोकाटच आहेत.

याप्रकरणातील आरोपी समीर गायकवाड वगळता अन्य कुणापर्यंतही पोहोचण्यात तपास यंत्रणा अद्याप सपशेल अपयशी ठरल्यात. याप्रकरणाची सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी आजच्याच दिवशी कोल्हापूरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या पानसरे दाम्पत्यावर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर गोविंद पानसरेंना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. मात्र 20 फेब्रुवारीला त्यांची प्राणज्योत मालवली होती.
==========================================

रशियातील मेडिकल अकॅडमीत आग, नवी मुंबई-पुण्याच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

रशियातील मेडिकल अकॅडमीत आग, नवी मुंबई-पुण्याच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
मुंबई : रशियाच्या स्मोलेन्स्क मेडिकल अकॅडमीत लागलेल्या आगीमध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन या घटनेची माहिती दिली आहे. या दोन्ही मुली नवी मुंबई आणि पुण्यातील आहे.

आगीच्या घटनेत दोन भारतीय मुलींचा मृत्यू झाला. दोघींचे मृतदेह उद्यापर्यंत मॉस्कोत आणले जातील आणि त्यानंतर मुंबईला हलवण्यात येतील, असंही सुषमा स्वराज यांनी सोमवारी रात्री ट्विटरवर सांगितलं होतं.

पुण्याची करिश्मा भोसले आणि नवी मुंबई पूजा कुल्लर अशी मृत विद्यार्थिनींची नावं आहेत. विद्यापीठातील सुत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही मुलींचे पालक आणि भारतीय दूतावासाला या दुर्दैवी घटनेची माहिती दिली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांचे मृतदेह भारतात पाठवले जातील.

रशियाच्या स्मोलेन्स्क मेडिकल अकॅडमीमध्ये रविवारी (14 फेब्रुवारी) सकाळी चौथ्या मजल्यावर आग लागली. या पूजा कुल्लर आणि करिश्मा भोसले या रुममेट होत्या. चौथ्या मजल्यावरच त्यांची रुम होती आणि त्यातच दोघीही अडकल्या. पूजा आणि करिश्मा या एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होत्या.

आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान रुममध्ये गेले आणि तिथे त्यांना दोन्ही मुलींचे मृतदेह आढले. धुरामुळे गुदमरुन दोघींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल, असंही विद्यापीठाच्या सुत्रांनी सांगितलं.
==========================================

विरारमधून अपहरण झालेली शिल्पी वर्मा पंजाबमध्ये सापडली

विरारमधून अपहरण झालेली शिल्पी वर्मा पंजाबमध्ये सापडली
विरार : विरारमधील शिल्पी वर्मा अपहरण नाट्यावरुन अखेर पडद उठला आहे. पालघर पोलिसांनी शिल्पी शर्मा आणि अपहरणकर्त्याला पंजाबमधून ताब्यात घेतलं आहे. 2 फेब्रुवारी रोजी विरारच्या डोंगरपाडा परिसरात बंदुकीचा धाक दाखवून 40 वर्षीय शिल्पी वर्माचं अपहरण झालं होतं.

पालघर पोलिस मागील अनेक दिवसांपासून शिल्पी वर्माला शोधण्याचा प्रयत्न करत होते. शिल्पी वर्मा पंजाबमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांतर पोलिसांची एक टीम तिला आणण्यासाठी पंजाबला गेली आहे. शिल्पी वर्मासह अपहरणकर्त्यालाही ताब्यात घेतलं आहे.
==========================================

देशद्रोहाच्या आरोपाखाली एस ए आर गिलानी यांना अटक

देशद्रोहाच्या आरोपाखाली एस ए आर गिलानी यांना अटक
नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एस ए आर गिलानी यांना अटक करण्यात आली आहे. प्रेस क्लबमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा एस ए आर गिलानी यांना ताब्यात घेतलं. संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गिलानी यांची चौकशी झाली. त्यांनतर पहाटे 3 च्या सुमारास गिलानींना अटक केली.

गिलानी यांनी अफजल गुरु आणि मकबूल बट यांना शहीद सांगून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिल्ली विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक अली जावेद यांची तीन वेळा चौकशी केली आहे. अली जावेद यांच्यासह प्रेस क्लबचे ऑफिस सेक्रेटरी जितेंद्र सिंह यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या जबानीतूनच समोर आलं की, माजी प्राध्यापक गिलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतविरोधीत घोषणा दिल्या होत्या.

दरम्यान संसदेवरील हल्ल्याप्रकरणी प्राध्यापक गिलानी यांना 12 डिसेंबर 2001 रोजी अटक करण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची सुटका केली.
==========================================

देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना पैलवान योगेश्वर दत्तची कवितेतून चपराक

देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना पैलवान योगेश्वर दत्तची कवितेतून चपराक
नवी दिल्ली : ऑलिम्पिक विजेता पैलवान योगेश्वर दत्तने जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील वादावर एक कविता लिहिली आहे. ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. देशभक्ती शिकवणारी ही कविता देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावते. देशाप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करणारी ही कविता प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवी. 
योगेश्वर दत्त लिहितो….. 
गजनी का है तुम में खून भरा जो तुम अफजल के गुण गाते हो,
जिस देश में तुमने जनम लिया उसको दुश्मन बतलाते हो ! 
भाषा की कैसी आजादी जो तुम भारत मां का अपमान करो,
अभिव्यक्ति का ये कैसा रूप जो तुम देश की इज्जत नीलाम करो ! 
अफजल को अगर शहीद कहते हो तो हनुमनथप्पा क्या कहलाएगा,
कोई इनके रहनुमाओं का मजहब मुझको बतलाएगा ! 
अपनी मां से जंग करके ये कैसी सत्ता पाओगे,
जिस देश के तुम गुण गाते हो वहां बस काफिर कहलाओगे ! 
हम तो अफजल मारेंगे तुम अफजल फिर से पैदा कर लेना, 
तुम जैसे नपुंसकों पर भारी पड़ेगी ये भारत सेना ! 
तुम ललकारो और हम ना आएं ऐसे बुरे हालात नहीं
भारत को बर्बाद करो इतनी भी तुम्हारी औकात नहीं ! 
कलम पकड़ने वाले हाथों को बंदूक उठाना ना पड़ जाए,
अफजल के लिए लड़ने वाले कहीं हमारे हाथों ना मर जाएं ! 
भगत सिंह और आज़ाद की इस देश में कमी नहीं, बस इक इंकलाब होना चाहिए,
इस देश को बर्बाद करने वाली हर आवाज दबनी चाहिए ! 
ये देश तुम्हारा है ये देश हमारा है, हम सब इसका सम्मान करें,
जिस मिट्टी पर है जनम लिया उसपे हम अभिमान करें !
जय हिंद !
==========================================
‘महाराष्ट्र रजनी’ चुकीच्या ठिकाणीच !, आग विझली आता राजकारण पेटलं

 मुंबईत गिरगाव चौपाटीवर लागलेली आग काल रात्रीच विझली, पण आता राजकारण मात्र पेटलंय. ‘महाराष्ट्र रजनी’च्या कार्यक्रमासाठी गिरगाव चौपाटीची जागा चुकीची निवडली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलाय. तर मंत्रालयाला आग लागली तेव्हा विरोधकांनी आमच्यावर आरोप केले होते. पण आग लागू शकते, प्रत्येक वेळी ती लावली जात नाही, असा टोमणा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी मारलाय.
मेक इन इंडियाच्या कार्यक्रमामध्ये लागलेल्या आगीने राज्य सरकारचं नाक कापलं आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.आगीबद्दलचा अहवाल आठवड्याभरात येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या आयोजनात सगळे नियम पाळले गेले, असं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विझक्राफ्टने निवेदन काढून स्पष्ट केलंय.
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर आगपाखड करत असताना शिवसेना आणि भाजप मात्र जवळ येतायत. मंुबई-महाराष्ट्रासाठी जे काही चांगलं कराल त्यामध्ये शिवसेना आणि प्रत्येक शिवसैनिक तुमच्या खाद्यांला खांदा लावून उभा राहील, अशी ग्वाही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली. मेक इन इंडियाच्या सांगता कार्यक्रमात त्यांनी ही ग्वाही दिली.
==========================================
राज्य सरकारने हिरावला मुक्या जनावरांचा घास !

 दुष्काळाने होरपळणार्‍या मराठवाड्यावर आता पाणीटंचाईचं सावट आहे. दुष्काळी परिस्थितीला तोंड देणार्‍या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळत राज्य सरकारने मुक्या जनावरांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीडमधील चारा छावण्या मे 2016 पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.
उस्मानाबाद, लातूर, बीडमधील चारा छावण्यांमध्ये मे महिन्यांपर्यंत चारा उपलब्ध आहे. त्यामुळे या चारा छावण्या बंद करण्याची कारवाई करावी असं पत्र महसूल उपसचिव अशोक आत्राम यांनी बीड, उस्मानाबाद आणि लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना लिहीलं आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे चारा असल्याचा उल्लेख करत छावण्या बंद करण्याचे आदेश दिले आहे. तसंच मे महिन्यात आढावा घेऊन आवश्यकता असल्यास चारा छावण्या चालू करण्याबाबत प्रस्ताव पाठवा अशी सुचनाही केलीये. रब्बी हंगामात उपलब्ध झालेला चारा जिल्ह्यामध्ये उपलब्ध होईल तो सर्वत्र पोहचेल आणि जनावरं यापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी जिल्ह्याधिकार्‍यांची असेल असा शेराही मारण्यात आलाय. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली असून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवालच विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विचारलाय.
==========================================
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी काढला एकत्र सेल्फी

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मॅग्नेटीक महाराष्ट्र मधील एमटीडीसीच्या दालनात सेल्फी काढला. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मोबाईलने हा सेल्फी फोटो काढलाय. या सेल्फी फोटोत दोन्ही नेत्यांनी हाताच्या मुठी आवळून आपण एकत्रच असल्याचे दाखवून दिलंय.
सत्तेत एकत्र युतीचं सरकार असूनही भाजप आणि शिवसेना यांच्यात सतत तू तू मै मै सुरू होती. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उद्धव ठाकरेंना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे शिवसेना नाराज होती. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील कटुता काहीशी या सेल्फी फोटो काढून दूर करण्याचा प्रयत्नं मुख्यमंत्र्यांनी केलांय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या सेल्फी फोटोसाठी शिवसेना स्टाईल आक्रमक फोटो पोझ दिली.
==========================================

हरियाना; आयसीयूमध्ये लैंगिक जबरदस्ती करणा-या आरोपीची ओळख पटली


हरयाणाच्या झांज्जर जिल्ह्यात बहादूरगड येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शनिवारी नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेबरोबर लैंगिक जबरदस्तीची धक्कादायक घटना घडली होती. 
या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून, तो स्थानिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पिडित महिलेच्या घराजवळच तो रहातो असे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे त्याची ओळख पटवता आली. आम्ही त्याची ओळख उघड करणार नाही कारण तो अजूनही फरार आहे असे पोलिसांनी सांगितले. 
या घटनेपूर्वी पिडित महिला त्याला ओळखत नव्हती याबद्दल आम्ही ठाम आहोत असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी सकाळच्यावेळी आरोपी डॉक्टरच्या वेशात महिलेच्या खोलीत आला होता. पीडित महिलेला सुरुवातीला डॉक्टर तपासणी करत आहे असे वाटले. 
मात्र जेव्हा डॉक्टरचा चुकीचा इरादा लक्षात येताच तिने आक्षेप घेतला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. शुक्रवारीच पिडित महिलेची सिझरींग ऑपरेशनव्दारे प्रसूती झाली होती. 

==========================================

उद्योगांची पसंती महाराष्ट्रालाच! 

  • मुंबई : रतन टाटा, दिलीप संघवी, गौतम सिंघानिया, बाबा कल्याणी यांच्यासह देशातील दिग्गज उद्योगपतींनी आज गुंतवणुकीबाबत त्यांची पहिली पसंती महाराष्ट्रच असल्याचे ठामपणे सांगितले.
    उद्योगांच्या उभारणीसाठीच नव्हे तर एकूणच स्टार्ट अप इंडियासाठी देशातील सर्वात आदर्श राज्य महाराष्ट्रच असल्याचे प्रशंसोद्गार काढत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना प्रशस्तिपत्र दिले. बीकेसीवर सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात आजचा दिवस खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा होता. ‘महाराष्ट्र दर्शन’ कार्यक्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडून काही तासच झाले असताना महाराष्ट्रावर गुंतवणुकीचा अक्षरश: पाऊस पडला. दिवसभरात आज गुंतवणुकीसाठी तब्बल २ हजार २४५ करार झाले. ‘भारताच्या उत्पादन क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र’ या विषयावरील चर्चासत्रात उद्योगपती
    रतन टाटा, सन फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप संघवी, रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया, एरिक्सन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पाओलो कोलल्ला आणि रिलायन्स इंडस्ट्रिजचे व्यवस्थापकीय संचालक निखिल मेसवानी यांनी विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योगपतींनी मांडलेल्या कल्पनांचे स्वागत करताना त्यांच्या अंमलबजावणीची हमी दिली. (विशेष प्रतिनिधी)
    स्टार्ट अप इंडिया अभियान यशस्वी होण्यासाठीची प्रत्येक आवश्यक बाब महाराष्ट्राकडे उपलब्ध आहे. पुढील काळात राज्याच्या विकासाचा विचार करताना सर्वसमावेशक व्हावे लागेल. कृषी, उत्पादन, सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधांची सांगड घालावी लागेल. मुख्यमंत्री फडणवीस तसा विचार करीत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. ही क्षेत्र हातात हात घालून चालली तर महाराष्ट्र प्रगतीचे शिखर गाठेल. - रतन टाटा
    फडणवीस सरकारने प्रकल्पासाठीच्या मंजुरी केवळ दहा दिवसांत दिल्याचा सुखद अनुभव सांगितला. मात्र त्याच वेळी केंद्राशी संबंधित काही न्यायिक विषय आजही उद्योगांसाठी अडसर ठरत आहेत ते दूर करण्याची सूचना त्यांनी केली.
    - गौतम सिंघानिया
==========================================

रशियातील दुर्घटनेत सीवूडच्या तरुणीचा मृत्यू 


  • रशियातील मॉस्को येथे रविवारी पहाटे रशियातील स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल अ‍ॅकॅडमीमध्ये लागलेल्या आगीत दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही विद्यार्थिनी भारतीय असून, एक पुणे येथील तर दुसरी नवी मुंबईमध्ये सीवूड येथील राहणारी आहे. स्मोलेन्स्क अ‍ॅकॅडमीत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिकत असून, त्याच ठिकाणी या विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. रविवारी (१४ फेब्रुवारी) पहाटे ४.१५ (भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३०) अ‍ॅकॅडमीच्या वसतिगृहात आग लागली. या वेळी पुण्याची करिश्मा भोसले व सीवूडची पूजा कल्लूर या दोघी एकाच खोलीमध्ये झोपलेल्या होत्या. मात्र, काही वेळातच सर्वत्र आग पसल्याने त्यांना खोलीतून बाहेर निघता आले नाही व आतमध्येच गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. इतर विद्यार्थ्यांनी मात्र वेळीच बाहेर पळ काढला, तर काहींना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
    पूजाचे वडील सिद्दपा कल्लूर यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी स्मोलेन्स्क अ‍ॅकॅडमीमध्ये संपर्क साधला, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शिक्षणासाठी परदेशात गेलेली मुलगी सुखरूप असल्याची खात्री करून घेण्यासाठी ते सातत्याने भारतीय व रशियन राजदूतांनाही संपर्क साधत होते, परंतु अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडत होती. अखेर भारतातील ज्या कन्सल्टंट्समार्फत त्यांनी रशियातील स्मोलेन्स्क मेडिकलमध्ये पूजाचा एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता, त्या कॉसमॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्समध्ये संपर्क साधल्यावर, त्यांना पूजाच्या निधनाची माहिती मिळाली. तोपर्यंत सुमारे आठ तासांचा कालावधी निघून गेला होता. घटना घडताच अ‍ॅकॅडमीने पूजाच्या कुटुंबीयांना तिच्या मृत्यूची माहिती देणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही.
==========================================

पुण्यात नव्या विमानतळाची घोषणा 

  • मुंबई : पुणे येथील नवीन विमानतळासाठी जागेची घोषणा लवकरच केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले, तसेच नवी मुंबई विमानतळावरील पहिले टेक आॅफ आपल्या याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात २०१९ पूर्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    ‘मेक इन इंडिया’ सप्ताहांतर्गत, ‘मेक इन महाराष्ट्र - यशासाठीची नवी रणनीती’ या विषयावरील चर्चासत्रात फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर, रासायनिक व खते राज्यमंत्री हंसराज
    अहीर, जेव्हीके समूहाचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय
    संचालक जेव्हीके रेड्डी, जेएसडब्ल्यू स्टील लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल
    आणि राज्याचे मुख्य सचिव
    स्वाधिन क्षत्रिय यांनी विचार व्यक्त केले.
==========================================

अलिबाग; गिधाड संवर्धनासाठी सायकल रॅली


  • अलिबाग, दि. १६ - गिधाड पक्षांचे निसर्गातील अनन्यसाधारण महत्व ओळखून भारत सरकारने आणि  इतर जागतिक संस्थांनी गिधाडाच्या संवर्धनासाठी देशांतर्गत विविध प्रकल्प राबविण्याचे निर्णय घेतले. परंतु ढासळत्या गिधाडांच्या अधिवासाचा मात्र विचार व त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाहीत. 
    गिधाड पक्षी हा मृत जनावरांवार उपजिवीका करणारा आणि पर्यावरण स्वच्छ राखणारा अन्नसाखळीतील महत्वाचा दुवा आहे. सध्या गिधाडांच्या  अस्तित्वाच्या फारच कमी खुणा राज्यामध्ये नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिपळूण येथील "सह्याद्री निसर्ग मित्र" तसेच महाड येथील "सह्याद्री मित्र" आणि "सिस्केप" या संस्थांच्या माध्यमातून गेल्या दशकात गिधाडांच्या वसतीस्थानांच्या नोंदींचे सर्वेक्षण केले गेले आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले. 
    आज गिधाडांच्या पिल्लांवर उपासमारीची पाळी येते आणि त्यामुळे पहिल्याच वर्षात उडालेली व मोठी झालेली ही पिल्ले भुकेपोटी खाली पडतात आणि मग अन्नाच्या शोधार्थ तिथेच फिरत बसतात. गेल्या महिन्यामध्ये महाड परिसरात असेच एक गिधाडाचे पिल्लू सव या गावी शेतकरी संघटनेच्या तरूण कार्यकर्त्यांच्या नजरेत पडले. पुढे सिस्केपच्या कार्यकर्त्या्नी तसेच महाड विभागीय वनपरिक्षेत्र कर्मचार्यांच्या सहकार्याने त्यास खाद्य देऊन मग नाणेमाची येथे ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सोडण्यात आले. 
    पण प्रश्न पुढे उभा राहतो की हे एक पिल्लू हाती लागले बाकीच्या पिल्लांचे काय झाले असेल...? इतर ठिकाणी गावांमध्ये चौकशीँअंती गिधाडे उडताना बघितल्याचे व शेताच्या बांधावर बघितल्याचे नोंदी आढळल्या. मात्र संपर्काअभावी त्यांची माहिती संस्थेपर्यंत पोहचू शकली नाही,. याच शंकेचा आधार घेऊन संस्थेने महाड ते गोरेगाव लोणेरे परिसरांतर्गत असलेल्या गावांमध्ये गिधाडांच्या विषयी जनजागृती करण्याचा कार्यक्रम गिधाड संवर्धन जनजागृती अभियानातून करण्याचे ठरविले. 
==========================================

डॉकयार्ड रोड ते सीएसटी रेल्वे प्रवास होणार एलिव्हेटेड 


  • मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील सीएसटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या नवीन मार्गासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या मार्गासाठी हार्बरची जागा उपलब्ध करून देतानाच डॉकयार्ड रोड ते सीएसटीपर्यंतचा संपूर्ण हार्बर रेल्वेमार्ग एलिव्हेटेड (उन्नत) करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यावर सध्या काम सुरू असून शासनाकडेही या जागेसाठी बोलणी सुरू आहे.
    एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर सीएसटी ते कुर्ला पाचवा आणि सहावा नवीन मार्ग बनविला जाणार आहे. सध्या कुर्ला ते कल्याणपर्यंत पाचव्या-सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. सीएसटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग उपलब्ध झाल्यास लांब पल्ल्याबरोबरच लोकलचा प्रवासही सुकर होणार आहे. तथापि, सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग पूर्ण करण्यासाठी रेल्वेला जागेची उपलब्धता ही सर्वात मोठी अडचण आहे. सॅण्डहर्स्ट रोड ते सीएसटीपर्यंत जागेअभावी मध्य रेल्वेने यावर एक नवा पर्याय शोधला आहे. पाचव्या-सहाव्या नव्या मार्गासाठी मध्य रेल्वेने हार्बरवरील सॅण्डहर्स्ट रोड ते सीएसटीपर्यंत सध्याचे दोन्ही मार्ग उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गाला डॉकयार्ड रोडपासून वळवून पी.डिमेलो रोडमार्गे नेले जाईल आणि त्यानंतर कर्नाक बंदरहून सीएसटीला या मार्गाचा शेवट केला जाईल. मात्र हार्बरचा हा शेवट सीएसटीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात पी.डिमेलो रोडला असेल. त्यामुळे सीएसटी हार्बरवरील सध्याचे दोन प्लॅटफॉर्म बंद करून ते पी. डिमेलो रोडकडे हलवले जातील. या मार्गासाठी एकूण ८९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.हार्बरवरील डॉकयार्ड रोड आणि सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन ही स्थानके सध्या एलिव्हेटेड आहेत. मात्र मस्जिद ते सीएसटीपर्यंत एलिव्हेटेड मार्ग नसून हादेखील मार्ग एलिव्हेटेड होईल. त्यामुळे हार्बरवासीयांना सीएसटीत (पी. डिमेलो रोड दिशेला) एलिव्हेटेड स्थानक मिळेल.
==========================================

...म्हणे ‘महात्मा’ उपाधी टागोरांनी दिली नव्हती! 

  • अहमदाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘महात्मा’ ही उपाधी नोबेल पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांनी दिली असल्याचे शाळा कॉलेजातून शिकवले जाते; परंतु गुजरात सरकारला मात्र हे मान्य नाही असे दिसते. कारण सौराष्ट्रच्या जेतपूर गावातील अज्ञात पत्रकाराने सर्वप्रथम गांधीजींचा उल्लेख ‘महात्मा’ असा केला होता, असे या सरकारचे म्हणणे आहे.
    राजकोट जिल्हा पंचायत शिक्षण समितीने राजकोटसह इतर काही जिल्ह्यांच्या महसूल विभागात तलाठी पदावर नियुक्तीसाठी अलीकडेच एक परीक्षा घेतली होती. या परीक्षेत गांधीजींना महात्मा ही उपाधी कुणी दिली होती? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
    ही परीक्षा देणारी एक परीक्षार्थी संध्या मारू हिने या प्रश्नाचे उत्तर रवींद्रनाथ टागोर असे दिले होते; परंतु हे उत्तर चुकीचे ठरवून तिचे गुण कमी करण्यात आले. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असतानाच सौराष्ट्रातील एका पत्रकाराने त्याच्या निनावी पत्रात त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला होता, असा खुलासा परीक्षा आयोजन समितीतर्फे करण्यात आला. त्याच्या पुष्ट्यर्थ गांधीवादी नारायण देसाई यांच्या पुस्तकाचा हवालाही समितीने दिला.
    या गुणकपातीविरोधात संध्या मारू यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि वादाला तोंड फुटले. याचिकेत तीन प्रश्नांच्या उत्तराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अंतरिम उत्तर पत्रिकेत या प्रश्नांची योग्य उत्तरे आहेत; परंतु अंतिम उत्तर पत्रिकेत मात्र चुकीची उत्तरे देण्यात आली असल्याचा याचिकाकर्तीचा दावा आहे.
    गांधी यांना महात्मा उपाधी कुणी दिली? या प्रश्नाचे अंतरिम उत्तरपत्रिकेतील उत्तर टागोर असे आहे; परंतु अंतिम उत्तरपत्रिकेत मात्र अज्ञात पत्रकाराचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे देशातील सर्वात लांब नदी कोणती? या प्रश्नाचे उत्तरही गंगाऐवजी ब्रह्मपुत्रा असे देण्यात आले असल्याचे संध्या मारू यांनी लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे यावर न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला यांनी मागितलेल्या खुलाशातही जिल्हा पंचायतने या अज्ञात पत्रकाराचाच उल्लेख केला. तेव्हा न्यायालयाने थेट जिल्हा पंचायतीचे वकील एच.एस. मनशॉ यांनाच या प्रश्नाला तुमचे उत्तर काय असेल? असा सवाल केला. वकिलांनी आपले उत्तर टागोरच राहील, कारण विद्यार्थ्यांना हेच शिकविले जाते, असे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होणार आहे.
==========================================

कुलगुरूंच्या बडतर्फीस राष्ट्रपतींकडून मंजुरी 

  • नवी दिल्ली : विश्व भारतीचे कुलगुरू सुशांत दत्तगुप्ता यांना बडतर्फ करण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी मंजुरी दिली. एखाद्या केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूला पदावरून हटविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
    ‘विश्व भारतीचे कुलगरू दत्तगुप्ता यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव मंत्रालयाने दिला होता. त्याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे,’ असे मंत्रालयाचे प्रवक्ते घनश्याम गोयल म्हणाले. दत्तगुप्ता यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी शिफारस करणारी फाईल मंत्रालयाने या महिन्याच्या प्रारंभी राष्ट्रपतींकडे पाठविली होती. दत्तगुप्ता यांच्याविरुद्ध वित्तीय आणि प्रशासकीय गैरप्रकार केल्याचा आरोप आहे.
    (लोकमत न्यूज नेटवर्क)तत्पूर्वी राष्ट्रपतींनी कुलगुरूंना हटविण्याच्या शिफारशीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर मंत्रालयाने कायदा मंत्रालयाचे मत मागितले होते. याआधी राष्ट्रपतींनी दत्तगुप्तांच्या बडतर्फीची शिफारस करणारी फाईल दोनदा परत केली होती. परंतु कायदा मंत्रालयाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठिंबा दिल्यानंतर ही फाईल पुन्हा राष्ट्रपतींना सादर करण्यात आली आणि सोमवारी राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केले.
==========================================

कराची; हिंदू विवाह विधेयकातील वादग्रस्त कलम वगळा 

  • कराची : जोडप्यापैकी एकाने धर्म बदलल्यास विवाह रद्द करण्याची तरतूद असलेल्या हिंदू विवाह विधेयकाच्या मसुद्यातील वादग्रस्त कलम वगळण्याची मागणी पाकिस्तानातील प्रमुख हिंदू संघटनेने केली आहे. या कलमामुळे अल्पसंख्याक हिंदू महिलांचे बळजबरी धर्मांतरणाचे प्रकार वाढतील, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे.
    पाकमधील हिंदू समाज या कलमाबाबत चिंतित आहे, असे पाकिस्तान हिंदू परिषदेचे प्रमुख संरक्षक रमेश वांकाणी यांनी म्हटले. हिंदू विवाह विधेयकातील आक्षेपार्ह कलम १२ (३) चा
    हिंदू मुली आणि महिलांच्या धर्म परिवर्तनासाठी गैरवापर केला जाऊ शकतो. पती-पत्नीपैकी एकाने धर्मांतर केल्यास विवाह संपुष्टात येऊ शकतो, असे हे कलम म्हणते. सत्ताधारी पीएमएल-एनचे संसद सदस्य वांकाणी म्हणाले की, सिंधच्या ग्रामीण भागातील हिंदू महिला आणि मुलींच्या बळजबरी धर्मांतराचा मुद्दा सरकारसमोर उपस्थित केला असून हिंदू विवाह विधेयकातील वादग्रस्त तरतुदींमुळे बळजबरी धर्मांतराचे प्रकार वाढतील, असेही ते म्हणाले. हिंदू मुलींच्या अपहरणानंतर न्यायालयात प्रमाणपत्र सादर करून तिने धर्मांतर व मुस्लिम व्यक्तीशी विवाह केल्याचे सांगण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, असेही ते म्हणाले.
  • ==========================================
  • पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी
  • पालघर - पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांनी 18948 मतांनी विजयी विजय मिळविला आहे.
    पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाल्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या जागेवर कृष्णा घोडा यांचे पुत्र अमित घोडा व काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत होती. या लढतीत शिवसेनेच्या अमित घोडा यांनी बाजी मारत 18 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला.
    या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनिषा निमकर तिसऱ्या स्थानावर राहिल्या. शिवसेना-भाजपने या पोटनिवडणुकीसाठी युती केली होती. शनिवारी या पोटनिवडणुकीसाठी जवळपास ६५ टक्के मतदान झाले होते.
==========================================
कुमार विश्‍वास यांची पत्रकार परिषद उधळली
लखनऊ - आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्‍वास यांनी त्यांच्या कवितांमधून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचे म्हणत त्यांचा निषेध व्यक्त करत पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्या दिशेने अंडे फेकत पत्रकार परिषद उधळून लावण्यात आली.
विश्‍वास यांनी लखनऊमध्ये आम आदमी पक्षाच्या एका सभेला संबोधित केले. या सभेला दोन हजार व्यापारी उपस्थित होते. सभेनंतर विश्‍वास पत्रकार परिषदेत घेत होते. दरम्यान कवितांमधून हिंदू देवतांचा अपमान केल्याचा निषेध व्यक्त करत तरुणांच्या समूहाने घोषणा देत अंडे फेकून पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याबाबत बोलताना विश्‍वास म्हणाले, ‘माझ्या ज्या कवितांबद्दल आक्षेप होता त्याबद्दल मी यापूर्वीच माफी मागितली आहे. मी जाणूनबुजून कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही. राजकारणात येण्यापूर्वीपर्यंत माझ्या त्या कवितांबद्दल कोणालाच काहीही अडचण नव्हती. धर्म आणि जातीच्या नावावर समाजामध्ये फूट पाडू इच्छिणाऱ्या घटकांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्या घटकांना आम आदमी पक्षाच्या भ्रष्टाचारमुक्त मोहिमेची भीती वाटते.‘ यावेळी मोदी यांचे उदाहरण देत विश्‍वास म्हणाले, "वाराणसीच्या सभेदरम्यान भाजप नेत्यांनी ‘हर हर मोदी‘ अशा घोषणा दिल्या होत्या. गेल्या कित्येक शतकांपासून हिंदू लोक ‘हर हर महादेव‘ असे म्हणत भगवान शंकराकडे प्रार्थना करत आहेत. भाजपची ही कृती म्हणजे भगवान शंकराची अपमान आहे का?‘ 

अमेठी येथे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध विश्‍वास यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. 
==========================================
केरळमध्ये रा.स्व. संघ कार्यकर्त्याची हत्या
कन्नूर (केरळ) - कन्नूर जिल्ह्यातील पापीनिसेरी गावाजवळ 27 वर्षाच्या एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. 
सुजीत नावाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणारे कुटुंबियही जखमी झाले आहेत. याबाबत अद्याप सविस्तर माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामध्ये सुजितचे पालक आणि भावाचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी या हत्येमागे समाजवादी पक्षाचा हात असल्याचा आरोप केला आहे.
==========================================
नागपूर; मेडिकलच्या शवविच्छेदगृहात गेले पंचवीस वर्षे मोहन तोमस्कर यांची सेवा


नागपूर - मेडिकलच्या शवविच्छेदगृहात गेले पंचवीस वर्षे मोहन तोमस्कर सेवा देत आहेत. त्यांनी आतापर्यंत 35 हजारांवर शवविच्छेदन केले. दर महिन्याला शंभरापेक्षा जास्त शवविच्छेदन त्यांच्या हातून होतात. शवविच्छेदनगृहात काम करताना दिवाळी, दसऱ्याचा आनंद कित्येक वर्षांपासून नशिबी आलाच नाही. तर अल्प मनुष्यबळ असल्याने सुटीच्या दिवशीही शवविच्छेदगृहाचा रस्ता धरावा लागतो, ही त्यांची व्यथा. 
मोहन यांना अनुकंपा तत्त्वावर 1981 साली मेडिकलमध्ये नोकरी मिळाली. पोट भरण्यासाठी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्याचे काम करावे लागते, याची मनात खंत नाही. परंतु इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन निराळाच असतो. मृतदेहाच्या शरीरावरच्या जखमांचा हिशेब कागदावर त्यांना मांडावा लागतो. यातूनच पुढे न्यायालयात अनेक आरोपींना शिक्षा मिळते. कोणत्या हत्याराने जखम झाली हे बघताक्षणीच सांगतो. शवविच्छेदनासाठी शहरासोबतच गावखेड्यातील पोलिस मोहनचीच मदत घेतो. 
सकाळचे सात वाजले की, मोहन शवविच्छेदनगृहात हिरवा झगा अंगावर घालून तयार असतो. सूर्यास्तानंतर सात साडेसात वाजता ते घरी जातात. जणू शवविच्छेदनगृह हेच त्यांना भेटण्याचं योग्य ठिकाण. मेडिकलमध्ये दिवसभरात पंधरा मृतदेहांवर शवविच्छेदन होते. यातील चार ते पाच मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची जबाबदारी त्यांच्या वाट्याला येते. हे काम करताना मनात किंवा चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नसतो. 
चिमुकलीचा अखेरचा श्‍वास 
नागपुरातील गोवारी हत्याकांड. 23 नोव्हेंबर 1994 सालची काळरात्र. पोलिसांच्या गाड्यांत भरून मृतदेह आणले जात होते. मेडिकलच्या वऱ्हांड्यात मृतदेहांचा खच पडून होता. अचानक मृतदेहांच्या ढिगाऱ्यात एका चिमुकलीचे ह्रदय धडकत होते. तिला बाहेर काढले आणि तिने अखेरचा श्‍वास घेतला. ही घटना हृदयात साठवून ठेवली आहे. मृतदेहांची गर्दी झाल्याने कुठे ठेवावे हे कुणालाच सुचत नव्हते. त्यावेळी मोहन यांनी रिकामा असलेल्या वॉर्ड क्रमांक 22 मध्ये मृतदेह ठेवण्याची सूचना केली. पेइंग वॉर्डाकडून शवविच्छेदनासाठी एकामागोमाग मृतदेह आणले जात होते. सलग न थांबता 36 तासांपेक्षाही जास्त वेळ शवविच्छेदनगृहात काम सुरू होतं. 
मृतदेहांचं शवविच्छेदन करताना कोणताही जात, धर्म, पंथ या भेदांच्या भिंती आडव्या येत नाहीत. शवविच्छेदनगृहात खरी समानता नांदते. नवजात अर्भकापासून वृद्ध, बेवारस प्रेत, गरीब-श्रीमंत साऱ्यांच्या मृतदेहांचे विच्छेदन करताना एकच पद्धत असते. युग, कुशसारख्या मुलांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना मन हेलावते. हात थरथरतात. नोकरी हैं...करना पडेगा.‘ 
- मोहन तोमस्कर, शवविच्छेदनगृहातील कर्मचारी 
==========================================
कोल्हापूर: लक्ष्मीपुरी येथील दुकानांना आग 
कोल्हापूर - शहरातील लक्ष्मीपुरी भागातील चार दुकानांना आज (मंगळवार) पहाटे भीषण आग लागली. या आगीत सुमार आठ दुकाने जळून खाक झाली असून, 60 ते 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेतीन वाजता यशवंत एन्टरप्रायजेस या दुकानाला सर्वप्रथम शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. त्यानंतर आग इतर चार दुकानात पसरली. या आगीत जिवीतहानी झाली नसून, दुकानांचे पूर्ण नुकसान झाले आहे. दुकानातील सर्व माल जळून खाक झाला आहे. आगाची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि सातच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
==========================================
लातूर; मराठवाड्यात चारा छावण्या बंद 
मुंबई - मराठवाड्यात दुष्काळाची धग दिवसेंदिवस तीव्र होत असताना राज्य सरकारने मात्र सुरू असलेल्या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर या सर्वाधिक दुष्काळ प्रभावित जिल्ह्यांतल्या चारा छावण्या बंद करण्याचे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा काँग्रेस व राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला असून, राज्य सरकारचा हा ‘रझाकारी’ निर्णय असल्याची टीका केली आहे. 
बीड, लातूर आणि उस्मानाबाद या दुष्काळी जिल्ह्यांत ऑक्‍टोबर, नोव्हेंबरपासून चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. बीडमध्ये सर्वाधिक सुमारे १७० चारा छावण्या आहेत, तर उस्मानाबादमध्ये १५ ते २० आणि लातूरमध्ये ४ ते ५ छावण्यांमध्ये हजारो जनावरांची काळजी घेतली जात आहे. पण, नुकताच रब्बीचा हंगाम संपला आहे. या रब्बीच्या हंगामात पुढील तीन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला पाठवला होता, त्यामुळे मे महिन्यापर्यंत या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय १० फेब्रुवारीला मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला. त्यानंतर तातडीने या तिन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाला सरकारने पत्र पाठवून या चारा छावण्या बंद करण्याचे आदेश दिले.
==========================================
जनावर पेलवेना अन्‌ गिऱ्हाईक मिळेना
लातूर - ‘‘माझा गोट्या धुऱ्यावरच चरतो... मी कुठून पण हाक मारली तर धावत माझ्याजवळ येतो... माझ्या मांडीवर डोकं ठेवतो... कोणाच्या पीक-पाण्याला तोंडपण लावत नाही... कोणालाच मारत नाही...’’ बारा वर्षांच्या विष्णुकांतला त्याच्या बैलाचं किती कौतुक करू असं झालं होतं... पण बोलता-बोलता तो आवंढा गिळायला लागला... त्याचे शब्द अडखळले... त्याचा गोट्या विकला जाणार, याची कल्पनाच त्याला करवत नव्हती... 
जांबच्या (ता. जळकोट) जनावरांच्या बाजाराला शेतकरी खूप लांबून जनावरे विकायला आणतात. मराठवाड्यातील उत्तम जातीची जनावरं इथे विक्रीसाठी येत असतात. या वेळीही शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात या बाजाराला आले होते. शेतकऱ्यांनी जनावरे विकायलाच आणली होती. गुरांची खरेदी क्वचित होत होती. विष्णुकांत गेले तीन तास त्याच्या लाडक्‍या बैलाचे कासरे धरून उभा होता. गोट्याची विक्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला त्याच्यापासून दूर जायचे नव्हते... 

‘गोट्या एवढा तुझा लाडका आहे, तर त्याला विकायला तू कसा तयार झाला?’ यावर तो म्हणाला, ‘‘काय करणार ताई, घरची अडचण हाय. रात्रीपर्यंत खूप रडलो. आजा बोलला अडीनडीला काढावेच लागतेय जनावर. गावात चारा-पाणी पण न्हाई... पाऊस पडला की आपण नवीन घेऊ...’’ 

‘‘घरच्या गायीचाच आहे तो. एक वर्षाचा झालाय. मीच त्याला सांभाळलंय. त्याचं नाव गोट्यापण मीच ठेवलंय.’’ 

माळहिप्परगा गावातून (ता. जळकोट) गोट्याला विकायला आणले होते. कर्ज फेडण्यासाठी गोऱ्हा २५ हजारांना विकण्याची वेळ केंद्रे कुटुंबीयांवर आली होती; पण बाजार फुटेपर्यंत गोट्याचा व्यवहार होत नसल्याने विष्णू मात्र मनोमन सुखावला होता. 

‘‘जाऊ दे... पैशाचं बघ तू काय ते... मी त्याला चारा कुठून पण आणून देईन.’’- विष्णूने त्याच्या आजोबांना विनवायला सुरवात केली होती. 
बाजारात जवळपास ९० टक्के जनावरे चारा-पाणी उपलब्ध नाही म्हणून विकायला आणली गेली होती. वर्ताळचे धोंडिबा डावकरे याच बाजारात ७० हजारांची बैलजोडी ४० हजारांत विकून गावाकडे परत चालले होते. 

बैलाची जोडी विकल्यानंतर डावकरे त्या बाजारातून आपल्या गावातल्या लोकांसह ताडकन निघून गेले. 

येवतीच्या मोतीराम गुट्टेंनी पण बैलजोडी विकायला आणली होती. ‘‘हातउसने घेतलेले पैसे फेडून टाकणार आणि एखादं लहान जनावर यातूनच विकत घ्यायचंय. या मोठ्या जोडीला भरपूर पाणी आणि चारा लागतो. लहान गोऱ्हा असेल तर त्याला चारापाणी कमी लागेल. पाऊस पडेपर्यंत तो मोठापण होईल,’’ असे गुट्टेंनी सांगितले; पण दुपारी चारपर्यंत त्यांच्या बैलजोडीला कोणी ग्राहक नसल्याने ते निराश झाले होते. 
असे कुणी समजू नये, की जांबच्या बाजारातच हे दृश्‍य दिसतेय... कुठेही जा... कच्चीबच्ची जनावराला चिकटलीत आणि कर्त्यासवरत्या गिऱ्हाइकांची वाट बघताहेत.... 
बैल बाजारात का? 
वैरण-पाण्याची टंचाई 
चारा छावण्यांची कमी उपलब्धता 
छावण्यांत नीट निगा होत नाही 
जगण्यासाठी कर्ज वाढतेय, ते फेडायचे तर जनावरे बाजारात न्यावीच लागतात.

बैलांना दिवसाला तीन वेळा पाणी लागतं. दोन बैलांना सहा बादल्या पाणी लागतं. घरात माणसांना प्यायला पाणी मिळेना; कुठून आणायचं जनावरांना? आपल्या नजरेसमोर त्यांचे हाल होताना बघवत नाहीत. 
- धोंडिंबा डावकरे, शेतकरी
==========================================
दिल्ली; न्यायालयात विद्यार्थी, पत्रकारांना मारहाण 
वकिलांच्या वेशातील दहा ते पंधरा जणांच्या गटाने पतियाळा हाउस न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांना जोरदार मारहाण केली. न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. 
पोलिसांच्या समोरच देशविरोधी शक्तींना पाठिंबा दिल्याचा आरोप करत विद्यार्थी आणि पत्रकारांना मारहाण करण्यात आली, मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. भाजपचे आमदार ओ. पी. शर्मा यांचाही मारहाण करणाऱ्यांमध्ये समावेश होता. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर यापुढे हल्ले करण्यात येतील, अशी धमकीही शर्मा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या ‘जेएनयू’मधील विद्यार्थी संघटनांचा प्रमुख असलेल्या कन्हैयाकुमार याला आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी ही घटना घडली. 
न्यायालयाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी वकिलांच्या वेशातील काही व्यक्तींनी ‘जेएनयू’चे विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि पत्रकारांना न्यायालयाच्या बाहेर जाण्यास सांगत मारहाण करण्यास सुरवात केली. ‘जेएनयू’मधून देशद्रोही आणि दहशतवाद्यांची निर्मिती होते आहे. त्यामुळे तुम्ही देश सोडून जावे. भारताचा विजय असो, ‘जेएनयू’ बंद करा, अशा घोषणा हल्लेखोर देत होते, अशी माहिती ‘एआयएसएफ’चा अध्यक्ष वलिउल्लाह काद्री यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 
मारहाणीची घटना झाली त्या वेळी न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस हजर होते. मात्र त्यांनी कुठलीही हलचाल केली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
==========================================
चंदगड; भाजीवालीचा मुलगा बनला सहायक पोलिस आयुक्त 
चंदगड : पाच मुलांची जबाबदारी पडलेल्या आईने आठवडा बाजारात भाजीपाला विकून संसाराचा गाडा चालवलेला. शाळेत झालेली अक्षरांची ओळख उत्तरोत्तर घट्ट होत गेली. प्रतिकूल परिस्थितीत स्वयंप्रेरणेतून एमबीएपर्यंत शिकलेली बहीण माधवी भावाची मार्गदर्शक बनली आणि त्यांनी इतिहास रचला. नैसर्गिक बुद्धिमत्तेला परिश्रमाची जोड देत येथील विकास घोलू राठोड याने आभाळाएवढे यश मिळवले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहायक पोलिस आयुक्तपदी (एसीपी) त्याची निवड झाली. भाजीवालीचा मुलगा पोलिस अधिकारी बनला. 

विकासचे मूळ गाव कर्नाटकातील विजापूर. चाळीस वर्षांपूर्वी त्याचे आई-वडील गंगूबाई व घोलू हे मजुरीसाठी तिलारी धरणाच्या कामावर रुजू झाले. तेथील काम संपले; परंतु गावाकडे जाऊन खायचे काय, असा प्रश्न होता. त्याच दरम्यान, दोन मुली आणि तीन मुलगे असा वंशवेल बहरलेला. या दांपत्याने काही काळ मटण विक्रीचे काम केले. घोलू यांचे अकाली निधन झाले; परंतु गंगूबाई यांनी धीर सोडला नाही. गावोगावी फिरून मासे विक्री करून चरितार्थ चालवला. मुलांना शाळेत घातले. विकासचे आठवीपर्यंतचे शिक्षण तिलारीनगर येथेच झाले. मध्यवर्ती म्हणून त्यांनी चंदगडला कुटुंब हलवले. मोठी मुलगी इंदिराने याच व्यवसायाला हातभार लावण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले. पाठोपाठच्या माधवीसह अन्य भावंडांच्या शिक्षणाची आबाळ होऊ द्यायची नाही, ही गंगूबाई आणि इंदिरा यांची जिद्द होती. माधवीने दहावी, बारावीला प्रथम क्रमांक मिळवला. बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे एमबीएसाठी प्रवेश घेतला. अभ्यासक्रम पूर्ण करून कार्पोरेट कंपनीत नोकरी मिळवली. आता तिच्या आधारावर अन्य भावंडांचे शिक्षण सुकर झाले. विकासने बीई मेकॅनिकलची पदवी संपादन केली. खासगी कंपनीत नोकरी करीत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात तो प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला; परंतु मुख्य परीक्षेवेळी आजारी पडला. दुसऱ्यांदा मात्र त्याने यश मिळवले. सध्या तो नाबार्डकडे वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. 
==========================================

जिनेव्हा; विश्वाच्या प्राथमिक स्थितीची प्रतिकृती

  • जिनेव्हा : विश्वाच्या प्राथमिक स्थितीची छोटी प्रतिकृती तयार करण्यात आली असून, यासाठी शास्त्रज्ञांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली कण वेगवर्धकात प्रमुख अणूंची अत्याधिक ऊर्जेतून टक्कर घडविली. सर्न या जगातील सर्वाधिक मोठ्या प्रयोगशाळेतील लार्ज हैड्रन कोलायडरमध्ये ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
    महाविस्फोटानंतर अत्यंत उष्ण आणि घन अवस्थेत विश्व अस्तित्वात आले. यात प्रामुख्याने क्वार्क आणि ग्लुओनसह मूलभूत द्रव्यकण होते. या स्थितीला क्वार्क ग्लुओन प्लाझ्मा संबोधण्यात आले. 
==========================================

No comments: