[अंतरराष्ट्रीय]
१- नेपाळ कायमच भारताचा विश्वासू मित्र : के. पी. ओली
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- चंडीगड; जाट आरक्षणाची गुंतागुंत, हरियाणा का भडकलंय?
३- जाट आंदोलनाला हिंसक वळण, लष्कराचा फ्लॅग मार्च
४- शिक्षणाच्या भल्यासाठी तरी राजकारण बाजुला ठेवावं - स्मृती इराणी
५- जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला
६- अर्थसंकल्पात शेतकरी, तरुण वर्गावर भर: सिन्हा
७- देशातील अर्धा लाख पुलांचा 'डेटाबेस' सज्ज
८- हरियानात रेल्वे स्थानक जाळले;लष्कर दाखल
९- 'जेएनयू'मध्ये 15 वर्षांपासून फडकतोय तिरंगा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- चारा छावण्या बंदीचा निर्णय कोणत्या *** ने घेतला, शिवतारेंची जीभ घसरली
११- उल्हासनगरमध्ये पालिका उपायुक्तांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न!
१२- नाशिक; कमोडमध्ये पाय अडकल्याने 16 तासांपासून शौचालयात
१३- मातृभाषेतून शिक्षण ही जगभरात सुरू असलेली चळवळ - विनोद तावडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- खंडाला; साडे-सात तासानंतरही एक्स्प्रेस वेला कासवाचा वेग
१५- भोपाल; टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा, तरुणीच्या जागरुकतेनं प्रकरणाचा पर्दाफाश
१६- संमेलनात घुमले ‘अधिकार’वाणीचे सूर
१७- पुण्याच्या महापौरपदासाठी 'राष्ट्रवादी'तर्फे प्रशांत जगताप
१८- जेएनयू प्रकरणी तिघांविरोधात लुकआउट नोटिस
१९- मुखेड; कंधार तालुक्याचा डोंगरी विभाग कार्यक्रमाअंतर्गत समावेश करण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
२०- मुखेड; शाहिर अण्णाभाऊ साठे विद्यालयात निरोप व पालक मेळावा संपन्न
२१- मुक्रमाबाद; खळुरे यांना उपक्रमशिल कला शिक्षक पुरस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- विश्वविक्रम: शेवटच्या कसोटीत मॅक्युलमनं झळकावलं वेगवान शतक
२३- गायक हंसराज हंस यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
२४- साप चावल्यास घाबरु नका, सगळ्यात आधी हे उपाय करा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
चुकीचा रस्ता..चुकीची माणसं..वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..हे अत्यंत गरजेचे आहेत...
कारण...
यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे
(डाॅ. राहुल कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
गायक हंसराज हंस यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
चंदिगड - प्रसिद्ध सुफी गायक व शिरोमणी अकाली दलाचे माजी उपाध्यक्ष हंसराज हंस यांनी आज (शनिवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अर्थसंकल्पात शेतकरी, तरुण वर्गावर भर: सिन्हा

नवी दिल्ली: यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी वर्गावर केंद्रीत आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर देणारा असेल, असे सूतोवाच केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज (शनिवार) केले. केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.
सिन्हा म्हणाले, "गरीबी पूर्णपणे दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, या दिशेने अर्थ मंत्रालयामध्ये प्रयत्न सुरू आहेत. आपल्या शेतकऱ्यांना बळ देणारा, तरुण वर्गासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारा आणि सर्व भारतीयांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी कसून तयारी केली जात आहे. जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली असली, तरीही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि प्रगतीच्या मार्गावर कशी राहील, याची काळजी अर्थसंकल्पातून घेतली जाईल.‘‘
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार, आगामी आर्थिक वर्षातही भारताचा विकासदर 7.3 टक्के असा कायम राहण्याची शक्यता आहे. त्या पुढील आर्थिक वर्षात हा विकासदर 7.5 टक्के असू शकेल, असेही त्या अहवालात म्हटले आहे. याच अहवालानुसार, 2016 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 3.4 टक्के असेल, तर 2017 मध्ये हा दर 3.6 टक्के असेल.
=======================================
नेपाळ कायमच भारताचा विश्वासू मित्र : के. पी. ओली
पुण्याच्या महापौरपदासाठी 'राष्ट्रवादी'तर्फे प्रशांत जगताप

पुणे: पुण्याच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नगरसेवक प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जगताप हे वानवडीतील प्रभाग क्रमांक 61 (ब) मधून निवडून आले आहेत. येत्या 25 तारखेला महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे.
पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची आघाडी असल्याने जगताप यांची निवड निश्चित मानली जाते. महापौरपदासाठी हडपसर की खडकवासला विभागाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने महापौरपदाबाबत पक्षाच्यावतीने विशेष दक्षता घेण्यात आली होती. त्यात जगताप यांना संधी मिळाली. जगताप यांनी "पीएमपीएल‘चे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. महापौर पदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक मानकर, विकास दांगट, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, दिलीप बराटे आदी इच्छुक होते.
=======================================
देशातील अर्धा लाख पुलांचा 'डेटाबेस' सज्ज
नवी दिल्ली - देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील (एनएच) लहान- मोठ्या पुलांवरून होणारी अतिजड, जड व सामान्य वाहनांची संख्या किती, त्यासाठी या वाहनांना किती शुल्क भरावे लागते, याची संगणकीकृत माहिती संकलित करून त्यादारे या पुलांची देखभाल व वाहतूकदारांकडून येणाऱ्या शुल्कापोटी देशाच्या खजिन्यात जमा होणारी रक्कम; याबाबत शास्त्रशुद्ध माहिती असणारी "डेटाबेस प्रणाली‘ तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाने गती दिल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी "सकाळ‘ला सांगितले.
जेएनयू प्रकरणी तिघांविरोधात लुकआउट नोटिस
=======================================
हरियानात रेल्वे स्थानक जाळले;लष्कर दाखल
=======================================
'जेएनयू'मध्ये 15 वर्षांपासून फडकतोय तिरंगा
१- नेपाळ कायमच भारताचा विश्वासू मित्र : के. पी. ओली
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- चंडीगड; जाट आरक्षणाची गुंतागुंत, हरियाणा का भडकलंय?
३- जाट आंदोलनाला हिंसक वळण, लष्कराचा फ्लॅग मार्च
४- शिक्षणाच्या भल्यासाठी तरी राजकारण बाजुला ठेवावं - स्मृती इराणी
५- जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला
६- अर्थसंकल्पात शेतकरी, तरुण वर्गावर भर: सिन्हा
७- देशातील अर्धा लाख पुलांचा 'डेटाबेस' सज्ज
८- हरियानात रेल्वे स्थानक जाळले;लष्कर दाखल
९- 'जेएनयू'मध्ये 15 वर्षांपासून फडकतोय तिरंगा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- चारा छावण्या बंदीचा निर्णय कोणत्या *** ने घेतला, शिवतारेंची जीभ घसरली
११- उल्हासनगरमध्ये पालिका उपायुक्तांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न!
१२- नाशिक; कमोडमध्ये पाय अडकल्याने 16 तासांपासून शौचालयात
१३- मातृभाषेतून शिक्षण ही जगभरात सुरू असलेली चळवळ - विनोद तावडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- खंडाला; साडे-सात तासानंतरही एक्स्प्रेस वेला कासवाचा वेग
१५- भोपाल; टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा, तरुणीच्या जागरुकतेनं प्रकरणाचा पर्दाफाश
१६- संमेलनात घुमले ‘अधिकार’वाणीचे सूर
१७- पुण्याच्या महापौरपदासाठी 'राष्ट्रवादी'तर्फे प्रशांत जगताप
१८- जेएनयू प्रकरणी तिघांविरोधात लुकआउट नोटिस
१९- मुखेड; कंधार तालुक्याचा डोंगरी विभाग कार्यक्रमाअंतर्गत समावेश करण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
२०- मुखेड; शाहिर अण्णाभाऊ साठे विद्यालयात निरोप व पालक मेळावा संपन्न
२१- मुक्रमाबाद; खळुरे यांना उपक्रमशिल कला शिक्षक पुरस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- विश्वविक्रम: शेवटच्या कसोटीत मॅक्युलमनं झळकावलं वेगवान शतक
२३- गायक हंसराज हंस यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
२४- साप चावल्यास घाबरु नका, सगळ्यात आधी हे उपाय करा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
चुकीचा रस्ता..चुकीची माणसं..वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..हे अत्यंत गरजेचे आहेत...
कारण...
यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे
(डाॅ. राहुल कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
=======================================
चारा छावण्या बंदीचा निर्णय कोणत्या *** ने घेतला, शिवतारेंची जीभ घसरली
सोलापूर: राज्यात सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये पडलेली वादाची ठिणगी अद्याप कायम आहे. याचाच प्रत्यय सोलापूरमध्येही आला.
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी चारा छावण्यांवरुन सरकारला थेट शिव्या हासडल्या आहे. शिवतारेंची भाषा इतक्या खालच्या पातळीवर गेली की, त्यांचं भाषण पूर्ण दाखवणंही शक्य नाही.
चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय कुठल्या …….. घेतला असं म्हणत शिवतारे यांनी खालच्या शब्दात टीका केली. त्यांचा अप्रत्यक्ष रोख महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर होता.
टीका करताना शिवतारे यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला. सरकारमध्ये असताना असे चुकीचे निर्णय आम्हाला सहन करावे लागतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जलयुक्त शिवारमध्ये निवडलेल्या गावांची पाहणी करण्यासाठी शिवतारे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र बार्शी तालुक्यातल्या आगळगावच्या सभेत बोलताना विजय शिवतारेंनी सरकारला अक्षरश: शिव्या हासडल्या.
उल्हासनगरमध्ये पालिका उपायुक्तांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न!
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना पालिकेच्या आवारातच जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
दुपारी 1 वाजताच्या सुमारास भदाणे हे कारमध्ये बसले असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलनं कार पार्किंगच्या आवारात आले आणि पेट्रोलनं भरलेली बाटली कारवर टाकून आग लावली. भदाणे यांनी तात्काळ कारमधून पळ काढल्यानं त्यांचा जीव वाचला.
भदाणे यांची वॅगनर गाडी जळून खाक झाली आहे. महापालिकेच्या आवारातच अशी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
=======================================
कमोडमध्ये पाय अडकल्याने 16 तासांपासून शौचालयात
नाशिक: रुग्णालयातील शौचालयाच्या कमोडमध्ये पाय अडकल्यानं एक रुग्ण गेल्या 16 तासांपासून शौचालयात अडकून आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात अर्धांगवायूच्या उपचारासाठी दाखल असलेल्या समाधान वानखेडे, काल मध्यरात्री 1 वाजता शौचासाठी गेले. पण कमोडमध्ये पाय अडकल्यानं सकाळपर्यंत तिथे एकटेच अडकून पडले. सकाळी शोधाशोध झाल्यानंतर ते शौचालयात अडकल्याचं कळलं आणि त्यानंतर त्यांना सोडवण्याचे प्रयत्न सुरु झाले.
पण गेल्या 16 तासांपासून कमोडमध्ये अडकलेला पाय अजूनही अडकूनच आहे. त्यामुळे आधीच अर्धांगवायूचा त्रास सहन करणाऱ्या रुग्णाची सुटका कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जाट आरक्षणाची गुंतागुंत, हरियाणा का भडकलंय?
चंदीगड: आरक्षणासाठी हरियाणातल्या जाट समुदायाचं आंदोलन चांगलंच भडकलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून या मुद्द्यावर आंदोलन सुरु होतं. मात्र काल अचानक वणवा भडकावा तसं हे आंदोलन भडकलं. या आंदोलनाचा फटका सामान्यांना बसतोय. या आंदोलनामागे काही राजकीय गणितं दडली आहेत का, या प्रश्नांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
जाट आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत
हरियाणातल्या जाट आंदोलनाची धग आता दिल्लीपर्यंत पोहचली आहे. जवळपास 500 ट्रेन रद्द, दिल्लीच्या आजूबाजूचे डझनभर हायवे ठप्प अशी परिस्थिती बनली आहे. मंत्र्यांचा बंगला जाळण्यापर्यंतही आंदोलकाची मजल गेली. परिस्थिती हाताबाहेर जातेय असं म्हटल्यावर लष्करालाही पाचारण करण्यात आलं. पण आंदोलन किती वेगानं भडकलंय याचा अंदाज हरियाणाच्या पोलीस महासंचालकांच्या वक्तव्यावरुन येऊ शकतं. पोलीस महासंचालक म्हणतात, “या आंदोलनाला कोणत्याही नेत्याचा चेहरा नाही. तरुण मुलं जमा होऊन हे आंदोलन पसरत गेलं”.
जाट आंदोलनाला हिंसक वळण, लष्कराचा फ्लॅग मार्च
– हरियाणात जाट आरक्षणाला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, सुषमा जेटली, अरूण जेटली, मनोहर पर्रिकर हे मंत्री या बैठकीला उपस्थित होते. आंदोलन रोखण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे सुद्धा या बैठकीला हजर होते.
– हरियाणातून सुटणाऱ्या 500 रेल्वे गाड्या रद्द, शहरातील अनेक शाळा-महाविद्यालये बंद
हरियाणा: आरक्षणाच्या मुद्द्यावरून हरियाणातील जाट समाजानं पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहतकमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे तर 61 जण जखमी झाले आहेत. तब्बल 23 जणांना पोलिसांच्या गोळ्या लागल्या आहेत. तरीही आंदोलकांनी आंदोलनाची धार कमी झालेली नाही
रोहतक आणि भिवानीमध्ये परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर जाऊ यासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच लष्करालाही पाचारण करण्यात आलं असून कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी ते प्रशासनाला मदत करतील.
विश्वविक्रम: शेवटच्या कसोटीत मॅक्युलमनं झळकावलं वेगवान शतक
ख्रिस्टचर्च (न्यूझीलंड): आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या ब्रँडन मॅक्युलमनं अक्षरश: वादळी खेळी केली. या स्फोटक फलंदाजाची ही खेळी क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच लक्षात ठेवली जाईल.
ब्रँडन मॅक्युलम या वादळी खेळाडूनं आपल्या शेवटच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक जलद शतक ठोकण्याचा भीम पराक्रम केला आहे. मॅक्युलमने अवघ्या 54 चेंडूत शतक ठोकून 30 वर्षापूर्वीचा सर रिचर्ड्स यांचा विक्रम मोडीत काढला. आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणाऱ्या मॅक्युलमने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हा विक्रम रचला.
मॅक्युलमनं आपल्या या स्फोटक खेळीत अवघ्या 79 चेंडूत 145 धावा केल्या. ज्यामध्ये 21 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. मॅक्युलमनं आपलं अर्धशतक 34 चेंडूमध्ये पूर्ण केलं तर त्यानं पुढील 50 धावा अवघ्या 20 चेंडूतचं केले. त्यानं 54 चेंडूतमध्येच शतकाला गवसणी घातली. ज्यामध्ये 16 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
साप चावल्यास घाबरु नका, सगळ्यात आधी हे उपाय करा
मुंबई: साप म्हणजे विषारीच अशी जवळपास आपल्या सगळ्यांचा समज आहे. अनेकदा सापाच्या चावण्यांनं फक्त जखम होते आणि फक्त भीतीमुळं अनेकजण आपला जीव गमावत असल्याचं आढळून आलं आहे.
साप चावल्यास घाबरुन न जाता सर्वात आधी प्राथमिक उपचार म्हणून विष पसरवणं थांबवणं गरजेचं आहे.
1. साप ज्या जागी चावला असेल त्या जागी असणारा दागिना सर्वात आधी काढून ठेवा.
2. साप चावलेल्या व्यक्तीला सापापासून दूर घेऊन जा आणि त्याला धीर द्या.
3. स्वत:ला सुरक्षित ठेऊन कोणता साप होता हे जाणून घ्या.
4. जखमेशी छेडछाड न करता, पट्टी बांधून जवळच्या रुग्णालयात जावं.
5. साप चावलेल्या व्यक्तीनं जर बूट घातले असतील तर ते तात्काळ काढून टाकावेत, सैल कपडे नसल्यास तेही काढावे.
6. साप चावलेल्या व्यक्तीला आपल्या मर्जीनं कोणत्याही प्रकारचं पेन कीलर देऊ नका.
7. साप चावलेल्या व्यक्तीला अजिबात चालू देऊ नका. कारण की, यामुळे विष तीव्रतेनं शरीरात पसरण्याची शक्यता असते.
साडे-सात तासानंतरही एक्स्प्रेस वेला कासवाचा वेग
खंडाळा: डोक्याचा पार भुगा करणारी अवस्था होती आज मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर. खंडाळा घाट जणू दर्शन रांग झाला होता. ज्या रांगेतून प्रत्येकाला पुढे सरकायचं होतं. पण हा जाम नक्की का झाला? हेच कळत नव्हतं.
भल्या पहाटे खंडाळ्याच्या एक्झिटजवळ ऑईल टँकर उलटला. अख्खा रस्ता ऑईलनं माखला. त्यामुळे अपघाताची शक्यता होती. म्हणून मुंबईकडे येणारी वाहतूक पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वळवली.
झालं… द्रुतगती महामार्ग मंदगती महामार्ग झाला. खंडाळा घाटाच्या पायथ्यापासून लोणावळा संपेपर्यंत दोन्ही दिशेने रांगा लागल्या. पहाटे 6 वाजता उलटलेला टँकर ओसंडून वाहिला. पण रिकामा टँकर रस्त्यातून काढायला दुपारचा दीड वाजला. मग कुठे मुंबईच्या दिशेने एखादी लेन सुरु झाली.
पण आधीच अडकलेल्या प्रवाशांचा पुरता पुतळा झाला! एक्स्प्रेस वे सुरु होताच. इमाने इतबारे 195 रुपये वसूल करतात. पण सुरळीतपणे प्रवास पडण्याची शाश्वती आजही मिळत नाही. कधी दरड कोसळते, कधी अपघात होतो, कधी अमृतांजन पुलाजवळ कंटेनर बंद पडून डोकेदुखी वाढते. पण त्यातून प्रवाशांचे हजारो मानवी तास वाया जातात. त्याला जबाबदार कोण?
टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा, तरुणीच्या जागरुकतेनं प्रकरणाचा पर्दाफाश
भोपाळ: छुप्या कॅमेऱ्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावल्याची एक घटना समोर आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला या प्रकारामुळं बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे.
तरुणी आपल्या कुटुंबीयांसोबत बाहेर फिरायला गेली होती. घरी परतत असताना गावाजवळील पेट्रोलपंपाच्या इथे गाडी थांबविली. त्याचवेळी तरुणी येथील लेडीज टॉयलेटमध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. पण तिथे जाताच तिच्या मोबाइलचं नेटवर्क मिळेनासं झालं. त्यावेळी तिला शंका आली.
शिक्षणाच्या भल्यासाठी तरी राजकारण बाजुला ठेवावं - स्मृती इराणी
- पुणे - दि. 20 - 'शिक्षण क्षेत्रातून राजकारण सोडून एकत्र आलो तर आपण खुप पुढे जाऊ', असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं आहे. लोकमत माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘शिक्षण संवाद’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच लोकमत आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन इराणी यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना शिक्षण क्षेत्र तसंच त्यातील होणारे बदल यावर स्मृती इराणी यांनी दिलखुलास चर्चा करत आपली मतं व्यक्त केली.'जगभरात भारताची ओळख निर्माण होण्यासाठी भारतीय शिक्षण क्षेत्राची स्वत:ची चांगली ओळख निर्माण व्हायला हवी, पालक आणि विद्यार्थी यांना आपल्या शिक्षण पद्धतीबाबत काय वाटते हे लक्षात घ्यायला हवे' असंही स्मृती इराणी यावेळी सांगितलं. भारतीय शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय मानांकन आणणार असल्यांचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सोबतच येत्या काळात आपण भारतवाणी नावाचे अॅप्लिकेशन आणणार आहोत. ज्यामध्ये सुरुवातील 22 भारतीय भाषांचा समावेश असेल आणि त्यानंतर 100 भाषांचा समावेश केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मातृभाषेतून शिक्षण ही जगभरात सुरू असलेली चळवळ - विनोद तावडे
- पुणे, दि. 20 - मातृभाषेतून शिक्षण ही सध्या जगभरात सुरू असलेली चलवळ असल्याचे सांगताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला. लोकमत माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘शिक्षण संवाद’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. आज शनिवारी सकाळी ११ वाजता पुण्यातील हॉटेल वेस्टइनमध्ये हे चर्चासत्र झाले. शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संस्थापकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून राज्याचे शालेय, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी मुक्त संवाद साधण्याची संधी यावेळी निर्माण करण्यात आली. या कार्यक्रमात व्यक्त झालेले मान्यवरांचे महत्त्वाचे विचार पुढीलप्रमाणे:- दहावीत कुणीही नापास होणार नाही असा आमचा प्रयत्न आहे. तरीही नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आणि या मुलांना एक वर्षाचे कौशल्याधारीत शिक्षण देणार. हे एका वर्षाचे शिक्षण झाले की त्याला दहावी उत्तीर्ण असं प्रमाणपत्र मिळेल. - विनोद तावडे- स्थानिक स्वराज्य संस्थांतील शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा तसेच शिक्षण कृतीशील असावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. - विनोद तावडे- सर्वसमावेशक शिक्षणप्रणालीला सीबीएसई किंवा आयसीएसई मंडळं ही अडथळे आहेत असं मला वाटत नाही. - तावडे- प्रत्येक बालकामध्ये जिज्ञासू वृत्ती असते, त्यामुळे त्याला घोकंमपट्टी करायला न लावता ज्ञान देण्याची गरज आहे. - माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा.- ज्यावेळी विद्यार्थी शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडेल त्यावेळी आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन व्यावहारिक असायला हवा - राजेंद्र दर्डा- मध्ये पगाराव्यतिरिक्त 313 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. - राजेंद्र दर्डा यांनी दिली माहिती.- ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाचे अनेक प्रश्न असून त्यावर काम करण्याची गरज आहे तसेच सर्वाना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे. - राजेंद्र दर्डा.
संमेलनात घुमले ‘अधिकार’वाणीचे सूर!
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नगरी (ठाणे) : नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष फय्याज यांनी अध्यक्षपदाला अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली, तर नवनिर्वाचित अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी हे पद एका वर्षापुरते शोभेचे असता कामा नये, असा सूर आळवला. मात्र अधिकार हे मागून मिळत नाहीत, तर ते गाजवायचे असतात, अशा शब्दांत उद्घाटक व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उभयतांना ‘अधिकार’वाणीचा मंत्र दिला.अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या ९६व्या नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उभारलेल्या भव्य स्वर्गीय मामा पेंडसे मंचावर संपन्न झाला. तत्पूर्वी लेखक श्याम फडके यांच्या निवासस्थानापासून निघालेली नाट्यदिंडी गडकरी रंगायतनमार्गे स्टेडियमवर पोहोचली. गवाणकर यांना फय्याज यांनी सूत्रे सोपवताना अध्यक्षांचा गळ्यातील पदक आणि पुणेरी पगडी प्रदान केली.त्यानंतर फय्याज म्हणाल्या, की संमेलनाध्यक्ष हा १० दिवसांच्या गणपतीप्रमाणेच असतो. संमेलनानंतर त्याला काही अधिकार नसतो. शासनाचे दोन पुरस्कार निवडण्याचे अधिकार सोडले तर हे पद केवळ शोभेचे असते, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे मला वर्षभर काहीही करता आले नाही. हे पद किमान दोन वर्षेतरी असावे, संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक घेऊ नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या.उद्धव ठाकरे यांनी संमेलनाध्यक्षपद दोन वर्षे करण्याची मागणी मान्य आहे का, असा सवाल जाहीरपणे मोहन जोशी यांना करताच, त्यांनी त्यास होकारार्थी उत्तर दिले. मात्र असा झटपट निर्णय अशक्य असल्याची कुजबुज लागलीच सुरू झाली.
जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला
- नवी दिल्ली, दि. 20 - जाट आंदोलनाचा फटका मारुती सुझूकीला बसला असून सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर मारुती सुझूकीने हरियाणामधील मानेसर आणि गुडगांवमधील उत्पादन प्रक्रिया थांबवली आहे. जाट आरक्षणाच्या मुद्यावरुन गेले काही दिवस हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. ज्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मारुती सुझूकीने सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला आहे.जाट आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. रोहतक आणि जवळच्या परिसरात सुरु असलेल्या आंदोलनामुळे मारुती सुझूकीला कोणत्याही प्रकारची आयात - निर्यात करण शक्य होत नाही आहे. यामुळेच त्यांनी आज दुपारपासून मनेसर आणि गुडगांमधील उत्पादन प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपासाठी थांबवली आहे. मारुती सुझूकीने प्रसिद्धीपत्र जारी करुन ही माहिती दिली आहे.मनेसर आणि गुडगांमध्ये मिळून दिवसाला 5 हजार गाड्यांच उत्पादन केलं जात. मात्र उत्पादन प्रक्रिया ठप्प पडल्यामुळे मारुती सुझूकला खुप मोठं नुकसान होणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाईल अशी माहितीदेखील प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
गायक हंसराज हंस यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
चंदिगडमध्ये आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत हंसराज हंस यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हंस हे 2014 मध्ये शिरोमणी अकाली दलातून बाहेर पडले होते. त्यापूर्वी ते सात वर्षे पक्षाबरोबर काम करत होते. आता पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पंजाबमधील दाओबा भागात वाल्मिकी समाजाचे प्रभुत्व असून, हंस हे वाल्मिकी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. जालंधर लोकसभा मतदारसंघातून त्यांना शिरोमणी अकाली दलने तिकीट नाकारले होते.
=======================================अर्थसंकल्पात शेतकरी, तरुण वर्गावर भर: सिन्हा
नवी दिल्ली: यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी वर्गावर केंद्रीत आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर देणारा असेल, असे सूतोवाच केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी आज (शनिवार) केले. केंद्रीय अर्थसंकल्प 29 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.
सिन्हा म्हणाले, "गरीबी पूर्णपणे दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत, या दिशेने अर्थ मंत्रालयामध्ये प्रयत्न सुरू आहेत. आपल्या शेतकऱ्यांना बळ देणारा, तरुण वर्गासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारा आणि सर्व भारतीयांचे जीवनमान उंचावणारा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी कसून तयारी केली जात आहे. जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली असली, तरीही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि प्रगतीच्या मार्गावर कशी राहील, याची काळजी अर्थसंकल्पातून घेतली जाईल.‘‘
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार, आगामी आर्थिक वर्षातही भारताचा विकासदर 7.3 टक्के असा कायम राहण्याची शक्यता आहे. त्या पुढील आर्थिक वर्षात हा विकासदर 7.5 टक्के असू शकेल, असेही त्या अहवालात म्हटले आहे. याच अहवालानुसार, 2016 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 3.4 टक्के असेल, तर 2017 मध्ये हा दर 3.6 टक्के असेल.
=======================================
नेपाळ कायमच भारताचा विश्वासू मित्र : के. पी. ओली
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि नेपाळदरम्यान असलेले गैरसमजुतीचे वातावरण निवळले असून, मैत्रीची नव्याने सुरवात झाली असल्याचे नेपाळचे पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली यांनी आज म्हटले आहे. सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या ओली यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारतीय असलेल्या नेपाळमधील मधेशी समाजाने राज्यघटनेविरोधात सुरू केलेल्या आंदोलनानंतर नेपाळ आणि भारतामधील संबंध तणावाचे झाले होते. व्यापारी मार्ग बंद पडल्याने नेपाळने नाराजी व्यक्त केली होती. आता मात्र सर्व पूर्ववत झाले असून अविश्वास आणि तणाव संपुष्टात आल्याचे ओली यांनी सांगितले. काल (ता. 19) भारतात दाखल झाल्यावर ओली यांचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वागत केले होते. आज ओली यांचे लष्करातर्फे सलामी देत अधिकृत स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांनी "हैदराबाद हाउस‘मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सत्ता स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यावर आलेल्या ओली यांच्याबरोबर 77 जणांचे शिष्टमंडळ आहे. पंतप्रधान मोदी आणि ओली यांनी व्यापार, राजकीय परिस्थिती यासह अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. दोघांमध्ये निर्माण झालेला तणाव दूर करून संबंध पूर्वपदावर आणणे, हा ओली यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. मोदी यांच्या भेटीपूर्वी ओली यांनी स्वराज यांच्याशीही चर्चा केली. पायाभूत सुविधा, राजकारण, द्विपक्षीय संबंध, सार्क उपग्रह अशा मुद्द्यांवर ही चर्चा झाली. ओली यांच्या दौऱ्यादरम्यान, मधेशी समाजाच्या मागण्यांचा विचार करून नवी राज्यघटना अधिक सर्वसमावेशक करण्याचे त्यांना भारताकडून सांगितले जाऊ शकते. ओली यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी राधिका शाक्य, उपपंतप्रधान कमल थापा, अर्थमंत्री बिशू पौड्याल, गृहमंत्री शक्ती बस्नेत आले आहेत.
=======================================पुण्याच्या महापौरपदासाठी 'राष्ट्रवादी'तर्फे प्रशांत जगताप
पुणे: पुण्याच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नगरसेवक प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जगताप हे वानवडीतील प्रभाग क्रमांक 61 (ब) मधून निवडून आले आहेत. येत्या 25 तारखेला महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे.
पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची आघाडी असल्याने जगताप यांची निवड निश्चित मानली जाते. महापौरपदासाठी हडपसर की खडकवासला विभागाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने महापौरपदाबाबत पक्षाच्यावतीने विशेष दक्षता घेण्यात आली होती. त्यात जगताप यांना संधी मिळाली. जगताप यांनी "पीएमपीएल‘चे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. महापौर पदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक मानकर, विकास दांगट, बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, दिलीप बराटे आदी इच्छुक होते.
=======================================
देशातील अर्धा लाख पुलांचा 'डेटाबेस' सज्ज
भारतीय पूल व्यवस्थापन यंत्रणेने (आयबीएमएस) गेल्या सात महिन्यांत जमा केलेल्या संगणकीकृत माहितीनुसार, देशातील महामार्गांवर किमान 47 हजार पूल आहेत व त्याबाबत भारत हा जगात अव्वल क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. वेळापत्रकानुसार डिसेंबर 2016 पर्यंत हे काम पूर्ण होईल तेव्हा देशातील पुलांची संख्या किमान एक ते सव्वा लाखापर्यंत जाईल असा अंदाजही सूत्रांनी वर्तविला.
=======================================जेएनयू प्रकरणी तिघांविरोधात लुकआउट नोटिस
नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) भारतविरोधी घोषणा दिल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (शनिवार) तिघांविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे.
जेएनयू परिसरात 9 फेब्रुवारीला अफजल गुरुच्या समर्थनार्थ आयोजित सभेत भारताविरोधी घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता दिल्ली पोलिसांनी उमर खालीद, अनिर्बान आणि रियाज या तिघांविरोधात लुकआउट नोटिस प्रसिद्ध केली आहे.
या नोटिसमध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि तपास अधिकार्यांना सतर्क राहण्यास सांगितलेले आहे. या तिघांपैकी कुणी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना त्वरित अटक करा, असे या नोटिसमध्ये म्हणण्यात आले आहे.
=======================================
हरियानात रेल्वे स्थानक जाळले;लष्कर दाखल
चंदिगड - हरियानात जाट आरक्षणाच्या आंदोलनामुळे सुरु असलेल्या हिंसक घटना आज (शनिवार) दुसऱ्या दिवशीही काय असून जिंद जिल्ह्यातील बुधा खेरा रेल्वे स्थानक आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकले आहे. हरियानातील सहा जिल्ह्यात लष्काराला पाचारण करण्यात आले असून, त्यांनी शहरातून संचलन केले.
हरियानाच्या पोलिस महासंचालकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले, की रोहतक, जिंद, झझ्झर, भिवानी, हिस्सार, कैथल, पानिपत, सोनिपत आणि कर्नाल या नऊ जिल्ह्यांत लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. शिवाय केंद्रीय निमलष्करी दलांच्या वीस कंपन्यांची (सुमारे दोन हजार जवान) मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. पोलिसांच्या गोळीबारात एक जण ठार व २५ जण जखमी झाले. दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोहतक आणि भिवानीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शुक्रवारी संतप्त जमावाने राज्याचे अर्थमंत्री अभिमन्यू यांचे घर पेटवून दिले; तसेच सरकारी व खासगी मालमत्तेची नासधूस केली. रोहतक, झझ्झर आणि हन्सी येथे जमावाने काही पोलिसांना बंदिवान केले; तसेच खासगी आणि सरकारी वाहनांची नासधूस केली. सरकारी कार्यालयांच्या इमारती तसेच हिस्सार जिल्ह्यातील हन्सी आणि रोहतकमधील दोन टोल नाकेही आंदोलकांनी उद्ध्वस्त केले. जाट समाजाचे आरक्षणासाठी गेले काही दिवस हे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतलेल्या बैठकीत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले
=======================================
'जेएनयू'मध्ये 15 वर्षांपासून फडकतोय तिरंगा
नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) छतावर गेल्या पंधरा वर्षांपासून तिरंगा डौलाने फडकत असून, येथील विद्यार्थ्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
जेएनयूमध्ये नऊ फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानच्या घोषणा दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्व म्हणजे 46 केंद्रीय विद्यापीठांत रोज तिरंगा फडकावण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सर्व विद्यापीठांत 207 फूट उंच स्तंभावर रोज तिरंग्याला वंदन करणे बंधनकारक व अनिवार्य राहील, असे ठरविण्यात आले होते. या निर्णयानंतर समोर आले आहे, की जेएनयूमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून तिरंगा फडकत आहे. सर्व विद्यापीठात तिरंगा फडकाविण्याच्या कामास अंदाजे 45 लाख रुपये खर्च असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘जेएनयू‘मध्ये देशविरोधी व दहशतवाद्यांचे गुणगान करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. हा विषय "राष्ट्रभक्ती‘ व "देशद्रोही‘ या अंगाने नेल्यास जुळणारी गणिते सरकारच्या लक्षात येऊ लागल्याचे हे पहिले द्योतक असल्याचे जाणकार मानतात. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर मंत्रालयाने ही कुलगुरूंची बैठक बोलावण्याचा निर्णय केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात "जेएनयू‘मध्ये या महिन्याच्या पहिल्याच दिवशी अफजल गुरू प्रकरण घडले व आजच्या बैठकीतील चर्चेचा मुख्य रोखही बदलला.
=======================================
No comments:
Post a Comment