Saturday, 13 February 2016

नमस्कार लाईव्ह १३-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 

१- नायजेरिया; आत्मघाती जॅकेट फेकून ‘ती’ पळाली 

२- पाकमध्ये तुरुंग फोडण्याचा प्र्रयत्न उधळला 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

३- 'बाला अँड सन को इधर भेजो', राणाचा रेगेंना ई-मेल : हेडली 

४- मोदींच्या हस्ते 'मेक इन इंडिया' सप्ताहाचा शुभारंभ 

५- कुपवाडामध्ये अतिरेकी घुसलेलं घर उडवलं, मात्र दोन जवान शहीद 

६- साताऱ्याच्या पठ्ठ्याने बनवलं भारतीय बनावटीचं विमान 

७- काँग्रेसच्या बड्या नेत्यामुळे इशरतबाबतचं सत्य लपवलं? - राजेंद्र कुमार 

८- देशासाठी लढलेले माजी सैनिक जेएनयू प्रकरणामुळे दुखावले, दिला ‘पदवीवापसी’चा इशारा 

९- राहुल गांधींच्या तोंडी हाफीज सईदची भाषा- भाजप 

१०- 'जेएनयू'मधील आणखी सात विद्यार्थ्यांना अटक  

११- जेएनयू वाद : अभाविपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

१३- इशरतच्या टार्गेटवर मोदी,बाळासाहेब होते, राजेंद्र कुमारांचा दुजोरा 

१४- ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली विध्वंसक विकास नको- शिवसेना 

१५- जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाकर्त्यांत सीपीआय नेत्याची कन्या? 

१६- राजस्थान; तीन पाय असलेल्या बाळाचा जन्म, डॉक्टरही हैराण 

१७- कुपवाड्यात नाशिकचा वीर शहीद, तर वीजापूरच्या जवानालाही वीरमरण 

१८- जनता मोदी आणि भाजपला कंटाळलेय- गुलाम नबी आझाद 

१९- आजची काँग्रेस विदेशी भावना असलेली-गेहलोत 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

२०- परभणी; कॉलेजचं लोखंडी गेट अंगावर पडून दोन भावंडांचा मृत्यू 

२१- पुणे; हिंजवडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू 

२२- बंगळूरू; सेल्फीच्या नादात कालव्यात पडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू 

२३- नागपूर; सहा वर्षीय सायमन चालता-फिरता क्रिकइन्फो 

२४- तमिळनाडूत द्रमुक व काँग्रेस एकत्र लढणार 

२५- पुण्यात सोमवारपासून तलाठ्यांचे कामबंद आंदोलन. 

२६- अमरावती; महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा भरधाव ट्रकच्या धडकेने मृत्यू 

२७- माढा तालुक्यातील दहिवली गावात ट्रॅक्टर विहीरीत कोसळून ३ जण ठार 

२८- मुखेड; जि.प.प्रा.शाळा येवती येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न 

२९- टंचाईच्या तीव्रतेने पळाले तोंडचे पाणी! (पहा फोटो)

~~~~~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

३०- राष्ट्रपतीभवनात फुलांच्या राजाचा थाट 

३१- सुवर्ण मंदिराच्या लंगरमध्ये ऐश्वर्याने घासली भांडी 

३२- काळा पैसा उघड होण्याच्या प्रमाणात वाढ 

३३- ‘बसंती’मुळे गब्बर नेते येणार अडचणीत! 

३४- युवराजला फलंदाजीत बढती देणे अवघड-धोनी 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

आपण काय आहोत, यावरून आपली किंमत ठरते. आपल्याकडे काय आहे, यावरून नव्हे

(गजानन नरवडे, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~~~~~

विकणे आहे 

भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.

संपर्क- 7350625656

~~~~~~~~~~~~~~~~~~~

जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून

बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...

व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....

आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html

**********************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.

http://goo.gl/uS8DX4

===========================================

कुपवाडामध्ये अतिरेकी घुसलेलं घर उडवलं, मात्र दोन जवान शहीद


श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक मेजर दर्जाचा अधिकारी जखमीही झाला आहे. 
झुनरेशी गावात चार अतिरेकी घुसल्याची बातमी जवानांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी झुनरेशी गावात सर्च ऑपरेशन सुरु केलं. यावेळी अतिरेक्यांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. 
चकमकीत चार दहशतवाद्यांन कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. शिवाय ज्या घरात अतिरेकी घुसले होते, ते घर लष्कराने स्फोटकाच्या सहाय्याने उडवून दिलं. राष्ट्रीय रायफल्स, विशेष कृती दल, पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
===========================================

राजस्थान; तीन पाय असलेल्या बाळाचा जन्म, डॉक्टरही हैराण

तीन पाय असलेल्या बाळाचा जन्म, डॉक्टरही हैराण
परतापूर (राजस्थान) राजस्थानच्या एका सरकारी रुग्णालयात एका महिलेने तीन पाय असलेल्या मुलीला जन्म दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे आई आणि बाळ दोघीही सुखरुप आहेत. पण नवजात बाळाला पाहून डॉक्टरही हैराण झाले आणि याची माहिती तातडीने नातेवाईकांना दिली. 
बाळाच्या पाठीवर तिसरा पाय
भगोरा गावातील राजेंद्र आणि रोशनी कटारा या दाम्पत्याला हे बाळ झालं आहे. रोशनीचं हे पहिलंच गर्भारपण आहे. रोशनीला गुरुवारी पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. जनकराज सोनी आणि मेल नर्स रमेश बारिया यांनी शुक्रवार रोशनीची प्रसुती केली. पण नवजात बाळाला पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. बाळाचे दोन्ही पाय सामान्य आहेत, पण तिसरा पाय पाठीच्या कण्याला गाठोड्यासारखं दिसत आहे. त्यात तिसरा पाय आहे. डॉक्टरांनी तातडीने आई आणि बाळाला बांसवाडातील रुग्णालायत दाखल करण्याचा सल्ला दिला.
===========================================

परभणी; कॉलेजचं लोखंडी गेट अंगावर पडून दोन भावंडांचा मृत्यू 

कॉलेजचं लोखंडी गेट अंगावर पडून दोन भावंडांचा मृत्यू
परभणी : परभणीत कॉलेजचं लोखंडी गेट कोसळून दोन भावांचा मृत्यू झाला. मानवत येथील केकेएम महाविद्यालयात ही घडना घडली आहे. गोविंद मंजाभाऊ फंड (वय 10 वर्ष) आणि तन्मय रामकृष्ण फंड (वय 7 वर्ष) अशी या मृत भावांची नाव आहेत. 
हे दोघं मानवतमधील शकुंतला विद्यालयाचे विद्यार्थी असून खेळण्यासाठी ते केकेएम महाविद्यालयात आले होते. ही मुलं महाविद्यालयाच्या गेटसोबत खेळत होते. त्याचवेळी हे गेट पडून गोविंद आणि तन्मय या सख्ख्या चुलत भावंडांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. 
या दुर्दैवी घटनेमुळे मानवत गावावर शोककळा पसरली आहे.
===========================================

पुणे; हिंजवडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

पुण्याच्या हिंजवडीत भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू



hingvadi dog attack

पुणे : हिंजवडीजवळ माणगावातील बोडकेवाडी येथील वीटभट्टीवर एका दीड वर्षांच्या चिमुरड्याचा कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली. संदीप शावाप्पा नाटेकर असं या दुर्दैवी चिमुरड्याचं नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माण गावच्या हद्दीत असलेल्या बोडकेवाडीतील वीटभट्टीवर नाटेकर कुटुंबीय काम करतात व तेथेच वास्तव्यास आहेत. कुडाचे घर असल्यामुळे त्यांच्या घराला दरवाजा नाही. काल रात्री नाटेकर झोपले असता त्यांचा दीड वर्षांचा मुलगा संदीप हा खेळत खेळत घराबाहेर गेला. त्यावेळी तेथील भटक्या कुत्र्यांनी संदीप याच्यावर हल्ला केला. यामध्ये संदीप याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
सकाळी नाटेकर पति-पत्नी उठल्यानंतर संदीप घरात न दिसल्याने शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते तपास करत आहेत.
===========================================

मोदींच्या हस्ते 'मेक इन इंडिया' सप्ताहाचा शुभारंभ 

मोदींच्या हस्ते 'मेक इन इंडिया' सप्ताहाचा शुभारंभ
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचं आज मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर शुभारंभ झाला. परदेशी गुतंवणूकदारांना महाराष्ट्रात आणि देशात गुंतवणूक करण्याचं आवाहन करणं, असा या योजनेचा हेतू आहे. 
हा कार्यक्रम 13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मुंबईच्या बीकेसी ग्राऊंडवर 2 लाख चौरस फुटांवर विविध दालनं यासाठी तयार करण्यात आली आहेत. 
68 देशातील उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आठवड्याभरात महाराष्ट्रात 4 लाख कोटीची गुंतवणूक व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यातून 12 लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे. 
दरम्यान 15 तारखेला मेक इन मुंबई परिसंवादाचा समारोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
===========================================

'बाला अँड सन को इधर भेजो', राणाचा रेगेंना ई-मेल : हेडली 

'बाला अँड सन को इधर भेजो', राणाचा रेगेंना ई-मेल : हेडली
मुंबई: मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा आरोपी डेव्हिड हेडलीने पाचव्या दिवशीच्या साक्षीतही अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 
“राजाराम रेगेंशी संपर्कात होतो. त्यांचे सतत फोन, ई-मेल सुरु होते. रेगेंचा वापर कसा करावा याबाबात मतमतांतरे होती. मेजर इक्बालला रेगेंच्या माध्यमातून शिवसेनेच्या जवळ जायचं होतं. साजीद मीर, मेजर पाशा आणि हेडली यांना एका हल्ल्यासाठी रेगेंचा वापर करायचा होता”, असा गौप्यस्फोट हेडलीने केला. 
“डॉ. राणाचा रेगेंच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करावी असा हेतू होता. डॉ. राणानं रेगेला सांगितलं की शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे (बाला अँड सन) यांना अमेरिकेत पाठव. आम्ही त्यांची काळजी घेऊ. हेडली त्यांच्या प्रत्येक मित्राबाबत, कोणाशी ओळख होती हे मेजर इक्बाल आणि साजिद मीरला सांगत होता”, असंही हेडलीने सांगितलं. 
मुंबईतील 2008 च्या हल्ल्यानंतर 2009 मध्ये पुण्यातल्या सैनिकी तळांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याचं हेडलीनं सांगितलं. त्यासाठी पुण्यात रेकीही करण्यात आली होती. हल्ल्याच्या ठिकाणांची चित्रफीतही बनवण्यात आल्याचं हेडली म्हणाला. 
लष्कर-ए-तोयबाशी संबंधित इलियास काश्मीरीच्या सांगण्यावरुन हे काम केलं, असंही हेडली म्हणाला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनं शिवसेनेच्या राजाराम रेगेंशी आपली मैत्री असल्याचा पुनरुच्चार केला. रेगेसोबत आपले सतत फोन आणि ईमेल सुरू असल्याचं हेडलीनं सांगितलं.
===========================================

साताऱ्याच्या पठ्ठ्याने बनवलं भारतीय बनावटीचं विमान 

साताऱ्याच्या पठ्ठ्याने बनवलं भारतीय बनावटीचं विमान
मुंबई: ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमात पाहुण्यांचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय बनावटीचं पहिलं-वहिलं विमान सज्ज झालं. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील अमोल यादव यांनी या विमानाची निर्मिती केली. 
हे विमान तयार करण्यासाठी अमोल यांनी 2008 पासून प्रयत्नशील होता. हे विमान तयार करण्यासाठी तब्बल 4 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात हे विमान प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. 
“मी वैमानिक आहे. त्यामुळे मला हवाईदलाबद्दल माहिती आहे. भारतात सर्व विमाने आयात केली जातात. इथे विमान बांधणी होतच नाही. आम्ही मित्रांनी अमेरिकेत विमान खरेदी केलं. त्या विमानवरच आम्ही प्रशिक्षण घेतलं. त्यावेळी विमान शिकणं आणि बनवणं हे अवघड नसल्याचं जाणवलं. पण त्यासाठी कोणी पुढाकार घेत नव्हतं, तो पुढाकार मी घेतला”, असं अमोल म्हणाले. 
अमोल हे गेल्या 17 वर्षांपासून या क्षेत्राशी निगडीत आहेत. खरंतर अमोल यांनी बनवलेलं हे तिसरं विमान आहे. पहिलं पूर्ण झालं नव्हतं, दुसऱ्या विमानाला परवानगी मिळाली नाही, तर आता बनवलेल्या या विमानाला 2011 मध्ये परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्याची प्रक्रिया सुरु असल्याचं अमोल यांनी सांगितलं.
===========================================

काँग्रेसच्या बड्या नेत्यामुळे इशरतबाबतचं सत्य लपवलं? - राजेंद्र कुमार 

काँग्रेसच्या बड्या नेत्यामुळे इशरतबाबतचं सत्य लपवलं?
नवी दिल्ली : डेव्हिड हेडलीच्या साक्षीनंतर इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणी आयबीच्या माजी संचालकांनी केलेल्या दाव्यानंतर पुन्हा खळबळ माजली आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने माहिती लपवल्याचा दावा राजेंद्र कुमार यांनी केला आहे. 
इशरत जहाँच्या लष्कर-ए-तोयबाशी असलेल्या संबंधाबाबत याआधीही डेव्हिड हेडलीनं सीबीआय आणि एनआयएला माहिती दिली होती. मात्र तत्कालीन यूपीए सरकारनं ही माहिती दडपून ठेवल्याचा दावा आयबीचे माजी संचालक राजेंद्र कुमार यांनी केला आहे. 
गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणं, हाच यामागचा हेतू होता, त्यामुळेच हायकोर्टापुढेही हेडलीनं दिलेली साक्ष लपवली गेली, असं राजेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसचा तो बडा नेता कोण, याचीही जोरदार चर्चा रंगत आहे.
===========================================

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाकर्त्यांत सीपीआय नेत्याची कन्या? 

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाकर्त्यांत सीपीआय नेत्याची कन्या?
नवी दिल्ली : जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या देशविरोधी घोषणाबाजीला नवं वळण मिळालं आहे.  घोषणा देणाऱ्यांमध्ये सीपीएम नेते डी. राजा यांची मुलगी देखील होती, असा दावा भाजप नेते महेश गिरी यांनी केला आहे. 
डी. राजा आणि सीपीएम नेते सीताराम येचूरी यांनी याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. एखाद्या घटनेवरुन संपूर्ण जेएनयू विद्यापीठाला देशद्रोही ठरवणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. 
पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवारी जेएनयू कॅम्पसमध्ये काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. भारतात अशांतता पसरवण्याबरोबरच काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणांचा यात समावेश होता. याप्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्यालाल कुमार यांच्यासह 10 जणांवर देशद्रोहाचे खटले दाखल केले गेले आहेत. यापैकी तिघा जणांना पोलिस कोठडीत ठेवलं गेलं आहे, तर इतर काही जण फरार आहेत. 
दरम्यान विद्यार्थी निवडणुकांत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केल्यानं गोवलं जातंय, असा आरोप कन्हैय्यालाल कुमार यानं केला आहे.
===========================================

कुपवाड्यात नाशिकचा वीर शहीद, तर वीजापूरच्या जवानालाही वीरमरण

कुपवाड्यात नाशिकचा वीर शहीद, तर वीजापूरच्या जवानालाही वीरमरण
उधमपूर (जम्मू काश्मीर) : जम्मू-काश्मीरजवळच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत नाशिकच्या वीरासह दोन जवान शहीद झाले आहेत. अतिरेक्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं. नायक शंकर चंद्रभान शिंदे आणि सहदेव मारुती मोरे अशी या वीरांची नावं आहेत. 
शंकर शिंदे हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या बायले गावचे रहिवाशी, तर सहदेव मोरे हे कर्नाटकातील विजापूरचे आहेत. 
शंकर शिंदे यांच्या पश्चात पत्नी सुवर्णा, मुलगी (वय 6 वर्ष 5 महिने) मुलगा (वय 1 वर्ष 8 महिने) असं कुटुंब आहे. तर सहदेव मारुती मोरे यांच्या पश्चात त्यांची आई रखमाबाई आहे. 
अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत एक मेजर दर्जाचा अधिकारी जखमीही झाला आहे.
===========================================
राष्ट्रपतीभवनात फुलांच्या राजाचा थाट 



दिल्लीत राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक मुघल गार्डन 12 फेब्रुवारीपासून एक महिन्यासाठी सामान्य लोकांना बघायला खुलं होणार आहे. 15 एकरात पसरलेलं आणि 120 जातींच्या देशी विदेशी गुलाबांच्या जातीने बहरलेल्या मुघल गार्डन आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते आज या गुलाब प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे.शुक्रवारपासून सर्वसामान्यांसाठी हे गार्डन खुलं होणार आहे. या गार्डनची ही खास झलक…
===========================================
देशासाठी लढलेले माजी सैनिक जेएनयू प्रकरणामुळे दुखावले, दिला ‘पदवीवापसी’चा इशारा 
jnu_4235234

नवी दिल्ली – 13 फेब्रुवारी : नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी नारे दिल्याप्रकरणी आता काही निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी ठाम भूमिका घेतली आहे. आम्ही देशासाठी लढलो, त्याग केला त्यामुळे अशा घोषणा सहन करू शकत नाही, जर हे वेळीच थांबलं नाहीतर आम्ही आमच्या पदव्या परत करू अशा इशारा निवृत्त अधिकार्‍यांनी दिलाय.
राष्ट्रीय संरक्षण ऍकादमीच्या माजी सैनिकांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र पाठवले आहे. हे सर्व अधिकारी 54 व्या बॅचचे विद्यार्थी आहे. युनाइटेड फ्रंट ऑफ एक्स-सर्व्हिसमॅनचे निवृत्त कर्नल अलिल कौल यांनी हे पत्र लिहिले आहे. जून 1978 बॅचच्या एनडीएचे आम्ही माजी विद्यार्थी असून सायन्स आणि ऑर्टसची पदवी घेतलीये.
पण, जेएनयूमध्ये अफजल गुरू दिवस सारखे प्रश्न हाती घेऊन राष्ट्रविरोधी कृत्य केली जात आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. भारतविरोधी घोषणाबाजी करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई केली नाही, आणि हे उद्योग बंद केले नाहीत तर आम्ही आमच्या जेएनयूच्या पदव्या परत करू, असा इशारा या अधिकार्‍यांनी दिलाय. आम्ही ज्या देशासाठी लढलो, त्याग केला, त्या देशाविरोधातल्या घोषणा आम्ही ऐकू शकत नाही, आम्हाला ते सहन होत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
===========================================
इशरतच्या टार्गेटवर मोदी,बाळासाहेब होते, राजेंद्र कुमारांचा दुजोरा 
rajendra_kumar3
नवी दिल्ली – 13 फेब्रुवारी : इशरत जहाँ ही आत्मघातकी पथकाची सदस्य होती असा दावा डेव्हिड हेडलीनं नुकताच केला. त्याला गुप्तचर विभागाचे माजी विशेष संचालक राजेंद्र कुमार यांनी दुजोरा दिलाय. एवढंच नाही, पण इशरतच्या पथकाचं टार्गेट 5 बडे नेते होते. त्यात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, प्रवीण तोगडिया आणि अशोक सिंघल यांचा समावेश होता असा दावा राजेंद्र कुमार यांनी केलाय.
भाजपच्या प्रचार रॅलींमध्ये दहशतवादी या नेत्यांवर हल्ला करणार होते, असा गुप्तचर विभागाचा कयास होता. राजेंद्र कुमार यांच्या वक्तव्याला यासाठी महत्त्व आहे. कारण यूपीए सरकारनं इशरत प्रकरणात ठोस माहिती आणि पुरावे नाहीत, असं कोर्टाला सांगितलं होतं, आणि त्यामुळे स्वतः राजेंद्र कुमार अडचणीत आले होते. इशरत जहाँ एन्काऊंटर हे राजेंद्र कुमार यांच्या सांगण्यावरुनच करण्यात आलं होतं. जेव्हा इशरत जहाँ चकमक बनावट असल्याचा चौकशी समितीने दावा केला होता त्यावेळी राजेंद्र कुमार यांनाही आरोपीच्या कटघर्‍यात उभं केलं गेलं होतं. हेडलीच्या साक्षीमुळे आता राजेंद्र कुमार यांनी आपली कारवाई योग्य होती असं सांगितलं.
===========================================
राहुल गांधींच्या तोंडी हाफीज सईदची भाषा- भाजप 

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्या अटकेप्रकरणी विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेचा भाजपने समाचार घेतला. विरोधक हे लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेसारखी भाषा बोलत असून हा शहीदांचा अपमान आहे. त्यामुळे देशविरोधी शक्तींना बळ मिळत असल्याचा आरोप भाजपने केला. ‘जेएनयू’मध्ये काही मुठभर लोकांनी काढलेल्या देशविरोधी मोर्चाचा संपूर्ण भारतातून निषेध होत आहे. मात्र, काँग्रेस पक्ष राजकीय द्वेष आणि व्होटबँकेच्या राजकारणातून मोदी सरकारला लक्ष्य करत असल्याचा आरोप भाजपने केला. राहुल गांधी आणि त्यांचे साथीदार ‘जेएनयू’तील आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारा लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईदची भाषा बोलत आहेत. हा भारतीय सीमेचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या आमच्या देशातील शहिदांचा अपमान आहे. ‘जेएनयू’ने विचारवंत आणि अधिकारी घडवले आहेत. काही मुठभर लोक तेथे देशविरोधी भाषणे देत आहेत. कायदा त्याची जबाबदारी पाडत आहे. राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसने शहीदांचा अपमान करू नये, अशी आमची विनंती असल्याचे भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी सांगितले. 
===========================================
जनता मोदी आणि भाजपला कंटाळलेय- गुलाम नबी आझाद 
देशातील जनता पंतप्रधान आणि भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळली आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी केली आहे. ते शनिवारी पाँडेचरी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जनतेला पुढील तीन-साडेतीन वर्ष थांबायची इच्छा नाही. त्यांना मध्यावधी निवडणुका व्हाव्यात असे वाटत असल्याचे आझाद यांनी सांगितले. देशातील जनता पंतप्रधानांच्या कारभार आणि दीर्घकाळच्या प्रतिक्षेमुळे कंटाळली आहे. जनतेला अजूनही मोदींची भाषणे ऐकायला आवडतात. मात्र, जेव्हा पंतप्रधान आणि भाजपच्या कामगिरीचा विचार वेळ येते तेव्हा ती शून्य आहे, असे गुलाब नबी आझाद यांनी सांगितले.
===========================================
‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली विध्वंसक विकास नको- शिवसेना 

मुंबईत शनिवारपासून सुरू होत असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून काहीसा विरोधी सूर व्यक्त होताना दिसत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील अग्रेलखात विध्वंसक विकासाच्या मुद्द्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जैतापूरसारखे विध्वंसक, विषारी प्रकल्प भविष्यात हजारो शेतकर्‍यांचे रोजगार व आयुष्य उजाड करणार आहेत. या विध्वंसक विकासाला जनतेचा विरोध असेल तर राज्यकर्त्यांनी शेतकरी, कष्टकर्‍यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या विकासाचा हट्ट करू नये. आम्ही स्वत: विकासाच्या व आधुनिक प्रगतीच्या बाजूचे आहोत. ‘मेक इन इंडिया’चे स्वागत महाराष्ट्रात करीत आहोत, पण विकासामुळे ज्यांच्या पोटावर मारले जाणार आहे त्यांचे शापही घेऊ नका, असा सल्ला या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
===========================================
बंगळूरू; सेल्फीच्या नादात कालव्यात पडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू 
सेल्फी काढण्याच्या नादात कालव्यात पडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी हुलीवना गावाजवळ घडली. दोघांचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले असून, तिसऱया विद्यार्थ्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. श्रृती, जीवन आणि गिरीष असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  श्रृती आणि जीवन या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले असून तिस-या विद्यार्थ्याचा शोध अद्याप सुरु आहे. मंड्या इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे हे तीन विद्यार्थी आपल्या इतर दोन मित्रांसह गावातल्या कालव्याजवळ गेले होते. गौतम पटेल आणि सिंधू इतर दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.  पाण्यामध्ये खेळत असताना ही मुले सेल्फी काढत होती.  याच नादात त्यांचा तोल जाऊन ते २० फूट खोल कालव्यात पडले. त्यातील गौतम व सिंधूला स्थानिकांनी वाचवले. बंगळूरपासून १८० किलोमीटरवर हुलीवना गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. 
आत्ता पहा जोखीम घेवून काढलेले २५ सेल्फी------

===========================================
सुवर्ण मंदिराच्या लंगरमध्ये ऐश्वर्याने घासली भांडी 
आगामी सरबजीत या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती सध्या पंजाबला पोहचली आहे. दरम्यान, ऐश्वर्याने सुवर्ण मंदिराला भेट दिली आणि मंदिरात जाऊन प्रार्थना केली. 
===========================================
काळा पैसा उघड होण्याच्या प्रमाणात वाढ 
नवी दिल्ली - देशभरात काळ्या पैशासंबंधी कारवाई होत असताना गेल्या पाच वर्षांत देशातील अघोषित उत्पन्न उघड होण्याच्या प्रमाणात 15.5 पट वाढ झाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अहवालात आढळून आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. 
प्राप्तिकर महासंचालकांच्या एका विस्तृत अहवालातील माहितीनुसार, अनेक मोठ्या कंपन्या, हिरे, स्टील व्यापाऱ्यांपासून ते फार्मा व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येकाची प्राप्तिकर विभागाने तपासणी केली आहे. आर्थिक वर्ष 2011 मध्ये 5,894 कोटी रुपयांचे राष्ट्रीय अघोषित उत्पन्न होते. पुढील तीन वर्षात म्हणजेच 2014 सालापर्यंत हा आकडा 90,391 कोटी रुपयांवर पोचला होता. विशेष म्हणजे 2012-2013 दरम्यान अघोषित उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. 2012 साली देशात 6,573 कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न आढळून आले आहे तर 2013 साली अघोषित उत्पन्नाचे प्रमाण 19,337 कोटी रुपयांवर पोचले होते. वर्ष 2015 ची संपुर्ण आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. परंतु सुरुवातीच्या 2-3 महिन्यात अघोषित उत्पन्नाची रक्कम 1,900 कोटी रुपयांपर्यंत पोचली होती. 
===========================================
'जेएनयू'मधील आणखी सात विद्यार्थ्यांना अटक 
भारताविरुद्ध घोषणाबाजी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच्या प्रमुखाला अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या आणखी सात विद्यार्थ्यांना आज (शनिवार) अटक करण्यात आली आहे.
जेएनयू संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफजल गुरू याला 2013 मध्ये फाशी देण्यात आली होती, याचा निषेध करत या संघटनेने आंदोलन पुकारले होते. यावेळी भारताविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. 
कन्हैया कुमारच्या अटकेच्या निषेधार्थ आज इंदिरा गांधी कला केंद्र येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिल्ली पोलिसांनी सात विद्यार्थ्यांना अटक करत त्यांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले आहे. भारताविरोधी घोषणा देणाऱ्या आणि देशाची एकता आणि अखंडत्व यावर प्रश्‍नचिन्ह उभे करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले आहे.
===========================================
नागपूर; सहा वर्षीय सायमन चालता-फिरता क्रिकइन्फो 


चिमुकल्या सायमनच्या जिभेवर क्रिकेटचे रेकॉर्ड
नागपूर - घरात किंवा आजूबाजूच्या वातावरणात जे घडते त्याचे अनुकरण लहान मुले करतात. सायमन आगलावे हा अशाच मुलांपैकी एक. घरातील क्रिकेटच्या माहोलमुळे त्याला या खेळाचे वेड लागले. घरच्यांनी सपोर्ट केला. त्याची उत्सुकता वाढत गेली. आज तो जगभरातील क्रिकेटपटूंना क्षणार्धात ओळखतो. त्याच्या जिभेवर क्रिकेटमधील असंख्य रेकॉर्ड आहेत. या अचाट ज्ञानामुळे नातेवाईक व परिसरातही त्याची ओळख ‘चालता-फिरता क्रिकइन्फो!’ अशी झाली. 
सहा वर्षीय सायमन मूळचा बुलडाण्याचा. त्याला टीव्हीवर क्रिकेट मॅचेस पाहण्याचे भयंकर वेड. भारताची मॅच असो वा अन्य कोणत्याही देशाची, तो कधीही पाहायला विसरत नाही. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये येणारी आयपीएल त्याची आवडती स्पर्धा. कोणत्या टीमचा कोण कॅप्टन, कुणी किती वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली, कोण खेळाडू कोणत्या संघाकडून खेळतो, ११० चेंडू म्हणजे प्रत्यक्षात किती षटके, यासारख्या असंख्य कठीण प्रश्‍नांची उत्तरे तो क्षणार्धात देतो. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी व विराट कोहलीपासून ते समालोचकांबद्दलची इत्थंभूत माहिती त्याच्या जिभेवर आहे. याशिवाय रनरेट, रिक्‍वॉयर्ड रनरेट, पॉवर प्ले, स्लॉग ओव्हर, सुपर ओव्हर, डकवर्थ -लुईससारख्या क्रिकेटमधील ‘टर्म्स’चीदेखील त्याला जाण आहे. उल्लेखनीय म्हणजे, तो ही आकडेवारी कधीही कागदावर लिहून ठेवत नाही. स्मरणशक्‍ती चांगली असल्याने त्याच्या सहज लक्षात राहते. अलीकडच्या काळात बाराही महिने क्रिकेट खेळले जात असताना बारीकसारीक रेकॉर्ड स्मरणात ठेवणे निश्‍चितच सोपे नाही.  इतक्‍या लहान वयात क्रिकेटबद्दल एवढे ज्ञान पाहून घरच्यांनाही नवल वाटते. पण त्याचवेळी सायमनचा त्यांना अभिमानही आहे. त्यामुळे सायमनला रोखण्याऐवजी त्यांनी सपोर्टच केला, अशी माहिती ट्रेझरी ऑफिसमध्ये कार्यरत सायमनचे वडील अनिल आगलावे यांनी दिली. आगलावेंच्या घरी येणारे प्रत्येक नातेवाईक आणि मित्रमंडळीही सायमनच्या ज्ञानाची वेळोवेळी ‘टेस्ट’ घेत असतात. सायमनही या परीक्षेत खरा उतरतो.
===========================================
‘बसंती’मुळे गब्बर नेते येणार अडचणीत! 

नागपूर - सिनेसृष्टीतील ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांना सवलतीच्या दरात दिलेल्या भूखंडाच्या वादामुळे राज्य शासनाने आजवर खासगी संस्थांना दिलेल्या भूखंडांची माहिती गोळा करण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक शासकीय भूखंड वाटप झाले. ते लाटणारे राजकीय नेतेच मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.

राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता येताच खासदार हेमा मालिनी यांना नृत्य अकादमी स्थापन करण्यासाठी मुंबईत एक भूखंड सवलतीत दिला. कोट्यवधीचा भूखंड काही लाखांमध्ये दिल्याने विरोधकांतर्फे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरही आरोप केले जात आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने रेडिरेकनच्या दरानुसार यापुढे भूखंड वाटप केले जातील, असा निर्णय घेतला. मात्र विरोधकांतर्फे घोटाळ्याचे आरोप सुरूच आहेत. यास प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात कोणाला किती व किमतीत भूखंड वाटप केले, त्यांची नावे, संस्थांची नावे गोळा केले जाणार आहे. यामुळे सेवाभावी कार्याच्या नावावर स्वस्तात दरात भूखंड लाटून त्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांची नावे समोर येणार आहेत. यामुळे अनेक नेते अस्वस्थ आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय जमीन शैक्षणिक, धर्मदाय संस्थांना सवलतीच्या दरात देण्याबाबत शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले. त्यानुसार नाममात्र दरात जागा खासगी संस्थांना देण्यात आले त्याची माहिती एकत्रित केली जात आहे.  
===========================================
युवराजला फलंदाजीत बढती देणे अवघड-धोनी 
रांची - ट्वेंटी-20 सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन केलेल्या युवराजसिंग फलंदाजीत वरच्या क्रमांकावर बढती देणे अवघड असल्याचे, कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने म्हटले आहे.

शुक्रवारी रांचीत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करत युवराजच्या पूर्वी हार्दिक पांड्याला संधी देण्यात आली होती. युवराजला पहिल्या पाच खेळाडूंनंतर फलंदाजीची संधी देण्यात येत आहे. युवराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. तरीही त्याला फलंदाजीची संधी फार कमी मिळत आहे.

धोनी म्हणाला की, युवराजला फलंदाजीची संधी कमी मिळतेय हे दिसतेय. पण, पहिले चार फलंदाज सर्वोत्तम कामगिरी करत असताना त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविणे अवघड आहे. सलामीच्या दोन फलंदाजांमध्ये बदल करु शकत नाही. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर सुरेश रैना सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे युवराजला पाचव्या क्रमांकावर पाठविण्याशिवाय पर्यायच नाही. मात्र, तरीही युवराजला अधिकाधिक फलंदाजीची संधी देण्याकडे माझा कल असतो. सामना जिंकणे हेच आमचे मुख्य ध्येय असून, विश्वकरंडकात सर्वांना संधी मिळेल.
===========================================
आजची काँग्रेस विदेशी भावना असलेली-गेहलोत 
नागपूर - आज जी काँग्रेस आहे, ती महात्मा गांधींची काँग्रेस नसून, सोनिया गांधी यांची विदेशी भावना असलेली काँग्रेस आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी केली.
नागपूरमध्ये आज (शनिवार) आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गेहलोत यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. जेएनयूमध्ये सुरु असलेल्या वादावर आणि रोहित वेमूलाच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.
गेहलोत म्हणाले, ‘‘ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामधे महत्त्वाची भूमिका पार पाडली, तेच काँग्रेस आज देशविरोधी लोकांचे समर्थन करत आहे. रोहित वेमुला हा दलित नव्हता, तो ओबीसी होता. मात्र काँग्रेसने घाणेरडे राजकारण केले, या आधी त्या विद्यापीठात 9 विद्यार्थी, विद्यार्थिनीनी आत्महत्या केल्या. त्या काळात केंद्रात यूपीएचे सरकार होते, त्यावर काँग्रेस का काहीच बोलत नाही.‘‘
धनगर समाज आरक्षणाचा प्रस्ताव राज्य सरकारने अद्यापही केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही, असे गेहलोत यांनी सांगितले.
===========================================

पाकमध्ये तुरुंग फोडण्याचा प्र्रयत्न उधळला


कराची : पाकिस्तानी लष्कराने डॅनियल पर्लचा मारेकरी व अल-काईदाचा प्रमुख नेता अहमद ओमर सईद शेख याच्या सुटकेसाठी कारागृह फोडण्याचा प्रयत्न उधळून लावत जवळपास १०० खतरनाक दहशतवाद्यांना अटक केली आहे.
हे अतिरेकी अल-काईदा, लष्कर- ए- झांगवी व तेहरिक- ए- तालिबान पाकिस्तान या संघटनांशी संबंधित असून, दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी त्यांनी संयुक्त कृती पथक स्थापन केले होते, असे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल असीम सलीम बजवा यांनी सांगितले. हल्ले घडवून आणण्यासाठी या संघटना परस्परांशी सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आमचा निष्कर्ष आहे, असेही ते म्हणाले. कराची शहरात या ९७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. मेहरान हवाई तळ, जिन्ना विमानतळ आणि पाकिस्तान हवाई दल तळ यासह इतर अनेक मोठ्या हल्ल्यांत त्यांचा सहभाग होता. या अतिरेक्यांनी उमर शेखची सुटका करण्यासाठी हैदराबाद तुरुंग फोडण्याचा कट आखला होता व तो लवकरच अमलात आणण्यात येणार होता. दहशतवाद्यांनी स्फोटके लादलेली दोन वाहने तयार ठेवली होती. ही वाहने तुरुंगाच्या दरवाजावर आदळविण्याची योजना होती. उमर याच्यासह इतर शेकडो जणांची सुटका करताना तुरुंगातील ३५ कैद्यांना ठार मारण्याची त्यांची योजना होती. डॅनियल पर्ल यांच्या हत्येप्रकरणी उमरला मृत्युदंड ठोठाविण्यात आला आहे. पर्ल द वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार होते. पाकची गुप्तचर संघटना आयएसआय व दहशतवादी संघटनांतील कथित संबंधांची ते बातमी काढत होते. उमर शेख भारतात कैद होता. अपहृत भारतीय विमानातील १५० प्रवाशांच्या बदल्यात १९९९ मध्ये त्याची भारताने सुटका केली होती.
===========================================

नायजेरिया; आत्मघाती जॅकेट फेकून ‘ती’ पळाली


अबुजा (नायजेरिया) : बोको हराम या अतिरेकी संघटनेने त्या तीन मुलींवर आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी सोपविली खरी; पण हल्ल्याची वेळ जवळ येताच त्यातील एक मुलगी अंगाला बांधलेले स्फोटकांचे जॅकेट फेकून चक्क पळून गेली. नायजेरियातील या घटनेने लहान मुलांचा चाललेला गैरवापर पुन्हा अधोरेखित झाला आहे. अन्य दोन मुलींनी केलेल्या आत्मघातकी स्फोटात ५८ जण ठार झाले आहेत. या मुलींवर बोको हरामने हल्ल्याची जबाबदारी सोपविली होती. उर्वरित दोन मुलींनी मात्र दिकवा रिफ्युजी कॅम्पमध्ये स्वत:ला उडवून दिले.
===========================================
तमिळनाडूत द्रमुक व काँग्रेस एकत्र लढणार 
चेन्नई - आगामी तमिळवाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि द्रमुकने (डीएमके) आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
गुलाम नबी आझाद यांनी आज (शनिवार) सकाळी द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस आणि द्रमुक एकत्र तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
आझाद म्हणाले, की द्रमुक हा नेहमीच आमचा विश्वासू साथीदार राहिलेला आहे. तमिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली असून, सध्या चर्चेमध्ये कोणताही वादग्रस्त मुद्दा नाही. लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात येईल.
===========================================

टंचाईच्या तीव्रतेने पळाले तोंडचे पाणी! (फोटो)



जांब (बुुद्रुक) - मुखेड तालुक्‍यातील मोठी बाजारपेठ असलेल्या जांब येथे पाणीटंचाईचा नवा विक्रम होत आहे. गावातील जवळपास सर्वच पाण्याचे स्त्र्रोत आटले असून कोसो दूरवरून टॅंकरने गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. अजून चार ते पाच महिने पावसाळा समोर असताना पिण्याच्या पाण्याची सोय कशी करावी, असा गंभीर प्रश्‍न जांबवासीयांना पडला आहे.
मुखेड तालुक्‍यातील जांब येथे दर शुक्रवारी जनावरांचा आठवडे बाजार भरतो. जनावरे विक्री व खरेदीसाठी तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यासह लातूर, परभणी आदी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बाजारात कोणत्याही सुविधा नसल्यामुळे जनावरांना पाणी विकत आणून पाजावे लागते. गावात माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हजारो रुपये खर्च करून तहान भागवावी लागत आहे. बाजारच्या दिवशी जनावरांना पिण्यासाठी पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांची चांदी होत आहे. हंडाभर पाण्याची किंमत दहा ते पंधरा रूपये आहे. चाऱ्याची पेंडी २० ते २५ रुपयांना आहे. त्यातही जनावरांना कवडीमोल भावात विकावे लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जांब येथील हातपंप, विहिरी, विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. दिवसभर टॅंकरची वाट पाहण्यातच गावकऱ्यांचा दिवस जातो. पाणीटंचाईत पाण्याची बचत करण्यासाठी वेगवेगळे प्रयोगही केले जात आहेत. काही गावकऱ्यांनी घरातील स्नानाच्या पाण्याचा पुनर्वापर सुरु केला असून लहान मुलांना बाजेवर अंघोळ घालून खाली पडलेले पाणी जमा करून त्याचा वापर अन्य कामांसाठी केला जात आहे. सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्यामुळे पाणीसंकट आतापर्यंतचे सर्वात मोठे असल्याचे ज्येष्ठांकडून सांगण्यात येत आहे.
दुष्काळामुळे दहा ते पंधरा रुपयांना पाणी घागर आणि २० ते २५ रुपयांना चारा पेंडी असून बैलाला २५ हजारांची मागणी आली आहे. जनावरांना सांभाळणे परवडत नसल्याने विक्री करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.
- मोहन आंधोरे, पशुपालक, रा. गुती, ता. जळकोट

मी जांब येथील बाजारला दरवर्षी येतो. जनावरांना चांगला भाव मिळतो म्हणून मोठ्या प्रमाणात जनावरे बाजारात येतात. गेल्या वर्षी ७० ते ८० हजारांना बैलजोडी विकली जात असे. यावर्षी दुष्काळामुळे ३५ ते ४० हजारांतच विकली जात आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना चारापाणी उपलब्ध करून द्यावे.
- भाऊराव सूरनर, कारतळा, ता. कंधार
मी उस्मानाबाद जिल्ह्यातून जांबच्या बाजारात बैलांना चांगला भाव मिळेल या आशेने आलो होतो; पण जनावरांना चांगला भाव मिळत नसल्याने निराश झालो आहे. बैल विकण्याची मानसिकता नाही; पण दुष्काळापुढे मला पर्याय उरला नाही.
- बालासाहेब नरवाडे, पिंपरी, ता. कळंब, उस्मानाबाद
दुष्काळामुळे यंदा शेतात काही पिकले नाही. घरी लग्नासाठी पैशाची गरज असल्यामुळे बैल विकण्याची वेळ आली आहे. सरकारकडून आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही.
- मारोती राठोड, शेतकरी


पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा...
जांब (बु.) - मुखेड तालुक्‍यातील तीव्र पाणीटंचाईचे गाव म्हणून ओळख असलेल्या जांब येथील ही प्रातिनिधिक छायाचित्रे आज शुक्रवारी टिपलेली आहेत. जनावरांच्या बाजारात आलेल्या पशुपालकांना पाण्यासाठी एक तर भटकंती करावी लागत आहे किंवा पाणी विकत घ्यावे लागत आहे. लहान मुलांना स्नान घालण्यासाठी बाजेचा वापर करून त्या पाण्याचा पुनर्वापरही केला जात आहे.
===========================================
===========================================
===========================================


मुखेड; जि.प.प्रा.शाळा येवती येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

मुखेड :- 
         तालुक्यातील येवती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.12 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव पाटील गोपनर तर प्रमुख पाहुणे म्हणुन गटविकास अधिकारी सतिष व्यवहारे, शिवाजीराव येवतीकर, विस्तार अधिकारी शिवाजी बोनलेवाड, केंद्रप्रमुख साधु सर, माजी सरपंच वसंतराव पाटील, शेख मैनोद्दीनसाब, नीळकंठ देगावे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश, देसाभक्तीपर गीत, लोकगीतांसह दुष्काळग्रस्त शेतक-यांची आत्महत्याची नाटिका सादर केली. अशा विविध अंगी कार्यक्रमाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक माधव देवकत्ते, शामराज पाटील, नरसिंग नाईक, पंढरीनाथ जाधव, बस्वराज साधु, संतोष भुरे, सौ.योगेश्वरी एकाळे, नृत्यकलाशिक्षक पवन कांबळे यांचे सहकारी संजय सुडके, फयाज शेख आदींनी परिश्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा झाल्यामुळे पालक, गावक-यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

No comments: