** वाढत्या उन्हाबरोबरच पाणपोई आटल्या **
*- शहरात उन्हाचा कडाका वाढला आहे. उन्हाचा पारा वरचेवर वाढत चालला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोठा गाजावाजा करून पाणपोईची उभारणी केली. थाटामाटात उदघाटन करण्यात आले. प्रसिद्धी करून घेतली, मोठेपणा मिळवला. काही दिवस सुरळीत पाणी पुरावाठाही केलाही, पण....
पाणपोई आता शोभेची वस्तू बनून राहिल्या आहेत. शहरातील बहुतेक पाणपोई बंद अवस्थेत आहेत.
या पाणपोईचा आता काहीच उपयोग राहिला नाही. काही जागच्या पाणपोईची अवस्था तर अतिशय दयनीय, हास्यास्पद झाली आहे. तहानलेल्या जीव कासावीस होऊन पाणपोईच्या कोरड्या नळाकडे पाहत आहे. सामाजिक बांधिलकीसाठी स्वेच्छेने स्थापन केलेल्या पाणपोईसाठी तहानलेल्या जीवाने दाद मागायची तरी कुणाकडे. असो...
पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात पाणपोईचे उदघाटन झाल्याने काही दिवस पाणी मिळेल हीच अपेक्षा

No comments:
Post a Comment