8 मे रोजी रात्री 8.30 वाजता शहरातील गजबजलेल्या पायल ज्वेलर्स या दुकानात दोन जणांनी गोळीबार केल्यामुळे काही काळ खळबळ माजली होती. पायल ज्वेलर्स या दुकानात दोन हेल्मेटधारी आले. एकाने दुकाना बाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकाला आपल्या कडील पिस्तुलाच्या धाकावर रोखले. एक आत गेला आणि दुकानातील मालक,नोकर आणि ग्राहक यांना खाली बसण्यास भाग पाडले. आणि सोन्याचे दागिने आपल्या कडील पोत्यात भरण्यास सुरवात केली. बाहेर असलेला एक लुटारू आणि त्याच्या हालचाली रस्त्यावरील लोकांनी ओळखल्या आणि आरडा ओरड करण्यास सुरवात केली. आत असलेल्याने ही ओरड लक्षात येताच पोते घेऊन बाहेर आला. लोकां कडे बंदूक रोखून गोळी झाडली पण कोणालाच काही इजा झाली नाही. एवढ्यात लोकांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरवात केली. पायल ज्वेलर्स समोर असलेली गल्ली गुजराथी शाळा आणि पी.एन.कॉलेज कडे जाते. त्या रस्त्यावर या चोरट्यांनी आपली मोटार सायकल उभी केली होती. ती दुचाकी काढत असताना जनतेने पुन्हा त्यांचेवर दगडफेक केली पण लुटारूंनी पुन्हा गोळीबार केला आणि आपली दुचाकी काढून मागील रस्त्याने लुटारु निघून गेले. काही लोकांनी सांगितले की ते खडकपुरा रस्त्याने वाघी रस्त्यावर गेले. पोलिसांनी त्वरित सर्वत्र नाकाबंदी लावली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पायल ज्वेलर्स या दुकानात अवघ्या ७ मिनिटात ९४ लाख ४० हजार ३०० रुपयांची लुट पिस्तुलाच्या जोरावर चोरट्यांनी केली. आठ दिवसात ही दुसरी घटना आहे. हेल्मेटधारी दोन जणांनी अशीच लुट नवा मोंढा भागात केली होती. हेल्मेटधारकांच्या या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले
त्यामुळे आज शहरात सराफा असोसिएशनच्या वतिने कडक बंद पाळण्यात आला होता. शहरातील सर्वच सराफा दुकाने बंद होती.
शहरातील लुटमारीच्या दोन्ही घटनेचा तपास लावण्यास शहर पोलीसांना अपयश आलले आहे.
आज पालकमंत्री दिवाकर रावते यांचा नांदेड दौरा होता. सराफा असोसिएशन तर्फे त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनामध्ये गुन्हेगारांना त्वरित अटक करून कायदेशी दंडात्मक कार्यवाही करून मुद्देमाल मिळवून द्यावा तसेच सराफा बाजार, वजिराबाद, सिडको हडको, पेठेत सशत्र पोलीस बंदोबस्त कायम स्वरूपी देण्यात यावा. सराफा व्यापाराचा व्यापार पाहून शत्र परवाना देण्यात यावा. प्रत्येक बाजार पेठेत पेट्रोलिंग डायरी ठेवावी. ग्राहकांना तोंडावरील हातरुमाल काढून व्यवहार करण्यात यावा. आदीं मागण्या करण्यात आलेल्या आहेत. शहरातील सर्व सराफा व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

No comments:
Post a Comment