Saturday, 9 May 2015

१- गोवंश हत्या बंदी कायद्याविरोधात रिपाईतर्फे १९ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन



तब्बल १९ वर्षांपासून रखडलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्यावर ०२ मार्चपासून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केल्याने महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला.गाय, बैल वा या प्रजातीतील गुरे आजारी किंवा वृद्ध झाल्याचे कारण करून कत्तल करण्यासाठी विकणाऱ्यांना व विकत घेणाऱ्यांना पाच वर्षांचा तुरु ंगवास भोगावा लागणार आहे. याशिवाय गोवंश हत्या करणाऱ्यास कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. ती म्हणजे गोमांश बाहेर राज्यातून महाराष्ट्र राज्यात आणून खाल्यास ७ वर्षाच्या सजेची तरतूद करण्यात आलेली आहे.
या कायद्या विरोधाचे पडसाद मात्र आता दिसू लागले आहेत. गोवंश हत्या विधेयक रद्द करा, या मागणीसाठी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. आमदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली दि. १९ मी रोजी संपूर्ण राज्यात रास्ता रोको, मोर्चा, निदर्शने, आंदोलन करण्यात येणार आहे.
 नांदेडमध्ये दि. १९ मे रोजी रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून, जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
आज देवगिरी विश्राम ग्रहात झालेल्या बैठकीत विजय सोनवणे, गौतम काळे, मिलिंद शिराढोनकर, अशोकराज कांबळे, प्रभाकर बामणे, भगवान गवळे, सिद्धार्थ बोधनकर, निवृत्ती सोनकांबळे, सदाशिव पोटे, जाकेर कुरेशी, इक्बाल कुरेशी, युसुफ कुरेशी, सलीम कुरेशी, बाबा कुरेशी, फारुख कुरेशी, यांच्यासह आदी उपस्थित होते.
गोवंश हत्या कायदा अन्यायकारक आहे. गोवंश हत्या विधेयक पारित केले त्यामुळे शेतकरी, कुरेशी समाज, चर्मकार, यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
दि. १९ मे रोजी होणाऱ्या आंदोलनात शेतकरी, कुरेशी समाज, चर्मकार समाज आदींचा सहभाग राहणार आहे. 

No comments: