Friday, 8 May 2015

वजीराबादच्या पायल ज्वेलर्समध्ये झाला गोळीबार !



8 मे रोजी रात्री 8.30 वाजता शहरातील गजबजलेल्या पायल ज्वेलर्स या दुकानात दोन जणांनी गोळीबार केल्यामुळे काही काळ खळबळ माजली होती.

रात्री 8.30 वाजेच्या सुमारास अचानकच वजीराबाद भागात पळापळ सुरू झाली.लोक सैरावैरा सुरक्षित जागा मिळेल काय याचा शोध घेत होते.कुणी सांगत होते गोळीबार झाला,कुणी सांगत होते हल्ला झाला.पण प्रत्यक्षात कोठे काय झाले हे कळले नाही.काही काळात अंत्यत त्वरीत प्रभावाने पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे यांनी वजीराबादचे पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम आणि त्यांचे अनेक पोलिस कर्मचारी वजीराबाद भागात दाखल झाले आणि त्यानंतर जनतेचा जीव भांड्यात पडला.

प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता पायल ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान पूर्णपणे बंद होते.तेथे गर्दी जमली होती.काही लोक सांगत होते की,दुकानात येवून दोन जणांनी गोळीबार केला,काही लोक सांगत होते की,गोळीबार करून दुकानातून लुट झाली आहे.वृत्त लिहिपर्यंत काहीच निश्चित होत नव्हते.पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी सांगितले की,गर्दीमुळे काय घडले आहे हेच कळत नाही.प्रत्यक्ष झालेली घटना अवलोकन करून नंतर त्यावर योग्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल

No comments: