Friday, 8 May 2015

अवकाळी पावसाचा फळांचा राजा आंब्यालाही फटका


हिवाळ्यामध्ये सुरुवातीला खूप थंडी पडली. हिवाळी फळ पिकाला दिलासा देणारी वाटत होती. त्याप्रमाणे  झालेही. आंब्याचे पिक यावर्षी भरपूर येणार या उत्साहात सर्वच व्यापारी होते. आंब्याच्या झाडांना लागणारा मोहोर पाहून मन प्रसन्न करणारे होते. पण अवकाळी पाऊस सुरु झाला आणि चित्रच बदलले. राज्यभरात अवकाळी पावसाने आंब्याची नासाडी केली. मोहोर गळाल्याने उत्पादनही कमी येणार आहे . त्यामुळे यंदा आंबा खाण्यासाठी गेल्यावर्षी पेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागतील ,  अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे
बागायतदारांच्या बागा कराराने देण्याचा कल बदलवयास हवा. स्वत: खतपाणी व मोहोर संरक्षण केल्यास शेतकऱ्यांना चांगल्याप्रकारे नफा मिळू शकेल.
तसेच ग्राहकांनी कार्बाईड विरहित आंबा आहे का ? याची खात्री करावी. कार्बाईड युक्त आंब्यात रसायनीक घटक असतात. शरीराला ते अपायकारक असतात.
कार्बाइड युक्त आंबा ओळखायचा कसा? याची माहिती करावी. .
मे महिन्यात आंबे खाण्याच्या मोसमात फळाची आवक वाढेल , असेही विक्रेत्यांनी सांगितले . पावसाची हलकी झड बसलेल्या असंख्य फळांवरही काळे डाग उमटले आहेत.
त्यामुळे या वर्षी हिवाळा चांगला गेला तरी अवकाळी पावसाने हिरमोड केला. निसर्गाच्या लहरीपानापासून आंब्याचे संरक्षण करण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नांदेडमध्ये केशर, दशेरी, बेनिशान, लालबाग, रसाळ, राजापुरी, नीलम, सुंदरी, मल्लिका, तोतापुर, आदि प्रकारचे आंबे बाजार पेठेत उपलब्ध आहेत. आंब्याचा हा माल हैदराबाद, लखनऊ. गुजरात येथून आयात केला जातो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आंब्याला भाव जरी आसला तरी दुष्काळात होरपळनारा ग्राहकवर्ग मात्र आंबा खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसत आहे. पुरवठा मात्र पाहिजे तसा नसल्याने आणखी भाव वधारण्याची श्यक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

No comments: