नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 15 July 2015
सट्टेबाजीचा निकाल लागला,निकाल पुरेसा आहे का?
सट्टेबाजीचा निकाल लागला,निकाल पुरेसा आहे का?
आज आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीचा निकाल लागला.ज्या आयपीएलसाठी भारतातील करोडो लोकांना आपली सर्व कामे धंदे सोडून फक्त क्रिकेट,क्रिकेट आणि क्रिकेट हेच केले.क्रिकेट खेळाडू हे म्हणजेच भारतीय लोकांची दैवते बनली आणि क्रिकेटचे सर्व संघटक,क्रिकेटचे पदाधिकारी हे त्यामध्ये स्वतःचे हात धुऊन घेत होते हे सिद्ध झाले.कोण्या एका काळी इंग्रजांचा हा आलेला खेळ सभ्य लोकांचा खेळ म्हणून नावा रुपाला आला होता.क्रिकेट खेळामध्ये पैसा यायला लागला,पैश्याबरोबर सर्वसाधनसुचीकारी व्यर्थ व्हायला लागली आणि जसजसी पैसा,प्रसिद्धी वाढत होती,तसतसी क्रिकेटमध्ये या अपप्रवृत्तीनी प्रवेश केला.अगदी हा इतक्या मोठ्या थराला पोहचला होता कि,कुठल्या चेंडूला की घडावे यासाठी करोडो रुपयांचा सट्टा लागत होता.त्यातच हा आयपीएल नावाचा नवीन तमाशा उदयास आला.सुरुवातीला आयपीएलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कमिटीने आपले भ्रष्टाचार विरोधी पथक नेमाण्याविषयी सुचविले होते परंतु आयपीलच्या कमिटीने ते नाकारले,आम्ही समर्थ आहोत असे सांगितले.तसे पहिले तर ते आपल्यासाठी गौरवाची बाब होती.आमचा हा खेळ स्वच्छ आहे हे यातून दाखऊ शकतो.काही घडल्यास कारवाई करण्यास सक्षम आहोत हेही आम्ही दाखऊ शकत होतोत.याच्याने काही घडणार नाही याविषयी फार मोठा एक आत्मविश्वास निर्माण झाला होता.पण दुर्दैवाने हा खोटा ठरला.मॅच फिक्सिंग झाल्या आणि यात आश्चर्याची गोष्ट मात्र हि सापडली ज्यांनी संघ विकत घेतले,जे संघाचे मालक होते तेच सट्टेबाज होते.हे आता अधोरेखित झाले आहे.न्यायालयाचे कमिटीने न्यायमूर्ती लोढा यांच्या अध्यक्षतेखाली हा निकाल दिला.हा निकाल देत असताना यातील कागोरे आपल्याला विचारात घ्यावे लागतील.ज्या चेन्नई सुपरकिंग संघाचे मालक श्रीनिवासन आहेत. बीसीसीआयचे ते अध्यक्ष होते.ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांचाच संघ आता बाद झाला.त्यांच्याच संघाने सट्टेबाजी केलीय.यात भयानक गोष्ट अशी कि त्यात त्यांचे जावाईच गुंतले आहेत म्हणजे जर ज्या ठिकाणी राजाच गुंतला असेल तर प्रजाच कुठ गुंतणार.तशीच गोष्ट राज कुंद्रा यांच्या राजस्थान रॉयल्स संघाची. मालक राज कुंद्रा हे व्यापारी आहेत.त्याचा जसा या खेळासी काही संबंध नाही पण त्यांनी संघ विकत घेतला आणि चारही अंगाने पैसा ओढणे हा त्याचा व्यापार आहे.निकालाचा सगळीकडे उदोउदो होत असतानाही या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.न्यायालयाचा निकाल आहे.शिरोवर्य मानावाच लागेल आपण तो मानुही,त्याचा आदरही करू.परंतु दोन संघांना कायम स्वरूपी बंदी लागली गेली असती आणि या सट्टेबाजाचे पैसे वाया गेले असते तर खरच या निर्णयाचा विजयोत्सव झाला असता. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांना क्रिकेटपासून दूर ठेवनारे मुळात हे सट्टेबाज आहेत. मग यांना वेगळे केले काय आणि सोडले काय,दोन्ही गोष्टी एकच यांना जर सट्टेबाजी करायची असेल तर दुसरया टीमकडे करतील.दोन वर्षानंतर पुन्हा यांचे संघ मैदानात येतील.यांच्यावर कोर्टाची कारवाई होऊन,हातकडी पडली पाहिजे.यांना तुरुंगात डांबलेच पाहिजे,कठोर कारवाई झालीच पाहिजे.नुसत्या एवढ्याच शिक्षेने क्रिकेट सरळ होईल असा आशावाद म्हणजे आपल्याला या निकालाने डोंगर पोखरून,उंदीर काढून दिल्या सारखे आहे. निश्चितच एक चांगली सुरुवात या निकालांनी झाली आहे,पण हि पुरेशी नाही आणि आत्ताच योग्य वेळी तुडून काढले नाही यामुळे यांना कठोरात कठोर कारवाई करणे,हातकडी घालून जेलमध्ये टाकणे,तसेच दोन संघ कायमस्वरूपी बाद करणे हे महत्वाचे आहे.तसेच अनेक गोष्टी अजूनही लपून राहिलेल्या आहेत.खेळाडूचे नावे अजूनही पूर्णपणे समोर आलेली नाहीत आणि वंदता आहेत आणखी मोठमोठे आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्यात गुंतलेली आहेत.त्या खेळाडूंना उघडे पडणे,त्याची भरपाई करून घेणे आणि त्यांना अशी शिक्षा देणे कि बाकीचे खेळाडू त्याच्याकडचा आदर्श घेणार नाही.हे फार महत्वाचे आहे.ज्यंना आपण आदर्श मानतो त्याच्याच पावलावर पाऊल ठेऊन हे खेळाडू पुढची वाटचाल करतील,आज पैसा हा परवडीचा शब्द झाला आहे.आज खेळाच्या प्रेमात किती आणि पैशाच्या प्रेमात किती आणि जीव तोडून खेळणारे किती हा एक संशोधनाचा विषय आहे.आज जे खेळ अगोदरच फिक्स असतात अशे खेळ पाहण्यासाठी आपल्यासारखे लोक जीवाचे रान करतात.ते पैसे कमावतील,सट्टेबाज मजा करतील ह्या गोष्टी आपण लक्षात घेण्यासारख्या आहेत.आपण काही दाउद इब्राहीम सारख्याचे समर्थन करणार नाही पण सट्टेबाजी यांनी केली काय आणि त्यांनी केली काय असा प्रश्न यावेळी निर्माण होतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment