Wednesday, 8 July 2015

तब्बल १८ वर्षा नंतर भेटले पती पत्नी व मुलगा


तब्बल १८ वर्षा नंतर भेटले पती पत्नी व मुलगा 

{ वैजनाथ स्वामी }=====

दिनांक ०७/०७/१५ गंगाखेड.....
१८ वर्षापासुन एकमेका पासुन शाब्दीक वादातुन दुरावलेले पती पत्नी व मुलं यांची आज पुन्हा भेट..
हा क्षण भावनिक तर होताच परंतु..
आनंदाचा वेलु गगणावरी स्पर्श करत होता..पुन्हा भेटीनेे डोळ्यातुन वाहत असलेले आश्रृ व मनात दाटलेल्या एकमेकांच्या भावनेच्या अफाट लाटा तब्बल तिन तास एक मेकांच्या गळा भेटीने दिसुन येत होत्या.
दोन मुला पैकी एक चार वर्षाचे व दुसरा दोन वर्षाचे असनारे मुलं आज २२,२० वर्षाचे झाले केवळ जन्मदाता म्हणुन त्याच्या स्पर्षाने मुलाच्या डोळ्यातील पाणी व मनात असलेला क्षणीक राग मन सुन्न करत होता.
२५ वर्षापुर्वी नेव्ही दलात असनारा कँप्टन सुभाष येलोरे व सौ.निर्मला येलोरे यांचे दोन मुले संतोष व प्रदीप हे कुटुंब चेंबुर,मुंबई या ठिकानी वास्तव्यास होते.दोघेही १९८३ मध्ये B.A.पदविधर सुशिक्षित कुटुंब.सुभाष येलोरे नौकरी वरून निवृत्त झाल्यावर पती पत्नीत झालेल्या छोट्याशा कारनावर घर,संसार,पत्नी,मुल सार काही सोडुन निघालेले सुभाष येलोरे मागच्या दोन  महीण्यापुर्वी माझ्या संपर्कांत आले..लिंगायत असल्यामुळे त्यांनी मला गुरू म्हणायचे व मी त्यांना अप्पा..हि दोन महिण्याची मैत्री मनातले सुख दुःख वाटुन घेत होती..त्यांच्या मनातील भावना एक दिवस माझ्या समोर त्यांनी व्यक्त केल्या..त्याच भावना माझ्या मनाला स्पर्श करून गेल्या व त्यांच्या पुनर्र भेटीचा विडा मी उचलला..
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात असनारे माझे मित्र व सहकारी यांच्या मदतीने चेंबुर, मुंबई मध्ये त्या कुटुंबाची चौकशी केली चौकशी दरम्यान ते कुटुंब १६ वर्षापुर्वीच आपल्या माहेरी गेले हे समजले..हप्परगा,ऊमरगा ता.निलंगा जि.लातुर या गावचे शिवसेनेचे सरपंच इरेशअप्पा बिराजदार यांची ती बहिन असल्याचे समजले.
शोधन्या साठी काही अडचन कमी झाली परंतु मनात असलेला एकमेंका बद्दलचा राग हा कमी होत नव्हता..सुभाष येलोरे यांनी १८ वर्षात कधिच कुटुंबाची चौकशी केली नाही,शोध घेतला नाही.व स्वतः ही त्यांना चौकशी दरम्यान भेटले नाही..
हे कुटुंब तसे गावातील सावकारी,व्यावसायिक व शेतीप्रधान छोट्या कारनावर दुरावलेली मन जुडवण्यासाठी मी त्यांच्या मुलाचा वापर केला.फेसबुक वरून त्या मुलाचा शोध घेत आपला मित्र बनवले व त्याच्या बापा विषयी असलेल्या भावना समजुन घेतल्या,आई विषयी असनारे प्रेम समजुन घेतली,बालपनी मनावर कुठेतरी जखम देऊन गेलेला बाप त्याला नकोसा होता..पन तो विरूध्दार्थी विचार मनातुन कायमचा पुसुन काढण्यासाठी मला दोन महिण्याचा कालावधी लागला..इकडे पत्नी विषयी असनारा संताप कायमचा मोडीत काढन्यासाठी फोन च्या माध्यमातुन अनेकदा झाला शेवटी यश मिळनारच होते हे लक्षात आले.व आज या कुटुंबाची भेट करून देण्यास पुढाकार घेत गंगाखेड हे गाव गाठले..सुरवातीला मी सुभाष जी ला काहीच कळु दिले नाही..सहज भेटीला आलो आहे हे उत्तर मी देत प्रदर्शनी च्या ठिकानी मनसोक्त पाहुनचाराचा आनंद घेतला..निलंग्यावरून निघालेले पत्नी व मोठा मुलगा प्रदिप यांचा फोन खनखनला आम्ही गंगाखेड मध्ये पोहचलो..मी प्रदिपला एकट्याला त्या ठिकानावर बोलावुन घेतले व त्या पिता पुत्राला माझा मित्र म्हणुन ओळख करून दिली बापाला आपला मुलगा आहे ओळखु पडेना १८ वर्षाचा लोटलेला काळ त्या सर्व आठवणी हिसकाऊन घेऊन गेला होता..चर्चे दरम्यास सहज पुटपुटलो अप्पा हा माझा मित्र जर तुमच्या मुलगा असेल तर काय कराल अप्पा हसत हसत म्हणाले गुरू मी तुमच्या पाया व त्याच्या गळ्याला पडलो असतो..मी बोलुन मोकळा झालो अहो अप्पा हाच तुमचा प्रदिप..आणी हेच तुझे वडिल..
तो क्षण त्या एकमेकाकडे पाहुन आश्चर्याचा मोठा धक्का दाखवनारा होता..दोघांच्या डोळ्यातुन पाणी वाहत होते.मी बोललो आहो अप्पा आत्ताच तर बोललात प्रदिप असता तर गळ्याला पडलो असतो मग पडाना गळ्याला हा शब्द त्यांच्या कानावर पडताच तो आलेला आवाज मी आयुष्यभर विसनार नाही....
व त्याचे वर्णन मी शब्दातही करू शकत नाही..त्या दोघांना शांत करत उत्तरलो अप्पा आता तुमची पत्नी दिसली तर काय कराल.अप्पा आपली नजर गरगरत चारी दिशांकडे पाहत होते.
मी प्रदिपला सांगितले जा तुझ्या आईला घेऊन ये..
त्या पती पत्नीचे ते पुनर्रमिलन मला जो आनंद देऊन गेले ते करोडो रूपये कमाई केल्यावर मिळाले नसते..
त्या कुटुंबाने मला मानस पुत्र म्हणुन स्विकारले..व एकत्र राहन्याची तयारी दर्शवली....पन एका अटीवर मी त्यांच्या घरी सहपरीवार किमान दोन दिवस मुक्कीमी गेलो तर..मी ही मागणी क्षणात मान्य केली व त्यांना सोडन्यासाठी बसस्थानकात पोहचलो...प्रदिपला मी येण्यापुर्वी सुचना दिली की तु कोनालाही न सांगता फक्त आईला घेऊन ये ही गोष्ट त्याने मान्य करत दोघेच आले होते पन जाताना तिघेजन गेले....

आजचा हा दिवस माझ्या जिवनातला सुवर्ण अक्षराने लिहावा असाच उजाडला..माझ्या आई वडिलांचे संस्कार गुरूंचा आशीर्वाद माझ्या पत्नीची साथ व तुम्हा सर्वांचे मार्गदर्शन प्रोत्साहन व पाठबळ मला सदैव मिळत राहो हिच इच्छा
=================
by via--दीपक मठपती

No comments: