Thursday, 9 July 2015

घोटाळ्यांची चौकशी अन् चौकशीचा घोटाळा दोन्ही बाजूने राजकारण्यांनी केला धंदा


नमस्कार लाईव्ह विशेष संपादकीय सदर विषय आजच्या विषया  मध्ये आपण वाचा व ऐका +++++++++++++++++++++++++++घोटाळ्यांची चौकशी अन् चौकशीचा घोटाळादोन्ही बाजूने राजकारण्यांनी केला धंदा+++++++++++++++++++++++++++


पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा सध्या गाजतो आहे.विरोधकांनी राजीनाम्याचा दबाव वाढवला आहे.मध्यप्रदेशमधील व्या.प.म. घोटाळा ही असाच गाजत आहे.विरोधकांनी त्याच्या विरुद्धही असेच रान उठवले आहे.याच्यात ऐनकेन प्रकारे सरकारला बदनाम करणे,सरकारमधील कोणाला तरी राजीनामा द्यायला लावणे.आपले राजकीय हिशोब चुकते करणे ह्या व्यतिरीक्त विरोधक प्रामाणीकपणे कुठलीही गोष्ट करत आहेत असे दिसून येत नाही.
सरकार हे सगळे पाहत आहे,तात्विकपणे उत्तर देण्याचा आव आणत आहे परंतु दुसरीकडे मात्र गालातल्या गालात हसतच आहे.विरोधकांच्या विरोधात कसलाही दम दिसत नाही यावरून ही मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय जनतेला आहे.'तू मारल्या सारखे कर,मी लागल्यासारखे करतो' असेच नाटकाचे प्रकार चालू आहेत.
महाराष्ट्राला घोटाळ्याचे आरोप नविन नाहीत.भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे  राजीनामा द्यायला लागलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची यादी लांबतच चालली आहे.यात कॉंग्रेसचेच मुख्यमंत्री आहेत.सत्तेच्या राजकारणात जाऊन लाभ, सत्ता,पैसा,मानसन्मान मिळत नसेल,तर सत्ताधारी असेल नाहीतर विरोधक, खरच किती जन राजकारणात आले असते? याचा  ज्याचा त्यांनी विचार केला तर आत्ताचे ९९ % राजकारणी गायब झालेले दिसून येतील.याचा अर्थच असा आहे कि राजकारणी पैसा,मानसन्मान कमावण्यासाठी राजकारणात येतात मग ऐकमेकाला दोष तरी कसे देऊ शकतील?'पकडला गेला तो चोर व दुसरा साव'असा हा खेळ आहे.
   चोरी पकडली तरी बिघडत मात्र काही नाही.काही दिवस बॅकफुट वर जातात,पुन्हा नव्या जोमाने मैदानात येतात.यामध्ये चौकशीचा घोटाळा फार महत्वाचा आहे.सत्ताधारी विरोधकांना गप्प करण्यासाठी,कालहरण करण्यासाठी ह्या चौकशीचा उपयोग केला जातो.दरम्यानच्या काळात पुरावे हि बदलले जातात.बऱ्याच वेळा चौकशीची सुद्धा चौकशी केली जाते पण सगळ्यांचे उत्तर ठरलेले असते.आत्ता पर्यंत किती केसेसच्या चौकशी झाल्या   व किती दोषी  ठरले याची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे.आत्ताचे सत्ताधारी मागे विरोधक होते व आत्ताचे विरोधक मागे सत्ताधारी होते ह्या मुळे आता घोटाळ्यांच्या चौकशीसाठी दोन्ही पक्षांकडून ब्लॅकमेल करण्याचे राजकारण सुरु आहे.एका गोष्टीची चौकशीची मागणी झाली कि त्याची पुर्वश्रमिची चौकशी लावली जाते आणि विरोधकांना कायम स्वरूपी गप्प केले जाते या अभद्र राजकारणाचा घोटाळा देशाचं वाटोळ करीत आहे.यावर तोडगा काढल्याशिवाय कुठल्याही चौकशीला काहीही अर्थ राहणार नाही हे मात्र खरे.

No comments: