Monday, 30 November 2015

नमस्कार लाईव्ह ३०-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ३०-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- पॅरिसमध्ये मोदी-शरीफ याचं हस्तांदोलन व चर्चा
२- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आज पॅरिस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
३- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचं संरक्षण ...म्हणून दाऊदला ठार मारणं सोपं नाही: ज्युलिओ रिबेरो, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त
४- प्रवासी जहाजास इंडोनेशियामधील बातम या बेटाजवळ अपघात, बुडणाऱ्या 100 जणांना वाचविण्यात यश
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- आयएसआय’चे हेरगिरी रॅकेट उद्ध्वस्त
६- पेट्रोल 58 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी स्वस्त
७- सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेत
८- समुद्रकिनाऱ्यावर उभारणार रामदेव बाबांचे योग रिसॉर्ट
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- मुंबईत ४३४ ठिकाणी १३८१ कॅमेरे
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- शनिशिंगणापूर देवस्थानाचे विश्वस्त सयाराम बानकरांचा राजीनामा अहमदनगर धर्मादाय आयुक्तांकडे सादर
११- मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना तात्पुरता दिलासा, मेट्रोच्या भाववाढीला स्थगिती
१२- नागपुरात डॉक्टर पत्नीकडून पतीची हत्या
१३- थेरगावमध्ये तरुणाची पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या
१४- पुणे: चांदणी चौकात अपघात; महिलेचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- हिट अँड रन प्रकरण- कमाल खानला साक्षीदार म्हणून बोलावण्याची विनंती करणारा अभिनेता सलमान खानचा अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला
१६- अभिनेता गोविंदाने थप्पडीबद्दल मागावी माफी, ‘मनी है तो हनी है‘च्या चित्रीकरणादरम्यान एकाला थप्पड
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१७- बिलोली सा.बांधकाम उपविभागाची संविधान दिनाकडे पाठ
~~~~~~~~~~~~~~~
१८- हागणदारीमुक्‍त ग्राम पंचायतींचे प्रस्‍ताव सादर करावेत - मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांचे आवाहन
~~~~~~~~~~~~~~~
१९- सद्विचारांना कार्यातून नित्यस आकार देणे गरजेचे - डॉ. उमेश देशपांडे
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते
[सुधाकर कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

सद्विचारांना कार्यातून नित्यस आकार देणे गरजेचे - डॉ. उमेश देशपांडे



नांदेड, 
    येथील गंगुताई थाले ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा मानाचा आई पुरस्कार मिळाल्याबद्दल नामांकित ऑर्थोपिडीक डॉ. उमेश देशपांडे यांचा विशेष कार्यक्रमातून शाल, श्रीफळ, पुष्पहार, तुळजामातेची चांदीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
विश्वप्रेम प्रतिष्ठानच्या संचालिका श्रीमती वर्षाताई जमदाडे यांनी आयोजीत केलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात डॉ. उमेश देशपांडे यांचा मा. मधुकर कुर्तडीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. देशपांडे हे गेल्या विस वर्षांपासुन वैद्यकिय क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. आपल्या लाघवी संवाद कौशल्याने रूग्णांना विलाजा आधीच अर्धे बरे करण्याची कला त्यांच्यात आहे. त्यांनी पुणे येथे अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अतिशय दुर्गम भागातील गरिब गरजू रूग्णांना ते आपली सेवा प्रदान करतात. आपल्याला आई पुरस्कार मिळणे हा खुप मोठा सन्मान असुन रूग्णांकडुन मिळालेला आशिर्वाद आणि पत्नीची पदोपदीची साथ यामुळेच हे शक्य झाले असेही ते म्हणाले. आजवर संस्कार, संस्कृती आणि विश्वास यांच्या जोरावर सद्विचारांना कार्यातुन नित्य आकारदेत आलोय आणि हे प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे विचार डॉ. देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमात प्रा. हुकूमचंद जैन यांना दलित साहित्य परिषदेचा तथागत गौतम बुद्ध नॅशनल फेलोशिप अवार्ड मिळाल्याबद्दल जॉन अय्यर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गरजुंना मदत करून माणुसकि जपत राहण्याची दखल घेणे मी माझे कर्तव्य समजते. सर्वांना सन्मानाने वागवलेतरच आपल्याला सन्मान मिळेन आणि निर्मळ मनाने भावनिक नात्यांतून ही कर्तव्यनिष्ठा जपते, अशी भावना कार्यक्रमाची भुमिका मांडताना वर्षाताई जमदाडे यांनी मांडली. 
कार्यक्रमाची प्रस्तावना अधोरेखित करताना मुक्ता पेटकर यांनी प्रत्येक व्यक्ती सकारात्मक प्रवृत्तीनेच मोठी होते. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणार्‍यांची उर्मी ही एकूणच समाज मनाला सकारात्मक उर्जा देत राहते. त्याचे उत्कृष्ट दाखले हे कार्यक्रमातील उपस्थित सर्व मान्यवर आहेत, अशा शब्दांत त्यांनी मानवतेच्या भावना उपस्थितांवर बिंबवल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रस्तावना मुक्ता पेटकर यांनी केली तर कार्यक्रमाची भुमिका सांगुन आभार प्रदर्शन श्रीमती वर्षाताई जमदाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी ऍड. मिलींद लाढकर, धनंजय कुलकर्णी, पत्रकार मुक्ता पेटकर, संतोष क्षिरसागर, फिरोज पटेल, धनंजय कुलकर्णी, मुकूंद देशपांडे, वर्षा जोशी, सुमित लांडगे, सौ. सारिका लांडगे आदि मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

हागणदारीमुक्‍त ग्राम पंचायतींचे प्रस्‍ताव सादर करावेत - मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांचे आवाहन



नांदेड, 30- देशात स्‍वच्‍छ भारत अभियान मोठया उत्‍साहात राबविण्‍यात येत आहे. त्याचप्रमाणे अभियानामध्‍ये शौचालय बांधकाम करुन गाव हागणदारीमुक्‍त करणा-या ग्राम पंचायतींची तपासणी डिसेंबर महिण्‍यात करण्‍यात येणार असून ग्राम पंचायतीच्‍या पडताळणीचे प्रस्‍ताव जिल्‍हा परिषदेकडे येत्‍या 5 डिसेंबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांनी केले आहे.
      पहिल्‍या टप्‍प्‍यात 90 टक्‍के पर्यंत शौचालय बांधकाम असलेल्‍या ग्राम पंचायती यात सहभागी होऊ शकतात. वार्षिक कृती आराखडयात असणा-या ग्राम पंचायतींसह यापूर्वी निर्मल ग्राम पुरस्‍कार मिळालेल्‍या ग्राम पंचायती व इतर गावांनाही या मोहिमेत सहभागी होता येणार आहे. यात शाळा, अंगणवाडी, ग्राम पंचायत इमारतींना शौचालय असणे बंधनकारक असणार आहे. घर तेथे शौचालय या संकल्‍पनेसह गाव परिसरातील स्‍वच्‍छतेची पाहणीही करण्‍यात येणार आहे. राज्‍यस्‍तरावरुन या गावांची तपासणी डिसेंबर महिण्‍याच्‍या दुस-या आठवडयात करण्‍यात येणार आहे. या मोहिमेत जी गावे पात्र ठरणार आहेत, अशा ग्राम पंचायतींना राज्‍य शासनाच्‍या पाणी पुरवठा आणि स्‍वच्‍छता विभागाकडून हागणदारीमुक्‍त दर्जा प्राप्‍त ग्राम पंचायतींच्‍या नावांची घोषणा करुन या ग्राम पंचायतींना प्रमाणपत्र देण्‍यात येणार आहे.
      यासाठी ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्व कुटूंब, संस्‍था यांच्‍याकडून सुरक्षित व शाश्‍वत स्‍वरुपात मानवी विष्‍ठा व्‍यवस्‍थापन पध्‍दतीचा वापर आणि वैयक्तिक स्‍तरावर स्‍वच्‍छतेच्‍या सवयींचा अंगीकार तसेच स्‍वच्‍छता विषयक स्थितीतील सातत्‍य राखण्‍यासाठी ग्राम पंचायतींची महत्‍वाची भूमिका राहणार आहे. हागणदारीमुक्‍त ग्राम पंचायत पडताळणी प्रक्रियेत ग्राम पंचायतीच्‍या सहभागासाठी ग्रामसभेची मंजुरी तसेच ग्राम पंचायतींच्या ठरावासह हे प्रस्‍ताव गट विकास अधिकारी यांच्‍या मार्फत जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षात येत्‍या 5 डिसेंबर पर्यंत सादर करावयाचे आहेत. तरी गट विकास अधिकारी, मिनी बिडीओ व ग्रामसेवक यांनी आपल्‍या अधिनिस्‍त ग्राम पंचायतींचे प्रस्‍ताव विनाविलंब सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड यांनी केले आहे.



बिलोली सा.बांधकाम उपविभागाची संविधान दिनाकडे पाठ



बिलोली सा.बांधकाम उपविभागाची संविधान दिनाकडे पाठ
* जिल्हाधिका-याच्या आदेशाला केराची टोपली
* उपअभियंत्यावर कार्यवाहीची मागणी
* फारूखी यांचा अमरण उपोषणाचा इशारा

बिलोली  : ( यादव लोकडे  )

येथिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कार्यालयाने जिल्हाधिका-यांच्या संविधान दिन साजरा करण्याच्या आदेशास केराची टोपली दाखवून सविधानाप्रति अनादर दाखवित संविधान दिनाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरविल्याने संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अन्यथा अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन काँग्रेस अल्पसंख्याकचे बिलोली तालुकाध्यक्ष वलिओद्दीन फारूखी यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनाद्वारे दि 30 नोव्हेंबर रोजी कळविले आहे.
बिलोली येथिल सार्वजनिक बांधकाम विभाग हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते येथिल कार्यालयात गेल्या काही महिण्यांपासून माहिती विचारण्यासाठी गेलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांना या कार्यालयात येथिल उपअभियंता व्हि व्हि शिंगनवाड , अभियंता शेंबाळे व नरवाडे हे नेहमीच कार्यालयात गैरहजर असतात याविषयी येथे उपस्थित अनुरेखक पि.एस.हिपरमोडे यांना याविषयी विचारणा केली असता येथिल अधिकारी सतत गैरहजर असल्याचे सांगत याबाबत दुजोरा दिला.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने  सन 2008 साली संविधानाबद्दल जनजागृती व्हावी व संविधानाची शासकिय , निमशासकिय कार्यालयांना ओळख व्हावी या उद्देशाने संविधान दिन प्रत्येक कार्यालयात साजरी करण्याचे पत्रक काढले होते . याचउद्देशाने नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्ह्यातील सर्वच विभागप्रमुख , शासकिय कार्यालयांना 26 नोव्हेंबर 2015 रोजी संविधान दिन साजरी करण्याचे आदेश देऊन त्यासंबंधीचे पत्रही संबंधित विभागाला पाठविले होते परंतु बिलोली येथिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्हि व्हि शिंगनवाड यांनी संविधान दिन साजरा करण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संविधानाप्रती अनादर दाखविले असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा दि 20 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे बिलोली काँग्रेस अल्पसंख्याकसेलचे तालुकाध्यक्ष वल्लिओद्दीन फारूखी यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी , चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री , सी.ए .थुल साहेब अनु जाती आयोग मुंबई , खासदार अशोकराव चव्हाण , सार्वजनिक बांधकाम कार्य

नमस्कार लाईव्ह ३०-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र


नमस्कार लाईव्ह 30-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१- दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारच्या जनलोकपाल विधायकास काँग्रेसचा पाठींबा
२- पाकिस्तानच्या दोन गुप्तहेरांना अटक, दिल्ली क्राइम ब्रँचने केली कारवाई
३- सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते तर भारताचा 'पाक' झाला असता - सुप्रसिद्ध लेखक कांचा इलय्या
४- न्यायालयात राज्यघटनेवर हात ठेवून शपथ द्या, शिवसेनेचे पंतप्रधान मोदींना आवाहन
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
४- मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकांबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे उपस्थित
५- शनिशिंगणापुरात महिलेकडूनशनिपूजा प्रकरण, विश्वस्त सयाराम बानकर राजीनामा देणार, ग्रामस्थांच्या मागणीनंतर राजीनाम्याची तयारी
६- बिहार : रालोसपचे आमदार वसंत कुशवाह यांचं निधन, शपथविधीच्या आदल्या रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
७- पुणे : पाषाण रोडवरील ऑरेंज बिल्डींगमध्ये चौथ्या-पाचव्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी
८- लातूर : शहरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ पालिकेसमोर अंघोळ;  लातुरात अनोखं आंदोलन
९- शनि मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांचे मद्यप्राशन प्रकरण उघडकीस
१०- कल्याणमध्ये रिक्षाचालकांची वाहतूक पोलिसास मारहाण
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
११- 2015 चा तन्वीर पुरस्कार जाहीर, मुंबईच्या दी थिएटर ग्रुपचे प्रमुख अॅलेक पद्मसी यांना पुरस्कार
१२- इन्फोग्राफ : जगातील ९१५ भाषा मृत्यूच्या दारात
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१३- मुंबई : राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने कुुटुंबाला थिएटरमधून हाकललं - पहा व्हिडीओ
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
अभय यंदे, अमोल राऊत, बाबुल आली, दीपनाथ पत्की, कृष्णा पत्की, राजू दरेकर, शंभू देशमुख, रोहित सपकाळ, अर्चना मालपाणी, इशाक शेख, मीरा पाथरकर, उमेश रोडे
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते...
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते,
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो...
खरच विश्वास ठेवा...
आपल्या माणसांवर आणि ध्येयावर
[नागोराव येवतीकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

मुंबई सिनेमागृहात राष्ट्रगीतासाठी भांडण

हा व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा



राष्ट्रगीतासाठी उभे न राहिल्याने कुुटुंबाला थिएटरमधून हाकललं

Sunday, 29 November 2015

नमस्कार लाईव्ह २९-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २९-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- रशिया म्हणतो, त्यांच्या नागरिकांसाठी भारत असुरक्षित
२- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर या आठवड्यात अमेरिकेच्या दौ-यावर
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या गुजरातच्या दौ-यावर जाणार. साबरमती आश्रम व सोमनाथ मंदिरालाही भेट
४- सशस्त्र सीमा बलाच्या जवानांसह 13 भारतीय नेपाळच्या ताब्यात, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सर्वांची सुटका
५- लखनऊ :शिक्षण संस्थांचे सत्र वेळेत पूर्ण करा - अखिलेश यादव यांनी मुख्य सचिवांना दिला आदेश
६- हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथे डायनामाईटचा स्फोट, २ जणांचा मृत्यूू
७- केंद्रीय अर्थ मंत्रालयात काम करणा-या एका ४३ वर्षीय महिला अधिका-याची विष पिऊन आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- अधिकारी ऐकत नसलीत तर सेना स्टाईल उत्तर :जालनातील सभेत उद्धव ठाकरे
९- शिर्डी विमानतळासाठी पैसे देण्यास साई संस्थानाकडून असमर्थता व्यक्त, एक हजार कोटींची कामं प्रलंबित असल्याची संस्थानाची माहिती
१०- काँग्रेसचे आमदार सदानंद सिहं यांनी बिहार विधानसभेत प्रोटेम स्पीकर पदाची शपथ घेतली
११- अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शिपाई पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेदरम्यान उमेदवारांकडे मोबाईल; दोन उमेदवारांचे पेपर रद्द
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- नागपुरात वकिलाचा संशयास्पद मृत्यू, कोर्ट परिसरात श्रीकांत खंडाळकरांचा मृतदेह आढळला
१३- लोकमत दैनिकाच्या जळगाव कार्यालयावर हल्ला, लेखावरील आक्षेपामुळे हल्ला झाल्याचा लोकमतचा दावा
१४- मंथनच्या लेखातील चुकीबद्दल लोकमतची दिलगिरी
१५- नवी मुंबईच्या नेरुलमधील तलावात शेकडो माशांचा मृत्यू
१६- हिंगोली -  चार वर्षीय बालकाचा बोअरवेलमध्ये पडून मृत्यू; वसमत तालुक्यातील सोमठाणा शिवारातील घटना
१७- सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी नाशिक शहरात नाकाबंदी
१८- अमरावतीमध्ये विभागीय रुग्णालयात ७० वर्षांच्या रुग्णाला लावलेल्या ऑक्सिजन मास्कचा स्फोट
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- सदोष गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनिल नरेन याला आयसीसीने निलंबित केले
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२०- किर्तनातून स्‍वच्‍छतेचे धडे रुजविणारे अरविंद महाराज सोनखेडकर
~~~~~~~~~~~~~~~
२१- नांदेड; सर्वबहुजनांनी एकत्र येऊन लढल्यास फुले शाहु आंबेडकरांचे स्वप्न साकर होणार - सुरेशदादा गायकवाड
~~~~~~~~~~~~~~~

२२- नांदेड; शेतकऱ्यांना व आत्महत्याग्रस्त कुंटुबाला दुष्काळातुन सावरण्यासाठी मदतीचा हात - उध्दव ठाकरे
~~~~~~~~~~~~~~~
२३- नांदेड; दलितवस्तीसाठी आलेल्या 22 कोटी निधीपैकी 50 टक्के निधी पाणी टंचाईवर खर्च करणार -जि.प.चे उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे
~~~~~~~~~~~~~~~
२४- महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी पुण्‍यात मुलींची शाळा सुरु करुन स्‍त्री शिक्षणाची मुहूर्तमेड रोवली - जि. प. स. वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
स्वच्छ चरित्र आणि धाडसी कर्तृत्व कुणा कडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वता:लाच निर्माण करावे लागते..
[अभिजीत चौरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी पुण्‍यात मुलींची शाळा सुरु करुन स्‍त्री शिक्षणाची मुहूर्तमेड रोवली - जि. प. स. वर्षाताई भोसीकर



नांदेड, 29- महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी पुण्‍यात मुलींची शाळा सुरु करुन स्‍त्री शिक्षणाची मुहूर्तमेड रोवली, यामुळेच महिला प्रत्‍येक क्षेत्रात प्रगती करु लागल्‍या आहेत, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
      महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या स्‍मृतीदिनानिमित्‍त कंधार येथील प्रियदर्शीनी माध्‍यमिक कन्‍या शाळेत घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. यावेळी किशोर अंबेकर, सुधीर तपासे, कृष्‍णा भोसीकर, चॉदसाब, गंगाबाई लाडेकर, संभाजी नांदेडे, निळोबा चिरले आदींची उपस्थिती होती.
      पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी प्रथम क्रांतीज्‍योती सावि‍त्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. त्‍यानंतर आठराव्‍या शतकात मुलींची पहिली शाळा पुण्‍यात सुरु केली. यामुळे महिलांना पुरुषांबरोबर समनाता मिळाली. आज प्रत्‍येक क्षेत्रात महिला पुढाकारने काम करुन आपली स्‍वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुले व ज्‍योतीबा फुले यांनाच जाते. यांचा वारसा पुढे चालविण्‍यासाठी प्रत्‍येक पालकांनी मुलींना शिक्षण देऊन त्‍यांना त्‍यांच्‍या पायावर उभे करावे असे आवाहन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
      प्रारंभी महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन करण्‍यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर अंबेकर यांनी तर उपस्थितांचे आभार सुधीर तपासे यांनी मानले.

दलितवस्तीसाठी आलेल्या 22 कोटी निधीपैकी 50 टक्के निधी पाणी टंचाईवर खर्च करणार -जि.प.चे उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे



नांदेड, गंगाधर गच्चे ―
 जिल्हयामध्ये दुष्काळ पडला असुन ग्रामीण भागामध्ये तिव्र पाणी टंचाईचा झाला सुरु झाल्या आहेत व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असुन जिल्हा परिषदेला दलीतवस्तीसाठी 22 कोटी निधी मिळाला असुन त्यापैकी 50 टक्के  निधी हा पाणी टंचाई वर खर्च करणार  असल्याचे बैठकीत जिपचे उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे यांनी सांगितले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली त्यामध्ये जिल्हयाच्या पाणी टंचाई बाबत चर्चा करुन पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असुन सध्या जिपमध्ये दलितवस्तीचा 22 कोटी रुपये  निधी पडुन असुन त्यापैकी 50 टक्के निधी हा पाणी  टंचाई दुरकरणार असे जिपचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती दिलीपदादा धोंडगे यांनी सांगितले. ही बैढक जिप अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडीले यांच्या अध्यक्षपेखाली घेण्यात आली असुन बैढकीमध्ये अनेक विकास कामे जिल्हयातील योजनाचा यावेळी आढावा घेण्यात  आला योवळी उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, शिक्षणसभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती स्वप्नील चव्हाण,बांधकाम व अर्थ सभापती  दिनकर दहीफळे, महिला व बालकल्याण सभापती सौ.वंदना लहाणकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, कोमावाड रामोड, कृषी अधिकारी मोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी गोहोत्रे,यांची प्रमुख उपस्थिती  होती.

शेतकऱ्यांना व आत्महत्याग्रस्त कुंटुबाला दुष्काळातुन सावरण्यासाठी मदतीचा हात - उध्दव ठाकरे




नांदेड (गंगाधर गच्चे)
सध्या महाराष्ट्र राज्यासह मराठवाडयात भयंकर दुष्काळ पडला असुन पुढार्यासारखे  पावसाचे काम झाले असुन कधी येतो कधी नाही. त्यामुळे शेतकरी दुष्काळात सापडला असुन त्याला यामधुन  सावरण्यासाठी शिवसेना सदैव पाठीशी असुन मदतीचा हात म्हणून मी नांदेड मध्ये आलो असुन आत्महत्यागस्त कुंटुबाला व शेतकऱ्यांना एक शेळी दोन पिल्ले  व दहा हजार रुपये मदत देत असल्याचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष मा. उध्दवरावजी ठाकरे यांनी नांदेड येथील मल्टीपपर्स हायस्कुल येथील कार्यक्रमात शिवसेनीकांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.

यावेळी शिवसेना उपनेते तथा पर्यावरणी मंत्री रामदास कदम परिवहन मंत्री तथा जिल्हाचे  पालकमंत्री दिवाकर रावते, संपर्क प्र्रमुख  विश्वनाथ नेरुककर खा. अनिल देसाई राज्यमंत्री विजय शिंदे, विजय शिवतारे, दिपक केसरकर,आ.भरतसेठ  गोगावले, आ. प्रतापपाटील चिखलीकर, आ.नागेशपाटील आष्टीकर, आ.हेमंतभाऊ पाटील, आ.सुभाष साबणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की आमचे सरकार हे नेहमी शेतकरी व मजुरदार यांच्या हीताचे असुन आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकÚयांना कर्जमुक्त केले राज्यातील विदयार्थाची शिक्षण फी माफ केली परंतु बऱ्याच ठिकाणी यांची आमलबजावणी होते की नाही शिवसेनिकांनी करावे शाळेत जाण्यासाठी या दुष्काळामुळे
अनेक विदयाथ्यांचे पालक अडचणीत असुन त्यांना आपल्या विदयार्थी मुलांना शिक्षणासाठी पैसे व येजा करण्यासाठी पाससाठी पैसे नसल्यामुळे लातुर जिल्हयातील एक विदयार्थींनी स्वाती पिल्ले हिने आत्महत्या केली याची त्वरित मंत्रीमंडळात निर्णय घेवून परिवहन मंत्रीने विदयाथ्र्यांना मोफत पास देण्याचे  आदेश दिल्याने राज्यातील चार लाख पन्नास हजार विदयाथ्र्यांना फायदा झाला. सरकार दुष्काळग्रस्त भागामध्ये अनेक उपाय योजना राबवीत असुन त्यांची अमलबजावणी होते की नाही याची तपासणी शिवसेनीका जावुन करावी शिवसेना नेहमी शेतकऱ्यांना पाठीशी असुन आज मी आपनाला मदतीचा हात देण्यासाठी तुमच्या जवळ आलो आहे
राज्यात भयंकर दुष्काळ पडला असुन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, जर शासनाच्या योजना व दुष्काळसाठी उपाययोजना होत नसतील तर शिवसेना सरकारचा पंचनामा करणार आहे हे बदलेले सरकार असुन आम्ही आपनाला हिम्मत देण्यासाठी आलो आहे व केंद्रसरकारच्या वतीने 10 शेतकऱ्यांसाठी गट शेती योजना राबवत असुन दहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती उद्योगासाठी कर्जाची मागणी करावी ती त्वरीत देण्यात येणार आहे. असे ही उध्दवराव ठाकरे यांनी सांगितले व जिल्हयातील एक हजार शेतकरी यांना एक शेळी दोन पिल्ले व दहा हजार नगदी मदत दुष्काळावर मात करण्यासाठी यावेळी उध्दव ठाकरे यांचा हस्ते वाटप करण्यात आले.

पर्यावरणमंत्री रामदास कदम:- मराठवाडयात भयंकर दुष्काळ पडला असुन पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन सर्वत्र पाणी टंचाईचे संकट आहे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यासाठी टॅकरची सुविधा केली असुन टॅकरची मागणी केल्यास तिन दिवसात त्वरीत देऊ किडामुंगी सारखे मानसे मरत आहेत त्यामुळे आम्ही मदतीचा हात देण्यासाठी आलो असुन मा. उध्दवराव ठाकरे साहेब यांनी चित्रपदर्शनातुन मिळवलेले 7 ते 8 कोटी रुपये ते दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी यांना वाटप करीत आहेत, आम्ही दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना राबवत आहोत असे त्यांनी सांगितले.

हा कार्यक्रम दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मल्टीपपर्स हास्यकुलच्या मैदानावर घेण्यात आला यामध्ये जिल्हयातील एक हजार  शेतकÚयांना एक शेळी दोन पिल्ले व दहा हजार रुपये वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख भुंजग पाटील डक, मिलींद देशमुख, सहसंपर्क प्रमुख प्रकाश कौडगे, शहराध्यक्ष दत्ता कोकाटे, मनपा विरोधी पक्ष नेता बालाजी कल्याणकर प्रविणपाटील चिखलीकर, दिपक रावत, उमेश मुंडे, पप्पु जाधव, निखील लातुकरकर, अशोक उमरेकर, नेताजी भोसले, बाळु खोमणे,यांच्यासह  जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी तालुका प्रमुख महिला आघाडीच्या पदाधिकारी आदी जनांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आ. हेमंत पाटील यांनी केले.

सर्वबहुजनांनी एकत्र येऊन लढल्यास फुले शाहु आंबेडकरांचे स्वप्न साकर होणार - सुरेशदादा गायकवाड



नांदेड (गंगाधर गच्चे)
या देशामध्ये बहुजन समाज विखुरलेला असुन एकांमेकांना जवळ येऊ दिले नसल्यामुळे आपली उन्नती झाली नसुन, फुले शाहु आंबेडकरांचे स्वप्न साकार झाले
नाही त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास ते पुर्ण होईल असे मत बहुजन समाज पार्टीचे नेते सुरेशदादा गायकवाड यांनी दि.28 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा
ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निर्मीत आयोजीत केल्याला अभिवादंन सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ओबीसी महिला आघाडीच्या सौ.माधवी मठपती, राष्ट्रीय समाज पक्षाचे रामचंद्र येईलवाड, प्रा.महेश माली, सुरेंद्र  जयस्वाल, रापते आदी मान्यवरांची उपस्थीती  होती.
पुठे बोलतांना म्हणाले की आज आपल्या देशामध्ये बहुजनांच्या विकासाला खिळ घालण्याचे पडयंत्र येथील काही लोक करीत असुन आपण इतरत विखरल्यामुळे आपल्यामध्ये भांडणे
 लावुन स्वताःची पोळी भाजुन घेत आहेत आज बहुजन समाजातील ओबीसी,एस.टी,एस.टी,यांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.  त्यामुळे आपण जर एकत्र आल्यास नकीच महापुरुषांचे
 स्वप्न पुर्ण होणार आहे असे ही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले सर्व प्रथम महात्माफुले यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यांनतर मान्यवंरानी आपले मनोगत व्यक्त केले

किर्तनातून स्‍वच्‍छतेचे धडे रुजविणारे अरविंद महाराज सोनखेडकर




नांदेड, 29, स्‍वच्‍छता ही सर्वाना प्रिय असते यासाठी प्रत्‍येक जण स्‍वच्‍छ राहण्‍याचे धडपड करत असतो. वैयक्तिक स्‍वच्‍छतेबरोबरच गावागावात स्‍वच्‍छता झाली तरच ग्रामीण भागातील नागरीकांचे आरोग्‍य अबाधित राहील. याच्‍या प्रबोधनासाठी हरिभक्‍त पारायण अरविंद महाराज मोरे सोनखेडकर हे त्‍यांच्‍या किर्तनातून स्‍वच्‍छतेचे धडे लोकांच्‍या मनावर बिंबवतात.
     स्‍वच्‍छतेसाठी देशभरात मोठी मोहिम चालू असून उघडयावरील हागणदारी बंद करण्‍यासाठी शौचालय बांधून त्‍याचा वापर करणे आवश्‍यक आहे. यासाठी लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी जिल्‍हा व तालुकास्‍तरावरील अधिकारी व कर्मचारी गावस्‍तरावर लोकांना स्‍वच्‍छतेची माहिती सांगतात. परंतु पहिल्‍याच वेळेत त्‍यांना या मोहिमेत यश मिळत नाही. 
     धार्मिक क्षेत्रातील गुरुंनी जर त्‍यांच्‍या प्रवचनातून आणि किर्तनातून स्‍वच्‍छतेची माहिती दिल्‍यानंतर यात मोठा बदल झाल्‍याचे दिसून येते. यासाठी राज्‍यस्‍तरावरुन पंढरपूर येथे किर्तनकारांची कार्यशाळा देखील घेण्‍यात आली होती. लोहा तालुक्‍यातील सोनखेड इथले हरीभक्‍त पारायण अरविंद महाराज मोरे हे गेल्‍या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती वाढविण्‍यासाठी त्यांच्‍या किर्तनातून प्रबोधन करत असतात. या त्‍यांच्‍या प्रबोधनामुळे अनेक गावात शौचालयाची निर्मिती झाली आहे.
      अरविंद महाराज यांना त्‍यांच्‍या वडिलांचा किर्तनाचा वारसा मिळाला. वयाच्‍या दहाव्‍या वर्षापासून ते या क्षेत्रात आहेत. वयाच्‍या पंधराव्‍या वर्षापासून त्‍यांनी किर्तनाला सुरुवात केली. आतापर्यंत त्‍यांनी 15 ते 20 हजार किर्तने केली आहेत. सन 2002 पासून किर्तनातून स्‍वच्‍छतेचा विषय हाताळायला सुरुवात केली. या किर्तनामुळे भक्‍तगणांनी शौचालये बांधल्‍यामुळे गावात अमुलाग्र बदल दिसून आला आहे. आपण सांगितल्‍यानंतर लोकांमध्‍ये परिवर्तन होते हे लक्षात आल्‍यामुळे प्रत्‍येक किर्तनामधून हा विषय घेत असल्‍याचे हरीभक्‍त पारायण अरविंद महाराज मोरे यांनी सांगितले.
     संत तुकाराम महाराजांनी सोनखेडला मुक्‍काम केला होता. त्‍यांच्‍या पादुका सोनखेड येथे असून देहू नंतर सोनखेड येथे बिज उत्‍सव मोठया प्रमाणात साजरा कला जातो. संत तुकाराम महाराजांचे मंदीरही सोनखेड येथे आहे. सोनखेड ग्राम पंचायत हागणदारीमुक्‍त करण्‍यासाठी त्‍यांचे प्रयत्‍न असून त्‍यांच्‍या प्रबोधनाने सुमारे पाचशे शौचालये या ग्रामपंचायतीमध्‍ये निर्माण झाली आहेत. किर्तन आणि प्रवचन करणा-या महाराजांनी त्‍यांच्‍या किर्तनातून स्‍वच्‍छतेविषयी प्रबोधन केल्‍यास जिल्‍हा निर्मल होण्‍यास वेळ लागणार नाही असे मत हरीभक्‍त पारायण अरविंद महाराज मोरे व्‍यक्‍त केले.   

नमस्कार लाईव्ह २९-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २९-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- किशनगंज जिल्ह्याती भारत- नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांनी सशस्त्र सुरक्षा बलाच्या दोन जवानांना आज सकाळी ताब्यात घेतले होते. मात्र सशस्त्र सीमा बल आणि नेपाळ पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर दोन्ही भारतीय जवान सुरक्षित परतल्याची माहिती
२- नेपाळ पोलिसांनी सशस्त्र सीमा बलाच्या १३ सदस्यांच्या गस्ती पथकाला ताब्यात घेतले - महासंचालक बी. डी. शर्मा
३- नेपाळमध्ये सर्व भारतीय वृत्तवाहीन्यावर बंधी
४- श्रीलंकन नेव्हीने पाल्क स्ट्रेट जवळ २ बोटीसह ९ भारतीय मच्छीमारास पकडले
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- पॅरिसमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सम्मेलनासाठी पंतप्रधान मोदी रवाना
६- सुवर्ण योजनांशी संबंधित चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बँकांच्या प्रतिनिधींची १ डिसेंबरला घेणार भेट
७- समलैंगिक संबंधांच्या मुद्द्यावर सरकार गंभीर असल्यास, कलम ३७७ रद्द केले पाहिजे - मनीष तिवारी, काँग्रेस
८- जम्मू-काश्मीर : पुंछमधील लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांचा हल्ला
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- शनिशिंगणापूर; महिलेने दर्शन घेतल्याने शनीच्या चौथऱ्यावर शुद्धीकरणासाठी ग्रामस्थांकडून दुग्धाभिषेक, बंदचा निर्णय
१०- शनिशिंगणापूरमध्ये ग्रामस्थांकडून बंद मागे, पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून बंद मागे
११- सातारा; कळत-नकळत एचआयव्ही संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर नको वंशाचा दिवा...जोडीदार ‘सुरक्षित’ हवा, ९६८ रुग्णांनी स्वत:हून जोडीदाराला ‘सुरक्षित’ अंतरावर ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- कानपूरमधील एका खादीच्या गोदामाला लागली आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आव विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
१३- उस्मानाबाद-ढोकी रस्त्यावर भीषण अपघात, गरोदर महिलांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका ट्रॅक्टरवर धडकली, ४ जखमी
१४- मराठवाड्यात थंडीची चाहूल लागताच रंगू लागल्या हुरडा पाटर्‌या
१५- पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करुन अंमलबजावणी करावी - दिवाकर रावते
१६- मुंबई - अंधेरी मेट्रो रेल्वे स्थानकावर एका युवकाची फाशी घेऊन आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१६- नवी दिल्लीत अर्धमॅरेथॉनमध्ये ३४ हजार स्पर्धकांनी भाग घेऊन विक्रम नोंदवला
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१७- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन कि बात' - नोव्हेंबर २०१५
~~~~~~~~~~~~~~~
 १८- धावत्या रेल्वेतून युवक खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
~~~~~~~~~~~~~~~
१९- शंकरनगर देगलुर रोडवर बिजूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार ठार
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
दीपक कदम, नरेंद्रसिंघ बैस, वेंकटेश नारलावार, पिंटू डोम्पले, सुनील चेलानी, ज्योती भंडारी
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्य म्हणजे आपण लहानपणी बालवाडीत खेळायचो तशी "चमचागोटी"ची चमच्यामध्ये गोटी ठेवुन धावायची शर्यत आहे. जर धावताना चमचामधील गोटी पडली तर पहिला क्रमांक येउनही काय फायदा?
[जयश्री देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन कि बात' - नोव्हेंबर २०१५



मन कि बात नोव्हेंबर २०१५ मधील महत्वाचे मुद्दे 

सणांच्या वेळेस जेव्हा एखादी आपत्ती येते, ते खूप दु:खदायक असतं
तामिळनाडूतील पुराचा फटका बसलेल्या सर्व कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी आहे. केंद्र, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना धीर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत
नेपाळमधील भूकंपानंतर मी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा केली व आत्पकालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी 'सार्क' देशांनी मिळून तयारी केले पाहिजे, असे सुचवले - पंतप्रधान मोदी
संपूर्ण जगाला नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे
शारिरीक व मानसिक रित्या सक्षम नसलले लोकही आपल्यासाठी एका प्रेरणा स्त्रोत आहेत. त्यांच्याकडेही अचाट साहस व सामर्थ्य असतं 
बिल व मिलिंडा गेट्स हे दोघे भारतात अनेक ठिकाणी समाजसेवा करतात, ते त्यांची कमाई गरिबांसाठी खर्च करतात
MY GOV वर जाऊन स्वच्छ भारत, आदर्श गाव आणि हेल्थ क्षेत्राशी निगडीच ३ ई-बूक्स पाहा. आणि त्याबद्दल काही सूचना असल्यास त्या MY GOV वर पाठवा - पंतप्रधान मोदींचे तरूणांना आवाहन
वातावरणातील बदलामुळे सर्व जग चिंतीत झाले आहे, यापुढे पृथ्वीचे तापमान वाढणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे - पंतप्रधान मोदी
छोटी-छोटी कामे करणा-या व्यक्तीच देशाची आर्थिक शक्ती असतात, आपण त्यांचे बळ वाढवले पाहिजे 
हिवाळा जवळ येत असून, कसर्वांनी व्यायाम करून तंदुरूस्त रहावे, असा सल्ला मी देतो. 'अच्छा मौसम है तो अच्छी आदत भी होनी चाहिये'
 सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी (३१ ऑक्टोबर) मी एक भारत- श्रेष्ठ भारताबद्दल चर्चा केली होती, त्याला योजनेचे रुप देण्याची माझी इच्छा असून, त्यासाठी सर्वांनी सूचना पाठवाव्यात - पंतप्रधान मोदी

शंकरनगर देगलुर रोडवर बिजूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार ठार





बिलोली : ( यादव लोकडे )
  बिलोली तालुक्यातील बिजुर येथे देगलुर नांदेड महामार्गावर दि 28 नोहबंर रोजी सकाळ सहा
तीस वाजता देगलुर कडून नांदेड कडे जाणार्‍या दुचाकी स्वारास अज्ञात वाहनाने समोरून जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला.
मुळ रहिवासी उच्छा तालुका मुखेड येथील रहिवासी असलेले आणि सध्या समता नगर नांदेड येथे वास्तव्यास असलेले शरद आनंद भालेराव वय सताविस वर्षे हे देगलुर कडून नांदेड कडे दुचाकी एम एच 26 ए व्हि 9669 वरून दि 28 नोहबंर रोजी सकाळी सहा तीस वाजता जात असताना बिजूर जवळ नांदेड देगलुर महामार्गावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन  रोडवर मेन्दू पडला तर त्याच्या उजव्या पायाचा चुराडा झाला या व दुचाकीचा हि चुराडा झाला या भीषण अपघातात दुचाकी स्वार तरूण जागीच ठार झाला
दुचाकी स्वारास जोराची धडक देऊन अज्ञात वाहनाने पलायन केले असून रामतीर्थ पोलीस या अज्ञात वाहानाचा शोध घेत असून रामतीर्थ पोलीसांना मयताची ओळख पटविन्यासाठी दोन ते तीन तास लागल्याने अपघातात मृत्यू पावलेल्या तरूणाची डेट बाॅडी सुमारे तीन ते चार तास रोडवर पडून होता पुढील तपास रामतीर्थ पोलीस हे करीत आहेत

धावत्या रेल्वेतून युवक खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा



रेल्वेतल्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीनं आणखी एका तरुणाचा बळी घेतलाय. कोपर - दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात घडला. सीएसटीकडे निघालेला अवघ्या २१ वर्षांचा भावेश डोंबिवलीत ट्रेनमध्ये चढला होता. सकाळी ८.५९ वाजता डोंबिवलीहून निघालेल्या या ट्रेनमध्ये खच्चून गर्दी भरली होती. त्यामुळे, भावेशनं ट्रेन तर पकडली पण त्याला आतमध्ये शिरण्यासाठी मात्र जागा उरलेली नव्हती... त्यामुळे तो दरवाजातच लटकलेल्या अवस्थेत उभा होता.कोपर स्टेशन सोडल्यानंतर भावेशला तोल सांभाळणं कठिण झालं... आणि एका बेसावध क्षणी त्याचा हात सुटला आणि तो चालत्या रेल्वेच्या दरवाजातून खाली कोसळला. 

Saturday, 28 November 2015

नमस्कार लाईव्ह २८-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २८-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- भारताशी बिनशर्त चर्चा करण्यास तयार, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मवाळ भूमिका
२- लंडन : 11 वर्षांच्या मुलीने केली आईची प्रसूती
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- संपूर्ण भारतीय सेनाही दहशतवाद्यांना थोपवू शकणार नाही : फारुक अब्दुल्ला
४- देशातील सध्याच्या वातावरणासाठी 'असहिष्णुता' शब्द अपुरा - अरूधंती रॉय
५- देशातील वाढती असहिष्णुता ही माझ्यासाठी चिंतेची बाब बनली आहे- पी. चिदंबरम
६- गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी नागरिकांना 'स्मार्ट कार्ड; घरच्या गॅस सिलिंडरचे पैसेही भरा ऑनलाईन
७- जानेवारी महिन्यापासून सरकार जापनीज बीएन सेफेलायटिस, गोवर व जर्मन गोवर (रुबेला), रोटा व्हायरस या बालकांसाठीच्या चार लसी मोफत देणार- केंद्रीय आरोग्यमंञी जे. पी. नड्डा
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याची तयारी दाखवणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर शिवसेनेचा कडाडून हल्ला; कसब महात्मा होता त्यांचा अपमान करू नका
९- कॅबिनेट मंत्री अनिल विज यांच्या सोबत झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर, फतेहाबादच्या एसपी संगिता कालिया यांची तडकाफडकी बदली
१०- विमानतळासाठी सरकारला हवे साईंच्या दानपेटीतून 110 कोटी
११- कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन ठप्प झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक झाली ठप्प
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- नाशिक : शेताच्या वादाची तक्रारसाठी गेलेल्या दोघांना ट्रकखाली चिरडलं
१३- मुंबईतील दादर फुल मार्केटमध्ये एक भांडण; भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसालाच जमावाकडून मारहाण
१४- ठाण्याहून सीएसटीला जाणाऱ्या लोकलमधून पडून एकाचा मृत्यू
१५- लातुरात वानरांचा धुमाकूळ, गेल्या 15 दिवसांत 50 जणांना चावा
१६- छत्तीसगडमधील बस्तर येथे पोलिसांच्या कारवाईनंतर दोन महिला नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले
१७- तेलंगणातील मेदक येथे बोअरवेलमध्ये १ वर्षांचा मुलगा पडल्याचे वृत्त
१८- नागपूर : छेडछाडीमुळे सुनीता माकडे यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांचा कडकडीत बंद
१९- उमरी तालुक्यातील पुनर्वसित बिजेगावच्या बांधकामाबाबत व एजन्सीवरील बार चार्ट प्रमाणे दंडात्मक कारवाईसाठी पालकमंत्र्यांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- मॅगी पास्ता १०० टक्के सुरक्षित आहे. नेस्लेच्या उत्पादनांमधील सर्व घटकांची तपासणी करूनच ते बनवले जाते - नस्ले इंडियाचे स्पष्टीकरण
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२१- प्रत्येक मूल अधिक गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे - राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर
~~~~~~~~~~~~~~~
२२- महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा; अनेक हौशी कलावंताना व्यासपीठ मिळवून देण्याच काम
~~~~~~~~~~~~~~~
२३- ISISचा दहशतवादी व्हिडिओ शुटींग करताना ठार
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं आयुष्यात खुप महत्वाचं ठरतं.
कारण आपलं सुंदर दिसण हे फक्त समोरील व्यक्तिला आकर्षित  करू शकतं,
मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हेच त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं.....
[डॉ. वर्षा चौरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

ISISचा दहशतवादी व्हिडिओ शुटींग करताना ठार


ISISचा दहशतवादी व्हिडिओ शुटींग करताना ठार

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा; अनेक हौशी कलावंताना व्यासपीठ मिळवून देण्याच काम



महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अनेक हौशी कलावंताना व्यासपीठ मिळवून देण्याच काम महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून करत आहे. गेल्या ५४ वर्षापासून चालू आसलेल्या या स्पर्धेमधून अनेक कलावंत वैवसाईक रंगभूमीवर वावरातानी दिसत आहेत.
     नांदेड मधीलहि अनेक कलावंत हे राज्य नाट्य स्पर्धेतून आपल्या कलेला दाद मिळवत पुढे गिले तर अनेक कलावंत हौस म्हणून इतर नोकरी, वेवसाय सांभाळत राज्य नाट्य स्पर्धा करतात. एक प्रबळ इतिहास असलेली राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नांदेड केंद्रावर पार पडत आहे. हे नांदेड करांसाठी अभिमानाची गोष्ठ आहे.
     राज्य नाट्य स्पर्धेच्या सातव्या दिवशी सांस्कृतिक मंच, नांदेड च्या वतीने डॉ. चंद्र शेखर फणसळकर लिखित ‘वा गुरु’ हे नाटक सादर झाले. प्रा. रवि शामराज यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक गुरु, शिष्यांच्या भाव विश्वात नेणारे होते. गुरुणां झालेला असाध्य आजार, वीस वर्ष्यानंतर भेटण्यासाठी येणारा त्यांचा तो शिष्य, त्यांच्यातील संवाद आणि सहज अभिनय. हे नाटकाची जमेची बाजू.
    प्रा. रवि शामराज याचं दिग्दर्शन हे बर्याच वर्ष्यानंतर प्रेक्षकांना पहावयास मिळाले, लक्ष्मण संगेवार याचं नेपथ्य, दीपक मुळे यांची प्रकाश योजना, दिलीप पाध्ये याचं संगीत, सो. पूजा वझरकर यांची रंगभूषा, सो. भारती शामराज यांची वेशभूषा या सर्वच बाबी नाटकाला कुठेतरी प्रबळ करण्यास मदत करीत होते. या नाटकात गुरु- सप्रे सरांची भूमिका राजीव किवळेकर, सो. सुधा सप्रे यांची भूमिका सो. अंजली किवळेकर यांनी सांभाळली तर शिष्य-विध्याधर पै ची भूमिका गिरीष कराडे, जान्हवीची भूमिका सो. अनुराधा पत्की यांनी सांभाळली. सर्वच कलावंतानी आपल्या सहज अभिनयातून सत्याचा अभास निर्माण करून दिला.
उद्या दि. २९/११/२०१५ रोजी कोणत्याही नाटकाचे सादरीकरण होणार नसून सोम. ३० नोव्हें. रोजी सायं. ७ वा ‘अस्तित्व अॅत अंश डॉट कॉम’ या नाटकाचे सादरिकरन होणार असल्याचे समन्वयक दिनेश कवडे यांनी कळवले.     

प्रत्येक मूल अधिक गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे - राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर



नांदेड, दिनांक 28, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा राज्याचा संकल्प असून विद्यार्थ्याचा शैक्षणिकस्तर अधिकाधिक वाढविण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी हदगाव येथे 26 नोव्‍हेंबर रोजी आयोजित शिक्षण विभागाच्या सभेत व्यक्त केले.
     डॉ.भापकर हे मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी औरंगाबाद,जालनापरभणीहिंगोली व नांदेड जिल्ह्यास भेट देऊन हदगाव येथे शिक्षण विभागातील अधिकारीमुख्याध्यापक पत्रकार, शिक्षणप्रेमींशी संवाद साधला. हदगाव येथीस नगरपरिषद सभागृहात झालेल्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिक्षण विभागातल्या प्रत्येक घटकाने तळमळीने काम करण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी करण्यात येणारे प्रयत्न विशद करून काही यशोगाथा त्‍यांनी सांगीतल्या.
  शाळाबाह्य मुलांचा शोधस्थलांतरित पालकांच्या मुलांसाठी हंगामी वसतीगृहेअप्रगत विद्यार्थी न राहू शकणाऱ्या शाळा तयार करणेशैक्षणिक गुणवत्तेसाठीचे प्रयत्न आदींची माहिती दिली. ओघवत्या व प्रवाही शैलीत त्यांनी उपस्थितांच्या आत जाऊन संवाद केला.
प्रगत शैक्षणिक  महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दुसरी ते आठवीच्या मुलांची पायाभूत चाचणी घेतल्यामुळे मूल कोणत्या टप्प्यावर आहे, ते कळणार असून त्याच्यात गुणवत्ता वाढीसाठी काय करणे बाकी आहे ते स्पष्ट होईल. सर्व अधिकारी व मुख्याध्यापक शिक्षकांनी आता गुणवत्तापूर्ण विद्यार्थी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
     प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. डॉ.भापकर यांचे स्वागत वाचनीय पुस्तके देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले. सभेस जि.प.नांदेडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, पंचायत समिती हदगावचे सभापती बालासाहेब कदम, डायटचे प्राचार्य डॉ.बी.बी.पुटवाड, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्केशिवाजी पवारसविता बिरगेउपशिक्षणाधिकारी अशोक देवकरेएस.एस.वाघमारे,डायटचे अधिव्‍याख्‍याते ए. के. निळेकर, ए. ए. गौतम, जे. पी. कांबळे, ज्‍यात्‍स्‍ना धुतमल, के.ए. काझी, डॉ. दादाराव सिरसाठ, सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्‍तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्‍याध्‍यापक व शिक्षणप्रेमी यांची उपस्थिती होती.

नमस्कार लाईव्ह २८-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २८-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- चिलीमध्ये ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप, अद्याप कोणत्याही जीवित अथवा वित्तहानीचे वृत्त नाही
२- कोलोरॅडॉमधील कुटुंब नियोजन केंद्रावर झालेल्या गोळीबारामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह तीन ठार, तर ९ जण गंभीर जखमी आहेत. हल्लेखोर अटकेत
३- नायजेरियात शिया मुस्लिमांच्या मिरवणुकीत करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात २१ जण ठार
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बहुप्रतिक्षीत जीएसटी विधेयक दृष्टीक्षेपात, काँग्रेसच्या सरकारला तीन सुचना, लोकसभेत मोदी सरकारची अग्निपरीक्षा
५- पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी भेटले ; जीएसटी विधेयकावर झाली चर्चा
६- मॅगीपाठोपाठ नेस्ले कंपनीच्या पास्तामध्येही प्रमाणापेक्षा अधिक शिसे
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- दारुबंदीसाठी 18 हजार कोटीच्या महसूलावर पाणी कसं सोडणार?, खडसेंचा सवाल, तर भाजप आमदाराकडून दारुबंदीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
८- शिवसेना आमदार उद्यापासून मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर तर रविवारी उद्धव ठाकरेंकडून मराठवाड्याची पाहणी
९- आझम खान मुस्लीम नाहीत, शाही इमाम बुखारींचा टीका
१०- पुणे: छगन भुजबळ यांच्या हस्ते लेखिका अरुंधती रॉय यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान, मात्र अभाविप कार्यकर्त्यांनी रॉय यांना पुरस्कार देण्यास विरोध दर्शवत केली घोषणाबाजी. पोलिसांनी १०-१५ कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
११- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची रवानगी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी क्रूरकर्मा कसाब याच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष कारागृहात
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- रायगड : मद्यपी टोळक्याने पोलिस कॉन्स्टेबल राजकुमार यादव यांना रेल्वेतून फेकलं, रोहा स्टेशनजवळ, दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनमधील घटना
१३- कुख्यात गुंड मेहबूब पठाणला परभणी पोलिसांकडून अटक, पठाणवर बलात्कार, खुनासारखे गंभीर आरोप
१४- अहमदनगर : चंदूकाका ज्वेलर्सला ‘स्पेशल 26′ स्टाईल लुटलं, 100 तोळे सोनं लंपास
१५- जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात महावितरणच्या वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
१६- घाटकोपरमध्येही बाईक जळीत कांड, बर्वेनगर येथे अज्ञात समाजकंटकांनी जाळल्या ४ बाईक्स. मुंबईतील आठवडाभरातील तिसरी घटना
१७- वाशिमजवळ टोन ट्रक्सची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात, दोन्ही ट्रक्सनी घेतला पेट
१८- शिना बोरा हत्याकांड, पीटर मुखर्जी यांची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याला परवाणगी
१९- पंचायत निवडणूकीदरम्यान आग्रा येथे एका केंद्रावर दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीनंतर गोळीबार, अनेक लोक जखमी
२०- पश्चिम बंगालमधील तिलजला मशिद बारी लेन येथील रबरच्या कारखान्याला लागली भीषम आग. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थली पोहोचल्या
२१- पंजाब: लुधियानामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोटात तीन जणांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२२- पहा दुर्मिळ सीसीटीव्ही फुटेज : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
सचिन करपे, सुनील मामड्याल, विक्की कांबळे, विक्की मोरे, फरहान खान, ऋषिकेश मालवडकर
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे
[अविनाश पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

पाहा दुर्मिळ सीसीटीव्ही फुटेज : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला

पाहा दुर्मिळ सीसीटीव्ही : कसाबने कसा केला २६/११चा अतिरेकी हल्ला



Friday, 27 November 2015

नमस्कार लाईव्ह २७-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २७-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- भारत-पाक मालिकेला अद्यापही परवानगी नाही, परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती, बीसीसीआयच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
२- ब्रिटनमधील सुरक्षेसाठी आयसिसच्या तळांवर हल्ले गरजेचे – ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून
३- उत्तर कोरियात किम जोंग-उन यांच्या ‘अॅम्बिशिअस’ केशरचनेचे अनुकरण बंधनकारक
४- पाकिस्तानकडून घुसखोरी वाढली - बीएसएफ
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- आंबेडकरांनी अपमानाचं विष पचवून संविधानाचं अमृत दिलं : मोदी
६- संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण, मोदींच्या भाषणाआधी विरोधकांचा गोंधळ, जोरदार घोषणाबाजी
७- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवढा व्यापक विचार केला होता हे आजही कायम जाणवत राहतं - नरेंद्र मोदी
८- बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर अवहेलना सहन केली मात्र संविधानात त्यांनी कधीही सूडाची भावना येऊ दिली नाही - नरेंद्र मोदी
९- पाक व्यप्त काश्मीर पाकिस्तानमध्येच राहिल आणि जम्मू-काश्मीर भारतात आहे भारतातच राहिल - फारूख अब्दुल्ला
१०- HSBC भारतातील खासगी बँकींग व्यवहार गुंडाळणार अशी माहिती
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- राज्यात तूर्तास दारुबंदी नाही, दारु विक्रीतून राज्याला 11 हजार कोटींचा महसूल : एकनाथ खडसे
१२- दाभोलकर, पानसरे प्रकरणाचा तपास एकांगी - सनातन
१३- मुंबई : ISIS विरोधात लढण्यासाठी माहिम दर्ग्याचं अॅप
१४- मोबाईल चार्जिंगसाठी 1500 रुपये, नशेबाजीसाठी हजारो, कळंबा कारागृहात धक्कादायक वास्तव कैद्याकडून उघड
१५- दंगल आणि गुन्हेगारी कृत्यांच्या आरोपांवरून ‘आप’च्या पाचव्या आमदाराला [अखिलेश त्रिपाठी] दिल्ली पोलिसांकडून अटक
१६- मार्डचा संप मिटला, डॉक्टर होणार कामावर रूजू
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- पुण्यातील चंदूकाका सराफ दुकानाला भामट्याचा गंडा, मॅनेजर असल्याची बतावणी करत सव्वा किलो सोन लुटलं
१८- नवी दिल्ली :एटीएम कॅश व्हॅनमधून 22.5 कोटी लुटणारा चालक अटकेत
१९- पुणे : चिंचवडमधील आनंदनगरमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, झोपडपट्टीवर दगडफेक, घरांमध्ये घुसून सामनाची नासधूस, तोडफोडीत 5 दुचाकी, 3 चारचाकींचे नुकसान
२०- मुंबईत दहावीत शिकणाऱ्या चौघांकडून वर्गमैत्रिणीवर सामूहिक बलात्कार, व्हॉट्सअॅपवरील क्लीप पीडित मुलीच्या नातेवाईकांना दिसल्यामुळे प्रकरण उघडकीस
२१- मुंबई : मेट्रोची पुन्हा दरवाढ, मासिक पासात आणि तिकीटात केली वाढ, १ डिसेंबरपासून दरवाढ लागू
२२- मुंबई : बेस्टने चार महिन्यात प्रवाश्यांकडून २७ लाख ८२ हजार ५१७ रुपयांचा दंड वसूल
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- भारताचा द.आफ्रिकेवर दणदणीत विजय,मालिकाही खिश्यात
२४- स्नॅपडीलच्या ट्विटर हँडलवरुन आमीर खान गायब
२५- खरेदी-विक्री संकेतस्थळावर सूनेने दिली ‘सासू-विक्री’ची जाहिरात
२६- मेकअप करताना बिपाशाचा चेहरा भाजला!
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२७- रेल्वेच्या ट्राफिक ब्लॉक मुळे २८ नोव्हे. ते २० फेब्रु.पर्यंत काही गाड्यांच्या वेळेत बदल तर काही गाड्या उशिरा, पहा वेळापत्रक
~~~~~~~~~~~~~~~
२८- बिलोली; लोक्स्वराज्य आंदोलनाच्या वतीने शोषणमुक्त समाज निर्मिती व सामाजिक न्यायासाठी समतावादी संघटनेच्या स्थापनेसाठी बैठकीचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
नियतीसमोर गुढगे टेकले तर नियती तुम्हाला नेस्तनाबूत करते, मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज द्याल तर नियती सुद्धा नतमस्तक होते
[प्रवीण जोशी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

बिलोली; लोक्स्वराज्य आंदोलनाच्या वतीने शोषणमुक्त समाज निर्मिती व सामाजिक न्यायासाठी समतावादी संघटनेच्या स्थापनेसाठी बैठकीचे आयोजन

[स्थानिक प्रतिनिधी, यादव लोकडे]


रेल्वेच्या ट्राफिक ब्लॉक मुळे २८ नोव्हे. ते २० फेब्रु.पर्यंत काही गाड्यांच्या वेळेत बदल तर काही गाड्या उशिरा, पहा वेळापत्रक



दक्षिण मध्य रेल्वे
नांदेड़ विभागनांदेड़
जनसम्पर्क कार्यालयनांदेड़
प्रेस नोट ९६  
दिनांक – २७ नोवेंबर, २०१५ 
ट्राफिक ब्लॉक मुळे काही गाड्यांच्या वेळेत  बदल तर काही गाड्या उशिरा 
दिनांक २८ नोवेंबर,२०१५  ते १० फेब्रुवारी, २०१६  दरम्यान ७२ दिवसांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे तर काही गाड्या उशिरा धावतील. हा ट्राफिक ब्लॉक हैदराबाद विभागात रेल्वे पटरी चे काम हाती घेण्यात आल्या मुळे ७२ दिवसांचा लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे यामुळे पुढील बदल करण्यात आले आहेत  -

दिवस
पासून / पर्यंत
लाईन ब्लॉक ची वेळ 
गाडीच्या वेळे मध्ये करण्यात आलेला  बदल
रविवार
सकाळी ०७.१० ते  ११.१० पर्यंत
गाडी संख्या १२७६५ तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस निझामाबाद येथून पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक देण्यात यईल.
१.      गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२.      गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान १.४५ मिनिटे उशिरा धावेल.
३.       गाडी संख्या १७६३९ काचीगुडा–अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस डिच पल्ली ते कामारेद्दी दरम्यान ३५ मिनिटे उशिरा धावेल.
सोमवार
सकाळी ०६.१५ ते १०.१५ पर्यंत
गाडी संख्या ५७४७४ बोधन – मनोहराबाद सवारी गाडी जी डिच पल्ली येथे सकाळी ०६.१३ वाजता येते ती गाडी पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
१.         गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२.      गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान ५०  मिनिटे उशिरा धावेल.


मंगळवार
सकाळी ०६.१५ ते १०.१५ पर्यंत
गाडी संख्या ५७४७४ बोधन – मनोहराबाद सवारी गाडी जी डिच पल्ली येथे सकाळी ०६.१३ वाजता येते ती गाडी पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
३.         गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
४.      गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान ५०  मिनिटे उशिरा धावेल.


बुधवार
सकाळी ०७.१० ते  ११.१० पर्यंत
गाडी संख्या १२७६५ तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस निझामाबाद येथून पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक देण्यात यईल.
१.गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२.गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान १.४५ मिनिटे उशिरा धावेल.
३.गाडी संख्या १७६३९ काचीगुडा–अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस डिचपल्ली ते कामारेद्दी दरम्यान ३५ मिनिटे उशिरा धावेल.
गुरुवार
सकाळी ०६.१५ ते १०.१५ पर्यंत
गाडी संख्या ५७४७४ बोधन – मनोहराबाद सवारी गाडी जी डिच पल्ली येथे सकाळी ०६.१३ वाजता येते ती गाडी पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
१.गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२.गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान ५०  मिनिटे उशिरा धावेल.


शुक्रवार
सकाळी ०६.१५ ते १०.१५ पर्यंत
गाडी संख्या ५७४७४ बोधन – मनोहराबाद सवारी गाडी जी डिच पल्ली येथे सकाळी ०६.१३ वाजता येते ती गाडी पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
१.गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२.गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान ५०  मिनिटे उशिरा धावेल.


शनिवारी
सकाळी ०६.५०  ते १०.५०  पर्यंत
गाडी संख्या १८५०४   गाडी जी डिचपल्ली येथे सकाळी ०६.४५  वाजता येते ती गाडी पुढे गेल्या नंतर ४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल.
१.गाडी संख्या ५७५९४ नांदेड –मेदचल सवारी गाडी नांदेड येथून सकाळी ०४.५५ ऐवजी ०७.४० तास उशिरा म्हणजे २.४५ तास उशिरा सुटेल.
२.गाडी संख्या ५७५६१ काचीगुडा–मनमाड सवारी गाडी काचीगुडा ते डिचपल्ली दरम्यान १.२५  मिनिटे उशिरा धावेल.
३.गाडी संख्या १७६३९ काचीगुडा–अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस कामारेद्दी ते निझामाबाद दरम्यान १५  मिनिटे उशिरा धावेल.

जनसंपर्क कार्यालय, 
नांदेड