नांदेड, 15- येत्या 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिवस असून यानिमित्ताने पुन्हा एकदा नांदेड जिल्हयात शौचालय बांधकामाला गती देण्यात येणार आहे. आणि त्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला असून उद्यापासून गावस्तरावर मिनी बिडीओ, ग्रामसेवक यांनी गावात मुक्काम करुन शौचालयाचे महत्व गावक-यांना पटवून सांगणार आहेत. तसेच लोकप्रतिनीधी, सरपंच, महिला बचतगट, युवक-युवती मंडळ, गावस्तरावरील विविध समित्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
मागच्या वर्षात नांदेड जिल्हयाने सर्वाधिक शौचालय बांधून राज्यात अव्वल स्थान पटकावले होते. याही वर्षी नांदेड जिल्हा शौचालय बांधकामात अव्वल स्थान कायम राखले आहे. चालु वर्षात 465 ग्राम पंचायती निर्मल करण्यासाठी कृती आराखडयात घेण्यात आल्या. मात्र राज्याने सर्वच जिल्हयांना पन्नास टक्क्यापर्यंत आराखडा तयार करण्यास सांगीतला, परंतु नांदेड जिल्ह्याचे शौचालय बांधकामातली प्रगती पाहून नांदेड जिल्हयातील 465 ग्राम पंचायती कायम ठेवण्यात आल्या आहेत. या ग्राम पंचायतीमध्ये सुमारे 85 हजार शौचालय बांधावयाची आहेत, त्यापैकी आजमितीला 30 हजार शौचालय बांधुन पूर्ण झाली आहेत.
येत्या 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिवस असून यानिमित्ताने जिल्हयात शौचालय बांधकामाची मोठी मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी उद्या 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान जिल्हयातील 83 मिनी बिडीओ वेगवेगळया 249 गावात मुक्काम करुन ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व पटवून सांगणार आहेत. टप्प्या-टप्प्याने निर्मल करावयाच्या गावांमध्ये मुक्कामाचे कार्यक्रम आखून गावा-गावात शौचालये उभारण्यात येणार आहेत. चालु वर्षात पात्र लाभार्थ्यांना 12 हजार रुपये अनुदानाचा लाभही देण्यात येणार आहे. शौचालय बांधकामासाठी लागणारा सर्व निधी नांदेड जिल्हयासाठी शासनस्तरावरुन देण्यात येणार आहे. मुक्काम करण्यात येणा-या गावांची तालुकानिहाय माहिती याप्रमाणे- भोकर तालुक्यात चिंचाळा, नागापूर, सोनारी, सावरगाव मेट, डौर, खडकी, जांभळी, बेंबर, हस्सापुर, वाकद, धावरी खु, चितगीरी, आमठाना, महागाव, लगळूद, पाकी व थेरबन, माहूर- हिंगणी, मुरली, लांजी, हरडप, लोकरवाडी, पार्डी म, लिंबायत, मालवाडा, उमरा, मलकागुडा, कुपटी, अनमाळ, दिगडी, इवळेश्वर, पडसा, सायफळ व आष्टा, उमरी- जामगाव, ईश्वरनगर, पळसगाव, बोथी, रामखडक, बोळसा, मेंढका, राजवाडी व शेंबोली, धर्माबाद- धानोरा, जुन्नी, विळेगाव, सायखेड, आटाळा, येल्लापूर, सिरजखोड, नायगाव, बामणी, लोहा- दापशेड, जोशी सांगवी, टाकळगाव, अंबेसांगवी, कारेगाव, बोरगाव के, देऊळगाव, सोनमांजरी व वागदरवाडी, किनवट- गोंडे महागाव, मलगाजाम तांडा, मालकागुडा, दिगडी म., मलकवाडी, भिमपूर, अंबाडी, अंबाडी तांडा, परसराम नाईक तांडा, दहेलीतांडा, गौरी व मोहांडा, देगलूर – ईब्राहीमपूर, वन्नाळी, निपानी सावरगाव, चव्हाणवाडी, कबीरवाडी, कुन्मानपल्ली, सुजायतपूर, नरंगल, नंदूर, बोरगाव, करडखेडवाडी, नागराळ, देवापूर, पेंडपल्ली व टाकळी ज., कंधार – मरशिवणी, सोमठाणा, नवघरवाडी, बाळांतवाडी, नंदनशिवाणी, घागरदरा, शिरुर, बामणी प.क., तेलंगवाडी, गुंडा, हरबळ व खंडगाव, नायगाव – टाकळी त.ब., रहाटी बु, कहाळा खु, डोंगरगाव, सालेगाव, राजगडनगर, मरवाळी तांडा, धुप्पा, भोपाळा, दरेगाव, गडगा, मुकासदरा, मुस्तापूर, गोळेगाव व तलबिड, अर्धापूर – लहानतांडा, शहापूर, बेलसर, सावरगाव, धामदरी, उमरी, देगाव बु, येळेगाव, दिग्रस नांदला, कोंढा,कामठा व बामणी, बिलोली- हिप्परगा माळ, कामरसपल्ली, थडीसावळी, कांगठी, कोळगाव, कौठा, बाभळी अ, पोखर्णी, शिंपाळा, भोसी, चिंचाळा व तळणी, मुदखेड – मेंढका, राजवाडी, शेंबोली, रोहिपिंपळगाव, वाई, चिकाळा, रोहिपिंपळगाव तांडा, देवापूर, इजळी, हज्जापूर, जवळा पाठक, जवळा मुरार व निवघा.
शौचालय बांधकाम करतांना तीव्र उताराची भांडी, दोन शोषखड्डे असणे आवश्यक आहे. शौचालयासह बाथरुम बांधण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. येत्या मार्च 2016 अखेर 465 ग्राम पंचायती हागणदारीमुक्त करण्यात येणार असून यासाठी गट विकास अधिकारी, मिनी बिडीओ व ग्रामसेवक यांनी पुढाकार घेऊन नांदेड जिल्हयाल देण्यात आलेले उद्दिष्ट साध्य करुन जिल्हयाचा लौकिक वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment