Saturday, 21 November 2015

विष्णुपुरी जलाशयातून उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा पाटबंधारे विभागाचा इशारा




नांदेड पाटबंधारे विभाग ( उत्तर ) नांदेड अंतर्गत विष्णुपुरी जलाशयाचा संपूर्ण पाणीसाठा जिल्हाधिकारी नांदेड यांनी पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील तसेच जलाशयावरील उपसा करणाऱ्या बागायतदारांनी उपसा बंद करावा अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे कार्यकारी अभियंता नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) या जाहीर प्रगटनाद्वारे कळवले आहे. 

सर्व संबंधीत बागायतदारांचे उपसा परवाने 3 सप्टेंबर 2015 च्या जाहीर निवेदनाद्वारे यापुर्वीच स्थगीत केले आहेत. जलाशयातून उपसा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सर्व संबंधीत अधिकृत, अनधिकृत उपसा करणाऱ्या बागायतदारांना उपसा बंद न केल्यास कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. अद्यापही अधिकृत, अनाधिकृत उपसा सुरु असले बाबत निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व संबंधीतांना या प्रगटनाद्वारे उपसा तातडीने बंद करणेबाबत पुन:श्च नोटीस देण्यात येत आहे. अधिकृत, अनधिकृत उपसा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या मोटारी व सर्व साहित्य जप्त केले जाईल व जाहीर लिलावाद्वारे विक्री करुन रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल व त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोद घ्यावी. सर्वांनी उपसा बंद करुन सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेड यांनी केले आहे. 

No comments: