Wednesday, 25 November 2015

नांदेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत पाटनुर घाटातील चोरी उघडकीस अरोपी मुदेमालास अटक



नांदेड (गंगाधर गच्चे) बÚयाच दिवसापासुन पोलीसांना  गुंगारा देऊन जिल्हयात हौदोस घालणार अटल दरोडे हा स्थानिक गुन्हे  शाखेच्या हाती लागला असुन त्याला मुदेमालसह अटक केले आहे.सविस्तर वृत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विवेकानंद भारती हे किनवट येथील गंगानगर भागामध्ये अरोपीचा शोध घेत असतांना त्याचा शोध
घेऊन नेय या उदेशाने पाच महिला पाच पुरष यांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन महिलांना पुढे करुन पोलीस  अधिकारी यांना धमक्या देऊन शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण व त्यांच्या विरुध गुन्हा दाखल झाला  सदर प्रकरणी मुख्य  अरोपी ची माहीती घेतली असल्यामुळे नांदेड जिल्हयातील भोकर  हदगाव भाग्यनगर उमरी परभणी  जिल्हयातील वसमत विदर्भातील पुसद दिग्रस व्दारव्हा यवतमाळ व आंध्रप्रदेशातील आरमुर मेदक जगटयाल तुपरान अशा विविध पोली स्टेशनच्या 
हद्दीमधील दरोडा जबरी चोरी घरफोडी सारखे बरेच गुन्हे त्यांच्यावर दाखल असुन त्यांने लाखोरुपयाचा माल चोरी करुन लंपास
केला आहे  व सन 2005 मध्ये अरोपीने  भोकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरी केली होती त्यातील मुदेमाल सोने  चांदी दागीने  हस्तगत केले आहे सदर अरोपीला पुसद येथील न्यायालयात नेत असतांना तो पोलीसांना गंुगारा देऊन पळाला होता व तो नांदेड  जिल्हयात राहत असल्याने जिल्हयात चोरी दरोडे यांच्यामध्ये वाढ झाली होती याबाबत पोलीस अधिक्षक परमजितसिंह दहीया उप्पर पोलीस  अधिक्षक संदीप डोईफोडे,श्याम घुगे स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली शोध मोहीम सुरु केली असता स्थानिक  गुन्हे शाखेचे पथकाने त्यांचा शोध घेतांना असता अरोपी हा पोलीसांच्या हाती लागला व त्यांची चैकशी  केली असता सुरवातीला उडवाउडवी करीत होता मात्र त्याला विश्वासात घेतले असता त्यांने गुन्हाची कबुली देऊन जबरी चोरुन नेलेला मुदेमाल पैकी पाच लाख रुपये काढुन दिले व अर्धापुर हद्दीतील पाटनुर घाटातील गुन्हाची कबुली दिली तसेच  गुन्हात वापरेली स्कापिओ कार क्रमांक एम.एच.1686 किंमत तिन लाख रुपये जप्त केली सदर अरोपीने हदगाव येथील गुन्हाची कबुली दिली या अटक करण्यात आलेल्या करण्यात गुन्हेगारकडुन त्यांच्या साथी दाराचा शोध घेऊन गुन्हातील मुदेमाल हस्तगत करण्याचे काम करुन  सदर टोळी कडुन अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर पथकामध्ये पोनि संपतराव शिंदे पोउपनि शंकर वाघमोडे  बळीराम दासरे, पिराजी गायकवाड गुंडेराव करले पुंडलीक बोडलेवाड, दत्ता वाणी, ज्ञानेश्वर तिडके, सुभाष आलोने, बालाप्रसाद जाधव देविदास चव्हाण, सुधाकर कदम, शेख ईम्रान चालक रमाकांत शिंदे आदीजनानी अरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

No comments: