नांदेड (गंगाधर गच्चे)
सध्या महाराष्ट्र राज्यासह मराठवाडयात भयंकर दुष्काळ पडला असुन पुढार्यासारखे पावसाचे काम झाले असुन कधी येतो कधी नाही. त्यामुळे शेतकरी दुष्काळात सापडला असुन त्याला यामधुन सावरण्यासाठी शिवसेना सदैव पाठीशी असुन मदतीचा हात म्हणून मी नांदेड मध्ये आलो असुन आत्महत्यागस्त कुंटुबाला व शेतकऱ्यांना एक शेळी दोन पिल्ले व दहा हजार रुपये मदत देत असल्याचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष मा. उध्दवरावजी ठाकरे यांनी नांदेड येथील मल्टीपपर्स हायस्कुल येथील कार्यक्रमात शिवसेनीकांना व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
यावेळी शिवसेना उपनेते तथा पर्यावरणी मंत्री रामदास कदम परिवहन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री दिवाकर रावते, संपर्क प्र्रमुख विश्वनाथ नेरुककर खा. अनिल देसाई राज्यमंत्री विजय शिंदे, विजय शिवतारे, दिपक केसरकर,आ.भरतसेठ गोगावले, आ. प्रतापपाटील चिखलीकर, आ.नागेशपाटील आष्टीकर, आ.हेमंतभाऊ पाटील, आ.सुभाष साबणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की आमचे सरकार हे नेहमी शेतकरी व मजुरदार यांच्या हीताचे असुन आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकÚयांना कर्जमुक्त केले राज्यातील विदयार्थाची शिक्षण फी माफ केली परंतु बऱ्याच ठिकाणी यांची आमलबजावणी होते की नाही शिवसेनिकांनी करावे शाळेत जाण्यासाठी या दुष्काळामुळे
अनेक विदयाथ्यांचे पालक अडचणीत असुन त्यांना आपल्या विदयार्थी मुलांना शिक्षणासाठी पैसे व येजा करण्यासाठी पाससाठी पैसे नसल्यामुळे लातुर जिल्हयातील एक विदयार्थींनी स्वाती पिल्ले हिने आत्महत्या केली याची त्वरित मंत्रीमंडळात निर्णय घेवून परिवहन मंत्रीने विदयाथ्र्यांना मोफत पास देण्याचे आदेश दिल्याने राज्यातील चार लाख पन्नास हजार विदयाथ्र्यांना फायदा झाला. सरकार दुष्काळग्रस्त भागामध्ये अनेक उपाय योजना राबवीत असुन त्यांची अमलबजावणी होते की नाही याची तपासणी शिवसेनीका जावुन करावी शिवसेना नेहमी शेतकऱ्यांना पाठीशी असुन आज मी आपनाला मदतीचा हात देण्यासाठी तुमच्या जवळ आलो आहे
राज्यात भयंकर दुष्काळ पडला असुन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आम्ही तयार आहोत, जर शासनाच्या योजना व दुष्काळसाठी उपाययोजना होत नसतील तर शिवसेना सरकारचा पंचनामा करणार आहे हे बदलेले सरकार असुन आम्ही आपनाला हिम्मत देण्यासाठी आलो आहे व केंद्रसरकारच्या वतीने 10 शेतकऱ्यांसाठी गट शेती योजना राबवत असुन दहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती उद्योगासाठी कर्जाची मागणी करावी ती त्वरीत देण्यात येणार आहे. असे ही उध्दवराव ठाकरे यांनी सांगितले व जिल्हयातील एक हजार शेतकरी यांना एक शेळी दोन पिल्ले व दहा हजार नगदी मदत दुष्काळावर मात करण्यासाठी यावेळी उध्दव ठाकरे यांचा हस्ते वाटप करण्यात आले.
पर्यावरणमंत्री रामदास कदम:- मराठवाडयात भयंकर दुष्काळ पडला असुन पाणी टंचाईचा सामना करावा लागत असुन सर्वत्र पाणी टंचाईचे संकट आहे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यासाठी टॅकरची सुविधा केली असुन टॅकरची मागणी केल्यास तिन दिवसात त्वरीत देऊ किडामुंगी सारखे मानसे मरत आहेत त्यामुळे आम्ही मदतीचा हात देण्यासाठी आलो असुन मा. उध्दवराव ठाकरे साहेब यांनी चित्रपदर्शनातुन मिळवलेले 7 ते 8 कोटी रुपये ते दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी यांना वाटप करीत आहेत, आम्ही दुष्काळावर मात करण्यासाठी उपाययोजना राबवत आहोत असे त्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मल्टीपपर्स हास्यकुलच्या मैदानावर घेण्यात आला यामध्ये जिल्हयातील एक हजार शेतकÚयांना एक शेळी दोन पिल्ले व दहा हजार रुपये वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख भुंजग पाटील डक, मिलींद देशमुख, सहसंपर्क प्रमुख प्रकाश कौडगे, शहराध्यक्ष दत्ता कोकाटे, मनपा विरोधी पक्ष नेता बालाजी कल्याणकर प्रविणपाटील चिखलीकर, दिपक रावत, उमेश मुंडे, पप्पु जाधव, निखील लातुकरकर, अशोक उमरेकर, नेताजी भोसले, बाळु खोमणे,यांच्यासह जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी तालुका प्रमुख महिला आघाडीच्या पदाधिकारी आदी जनांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आ. हेमंत पाटील यांनी केले.

No comments:
Post a Comment