Friday, 20 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. २०-११-२०१५चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. २०-११-२०१५चे बातमीपत्र

~~~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी, पुन्हा पॅरिस : इसिसने जारी केला आणखी एक व्हिडीओ
२- फ्रान्सचा खरा हिरो 'डिझेल' आत्मघातकी हल्ल्यात मृत्युमुखी
३- ISISचे अतिरेकी टेलिग्राम अॅपने करतात संदेशवहन
४- जपानच्या दक्षिण-पश्चिम भागात भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२
५- चीनच्या झिनजियांगमध्ये २८ दहशतवाद्यांना ठार मारल्याचे वृत्त
~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय}
६- मोदींच्या सुवर्ण योजनेचा फज्जा, अवघे 400 ग्रॅमच सोने जमा
७- ७ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारी तिजोरीवर १,०२,००० कोटींचा भार पडणार - अर्थमंत्री अरुण जेटली
८- ७व्या वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू होणार आहे, यामुळे १६ टक्के पगारवाढ, भत्त्यात ६३ टक्क्याने वाढ आणि २४ टक्के पेन्शन वाढणार
९- मद्रास : धर्मपरिवर्तन न केल्यास हिंदू वधू-ख्रिश्चन वराचं लग्न अवैध - मद्रास हायकोर्ट
१०- नितीश कुमारांचा आज शपथविधी
११- शीना बोरा हत्याप्रकरण : पीटर मुखर्जीला सीबीआयकडून अटक
१२- गोहत्या करणाऱ्यांना देशात राहण्याचा हक्कच नाही - काँग्रेस नेते हरिश रावत
१३- नवाब मलिकांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार - गिरीश बापट
१४- घसघशीत वेतन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना २३ टक्के पगारवाढीची शिफारस
१५- श्रीलंकेच्या नौदलाने पकडलेल्या १४ मच्छिमारांसंदर्भात पंतप्रधानांनी लक्ष घालावे - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता
१६- जम्मू-काश्मीरमधील पामपोरे येथे हँडग्रेनड हल्ल्यात राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या २ जवानांसह २ नागरिक झाले जखमी
१७- गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली चीनच्या पंतप्रधानांची भेट
~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१८- सीएमसाहेब, वहिनींचे तरी ऐका; डाळीच्या मुद्द्यावर सेनेचे टोले
१९- बाळासाहेबांच्या महापौर बंगल्यातल्या स्मारकाला नारायण राणेंनी केला कडाडून विरोध
२०- छत्तिसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक
२१- मध्य प्रदेशच्या राज्यपालांना हटवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल, केंद्र व राज्य सरकारला नोटीस जारी करत ३ आठवड्यांत उत्तर मागवले
२२- बिहारमध्ये एनडीएचे सरकार आले असते वस्त्या पेटल्या असत्या -आझम खान यांचे वक्तव्य
२३- मुंबई - पश्चिम द्रुतगती मार्गावर डोमेस्टिक एअरपोर्टजवळ टेम्पोमध्ये बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने
~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२५- मुंबईत आगीच्या तीन घटना, आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश
२६- रत्नागिरीत मच्छीमारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन
२७- नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय चर्चेत, डॉक्टरावर लैंगिक शोषणाचा आरोप
२८- अलाहबाद युनिव्हर्सिटीतील खासदार योगी आदित्यनाथ यांचा कार्यक्रम रद्द केल्याने नाराज विद्यार्थ्यांनी पोलिसांवर केली दगडफेक
२९- आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये सुरक्षा रक्षकांशी झालेल्या चकमकीत २ शिकारी ठार
३०- मुसळधार पावसामुळे तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत, मृतांचा आकडा १२० वर पोचला
३१- आंध्र प्रदेशात मुसळधार पासवामुळे ३५ जणांचा मृत्यू
३२- यवतमाळमध्ये भारनियमाने त्रस्त झालेल्या शेतक-यांचे आंदोलन, नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर रास्ता रोको
३३- दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती नगरमध्ये असून आज कोपरगाव, संगमनेर येथे करणार पाहणी
३४- शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणात आरोपी असलेले पश्चिम बंगालचे माजी परिवहन मंत्री मदन मित्रा यांचा जामीन कोलकात्ता उच्च न्यायालयाने फेटाळला
~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३५- 'संघर्ष यात्रा' सिनेमात श्रुती मराठे साकारणार पंकजा मुंडे
३६- भारत - पाक क्रिकेट मालिकेचा निर्णय लवकरच होईल - BCCI
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
संजय निंबाळकर, अजय मावडे, माधवराव ताटे, संतोष शेपाल, आशिष सावंत, राज माहेश्वरी, लक्ष्मीकांत आगलावे, राहुल जैन,
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
(पंकज सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: