Monday, 23 November 2015

नमस्कार लाईव्ह दि. २३-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. २३-११-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र


-------------------
[अंतरराष्ट्रीय]
१- भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सुटला नसला तरी गेल्या काही वर्षापासून या सीमेवर युद्ध झालेले नाही, दोन्ही देश खूप संयम बाळगत आहेत - नरेंद्र मोदी
२- इस्लामिक स्टेटमध्ये २३ भारतीय तरूण सामील, त्यापैकी ६ जण ठार
-------------------
[राष्ट्रीय]
३- लोकसभेचे कामकाज योग्यरितीने चालविण्यासाठी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना पत्र
४- भूकंपाने उत्तर भारत पुन्हा हादरला, अफगाणिस्तानात केंद्र, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.0 नोंद
५- जम्मू-काश्मीरच्या कटरामध्ये हेलिकॉप्टरला अपघात, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या 6 भाविकांचा मृत्यू
६- शीना बोरा हत्याकांड कटाची मला माहिती नव्हती - पीटर मुखर्जी
-------------------
[राज्य]
६- मुंबई : कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने निर्वाणीचा इशारा, कागदपत्रांची पूर्तता न केल्यास पक्षांची नोंदणी रद्द
७- भाजपने आश्वासन पाळावं, विस्तारापूर्वी मित्रपक्षांची अपेक्षा
८- महाराष्ट्रात डान्स बारवर बंदी घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांने सुप्रीम कोर्टात याचिका केली दाखल
९- डाळीमुळे बापट गॅसवर, सचिवांना 5 पानी पत्रातून जाब
१०- कोल्हापूर टोलबंदीला एक महिुन्याची मुदतवाढ, ३१ डिसेंबरपर्यंत टोलबंदी कायम, आयआरबी आणि राज्य सरकार यांच्यात अद्याप तोडगा नाही
११- पहिले मराठी बालनाट्य संमेलन २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान सोलापूरमध्ये होणार
१२- मुलींची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करणार - पंकजा मुंडे
-------------------
[प्रादेशिक]
१३- बिहार : पोलीस अधिका-याला धमकी दिल्याप्रकरणी राजदचे आमदार सरोज यादव याच्यांवर गुन्हा दाखल
१४- साताऱ्यात पावसाच्या सरी, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस
१५- नागपुरात छेडछाडीत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, मुलगी जखमी
१६- वसई : प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून, मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून अपघाताचा बनाव,  कारनामा तब्बल महिनाभरानंतर उघड
१७- गणवेश आणि पुस्तकं विकत घ्यायला पैसे नाहीत म्हणून शेतकरीपुत्राची आत्महत्या, अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात दधम गावातील घटना
१८- अहमदनगर : जामखेड तालुक्यात वाकी येथे अभिमान केशव देवगिरे या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू
१९- शहर व ग्रामीण भागातील वृद्ध गायी, भाकड जनावरे व शहरातील भिकारी यांच्यासाठी अन्नपूर्णा माता वडेपुरी येथे संगोपनासाठी सहकार्य करण्यासाठी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
२०- लोहा: बेटमोगरा गावातील नाथजोगी समाजाच्या पंचावन्न परिवारास वाळीत टाकलेला निर्णय अखेर जात पंचायतीच्या पंचानी घेतला मागे
------------------
[इतर]
२१- भारत - पाकिस्तान यांच्यातील सामने श्रीलंकेत खेळविण्याची शक्यता
२२- अखेर प्रीती झिंटाला कोई मिल गया
-------------------
[सुविचार]
अगर आप आप एक पेन्सिल बनकर किसीकी ख़ुशी ना लिख सको तो,
कोशिश करो की एक रबर बनकर किसी का दुःख मिटा सको
[प्रदीप भद्रे, नमस्कार लाईव्ह वाचक]
-------------------
[जाहिरात]

शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही

फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....
संपूर्ण भारतात व जगभरात.....

केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........

फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध

<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन,
 घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>

प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार

संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: