Sunday, 22 November 2015

संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियानाची आजपासून जिल्‍हास्‍तरीय तपासणी



संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियानाची आजपासून जिल्‍हास्‍तरीय तपासणी
नांदेड, 22, नांदेड जिल्‍हयातील संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियानाची जिल्‍हास्‍तरीय तपासणी आज सोमवार दिनांक 23 नोव्‍हेंबर पासून करण्‍यात येणार आहे.
ठाणे जिल्‍हा परिषदे मुख्‍य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली अकरा अधिकारी जिल्‍हयातील गावांची तपासणी करण्‍यात येणार आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियानात तालुकास्‍तरावर पहिला व दुसरा क्रमांक पटकाविलेल्‍या ग्रामपंचायतींची तपासणी होणार आहेत. यात ग्राम पंचायतीसाठी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज स्‍वच्‍छ ग्राम पंचायत, शाहु-फुले-आंबेडकर दलित वस्‍ती अभियान तसेच साने गुरुजी स्‍वच्‍छ शाळा व सावित्रीबाई फुले स्‍वच्‍छ अंगणवाडीसाठी तपासणी करण्‍यात येणार.  
यासाठी जिल्‍हयातील सर्व ग्रामपंचायती सज्‍ज झाले असून तिन दिवस या गावांची तपासणी करण्‍यात येणार आहे. यात तालुकास्‍तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी गावात थांबून सदर टिमला गावे दाखवावीत असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.ए. रामोड यांनी केले आहे.

No comments: