कुसुम सभाग्रहात चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सहाव्या दिवशी सुहास देशपांडे लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व अॅट अंश डॉट कॉम’ हे नाटक सादर झाले. गूढ पद्धतीने जगणाऱ्या एका कुटुंबाची वेथा या नाटकात मांडण्यात आली.
परदेश्यात स्थाईक होणारा मुलगा, त्याचा सहवास मिळावा म्हणून तरसणारे आई-वडील आणि एका मुलीच्या मदतीने संपत्तीसाठी आपल्याच आई-वाडिलांना संपवू पाहणारा मुलगा यांच्यात गुंफवण्यात आलेलं या नाटकाचे कथानक, वाईट गोष्टीवर चांगुलपणाचा विजय मिळवता येतो हि गोष्ठ अधोरेखित करून जातो.
या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या नात्याने सुहास देशपांडे यांनी या तिन्ही बाजूस योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला तर अनघाच्या भूमिकेत स्वाती देशपांडे व प्राचीच्या भूमिकेत असलेली अदिती देशपांडे यांच्या कसदार अभिनयाने प्रक्षकांना अंतर्मुख केले. छोटीशी भूमिका असून स्वतःच्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची वा..वा.. मिळवली ती पलंबर च्या भूमिकेतील श्री. रमेश पतंगे यांनी.
या नाटकाचे नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा या सर्वच बाजू आशयाशी निघडीत दिसून आल्या. या नाटकाचे नेपथ्य रवी तेलंग, संगीत कु. उशा देशपांडे, प्रकाश योजना सागर पव्हाड यांनी आशयाशी निघडीत योग्य पद्धतीने करून नाटकाचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास मदत केली .
एकंदरीत स्पर्धेच्या सहाव्या दिवशी प्रेक्षकांना एक कोटुंबीक आशयपूर्ण नाटक पाहावयास मिळाले याचे समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसून आले. आज दि. २७/११/१५/ रोजी सांस्कृतिक मंच, नांदेड च्या वतीने वा गुरु हे नाटक सादर होणार आहे तरी या नाटकास जास्तीत जास्त संखेने प्रेक्षकांनी उपस्तीती लाऊन स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे व नाटकाचा अस्वाद घ्यावा अशी विनंती समन्वयक दिनेश कवडे यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment