महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे पार पडत आहे.१८ नोव्हें पासून सुरु झालेली हि स्पर्धा ५ डिसें पर्यंत चालणार असून त्यात रोज सायंकाळी सात वाजता एका नाट्य कलाकृतीचा अस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.असेच एका नवीन नाट्य कलाकृतीचा अस्वाद प्रेक्षकांना घेता आला ते स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी राहुल जोंधळे लिखीत, दिग्दर्शित “ बाजार ” या नाटका मधून, शिक्षणाच्या बाजारीकरणावर आधारित या नाटकाच्या आशयातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रकर्षाने मांडण्यात आले. या नाटकात अनेक महापुरुषांचेहि विचार मांडण्यात आले या नाटकातील सर्वच नवोदित कलाकारांचा उत्साह व त्यांचा अभिनय नाटकाला एक वेगळीच उंची मिळवून देतात. यात सुरज नगारे यांनी साकारलेली भूमिका सर्वांच्या लक्षवेधक ठरली तर विजय गजभारे, चंद्रकांत तोरणे, नाग्शेन गायकवाड, शुभम कळसकर, सुभाष जोगदंड, दत्ता जिंके, बंटी थोरात, अविनाश बोनाकुड्केवर, विजय भालेराव, सतीषलोने, सचिन कानोडे, साईनाथ भूसावले यांनी आप आपल्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. या नाटकातील नेपथ्य शिवशंकर मुळे यांनी साकारले तर प्रकाश योजना सत्यपाल नरवाडे यांनी सांभाळली. या नाटकाची जमेची बाजू म्हणजे या नाटकातील नेपथ्य हे आशय पूर्ण व लक्ष वेधक होती. या नाटकाश अनेक माण्यवरांसहित प्रेक्षकांनीही खूप मोठया प्रमाणात उपस्थिती लावली. दर वर्षीप्रमाणे या हि वर्षी समन्वयक दिनेश कवडे हे प्रेक्षकांची पावले सभाग्रहाकडे वळवण्यास यशस्वी झाले.
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 22 November 2015
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने नांदेड येथे १८ नोव्हे. ते ५ डिसेंबरपर्यंत चालणार मराठी राज्य नाट्य स्पर्धा
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे पार पडत आहे.१८ नोव्हें पासून सुरु झालेली हि स्पर्धा ५ डिसें पर्यंत चालणार असून त्यात रोज सायंकाळी सात वाजता एका नाट्य कलाकृतीचा अस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.असेच एका नवीन नाट्य कलाकृतीचा अस्वाद प्रेक्षकांना घेता आला ते स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी राहुल जोंधळे लिखीत, दिग्दर्शित “ बाजार ” या नाटका मधून, शिक्षणाच्या बाजारीकरणावर आधारित या नाटकाच्या आशयातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रकर्षाने मांडण्यात आले. या नाटकात अनेक महापुरुषांचेहि विचार मांडण्यात आले या नाटकातील सर्वच नवोदित कलाकारांचा उत्साह व त्यांचा अभिनय नाटकाला एक वेगळीच उंची मिळवून देतात. यात सुरज नगारे यांनी साकारलेली भूमिका सर्वांच्या लक्षवेधक ठरली तर विजय गजभारे, चंद्रकांत तोरणे, नाग्शेन गायकवाड, शुभम कळसकर, सुभाष जोगदंड, दत्ता जिंके, बंटी थोरात, अविनाश बोनाकुड्केवर, विजय भालेराव, सतीषलोने, सचिन कानोडे, साईनाथ भूसावले यांनी आप आपल्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. या नाटकातील नेपथ्य शिवशंकर मुळे यांनी साकारले तर प्रकाश योजना सत्यपाल नरवाडे यांनी सांभाळली. या नाटकाची जमेची बाजू म्हणजे या नाटकातील नेपथ्य हे आशय पूर्ण व लक्ष वेधक होती. या नाटकाश अनेक माण्यवरांसहित प्रेक्षकांनीही खूप मोठया प्रमाणात उपस्थिती लावली. दर वर्षीप्रमाणे या हि वर्षी समन्वयक दिनेश कवडे हे प्रेक्षकांची पावले सभाग्रहाकडे वळवण्यास यशस्वी झाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment