Monday, 30 November 2015

सद्विचारांना कार्यातून नित्यस आकार देणे गरजेचे - डॉ. उमेश देशपांडे



नांदेड, 
    येथील गंगुताई थाले ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा मानाचा आई पुरस्कार मिळाल्याबद्दल नामांकित ऑर्थोपिडीक डॉ. उमेश देशपांडे यांचा विशेष कार्यक्रमातून शाल, श्रीफळ, पुष्पहार, तुळजामातेची चांदीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
विश्वप्रेम प्रतिष्ठानच्या संचालिका श्रीमती वर्षाताई जमदाडे यांनी आयोजीत केलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात डॉ. उमेश देशपांडे यांचा मा. मधुकर कुर्तडीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. देशपांडे हे गेल्या विस वर्षांपासुन वैद्यकिय क्षेत्रात आपली सेवा देत आहेत. आपल्या लाघवी संवाद कौशल्याने रूग्णांना विलाजा आधीच अर्धे बरे करण्याची कला त्यांच्यात आहे. त्यांनी पुणे येथे अनेक अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अतिशय दुर्गम भागातील गरिब गरजू रूग्णांना ते आपली सेवा प्रदान करतात. आपल्याला आई पुरस्कार मिळणे हा खुप मोठा सन्मान असुन रूग्णांकडुन मिळालेला आशिर्वाद आणि पत्नीची पदोपदीची साथ यामुळेच हे शक्य झाले असेही ते म्हणाले. आजवर संस्कार, संस्कृती आणि विश्वास यांच्या जोरावर सद्विचारांना कार्यातुन नित्य आकारदेत आलोय आणि हे प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे विचार डॉ. देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमात प्रा. हुकूमचंद जैन यांना दलित साहित्य परिषदेचा तथागत गौतम बुद्ध नॅशनल फेलोशिप अवार्ड मिळाल्याबद्दल जॉन अय्यर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गरजुंना मदत करून माणुसकि जपत राहण्याची दखल घेणे मी माझे कर्तव्य समजते. सर्वांना सन्मानाने वागवलेतरच आपल्याला सन्मान मिळेन आणि निर्मळ मनाने भावनिक नात्यांतून ही कर्तव्यनिष्ठा जपते, अशी भावना कार्यक्रमाची भुमिका मांडताना वर्षाताई जमदाडे यांनी मांडली. 
कार्यक्रमाची प्रस्तावना अधोरेखित करताना मुक्ता पेटकर यांनी प्रत्येक व्यक्ती सकारात्मक प्रवृत्तीनेच मोठी होते. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणार्‍यांची उर्मी ही एकूणच समाज मनाला सकारात्मक उर्जा देत राहते. त्याचे उत्कृष्ट दाखले हे कार्यक्रमातील उपस्थित सर्व मान्यवर आहेत, अशा शब्दांत त्यांनी मानवतेच्या भावना उपस्थितांवर बिंबवल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रस्तावना मुक्ता पेटकर यांनी केली तर कार्यक्रमाची भुमिका सांगुन आभार प्रदर्शन श्रीमती वर्षाताई जमदाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी ऍड. मिलींद लाढकर, धनंजय कुलकर्णी, पत्रकार मुक्ता पेटकर, संतोष क्षिरसागर, फिरोज पटेल, धनंजय कुलकर्णी, मुकूंद देशपांडे, वर्षा जोशी, सुमित लांडगे, सौ. सारिका लांडगे आदि मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

No comments: