नेहरूंच्या कार्यकाळात'लोकशाही'मजबुत होती
- सौ.वर्षाताई भोसीकर
कंधार वार्ताहर (व्हि के कतरे पांगरेकर)
संविधानातील धर्मनिरपेक्षता कायम करणे आणि विविध योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करणे आदी कामे करण्यावर पंडित जवाहरलाल नेहरू सरकारचा भर होता.त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातच लोकशाही मजबुत होती असे प्रतिपादन जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी केले.
प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्याशाळेत दि.१४ नोव्हेबर रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू अंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार प्राप्त पत्रकार राजेश्वर कांबळे,सिद्धार्थ वाघमारे,मयुर कांबळे,हनमंत पेठकर,सुधीर तपासे,निळू चिरले,संभा नांदेडे यांची प्रमुख उपस्तिथी होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर व संजय भोसीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सौ.वर्षाताई भोसीकर पुढे म्हणाल्या की.पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जगातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीय नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. पंचशील तत्वेही त्यांनी मांडली.पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत तटस्थ राष्ट्रांचा गट बनविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांना मुलं प्रेमानं ''चाचा नेहरु'' म्हणत. मुलं आणि फुलं हा पंडितजींच्या हृदयातील एक अमुल्य ठेवा होता. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला. ''मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे.
नेहरु हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. पराराष्ट्र खातं त्यांनी आपल्याकडेच ठेवलं. अमेरिका व रशिया या दोन महाशक्तिंशी नेहरुंचे मित्रत्त्वाचे संबंध असल्याने एकाशी मैत्री, तर दुसर्याशी शत्रूत्त्व करण्यात त्यांना स्वारस्य नव्हतं. यासाठी त्यांनी अलिप्तवादी धोरण अंगिकारले. देशा-देशांमधील कोणताही वाद-तंटा शांततेने, वाटाघाटीवरुन, सामोपचाराने सोडविण्याचे कौशल्य पंडितजींच्या अंगी होत.असे त्या म्हणाल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अशोक कांबळे यांनी केले तर आभार माजीद बेग यांनी मानले

No comments:
Post a Comment