Thursday, 19 November 2015

जागतिक शौचालय दिनानिमित्‍त आज नांदेड जिल्‍हयातील अनेक गावातून शौचालय बांधकामाचा शुभारंभ

नांदेड, 19- जागतिक शौचालय दिनानिमित्‍त आज नांदेड जिल्‍हयातील अनेक गावातून शौचालय बांधकामाचा शुभारंभ करण्‍यात आला. यावेळी ग्राम पंचायतीचे सदस्‍य, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
     नांदेड जिल्‍हयातील 465 ग्राम पंचायती वार्षिक कृती आराखडयात निर्मल करण्‍यासाठी घेण्‍यात आले असून या गावांमध्‍ये शौचालय बांधकामासाठी विशेष उपक्रम राबविले जात आहेत. दिनांक 19 नोव्‍हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्‍त शौचालय बांधकामाचा शुभारंभ करण्‍यात आला आहे. येत्‍या मार्च अखेर ही गावे 100 टक्‍के हागणदारीमुक्‍त करण्‍यात येणार आहेत.या गावांमध्‍ये 85 हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्‍ट ठेवण्‍यात आले आहे.
     हे उद्दिष्‍ट साध्‍य करण्‍यासाठी 17 नोव्‍हेंबर पासून गट विकास अधिकारी, मिनी बिडीओ, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक गावात मुक्‍काम करुन शौचालय बांधकामासाठी गावक-यांना मार्गदर्शन करत आहेत. यासाठी ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, बचतगट, युवक-युवती यांचा उत्‍स्‍फुर्त सहभाग मिळत आहे. शौचालय बांधकाम केल्‍यानंतर पात्र लाभार्थ्‍यांना 12 हजार रुपयांचे अनुदान देण्‍यात येणार आहे.
4 हजार शौचालयाचा शुभारंभ
‍     वार्षिक कृती आराखडयात घेण्‍यात आलेल्‍या 465 गावांमध्‍ये प्रत्‍येकी 10 शौचालये या प्रमाणे सुमारे 4 हजार शौचालयाचा आज शुभारंभ करण्‍यात आला आहे. येत्‍या 15 दिवसात ही शौचालये बांधण्‍यात येणार आहे. याप्रमाणे टप्‍प्‍याटप्‍प्‍याने नियोजन करुन सदरील गावे निर्मल करण्‍यात येणार आहेत, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड यांनी दिली आहे.

No comments: