नांदेड, गंगाधर गच्चे ―
जिल्हयामध्ये दुष्काळ पडला असुन ग्रामीण भागामध्ये तिव्र पाणी टंचाईचा झाला सुरु झाल्या आहेत व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असुन जिल्हा परिषदेला दलीतवस्तीसाठी 22 कोटी निधी मिळाला असुन त्यापैकी 50 टक्के निधी हा पाणी टंचाई वर खर्च करणार असल्याचे बैठकीत जिपचे उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे यांनी सांगितले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली त्यामध्ये जिल्हयाच्या पाणी टंचाई बाबत चर्चा करुन पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असुन सध्या जिपमध्ये दलितवस्तीचा 22 कोटी रुपये निधी पडुन असुन त्यापैकी 50 टक्के निधी हा पाणी टंचाई दुरकरणार असे जिपचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती दिलीपदादा धोंडगे यांनी सांगितले. ही बैढक जिप अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडीले यांच्या अध्यक्षपेखाली घेण्यात आली असुन बैढकीमध्ये अनेक विकास कामे जिल्हयातील योजनाचा यावेळी आढावा घेण्यात आला योवळी उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, शिक्षणसभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती स्वप्नील चव्हाण,बांधकाम व अर्थ सभापती दिनकर दहीफळे, महिला व बालकल्याण सभापती सौ.वंदना लहाणकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, कोमावाड रामोड, कृषी अधिकारी मोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी गोहोत्रे,यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment