Thursday, 26 November 2015

गोदावरी गंगा पुजनाने उजळला नगिनाघाटाचा परिसर




 नांदेड-   सतत दहाव्या वर्षी कार्तिक पौर्णिमेनिमीत्त भाजपाचे  धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या           गोदावरी गंगा पुजनामध्ये शेकडो महिलांनी एकाचवेळी हजारो  दिवे नदीपात्रात सोडल्यामुळे  उजळलेला नगिनाघाटाचा परिसर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली.                                                                                                   
  भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ.धनाजीराव देशमुख,लायन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष दिलीप मोदी,लंगरसाहब गुरूद्वाराचे मोरबाबाजी,हभप राऊत महाराज यांच्या हस्ते गंगेची आरती करण्यात आली.सालासार भजन मंडळाचे सदस्य गिरीराज लोहीया ,कमल दायमा,बिरबल यादव यांनी सांगितिक आरती म्हटली. संयोजक अॅड.दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकात संगणक युगात आपल्या  परंपरा विसरू नये यासाठी सातत्याने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.संतोष परळीकर यांच्या मंत्रोच्चारात महिलांनी परीवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सामुहिक पुजा केली.प्रतिष्ठित व्यापारी योगेश जैस्वाल यांच्यातर्फे  उत्कृष्ट पुजेची थाळी सजविणा-या वर्षा ठक्कर,मंजुषा धारासुरकर,ममता जैस्वाल,जया जैन,अमिता जोशी,रचना तोष्णीवाल,शांता बाहेती,श्वेता कदम सह  21 महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच सोडत काढून 101 महिलांना भेटवस्तू देऊन  गौरविण्यात आले.मिना सामते,करूणा अग्रवाल,मिना पाटणी,आरती पुरंदरे,उज्वला दर्डा यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.अतिरिक्त जिल्हाधिकारी राम गंगराणी,प्रविण साले,धनंजय डोईफोडे,सतीश सामते,राजेन्द हुरणे,अँड.प्रवीण अग्रवाल,अमरसिंह चौहान,शशीकांत पाटील,सरला मोदी,जयश्री ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. भाजपाच्या वतीने दिपकसिंह ठाकूर ,राजेश केंद्रे,सुनील पाटील,संजय यादव यांच्या हस्ते माध्यम प्रतिनीधींचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मोहनसिंग तौर,अरविंद भारतिया, प्राचार्य आर.के.पाटील,सुनील देशपांडे,सुरेश हजारी,उभनलाल यादव,डॉ.महेन्द्रकर,नित्यानंद मैय्या ,अनिल पडवळ,संदीप छापरवाल,राजेश देशमुख,शंकर येमेवार,सरिता बैस  यांची प्रमुख उपस्थिती होती.मनपातर्फे जीवरक्षकाची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज ठाकूर,संतोष भारती,विजय अटकूरकर, सुभाष पाटील, अनिल चिद्रावार, लक्ष्मन गुडेवार,कैलाश वैष्णव,राहुल बनसोडे,किशोर ठाकूर,सुभाष कुकडे  ,शेख नुर, रवी पाटील,गणेश ठाकूर,विशाल परदेशी,महेश देबडवार,शेखर अंबारे यांनी परीश्रम घेतले.          
नगरसेविका गुरूप्रितकौर दिलीपसिंह सोडी यांच्या पुढाकारातून परिसर स्वच्छ ठेवण्यात आला होता.कार्यक्रम संपल्यानंतर गुरुद्वारा लंगर साहब तर्फे महाप्रसादाचे व सत्तू महाराज यांच्यातर्फे अन्नकुट चे आयोजन करण्यात आले.हरिद्वार ,वाराणशीच्या तोडीची आरती दहा वर्षापासून घेत असल्याबाबत संयोजकाचे नांदेडकरांकडून कौतुक होत आहे.

No comments: